Home Blog Page 419

हिंगणघाट काँग्रेस कडून इशारा शहरात डेंगुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करा !

0

 

हिंगणघाट . २३ ऑगस्ट
हिंगणघाट शहरात दिवसेंदिवस डेंगूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वेगाने वाढत चालेला असून यावर नगरपरिषदने तातडीने उपाययोजना करण्याचे मागणिचे निवेदन शहर काँग्रेस हिंगणघाट अध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस हिंगणघाट च्या वतिने देण्यात आले असून दोन-तीन दिवसांत उपाय योजना केल्या नाही तर हिंगणघाट शहरात तिव्र आंदोलन केल्या जाईल असा सबळ ईशारा देण्यात आला.
कॉंग्रेस पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले असता नगरपरिषद ईमारतित अस्वच्छता व कच-याचे ढिग दिसून आल्याने कॉंग्रेस पदधिका-यान कडून संताप व्यक्त करण्यात आला.
गेल्या 7 दिवसांपासून सफाई कामगार बेमुदत संपावर गेले आहे यामुळे घंटा गाडी,नाली सफाई डेंगुची प्रतिबंधक औषधी फवारणी पुर्णतः हा बंद आहे त्यामुळे रोगराई व अस्वच्छतेचा डोंगर गाठलेला आहे .
हिंगणघाट शहरात डेंगुच्या जीवघेण्या साथरोगाचा प्रादुर्भाव सुरू असून नगरपालीका कुंभकर्णी झोपेत आहे.
नगरपालीकेने शहराचे पालकत्व स्विकारले असते, त्याचं भानं ठेवून नगरपालीकेने जनतेच्या स्वास्थाकडे जाणिवपूर्वक लक्ष द्यावे.अशी मागणी कॉंग्रेस च्या वतिने मुख्याधिकारी जगताप, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तसेच ठाणेदार चव्हाण,यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आले असून, तातडीने डेंगू सारख्या जिवघेण्या साथरोगावर उपाययोजना केली नाही तर तिव्र आंदोलन करू,असा ईशारा शहर काँग्रेस तर्फे करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने पंढरीनाथ कापसे माजी नगराध्यक्ष, अध्यक्ष शहर काँग्रेस हिंगणघाट, अमित चाफले जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस, ज्वलंत मून अध्यक्ष किसान कॉंग्रेस हिंगणघाट,नकुल भाईमारे विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस, अंकुश कुचंनवार अध्यक्ष युवक काँग्रेस हिंगणघाट,हुमायू बेग उपाध्यक्ष शहर काँग्रेस हिंगणघाट,सय्यद मेराज अध्यक्ष अल्पसंख्यांक , गुणवंत कारवटकार, पंकज पाके,नागेश जिवणकर, अमोल हरडे,पवन मेश्राम, नितेश कवचकर,श्रीकांन्त देवपल्लीवार, व कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

आदीवासी नागरीकांच्या आरोग्यासाठी व अमृत पोषण आहार योजनेसाठी वर्षाला कोटयावधीचा खर्च तरीही कुपोषणग्रस्त

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शासनाकडुन आदीवासी वस्ती व पाड्यांसाठी विविध योजना अंतर्गत जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी मिळत असतो असे असतांना तालुक्यात आठ महिन्यांचा बालक कुपोषणाचा बळी पडतो ही शोकांतिकाच म्हणावी लागेल या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडुन जाणुन घेतला आदीवासींच्या योजना संदर्भातील माहीतीचा विशेष वृत्तांत . यावल तालुक्यातीत वड्री आसराबारी येथील आदीवासी वस्तीवर मागील महीन्यात कुपोषणामुळे आट महीन्याच्या आकाश बारेला या नांवाच्या बालकाचा जळगाव येथे दुदैवी मृत्यु झाला आणी या निमित्ताने तालुक्यात महीला व बालविकास विभाग व आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ आणी भ्रष्ठ कारभाराचे पितळ उघडे पडुन सत्य समोर आलेत, दरम्यान त्या आदीच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तालुक्यातील कुपोषणग्रस्तांची धक्कादायक आकडेवारी समोर याच वेळीस डॉ .आशिया यांनी महीला व बालविकास तथा आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारावर नाराजी व्यक्त केली होती . याबाबत प्रस्तुत प्रतिनिधी यांनी एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी वस्तीवर वास्तव्यास राहणाऱ्या आदीवासी बांधवांच्या चिमकुल्या मुलांसाठी ए पी जे अब्दुल कलाम अमृत पोषणहार या योजनेच्या माध्यमातुन आदीवासीच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येवु नये यासाठी शासनाच्या वतीने वर्षाला सुमारे तिन कोटी रुपयांचे खर्च केले जातात तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातुन आदीवासी बांधवांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबवुन त्यांच्या कुटुंबाची युद्ध पातळीवर काळजी घेण्या संदर्भात विविध आरोग्य योजने अंतर्गत वर्षाला पाच कोटी रूपयांचा निधी खर्च केला जात असतात अशी माहीती प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिली असुन आमच्या विभागाअंतर्गत केलेल्या शोध कार्यात देखील आदीवासी योजनेच्या अमलबजावणी संदर्भात अनेक गंभीर प्रकार समोर आले असुन , आमच्या ही स्वतंत्र चौकशीचा अहवाल हा वरिष्ठा पर्यंत पाठविण्यात आले आहे .असे असतांना ही जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यात कुपोषणग्रस्तांची वाढलेली संख्या ही धक्कादायक व शासकीय योजना या खऱ्या अर्थाने आदीवासी वस्ती व पाडया वाडयांवर फक्त कागदावरच पहोचलेली दिसुन येत असुन, प्रत्यक्षात या योजनांची अमलबजावणी झालेली नसल्यानेच कुपोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आलेत. या सर्व कुपोषणग्रस्तांच्या विषयाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांनी गांर्भीयाने घेतले असुन , कुपोषण संदर्भातील निष्पक्ष चौकशी व्हावी या दृष्टीकोणातुन त्रियसदस्यांची नेमकुण केली व समितीच्या अहवालावरून कुपोषणग्रस्त आट महीन्याच्या बालकाच्या मृत्यु प्रकरणी ७ जणांना शॉकॉज नोटीसा पाठविल्या असुन , पुढील होणाऱ्या कार्यवाहीकडे विविध राजकीय पक्ष समाजसेवी संघटना व आदीवासी बांधवांसह सर्वांचे लक्ष लागुन आहे .

भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी वतीने परभणी जिल्हा स्तरीय अभ्यास वर्ग अंतर्गत राष्ट्रीय स्वस्थ स्वयंसेवक अभियान राबविण्यात आले

0

 

अजहर पठाण परभणी

परभणी सेलू तालुक्यातील वालुर येथे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्य वतीने परभणी जिल्हा स्तरीय अभ्यास वर्ग अंतर्गत राष्ट्रीय संस्थ स्वयंसेवक अभियान राबविण्यात आले या अभियानाचे आयोजन डॉ संजय लोंढे साहेब प्रदेश सहसंयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी केले होते या राष्ट्रीय स्वस्थ स्वयंसेवक अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ सुभाष कदम जिल्हाध्यक्ष भाजप परभणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर बाबासाहेब जामगे जिल्हा महामंत्री भाजप परभणी सुरेश भाऊ भुमरे जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा परभणी भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उद्धवराव नाईक डॉ विद्याताई चौधरी जिल्हाध्यक्ष भाजप महिला आघाडी आय आय टी सेल प्रमुख भाजप परभणी डॉ मनोज पोरवाल महानगर जिल्हाध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडी परभणी डॉ उमेश देशमुख भाजपा प्रवक्ते परभणी डॉ पंडित दराडे जिल्हा उपाध्यक्ष भाजप परभणी जयसिंग भाऊ शेळके जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी भागवत दळवी जिल्हा चिटणीस भाजप परभणी अभिजीत रोडगे महामंत्री भाजप युवा मोर्चा परभणी रामप्रसाद पोळ जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा परभणी महादेव जिल्हा कोषाध्यक्ष भाजप युवा मोर्चा परभणी भाजपा तालुकाध्यक्ष सेलू बाळासाहेब जोगदंड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सेलू शिवहरी शेवाळे भाजपा किसान मोर्चा सेलू तालुका अध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष सेलू आजार भाई पठाण ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सेलू बाजीराव बोडखे ह भ प दतरावजी मगर महाराज सोंन्नेकर सदाशिव भाऊ निकम कृषी उत्पादन बाजार समिती माजी उपसभापती सेलू शहराध्यक्ष कपिल भाऊ फुलारी नाईकवाडे अण्णा माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा महिला तालुका अध्यक्षा सेलू वनिता ताई चाफेकर किसान मोर्चा महिला तालुका अध्यक्षा अर्चना राऊत चंद्रकांत चौधरी आबा वायद भाई पठाण विठ्ठल भाऊ कोकर सेलू तालुका सचिव गणेश खेडकर सेलू तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रदीप झिंबरे भाजपा किसान मोर्चा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष एकनाथ टाकरस सोशल मीडिया युवा मोर्चा गजु भाऊ नांद्रेकर किसान मोर्चा उपाध्यक्ष बळीराम गटकळ किसान मोर्चा चिटणीस गोविंद भाऊ मगर किसान मोर्चा उपाध्यक्ष वैभव देशमुख किसान मोर्चा चिटणीस कंस मानमोडे किसान मोर्चा चिटणीस मसूद अन्सारी वालूर शहराध्यक्ष बंडू आरे युवा मोर्चा शहराध्यक्ष वालूर शिवाजी जीवनी युवा मोर्चा कोषाध्यक्ष दत्ता गिरी चिकलठाणा किसान मोर्चा सर्कल प्रमुख अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा किसान मोर्चा सेलू तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील यांनी प्रयत्न केले कार्यक्रमात चंद्रकांत बाबा चौधरी डॉ पंडित दराडे डॉ सुभाष कदम सुरेश भाऊ भुमरे बाबासाहेब जामगे डॉ संजय लोंढे डॉ विद्या ताई चौधरी आदी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ संजय लोंढे यांनी केले तर सूत्रसंचालन भागवत दळवी गोविंद मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर मनोज पोरवाल यांनी मानले

पाच लाखासाठी यावलच्या माहेरवाशीनीचा छळ; यावल पोलीसात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी यावल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, माधुरी भुषण फुसे (वय-२८) रा. नेहरू नगर, रामानंद नगरजवळ ह.मु. मेन रोड यावल यांचा विवाह जळगाव येथील भुषण यशवंत फुसे यांच्याशी ३० मार्च २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच पती भुषण यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर पती भुषण याला नोकरी लागण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी मारझोड करण्यास सुरूवात केली. लग्नाला वर्ष झाल्यानंतर मुलबाळ होत नाही म्हणून सासरे यशवंत फकीरा फुसे, सासु सुमित्रा यशवंत फुसे, ननंद पुनम हितेंद्र असवाल आणि नंदोई हितेंद्र भगवान आसवाल सर्व रा. नेहरू नगर जळगाव यांनी गांजपाठ केला. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता यावल येथे माहेरी निघून आल्यात. यावल पोलीसात धाव घेवून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात पती भुषण फुसे, यशवंत फुसे, सासु सुमित्रा फुसे, ननंद पुनम असवाल आणि नंदोई हितेंद्र आसवाल यांच्याविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून रक्षाबंधन दिवस साजरा केला.

0

 

दी.22 ऑगस्ट
हिंगणघाट :- रक्षाबंधन दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंगणघाट च्या वतीने कोरोना काळात दिवसरात्र आपल्या सेवेत असणारे. आपल्या हिंगणघाट पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना यांना राखी बांधून . रक्षाबंधन साजरा करण्यात आला .
यावे उपस्थित जिल्हा संघटन मंत्री शिवेशजी हारगोडे, संजय खत्री,गौरव तांबोळी , किर्तेश साबळे,सनी बासनवार, स्वयम तांबोळी, , समिक्षा तांबोळी, दिप्ती चल्लिरवार, वैष्णवी पुट्टावार, पायल कोल्हे ,करुणा ठाकरे,गायत्री ठाकरे, प्रियंका लोखंडे किरणं डफ सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परीषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो म्हणून तेलाच्या केटली ने डोक्यावर मारून केले जखमी

0

 

पत्नीकडे वाईट नजरेने का पहातो? असा जाब विचारीत एका दारूविक्रेत्याने तेलाच्या केटलीने मारहाण केल्याची घटना शहरातील निशाणपुरा वार्ड येथे दुपारी घडली.
शहरातील नेताजी वार्ड येथील रहिवासी अजय विलास साठोणे हा रुपेश व शुभम या मित्रांसोबत हमाली कामावर जात असताना आरोपी अजय नागोराव ठोंबरे रा. निशानपुरा याच्या घरी गेले. रुपेश व शुभम दारू पिण्याकरिता घरात गेले असता अजय साठोणे घराबाहेरच उभा होता.
आरोपी अजय ठोंबरे हा तेथे आला व फिर्यादि अजय साठोणे सोबत वाद घालु लागला. तू माझ्या घरी दारू पिण्यासाठी का येतो ? माझ्या बायकोकडे वाईट नजरेने का पाहतो ? यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला . यावेळी आरोपी अजय ठोंबरे याने तेलाची केटलीने अजय साठोणे याचे डोक्यावर मारहाण करीत त्याला जखमी केले.फिर्यादिचे तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी कलम ३२४ ,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला, पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

विसावा वृध्दाश्रम अचलपूर माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन रक्षाबंधन

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती-: अमरावती जिल्ह्यातील विसावा वृध्दाश्रम अचलपूर व माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन आज दिनांक
२२ /८ /२०२१रोजी वृद्धाश्रम येथे मोठ्या उत्साहात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन चे पदाधिकारी
यांनी विसावा वृध्दाश्रम येथील वृद्ध व्यक्तींना भाऊ बहिणीचे नाते वृनांनू बंधन जोपासता यावे यासाठी आम्ही सर्व माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन च्या वतीने सामाजिक बांधिलकी अंगीकारुन सलोखा निर्माण करण्याचे कार्य करतं आहे विसावा वृध्दाश्रम येथील सर्व वृद्ध व्यक्तींना भाऊ बहिणीचे नाते आम्ही निर्माण झाले आहे. सुरवातीला आश्रमातील सर्वच वृद्ध व्यक्तींना राखी बांधून सर्व
पेढा भरविला त्या नंतर अल्पोपहार देण्यात आला यावेळी माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशनचे पदाधिकारी सौ.शारदा उईके.विजया फाटकर.दिपाली विधळे सोनम गाठे व माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा सौ दिपा अमोल
तायडे उपस्थित होत्या विसावा वृध्दाश्रमाचे संस्थापक सचिव ॲडोकेट.भास्कर कौतिक्कर व आश्रमातील सर्वच वृद्धांनी माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन च्या सर्व पदधिकार्यांचे आभार मानले

नंदोरी चौकातील उड्डाणपुलावर मॉर्निंग वॉक ला जाताना अज्ञात वाहनाने दिली धडक !

0

 

हिंगणघाट :- स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी विठ्ठल ज्ञानेश्वर लाटकर वय 48 वर्ष यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. अपघात हा पहाटेच्यावेळी 5 वाजता नंदोरी चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील उड़ाण पुलावर मॉर्निंग वॉकला जातांना पहाटे घडला असून यावेळी एका अज्ञात वाहनाने श्री लाटकर यांना धडक दिली.अपघातानंतर त्यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
श्री लाटकर हे विकास विद्यालय कोरा येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
आज दि.22 रोजी दुपारी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

महावितरणकडे नऊ महीन्यांपुर्वी तक्रार देवुन ही जंगलागलेले विद्युत खांब बदलेले जात नाही अप्रिय घटनेची शक्यता

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील मेन रोड वरील गवत बाजार परितरातील भाजी बाजार या ठीकाणचे सार्वजनिक विद्युत पुरवठा करणारे इलेक्ट्रिक पोल जंगल्यामुळे खालच्या बाजूला खराब होऊन खूप झुकला आहे व रस्त्याच्या टर्निंग वर असल्याने वाहनांचा धक्का लागून केव्हाही पडू शकतो तसे झाल्यास मोठी जिवीत व वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही , यासंदर्भात तक्रार केल्यावर देखील महावितरण कंपनीचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील गवत बाजार हे क्षेत्र भाजीपाला विक्रीसाठी प्रसिद्ध आहे यामुळे या परिसरात नागरीकांची नेहमीच वर्दळ असते , याच ठीकाणी मेन रोडवरील वळणावर सार्वजनिक विद्युत पुरवठा करणारा विद्युत खांब हा पुर्णपणे जंगलागल्याने जिर्ण झाला असुन तो कुठल्याही क्षणी कोसळण्याची भिती या परिसरातील नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत असून , याबाबत त्या वळणावर रहीवाशी असलेले उच्च शिक्षीत तरूण अनिल त्र्यंबक पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी सुचना देवुन व दिनांक १७ /११ / २०२० रोजी यावल येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांना लिखित तक्रार अर्ज दिला असतांना ही मागील नऊ महीन्यांपासुन या संदर्थात अद्याप महावितरण विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही . या मार्गावरील विद्युत खांबाच्या ठीकाणी जवळपास रोज भाजी बाजार भरत असतो व ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची व वाहनांची खूप मोठी गर्दी असते.जर हा जिर्ण झालेल्या सार्वजनिक विद्युत पुरवठा करणार खांब पडला किंवा मोटर वाहनाने धडक देवुन कोसळल्यावर खूप मोठी जीवित व आर्थिक हानी होऊ शकते असे तक्रारीत म्हटले आहे.महावितरणच्या कार्यालयामध्ये रितसर तक्रार करूनसुद्धा जंगलागुन जिर्ण झालेले बदलला गेला नाही.भविष्यात जर काही अप्रिय घटना घडल्यास त्यास सर्वस्व महावितरण कंपनी जबाबदार राहील.तरी यावलच्या महावितरण. विभागाने या संदर्भात गांभीर्याने दखल घेवुन तात्काळ या ठीकाणचे जिर्णखांब बदल करावा असे म्हटले आहे .

यावल शहरातून अल्पवयीन मुलीला फूस पळविले; यावल पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची १५ ऑगस्ट रोजी घडली. पाच दिवसानंतर पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी, यावल शहरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तिच्या राहत्या घरात टी व्ही पाहात असतांना तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून आणि आमिष दाखवत पळवून नेल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीच्या वडीलांसह सर्व नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणीकडे व नातेवाईकडे प्रत्यक्ष जावून शोध घेतला. परंतू त्यांची मुलगी कुठेच आढळली नाही. पिडीत मुलीच्या वडीलांना काल शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.