Home Blog Page 420

मोदी सरकारच्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर निशेध मोर्चा

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आज दि.२१/ ८ / २०२१ ला तहसिल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने गॅस इंधन विरोधात निशेध मोर्चा काढण्यात आला व आंदोलन करण्यात आले .व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महिला अध्यक्ष सौ.संगीताताई ठाकरे तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.कल्पनाताई वानखेडे यांचे प्रमुख उपस्थितीत गॅस व इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी रेखाताई येवतकर व अस्मिता ताई भडके तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर कोहळा जिल्हा जेटेश्वर सरपंच सौ. शोभाताई मोहोड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष मनोज गांवाडे अनिकेत मेश्राम अक्षय गिलबे ग्रामीण तालुक्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महीला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते या निशेध मोर्चाचे आयोजन तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ अस्मिता ताई भडके यांच्या उपस्थितीत तहसीलदार साहेब यांना निवेदन देवून मोदी सरकारच्या धोरणा विरोधात निशेध करण्यात आले.

अण्णा हजारे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास सुरू ठेवण्याचा सदस्यांकडून आग्रह.

0

 

राळेगणसिद्धी येथील बैठकीत राज्यातील माजी जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न.

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संस्थापक तथा प्रणेते आदरणीय अण्णा हजारे यांनी आपले जन आंदोलन यापुढे अखंड सुरू ठेवावे आणि आंदोलनात सहभागी सदस्यांना, नागरिकांना,तरुणांना प्रेरणा द्यावी असा आग्रह राज्यातील माजी जिल्हाध्यक्ष,संघटक,निमंत्रक यांनी केल्याने न्यासाची एक आदर्श नवीन घटना तयार करून आंदोलन पुन्हा मोठ्या जोमाने सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन आदरणीय अण्णा हजारे यांनी उपस्थित माजी सर्व जिल्हाध्यक्ष व सदस्यांना दिल्यामुळे राज्यातील सर्व माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासह विश्वस्त मंडळात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी न्यासाच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारण्या बरखास्त केल्या होत्या त्यामुळे आंदोलनाची गती मंदावली होती आणि कामकाज ठप्प झाले होते त्यामुळे अण्णांच्या पुढील आंदोलनाकडे माजी जिल्हाध्यक्ष,सदस्य व ट्रस्टी मंडळी व इतर राज्यातील राजकारण्यांचे समाजसेवकांचे आणि सर्व स्तरातील महिला,पुरुष,तरुण मुले,मुली,विविध संघटना नागरिकांचे लक्ष वेधून होते आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.या सर्व प्रश्नांना फुल स्टॉप मिळाला.
बुधवार दि.18ऑगस्ट2021रोजी राळेगणसिद्धी येथे आदरणीय अण्णा हजारे आणि विश्वस्त मंडळी यांच्या उपस्थितीत आंदोलन न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा निमंत्रक,माजी जिल्हा संघटक यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली समाजातील सामुदायिक जनहितासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांची भूमिका,ध्येय,उद्दिष्ट हेच महत्त्वाचे ठरणार असल्याने न्यासाचे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी सदस्यांची, जिल्हाध्यक्ष यांची भक्कम फळी ट्रस्टी ऍड.शाम आसावा,ऍड. अजित देशमुख,अशोकजी सब्बन,बालाजी कोपलवार,शेख अलाउद्दीन,अर्ते यांच्यासह इतर ट्रष्टीच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भक्कम फळी निर्माण करून आदरणीय अण्णा हजारे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली लवकरच भ्र.वि.जनआंदोलन न्यासाचे काम पूर्ववत मोठ्या जोमाने सुरू केले जाईल असे मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व उपस्थितांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले, बैठक यशस्वीतेसाठी दत्ता आवारी,कैलास पठारे,शेख अन्सार यांनी उत्कृष्ट नियोजन पूर्वक परिश्रम घेतले.

*लोकायुक्त कायद्यात सर्वांची चौकशी करण्याचे अधिकार*
लोकायुक्त कायदा झाल्यास पुरावे असतील तर आमदार, खासदार,मंत्री यांची सुद्धा चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार लोकायुक्तयास राहणार आहे, कोणाकडे जाण्याची गरज राहणार नाही,कारण लोकायुक्तास सत्र न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत,तसेच न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष सदस्य यांनी तक्रारअर्जा पर्यंत मर्यादित न राहता समाजाचे इतर अनेक सामुदायिक प्रश्न,समस्यांकडे आपले लक्ष केंद्रित करून आंदोलने करायला पाहिजे असे बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शनपर सूचना आदरणीय अण्णा हजारे यांनी दिल्या.

दिव्यांग वृध्द निराधार यांनी आपल्या हक्कासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी गावागावात बोर्डाचे अनावर करून संघटित लढाईत सामिल व्हा असे आव्हान सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी बा-हाळी ता मुखेड शाखा मेळाव्यात केले

0

 

मुखेड :- तालुक्यातील बा-हाळी येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या हस्ते बोर्डाचे उदघाटन व दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला.
प्रथम थोर रयतेचे राज्य श्रीछञपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालुन वंदन करून बोर्डाचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष व प्रमूख पाहुणे यांच्या हस्ते करून मेळाव्यास सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हानमंत मामा वाडेकर तंटामुक्तीचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मा.चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे, काँ.अशोक घायाळे,नायगाव अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर, मुखेड ता.अध्यक्ष आर एम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, पञकार,
ग्रामसेवक ईतर पाहुण्याचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
प्रस्ताविक यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशी सोडवणूक करीत आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले.
संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी शंभर सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत
पण दिव्यांगाच्या चाळीससवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन
केल्यास दिव्यांग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी ची चोरी होनार नाहि, व दिव्यांचा कोणीहि ञास दिला जात नाही श
शासन प्रशासन व जनतेला कळेल कि दिव्यांग बांधवांची संघटना असल्यामुळे त्यांचा हक्क व ञास दिल्यास दिव्यांग कायदा 2016 प्रमाणे क्षिक्षा होईल हि भिती व दिव्यांग बांधव आपल्या हक्कासाठी जागा आहे संघटित आहे यांची जाणिव व्हावी म्हणून आज आपल्या गावात बोर्डाचे उदघाटन करण्यात आले.
दिव्यांग बाधवानी संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळत नाही.दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता, हक्क मिळत नाही म्हणून आत्महत्या करू नये दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नहि हे दाखवून देण्यासाठी
संघटितपणे संघर्षात सामिल होऊन आपली शक्ती निर्माण करून दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत, पचायत समिती,जिल्हा परिषद, नगरपंचायत,नगरपालिका
महानगर पालिका, खासदार, आमदार निधी, घरकुल, अपंग शिष्यृती ईत्यादी चाळीस सवलतीसाठी आपण संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान डाकोरे पाटिल यांनी केले .
सुञसंचलन व आभार अमोल वाघमारे यांनी केले .
हा कार्यक्रम यशस्वी मुखेड विधानसभा म. अध्यक्ष रंजीत पाटिल इंगळे, बा-हाळी सर्कल प्रमुख माधव पा गोजेगावे, शा.
अध्यक्ष पाडुरंग वाघमारे,शेख खुदुस,गजलवाड सुभाष, तानाजी भंगे,सुभाष नागेश्वर,राजकुमार चव्हाण,यशोदाबाई नेवळीकर, गंगाबाई बोईनवाड, राज्याबाई कल्पे, ईत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

राज्य रस्ता वालुर इरळद मानवत रोड काम निकृष्ट दर्जाचे चौकशी करण्याची भाजप ओबीसी सेल ची मागणी

0

 

सेलू प्रतिनिधी अजहर पठान

राज्य रस्ता क्रमांक 253 हा मार्ग चारठाणा वालूर इरळद मानवत रोड हा वालूर गावातून जातो याचे काम न्यू रामेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतलेले असून 1 वर्षा पासून संथ गतीने सुरू आहे मानवत रोड ते वालुर कॉर्नर या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले व सध्या 1 महिन्यापूर्वी वालुर गावातून जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रोडचे काम करण्यात आले परंतु हे काम करीत असताना रोडच्या दुतर्फा बाजूने नालीचे बांधकाम करण्यात आले नाही रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले नाही यामुळे सतत होणाऱ्या पावसामुळे पाणी तुंबून एकाच पावसात रस्ता खचून वाहून गेला आहे सदरील काम निकृष्ट दर्जाचे झाले असून इस्टिमेट प्रमाणे कुठलेच काम झाले नसल्याने वालुर येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा ओबीसी सेलचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष श्री विलास सोनवणे यांनी सेलू येथील उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लेखी निवेदन दिले असून सदरील रस्त्याच्या कामाची पाहणी करून इस्टिमेट प्रमाणे रस्त्याचे काम करून रस्त्याच्या दुतर्फा बाजूने नाली बांधकाम व पाणी वाहून जाण्यासाठी उपायोजना करूनच रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली आहे
दि.20/8/2021
अजहर पठाण
सेलू/परभणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत महिलांचा व युवकांचा जंगी प्रवेश

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्र.

दि.१९/८/२०२१रोजी नांदुरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सन्मानिय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराशीं प्रेरित होऊन विदर्भ नेते विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या आदेशावरून जिल्हाअधक्ष मदनराजे गायकवाड यांच्या सूचनेवरून ता.अधक्ष भागवत उगले व शहराअधक्ष सागर जगदाळे यांच्या नेतृत्वात आज नांदुरा शहरात अनेक महिलानी युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेशेत जाहीर प्रवेश घेतला यावेळी ता.अधक्ष भागवत उगले यांनी येणाऱ्या काळात प्रतेक ग्रामीण भागात गाव तिथे शाखा व.घर तेथे कार्य करता. मनसेचा पोचवायचा आहे त्यासाठी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी एक साथ होऊन कामाला लागावे असे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले तसेच मनसे शहर संघटक विशाल बगन यांनी आपले विचार मांडले वेळी आगामी काळात नांदुरा शहरात वा.तिथे शाखा व घर तेथे मनसे कार्यकरता नवनिर्माण करु या साठी जास्तीत जास्त युवकांनी मनसेत सामील होऊन जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्यासाठी म.राज साहेबाचे हात बळकट करावे असे संबधीत केले तसे उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना सभोधित करून सांगितले कार्यक्रमाचे प्रस्थाविक मनसे प्रसिद्धी प्रमुख योगेश सपकाळ यांनी केले यावेळी अजय बेलोकार. निकेतन वाघमारे. राजू काळे. धनंजय देशमुख. अंकीता अवचार प्रवीन माळी. प्रामुख्याने उपस्थित होते या वेळी प्रवेश केलेल्या मध्ये शारदा बोदडे. ललिता राजेश निखाडे. अनुराधा भागवत खंडागडे. या महिलांनी तर युवकामधे नांदुरा येथील वैभव बोदडे. निशांत निखाडे. संतोष सोनवाल. युवराज सोनवाल. करन तांकट रुतिक खंडारे. शुभम जाधव. रोहित गोहर. अभिषेक सकळकर. बाबुलाल देवळे. नारखेड येथून गोपाल कवलकार. गोपाल काटोले .विश्वास वाघमारे. महेश उमाळे. विकि डाबेराव. प्रतिक राठोड. राजेश डाबेराव. यांनी यावेळी जाहीर प्रवेश घेतला

समृध्दि महामार्गाच्या कामावर मोठा अपघात,13 मजूर ठार

0

 

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी डुएल बार घेऊन जाणाऱ्या टिप्परला भिषण अपघात,या टिप्पर मध्ये बसलेले मजूर भारीभरकम लोह्याचे डुएल बार खाली दबले,,12 मजूरांच्या मृत्युची प्राथमिक माहिती तर काही मजूर गंभीर जखमी, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव – दुसरबिडच्या मध्ये सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कॅम्पच्सा जवळ झाला हा अपघात.

 

यावल सातपुडा पर्वत आदीवासी गावात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने आरोग्य शिबीर

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे संरक्षण आणि कायदे,आपात्कालीन कार्य, वन्यजीव जनजागृती, कोरोना विषयक जनजागृती व लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

रावेर आणि यावल तालुक्यातील गारखेडा, उसमळी, जामन्या, गाडऱ्या आणि लंगडाआंबा या भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन बुधवारी सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित जामन्या येथील आश्रमशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख हे होते. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, अँड. सागर चित्रे, विजय दर्जी, शरद न्हायदे, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील, नायब तहसीलदार आर. डी. पाटील सहायक पोलीस निरीक्षक पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांनतर गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी व कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.

जंगलात सर्पदंश झाल्यास करावयाचा आपात्कालीन प्रथमोपचार या विषयावर सर्पमित्र जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, गौरव शिंदे, कल्पेश तायडे यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य विषयक योजनांची माहिती ग्रामीण रूग्णालय, पालचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी. बी. बारेला यांनी दिली.

या शिबिरात जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. बारेला यांनी स्थानिक पावरा भाषेत नागरिकांना मार्गदर्शन करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन या गावातील अनेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

या गावांमध्ये अगोदर आदिवासी बांधव लस घेण्यास तयार नव्हते, त्याच गावातील नागरिकांनी यावेळी याठिकाणी लस घेतली हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरल्याचे डाॅ. बारेला यांनी सांगितले. या नागरिकांना मुख्य अधिपरिचरिका सौ. कल्पना नगरे व परिचारिका शाबजान तडवी यांनी लस दिली.

कार्यक्रमास जामन्याचे पोलीस पाटील, गाड्या जामनेर चे ग्रामसेवक रुबाब तडवी सत्तरसिंग बारेला, सरपंच काशिनाथ बारेला, माजी सरपंच भरत बारेला, प्रताप बारेला, वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष व मानद सचिव रवींद्र फालक, अधीक्षक रविद्र ठाकूर. वनपाल ललित सोनार, लालसिंग बारेला, तेरसिंग बारेला, भरत बारेला, दारासिंग बारेला, बिर्ला बारेला, देवसिंग बारेला आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रमेश साबळे, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमलता सावकारे, एम. डी. नरवाडे, प्रवीण चव्हाण, एस.पी. नामायते, अधीक्षक सुभाष गाढे, एन. व्ही. ढाके, अनिल तडवी मिलिंद कुरकुरे जावेद तडवी, राजेंद्र कांचोळे, मामाज पवार, राजेंद्र पाटील, गीरासिंग बारेला,, गणेश प्रजापती, कस्तुरा बारेला, निलेश बारेला, वीरेंद्र बारेला, जमेला तडवी, विठ्ठल मेढे यांनी घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार बाळकृष्ण देवरे यांनी मानले.

आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ बी. बी. बारेला, डॉ सचिन पाटील, डॉ. भोईटे, डॉ. ठाकरे, मुख्य अधिपरिचारिका सौ. कल्पना नगरे, अधिपारीचारक अरिहंत पाटील, औषध निर्माता पी. एम. पाटील, परिचारिका राबजान तडवी, गोविंद पवार यांच्यासह ग्रामीण रुग्णालय. पाल व प्राथमिक आरोग्य केंद्र. सावखेडा ता. यावल येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती डॉ बारेला यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहेत.

आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते खोकडपुरा येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण

0

 

संभाजीनगर /औरंगाबाद / दि. 19

शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या संभाजीनगर मध्य शहरातील वॉर्ड क्र. ५४ गांधीनगर खोकडपुरा प्रभागातील
श्री. सराईकर यांच्या घरापासून ते श्री. टाकळकर यांच्या घरातपर्यंत तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी विभागप्रमुख नरेश भालेराव , माजी नगरसेवक सतीश कटकटे, शाखाप्रमुख रणजीत दाभाडे,त्रिंबक‌राव करडेल राजू हाळनोर नरेश लहाने विलास सराईकर जितेंद्र मनगटे,दिलीप सूरासे निलेश सेवेकर वरद गुट्टे संजू रिडलॉन महिला आघाडीच्या उपशहर संघटक सुनिता सोनवणे विभागसंघटक सौ सुषमा यादगिरे स्व-स्वरूप संप्रदायाच्या प्रवचनकार सौ.निर्मलाताई खंडागळे ,सौ.निर्मला मोगल, सौ.संगिता पूणेकर, सौ.अरूणा पूणेकर, सौ.सोनाली मनगटे, जया सूरासे ,बबीता कागडा आदींसह वॉर्डातील नागरिक शिवसैनिक उपस्थित होते ✍️. मोहन चौकेकर

आज चार वर्षांपूर्वी १९ व २० ऑगस्ट २०१७ ला शेगावात झाले होते पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन ; पत्रकारांचं अधिवेशन , अन् कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील! -राजेंद्र काळे

0

 

पत्रकार परिषदेचे ४१वे राष्ट्रीय अधिवेशन शेगाव येथे १९ व २० ऑगस्ट २०१७ रोजी झाले होते. त्याला आज ४ वर्ष पुर्ण होत असून, त्यानिमित्ताने कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा त्यासंदर्भातल्या आठवणींना हा उजाळा!

मराठी पत्रकार परिषदेचं ४१वं अधिवेशन घेण्याचं ठरलं, ते शेगावात.. अवघ्या २२ दिवसातच तयारीचं शिवधनुष्य पेलायचं होतं.. परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष एस.एम.देशमुख सरांनी माझ्यावर जबाबदारी टाकली म्हणण्यापेक्षा, मीच ती जबाबदारी मागून घेतली. शेगावला अधिवेशन होणार म्हटल्यावर ते ‘राष्ट्रीय’ व्हावं, हा संकल्प घेवून शिवशंकरभाऊ पाटील ज्यांच्याशी सातत्याने वैद्यकीय हितगुज करत.. ते आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांना घेवून मी राजेंद्र काळे व सकाळचे पत्रकार अरुण जैन आम्ही पहिल्यांदा शिवशंकरभाऊ म्हणजे भाऊसाहेबांकडे गेलो.

_साहित्यीक अन् पत्रकारांची अधिवेशनं, म्हणजे १२ भानगडी.. असा भाऊंचा ग्रह विविध अधिवेशनांवरुन झालेलाच होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं असतं, पण नको त्या दीडशहाण्या कटकटी.. म्हणून भाऊसाहेबांनी अशा अधिवेशनांकडे कानाडोळा केला. त्यामुळे भाऊसाहेब अधिवेशनाला परवानगी देतील की नाही? ही मोठी धास्ती होती. इंजिनिअरींग कॉलेजचा प्रशस्त हॉल, आनंदविसावा व आनंदविहार ही २ भक्तनिवास, चहा-नाश्ता-जेवणाची व्यवस्था असं कार्यक्रमासह राहण्या-खाण्याची व्यवस्था संस्थानची हवी.. संस्थान असल्यामुळे ते नि:शुल्कही नको होतं._

भाऊसाहेबांनी प्रस्ताव ऐकून घेतला, जवळपास ५ मिनीट शांत. अर्थात त्यांची शांतता आमची धडपड वाढविणारी. ‘अधिवेशन घ्या, पण संस्थानची शिस्त पाळून..’ या त्यांच्या बोलण्याने आमच्या आनंदाला पारावर राहीला नाही. फक्त प्रश्न होता, शिस्त अन् पत्रकारांनी पाळायची? तेही अधिवेशनात.. कारण आजवरच्या अनेक अधिवेशनाचा अनुभव हा मौज-मस्ती, खाओ-पियोचा. मी एस.एम.सरांना फोन केला- ‘आपल्याला अधिवेशनात शिस्त पाळावी लागेल!’ क्षणात एस.एम.सरांचे उत्तर होते- ‘मीच बेशिस्त खपवून घेणार नाही..’ मग आम्ही म्हणजे आयोजक असणारा बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ मग रिलॅक्स झाला. पुढच्या अधिवेशनाच्या प्रत्येक पोस्टमध्ये उल्लेख असायचा, संस्थानच्या शिस्तीचा अन् वस्तुस्थिती सांगतो- शेगाव संस्थानच्या कोणत्याही आवारात प्रवेश केल्यानंतर माणूस शिस्तीप्रती एवढा जागरुक होवून जातो की, बेशिस्तपणा कुणालाच आवडत नाही. त्याचे प्रत्यंतरतर अधिवेशनात ठायी-ठायी आले. अगदी वेळेवर उद्घाटन सोहळा, तत्पुर्वी शिस्तप्रिय पत्रदिंडी, प्रत्येक परिसंवाद अन् चर्चासत्र वेळेवर.. जी वेळ साधारणत: कुठल्याही अधिवेशनात पाळली जात नाही, ती काटेकोरपणे मराठी पत्रकार परिषदेच्या ४१व्या ‘राष्ट्रीय’ अधिवेशनात पाळली गेली.. ती फक्त ‘श्रीं’ची कृपा!

_शेगावला अधिवेशन होणार म्हटल्यावर, उद्घाटक शिवशंकरभाऊच असावेत.. असा सर्वांचा आग्रह. आम्ही तो प्रस्ताव आधी भाऊंपुढे ठेवला, ‘तुम्हाला अधिवेशन घ्यायचे की नाही?’ एवढेच भाऊ बोलले अन् आम्हीही समजून गेलो. मग आम्ही भाऊंना पाहुणे म्हणूनतर सोडा पण उपस्थित राहण्याचाही आग्रह केला नाही. मग उद्घाटक कोण? साधारणत: राजकीय नेता नको, अशी भावना होती.. मग नाव पुढे आले, साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांचे. त्यांनी नम्रपणे होकार दिला. त्यांनीच उद्घाटनपर मनोगतात ‘मंदीर व्यवस्थापन’ हा विषय प्रथमच पत्रकारांपुढे मांडून शेगावच्या मंदीर व्यवस्थापनावर स्तुतीसुमनांचा वर्षावच केला. विशेष म्हणजे शिवशंकरभाऊ अधिावेशनास्थळी नसतांनाही, प्रत्येक कार्यक्रमांचे अपडेटस् व कोण काय बोलले? याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे पोहचत होती._

१९ व २० ऑगस्ट २०१७ या २ दिवसात संतनगरीत पत्रकारांची मांदीयाळी जमली होती, व त्यामुळे उपस्थित दीड हजारावर पत्रकारांना शेगाव संस्थान जवळून बघण्याची अनुभूती आली. पत्रकारांनी अगदी सहपरिवार ‘आनंदसागर’ बघून अनुभूती घेतली,
_आनंदाचे डोही आनंद तरंग!_

_जे अधिवेशन घ्यायला २० ते २५ लाख रुपये लागले असते, ते २ दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन.. आधीच संस्थानचे शुल्क कमी, त्यात ५० टक्के सवलत.. म्हणजे केवळ ५ लाख रुपयात बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ घेवू शकला. विशेष म्हणजे हा निधीही थेट त्या- त्या सहकार्यकर्त्यांनी संस्थानला देणगी स्वरुपात जमा केला. म्हणजे गजानन महाराजांच्या शिकवणीप्रमाणे- ‘पैशाला हात लावू नका..’ अपवाद वगळलातर तसेच झाले. पावतीशिवाय अधिवेशन होवू शकते, याची जणु मिळाली पावतीच.. एवढे सर्व झाले शिवशंकरभाऊ यांच्यामुळे, भाऊ म्हणायचे- हे झाले महाराजांच्या कृपेमुळे.. तो कृपाशिर्वाद होताच !_
जय गजानन 🙏🙏
– राजेंद्र काळे मो.नं.९८२२५९३९२३

राजकीय व हप्तेखोर लोकांच्या दबावात येवून अपंगांना स्वयंरोजगारासाठी मंजुर केलेली जागा रद्द करून अपंगांची दिशाभूल केली

0

 

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अपंगांचे सामुहिक आमरण उपोषण सुरु

जिल्हा प्रतिनिधी हंसराज उके अमरावती

अमरावती :- अपंगांना पुनर्वसन व रोजगार मिळावा म्हणून नवीन अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायदा अस्तित्वात आणण्यात आला . या कायद्यामध्ये अपंगांना रोजगारापासून वंचित ठेवल्यास संबंधित विभागावर कारवाईची तरतुद असुन सुद्धा महानगरपालिकेने सन २०१६ मध्ये अपंग संघटनेच्या मागण्यांवरुन अमरावती शहरातील रहिवासी राजीक शाह दिलबर शाह ( अपंग बेरोजगार ) व एक अपंगाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिट क्र . २५ – सी , भूखंड क्र . ६/२ या ठिकाणी ७ बाय ७ ची मा . आयुक्त यांनी दि . ०७/०५/२०१६ रोजी मंजुरी मान्यता दिली होती व स्थायी समिती ठराव क्र . २६५ दिनांक १५ / ० ९ / २०१६ रोजी ही मान्यता कायम करण्यात आली असून अपंगांनी त्या जागेवर महानगरपालिकेला महिन्याकाठी भाडे भरुन स्टॉल टाकून व्यवसाय सुरु केले होते . पण काही राजकीय व हप्तेखोर लोकांनी त्यांना हप्त्यासाठी त्रास देणे सुरु केले व न दिल्यास त्या जागेच्या खोट्या तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या व महानगरपालिकेवर राजकीय दबाव टाकून अपंगांच्या मंजूर जागा रद्द केल्या असून अपंग हक्क अधिनियम २०१६ चा कायदा अस्तित्वात असून सुद्धा या कायद्याची अवहेलना महानगरपालिकेकडून होत असून अपंग बेरोजगारांना मंजूर झालेल्या जागा पुर्ववत करण्यात याव्या व अपंग हक्क अधिनियम कायद्याचे सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अपंगांचे सामुहिक आमरण उपोषण सुरु करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका व प्रशासनाची राहील असे उपोषण कर्ते यांनी सांगितलं मयुर मेश्राम,राजीक शहा,राहुल वानखडे ,नासीर बेग हे उपस्थित आहे