Home Blog Page 421

चुचाळे येथील : यशवंत सुपडू पाटील* (राजपुत) वय ९० माजी सरपंच निधन झाले आहे

0

 

आज सकाळी १०.४५ वाजता यांचे दुःखद निधन झाले.आहे तरी त्यांची अंत यात्रा राहात्या घरून आज दि -१९/०८/२०२१ वार गुरुवार रोजी संध्याकाळी ५ : ०० वाजता राहत्या घरुन निघेल कळावे

ठिकाण :- राजपुत वाडा
शोकाकुल
==========
श्री युवराज यशवंत पाटील शिक्षक रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालय चुंचाळे
श्री रमेश यशवंत पाटील प्रगतीशिल शेतकरी
श्री सुकलाल यशवंत पाटील ग्रा.प.सदस्य चुंचाळे
राजपुत समाज व ग्रामस्थ चुंचाळे

हिंगणघाट शहरात दुसरी घटना वाढदिवसाचा केक तलवारीने कापला

0

 

शहरात गुण्डागर्दीच्या घटनांमधे सतत वाढ होतांना दिसत असून तरुण युवकांनासुद्धा याचेच आकर्षण दिसुन येत आहे.
येथील तरुणतरुनींमधे सामुहिकरित्या हॉटेल,बगीचा अशा ठिकाणी शक्तिप्रदर्शन करीत वाढदिवस साजरा करणे आता नेहमीचा प्रकार झाला आहे.
नुकत्याच १२ रोजी स्थानिक गोमाजी वार्ड येथे एका युवकाने तलवारबाजी करीत वाढदिवस साजरा केला व त्याचा वीडियो सोशल मिडियावरती वायरल केला,या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर दि.१५ रोजी स्थानिक गुरुनानक वार्ड येथे पुन्हा असाच प्रकार घडला.
गुरुनानक वार्ड येथील रहिवासी असलेल्या विक्की मोतीराम तख्तानी(२७) या तरुणाने रात्री १२ वाजताचे दरम्यान तलवारबाजी करीत त्या नग्न तलवारिनेच आपल्या जन्मदिवसाचा केक कापला.
यावेळी सार्वजनिक ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आली.
परिसरातील नागरिकांनी सदर बाब पोलिसांचे कानी टाकल्यावर पोलिसांनी या युवकावर कारवाई करीत सदर युवकावर कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा नोंद केला.
अधिक माहिती घेता या युवकावर यापुर्वी गुंडागर्दी तसेच अनाधिकृत सावकारी करीत असल्याच्या आरोप आहे.
सदर घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा विवेक बंसोड व चमु पुढील तपास करीत आहेत.
सुर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष अध्ययन स्तर समजण्यासाठी,वस्तूनिष्ठ “प्रारंभिक चाचणीच्या” अंमलबजावणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा.

0

 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्रतिपादन.

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक‌.

गडचिरोली:-आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने फुलोरा उपक्रमात समाविष्ट असलेल्या शिक्षकांसाठी यु-ट्युबवर ऑनलाइनद्वारे सभा आयोजित करण्यात आली होती.फुलोरा उपक्रम हा मुलांचा अध्ययन क्षमता विकसन कार्यक्रम म्हणून हाती घेण्यात आला आहे.सदर उपक्रमाची संकल्पना जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची आहे.
कोविड १९ मुळे मुले शिक्षणापासून वंचित असल्याने मुलांचा “सद्याचा अध्ययन स्तर काय आहे?” हे बघण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात निवडक शाळांमध्ये दिनांक २० ऑगस्ट रोजी प्रारंभिक चाचणी-२०२१-२२ आयोजित करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी सभेला उपस्थितीतांना चाचणी संदर्भात सविस्तर माहिती दिली तथा मार्गदर्शन केले.सोबतच डॉ.जगन्नाथ कापसे जेष्ठ अधिव्याख्याता,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांनीही मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप,चाचणी कशी घ्यावी,प्रपत्र कसे भरायचे,लिंक मध्ये माहिती कशी भरावी? यावर प्रकाश टाकला.
त्याचप्रमाणे काही तांत्रिक अडचणींमुळे सभेला उपस्थित होता आले नसेल तर *https://youtu.be/QmQ1gYZYXbc* या लिंक वर क्लिक करून *फुलोरा प्रारंभिक चाचणी* संदर्भात सविस्तर माहिती पाहू शकता असे आवाहन संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केले आहे ‌
आज पार पडलेल्या ऑनलाईन यु ट्युब मार्गदर्शन सभेला हेमलता परसा(शिक्षणाधिकारी प्राथमिक,जिल्हा परिषद गडचिरोली)सर्व जेष्ठ अधिव्याख्याता,सर्व अधिव्याख्याता,सर्व गटशिक्षणाधिकारी,सर्व केंद्र प्रमुख,सर्व विषय सहाय्यक, सर्व विषय साधनव्यक्ती,निवडक शिक्षक, विशेषतज्ञ,संसाधन शिक्षक उपस्थित होते.

कोरपावली येथील भास्कर सुखदेव अडकमोल यांचे अल्पशा आजाराने निधन.

0

 

कोरपावली येथील भास्कर सुखदेव अडकमोल वय 35 वर्ष यांचे अल्पशा आजाराने 17/08/2021 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे. ते BSNL चे अधिकारी आयु. भीमराव पुंजो अडकमोल व राजू अडकमोल यांचे बंधू होत. तरी त्यांचे जलदान विधीचा कार्यक्रम दिनांक 21/08/2021 शनिवारी कोरपावली येथील राहत्या घरी आयोजीत केला आहे.

तालुक्यातील चुंचाळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीची मागणी भीम आर्मी यावल तालुका युनिटतर्फे शासनाच्या विविध विभाग प्रमुखांना निवेदन देवून करण्यात आली.

0

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे

भीम आर्मीचे राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव सुपडू संदानशिव यांच्या साथीने तसेच जळगाव जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे यांच्या सूचनेनुसार यावल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी त्यात प्रमाणे प्रांताधिकारी कैलास कडलग फैजपूर, तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार ,यावल गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील ,सार्वजनिक बांधकाम विभाग यावलचे उपविभागीय अधिकारी जे एस तडवी ,यावल पोलीस स्टेशन येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावल तालूका प्रमुख हेमराज तायडे यांच्या नेतृत्वात यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव या दरम्यानच्या रस्ते दुरुस्तुची मागणी असलेले निवेदन देण्यात आले. सदर रस्ता निकृष्ट असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. सध्या पावसाळी दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यांमध्ये पाणी साचत आहे. यामुळे मोठा अपघात घडू शकतो. यासंदर्भात पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. कदाचित या झोपलेल्या प्रशासनाला मोठा अपघात घडल्यावर जाग येईल कि काय असा प्रश्न राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे यांनी उपस्थित केला आहे.

 

अन्यथा १ सप्टेंबर रोजी रस्ता रोको

या मार्गासंदर्भात येत्या १ सप्टेंबर पर्यंत शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी दिला. निवेदन देतांना राज्य प्रवक्ते रमाकांत जी तायडे,राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे, शहर प्रमुख हर्षल गजरे,यावल तालुका उपाध्यक्ष आकाश बिऱ्हाडे, यावल तालुका कार्याध्यक्ष निलेश सपकाळे, बोराळे शाखा सचिव करण ठाकरे,पंकज डांबरे,महेंद्र तायडे,अनुराग तायडे, करण अडकमोल,आकाश गजरे,गणेश गजरे आदी उपस्थित होते.

यावल येथील चेअरमनच्या एकतर्फी कारभारामुळे आर्थिक दिवाळखोरीस गेलेल्या श्री कालींका नागरी पत संस्थेवर अवसायकांची नेमणुक

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तत्कालीन चेअरमनच्या आर्थिक व भ्रष्ठ अशा व्यवहाराच्या गोंधळलेल्या कारभारामुळे दिवाळखोरीला निघालेल्या श्रीकालींका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत यावल चे कामकाज हे अवसायनात घेणे आली याकरीता काही संचालक मंडळाने सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे . दरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की येथील श्री कालींका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत यावल या पत संस्थेची दिनांक १ / ०४ / २०१५ते ३१ / o३ / २०१७ अखेरचा प्रशासकीय नुसार कर्जदार यांचे व्यवहार उशिराने नोंदविणे तसेच वार्षीक सर्वसाधारण सभा व संचालक मंडळ सभा इत्तीवृत्ता बाबत संस्थेच्या नियमितपणे सभा झाल्या किंवा नाही तसेच संस्थेने कलम १०१कामी वकील फी पोटी बरीच रक्कम खर्च केली असुन त्याबाबत ताळेबंद मध्ये देणे दर्शवल्या नाही व संस्थेने थकीत कर्जदार यांच्या जंगम मालमत्तेचा लिलाव केला असुन कर्जदाराच्या घरातील जप्त केलेल्या वस्तु कर्जदारास परत केल्या किंवा काय याची खात्री करता येत नाही तसेच संस्थेने बेकायदेशीररित्या रोखीने रकमा परत केल्या आहेत वगैरे या बाबत सहकारी संस्थांचे यावलचे उपलेखा परिक्षक डी व्ही ठाकुर यांनी ०१ / ०३ / २०१७या कालावधीचा प्रशासकीय अहवाल सादर केला असुन , सदर प्रशासकीय अहवालाच्या अनुषंगाने कलम ८८नुसार प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणुन नेमणुक झालेली आहे . या संदर्भात संस्थेचे विद्दमान चेअरमन पंकज सोनार यांच्याकडुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल या ठिकाणी दिनांक १९ / ०३ / २०२१ रोजी चौकशी केली असता संस्थेची आवश्यक रेकॉर्डचे मागणी त्यानुसार माहीती घेतली असता चेअरमन पंकज सोनार यांचे कडून पदभार काढुन घेतला असुन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम१९६१ त्यामधील नियम७२ ( १ ) नुसार दिनांक ७ / ०१ / २०२०पासुन संस्थेचे अवसायक म्हणुन डी एफ तडवी यांची नियुक्ती झाली असुन व प्रस्तुत मुद्दा बाबत संस्थेस लाखो रुपयांचे आर्थिक नुकसानीची जबाबदारी तत्कालीन जाब देणार संस्थेचे चेअरमन व संचालक यांचेवर का निश्चित करू नये ?यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम१९६०चे कलम ८८मधील तरदुतीनुसार चौकशी करून संस्थेस झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी निश्चिती कामी, जाब देणार संचालक जबाबदार आहेत का ?वते किती रकमेच्या गैरव्यवहारास जबाबदार आहेत याची निश्चिती करणे कामी प्राधीकृत चौकशी अधिकारी म्हणुन सक्षम अधिकारी यांची नेमणुक झाली असुन , या श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत मधील लाखो रुपयांचा झालेल्या गैरव्यहाराचा सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या अपहाराची निष्पक्ष : चौकशी होवुन संचालक ठेवीदारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा संचालक नितिन सोनार , संचालक देवराम कृष्णा राणे , टालु महाजन, सैय्यद अखलाक अली यांनी व्यक्त केली आहे .

तलवारीने वाढदिवसाचा केक कापून सोशल मीडियावर वायरल व्हिडीओ करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

0

 

दिनांक १२/०८/२१ रोजी प्रतिक हनुमानजी ठाकरे (वय १९) वर्षे रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचा वाढदिवस असल्याने त्याने रात्री १०.०० ते ११.०० वाजता दरम्यान आपल्या मित्रांसोबत संत गोमाजी वार्ड येथे हातात लोखंडी टोकदार तलवार बाळगुन टेबल वर ठेवलेले केक कापुन सार्वजनिक ठिकाणी तलवारीसारख्या घातक शस्त्राचे प्रदर्शन केले व सदरचा व्हिडीयो व्हाॅटसएप सारख्या सोशल मिडीयावर प्रसारीत केला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशतीचे व भितीचे वातावरण तयार झाल्याने सदरचा व्हिडीयो प्राप्त होताच प्रकरणाची तात्काळ दखल घेवुन त्यामधील आरोपी प्रतिक हनुमानजी ठाकरे(वय १९) वर्षे संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचा शोध धेवुन त्याच्यावर दिनांक १७/०८/२१ रोजी कलम ४,२५ शस्त्र अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात आली असून सदर आरोपीस अटक करण्यात आली. पुढील कारवाही हिंगणघाट पोलीस करीत आहे .

अचलपूर उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या उत्साहात ७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राम पाटिल मोनु सुळे कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशिस्तपत्र गौरव करण्यात आला.

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
===============
अमरावती -: अचलपूर उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या उत्साहात ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांचे अध्यक्षतेखाली ७५व्या स्वातंत्र्य सकाळी ७.३०
उपविभागीय कार्यालय येथे मोठ्या संख्येने शहरातील विविध शाळा महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी पी जे अबदागीरे अचलपूर तहसीलदार मदन जाधव कार्यकारी अभियंता चंद्र कांत मेहेत्रे . यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मोनु सुळे राम पाटील यांना कोरोणा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशिस्तपत्र देवुन गौरविण्यात आले.यावेळी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

भोई समाजाला स्थाईक जागा देण्यात यावी डाॅ उमेश वावरे यांनी केली मागणी..

0

 

हिंगणघाट मच्छीमार संघटनेची स्थाई जागा मिळण्याबाबत अनेक दिवसाची मागणी आहे.
शहरात मटण मार्केट व चिकन मार्केट यांना स्थाई जागा आहे.
परंतु मच्छीमार समाजा करीता कोणतही स्थाई जागा नाही .
आम्ही शासनाला वारवार निवेदन दिले परंतु ह्यावर कायम स्वरूपी तोडगा निघाला नाही.
दि.11/3/2010 ला जिल्हा अधिकारी महोदयांनी नगर परिषद हिंगणघाट हयाना तोडगा काढनाचे आदेश दिले होते.
परंतु मुख्याधिकारी हिंगणघाट यानी त्यावर कोणताही तोडगा काढला नाही.नंतर खासदार व आमदार महोदय याची जाणीव करून दिली परंतु त्यांनी सुद्धा हया प्रकरणात लक्ष
दिले नाही. अनेक भोई समाजाचा पोट पाण्याचा प्रश्न आहे .
मुला बाळाचा उदरनिर्वाहचा एकमात्र व्यवसाय आहे.
तरी आपण हयावर तातडीने लक्ष घालून त्वरीत कायमस्वरूपी तोडगा काढनात यावा .नाही तर भोई समाजा तर्फ जनआंदोलन करण्यात येईल.
अशे निवेदन डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत मा. जिल्हा अधिकारी वर्धा यांना देण्यात आले. त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. प्रदीप माणिकपुरे. जिवनभाऊ उरकुडे. इमरान शेख. प्रदीप कोल्हे. अनिल ढाले. चंद्रा कोले.देवराव बावणे.सचिन कापटे. दत्तु कोल्हे. लक्ष्मण ढाले. अशोक कोले.अमृत राव बावणे. ज्ञानेश्वर ढाले. ज्ञानेश्वर मन्ने.मारोती पोहनकर. गणेश मोरे.झगन मोरे .मारोती मोरे.ज्ञानेश्वर निमसळे.मंगल वानखेडे. सुनिलराव पढाल.यशवंत बांवणे. अशोक सुरजुसे. नागेश बावणे.सुरेश मोरे.रमेश मोरे.डोमाजी मन्ने. नामदेव मोरे.किशोर जावडे.पाडूरग बावणे .विजय कोल्हे. प्रशांत ढाले.चिंतामण कापटे.मोहन बावणे गणेश मन्ने. गजानन गेडाम. गणेश पडाल.मारोती कोल्हे.अजय बावणे.बबनराव मेश्राम.आकाश कोल्हे. विठ्ठल कोल्हे. विलास बांवणे. श्रावण बांवणे. शंकरजी बांवणे. मयूर बावणे. कुटु जावरे.राकेश बावणे. रितेश मोरे. दुर्गा मोरे.करन मलई.गणेश मोहीजे. रोशन वानखेडे. नरेश चिरडे .प्रशांत लाडगे.राहूल पढाल.सुरज बावणे. नदु ढाले. विनोद आमगे.गुरुदेव बावणे. विशाल कोल्हे. अजय ढाले देवा किरडे.मधुकर मोरे.विनोद भोटे. अभिलाषा पढाल .उत्तम मोरे.अजना मलाई.दिपक मोरे.शंकर मोरे.सुधाकर सातघरे.सुधाकर मोरे. वंसता मोरे. मोरेश्वर मोरे.जालीधर बावणे. किरण मोरे. ईत्यादि मान्यवर उपस्थित होते..
सूर्या मराठी न्न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

गावठी पिस्तुलासह फिरत असलेल्या चिंचोली येथील तरूणाला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0

 

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालक्यातील चिंचोली गावातील गणेश शिवाजी पाटील या तरूणाकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण खात्याच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी पोहेकॉ शरद वसंतरावभालेराव, महेश महाजन, किरण मोहन धनगर आणि प्रमोद अरुण लाडवंजारी यांचे पथक तयार केले.

या पथकाने चिंचोली तालुका यावल येथे जाऊन गणेश शिवाजी पाटील (वय२१, रा. रामानंद नगर, चिंचोली, तालुका यावल) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. हे पिस्तुल जप्त करण्यात आले असून गणेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरूध्द आर्म ऍक्टसह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.