Home Blog Page 422

चोपडा मतदारसंघाच्या आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांसाठी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

0

 

 

यावल प्रतिनिधी ।विकी वानखेडे

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आ.प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते विकास कामांचा वाघझीरा तालुका यावल येथे शासकीय आश्रम शाळा दुरुस्ती तसेच खावटी अनुदान वाटप तसेच दोनगाव येथे स्मशानभुमी बांधणे, चिंचोली येथे संरक्षण भिंत बांधणे, शिरागड येथे पेवर ब्लॉक बसवणे ईचखेडा येथे पेवर ब्लॉक बसवणे अशा विविध विकास कामांचे भुमीपुजन करण्यात आले. दरग्यान यावल तहसील कार्यालयामध्ये आ. लताताई सोनवणे व तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते तथा निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख यावल रविंद्र सोनवणे, युवा सेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे यांच्या उपस्थित दारिद्रय रेषेखालील कुटुंबप्रमुख निराधार महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत यावल तालुक्यातीत चोपडा मतदारसंघातील अलका पाटील , दहीगाव, ज्योती पाटील, उंटावद , नुसरत दगडु तडवी रा . किनगाव बू॥ , सरलाबाई जिजाबराव पाटील रा . गिरडगाव ,सुंनदा पाटील रा .थोरगव्हाण, सखुबाई मेहतरे रा . मनवेल , भिकुबाई भिल रा . दगडी आणी वंदना कोळी रा . डांभूर्णी या ८ महीलांना प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे अर्थसहायचे धनादेश वाटप करण्यात आले.

तसेच रेशन कार्ड , विद्यार्थ्यांना शैक्षणीक कार्यासाठी उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित हो.ते उपतालुकाप्रमुख आडगाव योगेश पाटील उपतालुकाप्रमुख मनवेल विनायक पाटील, उपतालुकाप्रमुख पप्पू जोशी, यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवासेना शहर प्रमुख सागर देवांग, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे तालुका संघटक अजहर खाटीक, रोहिदास महाजन किनगाव मनोहर पाटील, सरपंच गिरडगाव, प्रताप सोनवणे सरपंच शिरागड, मोहन कोळी सरपंच पिंपरी, भरत चौधरी चुंचाळे, भरत राजपूत बोराळे, प्रदीप वानखेडे, विकी वानखेडे बोराळे, निलेश साळुंखे चिंचोली सूर्यभान पाटील डोणगाव ,आदिवासी तालुका संघटक भारसिंग तेरसिंग बारेला वाघझिरा, दिनेश साळुंके चिंचोली, सुधाकर आबा वाघोदा, मनोहर पाटील गिरडगाव ,अण्णा कोळी डांभुर्णी, अशोक पाटील थोरगव्हाण, समाधान कोळी थोरगव्हाण ,पिंटू साळुंके शिरागड, हेमंत पाटील नायगाव ,प्रकाश कोळी दहिगाव ,अविनाश पाटील, इस्‍माईल तडवी सावखेडा सिम, बबलू कोळी किनगाव ,भरत पाटील कोरपावली, आशिष झुरकाडे महेलखेडी, गोकुळ कोळी, विनायक कोळी मनवेल ,जितू खंबायत मोहराळा ग्रामपंचायत सदस्य, विरावली नथूभाऊ उपशहर प्रमुख यावल किरण बारी, मोहसीन खान ,विजय पंडित, पिंटू कुंभार, गणेश कोळी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी मानले.

जळगाव जिल्ह्यात कोवीड१९च्या पहील्या लसीकरण मोहीमेत १०० टक्के उत्कृष्ठ कार्य करणारे राजोरा ठरले पहीले गाव

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील राजोरा हे गावा जळगाव जिल्ह्यातील पहीले १०० टक्के कोवीड१९च्या पार्श्वभुमीवर लसीकरण करणारे गाव जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ .रंजनाताई पाटील यांनी दिली भेट प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या स्थानिक आरोग्य पथकाचे केले कौत्तुक . दरम्यान मागील दिड वर्षापासून संपुर्ण देशासह राज्यात देखील कोरोना विषाणु संसर्गाने थैमान घातले असुन , या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलीत अनेकांची कुटुंब उद्धवस्थ झालीत अनेक जवळचे मित्र दुरावलीत अशी अनेक संकटे मानवी जिवना देणाऱ्या कोरोना संपुष्टात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झालीत यात महाराष्ट्र राज्य हे देशातले कोरोनाच्या गोंधळात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणारे पहीले राज्य ठरले असुन, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातुन अत्यंत वेगाने कोवीशील्ड या लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवुन उल्लेखनिय कार्य केले .दरम्यान यावल तालुक्यातील भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणारे राजोरा उपकेन्द्राने गाव आणी परिसरात नागरीकांनी कोवीड लसीकरण मोहीमेत १०० टक्के लसीकरणाचे कार्य केले असुन, पहीले कोविडशिल्ड लसीकरण कार्यक्रम हे दिनांक ८ / o४ / २०२११८ते ४४ वर्षाच्या वयोगटातील १९९ दिनांक २३ / ४ / २०२१ला५९ वर्ष वयोगटाच्या १८४ नागरीकांना त्याचप्रमाणे ६० वर्ष वयोगटातील २०२ जणांना तर गरोदरमातांना दिनांक १० ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत असे सर्व वयोगटातील ५८५ पैक्की ५८५ नागरीकांनी घेतले असुन ८९५ लसीकरण डोस देण्यात आलीत तर१५ ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत दुसरे लसीकरण५५० नागरीकांनी घेतले असुन असे लसीकरणच्या राष्ट्रीय आरोग्य मोहीमेत उत्कृष्ठ कार्य करणारे राजोरा हे जळगाव जिल्ह्यातील पहीले गाव ठहरले आहे . या आरोग्य सेवेच्या उत्कृष्ठ कार्यासाठी भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक्षा सुरुशे , डॉ प्राजक्ता चौहान , डॉ . राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राजोरा उपकेन्द्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ .जाकीर हुसैन पिंजारी , आरोग्य सहाय्यक राजेन्द्र पालवे, आरोग्य सेविका श्रीमती के आर बोरोले , श्रीमती एस एस पाटील , श्रीमती वैशाली महाजन , आरोग्य सेवक अलताफ देशपांडे त्याचप्रमाणे आशा कार्यकर्ता श्रीमती मनिषा महाजन , श्रीमती मंगला सोनवणे , श्रीमती आशा पाटील , श्रीमती ज्योती ठाकरे , हेमलता नारखेडे , किरण नेहते , हर्षल सोनवणे यांनी महत्वाची कामगिरी बजावली , दरम्यान जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ . रंजनाताई पाटील यांनी या ठीकाणी भेट दिली त्यांच्या सोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी टी जमादार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त ब्ऱ्हाटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी त्यांचे स्वागत सरपंच सौ . पुष्पा गिरधर पाटील , उपसरपंच दिनेश सिताराम पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर लक्ष्मण सानोने, सौ . रोहीणी वासुदेव बोरोले, सौ सुनंदा भगवान पाटील , श्रीमती सुवर्णा संजय महाजन , ग्रामसेवक पी पी चौधरी, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील यांनी केले .

निशाणपुरा वार्ड येथील कब्रस्थान परिसरात 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे पर्वावर वृक्षारोपण कार्यक्रम

0

 

हिंगणघाट 15 ऑगस्ट 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त निशाणपुरा कब्रस्थान येथे आंबा,चिक्कु ,जाम्भूळ,आवळा इत्यादि पर्यावरणपूरक तसेच लोकोपयोगी ५० झाडांचे वृक्षपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बिस्मिल्लाहखान होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका वैशाली ताई सुरकार , नगरसेवक धनंजय बकाने , नगरसेवक प्यारूभाई कुरेशी , ऍड. इब्राहिम बख्श आझाद, हाजी मोहम्मद रफीक, प्रविन उपासे, इम्रान सर, इकबाल पहेलवान , अमीन भाई, रहीम पहेलवान , अब्दुल सलीम , सलीम कुरेशी , गुडु मौलाना . आसिफ सोलंकी निशानपुरा मस्जिद अध्यक्ष मुस्ताक अहेमद,मस्जिद सेक्रेटरी करीमखान ,अताउलाखान ,यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली .
कार्यक्रमाचे आयोजनासाठी निशाणपुरा कमेटी अध्यक्ष अहेमद खान, उपाध्यक्ष अंनिस खान , सचिव शेख इर्शाद, सहसचिव शेख नदीम, कोषाध्यक्ष शेख सोहेल सदस्य कलाम खान सदस्य ईस्माइल खान इत्यादिनी परिश्रम घेतले.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

आमदार समिर कुणावार यांची मातोश्री स्व. आशाताई कुणावार अभ्यासिकेस सदिच्छा भेट

0

 

हिंगणघाट
दि.१६ आगस्ट २०२१

शहरातील मातोश्री आशाताई कुणावार अभ्यासिका येथे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी भेट देऊन पाहणी केली.
अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना काही समस्या किंवा अडचणी असल्यास त्यांनी कोणत्याही क्षणी संपर्क करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी हिंगणघाट तालुक्याच्या नव्यानेच रूजू झालेल्या उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोणाले, तहसीलदार श्रीराम मुंदड़ा इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
नुकत्याच २१ फेब्रूवारी रोजी स्व.आशाताई कुणावार यांचे स्मृतीपर या अभ्यासिकेचे स्थानिक यादगार व्यायाम शाळेच्या परिसरात निर्मित समाज भवनात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील गरीब,होतकरु विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगामार्फत किंवा शासनाचेवतीने शासकीय, निमशासकीय नौकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तसेच इतर नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षाची तयारी करण्यासाठी,त्याचा अभ्यास करण्यासाठी विनामूल्य पुस्तके तसेच शांततामय परिसर उपलब्ध व्हावा,असा आ.समीर कुणावार यांचा हेतु होता,या हेतुने प्रेरित होऊन त्यांनी पुढाकार घेऊन या अभ्यासिकेची निर्मिती केली होती,अवघ्या सहा महिन्याचे कालावधीतच या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करीत शासकीय नौकरीत प्रवेशसुद्धा मिळविला . आमदार समीर कुणावार, श्री. सुनिल फुटाणे सर, अ‍ॅड. सुशील नायडू सर व इतर मान्यवरांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी दिसुन आले.
आज सदिच्छा भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले ,तहसीलदार श्रीराम मुंदड़ा यांनी अभ्यासिकेतील उपस्थित विद्यार्थ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

शास्त्री वार्ड येथे 75 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

0

 

हिंगणघाट शास्त्री वार्ड येथे फिटनेस क्लब व चावडी स्वयं सहाय्यता बचत गट बालाजी दाल मिल च्या मागे
15 ऑगस्ट निमित्त देशभक्ती गीते, कारगिल युद्ध सर्वधर्मसमभाव यावर लघु नाटक, मनोरंजनात्मक,कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमातून आजच्या युवा पिढीला आपल्या देशातील सैनिकांनी केलेले बलिदान व देशासाठी सर्वधर्मसमभाव ही भावना जागृत करणे हे लघुनाट्य च्या माध्यमातून सादर करण्यात आले संतोष करपे माजी सैनिक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व मोलाचे मार्गदर्शन केले . आजच्या युवा पिढीने जाती-धर्माचे राजकारण न करता सर्व धर्म समभाव याच गोष्टीचा विचार केला पाहिजे आपले सैनिक देशासाठी, आपल्यासाठी देशाचे रक्षण करतात व आपण धर्माच्या नावावर एक मेकाचे रक्त सांडवतो अशा कार्यक्रमा चे आयोजन करणे आज अत्यंत आवश्यक आहे .
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन चावडी बचत गटाचे अध्यक्ष राजू धात्रक, उपाध्यक्ष सुधीर सावकार,, सचिव नीलकंठ आष्टनकर, सदस्य विलास खडसे, प्रदीप सायंकार, फिटनेस क्लब चे वेदांत आष्टनकर सुमित सावकार , यश खडके, प्रदीप शाहू, बालू कोरटकर , यांनी केले हा कार्यक्रम वार्डातील लोकांनी उपस्थित राहुल 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला .
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

विरावाली ता. यावल या गावातिल देश सेवेत कार्यरत/माजी सैनिक आणि त्याचे परिवार सदस्यना स्वातंत्र्यदिना निमित्त १४ आणि १५ अगस्त २०२१ ला मोफत सुविधा प्रदान केली आहे.

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

विरावली गावातिल नाभिक समाजाचे श्री दिलीप शामराव फूलपगारे, श्री सतीश यादव फुलपगारे, श्री दिनेश पुंडलिक फूलपगारे, राहुल दिलीप फूलपगारे, विशाल विलास फूलपगारे आणि फुलपगारे परिवार यांचे कडून त्यांचे गावातिल सैनिक याना स्वातंत्र्यदिना निमित्त १४ आणि १५ अगस्त २०२१ ला मोफत दाढ़ी कटिंग ची सुविधा प्रदान करने बाबत निर्णय घेउन तशी सैनिक/परीवाराना सुविधा प्रदान केली गेली. या त्याचे महान कार्य बद्दल वीरावली गावचे नाभिक सामाजाचे सारे गाव व पारिसारातिल नागरिक यांचे कडून स्वागत व कौतुक केले जात आहे ज्यात गावातील सैनिक प्रेमी नागरिक, तथा माजी सैनिक मुकेश राजपुत सीआरपीएफ, व सारे सेवारत सैनिक ज्यात बीएसएफ सैनिक महेंद्र पुंडलिक पाटिल, प्रदीप बाळु अड़कमोल CRPF, अमोल बाळु अड़कमोल CISF, प्रशांत मिलिंद अड़कमोल व संकेत संजय अड़कमोल, Army सारे विरावली
यांनी हया निर्णया चे स्वागत करून सैनिक आणि पारिवार यांचे बद्दल वीरावली गावातिल नाभिक समाज यांचे या प्रेमाचे मनपुर्वक कृतनता व आभार व्यक्त केले आहे ।

तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्य विमल बाई चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

0

 

यावल, तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

आज बोराडे ता यावल. जि. जळगाव येथे ७५व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करतांना गावाचे ग्रामपंचायत सदस्य विमलबाई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले सरपंच वंदना चौधरी उपसरपंच उज्जैन सिंग राजपूत मोना राजपूत सरोज बाई राजपूत शीतल राजपूत रवींद्र वानखेडे पोलीस पाटील आशा वर्कर सुनयना राजपूत माजी सरपंच नितीन राजपूत तमन्ना मुक्त अध्यक्ष कैलास सिंग राजपूत खिलचंद चौधरी भरत राजपूत युवा सेना अध्यक्ष अनिल वानखेडे किशोर वानखेडे संदीप वानखेडे रोजगार सेवक जितेंद्र पाटील सुमित राजपूत तुषार राजपूत किसन नावे सूत्रसंचालक प्रदीप वानखेडे यांनी केले तरी आभार व्यक्त संजय सिंग राजपूत यांनी मानले आहे

स्वातंत्र्याच्या ७५ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या विविध घोषणा ; ७५ वंदे भारत ट्रेन, देशाच्या विकासासाठी १०० लाख कोटींची गतीशक्ती योजना; महिलांसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म योजना ; २०२४ पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिकतांदूळ ; नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची स्थापना ; मुलींसाठी सैनिकी शाळा खुल्या — मोहन चौकेकर

0

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडवून आज अनेक घोषणा केल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ आठवड्यांमध्ये ७५ वंदे भारत ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. भारताची विकास यात्रा सुरू करण्याची वेळ आली आहे. या विकास यात्रेची आता सुरुवात करून, पुढील २५ वर्षांचा प्रवास हा नवीन भारताच्या निर्मितीचा अमृत काळ आहे. या अमृत काळात आमच्या संकल्पांची पूर्तता आपल्याला स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात कोणत्या नवीन घोषणा केल्या ते पाहूया…

*मुलींसाठी सैनिकी शाळांची कवाडे उघडणार*
सर्व सैनिका शाळांची कवाडं आता मुलींसाठीही उघण्यात येतील. देशात सध्या ३३ सैनिकी शाळा आहेत. अडीच वर्षांपूर्वी मिझोराममध्ये मुलींना सैनिका शाळेत प्रवेश देण्याचा प्रयोग केला गेला. आता देशातील सर्व सैनिकी शाळांची कवाडं मुलांसाठी खुली केली जातील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

*स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ७५ वंदे भारत ट्रेन*
देश आज स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. आता ७५ आठवड्यांच्या आत ७५ वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्याला जोडतील. देशात ज्या वेगाने नवीन विमानतळे बांधली जात आहेत आणि उडाण योजना दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडत आहे, ती देखील अभूतपूर्व आहे, असं ते म्हणाले.

*पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करणार*
पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू करण्यात येईल. १०० लाख कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील. पंतप्रधान गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन हा औद्योगिक उलाढालीला चालना देणं आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणारा असेल.

*नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन*
ग्रीन हायड्रोजनचे जागतिक केंद्र आणि सर्वात मोठा निर्यातदार बनण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची स्थापना करण्याची घोषणा पीएम मोदींनी केली. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी देश ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी झाला पाहिजे, असा संकल्प पंतप्रधान मोदींनी सोडला. देशाची प्रगती आणि स्वावलंबी होण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होणं गरजेचं आहे. देश अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे आणि या क्षेत्रातील ऊर्जा क्षमता एक लाख मेगावॅटच्या वर गेली आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. देशाने २०२२ पर्यंत १,७५,००० मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, असं मोदींनी सांगितलं.

*महिलांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म*
देशात ८ कोटीहून अधिक गावातील महिला बचत गटांशी जुळल्या आहेत आणि त्या एकहून अधिक उत्पादनांची निर्मती करतात. त्यांच्या उत्पादनांना देशात आणि विदेशात मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल, अशी घोषणा पीएम मोदींनी केली.

*२०२४ पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिक तांदूळ*
सरकार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजनांद्वारे गरिबांना वितरित करण्यात येणारा तांदूळ पौष्टिक ( फोर्टिफाइड ) केला जाईल. सरकार आपल्या विविध योजनांतर्गत जे तांदूळ गरीबांना देते, ते आता पौष्टिक तांदूळ देईल. रेशन दुकानातून दिला जाणारा तांदूळ असो की मध्यान्ह भोजणासाठी दिला जाणारा तांदूळ, २०२४ पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे दिला जाणारा तांदूळ हा पौष्टिक केला जाईल.

*खेळात तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी प्रयत्न*
भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. ऑलिम्पिक खेळलेल्या खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली. तसंच त्यांनी नव्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं मोठं काम केलं. खेळांमध्ये प्रतिभा, तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र आणि व्यापक करावी लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ✍️ *मोहन चौकेकर*

अनोळखी व्यक्ती बुरकुणी शिवारात शेतात मृत अवस्थेत

0

 

हिंगणघाट गणपत हिरामण चापले रा.बुरकुणी यांनी आज 15 ऑगस्टला पोलीस स्टेशनला माहिती दिली की बुरकुणी शिवारातील शेतात एक अनोळखी अंदाजे 60 ते 65 वर्षे पुरुषाचा मृत अवस्थेत पडून आहे. त्यावरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे मर्ग. क्र. 80/ 2021 कलम 174 नोंद करून सदर अनोळखी मृतक इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु ओळख पटली नाही . मृतकाचे प्रेत सध्या उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील
शवविच्छेदन शीतगृहात ठेवण्यात आले आहे . याचे वर्णन उंची 05 फूट 07 इंच रंग सावळा बांधा सडपातळ अंगात पांढुरक्या रंगाचे त्यावर पिवळसर उभ्या रेषा असलेले शर्ट व पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला असून त्याच्याजवळ एक पिवळसर रंगाची तंबाखू चुन्याची प्लास्टिक डब्बी मिळून आली सदर अनोळखी मृतकांची ओळख पटल्यास हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक वसंत शुक्ला यांच्याशी संपर्क करावा . मोबाईल क्र.9765864264 , हिंगणघाट पोलीस स्टेशन नं.07153 – 244033
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

बेवारस जखमी उंटाला मिळवुन दिला हक्काचा निवारा ; निसर्ग साथी फाऊंडेशन हिंगणघाट चा पुढाकार

0

हिंगणघाट शहरातील वणा नदी तीरावर बऱ्याच दिवसांपासून एक जखमी उंट फिरत असल्याचे विट भट्टीवर काम करणाऱ्या लोकांचा लक्षात आले ,त्यांनी त्या उंटाचे निरीक्षण केले तर त्याला मोठी जखम होती . ही बाब त्यांनी निसर्ग साथी फाउंडेशन चे गुणवंत ठाकरे यांना सांगितली , आणि लगेच निसर्ग साथी ची टीम उंटा ला पाहण्याकरिता गेली . प्रकाश धानोरकर यांचे शेता जवळ उंटाला पकडून त्याचे निरीक्षण केले .त्याचा शरीरावर अनेक जखमा होत्या उपचार न मिळाल्यामुळे त्या चिघळल्या होत्या जखमांमध्ये जंतु पडले होतेत्याला दीर्घ उपचारा ची गरज आहे हे ओळखून निसर्ग साथीचे शिलेदार राकेश झाडे ,परिक्षीत ढगे , यांनी त्याचेवर प्रथमोपचार केले ,खायला दिले . निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडू यांच्याशी चर्चा करून त्याला प्यार फाउंडेशन ऐनीमल रेस्क्यू सेंटर मध्ये दीर्घ उपचारा करिता पाठवायच ठरवीले .उंटाला रात्री ११ वाजता प्राणी रुग्णवहिकेतून रेस्क्यु सेंटर ला नेण्यात आले .श्री देवेन प्यार फाउंडेशन त्याला घेण्यासाठी आले होते .निसर्ग साथी फाउंडेशन जखमी प्राण्यांवर उपचारा करिता नेहमी प्रयत्नशील असते ,कुत्रे,गाय,मोर,उंट ,गाढव, माकड यांचा उपचारा करिता प्रयत्न केला त्यामुळे सर्वत्र निसर्ग साथी फाउंडेशन चे कौतुक होत आहे .
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा