Home Blog Page 424

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन, अधिकाऱ्यांची भंबेरी, एकास अटक..! –मोहन चौकेकर

0

 

 

मंत्रालयातील दूरध्वनी बुधवारी (ता.11) रात्री खणाणला. समोरुन साक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज ऐकू येत होता. “हॅलो, सिल्व्हर ओकवरुन शरद पवार बोलतोय.. चाकणमधील जमीन प्रकरण मिटवा..” असे फोनवर सांगण्यात आले. हुबेहुब शरद पवार यांचाच आवाज असल्याने अधिकारीही काही क्षण गोंधळले.

मात्र, मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या काॅलची शहानिशा करण्यासाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वरच कॉल केला नि सगळा प्रकार समोर आला. कोणीतरी पवार यांच्या नावाने फेक कॉल केल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने ते गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.

पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यातील जेऊर येथून एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवारांच्या आवाजात थेट मंत्रालयात कॉल केला होता, यासंदर्भात काहीही बोलण्यास पोलिसांनी नकार दिला.

दरम्यान, शरद पवार यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे मंत्रालयात त्यांच्या नावे फोन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांनीही या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ✍️ मोहन चौकेकर

दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या – मोहन चौकेकर

0

 

1. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर, टास्क फोर्सच्या शिफारसीनंतर राज्य सरकारचा निर्णय, अधिकृत आदेशाची प्रतीक्षा ; शाळा सुरू करण्याच्या निर्णयात सरकारचा सावळा गोंधळ

2. मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन ; सध्याच्या कामगिरीवर समाधानी नाही, प्रतिदिन 100 किमीचा महामार्ग बांधण्याचं माझं लक्ष्य, नितीन गडकरी यांचा विश्वास

3. राज्यसभेतील कालच्या अभूतपूर्व गोंधळावरुन राजकीय महाभारत, संसद भवन परिसरात गोंधळाचा निषेध

4. काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; राहुल गांधी यांच्यानंतर पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद ; केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप या नेत्यांचेही ट्विटर हँडल ट्विटरकडून बंद

5. राज्यातल्या समान विकासासाठी ‘नदी जोडो’ प्रकल्पावर भर देणार, माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं प्रतिपादन

6. महाविद्यालयीन तरुणांसाठी जिल्हा स्तरावर 30 टक्के लस राखीव ठेवावी, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा प्रस्ताव, महाविद्यालयीन फी संदर्भातही विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार

7. हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील तळीयेची पुनरावृत्ती, प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

8. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद ; राज्यात बुधवारी 5560 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर रिकव्हरी रेट 96.82 टक्के

9. अमरावतीच्या पिस्तुल घेऊन व्हिडीओ काढणाऱ्या पोलिसाचं निलंबन रद्द, परिसरात लागले शुभेच्छांचे बॅनर

10. भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी, पावसामुळे खेळ थांबला, भारताची धावसंख्या 46/0, सामन्यापूर्वी इंग्लंडला दोन मोठे धक्के, दिग्गज खेळाडू बाहेर ✍️ मोहन चौकेकर

वृत्तपत्रांची थकीत जाहिरात बिलं त्वरित चुकती करावीत ; एस.एम.देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी –मोहन चौकेकर

0

 

मुंबई :राज्यातील छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रात प़सिध्द झालेल्या सरकारी जाहिरातींची कोट्यवधींची थकबाकी सरकारकडून येणे बाकी आहे ही रक्कम सरकारने त्वरित चुकती करावी अशी मागणी मराठी परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे..
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील वृत्तपत्र व्यवसाय मोडकळीस आलेला आहे.. सर्वच वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडलेली असल्याने त्यांच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.. सरकार वृत्तपत्रे आणि पत्रकारांसाठी कोणताच दिलासा देताना दिसत नाहीत.. उलट वृत्तपत्रातून प़सिध्द झालेल्या जाहिरातींची बिलं देखील दिलं जात नसल्याने संकट अधिकच उग्र झालं आहे..युतीच्या काळात विद्यमान अर्थमंत्री अजित पवार यांनी वृत्तपत्रांची बिलं त्वरित द्यावीत अशी मागणी विधान सभेत केली होती.. म्हणजे त्यांना विषयाचे गांभीर्य माहिती आहे.. आज अजित पवार स्वतः अर्थमंत्री असताना देखील बिलं दिली जात नसल्याबद्दल देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.. महाआघाडी सरकारने वृत्तपत्रांचा अधिक अंत न पाहता तातडीने वृत्तपत्रांची थकित बिलं चुकती करावीत अशी मागणी देशमुख यांनी केली आहे..
सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करून देखील सरकार पाच पाच वर्षे बिलं देत नसल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हयातील वृत्तपत्र मालक स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उषोषण करीत आहेत.. मराठी पत्रकार परिषदेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून स्वतः एस.एम.देशमुख काही वेळ या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या प़सिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.. पत्रकावर विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत…बीड जिल्हयातील वृत्तपत्रांची जवळपास दीड कोटींची थकबाकी सरकारकडून येणे आहे.. यातील काही बिलं तर २००० पासून प़लंबित आहेत.✍️ मोहन चौकेकर

यावल येथील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिनसाजरा

0

 

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात *मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग व आय. क्यू. ए. सी.* यांच्या संयुक्त विद्यमाने *विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त* व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषवले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. एस. आर .गायकवाड यांनी नामविस्तार दिन साजरा करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सदर कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .उपप्राचार्य प्रा. एम .डी . खैरनार यांनी विचार व्यक्त केले की, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार करताना कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी विरोध दर्शविला नाही. सर्वांनी एक मताने निरक्षर असूनही काव्य प्रांतात अनमोल कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या जातिवंत शेतकरी असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. प्रा. प्रवीण पाटील यांनी बहिणाबाईंच्या काव्यावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रतिपादन केले की, बहिणाबाईंच्या प्रत्येक कवितेत जीवन संदेश आहे. त्या दैववादी नसून कर्मवादी होत्या. त्यांच्या कवितेतून निसर्ग, मानव समाज, कृषी क्षेत्र व सण उत्सव यांचे उत्कट चित्रण येते .विशेष म्हणजे त्यांच्या कविता बोलीभाषेमध्ये असून लयबद्ध आहेत.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या सोनवणे यांनी बहिणाबाईंच्या कवितेतील चिंतनशीलता , सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भावमयता, आशय घनता ही साहित्यिक वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले. आभार डॉ. एस. पी . कापडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा .संजय पाटील, डॉ. पी. व्ही पावरा, डॉ. एच. जी .भंगाळे, मिलिंद बोरघडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावल विस्तारीत वसाहतीच्या श्रीस्वामी केन्द्र आवारातील बाल उद्यानाचे काम अतुल पाटीलांच्या प्रयत्नांनी पुर्णत्वास

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातील विस्तारीत क्षेत्रातील वसाहती मधील फालकनगरच्या श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात सुन्दर व भव्य असा बागीच्याचे कार्य हे पुर्णत्वास आले असुन, याबागीच्या ( उद्याना ) चे कार्यापुर्ण झाल्या मुळे या क्षेत्राच्या नागरीकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी उद्यानाच्या कामास भेट दिली व उद्यानाच्या कामाबाबतची सविस्तर माहीती देतांना प्रस्तुत प्रतिनिधी बोलतांना सांगीतले की मागील अनेक दिवसांपासुन शहराच्या विस्तारीत वसाहतीमध्ये फालक नगर क्षेत्रातील श्री स्वामी समर्थ केन्द्रच्या आवारात लहान चिमूकल्या बालकांसाठी यावल नगर परिषदच्या माध्यमातुन ४५ लाख रुपयांच्या वेशिष्टपुर्ण निधीतुन फालक नगर वस्तीच्या सुन्दरते अधिकभर टाकणाऱ्या आकर्षक अशा उद्यानाचे कार्य हे पुर्णत्वाकडे गेले असुन , या उद्यानात विविध प्रकारची लहान चिमकुल्या बाळांसाठी अत्याधुनिक खेळणे, सहज खेळतांना व्यायाम करता येईल अशी यंत्रे या सुन्दर व आकर्षक उद्यानात लावण्यात आली आहे . या परिसरातील नागरीकांनी मागील काही दिवसापुर्वी या ठीकाणी उद्यान निर्माण व्हावे अशी मागणी नागरीकांनी केली होती या मागणीचा पाठपुरावा माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झाल्याने नागरीकांनी पाटील यांचे आभार मानले.

परसाडे या आदीवासी वस्तीवर सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबीर संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ. नसीमा तडवी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किशोरवयीन ( ११ ते १९ वर्ष वयोगटातील ) मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून ग्रामीण भागात गावागावात जाऊन विशेष मार्गदर्शनपर शिबिर घेऊन एक सुत्य असा उपक्रम राबवित आहेत.परसाडे या गावात कोविड१९च्या नियमांचे पालन करून शिबीर घेण्यात आले.
किशोरवयीन वयोगटातील मुला-मुली मध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या दरम्यान त्यांना अनेक प्रश्न व शंका निर्माण होत असतात. परंतु आपल्या समाजात लैंगिक ह्या विषयावर मोकळेपणाने बोललेच जात नाही. पालक व शिक्षक ही ह्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसून येत नाही. व त्यांच्या मनातील प्रश्न व शंकाचे समाधान होत नाही. परिणामी लैंगिक विषयावर असलेला गैरसमजुती वाढीस लागून त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे तरुण असतील. त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य हे निरोगी व सशक्त असायला हवे. म्हणून किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींना योग्य व शास्त्रीय मार्गदर्शनाची गरज ओळखून डॉ.नसीमा तडवी गावागावात जाऊन किशोरवयीन मुलींसाठी हा उपक्रम राबवित आहेत.परसाडे येथे गावात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिरास मोठ्या संख्येने आदिवासी मुलीं सहभागी झाल्या होत्या. डॉ. नसीमा तडवी यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समस्या, वैयक्तिक स्वच्छता, होणारे शारीरिक बदल व मासिक पाळी विषयी समस्या आदी विषयाबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. व मुलींच्या शंका व समस्या जाणून घेऊन त्याचे निरसन केले. तर काही मुलींसोबत त्यांच्या आई (माता) सुद्धा आलेल्या होत्या त्यांनीही मुलींच्या समस्या सांगितल्या त्यांच्या ही शंका व समस्यांचे निराकरण डॉ. तडवी यांनी केले. यावेळी आलेल्या सर्व किशोरवयीन मुलींची मोफत रक्त (H.B.) तपासणी करण्यात आली. व आवश्यकतेनुसार सर्वांना लोह आणि कॅल्शियम ची मोफत औषधी देण्यात आली. तसेच डॉ. तडवी यांच्याकडून किशोरवयीन मुलींसाठी नाश्ता व्यवस्थाही करण्यात आली होती. कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल माता व किशोरवयीन मुलींनी डॉ. तडवी यांचे आभार व्यक्त केले.डॉ. नसीमा तडवी या नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी कामे करीत असतात. कोरोना च्या दुसऱ्या लाटे च्या काळात सर्वसामान्य जनतेला लॉकडाउन चा फटका बसलेला होता. या परिस्थितीत डॉ. नसिमा तडवी यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले लसुन बर्डी या आदिवासी पाड्यात गरीब व गरजू आदिवासी बांधवांना (कुटुंबांना) जीवनावश्यक अशा किराणा किटचे वाटप केले होते. तर काही दिवसापूर्वीच त्यांनी लोहारा येथील मज्जितला इन्वर्टर भेट दिला होता. त्यांच्या या अशा सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आरोग्य सेविका मेहमूदा तडवी , गटप्रवर्तक सरला तडवी,आरोग्यसेवक भुषण पाटीसंजय तडवी, अंगणवाडी सेविका संगीता तडवी आशासेविका,हिराबाई तडवी,फरीदा तडवी,समीर तडवी,सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन व आदींचे सहकार्य लाभले

हिंगणघाट नगरपालिका कर्मचारी चा जलशुद्धीकरण टाकी मध्ये बुडून मृत्यू

0

 

हिंगणघाट स्थानिक नगरपालिकेच्या जल शुद्धीकरण केंद्रातील फिल्टर टाकीच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. राष्ट्रपाल ठमके वय 57 हे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून आज सकाळी ते जल शुद्धीकरण केंद्रात ड्युटीवर होते. यावेळी नगरपालिकेचे अन्य दोन कर्मचारी जलशुद्धीकरण केंद्राच्या समोरील भागात काम करत होते. ते टँकजवळ गेले असता राष्ट्रपाल ठमके यांची चप्पल मोबाईल त्यांना टँक वर ठेवून असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शोध घेतला असता ठमके हे टाक्यात मृतावस्थेत आढळून आले. घटनास्थळी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी ,मुख्याधिकारी अनिल जगताप तसेच पाणीपुरवठा अभियंता दिनेश तपासे यांनी भेट दिली.पोलिसांनी या मृत्युची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरात पोलिसावर गोळीबार, आरोपी फरार

0

 

हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात काल रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान पोलिस जमादार कमलाकर धोटे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. यात आरोपी अज्ञात इसमाचा हात पकडल्याने गोळी हवेत फायर झाली. गोळीबार करणारे अज्ञात आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.असून हिंगणघाट पोलिसात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. काल रात्री अकराच्या सुमारास नंदोरी चौकामध्ये दोन इसम दुचाकीने थांबले व त्यांनी चौकात आल्यावर उभे असलेले माजी नगरसेवक अनिल भोंगाडे यांना वरोरा कुठून जाते अशी विचारणा केली. अनिल भोंगाडे यांनी त्यांना तुम्ही कुठून आले व तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही असे विचारले असता ते उडवाउडविचे उत्तरे देत होती. या दरम्यान हिंगणघाट पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलिस जमादार कमलाकर धोटे हे साध्या कपड्यांवर आले व अनिल भोंगाडे जवळ थांबले असता त्यांना यातील ऐकाणे या रोडवर पोलिस असते का चेकिंग असते का असे विचारले. जमादार यांना दोघांवर शंका आली त्यांनी लगेच आपला मोबाईल नंबर त्यांना दिला व मला एक मिस कॉल द्या समोरं अडचण आली तर मी त्यांच्याशी बोलील मी देखील पोलिस आहे असे सांगितले. व आरोपींचा मोबाईल नंबर मिळविला . या दरम्यान अनिल भोंगाडे लघुशंका करण्यास गेले व जमादार धोटे यांनी तुमच्या बॅगेत काय आहे अशी विचारणा केली. व बॅगेला हात लावण्याचा प्रयत्न केला असतां अचानक यातील एकाने आपली रिव्हॉल्वर काढून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र जमादार धोटे यांनी त्याचा हात धरल्याने ती गोळी हवेत फायर झाली व एक काडतूस खाली पडली . यादरम्यान धोटे ओरडल्याने अनिल भोंगाडे धावत आले व जवळ पडली असलेली विट त्या दोघांना फेकून मारली. या दरम्याने एकाने भोंगाडे यांच्यावर अवजार चालविण्याचा प्रयत्न केला मात्र भोंगाडे यांनी परत विट हाती पकडली असल्यानं ते दुचाकीवरून पळून गेले. गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत आहे .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रपूर मनपा मध्ये सोडल्या कोंबड्या

0

 

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे ह्या करिता अमृतजल योजने अंतर्गत कंत्राटदाराला 2015 मध्ये 354 कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला परंतु आज 5 वर्ष लोटून गेले तरी ह्या योजनेच्या कंत्राटदाराने काम तर पूर्ण केले नाही आणि जे काम केले ते पण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले.
चंद्रपूर शहरा मध्ये पाईप लाईन टाकलेल्या भागात जे गट्टू लावण्यात आले ते गट्टू पूर्ण पणे जमिनीच्या आत गेले ह्याचाच अर्थ काम एकदम निकृष्ट दर्जाचे झाले.
ह्या विषयाला घेऊन वारंवार प्रत्येक झोन मध्ये नागरिकांच्या प्रश्नाला घेऊन निवेदन देण्यात आले परंतु मनपा चंद्रपूर ने दुर्लक्ष केले म्हणून ह्या विषयाला घेऊन आज दिनांक 12/8/2021 ला अमृत जल योजनेच्या भोंगळ कारभार आणि ह्या भोंगळ कारभार बघून अधिकारी दुर्लक्ष करीत असलेल्या मुळे आज महापालिका चंद्रपूर येथे कंत्राटदारावर चौकशी लावावी ह्या करिता धिक्कार आंदोलन करण्यात आले आणि अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी महापालिकेत कोंबड्या सोडण्यात आले सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक चंद्रपूर चे जिल्हा सचिव अभिनव देशपांडे ह्यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.

अपंगांना स्वयंरोजगारासाठी मंजुर जागा रद्द केल्यास सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटना चा म.न.पा. आयुक्त यांना इशारा

अमरावती: अपंगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर केलेली जागा रद्द केल्यास 15 ऑगस्ट रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा अपंग जनता दलाने दिला आहे. आज या संदर्भात अपंग जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अपंगांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी 2016 मध्ये स्थानिक अपंग बेरोजगारांना नझुलची जागा स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आली होती, पण आता काही राजकीय लोकांचीही या जागेवर नजर गेली आहे यामुळे दिव्यांगांसाठी मंजूर केलेली जागा रद्द करण्याचे षडयंत्र महानगरपालिकेत सुरू आहे. ही जागा रद्द केल्यावर 15 ऑगस्ट रोजी अपंग जनता दलाचे महासचिव राजिक शाह व नासीर बेग ये दोन पदाधिकारी अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात सामूहिक आत्मदहन आंदोलन करतील. असे निवेदन राजीव शहा, दिलबर शहा, नासिर बेग नजीर बेग, शेख बब्बू, राजीक शहा, मयूर मेश्राम,राहुल वानखेडे, शेख रुस्तम, फारूक शहा, सुफियान खान, इरफान खान, विकास धोटे, विद्या तायडे, बेबी शिंदे, वाचाला शिंदे, ललिता महेंद्र, जानकी पाटेकर, प्रज्वल गवळी, मनीष जगताप, वैशाली मोहोड, अश्विन वंजारी, हर्षद माहुरे संजय उगले, हर्ष सहारे, सतीश मरोडकर, प्रमोद शेबे, केशवराव कोठे, सीताराम डहाळकर, अमित तेभुर्णे इत्यादी उपस्थित होते.