Home Blog Page 425

बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील शेतीसाठीची अतिक्रमणाचा मालकी कायम पट्टे वाटप करा-के.जी.शाह

0

 

अजहर शाह

बुलढाणा:-बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव,सि राजा,दे राजा,मेहकर, व मोताळा या तालुक्यातील १९९० पूर्वीच्या शासकीय पड व गायरान जमीनिवरील शेतीसाठी असलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यात यावी या बाबत भूमी हक्क परिषद महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के जी शाह यांनी दि १०/०८/२०२१ रोजी मा,जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे की महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र एल इ एन १०९०/प्र, क्र /१७२/ज १ मंत्रालय मुंबई दिनांक २८ नोव्हेंबर १९९१ च्या शासन निर्णया नुसार बुलढाणा जिल्यात १९९०पूर्वी शासकीय जमिनीवर शेतीसाठी गायरान व पड जमीन अतिक्रमण क्षेत्र हे ४८३०,४६ हे आर आहे संबधित महसूल विभागाच्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी २२ सप्टेंबर २०११ मध्ये योग्य गावं पातळीवरिल अतिक्रमण धारकांनचा जिल्हाअधिकारी कार्यालया कडे न पाठविल्या मुळे जिल्ह्यातील अतिक्रमण धारकनवर अन्याय झाला आहे या बाबत संघटनेने मा,मुख्यमंत्र्याला पत्र लिहले होते त्याची दखल घेऊन राज्याच्या महसूल व वन मंत्रालयाने महाराष्ट्र शासन पत्र का,जमीन -२०१९ स,क,९६/ज-९/ मंत्रालय मुंबई ०३२ दि २८/०१/२०२० रोजी हे पत्र मा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठून बुलढाणा जिल्ह्यातील शेती साठीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमाकुल करण्या बाबत आदेशीत केले होते या वरून जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व विभागाने सर्व एस डी ओ व तहसीलदार यांच्या कडून अहवाल मागितला होता परंतु कोविडं 19 ही महामारी आल्यामुळे हे प्रकरण बंद पडले ते नव्याने सुरू करावे व जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या वतीने दिनांक-१/०९/२०२१ पासून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा भूमी हक्क परिषदेने दिला आहे

पक्षांचा अधिवास नष्ट केल्या प्रकरणी निसर्ग साथी चे एक दिवसीय धरणे आंदोलन

0

 

हिंगणघाट शहरातील पंचायत समिती परिसरातील कवठ वृक्ष जुलै अखेरीस पावसाने कोसळल्याने झाडांवरील पक्षांचा अधिवास सुरक्षीत ठेवून पक्षांचा प्रजनन संपेपर्यंत आक्टोबर पर्यत कवठ वृक्ष जैसे थे ठेवण्याचे आश्र्वासन प्रशासनाने निसर्ग साथी फाऊंडेशन ला दिले होते.हिंगणघाट शहरात गत 10 वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्गातील पशु पक्षी संवर्धनासाठी निसर्ग साथी फाऊंडेशन कार्यरत आहे.
मात्र गत 4 – 5 दिवसांपूर्वी प्रशासनाने दिलेला शब्द फिरवुन झाडाच्या फांद्या कटर नी कापल्या तद्दतच वृक्षाखाली विस्तव पेटवल्याने वृक्षांवर निवासी पक्षांची पिले मृत्यू मुखी पडली तर काही घरटी उद्धवस्थ झाली.प्रशासनाने दिलेला शब्द फिरविल्याचे निषेधार्थ तथा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास्तव निसर्ग साथी फाऊंडेशन नी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले .या धरणे आंदोलनात निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडु, रुपेश लाजुरकर, गजू कुबडे, प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे, राकेश झाडे,विजयभाऊ थोरात ,साई खोब्रागडे , प्रविन कारळकर , परिक्षित ढगे ,दिनेश मुडे आदी निसर्ग साथी सहभागी झाले होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

हनुमान मंदिर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व रोजगार सेवक अर्जुन भाऊ कराळे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण

0

 

 

श्री क्षेत्र नागझरी ग्रामपंचायत यांच्यातर्फे आज रोजी दिनांक अकरा आठ रोजी वृक्षारोपणाचा नागझरी गावामध्ये हनुमान मंदिर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व रोजगार सेवक अर्जुन भाऊ कराळे यांच्या माध्यमातून वृक्षारोपण चा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमाला गावचे सरपंच गणेश भाऊ खरप उपसरपंच रमाताई सरदार. ग्रामपंचायत सचिव रुपेश बोबडे व ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सरदार संतोष पवार आणि बहुसंख्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

पुरात वाहून गेलेल्या व्यकतींच्या कुटुंबियांना शासनाची मदत

0

 

दिनांक 11 ऑगस्ट
हिंगणघाट
मागील महिन्यात पुरात वाहून गेलेल्या समुद्रपुर तालुक्यातील दोन मृताकांच्या परिवारास आज महसुल विभागाकड़ून त्यांना आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते धनादेशाद्वारे दोन्ही कुटुंबियांना ४ लाख रक्कमेचे धनादेश सोपविण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार श्री संजय महाजन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
समुद्रपुर तालुक्यात सततधार पावसामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील तास येथील संतोष शंभरकर या वृद्ध इसमाचा मृत्यु झाला,यासह समुद्रपुर येथील रहिवासी असलेल्या श्रीमती रंभाबाई मेश्राम या महिलेचासुद्धा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.
आज दि.११ रोजी मृतकांचे परिवारातील सदस्यांना एकूण ४ लाख रूपयांची मदत देण्यात आली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी जननायक वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नायगांव येथे आदिवासी दिवस उत्साहात साजरा

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

कार्यक्रमात आदिवासी तडवी भील परिवाराचे पिढ्यानंपिढ्या चालत आलेल्या पारंपारिक पद्धतीने आदिवासी तडवी भील “साजोनी”हे नृत्य प्रकार सादर करण्यात आले व संस्कृती जतन व संवर्धन या निमित्ताने ने सर्वं आदिवासी बांधवाना बघावयांस मिळाले
तसेच ऍडव्हकेट कु.कविता जांहगीर सावळे व ऍडव्हकेट कु.कविता मकुंदा पवार या दोघं जळगाव कोर्टाच्या वकील तरुणीनीं विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जागतिक आदिवासी दिनात आपला सहभाग नोंदवला

*प्रसंगी आदिवासी तडवी भील जतन व संवर्धना चे जानकार व नायगाव येथील युवा समाजसेवक सचिन तडवी,विद्रोही कवी बी-राज,मुबारक तडवी, मुस्तुफा तडवी, तडवी,सर्फराज तडवी,फकिरा तडवी,खलील तडवी,दिलदार तडवी,वजीर तडवी, अजित तडवी सर, मेहरबान तडवी सर, किशोर सावळे,सोना सावळे, जुम्मा बांगी, साबीर तडवी,सागर तडवी असलम तडवी, पिरखा तडवी,खलील तडवी,आशिक तडवी, मजित तडवी,ग्रा.पं चे सरपंच,उपसरपंच सदस्य व समस्थ आदिवासी तडवी भील समाज बांधव उपस्थित होते*

नांदुरा तहसीलदार राहुल तायडे साहेब याना बुलढाणा जिल्हा उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार मिळाल्या बद्दल. भा.बौ.महासभा चे वतीने सतकार करण्यात आला

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधी

नांदुरा तहसीलदार आयु.राहुल तायडे साहेब यांना बुलढाणा जिल्हा उतकुषठ तहसीलदार पुरस्कार मिळाल्या बद्दल साहेबांचे भा.बौ.महासभा ता.नांदुरा च्या. वतिने स्वागत करण्यात आले उपस्थितामधे जिल्हा उपाध्यक्ष. एल एफ. मेढे. ता.अध्यक्ष दिलीप मेढे. ता.महासचिव. पंडित इंगळे. कोषाध्यक्ष. निरंजन तायडे. अशोक तायडे. अशोक इंगळे. नांदुरा सुधाकर तायडे. पो.पा.शेंबा समाधान रणित. शाहीर समाधान इंगळे. निबांजि हेलोडे. भास्कर सुरडकर. समता सैनिक दलाचे. सुपडाव नरवाडे हिम्मत राव गवई. डि.टि.दाडगे. दादाराव दोडे तसेच वंचित बहुजन आघाडिचे ता.अधक्ष. अजाबराव वाघोदे. मधुकर तायडे. देवानंद सरदार.व इतर बरीच मंडळी उपस्थित होती

रुग्णमित्र गजू कुबडे 48 तासाच्या आतच उपोषणाची घेतली दखल !

0

दि.11 ऑगस्ट
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थे बाबत वारंवार अर्ज विनंती करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अनेक गरजू गरीब रुग्णांची आरोग्याबाबत हेळसांड होऊन त्यांना महागडे उपचार घेण्यासाठी खासगी दवाखान्यात किंवा सावंगी,सेवाग्राम वा नागपूरला जावे लागते हेच ध्यानात ठेऊन रुग्णमित्र गजू कुबडे यांनी या उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या त्रुटी बाबत जिल्हा प्रशासनाने अनेकवार निवेदन देऊन लक्ष वेधले परंतु त्यांच्या निवेदनाची दखल ना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली ना आमदार-खासदारांनी घेतली.अखेर शेवटी ९ आगस्टच्या क्रांती दिनाचा मुहूर्त साधत गजू कुबडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले.आणि या उपोषणाला पूर्ण ४८ तास होण्याच्या आधीच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले.व दि १० ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता तहसीलदार श्रीराम मुंदडा यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन गजू कुबडे यांच्या सोबत मागण्यांबाबत चर्चा केली.यावेळी वैद्धकीय अधिकारी डॉ चाचरकर उपस्थित होते.या चर्चेनंतर तहसिलदार मुंदडा यांनी आरोग्य उपसंचालक नागपूर,व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांच्यासोबत मोबाईल वरून या मागण्यांबाबत चर्चा केली.त्या नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वैद्धकीय अधिकारी डॉ चाचरकर यांनी गजू कुबडे याना उपोषण मंडपात लेखी पत्र दिले.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटचे वैद्धकीय अधीक्षक डॉ चाचरकर यांनी गजू कुबडे यांच्या न्याय मागण्यां बाबत सुरू करण्यात आलेल्या कार्याविषयी दिलेल्या लेखी पत्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,पोष्टमार्टेम साठी उपलब्ध असलेल्या व्यक्तीला तांत्रिक प्रशिक्षणासाठी जिल्हा शल्य चिकित्सक येथे पाठविण्यात आले असून तो वापस येत पर्यन्त खासगी व्यक्तीस जबाबदारी देण्यात आली असून त्याला शासनाकडून मानधन देण्यात येणार आहे,पूर्णकालीन प्रसूती तज्ञा ची व्यवस्था करण्यात आलेली असून गरोदर स्त्रियांची सोनोग्राफी सेवा खासगी सोनोलॉजिस्ट कडून मोफत करण्याबाबत उपजिल्हा रुग्णालयासोबत करार झालेला आहे.या रुग्णालयातील दोन डॉकटर हे परसेवेवर असून त्यांना पुर्ववत या ठिकाणी रुजू करण्या बाबतचा अहवाल तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे फिजिशियन ची जागा ही संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने तातडीने उपलब्ध होऊ शकणार नाही त्या बाबत शासनाकडे नियमित पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या लेखी निवेदना नंतर गजू कुबडे यांनी तहसीलदार श्रीराम मुंदडा यांचे हस्ते व चेतन काळे यांना डॉ चाचरकर यांचे हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
यावेळी प्रहारचे सर्वश्री विनोद खंडाळकर वर्धा जिल्हा रुग्ण सेवक,जगदीश तेलहांडे ,अजय खेडेकर उपसरपंच जाम व प्रहार युवा तालुका प्रमुख समुद्रपूर,मोहन पेरकुंडे,सागर आत्राम,सूरज कुबडे,समीर मानकर,सतिष गलांडे,राजेश लखाणी,,दिवाकर वाघमारे,रोशन थूटे,केशव लेंडांगे,पिंटू हिवंज,अजय लढी,विनोद धोबे, संतोष जोशी,सुधीर मोरेवार, विजय पडोळे,नितेश भोमले,गोलू उजवणे,सोनू सोरते,रुपराज भगत,दिवाकर घंगारे,राजू बोभाटे, भोजराज नेहारे,प्रवीण जायजे,अक्षय मोहड,बालु चौव्हाण,तबरेज पठाण,सुरज डफ, अनिल हाते, धीरज नंदरे,अमित गोजे,राहुल चौधरी,रितेश गुडढे,राजेश तांदूळकर, प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

नारखेड येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथा चे वाचन

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधी

९आँगषट वार सोमवार नांदुरा तालुक्यातील नारखेड या गावी बुद्ध आनी त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यासाठी संकल्प.सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उपस्थित समता सैनिक दलाचे जवान आद.गजानन वाकोडे. सतीष वानखडे प्रमुख मार्गदर्शक आद. बौ.शिवराम इंगळे सर आनि संदीप खंडेराव व समस्त बौद्ध उपासक उपासिका हजर होते कार्यक्रमाची सुरवात त्रिसरण पंचशीलाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप खंडेराव यांनी केले तर इंगळे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले शेवटी एकमताने ग्रंथ वाचन सुरू करण्याचा संकल्प.करून सरनतय गाथेने शेवट करण्यात आला

यु ट्युब’ आणि ‘पोर्टल’ चालविणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न ‘महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेत’ सहभागी व्हा — एस.एम.देशमुख – मोहन चौकेकर

0

 

बुलढाणा : सध्याच्या काळात सोशल मिडियाचं महत्त्व नव्यानं सांगण्याचं कारण नाही. सोशल मिडियानं आपलं जीवन व्यापून टाकलं असल्यानं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना देखील सोशल माध्यमाची गरज वाटायला लागली आहे. त्यामुळेच मोठयातले मोठे चॅनल देखील आमच्या ‘यु ट्यूब चॅनल’ला सबस्क्राईब करा अशा जाहिराती करीत आहे. सोशल मिडियाचा वापर आणि ‘युट्यूब चॅनल’ला लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता पुढील काळ युट्यूब आणि पोर्टलचा आहे. म्हणूनच काळाची पाऊले ओळखून मराठी पत्रकार परिषदेने ‘महाराष्ट्र सोशल मिडीया परिषद’ ही संलग्न शाखा सुरु केली असून परिषदेच्या नव्या व्यवस्थेच्या माध्यमातून ‘युट्यूब’ आणि ‘पोर्टल’ चालविणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी महाराष्ट्र सोशल मिडीया परिषदेचा हिस्सा होऊन एकजुटीने आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

एस.एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, नव्या पिढीतील पत्रकार मोठ्या संख्येने या नव्या सोशल व्यासपीठाचा वापर करतांना दिसत आहेत. नवीन माध्यमं समोर येत असतानाच या सोशल माध्यमातील पत्रकारांना भेडसावणारे प्रश्न देखील समोर येत आहेत. व्यक्तिगत पातळीवर एकटा पत्रकार या समस्यांचा मुकाबला करू शकत नाही अथवा आव्हानांना सामोरं जाऊ शकत नाही. संघटीतपणेच नव्या माध्यमातील आव्हानांना सामोरं जाता यावं यासाठीच आपण “महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद” ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू केली आहे.

मराठी पत्रकार परिषद ही मराठी पत्रकारांची सर्वात जुनी अशी संस्था आहे. परिषदेने गेल्या 82 वर्षात पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन, पत्रकार आरोग्य योजना, बाळशास्त्री जांभेकर स्मारकासह पत्रकारांचे असंख्य प्रश्न मार्गी लावले आहेत. परिषदेने जे प्रश्न हाती घेतले ते चिवटपणे लढा देत सोडविले आहेत.. सोशल मिडिया परिषद देखील याच जिद्दीने काम करणार आहे. सोशल मिडिया परिषदेच्या शाखा सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात सुरू करण्यात येत आहेत. अगोदर जिल्ह्याची टीम निवडली जाईल. त्यानंतर ही जिल्ह्याची टीम तालुका शाखा स्थापन करील. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सोशल मिडिया परिषद ही मराठी पत्रकार परिषदेचीच एक शाखा असल्याने जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषद परस्पर पूरक आणि एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार आहेत.

सोशल मिडिया परिषदेचे राज्य निमंत्रक म्हणून बापुसाहेब गोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोशल मिडियातील ज्यांना परिषदेच्या नव्या प्रवाहात सहभागी व्हायचं आहे त्यांनी शरद पाबळे (9822083111), बापुसाहेब गोरे (9822222772) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी केले आहे. ✍️ मोहन चौकेकर

आदिवासी घरकुल ड ची प्रलंबित यादी मार्गी लागावी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे

0

 

यावल ( प्रतिनिधि) विकी वानखेडे

: गिरडगाव येथे आज महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांचा सत्कार प्रसंगी सरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व गावांतील ग्रामस्थ मंडळी हजर होते निवेदनात आदिवासी घरकुल ड ची प्रलंबित यादी मार्गी लागावी व मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही मुद्दे नमुद करण्यात आली मंत्री महोदयांनी तुमच्या निवेदन याची दखल घेतली जाईल शब्द दिला: उपस्थित मंडळी सरपंच अल्काबाई मधुकर पा, पोलीस पाटील अशोक रघुनाथ प्रशांत पाटील पा, सरपंच पति मधुकर जगन्नाथ पा ,व्य कोजी पा शुक्राम पा शेषराव पा ,रोहिदास पा,सुधाकर पा, प्रमोद पा, नामदेव पा ,लाखीचंद भिल्ल किरण भिल्ल बशीर तडवी ,गुलजार,तडवी,नागो,पा अनिल पा संजय पा मुंन्ना बाई,तडवी विकास,पा ओम प्रशांत पाटील गिरीड गाव: महेश पा