Home Blog Page 426

अमरावती जिल्हा ट्रेड युनियन्स कौन्सीलच्या महीला धडकल्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात…

0

 

हंसराज उके अमरावती

९आगस्ट क्रांती दिनी भारत बचाव दिन पाळण्याची हाक दिली
===============संविधान विरोधी व जन विरोधी मोदी सरकारच्या
विरोधात ९ आगस्ट २०२१भारत बचाव दिनाचे औचित्य साधत
संयुक्त कामगार संघटना कृती समिती व संयुक्त संघटना समन्वय समिती
अमरावती यांचे वतीने
संविधान विरोधी व जन विरोधी मोदी सरकारच्या धोरणा विरोधात ९ आगस्ट भारत बचाव दिन
पाळण्याची हाक दिली आहे त्याच अनुषंगाने आंदोलनाचा भाग म्हणून आज आम्ही अमरावती जिल्ह्यातील संयुक्त कामगार संघटना व संयुक्त किसान संघटनेच्या वतीने भारत बचाव दिन पाळत जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाद्वारे कामगार शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या मागण्यांचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देवून केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील शेतकरी कामगार व सर्व सामान्य जनता संकटात
सापडली आहे मुठभर लोकांच्या हितासाठी मोदी सरकार कायदे करून शेतकरी कामगारांचे अधिकार हिसकावून घेत आहे देशातील सार्वजनिक संपत्ती विकून खाजगी क्षेत्राला पुरस्कृत करीत आहे या धोरणापासुन प्रवृत करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या ऐतिहासिक दिनी ९ आगस्ट क्रांती दिनी देशभरामध्ये भारत बचाव दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या मागण्यासाठी व देशात संविधान राजकिय सलोखा कायम ठेवण्यासाठी भारत बचाव दिनी खालील मागण्या आपण केंद्र सरकारला त्वरित सोडविण्याचे आदेश करावे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे त्वरित मागे घ्या , कामगार विरोधी चार श्रम संहिता मागे घ्या, विज विधेयक २०२० रद्द करा , पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करा व महागाईवर नियंत्रण आणा, अंगणवाडी, आशा व शालेय पोषण कामगारांना शासकीय कर्मचा-यांनाचा दर्जा द्या तोल पर्यंत त्यांना किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागु करा, सार्वजनिक उद्योग व शासकीय विभागांचे खाजगी करणं व निर्जंतुक थांबवा विनाशकारी अत्यावश्यक संरक्षण सेवा अध्यादेश २०२०ई डी एस ओ मागे घ्या, बांधकाम कामगार घरकाम कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लागु करा, केंद्र व राज्य सरकार मधील रिक्त पदे त्वरित भरतु प्रकीया थांबवुन युवकांना रोजगार घ्या, कामगार कपात वेतन कपात बंद करा व कोरोना काळात बंद नौकर्या कपात मातीची भरपाई घ्या, आयकर मर्यादेखाली उत्पन्न गटातील सर्व कुटुंबांना ७५००रुपये थेट अर्थसाहाय्य घ्या, आरोग्य क्षेत्रासाठी जी डी पीच्या ६टक्के तरतूद करा , नविन शिक्षण धोरण २०२०मागे घ्या शिक्षणाचे
खाजगी करणं व बाजारिकरण थांबवा शिक्षणावर जीडीपी६ टक्के खर्च करा सर्वांना पुर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण मोफत घ्या इत्यादी मागण्या वरील युनियनचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ डॉ संजय कुटे यांचं नाव आघाडीवर.

0

 

आ. संजय कुटे होणार नवे प्रदेशाध्यक्ष ?

गजानन सोनटक्के जळगाव जा

भाजपचे (BJP) महाराष्ट्रातील मोठे नेते हे सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत त्यांच्या बैठका सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे नेते तिथे आहेत. तेव्हापासून भाजपमधील वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांच्या चर्चा सुरु आहेत. भाजपचा महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार यानिमित्त या बैठका सुरु असल्याचं समजतं आहे भाजपकडून जी नावं दिली जात आहे किंवा ज्या नावांची चर्चा सुरु आहे त्या सगळ्यात आघाडीवर जे नाव आहे ते डॉ. संजय कुटे यांचं. हे नाव पुढं आणण्यासाठी भाजपचं नेमकं काय राजकारण असणार आहे हे आपणं जाणून घेणं गरजेचं आहे.

संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्मपासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मुळचे बुलडाण्यातील आहेत. मागील काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात आहेत.

महाराष्ट्रात भाजपवर जर कोणाचा पगडा असेल पूर्णपणे तर तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे. संजय कुटे हे फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळेच त्यांचं नाव हे अध्यक्षपदासाठी फडणवीसांकडून पुढे केलं जात असल्याचं सूत्रांकडून खात्रीलायकरित्या समजतं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी संजय कुटे यांचं नाव का आहे चर्चेत?

संजय कुटे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे करण्यासाठी ओबीसी राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पाहिले तर लक्षात येईल की, सगळे मराठा समाजाचे नेते होते.

आता महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती हाताळायची असेल तर ती परिस्थिती बघता जर ओबीसी नेतृत्व पुढे आणायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाचा हा बदल होऊ शकतो. कारण एकीकडे पंकजा मुंडे यांनी फडणवीसांविरोधात एक प्रकारे एल्गारच पुकारला आहे. त्यामुळे नवं ओबीसी नेतृत्व पुढे आणायचं असेल तर संजय कुटे हे अगदी योग्य नाव असल्याचं फडणवीसांना वाटतं आहे. म्हणूनच त्यांचं नाव पुढे केलं जात आहे.

संजय कुटे हे सध्या महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान, भाजपच्या नेत्यांची अचानक दिल्ली वारी का सुरु आहे याबाबत अधिकृत काहीही कारण देण्यात आलेलं नाही. पण अशावेळी संजय कुटे हे दिल्लीत असणं हे कुठेतरी संकेत देणारं आहे की, ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.

ओबीसी मतदार भाजपचा नेहमीच मोठा मतदार राहिलेला आहे. ओबीसी समाजाचं राजकारण आता महाराष्ट्रात तापू लागलं आहे. त्यामुळे आता एक नवी खेळी पक्षाकडून केली जाऊ शकते. मात्र असं असताना अनेक दिग्गज नेते हे ओबीसी आहेत. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यासारख्या नेत्यांना डावलून संजय कुटे यांचंच नाव सध्या का चर्चेत आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या शेवटचा जो मंत्रिमंडळ विस्तार केला होता त्यावेळी त्यांनी संजय कुटे यांना देखील त्या मंत्रिमंडळात घेतलं होतं. त्यावेळी त्यांना कामगार आणि ओबीसी मंत्रालय देण्यात आलं होतं. पण मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या 3 ते 4 महिन्याचा होता. कारण त्यानंतर लागलीच विधानसभा 2019 च्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.

जिल्हा परिषद शिक्षिकेचा मुलांना चालना देणारा उपक्रम

0

गजानन सोनटक्के जळगाव

जळगाव जामोद तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोठ्या शाळांपैकी सुनगाव जिल्हा परिषद शाळा ही एक मोठी शाळा आहे सध्या दीड ते दोन वर्षापासून कोरोना परिस्थिती चालू असताना शाळेमध्ये 8वा वर्ग चालू करण्याची मुभा असताना 8वा वर्ग शिक्षणासाठी सुरू झालेला आहे तरी येथील कार्यरत असलेल्या शिक्षिका अस्मिता शिरसागर ह्या नेहमीच मुलांसाठी काहीतरी नवीन करीत असतात त्या निमित्त नियमित शाळेत येणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींना या शिक्षिकेने आपल्या स्वखर्चातून मुलांना पेन पेन्सिल वह्या कंपास इत्यादींचे वाटप केले त्यामुळे मुले ही नक्कीच शाळेत येतील व अभ्यास करतील असे आहे तरी हा उपक्रम जिल्हा परिषद शाळेतील मुलांना चालना देण्यासारखा उपक्रम आहे

आदिवासी बांधवाचे सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध. आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार. नांदुरा ता.प्रतिनिधी

नांदुरा दि.९/८/२०२१.रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित आदिवासी बांधवाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे होते आदिवासी बांधवांनाच्या सर्वागीण विकासासाठि कटिबद्ध असल्याचे मनोगत आमदार राजेश एकडे यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी नांदुरा तालुका काँग्रेस कमीटिचे अध्यक्ष भगवान भाऊ धांडे जिल्हा पुनर्वसन समीतीचे सदस्य पुरूषोत्तम झालटे.सुभाष पाटिल. नारायण झालटे. बाबुसिंग डाबेराव.गूलाबराव सोळंके. विनोद.डाबेराव भागवत भोलकर बूटेसर. मीनाताई तडवी. अधक्ष .सुगदेव सोळंके. राज समन्वयक आदिवासी जनता दल गोकुळसिंग चव्हाण दीलिप मोरे व बहुसंख्य आदिवासी बांधव व भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते

यावल शहरातील आठवडे बाजाराजवळी पेट्रॉलपंपाच्या ९० वर्षाचा करार संपुष्टात आलेल्या बेकायद्याशीर पंप चालकास जिल्हाधिकारी यांची नोटीस

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील आठवडे बाजार शेजारील शासनाची सि.स.नं. ३८५१/अ या जागेचा ९० वर्षाचा करार संपुष्टात येऊन ही या जागेवर अनधिकृतरित्या पेट्रोल पंप सुरू आहे.याशिवाय या जागेवर पेट्रोल पंपाचे मंजूर आराखडयामध्ये विनापरवानगीने बदल करण्यात आला आहे. सदर पंपचा वाणिज्य प्रयोजनार्थ सुरु असलेला बिनशेती वापर बंद का करण्यात येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह, पंप चालक शंकरलाल रामरतन अँड ब्रदर्स, व राजेंद्र राधाकृष्ण जाखेटे यांना नुकतीच (ता.४) बजावण्यात आली आहे.
तसेच सदर जागेसंदर्भात शर्तभंग झाला असून सि.स.नं. ३८५१/ अ ही ४२९१४ चौ.मि. जागा सरकार जमा का करण्यात येऊ नये याविषयी येत्या पंधरा दिवसात खुलासा करण्याची नोटीस येथील पालिका मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन बजावण्यात आली आहे. तर सदर पेट्रोल पंप चालक राजेंद्र जाखेटे यांनी पेट्रोल पंप साठी कॅबीन, व शौचालय, सेफ्टी टॅक बांधकामासाठी वापरलेली चार ब्रास वाळू परवानगी न घेता अवैध वापरली आहे. सदर प्रकरणी पंप चालक राजेन्द्र जाखेटे व वाळू वाहतूकदार भागवत भिकन पाटील यांचे वर अवैध वाळू वाहतूकीबाबत वनविलंब कार्यवाही तत्काळ सुरू करावी असे आदेश जिल्हाधिकारी जळगाव यांनी येथील तहसीलदारांना केले आहेत. अवैध पेट्रोल पंप संदर्भात येथील सामाजीक कार्यकर्ते शेख अलीम मोहंमद रफीक, शेख अजहर शेख शमसो६ीन, शेख रफीक शेख फारूक यांनी जळगाव येथे जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती या तक्रार निवेदनाची दखल घेत पंप संबधीतांना पंप चालकास नोटीस बजावण्यात आली असुन, यामुळे कुणी कुणी या पंपास पुनश्च कार्यरत करण्याकामी आर्थिक देवाण घेवाण केली आहे याची ही चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे .

हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी यांनी केला पदाचा दुरुपयोग

0

 

हिंगणघाट – दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान हिंगणघाट नगरपालिकेकडून राबविण्यात येते हिगणघाट नगरपालिका अंतर्गत बेघर नि dhवारा चे देखभाल व व्यवस्थापन करणे करिता ऑनलाइन टेंडर जाहिरात देण्यात आलेली होती व त्यामध्ये प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था सर्व अटी व शर्तीनुसार पात्र ठरली असून उपरोक्त बेघर निवारा चे देखबाल व व्यवस्थापन करणे करिता कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिनांक 26- 4 -2021 ते 26 -3- 2022 पर्यंत काम करण्याचा आदेश झालेल्या करारानुसार देण्यात आला होता करारनाम्यातील अटीनुसार बेघर निवाऱ्याची देखभाल केलेल्या कामाचा मासिक अहवाल सादर करण्यात यावा असे सांगितले होते. तरीसुद्धा मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी पदाचा दुरुपयोग करून अगोदरच दिनांक 25- 3 -21 ला 17855 रुपये 55343 रुपये 85532 रुपये 82728 असे एकूण 241458 रुपयांचा चेक दिला इतकेच नाही तर त्याच दिवशी बँकेतून पैसे ही काढले यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दिनेश वर्मा समाजसेवक यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

पीक कर्ज वाटपला गती देण्यात यावी याकरता स्टेट बँक व्यवस्थापकांना निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

गेली एक ते दीड महिना झाले जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे… तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून पिक कर्ज मिळत नाही आहे.त्यात जळगाव जामोद तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिलेले आहे.कुठेतरी शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळाला पाहिजे याकरता शेतकरी हा बँकांचे उंबरठे जी झीजवतो परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी मुळे /चुकीच्या कार्यपद्धतीमुळे अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत सुद्धा ती कर्ज मिळाले नाही.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील कर्ज निल व्हावे आणि नवीन बँकांचे व्यवहार चालू व्हावे याकरता खूप शेतकऱ्यांनी वन टाइम सेटलमेंट मध्ये पिक कर्ज भरली.परंतु अशाही काही शेतकऱ्यांना आतापर्यंत पिक कर्ज मिळाले नाही कुठेतरी ही सर्व पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणी करता आज युवा सेना जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ, युवानेते अक्षयभाऊ पाटील , अल्पसंख्यांक शहर प्रमुख चांद कुरेशी, उपशहरप्रमुख मंगेश कतोरे, दिपक बावस्कर, गोपाल ढगे, सतीष हुरसाळ, विनोद पाटील तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

अखिल भारतीय काँग्रेस असंघटित कामगार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोदच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद, अखिल भारतीय काँग्रेस असंघटित कामगार संघटना जिल्हा बुलढाणा च्या वतीने सोमवार रोजी उप विभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले कि अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेस च्या वतीने ९/८/२०२१ ला कामगारांच्या हक्कांसाठी संसद भवन दिल्लीला घेराव घालण्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार काँग्रेस बुलढाण्याच्या वतीने मागण्यांची पुर्तता होण्यासाठी जिल्हास्तरावर निवेदन देण्यात आले की खालील मागण्यांची पुर्तता होण्यासाठी कार्यवाही करावी, असंघटित कामगार काँग्रेस च्या मागण्या खालील प्रमाणे आहेत, १ शहरी रोजगार हमी कायदा अंमलात आणावा, २ मनरेगा योजने मधील माफिया गिरी संपुष्टात आणावे, ३-प्रवासी मजुर व कामगारांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, ४-असंघटीत कामगारांना थेट आर्थिक मदत करण्यात यावी, ५- असंघटित कामगार मंडळामध्ये कामगारांची नोंदणी प्रकिया त्वरित सुरू करावी, ६- केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदा रद्द करावा,वरील मागण्या ची पुर्तता होण्यासाठी निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थितांमध्य हाजी मुज़म्मिल अली खान माजी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस अल्प संख्याक विभाग, बाबु जमादार माजी शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी जळगाव जामोद, गोविंदा इंगळे माळी समाज नेते नांदुरा,अजय राजपूत, इमरान खान, अ. राज़ीक, शहर अध्यक्ष युवक काँग्रेस, राजु शेख शहर अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, हारिस भाईजी, मंसुर शेख, अमान खान, इमरान खान, शेख ईरशाद, निसार भाई, कादर खान, रशीद ठेकेदार, न्ईम शेख, ज़हिर शेख, राजा जमदार,, मुदस्सिर भाई, अबरार शेख, मुज़म्मिल शेख, शेख मोहसिन भाई, मो. बिस्मिल्ला, अवेज़ शेख उपस्थित होते.

अनिल जवादे यांच्या नेतृत्वात शाळा पूर्वरत व नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

0

 

दि.9 ऑगस्ट
हिंगणघाट – कोरोणाच्या प्रादुर्भावामुवे गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असून विद्यार्थ्यांचे मानसिक संतूलन बिघडत चालले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शाळा पूर्वरत सूरू कराव्यात.तसेच केंद्र सरकारने जाहिर केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे गरीबांना शिक्षणापासून वंचीत ठेवणारे असल्यामुळे ते रद्द करावे यासाठी भारतीय सविंधान जागृती अभियान आणि विदर्भ राज्य विकास आघाडीचे अध्यक्ष श्री.अनिल जवादे यांच्या नेतृत्वाखाली डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी पालक संघ आणि विदर्भ राज्य विकास आघाडी व भारतीय संविधान जागृती अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी श्री,अनिल जवादे यांनी आपल्या मनोगतातून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे दिड वर्षापासून शाळाँना कुलूप आहे..आॕनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे निट आकलन होत नाही..अनेकांकडे अध्यावत मोबाईल नसल्यामुळे तसेच ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.आॕनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना आपले भवितव्य दिसत नसल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य निट राखण्याच्या योग्य त्या उपाय योजना करून त्यांच्या उज्वलभवितव्यासाठी शाळा सुरू करणे गरजेचे आहे.तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण हे संविधानातील समता ,न्याय या मुल्यांविरोधी भूमिका घेणारे असून खाजगिकरणाला बळ देणारे, शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे,गरीब आणि श्रीमंत आसे दरी निर्माण करणारे विषमतावादी धोरण आहे.य्यामुळे हे धोरण रद्द करावे समान शिक्षणाचा कायदा तयार करावा असे विचार व्यक्त केले.यावेळी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष श्री किशोर मुटे ,विद्यार्थी पालक संघाचे सर्व पदाधिकारी भारतीय संविधान जागृती अभियान आणि विदर्भ राज्य विकास आघाडीचे पदाधिकारी श्री.गोरख भगत ,श्री.महेश माकडे,श्री.दिनेश वाघ ,श्री.गोपाल मांडवकर इत्यादी आणि बहुसंख्येने विद्यार्थ्यांच्या पालकांची या धडक मोर्चात उपस्थिती होती.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेंच्या निषेधार्थ रुग्णमित्र गजू कुबडे यांचे उपोषण सुरू !

0

दि.9ऑगस्ट
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अनेक सुविधेच्या अभावाच्या निषेधार्थ प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी आज क्रांती दिनाच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
उपोषणाला बसण्यापूर्वी राष्ट्रधवज तिरंग्याचे पूजन व प्रणाम करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबसाहेब आंबेडकर, अमर शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी या उपोषणाला निसर्गमित्र चेतन काळे हे सुद्धा या तीन दिवसांच्या उपोषणात सहभागी झालेले आहेत.
या उपोषणासंदर्भात येथील उपजिल्हा रुग्णालयात पूर्णकालीन प्रसूती तज्ञ,फिजिशियन,परसेवेवर अन्यत्र असलेल्या दोन्ही डॉकटर यांना येथे रुजू करण्यात यावे,रेडिओलाजिस्टची नियुक्ती करण्यात यावी,व कायम स्वरूपी पोष्टमार्टेम् करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी गजू कुबडे यांनी तीन दिवसाचे उपोषण सुरू केले आहे.
या उपोषण मंडपात आज सकाळपासून जिल्हा प्रमुख जयंत तिजारे,प्रमोद म्हैसकर, ता.प्रमुख समुद्रपूर, मोहन पेरकुंडे, जगदीश तेलहांडे ता.प्रमुख हिंगणघाट,सूरज कुबडे,समीर मानकर,राजेश लखणी,विनोद खंडाळकर,दिवाकर वाघमारे,अजय लढी,विनोद धो बे,संतोष जोशी,सुधीर मोरेवार, विजय पडोळे,नितेश भोमले,गोलू उजवणे,सोनू सोरते,मंगेश मिस्किन,रुपराज भगत,दिवाकर घंगारे,राजू बोभाटे, भोजराज नेहारे,प्रवीण जायजे, तबरेज पठाण,सुरज डफ, अनिल हाते, धीरज नंदरे,अमित गोजे,राहुल चौधरी,रितेश गुदढे प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूर्या मराठी साठी सचिन वाघे वर्धा