Home Blog Page 427

सणासुदीच्या महिन्यात मोहता गिरणी कामगारांना आमदार कुणावार यांनी केले जीवनावश्यक वस्तुंचे वितरण

0

 

हिंगणघाट दि.९ ऑगस्ट
हिंगणघाट शहर श्रमिकांची वस्ती आहे,या शहरातील जुन्या काळातील मोहता गिरणी आता व्यवस्थापणाने बंद केली असून तेथे काम करणारे श्रमिक तसेच त्यांचे कुटुंबिय निराधार झाले आहेत,अशा निराधार कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून जवळपास २ हजार रुपये किंमतीचे जीवनावश्यक वस्तुचे किटवितरण तसेच नगदी स्वरुपात 500 रूपयाची मदत करीत असल्याचे प्रतिपादन करीत या निराधार झालेल्या कामगारांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याचे आमदार समिर कुणावार यांनी सांगितले.
स्थानिक संत कंवरराम भवन येथे आयोजित ६०० कामगारांना जीवनावश्यक वस्तु वितरणप्रसंगी आ.कुणावार बोलत होते.
यावेळी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतांनी,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अंकुश ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, आर पी आय चे शंकरराव मुंजेवार, नगरसेविका सौ. छायाताई सातपुते, सौ. रवीलाताई आखाडे,सौ.वंदना कामडी,पदमाताई कोडापे, शुभांगी ताई सुनील डोंगरे, समाजसेवक सुनील डोंगरे,नगरसेवक चंद्रकांत मावळे,राहुल सोरटे, किरण वैद्य,संजय बोथरा,भाजपा शहर अध्यक्ष आशिष परबत, नगरसेविका वैशाली सुरकार, सौ. शारदा ताई पटेल, नगरसेविका सौ सुनीताताई मावळे तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे, शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. अनिताताई मावळे, राकेश शर्मा,बालू वानखेडे तसेच शेकडो आर एस आर मोहता गिरणीचे कामगार तसेच कर्मचारी सदस्य उपस्थित होते.
सणासुदीच्या काळात आमदार कुणावार यांचेवतीने कामगारांना २ महीने पुरेल एवढ्या अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तु व नगदी स्वरुपात ५०० रुपये मदत मिळाल्याने कामगार यावेळी समाधान व्यक्त करतांना दिसत होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

शहीद जवान कैलास पवार ,किशोर काळूसे व स्व.शिवशंकर बाबा पाटील यांना चिखलीकरांनी वाहली सामुहिक श्रद्धांजली – मोहन चौकेकर

0

 

वीर जवान अमर रहे च्या..जयघोषणांनी दणदणाला परिसर

 

चिखली : भारत मातेच्या रक्षणासाठी सियाचीन येथे कर्तव्यावर असलेले चिखलीचे सुपुत्र वीर जवान शहीद कैलास भारत पवार , बीबीचे सुपुत्र  शहीद जवान  किशोर काळूसे यांना व  श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्व, कर्मयोगी, युगपुरुष ह.भ.प. स्व.शिवंशकरभाऊ पाटील यांना चिखली येथील गांधी नगर परिसरातील गांधी चौकात नागरिकांनी दि.08 ऑगस्ट रोजी  सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार छोटु कांबळे यांनी केले होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम शहीद जवान कैलास पवार यांचे बंधू अक्षय पवार यांनी पुष्पहार अर्पण करीत कँडल पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच माजी नगरसेवक शाम शिंगणे, नारायण भोलवनकर,पत्रकार छोटु कांबळे,विक्की धनवे, युवा सेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर ,शिवसेना उपशहर प्रमुख रवी पेटकर ,बटी कपूर , सादिक भाई,शंकर देशमुख, भागवत इरतकर सर ,  विष्णुपंत घोंगे ,भगवान घोंगे ,कमलबाई  धनवे ,सत्यभामा भोळवनकर,तुपकर काकू, सागर गायकवाड, सतनाम वधवा  निलेश रुद्राक्ष, बबलू पठाण, अनिल जावरे ,शिरसाट सर, प्रतीक शेटे ,सौमेश  पैठणकर, राहुल उंबरकर ,सतीश जाधव ,  लक्ष्मण मोरे ,कुवरसिंग ठाकुर ,मोनु मोरे ,पवन मोरे, यांच्यासह अनेक पुरुष व महिलांनी पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वीर जवान अमर रहे ..भारत माता की जय..या जयघोषणांनी परिसर दनदणुन गेला होता. ✍️मोहन चौकेकर

स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात 9 ऑगस्ट क्रांती दिन जल्लोषात साजरा..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे काँग्रेस च्या वतीने जळगाव शहरात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रॅलीकरीता उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम दुर्गा चौक येथे शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले तदनंतर शेगाव संस्थानचे व्यवस्थापकीय विशवस्त स्व. शिवशंकर भाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहीद जवान तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सतत अकरा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार स्व. गणपतरावजी देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
देशभक्तीपर गीतांसहित, देशभक्तीपर नार्यानी जळगाव जामोदचा परिसर दुमदुमून गेला

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील विविध मागणीसाठी गजू कुबडे सोमवारपासून उपोषणावर

0

 

हिंगणघाट दि. 8 ऑगस्ट
हिंगणघाट उपविभाग क्षेत्र व आसपासच्या गोरगरीब जनतेच्या सुविधेसाठी असलेल्या येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधेच्या पूर्ततेसाठी सोमवार दि 9 आगस्टपासून तीन दिवसांचे लाक्षणिक उपोषण करणार आहे.
महाराष्ट्र्र शासनाने ५० कोटी रुपयांची या उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभारलेली आहे.परंतु सद्यस्थितीत हे उपजिल्हा रुग्णालय हे अव्यवस्थेंचें आगार झालेले आहे.
या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी परिसरातील गोरगरीब जनता येत असते त्यामुळे या रुग्णालयाच्या सोयी सुविधेसाठी कोणताही नेता किंवा आमदार-खासदार तोंड उघडत नाही व ही दुर्दैवाची गोष्ट आहे असा त्यांचा आरोप आहे.
या उपजिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रहारचे गजू कुबडे हे मागील दोन वर्षांपासून सरकार दप्तरी विविध मार्गाने समस्या मांडत आहेत.
प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडत नाही हे पाहून आता ९ आगस्टच्या क्रांती दिवसाचे निमित्ताने गजु कुबडे हे तीन दिवसांच्या आमरण उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला आज सोमवारी सकाळी १० वाजे पासून उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर बसणार आहे.
यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास प्रहारच्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गजू कुबडे यांनी दिलेला आहे.

विद्युत शॉक लागून म्हशींचा मृत्यू ,शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान, भरपाई मिळण्याची मागणी -संग्रामपूर एमआयडीसी जवळील घटना.

0

 

संग्रामपूर -जळगांव जा रोडवरील एमआयडीच्या जवळील पडीत शेतात असलेल्या विद्युत पोलवरील विद्युत वाहिनीचा स्पर्श लागून दुधाळू म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 /आगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे ९०हजाराचे नुकसान झाले आहे. मात्र शेतकरी फेकल्याने त्याचा जीव वाचला. संग्रामपूर एमआईडीच्या परिसरात पेट्रोल पंप च्या मागील बाजूस लागूनच निरोड शिवारातील गट 46 हे लियाकत खाॕ ताजदर खाॕ यांचे शेत असून लागूनच एमआयडीसी चे पडीत जागा (शेत) असून त्यामध्ये म्हैस चरायला गेली असता विजेचा तार लोंबकळत होता त्यातून विद्युत पोलला सपोर्टिंग असलेल्या तारेला वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने म्हशीचा मृत्यू झाला. त्यात शेतकऱ्यांचे अंदाजे 90 हजाराचे नुकसान झाले. शेतकरी म्हैस पाहण्यासाठी गेला असता त्याला विजेचा झटका लागून फेकला गेल्याने त्याचा जीव वाचला. सदर घटना हि विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्ष पणामुळे घडलीचा आरोप शेतकऱ्यांनी केले आहे. त्यामुळे ह्या गरीब दुध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला विद्युत वितरण कंपनी कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

 

जागृती बुद्ध विहार येथे वर्षावासा निमित्त ग्रंथ वाच नाला सुरुवात

0

 

शेगाव तालुक्यातील ग्राम लासुरा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे पठन व वाचनाला सुरुवात करण्यात आली.
बौद्ध धर्मीय लोक आषाढ महिन्या मध्ये बुद्धाच्या संस्कृतीनुसार धम्म ग्रंथाचे वाचन करून धम्मा बद्दलची शिकवण अंगीकारून ज्ञान संपन्न करतात त्याच अनुषंगाने लासुरा येथील जागृती बुद्ध विहार समिती च्या वतीने यावर्षी बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाचे वाचन म पठाण करण्यात येत आहे
यामध्ये वैशिष्ट असे की या ग्रंथाचे वाचन व पठण शालेय शिक्षण घेणारी मुलं करीत आहे याचे सर्व गावांमध्ये कौतुक होत आहे या ग्रंथाचे श्रवण करण्याकरिता गावातील महिला व पुरुष बहुसंख्यांनी उपस्थित राहतात
ग्रंथाचे वाचक मयूर धुरंधर सुमित जवंजाळ व विश्लेषक शुभम गवांदे हे करीत आहे या मुलांना मार्गदर्शन जागृती बुद्ध विहार समिती सातत्याने करीत आहे

आमदार राजेशभाऊ एकडे यांचा जनसंपर्क कार्यालय व निमगाव येथें संत शिरोमणी सावता महाराज याचे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधि

दि७आँगषट२०२१रोजी माननीय आमदार श्री राजेशभाऊ एकडे यांच्या जनसंपर्क कार्यालय व.निमगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी मा.आमदार श्री राजेशभाऊ एकडे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष माननिय लालाभाऊ इंगळे जिल्हा काँग्रेस कमीटिचे सरचिटणीस निलेशभाऊ पाऊलझगडे काँग्रेस नेते बंटी बावसकर सर.जिल्हा पुनर्वसन समीतीचे सदस्य तथा पातोंडा येथील.सरपंच पुरूषोत्तम भाऊ झाल्टे.काँग्रेस कमीटिचे उपाअध्क्ष आकाश वतपाळ. मधुकरभाऊ चरखे राजु हाडे. तुळशीराम चरखे. सचिन वावगे. विनोद भोपळे बाळुभाऊ भोपळे. नंदु इंगळे. निलेश भोपळे वबहुसंखेने कार्यकरते व नागरीक उपस्थित होते

स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ असेल – रविकांत तुपकर –मोहन चौकेकर

0

 

चिखलीत स्वाभिमानीचे हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालय सुरू
चिखली : – चिखली तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी व बेरोजगार तरुणांच्या प्रशासकीय व इतर पातळीवरील कोणत्याही समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर हे हक्काचे व्यासपीठ व्हावे. आलेल्या प्रत्येक समस्याग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील यंत्रणा काम करेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

चिखली येथे स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालयाचे सोमवार २ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना तुपकर बोलत होते. बुलडाणा येथे मागील दोन वर्षांपासून स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर सुरु आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे हजारो नागरिक, वियार्थी बाहेर जिल्ह्यात अडकून पडले होते. त्यावेळी बुलडाणा येथील हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून अडकून पडलेल्या नागरिकांना पासेस तयार करून त्यांना घरपोच पोहचविण्याची महत्वाची भूमिका पार पाडली. या शिवाय कोरोना बाधित शेकडो रुग्णांना रुग्णालयात भरती करून त्यांना बेड उपलब्ध करून देणे, रुग्णांना इंजेक्शन मिळवून देणे हे महत्वाचे काम स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून आम्ही केले. याशिवाय दररोज शेकडो शेतकरी, युवक व विद्यार्थी आपल्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम बुलडाणा येथे अविरतपणे सुरु आहे. बुलडाणा येथील सेंटरमध्ये ‘ऑन द स्पॉट’ शेतकरी व तरुणांच्या समस्या सोडविल्या जातात. याच धर्तीवर चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांना, तरुण व विद्यार्थ्यांना आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आता बुलडाणा येथे येण्याची गरज राहणार नाही. त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, शासकीय कार्यालयातील कामे चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून सोडविल्या जातील असेही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा मा. आमदार स्व.गणपतराव देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच नितीन राजपूत यांचे चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ‘स्वाभिमानी’चे बबनराव चेके,विनायक सरनाईक, भारत वाघमारे, रामेश्वर अंभोरे, भागवत म्हस्के, अनिल वाकोडे, अनिल चव्हाण, अंकुश सुसर, विष्णू आखरे, नितीन अग्रवाल, संदीप मुळे, दत्ता पाटील, रशीद पटेल, विजय बोराडे, सचिन शिंगोटे, संतोष शेळके, सुधाकर तायडे, विठ्ठल चौथे, अमोल मोरे, अमोल तिडके, रवि मेहेत्रे, राधाकिसन भुतेकर, इरफान शेख, विठ्ठल सोळंकी, काशिनाथ बकाल, मयूर बोर्डे, भीमराव हिवरकर, सागर ठाकरे, बाळू पवार, बाळू पाटील, रविराज टाले, अविनाश झगरे, अच्युतराव वाघमारे, छोटू झगरे, उमेश राजपूत, प्रफुल्ल देशमुख, भागवत धोरण, शुभम डुकरे, निलेश नारखेडे, देवेंद्र आखाडे, गौतम सदावर्ते, दशरथ सदार, युनिस शहा सालीम शहा, अरविंद दांदळे, सोनू काळे, कैलास उतपुरे, मिथुन सावळे, मोहन चव्हाण, शुभम शेळके, नाना खटके, सुदर्शन वाघमारे, गोपालराव जाधव यांच्यासह स्वभिमानीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ✍️ मोहन चौकेकर

एक घाव दोन तुकडे, राजकारणात येणार तेजस ठाकरे? — मोहन चौकेकर

0

 

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचं राजकारणात लाँचिंग होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतून लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आधी सामना दैनिकात हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुनही तेजस ठाकरे यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. “एक घाव, दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे” यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तेजस यांना ठाकरे कुटुंबियांचे व्हिव्हियन रिचर्ड्स संबोधत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने ही जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. या शुभेच्छांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिवियन रिचर्ड्स हे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर असून त्यांची फलंदाजी जगभरात चर्चेत होती. जगभरातील गोलंदांचा कर्दनकाळ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे व्हिवियन रिचर्ड्स हे नाव नसून मोठ्या स्थानाचं विशेषण संबोधलं जातं. म्हणूनच, नार्वेकर यांची जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसून येण्याची दाट शक्यता आहे.
माझी जशी तोडफोड सेना आहे, तशी त्याची तोडफोड सेनाच असेल, असं बाळासाहेब ठाकरे तेजसबद्दल म्हणाले होते. भाजपा नेत्याने शिवसेना भवन पाडण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेलाही पूर्वीचा आक्रमक बाणा दाखवावा लागणार आहे. त्यादृष्टीने पक्षबांधणी करायची असेल तर युवासेनेच्या शिलेदारांमध्ये जोश भरण्याची क्षमता तेजसमध्ये असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याची चर्चा शिवसेनेत सुरु असल्याची चर्चा आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे. ✍️ मोहन चौकेकर

शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रसंगी कृषिदुत रेणुका डोसे व संजना डाबेराव

0

 

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वा.वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी रेणुका डोसे व संजना डाबेराव यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत जस्तगाव येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पीक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतीसंबंधी वेगवेगळ्या मोबाईल अप्लिकेशन चा तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स चा वापर कसा करावा व त्यामधून पिकांची पडताळणी व तज्ञांचे मार्गदर्शन कसे मिळू शकते तसेच बदलत्या काळासोबत आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्तम शेतीबरोबरच समाधानकारक आर्थिक उत्पन्न मिळू शकते हे पटवून दिले.कृषी दूतांनी कपाशीच्या पिकावर असलेल्या किडीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याविषयी चर्चा केली. कृषिदूतांच्या या कार्याला जस्तगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी तेजराव पाटील, रामदास डोसे, विजय पुंडे, दामोदर डोसे तसेच इतर शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला.या उपक्रमासाठी कृषीदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई सर, कार्यक्रम अधिकारी व वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ प्रा. अविनाश आटोले सर, कार्यक्रम समन्वयक वि.टी. कपले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.