Home Blog Page 428

जोर जांभळीतील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेचा मदतीचा हात -मोहन चौकेकर

0

 

सातारा :अतीवृष्टी आणि महापुराने वाई तालुक्यातील जोर जांभळी परिसराची पार दुर्दशा झाली.. दुर्गम भाग असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचायला देखील अनेक अडचणी आल्या.. ही वस्तुस्थिती ओळखून परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठी पत्रकार परिषदने त्या भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.. त्यानुसार पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि लोणावळा पत्रकार संघाने ही जबाबदारी उचलली. जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर आणि महिला संघटक श्रावणी कामत यांनी पुढाकार घेत जोर जांभळी परिसरात मदत पोहोचविण्याचा निर्णय घेतला.. त्यानुसार जावळी पट्ट्यातील गोळेगाव आणि गोळेवाडी येथील पूरग्रस्तांना ब्लॅकेट, सॅनिटरी नॅपकिन, आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हरिष पाटणे आणि श्रावणी कामत यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मदत स्वीकारताना पूरग्रस्तांना अश्रू अनावर झाले.. पत्रकारांनी केवळ बातम्या न पाठविता सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक नागरिक सुनील गोळे आणि जितेंद्र गोळे यांनी मराठी पत्रकार परिषदेला धन्यवाद दिले.
चिपळूण, महाड, कणकवली, सावंतवाडी आणि आता जावळी परिसरातील पूरबाधितांना मदतीचा हात देऊन मराठी पत्रकार परिषदेने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श पत्रकार आणि समाजासमोर ठेवल्याचे मत हरिष पाटणे यांनी व्यक्त केले.. दत्ता मर्ढेकर यांनी आभार मानले.. यावेळी वाई परिसरातील पत्रकार, ग़ामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.. ✍️ मोहन चौकेकर

झीलच्या एमबीए विधार्थ्यांचे आंतरराष्टीय प्रोजेक्ट मध्ये उत्तुंग यश

0

 

झीलच्या एमबीए मध्ये शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्टीय प्रोजेक्ट मध्ये उतुंग यश संपादन केल्याबदल नुकताच या गुणवंत विधार्थ्यानाचा सत्कार करण्यात आला. ह्या प्रोजेक्ट मध्ये विध्यार्थ्यानी ऑनलाईन गूगल क्लासरूम च्या माध्यमातून पूर्ण केला.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.पराग काळकर (अधिष्ठाता ,वाणिज्य व व्यवस्थापन शाखा,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ),श्री रोहन सलगलकर,(व्यवस्थापकीय संचालक,अविरा इनसाइट्स, पुणे), श्री जयेश काटकर (सचिव, झील एजुकेशन सोसायटी,पुणे), श्री प्रदीप खांदवे (कार्यकारी संचालक,झील एजुकेशन सोसायटी,पुणे ) प्रा.उद्धव शिद (डायरेक्टर ऍडमिशन अँड अकॅडेमिकस ,झील एजुकेशन सोसायटी,पुणे ) तसेच डॉ.अश्विनी सोवनी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ.अश्विनी सोवनी यांनी नुसनतारा प्रोजेक्टची माहिती दिली.

यावेळी प्रा.जयेश काटकर यांनी या यशाबद्दल विधार्थ्यांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.पराग काळकर यांनी प्रॅक्टिकल शिक्षण हि काळाची गरज आहे तरी विध्यार्थ्यानी अशा प्रोजेक्टच्या माध्यमातून कौशल विकसित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

रोहन सलगरकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ऑनलाईन शिक्षणाचा वापर हा समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तसेच बदलण्याचा स्वीकार करण्यासाठी तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

झील एज्युकेशन सोसायटीच्या एमबीएच्या प्रथम वर्षातील विधार्थांची नुसनतारा या इंटरनॅशनल प्रोजेक्ट मध्ये भाग घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. या इंटरनॅशनल प्रोजेक्ट साठी झील एज्युकेशन सोसायटीतील एमबीए प्रथमवर्षात शिकत असलेल्या १८ विधार्थ्यांची निवड झाली होती.

सदरील प्रोजेक्टचा कालावधी हा २५ मार्च २०२१ ते १० जुन २०२१ एवढा होता. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना एआयबीपीएम या नामांकित संस्थेकडून “नुसनतारा प्रोजेक्ट” चे सर्टिफिकेट पण मिळाले आहेत.या प्रोजेक्ट मुळे विद्यार्थ्यांना जगभरातील १५ विद्यापीठातील विधार्थ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
सदर प्रोजेक्ट विध्यार्थ्यानी प्रा.डॉ.ऋषिकेश काकांडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला.

या प्रोजेक्ट मध्ये गीता टिळेकर, श्रद्धा विसपुते, विवेक उभे, विनया मारणे, गौरी भगत, शुभम जोशी, सायली दडवे, ऋषिकेश जंगम, रफीक़ मुलानी, मयूर कोल्हे, तन्वी धुरी, केल्विन सिबाचीनं, गौरी गायकवाड, अश्विन कांबळे, आकांक्षा रोकडे, आकांक्षा गाडे,विकी कामठे,अर्चना भागात या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या सर्व विद्यार्थ्यांनी जगभरातील १५ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थींसोबत काम करून हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर रिसर्च करून रिसर्च पेपर सादर केला आहे. उत्तम अशा रिसर्च पेपर ला स्कॉपस इंडेक्सड जर्नल्स मध्ये प्रकाशनाची संधी दिली जाणार आहे.तसेच सहभागी विद्यार्थ्यांना इंडोनेशिया आणि इतर अनेक देशात इंटर्नरशीप ची संधी सुद्धा मिळणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी,प्रा.विक्रांत नांगरे,प्रा.भावना खोत,प्रा.पांडुरंग पाटील,प्रा.धर्मेंद्र सिंग,प्रा.एकता तलवार आणि डॉ.आशिष व्यास यांचे सहकार्य लाभले.

शिल्पा सोनाले हिंगणघाट च्या नव्या उपविभागीय अधिकारी

0

 

हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांची उमरेड येथे बदली झाली असून यांच्या जागी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील शिल्पा संदेश सोनाले यांची बदली हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे झाली आहे ते सोमवारपासून कामावर रुजू होईल अशी माहिती मिळाली
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

पुनर्वसन करतांना शेतकरी व ग्रामस्थांचे हित जोपासा-पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे

0

 

 

अरकचेरी व पेनटाकळी प्रकल्पच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात घेतला आढावा

अजहर शाह

बुलडाणा:-पेनटाकळी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करतांना ग्रामस्थांचे हित जोपासावे. तसेच अरकचेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे भूसंपादन करतांना तेथील शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलामुळे बाधित झालेल्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पांढरदेव येथील घरांचे पुनर्वसन तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, पुनर्वसन करतांना एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून या गावांचे पुनर्वसन करावे. पुढील 15 दिवसात गावकऱ्यांना प्लॉट वाटप करून त्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करावा. या गावाच्या पुनर्वसनाकरिता लागणार निधी लवकरात लवकर मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.
संग्रामपूर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेत जमिनीचा सर्व्हे करून सयूंक्त मोजणी करण्यात यावी. हे काम करत असतांना कुठल्याही शेतकऱ्यांवर व ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी अशा सूचनाही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यावेळी दिल्या. बेठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

विध्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व दिले पटवून

0

 

अजहर शाह

मोताळा :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वातंत्र्यवीर गणपती इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद या विद्यालयात स्थानिक विद्यार्थी कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतात . या कृषी तंत्रज्ञानचा फायदा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना व्हावं या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन केले. रिधोरा शिवारातील दिगंबर चांगो मानकर यांच्या शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांनी अति महत्वाच्या विषयावर माहिती दिली व चर्चा केली ते म्हणजे माती परीक्षण.दर सहा महिन्याला शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षणाकरता प्रयोगशाळेत घेऊन जावी जेणेकरून शेतातील मातीची सुपीकता आपल्या लक्षात येईल व भरगोस उत्पादन घेण्यात शेतकरी सक्षम होईल असे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.तसेच शेतातील मातीचा नमुना कसा घ्यावा याच प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले.
या वेळी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य सुद्धा केले.विद्यालयातील विद्यार्थी योगेश गणेश देशमुख याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते व या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी योग्य सहभाग दिला.तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कृषी महाविद्यालय चे प्राचार्य श्री योगेश गवई कार्यक्रम अधिकारी श्री अविनाश आटोळे कार्यक्रम समन्वयक कु विद्या कपले यांचे मार्गदर्शन लाभले व महाविद्यालयातील माती विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ.न.एस.सदांशीव यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रभाग क्र 1जळगांव जामोद मधिल वायली वेस पासून,रुपलाल महाराज नगर तसेच नादर शहा प्लॉट मधून कब्रस्थान व बुऱ्हाणपूर रोड पर्यंत जाणारा जोडरस्ता बांधकाम करिता निधी उपलब्ध करुन नेण्यात यावा

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा

मा आ श्री गोपिकीशन बाजोरिया साहेब यांच्याकडे नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांची मागणी
दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी मा आ श्री गोपीकिशन बाजोरिया साहेब यांच्या दौऱ्या दरम्यान नगरसेवक तथा काँग्रेस सेवादल चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार यांनी प्रभाग क्र 1 मधून बुऱ्हाणपूर रस्त्याला जोडणारा जोड रस्त्याच्या बांधकाम करिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली असता मा बाजोरिया साहेब यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
ह्याप्रसंगी शिवसेना जिल्हा उप प्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख तथा गटनेते गजानन वाघ,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा न प गटनेते अर्जुन घोलप,नगरसेवक रमेश ताडे,कलीम खा हुसेन खा,खरेदी विक्री संस्थाचे संचालक संजय भुजबळ, युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप तालुका प्रमुख विशाल पाटील,शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख शेख चांद कुरेशी,शेख शरीफ कुरेशी, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते

भा.बौद्ध महासभा ता.नांदुरा चे वतीने ग्राम.खेरडा.येथे बुद्ध आणि धम्म या ग्रंथास भेट दिली

0

 

सूनिल पवार. नांदुरा ता.प्रतिनिधी

भा.बौद्ध महासभा ता.नांदुरा चे वतीने ग्राम.खेरडा येथे बुद्ध आनि त्या चा धम्म या.ग्रंथास सदीछा भेट दिली यावेळी ता.अधक्ष दिलिप मेढे. कोषाध्यक्ष निरंजन.तायडे उपाअध्क्ष. अशोक इंगळे सचिव अमोल मेढे. यशवंत वाकोडे.. निबांजि वाकोडे. तसेच रमेश वाकोडे धम्म ग्रंथासाठि गावकरी मंडळी बर्याच संख्येने उपस्थित होते या वेळी संजय सपकाळ व निरंजन तायडे यांनी प्रवचन केले इतर मान्य वरानि धम्म समजावून सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरंजन तायडे तर सुत्रसंचालन निबांजि वाकोडे यांनी केले व आभार धम्मपाल वाकोडे यानि केले

अकरावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी मध्यरात्री पासून बेपत्ता. पिंपळगाव काळे येथील घटना….

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा. प्रतिनिधी.

अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक ६ ऑगस्ट रोजी पहाटे तीनला पिंपळगाव काळे येथे उघडकीस आली आहे. सदर घटनेची फिर्याद मुलीच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.फिर्यादी मुलीचे वडील पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर फिर्यादी ची मुलगी ही अकरावीत शिकत आहे. ती दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतातून घरी आली.व रात्री जेवण करून सर्व झोपले असता आज पहाटे ३ वाजता फिर्यादी चा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता त्याला ती अंथरुणावर दिसली नाही. त्यामुळे त्याने वडिलांना व आईला उठवले सर्वांनी तिचा गावभर शोध घेतला.मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी दिनांक ६ आँगष्ट च्या सकाळीच पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोण्यातरी अज्ञात इसमाने रात्रीतून आपल्या मुलीचे अपहरण केले असल्याची तक्रार जळगांव पोलीस स्टेशनला दिल्यावरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जळगांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनास पी.एस.आय.प्रल्हाद मदन करीत आहे.

आमदार अंबादास दानवे यांच्या प्रयत्नातून घाणेगाव येथे पेव्हर ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ — मोहन चौकेकर

0

 

संभाजीनगर / औरंगाबाद

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत गंगापुर तालुक्यातील घानेगाव येथील स्मशानभूमी सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पटील बाळासाहेब दानवे प.स सभापती सुनील केरे पाटील यांच्या हस्ते करणयात आले.
याप्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश निश्चित उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर नवले संचालक श्रीलाल गायकवाड संतोष जोशी लक्ष्मण बहिर प्रवीण काळे गोविंद वल्ले विभाग प्रमुख प्रदीप सोनवणे सरपंच केशव गायके प्रकाश गोरे शाखाप्रमुख संतोष गायकवाड सुभाष बनकर सागर सातपुते बंडू दूबे सुरेश गायकवाड सोपान सातपुते हरिश्चंद्र मोरे सागर दुबे नारायण बनकर सचिन काळवणे तात्याराव राऊत विलास दौंड आदी शिवसैनिक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. ✍️ मोहन चौकेकर

आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आपेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेवर ब्लॉक बसवणे कामाचे भूमिपूजन संपन्न – मोहन चौकेकर

0

 

संभाजीनगर / औरंगाबाद

शिवसेना प्रवक्ते,जिल्हाप्रमुख , आमदार अंबादास दादा दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथे सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हर बॉल्क बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश पटिल, बाळासाहेब दानवे, प.स सभापती सुनील केरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आपेगाव परिसरातील नागरिकांना चांगला रस्ता नसल्यामुळे येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी चांगला रस्ता व्हावा यासाठी आमदार अंबादास दानवे यांच्याकडे मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेऊन जनसुविधा योजने अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड व पेव्हर ब्लॉक बसविणे कामाची त्वरित सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश निश्चित, ज्ञानेश्वर नवले, संचालक श्रीलाल गायकवाड, संतोष भाऊ जोशी, लक्ष्मण बहिर, प्रवीण काळे, गोविंद वल्ले, विभागप्रमुख प्रदीप सोनवणे मा सरपंच मनसुख जाधव मच्छिंद्र शेवगट रामेश्वर जाधव चंद्रकांत जाधव अशोक जाधव कृष्णा जाधव अशोक घोगरे नितीन आढाव रामेश्वर जाधव सतीश जाधव चव्हाण मॅडम ग्रामसेवक आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.