Home Blog Page 429

उत्कृष्ठ तहसीलदार म्हणून सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार राहुल तायडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार

0

 

नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे):

तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री. राहुल तायडे हे गेल्या २-३ वर्षांपासून नांदुरा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या कर्तव्याचे ते काटेकोरपणे पालन करतात परंतु याव्यतिरिक्त ही ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. जसे की विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणे, समाजउपयोगी कार्यात भरभरून मदत करणे.या सर्व कर्यांची दखल घेत दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी नांदुरा येथील तहसीलदार श्री राहुल तायडे यांना बुलडाणा येथे मा.जिल्हाधिकारी एस राममूर्ती,अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या हस्ते महसूल वसूली,महाराजस्व अभियान,सातबारा संगणकीकरण,नैसर्गिक आपत्तीत, कायदा व सुव्यवस्था,दंडाधिकारी यांची कामे इत्यादी महत्त्वाची भूमिका योग्यरीत्या पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल उत्कृष्ठ तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आले.यामुळे भारत सरकार मान्यता प्राप्त राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांचा शाल,श्रीफळ,हार,टोपी घालून सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री अनंत लाहुडकार, दिलीप इंगळे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे,भागवत दाभाडे,नांदुरा शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,अरुण सुरवाडे, सुशील इंगळे,रतन डोंगरदिवे व इतर पत्रकार उपस्थित होते.

वंचीत बहुजन आघाडी , जळगांव जा चे विवीध मागण्यांसाठी निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

वंचीत बहुजन आघाडी जळगांव जा च्या वतीने दि. ०६/०८/२०२१ ला नागरीकांच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात जुलै महीन्यात अतीवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. शेतजमीन भरडुन गेली. शेतातील पिके नेस्तनाबुत झाली. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात शेतीत ऊसाचे पिक वाया गेले. शेतात सुपीक मातीच राहली नाही. शेतकरी व शेतमजुर आर्थीकदृष्ट्या खचुन गेलेत. परीणामी पुरग्रस्त उस उत्पादक शेतकरी ज्या साखर कारखान्याचा सभासद आहे त्या कारखान्यानी शेतक-यास उचीत आर्थीक मदत द्यावी. पुरग्रस्त नागरीकांना जिवन जगण्यासाठी आवश्यक सुवीधांची तात्काळ पुर्तता करावी. शेतक-याच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना वाढीव मदत द्यावी. दुबार पेरणी शक्य नसलेल्या ठिकाणी शेतमालाच्या बाजारमुल्या प्रमाणे एकरकमी मदत जाहीर करावी. ज्यांची घरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.पुराच्या पाण्यात नागरीकांची महत्वाची कागदपत्रे जसे आधार कार्ड , रेशनकार्ड , मतदान कार्ड , शैक्षणीक दाखले हे सर्व मिळण्यासाठी शासकीय स्तरावर एकाच ठिकाणी विनामुल्य व्यवस्था करावी. पुरग्रस्त भागात साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना कराव्यात.
तसेच जळगांव जा. तालुक्यातील शेतक-यांची पिक कर्जाची प्रकरणे बॅंकांमधे प्रलंबीत आहेत करीता बॅकांना आदेश देवुन तात्काळ पिककर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश बॅंकाना द्यावे. ब-याच शेतक-यांनी दुबार पेरणी केलेली आहे अशा शेतक-यांना पंचनामा करुन हेक्टरी मदत द्यावी. सन २०२०-२१ वर्षातील पिकविम्याची रक्कम सरसकट विनाविलंब शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. कोरोना काळातील घरघुती व शेतीचे विजबिल माफ करण्यात यावे अशा विवीध रास्त मागण्यांसाठी वंचीत बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीेने शासनाला तहसीलदार साहेब जळगांव जा. यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी जेष्ठनेते रामकृष्ण रजाने माजी राज्यसचीव , बाबुराम तायडे माजी अध्यक्ष , नारायण पवार , मधुकर भगत , सुगदेव वानखडे , तालुकाध्यक्ष संतोष गवई , ज्ञानेश्वर कोकाटे , प्रदीप मोरखडे , विजय सातव सचीव , विशाल तायडे शहराध्यक्ष , विजय सोनोने , राजाराम पवार , बाबुराव पवार , विलास इंगळे , राहुल धुंदाळे , मंगेश करांगळे , साहेबराव वानखडे , विनोद वानखडे , योगेश वानखडे , अश्विन वानखडे , गौतम वाकोडे , धम्मदिप धुंदाळे , दिनकर इंगळे , ओंकार इंगळे , चिंतामण मांडोकार , रामदास दामोदर ,अंबादास पारवे , संजय इंगळे , सुनिल इंगळे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतांना हजर होते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने चोपडा मार्गावर एका ठिकाणी छापा टाकुन ६३ हजार रूपयांचे गावठी दारूचे रसायन व एका चारचाकी मोटर वाहनासह एका संशयीताला ताब्यात घेतले आहेत.

0

 

यावल प्रतिनिधि विकि वानखेड़े

दरम्यान, यावल तालुक्यात अन्न व औषद्य प्रशासन विभागाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षित कारभारामुळे तालुक्यात सर्वत्र महिन्याला लाखो रुपयांच्या गुटक्याची सर्रासपणे विक्री होत आहे. त्याचे काय असा प्रश्न नागरीक करीत आहे. मागील तीन ते चार वर्षापासून शेजारच्या गुजरात आणि मध्यप्रदेश या परप्रांतातुन विविध खाजगी वाहनाने गुटक्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जात असून सर्रासपणे तालुक्यातील यावल शहर फैजपुर शहर व इतर मोठी गावे या ठिकाणी सुमारे ३० ते ४० लाखांचा गुटका पानमसाला मोठ्या प्रमाणावर विकण्यात येत आहे. अगदी सहज कोणत्याही पानटपरी असो किंवा गल्लीबोळातील छोट्यातली छोटी किराणा दुकान या ठिकाणी काही मिळो न मिळो मात्र गुटका पानमसाला हा आर्वाजुन मिळत असतो.

सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार खालपासुन तर वरपर्यंत सर्वांना वेळेवर हप्ते मिळत असल्याने याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य उत्पादनची काल झालेली कार्यवाही म्हणजे अर्थकारणाचे हिशोबाचे गणीत चुकत्याने उशीरा सुचलेले शहाणपण असेच म्हणावे की काय असा प्रश्न नागरीक करीत आहे. दरम्यान आज ही यावल शहरात आणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गावटी दारू व पनीची दारू खुलेआम शहरातील विविध ठिकाणी व गावागावात राजरोसपणे विक्रीला जात असल्याने अनेक अल्पवयीन मुलं ही व्यस्नाधीन होत असुन त्यांच्या संसाराची राखरांगोळी होत असल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. त्यावेळी राज्यउत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई ही नुसता देखावा असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

यावल नगर परिषदने पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी : युवक राष्ट्रवादीची निवेदनाद्वारे मागणी.

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

। येथील नगर परिषदच्या माध्यमातुन राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुललाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल शहर शाखेतर्फे अध्यक्ष हितेंद्र गजरे यांनी नगर परिषद यावल कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे

येथे यावल शहरातील मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना नगरपालिकेकडून घरकुलाचे बांधकाम पंधरा दिवसाच्या आत चालू करण्यात यावे, अन्यथा आपले घरकुल रद्द करण्यात येईल अशा नोटिसा लाभार्थ्यांना देण्यात आल्याने घरकुल लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी बांधकाम परवानगी, त्या कामी कागदपत्राची पूर्तता, आर्थिक व्यवस्था, अशा बाबींची पूर्तता करावी लागते. परंतु मागील दीड वर्षापासून या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लाभार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाळू उत्खननावर बंदी असल्याने बांधकाम करण्यास लाभार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे. अशा विविध अडचणींमुळे लाभार्थ्यांची घरकुल बांधकाम सुरुवात झालेली नाहीत. नागरिक बांधकाम करण्यास इच्छुक असून देखील त्यांची नावे नगरपालिकेकडून वगळण्यात येणार असल्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. मंजुर यादीत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा कागदपत्र व इतर आर्थिक अडचणी असलेल्या इच्छुक लाभार्थ्यांना अधिक वेळ मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. ज्या लाभार्थ्यांची कामे सुरू आहेत, अशा लाभार्थ्यांना पुढील हप्ते देण्यात यावे. असे निवेदन येथील नगर परिषदेला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष हितेंद्र गजरे, समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नरेंद्र शिंदे आदींनी दिले.

मनोजभाऊ दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जामठी ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या वतीने वृक्षारोपण संपन्न – मोहन चौकेकर 251 वृक्ष लागवड करून होणार निसर्ग संवर्धन 

0

 

दांडगे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा नोंदविला वृक्षरोपनात सहभाग

जामठी:-निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून,निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल बुलढाणा मा.मनोजभाऊ दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जामठी ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या वतीने वृक्षारोपण सोमवार दि.02/08/2021 ला संपन्न झाले.यावेळी ज्ञानदेवराव बापू दांडगे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड क्रॉप सायन्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा वृक्षारोपण यात सहभाग नोंदविला होता व त्यांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच कोरोनाच्या कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. याचे महत्व पटवून देण्यासाठी व याच गोष्टीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा मनोजभाऊ दांडगे नेहमी वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतात याचेच उदाहरण म्हणून त्यांनी जामठी ग्रामपंचायत व वनविभाग जामठी यांच्या संयुक्त विद्यमाने जामठी माळरानात सरकारी जागेत 251 वृक्ष लागवड करून झाडे लावा,झाडे जगवा संदेश सर्वाना दिला आहे.याआधी सुद्धा जामठी ग्रामपंचायत ने विविध सामाजिक उपक्रम केले आहे.
याप्रसंगी मनोजभाऊ दांडगे,सरपंच बिलाल गायकवाड,ग्रामसेवक शिंदे साहेब,तलाठी शेवाळे मॅडम,राष्ट्रवादी युवा नेते संतोष भाऊ दांडगे,दांडगे ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य डवले सर,मराठी पूर्व व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक खर्चे सर सह सर्व शिक्षक वृंद,वनपरिक्षेत्र अधिकारी टेकाळे साहेब,वनपाल आंबेकर साहेब,वनरक्षक मुळे साहेब,ग्रामपंचायत उपसरपंच कौतिकराव नरोटे,सदस्य,माजी सरपंच भगवान तायडे,राष्ट्रवादी नेते जक्का सेठ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली विधानसभा उपाध्यक्ष रामेश्वर पाटील तायडे,रामकृष्ण तायडे पोलीस पाटील जामठी,राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष निर्मला ताई तायडे,माजी सरपंच मंगेश तायडे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेल चे तालुका कार्यध्यक्ष बुलढाणा गणेश तायडे पाटील,मनोहर तायडे पाटील,रमेश पाटील तायडे,विलास संतोष राव तायडे,समाधान पाटील तायडे,संजय माणिकराव तायडे,जितेंद्र पाटील तायडे,संदीप तायडे पाटील,संदीप भाऊ सोनुने,गजानन तायडे पाटील,आलीम खान,अमीन खा साहब,अजू पाटील तायडे,संदीप भाऊ तायडे,विष्णू भूक धांडे,गणेश पवार,समाधान कल्याणकर,तेजराव रावळकर, राजू भाऊ सोनुने,अमीन खान,विजय तायडे पाटील,हर्षल तायडे,मोहन तायडे,राजेश तायडे,भरत तायडे,भागेश तायडे,समाधान म्हस्के,विनोद रावळकर,अंकुश तायडे,महेश तायडे,शुभम तायडे,विठ्ठल तायडे,दिनेश अवसारमोल,नारायण गायकवाड, विनोद गणेश तायडे,विनोद गायकी,विजय समाधान तायडे,विशाल तायडे,रवी तायडे,गजानन मालोदे, राजेंद्र शेषराव तायडे,टिनू तायडे,अनिल गायकवाड,तुळशीराम पवार,विनोद गायकवाड, शुभम तायडे,विनोद प्रकाश तायडे,जफ्फर सेठ,सिकंदर बर्डे,अमोल तायडे,हरी गायकवाड, मोहम्मद खान,सुभाष तायडे,विलास थोरात,नामदेव अंभोरे,मधुकर तायडे,सुजित तायडे,सुजित तायडे,गोपाल तायडे,पांडुरंग रावळकर, श्रीकृष्णा थोरात,रामदास कडूबा तायडे,पिंटू पवार,गणेश ठाकूर,बाळू तडवी,अंगणवाडी सेविका जामठी,आशा सेविका,गावातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. ✍️ मोहन चौकेकर

शिवसेनेची तब्बल 22 दिवसांची शिवसंपर्क मोहीम संपन्न – मोहन चौकेकर

0

 

संभाजीनगर / औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्याच आदेशाने पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे , शिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई , चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर / औरंगाबाद जिल्हाभरात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली 11 जुलै चे 1ऑगस्ट पर्यंत शिवसंपर्क मोहीम राबविण्यात आली, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी या ठिकाणी या मोहिमेचा समारोप करण्यात आला. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने तसेच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने अनेक संघटनात्मक उपक्रम बैठका , विकास कार्यांचा धडाका या मोहिमेत करण्यात आला आला. संभाजीनगर/ औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल 68 पंचायत समिती गण ,34 जिल्हा परिषद गट, 4 नगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग संभाजीनगर / औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल 115 पैकी 106 वॉर्ड , कॅन्टोन्मेंट परिसरातील 7 वॉर्डसह , मुस्लिम समुदायाच्या 3 बैठका , यासह विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्त्यांनी या मोहिमेच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला अनेक विकासकार्याची सुरुवात समाजोपयोगी उपक्रम या मोहिमेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. यावेळी शिवसेना महिला आघाडी, युवासेना , सर्व अंगीकृत संघटनां या मोहिमेत सहभागी झाल्या त्यात प्रामुख्याने वाहतूक सेनेचे 3 शाखा सुरू करण्यात आल्या साडेतेरा हजार (13500 ) शिवसैनिक या अभियानात प्रत्यक्ष सहभागी झाले त्याचप्रमाणे इतर उपक्रमच्या माध्यमातून दोन लक्ष (२,०००००) नागरिकांपर्यंत ही मोहीम जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पोहोचवली या मोहिमेत प्रामुख्याने मा मंत्री महोदय संदीपान भुमरे , मा मंत्री महोदय अब्दुल सत्तार , महिला आघाडी संपर्क संघटक मानिषाताई कायंदे,आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट , रमेश बोरणारे , उदयसिंह राजपूत सहसंपर्कप्रमुख त्रिंबक तुपे , उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे , अविनाश पाटील,बाबासाहेब जगताप , संतोष काळवणे , राजू राठोड , संतोष जेजुरकर , जयवंत ओक , अनील पोलकर , राजेंद्र राठोड , अवचित वळवळे , विनायक पांडे , आनंद तांदुळवाडीकर , बाप्पा दळवी , तालुका प्रमुख दिनेश मुथा , राजू वरकड , केतन काजे ,
सुभाष कानडे , हनुमान भोंडवे , सचिन वाणी , आबा काळे
शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे , विश्वनाथ स्वामी , बाबासाहेब डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य ,सुशील खेडकर , गोपाळ कुलकर्णी , डॉ अण्णा शिंदे , गणेश अधाने ,दिलीप मचे, माजी महापौर नंदकुमार घोडेले माजी उपमहापौर
युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ , ऋषिकेश खैरे , सभागृहनेता विकास जैन युवासेना जिल्हाअधिकारी हनुमान शिंदे महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा , सहसंपर्क संघटक सुनीताताई आऊलवार ,जिल्हा संघटिका सुनीता देव, राखीताई परदेशी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य ,नगरपालिका लोकप्रतिनिधी, महानगरपालिका लोकप्रतिनिधी आदी शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.
या शिवसंपर्क मोहिमेमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले. ✍️ मोहन चौकेकर

पाणी आडवा पाणी जिरवा, चिंचाळा येथील विद्यार्थी दिला संदेश

0

`जल संरक्षणाची करा तयारी, होणार आहे वर्षा भारी

पाणी है निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अनमोल भेट आहे, आणि याचे मूल्य लावणे कठीण आहे. पाण्याशिवाय जीवनाचे महत्त्व नाही, आणि अस्तित्व ही नाही मग ते जीवन प्राण्यांचे असो वा मनुष्याचे. परंतु आजच्या आधुनिक युगात माणसाच्या निष्काळजीपणामुळे  धरतीवर पाण्याची कमी सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याचा परिणामस्वरूप आज खूप सारे ठिकाण पाण्याच्या आभावाने कोरडे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणी लोक स्वच्छ पाण्यासाठी तळमळ करीत आहेत.
जर भविष्यात होणाऱ्या जल संकटांपासून वाचायचे असेल तर सर्वप्रथम सर्व लोकामध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. आज मानवाने आपल्या चुकांमुळे निसर्गाला खूप क्षति पोहचवली आहे, म्हणून जर येणाऱ्या पिढ्यांचे अस्तित्व वाचवायचे असेल तर पुढील उपाय करणे आवश्यक आहे.
उपस्थित , पियुष भोगेकर, आदित्य निकुरे ,तृप्तेष माशिरकर, राहुल रामटेके,अनुराग भोगेकर , गणेश मानकर, मयुर नरूले

शैक्षणिक फी 50% माफ करणेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन

0

 

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना चे सावट पसरले आहे. ज्यामुळे शाळा कॉलेजेस अजून सुद्धा बंदच आहे पण खासगी शिक्षण संस्था मार्फत फी आकारणे सुरूच आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा 15% एवढी खासगी संस्थान कडून फी माफ करण्याचा विचार सुरू असला तरी शाळा कॉलेजेस बंद असल्याने आणि कोरोना मुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले असल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे उपकरणे आणि खर्च सर्व सामान्यांना अकरण्या जोगा नाही …
तरी खासगी संस्था कडून 50% एवढी शैक्षणिक फी माफ करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू व त्याची जवाबदारी शासनाची राहील अश्या आशयाचे निवेदन जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना आज 6 ऑगस्ट रोजी देण्यात आले.. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसिलदार किसन सुर्यवंशी यांनी स्विकारले
निवेदन देते वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटनीस वैभव अढाव

भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल
नगरसेवक आशिष भैया सारसर
युवा मोर्चा शहर संगटक गौरव डोबे
युवा मोर्चा शहर सरचिटणीस मयूर खंडाळे अभिषेक देशमुख
विनायक हिस्साल ओम कपले ऋषिकेश सुतोने श्याम टावरी कार्तिक दीक्षित आशुतोष भोपळे नीरज राजपूत पवन रोठे गौरव बैरागी योगेश केदार प्रथमेश फंडाळे मयूर मुळतकर अदनान खान

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा वाढविणार – वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांचे आश्‍वासन

0

 

वसतीगृहाची क्षमता वाढवावी व रिक्‍त पदे तातडीने भरावी – आ. सुधीर मुनगंटीवार

 

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्‍यासाठी संबंधित यंत्रणांना त्‍वरीत निर्देश देण्‍यात येईल तसेच याठिकाणी पायाभूत सुविधा वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी दिले.

दिनांक ४ ऑगस्‍ट रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांची भेट घेतली व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर बाबत विस्‍तृत चर्चा केली. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील वसतीगृहाची क्षमता १०० हून १५० इतकी वाढविण्‍याबाबत तसेच साधन सामु्ग्री सुध्‍दा वाढविण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्‍यान केली. वसतीगृह क्षमता व साहित्‍य सामुग्री त्‍वरीत वाढविण्‍याचे आश्‍वासन यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री यांनी दिले. याठिकाणी वर्ग १ ते वर्ग ४ च्‍या संवर्गातील महत्‍वपूर्ण पदे मोठया प्रमाणावर रिक्‍त आहेत. सदर रिक्‍त पदे भरण्‍याबाबत आपण सातत्‍याने विधानसभेच्‍या माध्‍यमातुन शासनाचे लक्ष वेधले. उपमुख्‍यमंत्र्यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत रिक्‍त पदे भरण्‍याचे निर्देशही दिले होते. मात्र सदर रिक्‍त पदे अद्याप भरण्‍यात आलेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा फटका सर्वसामान्‍य रूग्‍णांना तसेच वैद्यकिय शिक्षणाला सुध्‍दा बसत आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर हे चंद्रपूरकरांचे स्‍वप्‍न आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देत त्‍वरेने कार्यवाही करण्‍याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षणमंत्री यांना केली.

पारिजात इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व पंचायत समिती कृषी विभाग जळगाव जामोद यांच्या मार्फत कपाशी पीक पाहणी कार्यक्रम संपन्न…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा.ली. व पंचायत समिती कृषी विभाग जळगांव जा यांच्या मार्फत शेतकरी ऋषिकेश मधुकर येऊल यांच्या शेतात कपाशी चा पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आला…
कपाशी पीक पाहणी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माननीय कृषी अधिकारी श्री रवी नावकार साहेब तसेच पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा ली चे डॉ निकिता अवस्थी (पोर्टफोलिओ मॅनेजर,महाराष्ट्र) रिझवान पटेल (मार्केटिंग मॅनेजर,विदर्भ) आशिष खंडारे (टेरटरी मॅनेजर,बुलढाणा) योगेश येऊल (सेल्स ऑफिसर) तसेच, श्री सुखकर्ता कृषी केंद्र, सूनगांव याचे प्रो. प्रा. श्री गजानन वंडाळे, व प्रफुल कावरे, कृषिमित्र मोहन राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,,,,
तसेच श्री मधुकर येउल , रवी नानगदे, श्रीराम येउल असे 30 ते 35 शेतकरी उपस्थित असून त्यांना कृषी अधिकारी नावकर साहेब यांनी फवारणी करताना कशी काळजी घ्यावी त्या बद्दल मार्गदर्शन केले, व परिजातच्या डॉ निकिता यांनी शेतकरी बांधवांना प्रोडक्ट बद्दल माहिती दिली… आणि पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना सुरक्षा किट वाटप करण्यात आली….