Home Blog Page 430

मोताळा येथे पोल्ट्री लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

0

 

अजहर शाह

मोताळा:-स्थानिक मोताळा येथे पोल्ट्री लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.विशाल अहिरे यांच्या पोल्ट्री शेड मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी ऐकून 2000 पक्षींच लसीकरण करण्यात आले.गुंभोरो या रोगा पासून पक्ष्यांचे रक्षण होण्यासाठी हे लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमात युवा शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमा मध्ये शेतकऱ्यांना लसीकरण व पक्ष्यांवर येणाऱ्या रोगा संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.लसीकरणा बद्दल लोकांना प्रश्न विचारून त्या संबंधीत योग्य ती उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.धीरज सोनटके उपस्थित होते व त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्रवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद चे विध्यार्थी योगेश गणेश देशमुख व प्रियंका वासुदेव कोसे यांनी केले होते.तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कृषी महाविद्यालय चे प्राचार्य श्री योगेश गवई कार्यक्रम अधिकारी श्री अविनाश आटोळे कार्यक्रम समन्वयक कु विद्या कपले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ फवारणी करण्याची प्रहारची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
दि. 29 जुलै
हिंगणघाट शहरातील अनेक वॉर्डात डेंग्यू चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत असून अनेक कुटुंबे या आजाराने त्रस्त झालेले दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे शहरात ठिकठिकानी साचलेले कचऱ्याचे ढिग व त्यामुळे डेंग्यूच्या डासांचा मोठ्या प्रमाणात उपसर्ग वाढत आहे.परंतु एवढया मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण वाढत असूनही नप प्रशासन मात्र शहरात कोणतीही कीटकनाशक फवारणी करीत नसल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नप ने तातडीने शहरात सर्वत्र फवारणी करावी जगोजागी साचून पडलेला कचऱयाचे ढीग त्वरित उचलून नाल्याची सफाई युद्धपातळीवर करावी अशी मागणी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी नपला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगणघाट तालुका प्रमुख जगदीशभाऊ तेलहांडे,सुरज कुबडे,अजय लढी,मोहन पेरकुंडे,राजेश लखाणी,अमोल रामगुंडे,धीरज नंदरे,किशोर देवढे,पवन वाघमारे,पिंटू वडतकर,सुधीर मोरेवार,वि, संतोष जोशी,सुधीर मोरेवार,राजेश तांदूळकर,भूषण कुंभारे,महेश तांदुलकर, गोलू कुंभारे, शांताराम तराळे,नितीन मोरे,अमित पोतदार,प्रशांत आवारी इत्यादी उपस्थित होते

डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी अन्यथा आंदोलन ( वरवट बकाल गावातील नागरिकांचा इशारा)

0

 

संग्रामपूर प्रतिनिधी

वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी अन्यथा गावातील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा गावातील शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व सचिवाला 29 जुलै रोजी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टर खूप चांगली रुग्णसेवा देत आहेत. परंतु रात्रीच्या वेळी गावातील अत्यावश्यक रुग्णांसाठी आपले दवाखाने उघडत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नाईलाजाने रुग्णांचे नातेवाईक उसनवारी करून शेगाव, अकोला, खामगाव आदी गावाला खाजगी वाहनाने भाडे व वेळ खर्च करून उपचारासाठी जातात . त्या कारणांमुळे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास होत जावे आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जोपासून वरवट बकाल येथील डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी. अनयथा आंदोलन करण्याचा इशारा शेकडो नागरिकांनी दिला आहे. शासनाने कोविड 19 च्या विषाणूमुळे रुग्णांना सुरळीत रुग्णसेवा मिळावी यासाठी खाजगी दवाखाने 24 तास सुरू ठेवण्यासाठी कडक निर्बन्ध लावले आहेत. शासनाच्या अधीन राहून वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टरांनी रात्रीची रुग्णसेवा द्यावी अन्यथा गावातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर शेख अनिस, प्रल्हाद दातार, गोपाल इंगळे, नारायणराव ढगे, दिगम्बर बावस्कर, शेख कारीस, अर्जुन ढगे, रमेश डाबरे, गजानन ढगे, काशिराम ढगे, शेख निसार, लक्ष्मण भोपळे, विनायक टाकलकार, वासुदेव माकोडे, शेख शरीफ, अशोक डाबरे, दीपक दामधर, अभिजित पवार, वैभव डाबरे, चेतन बकाल सह 65 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

खाजगी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा द्यावी अन्यथा त्यांचे दवाखाने बंद पाडू
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे रात्री अपरात्री नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सेवा देण्यासाठी डॉक्टरांनी दिवसरात्र सेवेचे व्रत घेतलेले असते असे असताना जे डॉक्टर रात्री अपरात्री आजारी पडणाऱ्या रुग्णांना दवाखाने बंद करून रुग्णसेवा नाकारनाऱ्या डॉक्टर विरुद्ध तीव्र आंदोलन करून अशा डॉक्टरांचे कायमस्वरूपी दवाखाने बंद करणार.
प्रल्हाद दातार संस्थापक अध्यक्ष नागरिक हक्क बचाओ आंदोलन.
निवेदनाच्या प्रति
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलढाणा, संग्रामपूर तहसीलदार
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तामगाव यांना दिल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीविद्यार्थी आघाडी चा वतीनेमहाराष्ट्र शासनाने महामंडळ बसेस पुर्णतः चालू करणे बाबत उपविभागीय अधिकारी व आगार प्रमुख यांना निवेदन .

0

 

महाराष्ट्र शासनाने वर्ग 8ते 12 चे वर्ग काही दिवसात सुरू करण्याचा निर्णय घेत असल्यामुळे विदयर्थ्यच्या सोयीसाठी ग्रामीण भागात आद्यपही बसेस जात नाही असा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीने दिले .
येत्या काही दिवसात शाळा सुरू होत आहे.जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या वेळेवर बस उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.मागील 1.5वर्षांपासून कोरोना विषाणूजन्य रोगामुळे शाळा ,कॉलेज बंद झाली असल्यामुळे विद्य्यार्थ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या नुकसान टाळण्यासाठी सर्व बस फेऱ्या सुरु कराव्या या मागणीसाठी मा. उपविभागीय अधिकारी तथा आगर प्रमुखना निवेदन देण्यात आले .
निवेदन देते वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटनीस वैभव अढाव
भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल
नगरसेवक आशिष भैय्या सारसर
युवा मोर्चा शहर संघटक गौरव डोबे

योगेश केदार,श्याम टावरी, सोमेश लाड,वैभव भगत ,गोपाल दामोदर,सोमेश लाड,गौरव बैरागी,ऋषिकेश सुटोने,आशुतोष भोपळे,अंशुल भगत,प्रयाग फुसे,ओम कपले
कार्तिक दीक्षित,उज्वल हिस्सल विनायक हिस्सल, अभिषेक राऊत

साकळी येथे पोलीसांनी टाकला जुगार अड्डयावर छापा १५ जणांना ८८हजार रूपयांच्या रोकडसह घेतले ताब्यात

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथे एका जुगार अड्ड्यावर यावल पोलिसांनी छापा टाकत १५ जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून तब्बल ८८ हजाराचा मुद्देमाल जुगारीचे साहीत्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलीसांच्या वतीने ही सदर ची कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. यावल तालुक्यातील
साकळी येथे मंगळवारी सायंकाळी गावातील सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्डा चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली होती तेव्हा त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी सहायक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार सुशील घुगे, पोलीस अमलदार राजेश वाडे यांच्या पथकास पाठवले तेव्हा सदरील ठिकाणी छापा टाकून खालिक शेख, अहमद शाह, अनिल चौधरी, लतीफ तडवी, अल्लाउद्दीन शेख, असलम खान, चंद्रकांत जंजाळे, सरफराज तडवी, सुपडू तडवी, शेख अशपाक, किशोर खेवलकर, जाबीर शेख, जुम्माह तडवी, जाबीर तडवी व शेख जाकीर अशा एकुण पंधरा जणांना जुगार खेळतांना पकडण्यात आले तर कारवाई दरम्यान बबन पाटील रा. मनवेल हा फरार झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडुन सांगण्यात आले. तेव्हा या पंधरा जणांकडून ८८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या सर्वांविरुद्ध यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संजय देवरे करीत आहे.

शिवसेनेकडून मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्य सामाजिक उपक्रम

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 28 जुलै हिंगणघाट शिवसेना पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसा निमित्य शहरातील पिंपळगांव रोड जवळ तुकडोजी वार्ड येथे कमला नेहरु शाळेत निराधार निराश्रीत व्यकतीना फळे व बिस्किट वाटप तसेच उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे रुग्णांना फळे व बिस्किट वाटप कार्यक्रम उपजिल्हा प्रमुख श्री.राजेंद्र खुपसरे ,शहर प्रमुख श्री.सतिश ढोमणे,न.प.उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत घुसे,नगरसेवक श्री.श्रीधर कोटकर, नगरसेवक श्री.सतिश धोबे,नगरसेवक श्री.सुरेश मुंजेवार,नगरसेवक श्री.मनिष देवढे, नगरसेविका सौ.निताताई धोबे,नगरसेविका सौ.संगिताताई वाघमारे,नगरसेविका सौ.सुनिताताई पचोरी,उपतालुका प्रमुख प्रकाश अनासने,नगरसेवक श्री.भाष्कर ठवरी,माजी नगरसेवक श्री.शंकर मोहमारे,माजी नगरसेविका सौ.माधुरीताई खडसे,सौ.नलिनीताई सयाम,बंटी वाघमारे,लक्ष्मण बकाणे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.
महाविर भवन येथे राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या चमु च्या वतिने रक्तदान शिबीर कार्यक्रम दीप प्रज्वलन करुण स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला , 50 रक्तदात्यानी रक्तदान केले ज्यांनी रक्तदान केले .कार्यक्रमात सर्वश्री.युवासेना जिल्हा युवा अधिकारी श्री.अभिनंदन मुनोत, श्री.देवा पडोळे,माजी शहर प्रमुख श्री.मुन्ना त्रिवेदी,उपशहर प्रमुख श्री.संजय पिंपळकर,श्री.महेश खडसे,श्री. जयंता रोहणकर, उपशहर प्रमुख श्री.रोहीत बक्षी,अविनाश धोटे,मनोज जुमडे, संजय सयाम,प्रकाश झाडे,शंकर झाडे,वसंता पाल,विनोद वानखेडे,रमेश चतुर,संजय जुमडे, दिलीप चौधरी,भोला ठाकुर,अनिल कावडकर,अनिता गलांडे,धनराज गलांडे,विद्याधर नौकरकार,प्रदीप धनरेल,आशिष जैस्वाल,नितिन ठाकरे,प्रजय ढोमणे,सुरेश खोंडे,राजु माडेवार,अनिल चाफले, विजय झिंगरे,सौ.प्रमीलाताई झिंगरे,सौ.कल्पनाताई हिवंज,सौ.संगिताताई कडु,सौ.मायाताई खंदार,सौ.अरुणाताई झाडे,सौ.संगिताताई भांडे,सौ.शिलाताई वरघणे,सौ.छायाताई सहाघाटे,सौ.पिन्कीताई बावणे,सौ.मनिषाताई भोयर,सौ.वर्षाताई उघडे,सौ.कलावती निखाडे,गजानन पटोले,आशिष भांडे,प.स.उपसभापती अमोल गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ,विक्रम देवगिरकर,सोनु कोनप्रतिवार,महेंद्र पचोरी,दिनेश धोबे,गोपाल मेघरे,अनिल दुर्गे,रुपेश काटकार,तेजस तुमड़ाम,हिरामन आवारी,हरदीप काळे.राहुल मेहरे.विनोद झिंगरे,उमेश धोबे,राहुल मोहीतकर,निखील कोल्हे,चंदन काकडे,दत्ता सातपुते,बिकू ठावरी,मिलिंद मंगरूळकर,नरेंद्र गुळकरी,सुरेश चुंबळे,शुभम त्रिवेदी,अशांक लोखंडे,वैभव वैद्य,जितेंद्र जैन,आदी शिवसैनिक उपस्थित होते*

राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

0

 

यावल ता (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
किनगाव शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेने पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत  विद्यार्थ्यांना खाऊ व फळवाटपाचा कार्यक्रम दि. २७ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी यावल तालुका शिवसेनेचे संघटक गोपाल भाऊ चौधरी ; माजी जि.प.सदस्य सुभाष सोंळुके  ; माजी जिल्हा परिषद सदस्य  किरण सोंळुके  ,भाऊसाहेब धनगर ; विविध कार्यंकारी सोसायटी चे  माजी चेअरमन पंढरीनाथ चिंधु सोंळुके, पिक संस्थानचे माजी  चेअरमन  डी.एन.कोळी , रघुनाथ सुतार ;  संजय सोंळुके ,शांताराम पाटील , पिक संस्थानचे सचिव सुनील कोळी आदि शिवसेनिक व मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक पुष्पा चौधरी , मुरलीधर कोळी , झांबरे मॅडम आदि यांच्या  उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री ना . उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणी हितासाठी कोरोना संसर्गाच्या संकटकाळात ही राज्यातील जनतेसाठी उत्कृष्ठ असे कार्य करीत असलेल्याचे बोलवुन त्यांच्या विकास कामांना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पहोचवा असे आवाहन सर्व शिवसेनिकांसाठी या प्रसंगी सेनेचे तालुका संघटक गोपाळभाऊ चौधरी व माजी जिल्हा परिषद सदस्य किरण सोंळुके यांनी केले .

गावठी कट्टा कमरेला लावून दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेबच्या पथकाने अटक केली

0

 

यावल ता (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल शहरातील बुरूज चौकात गावठी कट्टा कमरेला लावून दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेबच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश राजेंद्र पाटील (वय-२२) रा. सुंदर नगरी यावल असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बुरूज चौकात एक तरूण बेकायदेशीर व विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली. त्यानुसार पथक जळगावहून यावलला आज मंगळवारी २७ जुलै रोजी दाखल झाले. दुपारी पथकाने सापळा रचून संशयित आरोपी यश राजेंद्र पाटील याला अटक केली. त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यात पोलीस कान्स्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, पोलीस नाईक युनुस शेख, किशोर राठोड, पोलीस कान्स्टेबर विनोद पाटील, रणजित जाधव यांनी कारवाई केली.

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी विजय अढाव यांची निवड

0

 

नांदुरा( प्रफुल्ल बिचारे):

– तालुक्यातील पिंपळखुटा खुर्द येथील तरुण तडफदार नेते श्री. विजय कडूजी अढाव पाटील यांची भाजपा युवा मोर्चा नवीन जम्बो कार्यकारणी २३ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजयभाऊ कुटे , जिल्हाध्यक्ष आ.आकाश दादा फुंडकर, जेष्ठ नेते चैनसुखजी संचेती,आ.श्वेताताई महाले पाटील , भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रमदादा पाटील,मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.उमाताई तायडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख , भाजपा जिल्हा सरचिटणीस मोहनजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी निवडण्यात आली. या नियुक्ती मुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रदेश स्तरावर विजय पाटील यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षसंघटना मजबूत करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून आपल्या पदाला न्याय देण्याचे काम करील अशी प्रतिक्रिया विजय अढाव यांनी व्यक्त केली.

यावल पंचायत समितीतील ८ अधिकारी व एक शिपाईयांच्या बदल्या झाल्या असुन यात चार ग्रामसेवक एक ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या एक ग्रामविकास अधिकारी व चार ग्रामसेवक एकुण पाच जणांच्या प्रशासकीय पातळीवर बदल्या झाल्याचे विश्वनिय वृत्त आहे . या संदर्भातील वृत्त असे की यावल पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे व शिरसाडचे आर जी चौधरी यांची रावेर तालुक्यात तर पाडळसा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एल एन नहाले यांची भुसावळ तालुक्यातील केऱ्हाळे व सांगवी खुर्द ग्रामपंचायत चे ग्रामसेवक राहुल तायडे यांची भुसावळ व बोरावल बु॥ व खुर्द दोघ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नागनाथ गायकवाड यांची मुक्ताईनगर येथे बदली झाली असल्याची माहीती दिली असुन अद्याप प्रशासकीय पत्र प्राप्त झाले नसले तरी त्यांनी बदल्या करण्यात आल्याच्या विषयास दुजोरा येथील पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सदरच्या बदली संदर्भातील माहीतीस दिला आहे . दरम्यान यावल पंचायत समितीतील शिक्षण व समाजकल्याण विभागातील विभागातील वरिष्ठ सहाय्यक मनोज भरत पाटील यांची जळगाव बांधकाम विभागात तर ग्राम पंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक के एल पाटील यांची रावेर पंचायत समितीला व शिक्षण विभागातील गुणवंत डिंगबर देवराज यांची चोपडा पंचायत समितीमध्ये तर शिपाई मोहन हरि हिरळकर यांची मुक्ताईनगर पंचायत समितीच्या बांधकाम विभागात बदली झाली आहे .