Home Blog Page 431

हिंगणघाट शहरात वाढत आहे डेंगू चे रुग्ण एकाचा मृत्यू

0

 

हिंगणघाट शहरात वाढत आहे डेंग्यूचे रुग्ण सर्व दवाखाने रुग्णाने हाउसफुल नगरसेवकाचे स्वच्छतेबाबत वार्डात दुर्लक्ष वार्डात नगरसेवक निवडून आल्यावर दिसत नाही . प्रतिनिधी यांना दिली माहिती शहरात स्वच्छतेबाबत नगरसेवकांचे कोणतेही नियोजन नाही.
2 ऑगस्टला नयन संजयराव लाकडे (वय ८) चिमुकल्याचा डेंग्यू या आजाराने सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला . शहरात अनेक डेंग्यू चे रुग्ण आहे यात लहान बालकांचा देखील समावेश आहे . नगरसेवकाचे स्वच्छतेबाबत कोणतेही लक्ष नाही. नगरपालिका अधिकारी यांना विचारले असता ते सांगतात आम्ही फवारणी केली आहे. वार्डातील लोक सांगतात आमच्याकडे फवारणी झाली नाही खरं कोण बोलत आहे ? नागरिकांचा तीव्र संताप असून या डेंग्यू रोगाच्या वाढत्या प्रकोपा करिता फवारणी करावी तसेच त्वरित तउपाय योजना करण्याची मागणी वार्डातील नागरिक करीत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

श्री.जी.एस.भगत यांनी वाढदिवसानिमित्य श्रेयस वाचनालयाला ग्रंथ खरेदी करीता दिली पाच हजाराची देणगी

0

 

हिंगणघाट– मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे.या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्यांच्या कार्य संस्कृतीवर सुद्धा प्रभाव पडतो . वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी व प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातच असावी लागते असे विचार भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष श्री जी.एस.भगत सर यांनी व्यक्त केले.ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्रेयस वाचनालयाला ग्रंथ खरेदी करीता पाच हजार रूपयाची देणगी देण्यासाठी श्रेयस वाचनालयात आले असतांना आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला बौद्ध महासभेचे श्री.संजय वानखेडे,श्री.राजू फुलझेले,श्री.राजू नगराळे ,श्री.परशुरामजी वाघमारे,श्री.निळकंठ भिमटे,अॕड रमेश थुल,श्रेयस वाचनालयाचे प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे,सौ.सुजाता नगराळे ,श्रेयस नगराळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री शशिमोहन थुटे यांनी केले.
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा

बैलजोडीच्या भाड्याच्या कारणावरून गळ्यावर चाकू मारून खून धानोरा येथील चित्तथरारक घटना…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे दिनांक तीन ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान मृतक वामन राघोजी घुले हे चौकात बसले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकर राहणार धानोरा महासिद्ध हे मृतक वामन घुले यांच्यासोबत बैलजोडीच्या भाड्यावरून बोलचाल करीत होता त्यातच आरोपीने वामन घुले यांना शिवीगाळ करणे सुरू केले त्यावेळी वामन राघोजी घुले त्यांना मुलाने घरी नेले. परंतु थोड्या वेळाने पुन्हा वामन घुले चौकात आले असता आरोपी ज्ञानेश्वर पांडुरंग देऊळकार,विठ्ठल देऊळकार, श्रीराम देऊळकार, यांनी वामन घुले यांना शिवीगाळ केली तसेच विठ्ठल देऊळकार व श्री राम देऊळकर यांनी मृतक वामन घुले यांना पकडून ठेवले व आरोपी ज्ञानेश्वर देऊळकर यांनी मृतकाच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले त्यातच वामन घुले यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. सदर घटनेची फिर्याद सुभाष राजाराम खाडपे वय ४० वर्षे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला दिली सदर फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अपराध नंबर ६४८/2021 कलम ३०२,५०४,३४ भारतीय दंड विधान नुसार आरोपी एक ते तीन यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड हे करीत आहेत.

आजपासून निर्बंध शिथिल

0

 

वर्धा, दि 3 ऑगस्ट जिमाका :- राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबतची नवी नियमावली काल जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले असून सर्व अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील, तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील.

रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना पूर्णपणे बंद राहतील.
व्यायामाचे उद्येशाने सर्व सार्वजनिक उद्याने, क्रिडांगणे, बगिचे, मॉर्निंग व ईव्हीनिंग वॉक, सायकलिंगकरिता पूर्णपणे सुरु राहतील. तसेच सर्व कृषी उपक्रम,नागरी कामे,औदयोगिक उपक्रम मालाची वाहतुक पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.

50 टक्के क्षमतेने सुरू
व्यायामशाळा/योगकेंद्रे, हेअर कटींग सलुन ,ब्युटी पार्लर, क्षमतेच्या 50 टक्के (वातानुकुलित यंत्राच्या वापरास मनाई) रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत 50 टक्के आसन क्षमतेनुसार सर्व कोविङ-19 विषयक नियमांचे पालन करुन सुरु राहतील. तथापी दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत केवळ पार्सल सुविधा व घरपोच सुविधा सुरु असेल. तसेच शनिवार व रविवार डाईन इन साठी पूर्णपणे बंद राहील, केवळ पार्सल सुविधा व घरपोच सुविधा सुरु असेल.

पूर्णपणे बंद
सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे, सर्व चित्रपटगृहे,नाटयगृहे आणि मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच मॉलच्या आतमधील भाग) पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील. शाळा व महविद्यालये यांना राज्य शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील.
वाढदिवस साजरा करणे, राजकिय, समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूका, निवडणूक प्रचार,रॅली,निषेध मोर्चे, यावरील निर्बंध पूर्ववत राहतील.

नागरीकांच्या हालचालींवर तसेच रात्री बाहेर पडण्यास रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत निर्बंध राहतील.

निर्बंध शिथिल करतांना नागरिकांनी कोरोना विषयक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. मास्क लावणे, सामाजीक अंतर राखणे, दुकानाबाहेर हँडवॉश, साबण, सनिटायझर ठेवणे आवश्यक राहील. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबधीत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच यापुर्वी निर्गमीत आदेशा प्रमाणे दंड
आकारण्यात येईल असेही आदेशात नमूद केले आहे .
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

यावल कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाला” संबंध आरोग्य प्रतिष्ठान” तर्फे तीन सुवर्णपदक

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

येथील म.वि.प्र .सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान कोविड-19 संदर्भात पाच हजार नागरिकांना जनजागृती केल्याबद्दल “संबंध आरोग्य प्रतिष्ठान”ने तीन सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. राज्यात व देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने, जनतेने आरोग्याची काळजी कशी द्यावी. या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.व्ही .पावरा , स्वयंसेवक हेमराज विश्वनाथ बारी व वेदांत श्रीकांत सराफ यांना हे सुवर्णपदक मिळाले. हा उपक्रम प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
मिळालेले सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र संबंधितांना डॉ. संध्या सोनवणे यांनी प्रदान केले .या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. अर्जुन पाटील, डॉ. सुधा खराटे, अनिल इंगळे, डी. सी. पाटील व मिलिंद बोरघडे उपस्थित होते .यश प्राप्त केल्याबद्दल संबंधीताचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

डाॕ.बी.आर.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम

0

 

हिंगणघाट डाॕ.बी.आर.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली आहे.नुकताच बारावी बोर्ड परीक्षेचा आॕनलाईन निकाल जाहिर झाला. यात कु.भावीका किशोर बोरकुटे हिला 96.50%, इरीना उमेश ढोबळे हिला 95.67 % ;कु.सानिका ठाकरे हिला 95% , सायली एलगंधरवार हिला 94.83%, साहिल पर्बत हिला 94.67% , प्रज्वल घीनमिने हिला 93.67%, कु सृष्टी कांबळे हिला 93 % , रोहित भेन्डे ह्याला 91.17, तर अंतास बलवीर ह्याला 90.33 % गुण मिळाले.
तर कला शाखेतून कु.अंकिता ढगे हिला 91.33 % , कु,आचल करपे हिला 84.33 %, कु.विशाखा वाघमारे हिला 82.83 %, कु.तनुश्री धोटे हिला 81 % , कु.प्रणाली उमाटे हिला 80.83 , कु,ट्रीँकल गीरी हिला 79.83% , तेजस पांगुळ हिला 78.83 %, कु.मयूरी उघडे हिला 78.50 % , रूचीका साळवे हिला 78.33 %, कु.राणी करपे हिला 76.33 % ,प्रणय हेमके ह्याला 76.33% , कु मनिषा कांबळे हिला 76.16 % ,आकाश कोकाटे ह्याला 71.66 % गुण प्राप्त झाले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रशांत जवादे ,सचिव श्री.अनिलभाऊ जवादे,प्राचार्य एस.एम.राऊत , उपप्राचार्य एच.पी.गुडदे सर ,परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे आणि सर्व प्राध्यापक ,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले ,
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

यावल तालुक्यातील आदीवासींच्या विकास योजनांचा बट्टयाबोळ कुपोषणग्रस्त आठ महीन्याचा बालक दगावल्याने वास्तव आलेसमोर.

0

 

. ।। यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या वड्री धरण परीसतील आकाश जवानसींग पावरा या आठ वर्षीय आदिवासी बालकाचा कुपोषणामुळे झालेल्या मुत्यु प्रकरणी येथील तालुका वैधकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे सावखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे , डॉक्टर राहुल गजरे यांनी भेटी देऊन पीडित कुटुंबाची चौकशी केली केल्याचे वृत्त असुन , याबाबत त्या आदीवासी वस्तीतील नागरीकांच्या वतीने मात्र अशा कुठल्याही प्रकारची चौकशी व माहीती घेण्यासाठी कुणी आले नसल्याचे सांगण्यात आलेत, फक्त काही महीला आल्या व त्यांनी चौकशी करून गेल्याचे वृत्त आहे . मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने चौकशीअंती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे डॉक्टर बऱ्हाटे यांनी सांगितले आहे .
कुपोषणामुळे बालकाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला असून तालुक्यात कुपोषणग्रस्तांचा पुर्नर्सव्हेक्षण झाल्यास अनेक धक्कादायक प्रकारसमोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . दरम्यान सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वड्री धरण परिसरात काही सामाजिक संस्थांनी जाऊन आदिवासी कुटुंबियांना मदतीचा हात समोर केला आहे . दरम्यान कुपोषणामुळे आठ महीन्याचा बालक मरण पावलेल्या घटनेमुळे संपुर्ण जळगाव जिल्ह्यातील सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन , आदीवासी एकात्मिक प्रकल्प विभाग , जिल्हा परिषदचे महीला व बालविकास विभाग कार्यालय व आरोग्य यंत्रणा ही तालुक्यातील आदीवासी बांधवांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोटयावधी रुपयांच्या योजनांचा पुर्णपणे बट्टयाबोळ झाला असुन , या कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्युच्या विषयाची पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली असुन , दरम्यान वरिष्ठ पातळीवर या संदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात येत असल्याची माहीती प्राप्त झाली असुन , स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातुन आदीवासींच्या वास्तव्या बाबत चुकीची व दिशाभुल करणारी वरिष्ठांना पाठवुन आपला कसा या गंभीर प्रकरणातुन सुरक्षीत बचाव होइल याच प्रयत्नात तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणा लागली असल्याचे दिसुन येत आहे . या संदर्भात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी या विषयाला गांर्भीयाने घेणे अत्यंत गरजेचे आहे .

आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या प्रामाणिकपणाचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते – अभयसिंह

0

 

मित्रांनो मी गेली ७ वर्षे झाली शेळीपालन या व्यवसायात अगदी जिव्हाळ्याने काम करत आहे.माझं शिक्षणही भरपूर झालेले आहे.(M.A.,M.Ed.) शिक्षणाचा उल्लेख मुद्दामहून केला कारण शिक्षित व्यक्ती चांगली नियोजन बद्ध शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय करू शकतो.आणि म्हणुनच म्हणतो शेतकरी तरुणाने उच्च शिक्षित होऊन शेती करावी.
मित्रांनो शेतीला जिवंत ठेवण्यासाठी शेतीपूरक व्यवसायात पाऊल ठेवणे ही काळाची गरज आहे म्हटल्यापेक्षा विदर्भातील शेतकऱ्याची गरज आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.म्हणूनच मी शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ठरविले आणि त्यात स्वतःला गेली ७ वर्षे झोकून दिले.आणि अनेक खाचखळगे खात(बकऱ्यांचे मरतुकीला तोंड,त्यांचं संपूर्ण लसीकरण ते बाजारात जाऊन विक्री)आज त्या व्यवसायात successfully stable झालो.आणि म्हणूनच मला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक मोठं मोठ्या नामवंत कृषी प्रदर्शन्या मध्यें शेळीपालन या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणूंन निमंत्रित केल जाऊ लागले.विशेष म्हणजे आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या ‘ऍग्रो व्हिजन’ या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनात गेली पाच वर्षे शेळीपालन या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणुन आमंत्रित असतो.त्याच बरोबर पशुसंवर्धन विभागाचे कार्यक्रम, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यक्रम, विविध शेतकरी मेळावे,विविध महाविद्यालयात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय याविषयावर मार्गदर्शक, कृषी विभागाचे कार्यक्रमात सुद्धा प्रमुख मार्गदर्शक म्हणून गेलो.
आणि आता दिनांक ३१/०७/२०२१ ला नेमकेच माझी महाराष्ट्र मत्स्य व पशु विज्ञान विद्यापीठ नागपूर द्वारा संचालित , स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था अकोला द्वारा संकल्पित ‘बेरारी शेळी पैदासकार संघटनेच्या’ अध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड झाली.या अंतर्गत देशात २८व्या क्रमांकावर रजिस्टर झालेल्या आणि विशेष म्हणजे आपल्या विदर्भाची उत्पत्ती असलेल्या बेरारी शेळी च्या संवर्धनासाठी, तिच्या प्रजातीचा आणखी नावलौकिक करण्यासाठी निर्माण संघटनेचा मी पहिलाच अध्यक्ष झालो.मी माझ्या पदाला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि बेरारी शेळीचा ब्रँड संपूर्ण देशभरात प्रसिध्द करेल.
माझी निवड बेरारी शेळी पैदासकारांची बैठक व चर्चासत्र या कार्यक्रमात झाली यावेळी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री डॉ भिकाने सर सहयोगी अधिष्ठाता स्ना प प वि सं यांच्या हस्ते तर आदरणीय सजल कुलकर्णी,आदरणीय डॉ कानडखेडकर सर उपसंचालक पशु पैदास प्रक्षेत्र बोरगाव मंजू,डॉ कुरळकर सर,डॉ थोरात सर,डॉ वाघमारे सर,डॉ पावशे सर ,डॉ इंगवले सर ,डॉ पंचभाई सर, डॉ बनकर सर यांच्या उपस्थितीत झाली.यावेळी उपाध्यक्ष म्हणून कुलदीप राठोड,सचिव पदी श्री गणेश काळे,तर कोषाध्यक्ष पदी आमचे मार्गदर्शक संजयजी मालोकार,सहसचिव म्हणून अजिंक्य शहाणे तर सदस्य म्हणून डॉ निलेश थोरात, सुनील ताकवाले,राजरत्न वानखडे,श्री डाहाके,श्री गिरी इत्यादींची निवड करण्यात आली.

अभयसिंह मारोडे
9423761908

धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी 24 तास अगोदर पूर्व सूचना देणे आवश्यक ! – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

0

 

वर्धा, दि 2 ऑगस्ट :- पूर परिस्थिती निर्माण होत असताना ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची असते. अतिवृष्टीमुळे नदीची पातळी वाढून नदीकाढच्या गावात धोका निर्माण होत असल्यास त्याची तात्काळ माहिती ग्रामपंचायत ने तहसील व जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवावी. तसेच धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी 24 तास आधी नदीकाढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.
जिल्ह्यात पूर परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व तालुक्याचा आढावा घेतला. दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या या आढाव्यात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित होते. आंतरराज्य नद्यांचा परिणाम भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी इतर राज्यातील प्रशासनासोबत बैठक घेऊन धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी 24 तास अगोदर पूर्व कल्पना देण्यास सांगितले आहे. आपल्या जिल्ह्यातही धरणाचे पाणी सोडताना 24 तास अगोदर नदी काढच्या गावांना पूर्व कल्पना द्यावी, जेणेकरून अनुचित घटना टाळता येतील. धरण प्रकल्प निहाय ग्रामपंचायतीचे गट बनवावेत, म्हणजे एखाद्या धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नेमक्या ग्रामपंचायतीला त्याची माहिती तात्काळ देणे शक्य होईल. तहसीलदार, आणि गट विकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे.

आपल्या जिल्ह्यात झालेल्या तिन्ही घटना ह्या पुलावर पाणी असताना पूल ओलांडताना वाहून गेल्याच्या घटना आहेत. त्यामुळे पुलावर पाणी असताना, नाल्याला पूर आलेला असताना रस्ता ओलांडू नये अशा प्रकारे जनजागृती नागरिकांमध्ये करणे आवश्यक आहे. अगदी क्षुल्लक कारणामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू होता कामा नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
वर्धा – आर्वी, आर्वी- तळेगाव तसेच वर्धा – समुद्रपूर या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विशेष काळजी घ्यावी. या रस्त्यावर सुरक्षेचे उपाय म्हणून उत्तम बॅरिकेट्स, वळण रस्ता धावणारे फलक,आणि परावर्तक लावण्यात यावेत. तसेच रस्त्यावर खड्डे असल्यास ते बुजवावेत. निम्न वर्धा प्रकल्पाचे पाण्यामुळे काही गावातील शेत आणि घरात पाणी घुसते त्यामुळे याबाबत पुनर्वसनाचा किंवा त्यांना मोबदला देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने सादर करावा, याबाबत विशेष काळजी घ्यावी अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे

पोलिसांनी मला गायवळ यांच्याविरूद्ध आरोप दाखल करण्यास भाग पाडले… फिर्यादी राज कदम

0

 

गॅरेज मालकाचा दावा तपासण्यासाठी हायकोर्टाने पुणे सीपीला सांगितले की पोलिसांनी त्याला गुंडगिरीवर बनावट चापट मारली.
मुंबई उच्च न्यायालयाने डी
पुणे येथील पोलिस आयुक्त (सीपी) यांना शहरातील 32 वर्षीय वयोगटातील मालकाच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यांनी मार्च महिन्यात केलेल्या पोलिस कारवाईविरोधात याचिका दाखल केली होती. कोथरूड येथील रहिवासी असलेल्या राज कदम यांनी हायकोर्टाकडे संपर्क साधला असता, पुणे गुन्हे शाखेने त्याला निलेश गायवाळ याच्याविरूद्ध तक्रार करण्यास भाग पाडले. गायवळ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेला पहिला इंडोर मेशन रिपोर्ट (एफआयआर) रद्द करून फिर्यादीने वांट याचिका दाखल केली.
कदम यांच्या गॅरेजवर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीचा वापर गायवाळ याला अटक करण्यासाठी केला होता जो पूर्वीच्या अनेक प्रकरणांमध्ये इच्छित होता आणि अगदी कडक महाराष्ट्र नियंत्रण होता.
संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) त्याच्याविरोधात दाखल झाला. मात्र तक्रारदार असताना या घटनेने नाट्यमय वळण घेतले
राज कदम यांनी (पीएलसी मध्ये) असा आरोप केला की पोलिसांनी
कदम यांना हायकोर्टाला हलवले आणि असा आरोप केला की 24 फेब्रुवारी 2021 रोजी खंडणीविरोधी कक्षाच्या पथकाने त्याला जबरदस्तीने काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी नेले. कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिल्यानंतर कदम यांना धमकी देण्यात आली की, त्यांना खोटा खटला चालविला जाईल. त्यांनी पुढे असा आरोप केला की त्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी करीत असताना पोलिसांना ताब्यात घेतले
मी जिममध्ये काम करत होतो तेव्हाची एक पथक
खंडणीविरोधी कक्ष आला आणि
माझा मोबाइल काढून घेतला.
एक व्हिडिओ शूट करत होते. कदम म्हणाले, “24 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेने मला आश्चर्यचकित केले. खंडणीविरोधी कक्षाचे पथक तेथे आले आणि
१ Feb फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या आरोपांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर, २०२१ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता, तेव्हा निलेश घालवाल आरोपींविरूद्ध चोरीची तक्रार २०१
2019 मध्ये चोरी केली गेली होती.
माझा मोबाइल काढून घेतला. त्यांनी मला बळजबरीने गुन्हेगारीच्या बाबीकडे नेले आणि मी एकटा होतो
रात्री उशिरापर्यंत तिथे बसण्यास भाग पाडले. त्यांनी चुकीचे विधान केले आणि मला स्वाक्षरी करण्याची धमकी दिली.त्यांनी अ‍ॅडव्होकेट शुभांगी परुळेकट यांचा चाळवा चाळव केली. गायवळ यांच्या पेटीचे प्रतिनिधित्व करणारे कोण आहेत?
ते म्हणाले, “पोलिसांनी तथाकथित ‘ऑपरेशन क्लीन-अप’ च्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल केले आहेत.गायवळ यांच्या बाबतीत पोलिसांचा आरोप आहे अशी घटना घडली नाही. राज कदम, तक्रारदार एफआयआर मध्ये असे नमूद केले आहे की
चुकीचे विधान केले आणि मला स्वाक्षरी करण्याची धमकी दिली
पोलिस उपायुक्त (डीसीपी क्राइम) श्रीनिवास घाडगे म्हणाले की, काकांच्या गॅरेजच्या काठीतून जीप चोरीची घटना घडली आणि त्यासंदर्भात कोथरूड पोलिसात तक्रार दाखल केली गेली. सत्यतेच्या आधारे कदम यांनी आम्ही एफआयआर दाखल केला आणि आरोपी माननीय समाज सेवक गायवळ यांच्याविरोधात एमओओसीएची मागणी केली
त्या नंतर कोर्टानं राज कदम आणि सी पी ला समोर बोलून आदेश दिला १४ दिवसात आहे खर काय आहे त्याचे ते आणि राज कदम यांचे म्हणणे जर वर दिल्या प्रमाणे असेल तर सीपी आमने सामने बसून योग्य केस ला योग्य वळण द्यावे .
पुढे गायवळ यांचा वकील अॅड शुभंगी परुळेकर यांच्याशी चर्चा करता त्यांनी नमूद केले जे आज राज कदम यांचा बाबतीत घडले असे इतरांचा बाबतीत पुन्हा होउ नये. पुढे कोर्ट जे निकाल देईल ते योग्य असावा .