Home Blog Page 432

अपघाती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे ।

कल्पना अनिल सोनवणे (वय-३९) रा. यावल असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिल लिलाधार सोनवणे रा.व्यास नगर, यावल हे आपल्या पत्नी कल्पना अनिल सोनवणे (वय-३९) ह्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. आज सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने पती अनिल सोनवणे यांच्यासोबत (एमएच १९ बीएच ५८६५) ने कामावरून यावल येथे येत असतांना चितोडा-यावल गावादरम्यानच्या रस्त्यावर त्यांच्या गळ्यातील स्कार्प अचानक दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला. त्यामुळे कल्पना सोनवणे ह्या जमीनवर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी मयत घोषीत केले.

मयत पावलेल्या कल्पना सोनवणे आणी त्यांचे पती अनिल सोनवणे हे दोघ ही डोंगर कठोरा येथे मागील दहा वर्षापासुन शासकीय नोकरीस आहेत. त्यामुळे दोघे पतीपत्नी नियमित डोंगरकठोरा ते यावल आपल्या दुचाकी वाहनाने ये जा करत होते. अपघाताचे वृत्त कळताच माजी जिल्हा परिषद हर्षल पाटील, सामाजीक कार्यकर्ते सलीम तडवी, भाजपा उदय बाविस्कर, पिन्टु राणे, डोंगरकठोरा सरपंच नवाज तडवी, उपसपंचन धनराज पाटील, नितीन भिरूड आदी रुग्णालयात मदतीसाठी धाव घेतली.

कामगार नेते डॉ.उमेश वावरे यांनी दिला निवेदनातून इशारा

0

 

हिंगणघाट डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात कामगाराचे एक दिवसीय धरने आदोलन
आम्ही 14 जून रोजी मिल कामगार च्या मागणी करिता जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले .त्या वर काही, तोडगा न निघालाने पुन्हा आम्ही 5 जुलै ला एक निवेदन दिले.
परंतु आता पर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही म्हणून आम्ही सर्व मिल कामगार 2आगस्ट रोजी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यानच्या समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करीत आहो.
तरी शासनाने या मध्ये तडजोड करून
मिल पूर्वरत सुरू करावा व कामगाराचे थकीत वेतन दावे.
किंवा शासनाने मिल स्वता चालवून कामगाराचे संपूर्ण देणे आहे हे त्वरीत करावे.
या मागणी साठी आम्ही अनेकदा निवेदन व वेळोवेळी पाठपुरावा केला आहे .परंतु त्यावर कायमस्वरूपी काही तोडगा निघाला नाही .
तरी यावर 8 दिससाच्या आत तोडगा नाही निघाला ? तर
उग्रस्वरूपाचे आदोलन करण्यात येईल अशा ईशारा देण्यात व या करीता प्रशासन स्वतः जवाबदार राहील.ताबडतोब याची दखल घ्यावी. डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्व मा. चन्द्रभान खंडाईत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिप कहूरके. जिवन उरकुडे. चारू आटे. प्रणय पाटील.अविनाश नवरखेले. जितेंद्र शेजवाल.श्याम इडपवार. अरुण काळे.रत्नाकर कुभारे. विलास ढोबळे .सचिन खाडरे .नितिन कानकाटे.पोषक लाडे.सुभाष महादेव. दुर्गादास मानकर.योगेश जंगले. बबन बेलखडे.कवडू कळबे.
मारोती कोहपरे.किशोर कडवे.राजेश खानकूरे. शरद मुळे. शंकर नगराळे. भारत भगत.रजितसीग ठाकुर. विनोद ठाकरे. प्रविण झाडे.हेमत शेळके. मनोहर काळे.बालाजी घुसे.विशाल थुल. नुतन राठोड सर्व कामगार उपस्थित होते.. सूर्या
मराठी न्यूज साठी सचिन वाघे हिंगणघाट

वणा नदित वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला

0

 

हिंगणघाट शहरातील विवेकानंद वार्ड येथील रहिवासी नरेश विठ्ठलराव वानखेड़े(४८) हा भोई समाजाचा इसम दि.२९ जुलै रोजी वणा नदीतील स्मशानेश्वर महादेव परिसरातुन वाहुन गेला होता.आज दि.२ रोजी त्याचा वणा नदी रेल्वेपुला जवळ मृतदेह सापडला.
पोलिस व महसुल प्रशासनाने शोध घेऊनही सदर इसमाचा शोध लागला नव्हता, स्थानिक भोई समाजाचे युवकांनीही यासाठी यासाठी ४ दिवस प्रयत्न केले होते,परंतु प्रशासन हतबल झाल्यानंतर यासाठी स्थानिक आमदार समिर कुणावार यांनी विशेष प्रयत्न करुन एनडीआरएफ चमुला पाचारण केले,यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा मदत केली.
घरी आलेल्या पाहूणयांसाठी पाहुणचार करण्यासाठी मासेमारी करतांना सदर इसमास आपला प्राण गमवावा लागला,यामुळे वानखेड़े कुटुंबियांवर मोठा आघात झाला,मृतकाच्या मागे दोन मुले,एक मुलगी,पत्नी असा आप्तपरिवार आहे.
आमदार समिर कुणावार यांचे पुढाकाराने काल १ रोजी एनडीआरएफची नागपुर येथील चमु शहरात दाखल झाली, या चमुचे निरीक्षक कृपाल मुडे यांचे मार्गदर्शनाखाली आज आखलेल्या शोधमोहिमेत सकाळी ६ वाजताचे दरम्यान सदर इसमाच्या मृतदेहाचा शोध लागला,वेणा नदिवर रेल्वे पुलाचे जवळपासच मृतदेह उन्हाळ्यात तात्पुरत्या स्वरुपात मोठे सीमेंट पाइप टाकून रस्ता करण्यात आला होता,नदीच्या प्रवाहात वाहुन गेलेल्या या इसमाचा मृतदेह या पाइपजवळ साचलेल्या काटेरी झुड़पात फसुन होता.
सदर मृतदेह हाती लागताच आमदार समिर कुणावार,तहसीलदार श्रीराम मुंदड़ा,मुख्याधिकारी अनिल जगताप,ठाणेदार संपत चव्हाण व चमु घटनास्थळी पोचली.
यावेळी प्रभागाचे नगरसेवक धनंजय बकाने,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी युवा कार्यकर्ते दिपक चौधरी,हिरामण मोरे,संदीप आमगे,भोला नींभरे,कमलाकर वाघ,प्रशांत लांडगे,प्रविण उपासे इत्यादि हजर होते.
सदर मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. सुर्या मराठी न्यूज़ साठी सचिन वाघे हिंगणघाट ,वर्धा

पवनी अल्लीपुर येथील लहुजीशक्ती सेना च्या वतीने थोर समाजसुधारक लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट तालुक्यातील पवनी अल्लीपुर येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने थोर समाजसुधारक लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्त साहित्य रत्न थोर समाजसुधारक लोकशाहिर कादंबरीकार अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती ला अध्यक्ष स्थानी श्रावणजी बावणे समाज सेवक होते
प्रमुख पाहुणे म्हणून बापुराव गवळी समाज संघटक जागेश्र्वर गवळी लहुजी शक्ती सेना हिंगणघाट तालुका अध्यक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरवातीला अध्यक्ष श्रावणजी बावणे यांनी दिप प्रज्वलन करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.लोकशाहीर थोर समाजसुधारक लेखक कादंबरीकार यांनी दलित पिडीत समाजासाठी लोकशाहीरीतुन समाजीक समता बंधुता आणि समानतेच्या तत्त्वावर आधारित बर्याच कादंबरी लिहल्या असे भावनिक मत अध्यक्ष यांनी व्यक्त केले या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन बंडुभाऊ गवळी लहुजी शक्ती सेना हिंगणघाट तालुका सचिव व आकाश गवळी यांनी केले.जयंती दिशांचे सुत्र संचालन गजानन खंडारे कानांवर सर्कल अध्यक्ष यांनी केले गावातील आशिष कापसे, उपसरपंच ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मासुमकर दिवाकर वांदिले प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद जानकर
माजी सरपंच विठ्ठल वाघमारे, संतोष वानखेडे, संजय गवळी संजय गवळी शाखा अध्यक्ष , कैलाश खंडारे आशिष गवळी सतीश बावणे युवा अध्यक्ष अतुल बांधणे विलास बावणे तेजु शरकी संदिप गायकवाड साहील बांधणे प्रतिक गवळी विकास गायकवाड दिलीप पोटफोडे गोलु पवार गावातील गणमान्य गावातील सर्व समाजातील महीला व पुरुष , लहुजी शक्ती सेने चे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहित्यरत्न थोर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त डी. जे. ग्रुप महाराष्ट्र राज्य व पंचशील ग्रुप आर्वी च्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा उपक्रमा अंतर्गत अभिवादन.

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी  प्रज्वल यावले

आज दि. ०१/०८/२१ ला डी. जे. ग्रुप महाराष्ट्र राज्य व न्यू बॉईज पंचशील ग्रुप आर्वी च्या वतीने थोर साहित्यरत्न शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सूरज घ. मेहरे व दर्पण प. टोकसे यांच्या नेतृत्वखालील आर्वी शहरात वाल्मीक वार्ड, मायबाई वार्ड, रेल्वे स्टेशन, कन्नोमार नगर , अंतरडोव पुनर्वसन, पिंपळा पुनर्वसन आणखी बऱ्याच ठिक ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम राबवण्यात आला व थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले….
दीपक भाऊ ढोणे, विलास भाऊ बेंडे, विशाल बडगे, अभी भीवगडे,अरुण लांडगे योगेश बावणे, अनिल माहुरे, मनवरे काका, दुर्गेश वाघमारे, संजय डोंगरे, मनोज वानखेडे, अनिल पखाले, संघम वानखेडे, अनिकेत शिघाने, व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .. .

हिंगणघाट गौतम वार्ड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 1 ऑगस्ट
हिंगणघाट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्य गौतम वॉर्ड येथे मातंग समाज मंदिर येथे मनसे जिल्हाअध्यक्ष अतुल वांदिले यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.

सुनगाव शेतशिवारात आदिवासी शेतमजुराचा मृतदेह सापडला विहिरीत / मृत्यु संशयास्पद..

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक एक ऑगस्ट रोजी संतोष राठी यांच्या शेतशिवारातील विहिरीमध्ये त्यांच्या शेतात कामाला असलेला शेतमजूर नामे तेरसिंग मनुसिंग गोचऱ्या याचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली सदर मृतक इसम हा संतोष राठी यांच्या शेतामध्ये आपल्या छोट्याशा कुटुंबासह राहत होता तो संतोष राठी यांच्या शेतातच शेतमजुरी करीत होता.आज सकाळी दिलीप राठी शेतामध्ये चक्कर मारण्याकरिता आले असता त्या ठिकाणी मृतक तेरसिंग गोचऱ्या हा त्याच्या कुटुंबासह शेतात मिळून आला नाही दिलीप राठी यांनी शेतात फिरून पाहणी केली असता तो मिळून आला नाही दिलीप राठी यांनी शेतामधील विहिरीला किती पाणी आहे हे पाहण्याकरिता विहिरीत डोकावले असता त्यांना काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसले त्यांनी निरीक्षण केले असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. त्या ठिकाणी कोणी नसल्याचे पाहताच दिलीप राठी ही दुसरीकडे असलेल्या त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असता तीर सिंग कहा पे है और उसकी लाडी और बच्चे कहा पे है असे बोलले असता मृतक तेरसिंग ची पत्नी गीता ही आपल्या नातेवाईकांसह संतोष राठी यांच्या शेतात गेले असता त्यांनी व्हेरी डोकावून पाहिले असता त्यांना मृतक तेरसिंग याचे प्रेत विहिरीत तरंगत असल्याचे दिसून आले व तो तेरसिंग ही है असे बोलले असता तसेच तेरसिंग याची पत्नी गीता हिने जळगाव पोलीस स्टेशन गाठले व पती विहिरीत पडल्याची फिर्याद दिली फिर्यादीच्या रिपोर्ट वरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन ने मर्ग दाखल करून घेतला मर्ग नंबर ५४/२०२१ कलम 174 नुसार दाखल करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात ए एस आय शेषराव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस कॉन्स्टेबल गवई यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सदर मृतकाचे प्रेत जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनास पाठविले. सदर मृतक तेरसिंग गोचऱ्या याने आत्महत्या केली की काही त्याच्यासोबत घातपात झाला असा संशय येत आहे. पुढील तपास बिट जमदार अशोक वावगे करित आहेत

महावितरणच्या उपव्यस्थापक सुभाष चक्रे निरोप समारंभ

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती- उपव्यस्थापक श्री.सुभाष  चक्रे यांना दिनांक ३०/७ /२०२१ प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे अभियंता ग्रामीण विभाग कार्यालय अमरावती व इतर भागात
जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून सर्व सामान्य माणसाला चांगले सेवा दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता मा.अनिरुध्द आलेगावकर होते या निरोप समारंभाचे सत्कार मुर्ती अभियंता सुभाष चक्रे व सौ.चक्रे
मॅडम यानां शाल व श्रीफळ देऊन सत्कार करुण आपल्या भाषणात श्री चक्रेसाहेबा बद्दल त्यांचे कामांचे कौतुक केले व अभियंता सुभाष चक्रे यांना पुढील कामाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी महावितरण मधील कार्यरत अनेक संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते श्री सुभाष चक्रे साहेबांच व्यत्कीमहत्व हे महत्वाचे पदावर असताना सुद्धा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यानां योग्य न्याय
दिला गेला पाहिजे कोणावरही अन्याय होता
कामा नये अशी भूमिका सेवा निवृत्त होई पर्यंत सेवा दिली.

मिल कामगारांच्या समस्या घेऊन कामगार नेते डॉ. उमेश वावरे यांचे नेतृत्वात धरणे आंदोलन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 2 आगस्ट ला मोहता मिल कामगारांच्या मागणा घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यलयासमोर 1 दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे .

सावता परिषदेच्या वतीने फेसबुक लाईव्ह प्रवचनमाला

0

 

सिलोड प्रतिनिधी सागर जैवाळ

संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचा जागर करण्यासाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या संकल्पनेतून सात दिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आल्याची माहिती सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू उबाळे (मामा) व महिला जिल्हाअध्यक्ष मंजूषा ताई महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
संतशिरोमनी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा सर्वत्र मोठया व्यापक प्रमाणावर साजरा होत असतो. तथापि, मागील दोन वर्षांपासून कोव्हीडच्या कठोर निर्बंधामुळे जाहीर स्वरूपाचे उपक्रम अथवा उत्सव घेता येत नाहीत. मात्र अशाही परिस्थितीत सावता महाराजांच्या जीवन चरित्राचा जागर झाला पाहिजे. त्यांच्या विचार-आचार आणि कार्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या फेसबुक लाईव्ह प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सावता परिषद फेसबुक पेजवरून दि.१ ऑगस्ट रोजी गायनाचार्य ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे (बारामती), दि.२ ऑगस्ट रोजी विनोदाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे(नेवासा), दि.३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुनीताताई महाराज आंधळे(आळंदी), दि.४ ऑगस्ट रोजी किर्तनकेसरी ह.भ.प. प्रा. सागर महाराज बोराटे(नातेपुते), दि.५ ऑगस्ट रोजी भाषाप्रभु ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील(भिवंडी), दि.६ ऑगस्ट रोजी समाजप्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी(नंदुरबार), दि.७ ऑगस्ट रोजी प्रेममुर्ती ह.भ.प. समाधान महाराज शर्मा(केज) या महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार मंडळींचे सावता महाराजांच्या अभंगावर रोज सांयकाळी ७ ते ८ या वेळेत प्रवचने होणार आहेत.
शनिवार दि.७ ऑगस्ट रोजी सावता महाराजांच्या पुण्यतिथीदिनी सकाळी ११ वा. सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. दत्तात्रय मामा भरणे शुभेच्छा संदेश देणार आहेत. सावता महाराजांच्या संजीवन समाधीचे लाईव्ह दर्शन ठिक ११.३० वाजता तर दुपारी ठीक १२ वा. भजनसम्राट ह.भ.प. सदानंद महाराज मगर(पैठण) यांच्या स्वरांनंद कला अकॅडमी प्रस्तुत संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.प्रा. प्रभू महाराज माळी हे करणार आहे
तरी या फेसबुक लाईव्हद्वारे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे असे अवाहन सावता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष जगदीश बुलबुले व युवा जिल्हाध्यक्ष सागर जैवळ ,जिल्हा कार्यअध्यक्ष प्रमोद गायके यांनी केले आहे.