Home Blog Page 433

धानोरा गावातील पूर्णा नदीतील वाळु चोरी झपाट्याने — सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांची मागणी

0

 

सागर जैवाळ सिल्लोड प्रतिनिधि

होत आहे व धानोरा फाटा ते धानोरा रस्त्याची दुरव्यवस्था झाली आहे याला कारणीभूत सिल्लोड वरून अनेक टिप्पर येतात आणि वाळु चोरी करून नेतात यामूळे धानोरा फाटा ते धानोरा रस्ता अतिशय खराब झाला आहे याकडे धानोरा ग्रामपंचायत व लोक प्रतिनिधि व महसूल विभाग व पोलीस प्रशासन आणि गावातील पोलीस पाटील दुर्लक्ष करीत आहे तरी त्वरीत वाळु ऊपसा थांबवावा अशी सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे यांची मागणी

सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड कन्नड रस्त्यावर असलेल्या धानोरा फाटा ते धानोरा गाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संबंधित ग्रामपंचायत चे दुर्लक्ष करत आहे. तालुक्यातील धानोरा हे गाव सिल्लोड कन्नड रस्त्यावर असून या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.मात्र येथील रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते झाली आहे. . गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू होणार होते,अद्यापही काम सुरु झाले नाहि सध्या पावसाळा सुरू असल्याने थोडा जरी पाऊस झाला या रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे डबके साचतात. त्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर कित्येक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात.त्यामुळे धानोरा फाटा ते धानोरा हा रस्ता वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनला आहे. संबंधित विभागाने या रस्त्याला कामाला मंजुरी देऊन सुद्धा या रस्त्याचे काम सुरू का झाले नाही ?????

वड्री जवळ आदिवासी वस्तीवर राहणाऱ्या कुपोषीत बालकाचा मृत्यू; वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांचा दुजोरा

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील वड्री जवळच्या आदिवासी वस्तीवर राहणार्‍या एका आठ महिन्याच्या कुपोषित बालकाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज शनिवार ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. यावृत्ताला यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला यांनी दुजोरा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील वड्री धरण येथील आदिवासी वस्तीमधील आकाश जवानसिंग पावरा (वय-आठ महिने) हा बालक गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. आज शनिवार ३१ जुलै रोजी पहाटे सहा वाजता त्याची प्रकृती अत्यंत खालावली. त्यामुळे त्याला त्याच्या पालकांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. ग्रामीण रूग्णालयात डॉ. अक्षय नालगे यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली असता बालक कुपोषीत असून त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. त्याला श्वास घेण्यासही खूप अडचणी येत होत्या असे त्यांना आढळून आले. परिणामी वैद्यकीय अधिकारी यांनी बालकाला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले.

या अनुषंगाने शासकीय रूग्ण वाहिकेने बालकाला सकाळी १० वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बालकाला येथील बालरोग तज्ञ डॉ. अतूल गाजरे यांनी तपासणी केली. यातच बालकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी बालकाच्या मृतदेहावर शवविच्छेदन केले. दरम्यान, तालुक्यातील कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी दुजोरा दिला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे यावल येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १३ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत कुपोषणग्रस्त बालकांची आकडेवारी विचारली होती. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकासच्या प्रभारी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची अक्षरश: भंबेरी उडाली होती. यावल तालुक्यातील ३१६ कुपोषणग्रस्त तर ३९ बालके कमी जास्त वजनाची बालके असल्याचे समोर आले होते. ही आकडेवारी पाहून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दोन्ही अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. यानंतर आज तालुक्यात कुपोषीत बालकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागले आहे.

चिंचळा तर्फे मित्रता दिनाच्या झाड लावून शुभेच्छा .

0

 

झाडे ही पृथ्वीवरील मौल्यवान नैसर्गिक संसाधने आहेत. आपण झाडांना इजा करु नये आणि झाडे आणि जंगले तोडणे थांबवावे. हे वायू प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग आणि दुष्काळ यासारख्या बर्‍याच प्रदूषणांना कमी करण्यात मदत करेल. आपण आपल्या आसपासच्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्यांचे काळजीपूर्वक संवर्धन केले पाहिजे. झाडे ही देवाने दिलेली अनमोल भेट आहे. माणूस आणि प्राणी दोघांनाही झाडांपासून अनेक गोष्टी मिळतात. वृक्ष लागवड ही जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे परंतु बर्‍याच लोकांना झाडाचे महत्त्व कळत नाही. झाडे आमचे जिवलग मित्र आहेत. आपण आनंदी किंवा दु:खी असो, झाडे नेहमीच आपल्यासाठी उपयुक्त असतात. लोक झाडांच्या मदतीने जगतात, झाडे चांगली हवा देतात, पाऊस पुरवतात. पावसाशिवाय पाणी, पिके होणार नाहीत. म्हणून मानवी जीवनासाठी झाडे आवश्यक आहेत. झाडांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. आज बरेच लोक झाडे नष्ट करतात जे शहाणे लोक नाहीत. त्यांना भविष्याचा विचार नाही. झाडांशिवाय आपली पृथ्वी वाळवंट होईल. बरेच लोक पैसे मिळवण्यासाठी झाडे तोडतात. केवळ झाडांचे आयुष्यच नाही तर प्रत्येकाचे आयुष्यही नष्ट होईल. बर्‍याच देशांमध्ये झाडे तोडण्यास बंदी आहे. झाडे तोडणाऱ्या आणि त्यांना नुकसान पोहोचविणाऱ्यांविरोधात मोठी पावले उचलली पाहिजेत. वृक्षांच्या महत्त्वविषयी जनजागृती लोकांमध्ये व्हायला हवी.

समीर सोनोने के नेतृत्व में टीम महाराष्ट्र पहुंची उदयपुर

0

 

रूरल गेम्स चैंपियनशिप प्रतियोगिता में सहभागी हो रही टीम महाराष्ट्र

अकोला प्रतिनिधि

यूथ रूरल गेम्स असोसिएशन राजस्थान द्वारा उदयपुर में आयोजित रूरल गेम्स नैशनल चैंपियनशिप 2021 में सहभागी होने टीम महाराष्ट्र समीर अनिल सोनोने के नेतृत्व में उदयपुर पहुची है . 29 30 31 जुलाई तीनदिवसीय प्रतियोगिता में आउटडोर और इनडोर दोनों तरहा के खेल होने है . इस नैशनल चैंपियनशिप में देश भर के खिलाड़ी सहभागी होने जा रहे है . अकोला से टीम महाराष्ट्र के खिलाड़ी समीर अनिल सोनोने के नेतृत्व में सहभागी हुए है .

सुनगाव येथे युवकांनी वाचविले विहिरीत पडलेल्या व गोमातेचे प्राण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव
जा

तालुक्यातील सुनगाव येथील वावडी हर्दो शिवारातील प्रेमसिंग पवार यांच्या शेतात आज बाजूला गाय चरतर असताना बाजूला असलेल्या नव्वद फूट विहिरीमध्ये अचानक पडली व तो आवाज येताच बाजूला काम करीत असलेले ज्ञानेश्वर कपले दगडू धुळे व योगेश मिसाळ हे युवक विहिरीकडे धावले ही एकच गडबड पाहता शेतात काम करीत असलेले आदिवासी बांधव सुद्धा विहिरीकडे धावले व ज्ञानेश्वर कपले आणि योगेश मिसाळ यांनी तात्काळ दोर चराटआणून जीवाची पर्वा न करता विहिरीमध्ये उतरले वीहिरीला 30 ते 35 फूट पाणी होते परंतु वेळीच दक्षता घेतल्याने मातेसमान असलेल्या व गोमातेचे प्राण वाचविण्यात या युवकांना यश आले तरी जीवाची परवा न करता या युवकांनी दक्षता दाखवून या गोमातेचे प्राण वाचविले त्यामुळे सुनगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे

जळगाव जामोद येथे कृषिदूतांची कार्यशाळा

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा.तालुका प्रतिनिधी:-

लॉकडॉऊनमध्ये सर्व शैक्षणिक आस्थापने, शाळा, महाविद्यालय बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे देखील वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कार्य चालू आहे. याच पाश्र्वभूमीवर स्वा. वि. गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन कार्यशाळा आयोजित केली. यादरम्यान विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती, तांत्रिक शेती तसेच जैविक शेती याबाबत माहिती पटवून दिली . सदर कार्यशाळा सदन कास्तकार समाधानभाऊ बगाडे यांच्या बांधावर घेण्यात आली. या कार्यशाळेचे आयोजन साक्षी इंगळे, वैष्णवी आटोळे,प्रगती मुळतकर, सोमल घोगरे या विद्यार्थ्यांनि केलें.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उद्यानविद्या महाविद्यालयातिल प्राचार्य वाय आर गवई सर, उपप्राचार्य एस एस धर्माळ सर,ए डी सुने सर , जे आर साळी सर व समुपदेशक पी एस वानखडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

चुंचाळे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिपक कोळी तर उपाध्यक्षपदी तुकमान तडवी यांची निवड करण्यात आली

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य दिपक कोळी तर उपाध्यक्षपदी लुकमान तडवी यांची निवड करण्यात आली आहे .
चुंचाळे तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ नुकताच संपल्यामुळे कोराना संसर्गाचा प्रभाव लक्षात घेत टप्याटप्याने पालक सभेतून सदस्य निवड करण्यात आली व दिनांक ३१ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली त्यात अध्यक्षपदी दिपक कोळी यांना ११ पैकी ९ मते मिळाली त्यांना शाळेचे मुख्यध्यापक गिरीष सपकाळे यांनी विजयी घोषीत करत अध्यक्षपदी निवड केली तर लुकमान तडवी यांची उपाध्यंक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडीला समितीचे मावळत्या अध्यक्ष जरीना तडवी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या , यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे शाल व श्रीफळ देऊन चुंचाळे तंटा मुक्ती अध्यक्ष धनसिंग राजपुत यांनी सत्कार केला नवनिर्वाचीत सदस्य माधुरी मिथून गजरे,राजश्री सुकदेव पाटील,सोनाली योगेश पाटील,रजीया महेबुब तडवी,आरीफा इरफान तडवी,अशोक मधुकर धनगर,सुरेश आत्माराम पाटील,नथ्थु फत्तु तडवी,अमिर अजीत तडवी यांची निवड करण्यात आली यावेळी इतबार तडवी,भिका तडवी,पप्पु पाटील,रहिमान तडवी,योगेश पाटील,सुकदेव पाटील,इरफान तडवी,मिथून गजरे उपस्थित होते निवडणुक प्रक्रियेसाठी मुख्यध्यापक गिरीष सपकाळे यांनी काम पाहिले तर मंजित तडवी,सुरेखा त्रिपाटी,राहुल वाणी,राजु सोनवणे यांनी सहकार्य केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री दीपक कोळी यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता शालेय भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांना विसिद्ध शालेय सुविधा पुरविण्याचा सुद्धा त्यांनी मानस व्यक्त केला

 

 

अखेर सत्य जिंकले भ्रष्टाचारा खतपाणी देणाऱ्या ग्रामसेवकाची बदली ग्रामपंचायत रूपी वडाला आलेल्या बांडगुळाचे पोषण कसे होणार.?

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत येथील वादग्रस्त ग्रामसेवकाची अखेर बदली करण्यात आल्याची माहीती पंचायत समितीच्या सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे दरम्यान ही बदली त्या ग्रामसेवकाचे नायगाव येथील कार्यकाळ संपल्याने त्यांची तालुकाअंतर्गत साकळी ग्रामपंचायती प्रशासकीय पातळीवर बदली झाल्याचे कळते , या संदर्भातील वृत्त असे की नायगाव येथे १६ फ्रेब्रुवारी २०१६ ला ग्रामसेवक म्हणुन पी पी सेंदाणे हे नायगाव ग्रामपंचायतीला हजर झाले होते. हजर होताच त्यांनी काही मंडळी स हाताशी धरून मनमानी कारभार सुरु केला. आजपर्यंत त्यांनी नायगाव ग्रामपंचायतीला सर्व बाजुने धुवून खाल्ले नायगाव च्या विकासात खिळ घातली. या सर्वात गंभीर विषय म्हणजे आर्थिक स्वार्थापोटी गावातील मतदारांना सोडून बाहेरगावाहून आलेल्याना परप्रांतांच्या नांवावर घरकुल मंजुर करून दिले गेले या संदर्भात तक्रारी झाल्यावर देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही यावल पंचायत समितीच्या दिसुन आती नाही . दरम्यान हा सर्व प्रकार पाहुन ही मंडळी गप्प का होती. याचा अर्थ काय समजावा.आताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही पारदर्शकता व स्वाभीमान जपणारे सदस्य निवडून आले आणि त्यांनी या सर्व आर्थीक गोंधळाचा आवाज उठवून गैरकारभारा विरुद्ध गटविकास अधिकारी , सिईओ. ग्रामविकास मंत्रालय पर्यंत तक्रारी केल्या. आवाज उठवला.पण तरीही या महाशयांना वाचवण्यासाठी, ज्यांना या पासून फायदा होता असे महानग ग्रामसेवकाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पण शेवटी सत्य जिंकले. सत्याचा विजय झाला. फक्त बदलीने समाधान न मानता यांची चौकशी होवून शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून असे धाडस पुन्हा कोणी ही करणार नाहीत अशी संत्पत भावना ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
आता गावातील तरूण, उच्च शिक्षित आणि गावाच्या विकासाचा विचार करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे की, पाच पाच वर्षे मलिदा खाणाऱ्या ग्रामसेवकांला सहकार्य करणाऱ्या धेंड्यांना शोधून त्यांची ठेचून नांगी ठेचली पाहिजे. कोणाही व्यक्तीपेक्षा गाव नक्कीच मोठा असतो अशी प्रतिक्रीया सामाजीक कार्यकर्त रामदास पाटील यांनी व्यक्त केली आहे .

हिंगणघाट पोलिस स्टेशनचा पोलिस कर्मचाऱ्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 31 जुलै
हिंगणघाट येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा 29 जुलै रोजी दाखल झाला असून ,आरोपी पोलीस कर्मचाऱ्यास हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे.
अरुन हरिदास उघडे वय 49 बक्कल क्रमांक 649 राहणार तरोडा जिल्हा वर्धा असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हिंगणघाट येथील एका रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेने याबाबत काल हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अरुण उघडे विरुद्ध 354 अ, ड,500,506 कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. यातील पीडित तक्रारदार महिलेचा मोबाईल हरवलेला असल्याची 1 महिन्यापूर्वी महिलेने हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणात आरोपी पोलिस कर्मचारी अरुण उघडे याने या महिलेचा मोबाईल मिळवून देतो असे सांगत महिलेसोबत जवळीकता निर्माण केली.. या दरम्यान आरोपी उघडे याने या महिलेस नवीन मोबाईल घेऊन दिला व यातूनच या दोघांची मैत्री घट्ट झाली. आरोपी पोलिस कर्मचारी उघडे हा या मैत्रीचा फायदा उचलत महिलेला माझ्यासोबत लग्न कर असा हट्ट करू लागला. यादरम्यान महिलेचा जबरीने हात पकडून तिला गाडीवर बसून माझ्या सोबत फिरायला चाल अशी जबरदस्ती देखील आरोपी पोलिस कर्मचाऱ्यानी केली असल्याने काल रात्री हिंगणघाट पोलिसात उशिरा याबाबत पीडित महिलेने तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी आरोपी पोलिस कर्मचारी अरुण उघडे विरुद्ध गुन्हा नोंदवला असून या अगोदर या कर्मचाऱ्याला दोन वेळा सस्पेंड केले आहे अशी माहिती मिळाली आहे. पुढील तपास पीएसआय गावडे करीत आहे.

तालुका स्तरावर अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु करा

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटना चे समाज कल्याण अधिकारी श्री. राजेंद्र जाधवर यांना निवेदन

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती :- अपंगांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून अपंग हक्क अधिनियम २०१६ च्या कायद्यामध्ये जिल्हा स्तरीय अपंग तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात याव्यात असे शासनाचे पत्र असून यामध्ये पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा स्तरावर मा . मुख्य कार्यकारी अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करणारे शासन निर्णयाकडे व पंचायत समिती स्तरावर अपंग मार्गदर्शन व सल्ला केंद्र सुरु या शासन निर्णय या कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अपंगांना तालुका स्तरावर एकाच ठिकाणी अपंगांना योजना व सवलतीची माहिती मिळावी म्हणून अपंग सल्ला मार्गदर्शन केंद्र प्रत्येक पंचायत समिती कार्यालयामध्ये सुरु करण्यात यावे असे आदेश असून सुद्धा याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे . तरी आपण आपल्या स्तरावर अपंग तक्रार निवारण समित्या व अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र त्वरीत सुरु करण्यात यावे व जे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असेल त्यांचेवर त्वरीत अपंग हक्क अधिनियम कायद्याअंतर्गत त्वरीत कार्यवाही करावी असे निवेदन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर व अपंग विभाग प्रमुख पी. डी शिंदे यांना अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे मयूर मेश्राम. शेख बब्बू, राजिक शाह, कांचन कुकडे,जहीर खान, गणेश वानखडे,राहुल रामटेके,राहुल वानखडे हे उपस्थित होते.