Home Blog Page 434

जनतेने स्वयंस्फूर्त लस घेऊन,शासकिय नियमांचे पालन करावे -संत विवेक दासजी महाराज

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे) :-

कोरोनाची नुकतीच दुसरी लाट कमी झाली. असुन‌ त्या मध्ये अनेकजण मरण पावले. तर अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय बुडाला अशा या भयानकर महामारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व जागतीक संघटना कोरोनाची तीसरी लाट येणार असल्याचे बोलल्या जात आहे. नागरिकांनी स्वताच्या तसेच स्वतःच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी या लसीचे दोन डोज घेऊन शासकीय नियमांचे पालन जसे की वारंवार हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क अत्यावश्यक कामे वगळता विनाकारण घरा बाहेर न पडणे, गर्दीचे ठिकाणी न जाणे नियमांचे पालन करून स्वतःचे तसेच स्वतःच्या कुटुंबियांचे,आपल्या समाज बांधवांचे रक्षण करण्याचे आवाहन सद्गुरू कबीर आश्रम वाराणसी येथील संत विवेक दासजी यांनी केले आहे. सद्यस्थितीमध्ये मेहकर शहरांमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये संत विवेकजी यांनी कोविल्शीड चा दुसरा डोस घेतला असून त्यानी मेहकर व बुलढाणा जिल्ह्यातील लसीकरण व्यवस्थापनाचे वैद्यकीय अधिकारी तथा लसीकरण व्यवस्थापनाचे डॉ.श्याम ठोबंरे यांच्या कडून माहिती घेतली बुलढाणा जिल्ह्यामधील लसीकरणाचे काम खूप नियोजनबद्ध व प्रशंसनीय आहे व संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनतेच्या लसीकरणासाठी अहोरात्र झटत असलेल्या डॉक्टर, नर्स,आशासेविका व पोलीस प्रशासनाचे त्यानी अभिनंदन केले आहे.

डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील पेट्रोल पंप रद्द करा डाॅ उमेश वावरे ची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
30 जुलै
वर्धा शहरातील आत डाॅ बाबासाहेब आंबेडकर जवळ शिट क्र 02 भूखंड क्र 12 मौजा वर्धा येथे पेट्रोल पंप बांधकाम होत आहे. ते आंबेडकर पुतळ्या जवळ होणे अन्याय कारक आहे. त्यामुळे तिथे होऊ घातलेले सामाजिक कार्यस बाधा आनणारे आहे. व समाज बांधवाच्या भावना दुखवनारा आहे .शहरात एकोपा निर्माण व्हावा व सामाजिक विघटन होऊ नये हया करीता आपन ते पेट्रोल पंप अन्य ठिकाणी हलवा .
तसेच हया पेट्रोल पंप करीता ज्या अधिकारी परवानग्या दिल्या व त्या वर कठोर कारवाई करावी जर पेट्रोल पंप रद्द झाले नाही तर मोठाया प्रमाणात जन आदोलन करण्यात येईल. अशे निवेदन कामगार नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात श्रिमती प्रेरणा देशभ्रतार जिल्हा अधिकारी वर्धा यांना देण्यात आले त्या प्रसंगी अॅड रामकृष्ण सांभारे. मनीष कांबळे. जिवनभाऊ उरकुडे. राजेश खानकूरे. दिलीप कहूरके. महादेव शेन्डे. सुभाष खडारे .नंदकिशोर खोड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

एस एस एम विद्यालयाची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम        

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 30 जुलै हिंगणघाट :- प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस. एस. एम. विद्यालय, हिंगणघाट येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री रमेशराव धारकर प्रमुख अतिथी शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सौ सु. स. देशपांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्र. ल.देशपांडे पर्यवेक्षक श्री भ.तु. धोंगडे सकाळ पाळी प्रमुख श्री रा.ता.कारवटकर  प्रामुख्याने  उपस्थित होते. .यावेळी उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.दरवर्षी शाळेतून विविध  स्पर्धा परीक्षामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यात येते 2021 मध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत शाळेतील  29 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये श्रुती सचिन वाघे, विशाल राजेश डफ,खुशी अनिल झाडे,गुंजन विलास कोल्हे,सृष्टी सचिन वाघे,भूमिका संजयराव तूमाने,संस्कृती विनोद पिटटलवार, तनुश्री आतिश काळे, सानिका घनश्याम खुनकर या विद्यार्थ्यांनी  घवघवीत यश प्राप्त करून निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन  संस्थेचे अध्यक्ष श्री. गो. गो. राठी उपाध्यक्ष श्री श्या भा भीमनवर सचिव श्री र गं धारकर शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सौ.सु.स.देशपांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्र.ल.देशपांडे पर्यवेक्षक श्री भ.तु. धोंगडे जेष्ठ शिक्षक तथा सकाळ पाळीचे प्रमुख श्री रा.ता.कारवटकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग व समाजातील सर्व स्तरातून होत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांनी  आपल्या यशाचे श्रेय   मुख्याध्यापक,  पर्यवेक्षक, सकाळ पाळीचे प्रमुख व सर्व शिक्षकांना तसेच आई वडिलांना दिले

यावल नगरपालिकेत एसीबीचा ट्रॅप; अधिकारी ताब्यात

0

 

 

यावल प्रतिनिधी | विकी वानखेडे

येथील नगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज दुपारी सापळा रचून एका अधिकार्‍याला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील नगरपालिकेत आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केली. यात जळगाव येथील पथकाने सापळा रचून पालिकेतील एका अधिकार्‍याला ताब्यात घेऊन जळगावकडे प्रयाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज कारवाई करण्यात आलेला अधिकारी हा वरिष्ठ असून त्याला लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात लाचलुचपत खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भातील अधिक तपशील देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नगरपालिकेतील लाचखोरीबाबत अनेकदा चर्चा होत असली तरी आज थेट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या अटकेचा संबंध नगरपालिकेतील राजकीय वादांशी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

वनांचल समृद्धी अभियान फाऊंडेशनंच्या माध्यमातुन सातपुडा रूईखेडा व डोंगरकठोरा वनपट्टा क्षेत्रात वन औषधी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा पर्वतीय क्षेत्रातील डोंगर कठोरा व रुईखेडा येथे सामूहिक वनाधिकार प्राप्त जमिनीवर पट्टयांवरील कार्यक्षेत्रात वृक्षारोपणाला सुरवात करण्यात आली. यावल तालुक्यातील पर्वताच्या डोंगराळ क्षेत्रात वनांचल फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली आहे . यावेळी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व यावल नगर परिषदचे नगरसेवक तथा युवा सामाजीक कार्यकर्ते डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते विविध वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात येवुन या अभीयानाच्या माध्यमातुन डोंगराळ क्षेत्रात वृक्षांच्या लागवडीकरिता ५०० आवळा सिताफळ ,रामफळ,जांभूळ, मोहा,वड, इत्यादी वन औषधींची फळ झाळे उपलब्ध करुन देण्यात आलीत व वनविभागाच्या माध्यमातुन ७०० बांबु मोफत मिळाले त्याकरिता ग्रामीण पातळीवर ग्रामसहभागातून तरुण युवकांच्या पुढाकाराने वृक्ष लागवडीला सुरवात करण्यात आली आहे . यावेळी सामुहीक वनहक्क अध्यक्ष श्री .प .पु. स्वरूपानंदजी महाराज , डोंगर कठोरा व डोंगरदे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच नवाब तडवी यांच्या वतीने एकुण १२०० झाडांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान येत्या काही दिवसात आदिवासी पाड्यांत आदीवासी बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावे या उद्दिष्ठाने सदर फळझाडांचे रोपण केले जाणार आहे आणि असुन या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामस्थांकडे देण्यात आलेली आहे. याप्रसंगी नगरसेवक डॉ . कुंदन केगडे , सामुहीक वनहक्क चे अध्यक्ष
श्री .प . पु . स्वरूपानंदजी महाराज, बाळु किटकुल तायडे, डोंगर कठोरा ग्रामपंचायतचे सरपंच नवाब तडवी, दिनेश बारेला (वसा समन्वयक जळगाव ) यांच्यासह डोंगर कठोरा व डोंगरदे येथील ग्रामस्थयांच्यासह कार्यक्रमास रूईखेडा वनहक्क समितीचे अध्यक्ष लक्ष्मणसिंग जामसिंग पावरा
ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते .

मातोश्री शांताबाई जवादे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षलागवड

0

 

सचिन वाघे वर्धा
दि.29 जुलै

हिंगणघाट डाॕ.बी.आर.आंबेडकर शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा स्मृतिशेष मातोश्री शांताबाई जवादे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिक्षण संस्थेचे सचिव श्री.अनिल जवादे यांच्या प्रेरणेतून सेलू मुरपार परिसरातील शिवारात वृक्षलागवड संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनात साग,चंदन,बांबू,सिताफळ,करवंदअशा विविध प्रजातीच्या पाचशे वृक्षांची लागवड सुमारे दिडशे वृक्ष प्रेमिंच्या हस्ते करण्यात आली.
” वृक्ष हा सदृढ पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.वृक्ष लागवड,संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर वातावरण बदलातील त्याचे सकारात्मक कार्य आधोरेखित करण्यासाठी हे वृक्ष लागवड संमेलन आयोजित करण्यात आल्याचे” श्री.अनिल जवादे यांनी सांगितले.आज पृथ्वीची अवस्था वृक्ष तोडीमुळे बिकट होत चाललेली आहे.पृथ्वीवरील आॕक्सीजनचे प्रमाण कमी होत चालले आहे.वृक्ष हे मानवाला सर्वात जास्त आॕक्सीजन देण्याचे काम करीत असते.त्यामुळे माणसासाठी काही करावयाचे असेल तर आधी वृक्षांसाठी काही करावे लागेल. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हा लोकचळवळ होऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन झाले पाहिजे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.प्रारंभी सकाळी नऊ वाजता डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालायात स्मृतीशेष मातोश्री शांताबाई जवादे यांच्या स्मृतीला अभिवादन करून आणि मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा देऊन आदरांजली अर्पित केली.यावेळी विचार मंचावर संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रशांत जवादे,सचिव श्री .अनिलभाऊ जवादे ,प्राचार्य एस.एम,राऊत,संस्थेचे संचालक सौ.मंदाताई जवादे,सौ.अनुराधा जवादे,पराग जवादे,रमन जवादे,श्री आर.के.पाटील,श्री.बी.एस.पाटील, प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे,प्रायमरीचे मुख्याध्यापक देवतळे सर,उपप्राचार्य गुडदे सर,श्री.इंगळे साहेब,पर्यक्षक दिनेश वाघ,सौ.बन्सोड मॕडम इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन ज्योत्सना धोटे यांनी तर आभारप्रदर्शन लाखे मॕडम यांनी केले.

माती व पाण्याच्या समृद्धीतूनच समृद्ध गाव साकार होईल जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती

0

 

अजहर शाह

बुलडाणा*:-गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच अवलंबून आहे. त्यामुळे पुढील कालावधीत समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी प्रत्येक गावाने आपल्या गावातील माती समृद्ध करण्यासाठी आणि शिवारात पाण्याची समृद्धी आणण्यासाठी जल व मृदसंधारण कामावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतीपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.
पाणी फाउंडेशनकडून 2020 पासून सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेला महाराष्ट्रातील एकूण 39 तालुक्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये सहभागी गावाकरिता फेब्रुवारीमध्ये मिनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या गावांचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वॉटर कप द्वितीय पुरस्कार विजेते गाव सिंदखेड ता. मोताळा येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात संबोधीत करताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प राजेश लोखंडे, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. ढवळे, जि.प सदस्य निरंजन वाडे, गटविकास अधिकारी श्री. मोहोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. थोरात, तालुका कृषी अधिकारी श्री. कासार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, गावाच्या सामुहिक प्रयत्नातून सातत्यपूर्ण काम करीत राहिल्यास मोताळा तालुक्याचा नावलौकिक देशपातळीपर्यंत पोहोचेल. गावाच्या विकासाकरिता जिल्हा प्रशासनाचे पूर्ण क्षमतेने सहकार्य असणार आहे. उपजिल्हाधिकारी श्री. माचेवाड यावेळी म्हणाले, नरेगा योजनेच्या माध्यमातून लखपती कुटुंब समृद्ध कुटुंब ही संकल्पना राबविण्यात येत आहे. नरेगाची काम करण्याची पद्धत, आता बदलली असून मागेल ते काम देण्याची कार्यपद्धती सध्या रोजगार हमी योजने मार्फत राबविण्यात येत आहे. रोजगार हमीच्या योग्य नियोजनातून गावातील बेरोजगारी तसेच आर्थिक अडचण निश्चितपणे सोडवल्या जाऊन शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करता येते.
कार्यक्रमामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे म्हणाले, समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम करत असलेल्या सर्व गावांची कामगिरी समाधानकारक राहीली आहे. तसेच समृद्ध गाव स्पर्धेबरोबरच गावाने गावाची एकी आणि नेकी टिकवून ठेवावी. त्याच्या जोरावर गावाचा विकास करावा. सन्मान सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी सिंदखेड समृद्ध गाव स्पर्धेमध्ये करीत असलेल्या कामांची पाहणी केली. त्यामध्ये पर्जन्यमापक स्थळ, गावाने तयार केलेली गवत नर्सरी, बांधावरील वृक्ष लागवड, सोबतच 67 एकर वरती केलेली वृक्ष व गवत लागवडीच्या पाहणीचा समावेश आहे.
संपूर्ण शिवारफेरी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने गाव करीत असलेल्या कामाची पाहणी करून निरीक्षण केले. गावाची पुढील वाटचाल समजून घेतली. सन्मान सोहळ्यामध्ये जयपूर, जनुना, महाळुंगी जहागीर, वारुळी, पोखरी, चिंचपूर, पोहा, तिघ्रा, दाभा, उबाळखेड, शेलापुर खु, चिंचखेड नाथ आणि सिंदखेडा या 13 गावांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच पोफळी, लपाली, खामखेड, कोऱ्हाळा बाजार, अंत्री, रिधोरा जहागीर आणि भोरटेक या 7 गावांना सन्मानपत्र देऊन गौरवित करण्यात आले. मोताळा तालुक्यातील विजयी गावांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदर सन्मान सोहळ्यामध्ये श्रीमती कामिनीबाई राजगुरू, उबाळखेड यांना युएनडीपी, जलशक्ती मंत्रालय आणि स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर वुमन वारियर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक सुखदेव भोसले, पाणी फाउंडेशन, विभागीय समन्वयक यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप मोरे यांनी केले.

मोताळा येथे पोल्ट्री लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

0

 

अजहर शाह

मोताळा:-स्थानिक मोताळा येथे पोल्ट्री लसीकरण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.विशाल अहिरे यांच्या पोल्ट्री शेड मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी ऐकून 2000 पक्षींच लसीकरण करण्यात आले.गुंभोरो या रोगा पासून पक्ष्यांचे रक्षण होण्यासाठी हे लसीकरण करण्यात आले. कार्यक्रमात युवा शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमा मध्ये शेतकऱ्यांना लसीकरण व पक्ष्यांवर येणाऱ्या रोगा संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.लसीकरणा बद्दल लोकांना प्रश्न विचारून त्या संबंधीत योग्य ती उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.धीरज सोनटके उपस्थित होते व त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.या कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्रवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद चे विध्यार्थी योगेश गणेश देशमुख व प्रियंका वासुदेव कोसे यांनी केले होते.तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कृषी महाविद्यालय चे प्राचार्य श्री योगेश गवई कार्यक्रम अधिकारी श्री अविनाश आटोळे कार्यक्रम समन्वयक कु विद्या कपले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ फवारणी करण्याची प्रहारची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
दि. 29 जुलै
हिंगणघाट शहरातील अनेक वॉर्डात डेंग्यू चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत असून अनेक कुटुंबे या आजाराने त्रस्त झालेले दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे शहरात ठिकठिकानी साचलेले कचऱ्याचे ढिग व त्यामुळे डेंग्यूच्या डासांचा मोठ्या प्रमाणात उपसर्ग वाढत आहे.परंतु एवढया मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण वाढत असूनही नप प्रशासन मात्र शहरात कोणतीही कीटकनाशक फवारणी करीत नसल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नप ने तातडीने शहरात सर्वत्र फवारणी करावी जगोजागी साचून पडलेला कचऱयाचे ढीग त्वरित उचलून नाल्याची सफाई युद्धपातळीवर करावी अशी मागणी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी नपला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगणघाट तालुका प्रमुख जगदीशभाऊ तेलहांडे,सुरज कुबडे,अजय लढी,मोहन पेरकुंडे,राजेश लखाणी,अमोल रामगुंडे,धीरज नंदरे,किशोर देवढे,पवन वाघमारे,पिंटू वडतकर,सुधीर मोरेवार,वि, संतोष जोशी,सुधीर मोरेवार,राजेश तांदूळकर,भूषण कुंभारे,महेश तांदुलकर, गोलू कुंभारे, शांताराम तराळे,नितीन मोरे,अमित पोतदार,प्रशांत आवारी इत्यादी उपस्थित होते

डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी अन्यथा आंदोलन ( वरवट बकाल गावातील नागरिकांचा इशारा)

0

 

संग्रामपूर प्रतिनिधी

वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी अन्यथा गावातील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा गावातील शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व सचिवाला 29 जुलै रोजी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टर खूप चांगली रुग्णसेवा देत आहेत. परंतु रात्रीच्या वेळी गावातील अत्यावश्यक रुग्णांसाठी आपले दवाखाने उघडत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. नाईलाजाने रुग्णांचे नातेवाईक उसनवारी करून शेगाव, अकोला, खामगाव आदी गावाला खाजगी वाहनाने भाडे व वेळ खर्च करून उपचारासाठी जातात . त्या कारणांमुळे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास होत जावे आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जोपासून वरवट बकाल येथील डॉक्टरांनी रात्रीची अत्यावश्यक रुग्णसेवा द्यावी. अनयथा आंदोलन करण्याचा इशारा शेकडो नागरिकांनी दिला आहे. शासनाने कोविड 19 च्या विषाणूमुळे रुग्णांना सुरळीत रुग्णसेवा मिळावी यासाठी खाजगी दवाखाने 24 तास सुरू ठेवण्यासाठी कडक निर्बन्ध लावले आहेत. शासनाच्या अधीन राहून वरवट बकाल येथील खाजगी डॉक्टरांनी रात्रीची रुग्णसेवा द्यावी अन्यथा गावातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर शेख अनिस, प्रल्हाद दातार, गोपाल इंगळे, नारायणराव ढगे, दिगम्बर बावस्कर, शेख कारीस, अर्जुन ढगे, रमेश डाबरे, गजानन ढगे, काशिराम ढगे, शेख निसार, लक्ष्मण भोपळे, विनायक टाकलकार, वासुदेव माकोडे, शेख शरीफ, अशोक डाबरे, दीपक दामधर, अभिजित पवार, वैभव डाबरे, चेतन बकाल सह 65 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

खाजगी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा द्यावी अन्यथा त्यांचे दवाखाने बंद पाडू
रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे रात्री अपरात्री नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सेवा देण्यासाठी डॉक्टरांनी दिवसरात्र सेवेचे व्रत घेतलेले असते असे असताना जे डॉक्टर रात्री अपरात्री आजारी पडणाऱ्या रुग्णांना दवाखाने बंद करून रुग्णसेवा नाकारनाऱ्या डॉक्टर विरुद्ध तीव्र आंदोलन करून अशा डॉक्टरांचे कायमस्वरूपी दवाखाने बंद करणार.
प्रल्हाद दातार संस्थापक अध्यक्ष नागरिक हक्क बचाओ आंदोलन.
निवेदनाच्या प्रति
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलढाणा, संग्रामपूर तहसीलदार
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तामगाव यांना दिल्या आहेत.