Home Blog Page 435

भारतीय जनता पार्टीविद्यार्थी आघाडी चा वतीनेमहाराष्ट्र शासनाने महामंडळ बसेस पुर्णतः चालू करणे बाबत उपविभागीय अधिकारी व आगार प्रमुख यांना निवेदन .

0

 

महाराष्ट्र शासनाने वर्ग 8ते 12 चे वर्ग काही दिवसात सुरू करण्याचा निर्णय घेत असल्यामुळे विदयर्थ्यच्या सोयीसाठी ग्रामीण भागात आद्यपही बसेस जात नाही असा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीने दिले .
येत्या काही दिवसात शाळा सुरू होत आहे.जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या वेळेवर बस उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.मागील 1.5वर्षांपासून कोरोना विषाणूजन्य रोगामुळे शाळा ,कॉलेज बंद झाली असल्यामुळे विद्य्यार्थ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या नुकसान टाळण्यासाठी सर्व बस फेऱ्या सुरु कराव्या या मागणीसाठी मा. उपविभागीय अधिकारी तथा आगर प्रमुखना निवेदन देण्यात आले .
निवेदन देते वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटनीस वैभव अढाव
भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष किर्तेश अग्रवाल
नगरसेवक आशिष भैय्या सारसर
युवा मोर्चा शहर संघटक गौरव डोबे

योगेश केदार,श्याम टावरी, सोमेश लाड,वैभव भगत ,गोपाल दामोदर,सोमेश लाड,गौरव बैरागी,ऋषिकेश सुटोने,आशुतोष भोपळे,अंशुल भगत,प्रयाग फुसे,ओम कपले
कार्तिक दीक्षित,उज्वल हिस्सल विनायक हिस्सल, अभिषेक राऊत

साकळी येथे पोलीसांनी टाकला जुगार अड्डयावर छापा १५ जणांना ८८हजार रूपयांच्या रोकडसह घेतले ताब्यात

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथे एका जुगार अड्ड्यावर यावल पोलिसांनी छापा टाकत १५ जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून तब्बल ८८ हजाराचा मुद्देमाल जुगारीचे साहीत्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलीसांच्या वतीने ही सदर ची कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. यावल तालुक्यातील
साकळी येथे मंगळवारी सायंकाळी गावातील सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्डा चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली होती तेव्हा त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी सहायक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार सुशील घुगे, पोलीस अमलदार राजेश वाडे यांच्या पथकास पाठवले तेव्हा सदरील ठिकाणी छापा टाकून खालिक शेख, अहमद शाह, अनिल चौधरी, लतीफ तडवी, अल्लाउद्दीन शेख, असलम खान, चंद्रकांत जंजाळे, सरफराज तडवी, सुपडू तडवी, शेख अशपाक, किशोर खेवलकर, जाबीर शेख, जुम्माह तडवी, जाबीर तडवी व शेख जाकीर अशा एकुण पंधरा जणांना जुगार खेळतांना पकडण्यात आले तर कारवाई दरम्यान बबन पाटील रा. मनवेल हा फरार झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडुन सांगण्यात आले. तेव्हा या पंधरा जणांकडून ८८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या सर्वांविरुद्ध यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संजय देवरे करीत आहे.

शिवसेनेकडून मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्य सामाजिक उपक्रम

0

 

सचिन वाघे वर्धा

दि. 28 जुलै हिंगणघाट शिवसेना पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसा निमित्य शहरातील पिंपळगांव रोड जवळ तुकडोजी वार्ड येथे कमला नेहरु शाळेत निराधार निराश्रीत व्यकतीना फळे व बिस्किट वाटप तसेच उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे रुग्णांना फळे व बिस्किट वाटप कार्यक्रम उपजिल्हा प्रमुख श्री.राजेंद्र खुपसरे ,शहर प्रमुख श्री.सतिश ढोमणे,न.प.उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत घुसे,नगरसेवक श्री.श्रीधर कोटकर, नगरसेवक श्री.सतिश धोबे,नगरसेवक श्री.सुरेश मुंजेवार,नगरसेवक श्री.मनिष देवढे, नगरसेविका सौ.निताताई धोबे,नगरसेविका सौ.संगिताताई वाघमारे,नगरसेविका सौ.सुनिताताई पचोरी,उपतालुका प्रमुख प्रकाश अनासने,नगरसेवक श्री.भाष्कर ठवरी,माजी नगरसेवक श्री.शंकर मोहमारे,माजी नगरसेविका सौ.माधुरीताई खडसे,सौ.नलिनीताई सयाम,बंटी वाघमारे,लक्ष्मण बकाणे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.
महाविर भवन येथे राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या चमु च्या वतिने रक्तदान शिबीर कार्यक्रम दीप प्रज्वलन करुण स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला , 50 रक्तदात्यानी रक्तदान केले ज्यांनी रक्तदान केले .कार्यक्रमात सर्वश्री.युवासेना जिल्हा युवा अधिकारी श्री.अभिनंदन मुनोत, श्री.देवा पडोळे,माजी शहर प्रमुख श्री.मुन्ना त्रिवेदी,उपशहर प्रमुख श्री.संजय पिंपळकर,श्री.महेश खडसे,श्री. जयंता रोहणकर, उपशहर प्रमुख श्री.रोहीत बक्षी,अविनाश धोटे,मनोज जुमडे, संजय सयाम,प्रकाश झाडे,शंकर झाडे,वसंता पाल,विनोद वानखेडे,रमेश चतुर,संजय जुमडे, दिलीप चौधरी,भोला ठाकुर,अनिल कावडकर,अनिता गलांडे,धनराज गलांडे,विद्याधर नौकरकार,प्रदीप धनरेल,आशिष जैस्वाल,नितिन ठाकरे,प्रजय ढोमणे,सुरेश खोंडे,राजु माडेवार,अनिल चाफले, विजय झिंगरे,सौ.प्रमीलाताई झिंगरे,सौ.कल्पनाताई हिवंज,सौ.संगिताताई कडु,सौ.मायाताई खंदार,सौ.अरुणाताई झाडे,सौ.संगिताताई भांडे,सौ.शिलाताई वरघणे,सौ.छायाताई सहाघाटे,सौ.पिन्कीताई बावणे,सौ.मनिषाताई भोयर,सौ.वर्षाताई उघडे,सौ.कलावती निखाडे,गजानन पटोले,आशिष भांडे,प.स.उपसभापती अमोल गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ,विक्रम देवगिरकर,सोनु कोनप्रतिवार,महेंद्र पचोरी,दिनेश धोबे,गोपाल मेघरे,अनिल दुर्गे,रुपेश काटकार,तेजस तुमड़ाम,हिरामन आवारी,हरदीप काळे.राहुल मेहरे.विनोद झिंगरे,उमेश धोबे,राहुल मोहीतकर,निखील कोल्हे,चंदन काकडे,दत्ता सातपुते,बिकू ठावरी,मिलिंद मंगरूळकर,नरेंद्र गुळकरी,सुरेश चुंबळे,शुभम त्रिवेदी,अशांक लोखंडे,वैभव वैद्य,जितेंद्र जैन,आदी शिवसैनिक उपस्थित होते*

राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

0

 

यावल ता (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
किनगाव शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेने पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत  विद्यार्थ्यांना खाऊ व फळवाटपाचा कार्यक्रम दि. २७ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी यावल तालुका शिवसेनेचे संघटक गोपाल भाऊ चौधरी ; माजी जि.प.सदस्य सुभाष सोंळुके  ; माजी जिल्हा परिषद सदस्य  किरण सोंळुके  ,भाऊसाहेब धनगर ; विविध कार्यंकारी सोसायटी चे  माजी चेअरमन पंढरीनाथ चिंधु सोंळुके, पिक संस्थानचे माजी  चेअरमन  डी.एन.कोळी , रघुनाथ सुतार ;  संजय सोंळुके ,शांताराम पाटील , पिक संस्थानचे सचिव सुनील कोळी आदि शिवसेनिक व मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक पुष्पा चौधरी , मुरलीधर कोळी , झांबरे मॅडम आदि यांच्या  उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री ना . उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणी हितासाठी कोरोना संसर्गाच्या संकटकाळात ही राज्यातील जनतेसाठी उत्कृष्ठ असे कार्य करीत असलेल्याचे बोलवुन त्यांच्या विकास कामांना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पहोचवा असे आवाहन सर्व शिवसेनिकांसाठी या प्रसंगी सेनेचे तालुका संघटक गोपाळभाऊ चौधरी व माजी जिल्हा परिषद सदस्य किरण सोंळुके यांनी केले .

गावठी कट्टा कमरेला लावून दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेबच्या पथकाने अटक केली

0

 

यावल ता (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल शहरातील बुरूज चौकात गावठी कट्टा कमरेला लावून दहशत माजविणाऱ्या एका तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेबच्या पथकाने अटक केली असून त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश राजेंद्र पाटील (वय-२२) रा. सुंदर नगरी यावल असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बुरूज चौकात एक तरूण बेकायदेशीर व विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली. त्यानुसार पथक जळगावहून यावलला आज मंगळवारी २७ जुलै रोजी दाखल झाले. दुपारी पथकाने सापळा रचून संशयित आरोपी यश राजेंद्र पाटील याला अटक केली. त्याच्या ताब्यातील २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यात पोलीस कान्स्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, पोलीस नाईक युनुस शेख, किशोर राठोड, पोलीस कान्स्टेबर विनोद पाटील, रणजित जाधव यांनी कारवाई केली.

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी विजय अढाव यांची निवड

0

 

नांदुरा( प्रफुल्ल बिचारे):

– तालुक्यातील पिंपळखुटा खुर्द येथील तरुण तडफदार नेते श्री. विजय कडूजी अढाव पाटील यांची भाजपा युवा मोर्चा नवीन जम्बो कार्यकारणी २३ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजयभाऊ कुटे , जिल्हाध्यक्ष आ.आकाश दादा फुंडकर, जेष्ठ नेते चैनसुखजी संचेती,आ.श्वेताताई महाले पाटील , भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रमदादा पाटील,मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.उमाताई तायडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख , भाजपा जिल्हा सरचिटणीस मोहनजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी निवडण्यात आली. या नियुक्ती मुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रदेश स्तरावर विजय पाटील यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षसंघटना मजबूत करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून आपल्या पदाला न्याय देण्याचे काम करील अशी प्रतिक्रिया विजय अढाव यांनी व्यक्त केली.

यावल पंचायत समितीतील ८ अधिकारी व एक शिपाईयांच्या बदल्या झाल्या असुन यात चार ग्रामसेवक एक ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या एक ग्रामविकास अधिकारी व चार ग्रामसेवक एकुण पाच जणांच्या प्रशासकीय पातळीवर बदल्या झाल्याचे विश्वनिय वृत्त आहे . या संदर्भातील वृत्त असे की यावल पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे व शिरसाडचे आर जी चौधरी यांची रावेर तालुक्यात तर पाडळसा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एल एन नहाले यांची भुसावळ तालुक्यातील केऱ्हाळे व सांगवी खुर्द ग्रामपंचायत चे ग्रामसेवक राहुल तायडे यांची भुसावळ व बोरावल बु॥ व खुर्द दोघ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नागनाथ गायकवाड यांची मुक्ताईनगर येथे बदली झाली असल्याची माहीती दिली असुन अद्याप प्रशासकीय पत्र प्राप्त झाले नसले तरी त्यांनी बदल्या करण्यात आल्याच्या विषयास दुजोरा येथील पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी सदरच्या बदली संदर्भातील माहीतीस दिला आहे . दरम्यान यावल पंचायत समितीतील शिक्षण व समाजकल्याण विभागातील विभागातील वरिष्ठ सहाय्यक मनोज भरत पाटील यांची जळगाव बांधकाम विभागात तर ग्राम पंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक के एल पाटील यांची रावेर पंचायत समितीला व शिक्षण विभागातील गुणवंत डिंगबर देवराज यांची चोपडा पंचायत समितीमध्ये तर शिपाई मोहन हरि हिरळकर यांची मुक्ताईनगर पंचायत समितीच्या बांधकाम विभागात बदली झाली आहे .

भीम आर्मी ने दिले प्रांताधिकारी फैजपूर यांना निवेदन,आरोपींना कठोर शिक्षेची मागणी व फास्टट्रॅक वरती खटला चालवण्याची केली मागणी

0

 

यावल ता (प्रतिनिधी)विकी वानखेडे

फैजपूर येथे प्रांताधिकारी कार्यालयास दिले भीम आर्मी ने निवेदन,
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,
हत्याग्रस्त पिडीत विवाहितेला योग्य तो न्याय मिळावा.
यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेरवाशीण असलेली अल्पवयीन तरुणी करीना भालेराव(निकम) यांचा जळगांव येथील दांडेकर नगरातील सागर निकम या तरुणाशी ११ जुलै रोजी विवाह सोहळा संपन्न झाला,मात्र लग्न सोहळ्याच्या दहा दिवसातच सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणी करीना भालेराव(निकम) यांनी राहत्या घरात आत्महत्या केली…..
त्यांनी अजुन म्हटले आहे की, सदर पीडित तरुणी हि अल्पवयीन असल्याने ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसतांना हि तिचा विवाह करण्यात जे कि भा.दं.स. च्या बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ विरुद्ध आहे..तसेच जळगांव येथील रहिवासी सागर निकम व त्यांचा परिवार यांनी पीडित तरुणी अल्पवयीन असून देखील कायद्याविरुद्ध जाऊन विवाह केला व सदर विवाहित तरुणी करीना भालेराव(निकम) यांचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले,,,जे कि हत्या केल्या प्रमाणेच आहे.सदर घटना हि,हृदयाला खिन्न करणारी व मानवतावादी समाजाला काळिमा फासणारी आहे. सदर घटनेचे गंभीर्य बघता योग्य ती चौकशी करून हत्तेती सर्व आरोपींना कठोर शिक्षा कशी देता येईल याचा विचार करावा व सदर खटला हा जलदगती न्यायालयात चालवावा जेणेकरून भविष्यात असले कृत्य करणाऱ्या समाजविघातक कृत्यांना चपराक बसेल. सदर निवेदन देते वेळी
भीम आर्मी राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे,राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे,महासचिव प्रशांत तायडे, हिंगोना शाखा अध्यक्ष सत्यवान तायडे,कारखाना शाखा चे संतोष तायडे,जितू वाघ,संजय जाधव,दीपक अहिरे,ललित तायडे,गोविंदा भालेराव आदी उपस्थित होते.

श्री शिवाजीमहाविद्यालयात कारगील विजय दिन साजरा

0

 

अजहर शाह

मोताळा:-२६ जुलै ला स्थानिक श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला.देश सेवा करण्याचे कार्य माझ्या नशीबाने मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो असे मत माजी सैनिक मा.सदाशीव घाटे यांनी कारगील विजय दिनी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना व्यक्त केले.तर प्रा.डॉ.सुनिल मामलकर यांनी सैनिक सिमेवर जागरूक असल्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षित असतो.असे मत मांडले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूण बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पांडे सर यांनी प्रत्येकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात तन,मन व धन अर्पण करून कार्य केल्यास ती देश सेवाच घडते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अविनाश मेहरकर, यांनी केले तर संचालन प्रा.पुरुषोत्तम चाटे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अरुण गवारे सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मेहरकर सर व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केले. छायाचित्रण प्रा.नागेश गाट्टूवार यांनी केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.भास्कर भिसे,डॉ.चित्रा मोरे मॅडम,प्रा.विलास हिरनवळे, प्रा.डॉ.सुप्रिया बेहरे मॅडम,डॉ.प्रविण ठेंग , डॉ.अभय ठाकूर प्रा.राम बनकर ,प्रा.निलेश राहाटे,प्रा.दादा मनगटे,प्रा. ब्राह्मणकर,प्रा.चन्नेकर,डॉ. राहुल उके,प्रा.शुभम साखरे व शिक्षकेत्तर कर्मचारी आणी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी याची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयाची दुरावस्था 9 आगस्ट पासून आमरनचा इशारा ! रुग्णमित्र गजू कुबडे

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 26 जुलै
येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक प्रकारांची दुरावस्था असून सध्याच्या कोविडच्या भिषण काळातही या उपजिल्हा रुग्णालयातील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी शासनस्तरावरून कोणतीही हालचाल होत नाही हे या भागातील जनतेचे दुर्दैव आहे.हा आरोग्यविषयक अन्याय दूर न झाल्यास ९ आगस्ट पासून तीन दिवसाचे आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आज उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
गजू कुबडे यांनी निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, येथील उपजिल्हा रुग्णालयात पोष्टमार्टेम करणारा कोणताही कायम स्वरूपी कर्मचारी नसल्याने मृतकाच्या नातेवाईकांना विनाकारण अनेक तास आपल्या प्रिय व्यक्तीचे पार्थिव घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे नातेवाईकांना विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
त्याच प्रमाणे एवढ्या मोठ्या उपजिल्हा रुग्णालयात पुर्णकालीन प्रसूती तज्ञ नसल्याने अनेक प्रसूतीकाना एकतर येथील खासगी दवाखाण्यात भरती होऊन महागडा खर्च करावा लागतो किंवा सावंगी अथवा सेवाग्राम येथे नाईलाजाने जावे लागते.यातच एखादी महिला गंभीर अवस्थेत असेल तर तिला आपला जीवही गमवावा लागतो.अशीच दुर्दैवी घटना येथील रुग्णालयात चार ते पाच महिन्यांपूर्वी घडली आहे.
त्याच प्रमाणे येथे फिजिशियन ( वैद्य) ही महत्वपूर्ण जागा मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत.त्यामुळे अनेक रुग्णांना तपासणी अभावी अन्यत्र जावे लागते.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले परंतु परसेवेवर मागील अनेक वर्षांपासून दुसरीकडे आपली सेवा देणाऱ्या 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी वापस बोलविण्यात यावे किंवा त्यांची येथील सेवा खंडित केल्यास या 2 जागा रिक्त होईल त्यामुळे सरकारला नवीन जागा भरता येतील त्यामुळे अनेक गरजू व गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल.
या सर्व जनतेच्या जिव्हाळ्याच्या व अतिशय महत्वाच्या गंभीर विषया बाबत सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. या महत्वपूर्ण प्रश्नाकडे त्वरीत लक्ष दिल्यास येथील गोरगरीब शेतकरी,शेतमजूर,गिरणी कामगार व अत्यल्प उत्पन्न गटातील जनतेला मोठा फायदा होईल असे वाटते.
या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आपण वेळीच लक्ष द्यावे अन्यथा प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन छेडावे लागेल. येत्या 9 आगस्ट या क्रांती दिनापासून 3 दिवसांचे आमरण उपोषण या मागणी संदर्भात करणार असल्याचा इशारा श्री गजू कुबडे यांनी दिला असून व यानंतरही मागणीवर विचार न झाल्यास प्रहार च्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घेण्याची विनंती महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाला गजू कुबडे यांनी निवेदनातून केलेली आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे हिंगणघाट तालुका प्रमुख जगदीश तेलहांडे,सुरज कुबडे,मोहन पेरकुंडे,राजेश लखाणी,अमोल रामगुंडे,धीरज नंदरे,किशोर देवढे,पवन वाघमारे,अमोल धारने,संतोष जोशी,सुधीर मोरेवार,राजेश तांदुलकर,प्रशांत आवारी भूषण कुंभारे,गोलू कुंभारे,शांताराम तराळे, विक्की सोनकुसरे,गोलू उजवणे,पिंटू वडतकर, अमोल पोतदार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते