Home Blog Page 436

महावितरण कंपनीच्या भोंगळ व हुकुमशाही पद्धत व शक्तीच्या विजवसुलीच्या विरोधात ग्रामीण सेवा फाउंडेशनचे उपोषण व मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या हुकुमशाही व भोंगळ कारभारामुळे आदीच कोरोना संकटामुळे सर्वसामान्य माणुस हा आर्थिक संकटात सापडला असुन , यात महावितरणाच्या कारभाराच्या विजवसुलीची सक्तीची सुरू असलेली मोहीमच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशनचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष जलीलदादा सत्तार पटेल उपोषण करणार सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना काळ असल्याने सामान्य जनता शेतकरी, शेतमजूर,दलित, आदिवासी, या सहित सर्वच घटकांच्या लोकांना रोजगार नाही हाताला काम नाही त्यात इमाने इतबाराने काबाळ कस्त करून लोक पोट भरत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी हुकमशाही करून जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दबंगगिरी करून सामान्य जनतेचे १०० टक्के विजबिल चे पैसे भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कट करू असा दम भरत असून अनेक वर्षानुवर्षे नेहमी नियमित वीज भरणा करणाऱ्या जनतेचेही वीज कनेक्शन कट करत असून आणि वीज वेवस्थापणात अनिमियत्तता व वारंवार भारनियमन ( लोडशेडींग ) करून वीजबिल सक्तीची वसुली करून वीजबिल न भरल्यास विजकनेक्शन कट करण्याची धडक मोहीम राबवत असून या महावितरणाच्या गोंधळलेल्या मोहीमेत सर्व सामान्य जनता भरडली जात असून, अशा प्रकारच्या होत असलेली ही कार्यवाही त्वरीत न थांबल्यास आपण दि. २७ जुलै २०२१ मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यावल येथील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे मा.सरपंच जलील सत्तार पटेल यांनी दिला असुन , या संदर्भातील माहीती ही निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य
ऊर्जामंत्री ना नितिन राऊत ( महाराष्ट्र राज्य ) तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र नानाजी पटोले यांना पाठविण्यात आली आहे .

धम्मसावली बुद्ध विहार हैबतपूर पुनर्वसन येथे वर्षावास प्रबोधन व आंबेडकरी कविसंमेलन संपन्न

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर व धम्मसावली बुद्धविहार व बोधीसत्व ‌वाचनालय हैबतपुर पुनर्वसन तह. आर्वी च्या वतीने आंबेडकरी आंदोलनाची कविता काव्यधारा व वर्षावास प्रबोधन आयोजित करण्यात आले होते.
स्थळ= धम्मसावली बुद्धविहार बोधीसत्व वाचनालय
हैबतपुर पुनर्वसन ता. आर्वी
दिनांक= रविवार २५/०७/२०२१
संध्याकाळी कवीसंमेलन आयोजीत.
अध्यक्ष= छत्रपाल तामगाडगे
सुत्रसंचलन= प्रवीण कांबळे
कवी.रंगराज गोस्वामी
कवी.सुरेश भिवगडे
कवी.संजय पाटील
कवी.सचिन मनवरे
माणिक खोब्रागडे
प्रा राजेन्द्र कांबळे व कविता सादर केल्या.
भगत ताई यांनी रमाई गीत सादर केले . प्रमूख अतिथी दर्पण टोकसे सूरज मेहरे
मधुकर सवाळे , नारायण पाटील आदी प्रमूख अतिथी होतें
या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन निळाई त्रैमासिकाचे संपादक प्रा. प्रविण कांबळे यांनी केले. याप्रसंगी निळाई परिवाराचे वतीने बोधीसत्व वाचनालय येथे ग्रंथसंच दान देण्यात आला.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुरेश भिवगडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी हैबतपूर पुनर्वसन उपासक उपासीका व बोधीसत्व वाचनालय येथील विद्यार्थी मित्रांनी सहयोग दिला. येथिल यांनी सहकार्य केले.

शाश्वत शेतीसाठी , अधिक उत्पादनासाठी आणि मातीच्या सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचे

0

सिल्लोड प्रतिनिधी सागर जैवाळ

_कृषिदूताचा ग्रामस्थ शेतकऱ्यांना सल्ला_
महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संलग्नित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी-औद्योगिक कार्यानुभव  कार्यक्रम जुलै 2021 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील कृषिदूत योगेश परसराम नवल याने रहिमाबाद येथील शेतकऱ्यांना मृदा परीक्षणासाठी माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
रासायनिक खतांचा अति वापर , वर्षानुवर्षे पीक लागवड यामुळे मातीची सुपिकता कमी होत आहे तसेच त्यासाठी माती मध्ये कोणती मूलद्रव्ये कमी आहेत तसेच कोणते घातक घटक आहेत याची माहिती असणं हे खूप गरजेचं आहे . ही माहिती माती परीक्षणामुळे मिळू शकते व त्यानुसार आपण मातीमध्ये योग्य ती मूलद्रव्ये सोडू शकतो.जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरण्याचा सल्ला योगेशने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला. याप्रसंगी त्याने मृदा परीक्षणासाठी माती नमुना शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच सदर माती नमुना हा कृषी महाविद्यालयात परीक्षणासाठी पाठवण्यात आला .शेतकऱ्यांनी त्याचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी दादाराव मोरे, भगवान मोरे ,वैभव मोरे, गणेश मोरे , इत्यादी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी योगेशला  प्रा.ए. डी.फापळे, प्रा. बी.बी.मुंडे आणि प्रा.मोनिका नाफडे-भावसार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

यावल तालुक्यात विविध ठीकाणी कृषीदुत यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठीची माती परीक्षण मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

गोदावरी फाउंडेशन व्दारे संचलीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूत आशुतोष मुकेश येवले याने ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत यावल तालुक्यातील यावल शहर ग्रामीण शिवारात माती परीक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर उल्हास पाटील माती-पाणी तपासणी प्रयोगशाळा येथून मृदा चाचणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी कृष्णात पाटील राहुल पाटील- सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कृषिदूत आशुतोष मुकेश येवले याने शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कसे अबाधित ठेवता येईल यावर सखोल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्याचा मृदेचा होणारा रास व माती परीक्षण शिबिरांची खेडोपाडी असणारी आवश्यकता यावरही येवले यांनी सूतोवाच केले. त्याचबरोबर माती परीक्षण कसे आणि का करावे याचे बहुमोल मार्गदर्शन केले. त्याला प्राचार्य शैलेश तायडे, प्राध्यापक मोनिका नाफाडे-भावसार, प्राध्यापक मोनिका भावसार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले.

किनगाव येथे कृउबा समिती आवारात मा. आ . सोनवणे यांच्या उपस्थित घर तिथं शिवसेनिक व गाव तिथ शाखा या शिवसंपर्क अभियानाची बैठक संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील चोपडा विधानसभा क्षेत्रातील किनगाव-डांभूर्णी व साकळी-दहीगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांची माजी आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. या अभीयान बैठकीत शिवसेनिकांनी आपला सहभाग नोंदवला, शिवसेना शिवसंपर्क अभियान बैठक आज रविवार दिनांक २५/०७/२०२१ रोजी दुपारी २ वाजता किनगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झाली, या शिवसेना शिवसंपर्क अभियान मोहीम अंतर्गत घर तिथं शिवसेनिक व गाव तिथ शाखा हे अभीयान माजी आमदार तथा चोपडा रावेर लोकसभा मतदारसंघाचे सह संपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या आमदार सौ .लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे. सदर बैठकीस चोपडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गोटुभाऊ सोनवणे, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेना आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख भारसिंग तेरसिंग बारेला , लिलाधर पाटील , योगेश पाटील , रोहीदास महाजन , किशोर माळी , आडगावचे सरपंच रशीद तडवी , सुर्यभान पाटील , लक्ष्मण बडगुजर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदधिकारी यांना पक्षाअंतर्गत संघटना बांधणी व आदी विविध विषयांवर माजी आमदार व प्रा .चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करण्यात आलीत .
तरी शिवसेनेच्या या शिवसंपर्क अभीयान सर्व शिवसैनिकांनी व शिवसेना पदाधिकारी यांनी बैठकीस प्रामुख्याने उपस्थित राहुन या अभीयानास यशस्वी केले .

डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानांतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२५ जुलै भारतीय जनता पार्टी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी(रेल्वे)
विधानसभा क्षेत्रात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन स्थानिक तुळसकर सभागृहात आज रविवार ,दि.२५ जुलै रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तड़स यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन तसेच प्रतिमा पुजन करुन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मंचकावर विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार, विधान परिषद आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे,लोकसभा संयोजक जयंत कावळे,जिल्हा महामंत्री अविनाश देव,नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे ,जिल्हा कोषाध्यक्ष भूपेंद्र शहाणे,प.स.उपसभापती योगेश फुसे, भाजपा सेलू तालुका अध्यक्ष श्री. अशोक कलोडे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा महामंत्री किशोर दिघे यांचे प्रस्ताविकानंतर
सर्व उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.
प्रशिक्षण वर्गादरम्यान हिंगणघाट शहर, हिंगणघाट ग्रामीण, समुद्रपूर, सिंदी(र.) असा मंडळनिहाय आढावा घेण्यात आला.यावेळी येत्या १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत बूथनिहाय रचना करण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार रामदास तडस,जिल्हाध्यक्ष डॉ.शिरीष गोडे,भूपेंद्र शहाणे,भाजयूमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर,जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांनी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानाची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांना पक्षबांधणीचे दृष्टिने बूथनिहाय रचना करण्यास सांगितले.
कार्यक्रमा दरम्यान समुद्रपुर येथील नगरपंचायतचे माजी अध्यक्ष गजानन राऊत यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा महामंत्रीपदी तर भाजपा गोवारी समाज मोर्चाचे शहर अध्यक्षपदी दिनेश नेवारे यांची नियुक्ति करण्यात आली.यासोबतच भाजपा शहर नाभिक समाज मोर्चाचे अध्यक्षपदी विलास अंबरवेले यांची नियुक्ति करण्यात आली,महत्वाचे म्हणजे वंजारी समाज महिला समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षा अरुणाताई हेमके यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.उपरोक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.
हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,शहर अध्यक्ष आशिष पर्बत, माजी पंचायत समिती सभापती गंगाधरराव कोल्हे, अल्पसंख्यांक मोर्चाचे बिस्मिल्लाह खान,शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनिता मावळे,सिंदि (रेल्वे) येथील नगराध्यक्षा सौ. बबिता ताई तुमाने, विनोद विटाळे, बाळू इंगोले, हिंगणघाट शहरातील नगरसेवक नगरसेविका हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी (रेल्वे) सर्कलमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती , सदस्य इत्यादी मान्यवर मंडळी यांनी प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच मंचसंचालन किशोर दिघे यांनी केले तर तालुकाध्यक्ष संजय डेहणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हिंगणघाट शहरात नेहरू वार्ड येथे शिव सेना शाखेची स्थापना.

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 25 जुलै शिव संपर्क अभियाना अंतर्गत नेहरू वार्ड इथे शाखा उद्घघाटन कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी
मा.श्री राजेंद्रजी खूपसरे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख वर्धा)
यांच्या हस्ते शाखा उद्घघाटन करण्यात आले.
मा. श्री अभिनंदन मुनोत (वर्धा जिल्हा युवा सेना जिल्हाधिकारी) मा. श्री चंद्रकांत जी घुसे (उपाध्यक्ष नगर परिषद)
मा. श्री सुरेश मुंजेवार (नगरसेवक)
मा.श्री सतीश धोबे
श्रीमती.सुनीता पाचोरी (नगरसेविका)
श्रीमती. नीता दुबे (नगरसेविका)
मा. श्री सतीशजी ढोमणे (शिवसेना शहर प्रमुख)
मा. श्री. मुन्नाजी त्रिवेदी (शिवसेना शहर संघटक)
श्री. रोहित रंगीलालजी बक्षी (शिवसेना उपशहर प्रमुख)
श्री. आदर्श गुजर (शिवसेना वैद्यक कक्ष प्रमुख)
श्री. शंकर मोहमारे (माजी नगरसेवक)
श्री विक्रम देवगिरकर (सराफा लाईन अध्यक्ष)
श्री. बालू भाऊ अनासने
श्री. संजयजी पिंपळकर
श्री. अनिल कावडकर

शाखाप्रमुख: श्री प्रजय ढोमणे
उपशाखाप्रमुख: श्री शुभम त्रिवेदी
सचिव: श्री ग्यानू जोशी
उपसचिव: श्री चेतन प्रधान
कोषाध्यक्ष: श्री अंकित त्रिवेदी
सदस्य: बबलु त्रिवेदी, अखिलेश ढोमणे, यश त्रिवेदी, अक्षय ढोमणे, शशांक पेंडके, अर्थव त्रिवेदी, संग्राम त्रिवेदी, अनिष पेंडके, गोपाल जोशी, सोनु त्रिवेदी, अखिल ठाकुर, निखील ठाकुर, शाम अग्रवाल, शांतनु हिंगमिरे, विजय खाटिक व समस्त नेहरू वार्ड कार्यकर्ता.

मालोद येथे पावसात घराची भिंत  कोसळून ४ वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद येथे पावसात घराची भिंत कोसळयाने झालेल्या घटनेत एक चिम् कुल्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मालोद या आदीवासी गावात आज दिनांक २५ जुलै रवीवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ईमाम दगडु तडवी यांच्या घरातील मातीची भिंत ही वेगाने सुरू असलेल्या पाऊसामुळे अचानक कोसळुन घरात खेळ असलेला ४ वर्षाच्या आबीद इमाम तडवी यांच्या अंगावर ती भिंत कोसळुन तो दुदैवीरित्या जागीच मरण पावल्याची घटना घडली असुन गावातील नागरीकांच्या मदतीने कोसळलेल्या भिंतीच्या ढीगाऱ्यातुन त्याचार वर्षीय बालकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले , मालोद गावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली , मरण पावलेल्या त्या चार वर्षीय बालकाचे मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके यांनी केले . मयत बालकाचे वडील इमाम दगडु तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .मालोद, राजू तडवी ग्रामसेवक, सर्कल ,मालोद येथील तलाठी तेमरसिंग बारेला यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन घटनेचा पंचनामा केला असल्याची माहीती महसुल सुत्रांकडुन मिळाली आहे

यावल – भुसावळ मार्गावर मोटरसायकल व अज्ञात ट्रकच्या अपघातात दोन जणं जखमी झाले

0

 

 

यावल  : (प्रतिनिधी) विकी वानखेडे

अज्ञात ट्रकचालक त्याचे  वाहन घेवुन पसार झाला आहे . यावल ते भुसावळ मार्गावरील जुने भुसावळ नाक्यावर  आज  सकाळी यावलहुन भुसावळकडे  मोटरसायकलने  ( क्र  एमएच १९ बी २१८o ) यावल येथील आठवडे बाजार परिसरात  राहणारे  शेख शकील शेख ईबा ( वय ४७ ) व  दहिगाव येथील मेहमुद खान फकीरा खान ( वय ५२ ) हे दोघ ही बांधकाम कारागीर  जात होते

भुसावळकडुन यावलच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने भरधाव वेगात  मोटरसायकलला धडक दिल्याने हे दोघे जखमी झाले यातील एकाची प्रकृती गंभीर आहे . अपघात झाल्यानंतर ट्रकचालक पुन्हा भुसावळच्या दिशेने पसार झाला   या जखमींना  यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके , अधिपरिचारिका निलीमा पाटील , आरोग्यसेवक कादर तडवी यांनी प्रथमोपचार केल्यावर दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे . प्रहारचे राजु शेख , नगरसेवक मनोहर सोनवणे , हाजी अय्याज खान , अशपाक शाह  यांनी या जखमींवरील उपचारांसाठी  मदत केली

प्रबुद्ध बुद्ध विहार ट्रस्ट आर्वी, भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना संपन्न.

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

आर्वी – दिनांक 24 जुलै 2021 ला आषाढ पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध बुद्ध विहार येथे भदंत नागार्जुन सुरई ससाई, अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमेटी दीक्षाभुमि नागपूर यांच्या हस्ते पार पडला.
प्रबुद्ध बुद्ध विहार ट्रस्ट द्वारा आयोजित बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना निमित्याने आज सकाळी 9.00 वाजता प्रबुद्ध बुद्ध विहार गौरक्षण वॉर्ड येथे भदंत नागार्जुन सुरई ससाई, व भिक्खू संघ व यांच्या हस्ते वॉर्डातील सर्व उपासक व उपासिका यांच्या उपस्थित सर्व प्रथम बुद्ध मूर्तीचे अनावरण करण्यात आले. नंतर मूर्ती प्रतिष्ठापना करून त्रिशरण पंचशील व त्रिरत्न वंदना घेण्यात आली. या नंतर जवळ पास 50 उपासक यांना भदंत नागार्जुन सुरई ससाई, यांनी धम्म दीक्षा देऊन प्रमाण पत्र देऊन धम्म दीक्षा चा सोहळा पार पाडण्यात आला. त्या नंतर दान पारामिता पार पाडून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या प्रसंगी ग्रंथ वाचक – आयु. अंकुश गडलिंग (गुरुजी), आयु. प्रकाश बनसोड सर, समन्वयक, राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिका, धम्म सेविका आयु. प्रतिभाताई खापर्डे, आयु. सुखदेव राव नंदागवली, आयु. पुरणभाऊ सुर्यवंशी, धम्म प्रचारक – सुरेंद्र भिवगडे, आयु. भिमरावजी मनवर, आयु. राजाराम डोंगरे दर्पण टोकसे व मित्र परिवार व मुख्य आयोजक प्रबुद्ध बुद्ध विहार ट्रस्ट चे अध्यक्ष – आयु. प्रविण काळे, उपाध्यक्ष – भिक्कु सातपुते, सचिव – अजय वाघमारे, कोषाध्यक्ष – किरण कोल्हे, सह सचिव – विशाल मेश्राम, सदस्य – मारोती फुले, मानव वाघमारे, प्रदीप गावंडे, प्रभाकर धाबर्डे, मनोज बोरकर, विशाल काळे, प्रफुल्ल भागत, सल्लागार – अरविंद वाघमारे, राजेंद्र वाघमारे, प्रकाश धाबर्डे, किशोर कोल्हे व वॉर्डातील समस्त उपासक उपासिका बाल व बालिका या सर्वांच्या योगदानाने हा सोहळा पार पाडण्यात आला.