Home Blog Page 437

प्रहार अपंग क्रांती संगटनेचे 77 व्या शाखेचे उदघाटन

0

 

सागर जैवाळ सिलोड

आज खामंगाव ता.कन्नड येथे प्रहार अंपग क्राती संघटनेची ७७व्या शाखेचे उदघाटन अंपग क्राती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा शिवाजी भाऊ गाढे याच्या हस्ते करण्यात आले
यावेळी कन्नड ता अध्यक्ष अनिल गागुर्ड वैजापुर प्रहार जनशक्ती पक्षाचे उपध्यक्ष मा गणेश पा सावंत वैजापुर ता कार्यध्यक्ष नितीन भाऊ तांबे प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सचिव मा ज्ञानेश्वर भाऊ तुरकणे प्रहार सेवक शांताराम वाळुज तसेच कन्नडचे युवा ता अध्यक्ष सुनिल नलावडे उप अध्यक्ष उमेश गायके तालुका सचिव प्रशांत गायके शाखा अध्यक्ष आकाश गायके संजय मिसाळ गणेश बोराडे यावेळी अंपग बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होत प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा कृष्णा भाऊ गाडेकर याच्या आदेशाने प्रहार विद्यार्थी संघटना कन्नड ता अध्यक्ष नियुक्ती जिल्हा सचिव मा ज्ञानेश्वर भाऊ तुरकणे याच्या हस्ते युवराज कुदंळ याना देण्यात आली व ता सचिव पदी सुनिल घुले याची करण्यात आली

भाजयुमो जिल्हा सरचिटणीसपदी उमेश वाघ यांची निवड_

0

अजहर शाह

मोताळा :- तालुक्यातील शेलापुर बु, येथील तरुण तडफदार माजी सरपंच उमेश समाधान वाघ यांची भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीस पदी फेरनिवड करण्यात आली. भाजयुमो नवीन जम्बो कार्यकारणी दि.२२ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार डॉ.संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आ‌.आकाश फुंडकर, जेष्ठ नेते चैनसुखजी संचेती, आमदार श्वेताताई महाले पाटील, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पु देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी निवडण्यात आली. तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रदेश स्तरावर अभिनंदन वर्षाव करण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करुन जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लाऊन आपल्या पदाला न्याय देण्याचे काम करील अशी प्रतिक्रिया उमेशभाऊ वाघ यांनी व्यक्त केली

चुंचाळ्यात गुरुपोर्णीमा साजरी,भजने भारुडे व भक्तांच्या करुणेने फुलला वासुदेव बाबा दरबार कोरोना चे काटेकोरपणे पालन तर भारत मातेच्या सैनिकाने फोडली हंडी

0

 

यावल तालुका प्रतिनिधी। विकी वानखेडे

चुंचाळे ता.यावल येथे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री समर्थ वासुदेव बाबा दरबारात सालाबादा प्रमाणे ह्या ही वर्षी गुरुपोर्णीमे निमीत्त महाप्रसाधाचे आयोजन केले होते,
सकाळी पाचला मुर्ती स्थान सहाला मारोती अभीषेक बाराला आरती त्यानंतर दिवसभर महा प्रसादाचे वाटप करण्यात आले व दिवसभर भजन भारुडे सुरु होते
कोरोनाचे काटेकोरपणे पालन करीत भाविकांनी घेतले समाधी स्थळांचे दर्शन घेतले व नवस फेडले दर्शन घेण्यासाठी गुजरात .कर्नाटक एम पी व महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातून भाविक व शिष्य मदीरात आले होते त्यानंतर सध्याकाळी पाचला गावात भक्तीमय वातावरणात पावली खेळत पालखीची मीरवणुक काढण्यात आली होती पालखीचे पुजन येथील नगराज महाराज यांनी केले यावेळी वासुदेव बाबांना त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साकडे घातले
पालखिची परपंराही ५० वर्षापासून आजपर्यंत आविरत सुरुच आहे पालखी मध्ये सर्व गावातील ग्रामस्थ व शिष्यगण सहभागी होउन कोरोना नियमाचे पालन करुण रात्री ८ वाजता दहिहंडी साध्या पध्दती ने फोडण्यात आली दही हंडीचे पुजन देखील नगराज महाराज यांनी केले दहिहंडी आणि विशेष म्हणजे या वर्षी भारत मातेचा सुपुत आर्मी चे जवान गोपाळ पाटील यांनी दहिहंडी फोडून वेगळीच मिसाल त्यांनी करून दाखवली आहे, यावर्षी चुंचाळे येथील इडीयन आर्मीचे जवान गोपाळ ज्ञानेश्वर पाटील यांनी फोडली दहिहंडी फोडत असतांना भारत माता की जय या जयघोष करण्यात आला होता
कार्यक्रम यशस्वीते साठी चुंचाळे बोराळे व वासुदेव बाबा भजनी मंडळ यांनी परीश्रम घेतले

यावल गावाजवळच्या हडकाई नदी पुलावर अपघातास आमंत्रण देणारे जिवघेणे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील अंकलेश्वर बुऱ्हाणपुर या राज्य मार्गावरील यावल शहराजवळी नदी पुलावरील रस्त्याच्या मध्यभागी मोठया अपघातास आमंत्रण देणारे जिवघेणे मोठमोठे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का असा प्रश्न वाहनधारकांमध्ये उपस्थित करण्यात येत आहे . यावल शहरालगत असलेल्या अंकलेश्वर बु्ऱ्हाणपुर राज्य मार्गावर असलेल्या हडकाई नदीवरील पुलावर मध्यभागी भिषण अपघातास निमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन , या खड्डयामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सोसावे लागत आहे . या नदीच्या पुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे खड्डे चुकवितांना अपघात होवुन अवजड वाहने ही पुलाखाली कोसळुन मोठे अपघात होण्याची शक्यता असुन , विशेष म्हणजे या मार्गाने सर्व शासकीय अधिकारी जातात येतात पण या रस्त्याच्या परिस्थितीबाबत कुणीच काही बोलण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे . या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग यावलचे उपविभागीय अधिकारी जे एस तडवी यांच्याशी संपर्क साधुन
माहीती घेतली असता सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले असुन रस्त्याच्या उर्वरीत काही भागातील या नादुरुस्त रस्ताच्या तेवढा भाग हा काँक्रीटीकरणाचा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले आता ते कधी होणार याची आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे दरम्यान तोपर्यंत कुठलाही अपघात या ठिकाणी होवु अशी अपेक्षा करू या .

किनगाव येथे स्वामी समर्थकेन्द्राच्या वतीने गुरूपौर्णीमा व वसुंधरादिना चे औचित्य साधुन वृक्षारोपण

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव तालुका यावल येथील विविध ठीकाणी स्वामीसमर्थ संस्थेतर्फे गुरूपौर्णिमा व वसुंधरा दिनानिमीत्ताचे औचित्य साधुन विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलेत, यावेळी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांचे हस्ते गावात ठिकठिकाणी विविध जातींच्या शंभर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आलीत यावेळी यावल पंचायत समीतीचे माजी उपसभापती व सदस्य उमाकांत रामराव पाटील, किनगाव येथील व्हि.मार्टचे संचालक मनिष विजयकुमार पाटील, माजी सरपंच मिलींद चौधरी ग्राम पंचायत समिती सदस्य प्रमोद पाटील,बबलू कोळी,सचीन तडवी,संजय वराडे,पी.ए.समीर तडवी,मीनाताई,
चेतन धनगर, देविदास महाजन,मनीष कौठलकर, नारायण महाजन, प्रमोद पाटील , बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक पोपतसिंग जाधव व स्वामी समर्थ केंद्राचे सेवक पुरुषोत्तम पाटील,आनंदा हिवराळे इतर मान्यवरांसह गावातील ग्रामस्थ मंडळी प्रामुख्याने उपस्थीत होते.

हिंगणघाट तालुक्यात 2 दिवस संततधार पावसामुळे बगळ्याचे घरटे असलेले 1 कवठाचे झाड व लाडकी येथे 1 घर कोसळले

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२३ जुलै तालुक्यात सर्वत्र सततधार पाऊस सुरु असल्याने कष्टकरी,शेतमजूर धास्तावल्याचे दिसुन येत असून शेतकऱ्यांचा कामातसुद्धा अडथळा निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे.
शहरात तसेच तालुक्यात अतिवृष्टिमुळे जीवितहानी झाल्याची घटना घडली नसली तरी तालुक्यातील लाडकी येथील विजय नौकरकार यांचे राहते घर दि.२२ रोजी कोसळले आहे.
त्यांचे गृहउपयोगी कूलर, मशीन व इतर साहित्यसुद्धा मलब्यात दबले.
शहरातील पंचायत समिति प्रवेशद्वाराजवळच असलेला कवठाचा वृक्षसुद्धा काल रात्रीतुन मुळापासून उन्मळून पडला.
गेल्या २ दिवसांपासून सततधार पावसामुळे शहरातील मोठ्या नाल्याशेजारी वसलेल्या झोपड़पट्टीवासियांनासुद्धा अतिवृष्टिमुळे झोपडित पाणी शिरण्याची चिंता होती,परंतु आज शुक्रवारी दुपारपासून पावसाने उघाड दिल्याने सुर्याचेसुद्धा दर्शन झाले.आता शेतातील पिके बाळसे धरु लागली असून सोबतच शेतातील तण वाढल्याने तणनाशकाची फवारणी करणे सुरु आहे,परंतु सततधार पावसामुळे फवारणीसारखी अनेक महत्वाची कामे थांबली असल्याने शेतमजूरांच्या हाताला कामसुद्धा मिळणे अशक्य झाले होते.आता पावसाने विराम दिल्याने बळीराजा पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाल्याचे दिसुन येत आहे.

पत्रकार भवणासाठी जागा उपलब्ध करून देणार-सौ रजनीताई जवरे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-

शहरात पत्रकार भवन बांधण्यासाठी नगर परिषदेची योग्य जागा पत्रकारांना द्या याकरिता नांदुरा शहरातील कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मा.सौ.रजनीताई अनिलजी जवरे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने निवेनाव्दारे मागणी केली आहे. व येणाऱ्या मासिक सभेत ठराव मंजूर करण्याचे आश्वासन रजनीताई यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडेराव,तालुका संघटक श्रीकांत हिवाळे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,रतन डोंगरदिव,अरुण सुरवाडे,सुशील इंगळे व इतर पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

लयभारी साहित्य समुह इ बुक प्रकाशन आणि ऑनलाईन कवी संमेलन सोहळा संपन्न

0

 

लयभारी साहित्य समूह आयोजित , आषाढी एकादशी निमित्त , पंढरीची वारी हा उपक्रम पंधरा दिवस घेऊन , पंढरीची वारी ह्या विषयावर काव्यलेखन केले . आणि 78 कवितांचा इ बुक मध्ये समावेश केला . आणि आषाढी एकादशी दिवशी ज्येष्ठ कवयित्री शामला पंडीत , कवयित्री रंजना मांगले , कवी संतोष रायबान सर यांच्या हस्ते इ बुक प्रकाशन सोहळा झाला . त्या सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले . तर त्याच दिवशी ऑनलाईन झूम कवी संमेलनाचे नियोजन समूह संचालक अनिल केंगार यांनी केले . आणि कवी संमेलनाचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी आपल्या शैलीतून बहारदार केले . आणि कार्यक्रमाला रंगत आणली .वर्षा फटकाळे वराडे , संगीता महाजन , कु. वर्षा शिदोरे, सौ.कविता वालावलकर, सौ.शामला पंडित (दीक्षित)
सौ.वसुधा कोडगीरे, सौ.वैभवी मराठे , सौ.भाग्यश्री बागड, सौ.अनिता नागे/पाठे, सौ.रंजना मांगले , सौ.आम्रपाली धेंडे, सौ.सुचित्रा कुंचमवार , सौ.कल्पना निं.अंबुळकर , सौ.प्रांजली काळबेंडे , सौ.शशिकला गुंजाळ , सौ.वसुधा नाईक , सौ.योगिता जाधव
सौ.नूतन पाटील , सौ.संगीता चव्हाण सौ.अंजली राजाध्यक्ष, सौ.सुनीता बहिरट, श्रीमती संगीता जामगे, विकास पाटील, श्री. हरिदास मा.गौतम, श्री.मधुकर गायकवाड, श्री.रोहिदास होले , श्री.गजानन दराडे, श्री.वसंत गवळी, श्री.रविकांत जाधव, श्री.सचिन पाटील, श्री. आमीर पटेल, विशाल पाटील, राकेश बुधाजी डाफळे ,अविनाश शिंदे
संगीता महिरे साळवे ह्या सर्व सारस्वतांच्या काव्यातून इ बुक प्रकाशन सोहळा आणि ऑनलाईन झूम कवी संमेलन यशस्वीरित्या पार पडले .

यावल येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ता आदीवासी मुला मुलींना पौष्टीक आहार वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सक्षम नेतृत्व कर्तबगार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदीवासी मुलामुलींना पौष्टीक आहार वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक२२ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार असे सक्षम नेतृत्व करणारे महाविकास आघाडीतील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना . अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सकाळी ११ वाजता शहराला लागुन असलेल्या गोळीबार टेकळी या आदीवासी वस्ती पाडयावरील लहान मुला मुलींना पौष्टिक आहार व खाऊचे वाटप करण्यात आलीत . याप्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन आपला सहभाग नोंदविला यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम .बी . तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास सामाजीक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे ,
यावल शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार , फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे, भालोद चे राहुल चौधरी , बापु जासुद, हेमंत येवले , अब्दुल सईद शेख रशीद ,गनी भाई , पवन धोबी , आरीफ खान , विरेन्द्रसिंग राणा , अशोक भालेराव , दिपक तडवी , विजय साळी , नाना कोळी हे प्रामुख्याने उपस्थित होते तर पक्षाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे परिश्रम घेतले .

अट्रावलच्या शिक्षकाचे नाशिक येथे वाळलेले झाड त्यांच्याकारवर कोसळुन जागीच मृत्यु परिसरात सर्वत्र हळतळ

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील अट्रावल येथील मुळ रहिवासी आणी नाशिक येथील येथील शिक्षक नितीन सोमा तायडे ( वय ३२) यांचे वलखेड ( जि. नाशिक) फाट्यावर रस्त्याच्या कडेला असलेले वादळी वारा आणी पाऊसाच्या गोंधळात वाळलेले झाड त्यांच्या कारवर कोसळून झालेल्या विचित्र भिषण अपघातात त्यांचे दुदैवी निधन झाले ते पिंपरूळ जिल्हा नाशिक येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, बहिण, मेहुणे असा परिवार आहे. त्यांचे मृतदेह नाशिकहुन त्यांच्या मुळ अट्रावल येथे आणण्यात आले व त्यांचे आज सकाळी अट्रावल तालुका यावल येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , मयत शिक्षक नितिन तायडे येथील बस आगारातील सेवानिवृत्त चालक सोमा तायडे यांचे पुत्र होत. तर अट्रावल मुंजोबा देवस्थान विश्वस्त समिती सदस्य दीपक तायडे यांचे बंधू होत. नितिन तायडे यांच्या अशा दुदैवी अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .