Home Blog Page 438

पावसामुळे परिसरातील पिकांवर पडले पांढरे ठिपके / परिसरातील शेतकरी भयभीत

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

दिनांक 21 जुलै मध्यरात्री झालेल्या पावसानंतर 22 जुलै रोजी सकाळी परिसरातील सूनगाव सह जळगाव जा तालुक्यात कपाशी सोयाबीन व इतर सर्वत्र पिकावर झालेल्या पावसामुळे पांढऱ्या रंगाचे ठिपके पिकावर आढळून आले.

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरासह तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले जळगाव जामोद तालुक्यात पेरणीच्या वेळी पावसाने अचानक दांडी मारल्याने परिसरात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते व त्यानुसार दुबार तीबार पेरणी झाली परंतु सात ते आठ दिवसानंतर झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे तरी काल झालेल्या पावसामुळे परिसरात पिकांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके आढळून आले हे ठिपके पावसामुळेच पडलेले आहे असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे तालुका कृषी अधिकारी वाकोडे यांनी कपाशी पिकाच्या शेतात जाऊन पाहणी केली व कपाशी पिकाचे काही पाने व झाडे गोळा करून ती कृषितज्ज्ञ यांच्याकडे पाठविण्यात आले या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांमुळे निसर्गाकडून काहीतरी रोगाचा प्रादुर्भाव झाला की काय अशी चर्चा शेतकऱ्यांत आहे परंतु या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांमुळे पिकांवर काही दुष्परिणाम होणार का ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे

अखेर महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर सूनगाव वासीयांचे उपोषण मागे

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा

तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस सतत सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान  विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. कधीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिकाना उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वेल्डिंग व्यवसाय, गिरण्या ,बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे ,ऑनलाइन अभ्यास,त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले होते परंतु त्याची महावितरणने कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे सुनगाव येथील  नागरिकानि  सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यामुळे सुनगाव येथील नागरिक हे  आज दिनांक 22 जुलै पासून महावितरण कार्यालया समोर उपोषण थाटले आहे  या उपोषणास सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेव धुर्डे माजी पं.स.सदस्य अशोक काळपांडे , प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्राप सदस्य बळीराम धुळे, ग्राप सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ, पत्रकार गणेश भड ,पत्रकार अनिल भगत  उपोषणास बसले होते परंतु अखेर सूनगाव गावास सुरळीत विद्युत पुरवठा केल्या जाईल व प्रलंबित असलेली कामे पूर्ण केल्या जातील व त्या कामासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्या जाइल असे लेखी आश्वासन( पत्र) महावितरणचे अभियंता कातखेडे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी जामोद उपकेंद्रा चे अभियंता गोलाईत साहेब व कर्मचारी उपस्थित होते

कृषी विभागाने जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळवून द्यावा आमदार समिर कुणावार यांचे आवाहन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.२२ जुलै हिंगणघाट तालुक्यातील १५ तसेच समुद्रपुर तालुक्यातील ११ गावांचा पोकरा योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबागा तसेच सिंचन योजनेसारख्या अनुदान मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी जास्तीतजास्त प्रयत्न करावे असे आवाहन आढावा बैठकीच्या वेळी आमदार समिर कुणावार यांनी केले.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा)अंतर्गत आज दि.२२ रोजी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली
आढावा सभा आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेचे आयोजन स्थानिक पंचायत समीती सभागृह येथे करण्यात आले.
या सभेत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवड झालेल्या गावातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आढावा सभेच्यावेळी आमदार समीर कुणावार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे,समुद्रपुर पंचायत समितीच्या सभापती सौ सुरेखाताई टिपले,हिंगणघाट पंचायत समिती सभापती सौ शारदाताई आंबटकर,जिल्हा परिषद सदस्य सौ ज्योत्स्नाताई सरोदे,गटविकास अधिकारी दिनेश चौधरी इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते,तालुका कृषी अधिकारी नंदकुमार घोड़मारे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.सदर आढावा सभेमध्ये समुद्रपुरचे तालुका कृषी अधिकारी एमजी सोनटक्के,हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी आर बि.गायकवाड,मंडल कृषी अधिकारी सुपारे,जीबी बनसोडे,सीबी कारंजेकर,आर मेश्राम यांनी उपस्थिति होती.

हत्या करून मृतदेह फेकला रेल्वे ट्रॅकवर परसोडी येथील घटना,तीन आरोपींना अटक

0

 

सचिन वाघे वर्धा वर्धा .

२२ / ७ परिसरात खळबळ जुन्या वादातून एका व्यक्तीची राॅडणे हत्या करून मृतदेह वरुड रेल्वे लाईन वर फेकून दिला, ही घटना १८ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असुन मंगळवारी याचा उलगडा झाला,यासंबंधात तिन आरोपींना दहेगाव पोलिसांच्या हमदापुरचे बीट अमलदार पो.हवा.इजास खान , पो.हवा.मनोज बाराहाते यांनी ३ तासात आरोपींना अटक करून सक्तिने विचारपुस करताच आरोपींनी गुन्हा कबुल केला. तिघांनी मिळून मृतकाला मारून वरूड (पवनार) येथे रेल्वेलाइन वर रात्री ११ .३० वाजता फेकून दिले व हत्येचेवेळी उपयोगात आणलेले हत्यार नदीत फेकले अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.
मृतकाचे नाव दिगांबर नामदेव कन्नाके (रेल्वे)(५०)आहे . प्राप्त माहितीनुसार मृतक दिगांबर आणि आरोपी संदीप राऊत यांच्यात जुना वाद होता, ३ दिवसापूर्वी दिगांबर हा शेतातील कामे आटोपून घरा कडे जात असताना आरोपी संदीप राउत , राजु राउत आणि किशोर राउत यांनी रस्त्यावर अडवुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली तसेच त्यांच्या डोक्यावर राॅडनेही मारहाण केली. दरम्यान आरोपीनी जख्मी दिगांबरचा मृत्यू झाल्याने वरुड रेल्वे परिसरात रेल्वेच्या पटरीवर फेकुन दिला. यांचा तपास दहेगाव पोलिसांनी केला असता हि सर्व बाब उघड झाल्याने आरोपींना हत्येचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली हि हत्या जुन्याच वादातुन झाली आहे की यात आणखी काही दुसरे कारण आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहे.सदर गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पत्रकार भवणासाठी जागा उपलब्ध करून द्या राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाची नगर परिषद नांदुरा कडे मागणी- मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील सर्वच छोट्या मोठ्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. तसेच नांदुरा शहरात पत्रकार परिषद घेण्यासाठी सुद्धा हक्काची जागा नाही. यामुळे नांदुरा शहरात पत्रकार भवन बांधून मिळावे यासाठी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री राजेश एकडे साहेब यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली असता. नगर परिषद कडून जागा उपलब्ध करून घ्या मी पत्रकार भवन बांधून देतो असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले. म्हणून आज दिनांक २२ जुलै २०२१ रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्रकार भवनाच्या जागेच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडेराव,तालुका संघटक श्रीकांत हिवाळे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,रतन डोंगरदिव,अरुण सुरवाडे,सुशील इंगळे व इतर पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

आर्वी-पुलगाव राज्य महामार्ग खूबगावच्या पुलावर जीवघेणा खड्डे

0

 

प्रज्वल यावले
आर्वी तालुका प्रतिनिधी

आर्वी-पुलगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या जात असून या रस्त्याची दळण-वळण खूप मोठ्या प्रमाणात चालते,
तसेच आर्वी-पुलगाव मार्गावर असलेल्या खूबगाव लगतच्या पुलाजवळ अर्धा ते एक फुटाचा खड्डा पडलेला आहे. तसेच हा खड्डा उंचवटा दर्शवून आपले अस्तित्व दर्शीवित आहे.
सध्या पावसाळ्या सुरू झाला असून या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे या खड्डाची अर्धा ते एक फूट असलेली खोली प्रवाशांना समजून येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
संबंधित रस्त्याला बहुतांश ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, पण या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधले जात नाही का? असा प्रश्न येथील प्रवाशी जनतेला पडला आहे.या रस्त्यावर पडलेली खड्डे बंधकाम विभागाने दुरुस्ती करून घ्यावी, कारण या रस्त्याला प्रवाशी जनता त्रासली आहे,हे मात्र नाकी आहे…
आर्वी-पुलगाव रस्ताची खड्डे संबंधित यंत्रणेने रस्त्याची दखल घेऊन दुरुस्ती करून घ्यावी,अन्यथा एखद्याच्या जीवावर….बीतू शकते

सुनगांव येथील विद्युत पुरवठा नेहमी खंडित राहत असल्या कारणामुळे नागरिकांचे विद्युत वितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू

0

 

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस कंटिन्यू सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान सुनगाव येथील विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. तरीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिक उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्या कारणामुळे वेल्डिंग व्यवसाय गिरण्या बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले होते परंतु त्याची महावितरणने कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे सुनगाव येथील नागरिकानि सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यामुळे सुनगाव येथील नागरिक हे आज दिनांक 22 जुलै पासून महावितरण कार्यालया समोर उपोषण थाटले आहे या उपोषणास सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे माजी पं सदस्य अशोक काळपांडे धुर्डे, प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ, पत्रकार गणेश भड अनिल भगत गजानन सोनटक्के उपोषणास बसले आहेत व जोपर्यंत मागण्या पूर्ण व विद्युत पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यत उपोषण सुरू राहणार असा इशारा सूनगाव नागरिकांनी दिला आहे

सातपुडयातील लंगडाआंबा जंगलातुन नियोजीत पती व चुलत भावा बरोबर मोटरसायकलवर जाणाऱ्या तरुणीचे अपहरण सहा जणांवर गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गाडऱ्या गावातील एका आदीवासी अल्पवयीन तरूणी आपल्या नियोजीत पती सोबत आपल्या गावी गाडऱ्या येथे जात असतांना ६ जणांनी अपहरण करुन पळवुन नेल्याप्रकरणी मध्यप्रदेशातील राहणाऱ्या सहा जणांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की दिनांक ९ जुलै रोजी फिर्यादी अल्पवयीन तरूणी ही वाघझीरा तालुका यावल येथील चुलत बहीणीस भेटायला आलेली होती, दिनांक १२ जुलै रोजी ही तरुणी आपल्या नियोजीत पती रवी हुकाऱ्या बारेला राहणार वाघझीरा तालुका यावल व याच्या सोबत चुलत भाऊ गणदास खुशाल बारेला आपल्या गाडऱ्या गावी चुलत भाऊच्या मोटरसायकलवरून जात असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास लंगडाआंबा गावापासुन सुमारे एक किलोमिटर अंतरावर दोन मोटरसायकल समोर लावल्याच्या दिसुन आल्यात त्यामुळे तरुणीच्या नियोजीत पती रवी बारेला यांने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल हळु केली असता जंगलातील झाडाच्या पाठीमागुन जागीराम गुलाब बारेला, नेमसिंग जागीराम बारेला, अनेरसिंग गुलाब बारेला , नितेश जागीराम बारेला , शांताराम गुलाब बारेला सर्व राहणार पलासकोट तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ह . मु . गाडऱ्या तालुका यावल आणी मंसाराम मददास बारेला राहणार वालपानी तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्यप्रदेश या सर्वांनी मिळुन तरुणीच्या नियोजीत पती रवी बारेला आणी चुलत भाऊ गणदास बारेला यांना रस्त्यात अडवुन दोघांना लाथाबुक्याने व काठयांनी मारहाण करीत यातील नितेश जागीराम बारेला याने त्या अल्पवयीन तरुणीस तुझ्या चुलत भावाला आणी कुटुंबास जिवे ठार मारण्याची धमकी देवुन आपल्या सोबत प्रथम ढोलगा या गावी व नंतर मोटरसायकलवर बसवुन आपल्या सोबत वालपानी व नंतर सुतपुरी मध्यप्रदेश या गावी घेवुन गेलेत , दरम्यान अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ गणदास बारेला हा तरूणीचा शोध घेत भगवानपुरा पोलीस स्टेशन येथे पहोचला त्यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारवर पोलीसांनी अल्पवयीन तरुणी शोध घेतले व त्या तरुणीस पोलीस स्टेशनमध्ये बोलवुन तरूणीने दिलेल्या जबाबात नितेश बारेला यांने पळवुन आणले नसल्याचे सांगीतले होते . दरम्यान यावल पोलीस स्टेशनला दिनांक २० जुलै रोजी अल्पवयीन तरुणीने दिलेला आपला यावेळी फिरवल्याने अखेर तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून मध्यप्रदेशातील रहीवाशी सर्व सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार संजय तायडे व युनुस तडवी हे करीत आहे . दरम्यान त्या अल्पवयीन तरुणीस पोलीसांनी त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले असुन , अपहरण करुन पळवुन नेलेल्या संशयीत तरुण नितेश बारेला या तरूणाचे या तरूणीवर प्रेम असल्याचे कळते.

सातपुडा पर्वतरांगांमधील वन विभागाच्या भिंगारा पूर्व बीटमध्ये अनोळखी 65 वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा. प्रतिनिधी:

जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या सुनगाव येथील वनविभागाच्या भिंगरा पूर्व एक बीडमध्ये एका अनोळखी 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली दिनांक 21 जुलै च्या सकाळी सात वाजेच्या दरम्यान वनविभागाचे वनरक्षक अरुण गुलाबराव भुईकर वय तीस वर्ष हे पूर्व भिंगारा एक वनखंड क्रमांक 367 मध्ये गस्त करीत असताना यांना दुर्गंध आली असता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत अंदाजे 65 वर्षीय अनोळखी वृद्धाचे प्रेत दिसून आले असता, वनरक्षक भुईकर यांनी सदर घटनेची फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली घटनेची फिर्याद मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे पोलीस हेडकॉन्स्टेबल राऊत पोलीस कॉन्स्टेबल इंगळे पोलीस नाईक गणेश पाटील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच वनविभागाचे कर्मचारी हे सर्व घटनास्थळी पोचून त्यांनी कुंजलेल्या अनोळखी प्रेताचा पंचनामा केला सदर अनोळखी वृद्धाचे प्रेत हे अंदाजे तीस ते पस्तीस दिवसापासुन पडलेले असल्याचे दिसते सदर वृद्धाचे प्रेत हे पूर्ण कुंजलेले असल्यामुळे तेथे फक्त हाडांचा सापळा बाकी होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अनोळखी प्रेताचे नमुने घेऊन घटनेचा पंचनामा करून पंचांच्यासमक्ष तसेच वनकर्मचारी पत्रकार यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत हद्दीत ई क्लास जागेवर सदर अनोळखी वृद्धाचे प्रत नेउन तिथेच त्या अनोळखी वृद्धाचा अंत्यविधी करण्यात आला सदर जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल करण्यात आला आहे मर्द क्रमांक 53/2021 कलम 174 जा.फौ. नुसार दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक वावगे हे करीत आहेत.

वैजापूर मध्ये साकारणार भव्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुर्णाकृती पुतळा

0

 

ता.प्रतिनिधी
वैजापूर

आज शहरातील माळी समाजातील प्रमुख पदधिकारी व प्रतिष्ठित नागारीक यांची. बैठक पार पडली सदर बैठकीत सर्व मते पुतळा समिती कमीटी तयार करुन शासन दरबारी रितसर परवानगी साठी पाठपुरावा करण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत पुतळा उभारणी समिती तयार करण्यात आली सदर कमिटी अध्यक्ष महणून श्री दशरथ भगवानराव बनकर व उपाध्यक्ष पदी सुभाष उत्तमराव गायकवाड यांची सर्व मताणे निवड करण्यात आली सदर कमीटीचे सदस्य दौलत गायकवाड, श्रीराम गायकवाड, स्वप्नील जेजुरकर, परेश भोपळे, जगण गायकवाड, पुंडलिक गायकवाड, ज्ञानेश्वर घोडके, सुनिल गायकवाड,अरुण होले, सुरज नाना पवार, डिंगबर वाघचौरे, गौतम गायकवाड, प्रविण गायकवाड, महेश भालेराव याची नियुक्ती करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार रमेश पा.बोरणारे मा आ भाऊसाहेब पा चिगटगावकर, डॉ दिनेश भाऊ परदेशी, बाळासाहेब संचेती, साबेरभाई, काशिनाथ शेठ.गायकवाड विष्णुभाऊ जेजुरकर, सजणराव गायकवाड, रतिलाल गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, बद्रीआन्ना गायकवाड, प्रकाश भाऊ माळी, आबासाहेब जेजुरकर, ऋषीभाऊ जुंधारे, अशोक देवकर, अरविंद शेवाळे, विजय बनकर अंनता.बेळे बाळासाहेब शिंदे, संतोष गायकवाड, एकनाथ बनकर, दिलिप सोनवणे, सचिन गायकवाड, दत्ता गायकवाड, रामभाऊ बनकर, गणेश जेजुरकर, योगेश बोढरे, सचिन थोरात, आदि समाज बाधंव मोठया संखेत उपस्थित होते. यावेळी सुञसचालन जगननाथ गायकवाड यांनी केले. तर आभार आबासाहेब जेजुरकर यांनी मानले