Home Blog Page 439

विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पा अंतर्गत काटी येथे चर्चा संपन्न…

0

 

नांदुरा :- प्रफुल्ल बिचारे

तालुक्यातील ग्राम काटी येथे दि २० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता महाराष्ट्र शासनाच्या
विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पा अंतर्गत संतुलित पशु आहार विषयी संबंधित चर्चा पार पडली. या सत्रामध्ये विदर्भामध्ये श्वेतक्रांती घडवून आणण्या करिता विदर्भामधील शेतकऱ्यांमध्ये दुधव्यवसाया बद्दल जागरूकता निर्माण करून शेतकऱ्यांचे दुग्धत्पादना वरील अतिरिक्त खर्च कमी करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन कसे घडवून आनता येईल . दुग्ध उत्पादक शेतकरी जधावराणा देत असलेल्या खाद्याची संतुलित प्रमाणात मात्रा देऊन आहार संतुलनाचे व्यवस्थापन करण्यासंबंधी व तसेच जनावरांमध्ये सामान्यता आढळणारे आजारावर राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी संशोधन केलेल्या आयुर्वेदिक घरघुती उपाययोजना संबंधित व शासनाच्या विविध योजना संबधी आणि शेतकऱ्याच्या सध्य परिस्थिती मध्ये असण्याच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक श्री राहुल पोफळे सर तालुका समन्वयक श्री भूषण तायडे, तालुका व स्थानिक जाणकार श्री श्रीकांत हिवाळे यांनी शेतकऱ्यान बरोबर चर्चा केली. या चर्चा सत्रात काटी येथील श्री.रविद्र हिवाळे, निवृत्ती रोकडे, गणेश हिवाळे, प्रदिब हिवाळे, मोहन मारोडे, गजानन हिवाळे, शाम हिवाळे, कैलास जुनारे, जगन्नाथ हिवाळे, शरद हिवाळे, अमोल हिवाळे व आदी शेतकरी सहभागी झाले होते.

यावल येथे अखेर न्यायालयाचे आदेशान्वये सहा जणांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे आदेशान्वये सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील विरारनगर मधील रहिमा लुकमान तडवी वय ४५ हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक १५ मे रोजी सायंकाळी शहरातील विरारनगर भागात फिर्यादीचे राहते घरात संशयित आरोपी सुभान समशेर तडवी यावल , आमीन सुभान तडवी, सलीम सुभान तडवी रा.ठाणे, तसलीम सुभान तडवी रा.यावल, जैतून सुभान तडवी,रा.यावल ,नसिर उखर्डू तडवी रा.ईचखेड़ा तालुका यावल हे त्यांचे हातात लाकडी पट्ट्या घेऊन घरात घुसून म्हणाले की मनोज कुठे(फिर्यादी चा मुलगा मनोज)असे विचारले त्याला बाहेर काढा म्हणत आरोपींनी विनयभंग करत मारहाण केली तेव्हा सलमान रहेमान पटेल,शेख बसीम अब्दुल गफूर,मेहमूद हबीब तडवी, अजीत अरमान तडवी,शब्बीर इस्‍माईल तडवी यांनी मला व माझा मुलगा मनोज यास आरोपींच्या ताब्यातून सोडविले तेव्हा आरोपींनी आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली.याबाबत फिर्यादी महिलेने घटनेच्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन लेखी व तोंडी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी त्यावेळेस गुन्हा दाखल केला नसल्याने फिर्यादी महीलेने येथील न्यायालयात धाव घेतल्याने अखेर यावल पोलीसांनी
भाग ५ गु.र.नं. १३२/२०२१भा.द.वि. कलम३५४, ४५२, १४३, १४७, ३४१, ३२५, ३२४, ३२३,, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे ६आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठाण करीत आहे.

यावल येथे विजबिल वसुली महावितरणच्या एका कर्मचाऱ्यास धक्काबुकी शिवीगाळ व धमकी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील विरार नगर परिसरात घरगुती विज बिलची उर्वरीत रक्कम भरणा करा अन्यथा तुमची विज कनेक्शन तोडले जाईल अशी सुचना देण्यासाठी गेलेल्या एका महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणुन पोलीसात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , यावल शहरातील विरारनगर परिसरात आज दिनांक २० जुलै मंगळवार रोजी सकाळी १० , ३० वाजेच्या सुमारास यावल येथील महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन सेवेत कार्यरत असलेले योगेश सुधाकर करनकर वय४१ वर्ष हे आपले सहकारी किरण रोहीदास बागुल यांच्या सोबत विजवसुलीच्या थकबाकी साठी गेले असता विज वापरकर्ते ग्राहक रफीक , फरदीन , मुन्ना व एक महीला यांनी योगेश करनकर हे उर्वरीत विजबिलची रक्कम ११४१ रुपये अशी भरणा करण्याची सुचना देत असतांना घरातील महीला हिने आपल्या हातातील पाणी भरण्याच्या नळीने शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली व तसेच त्या ठीकाणी उपस्थित रफीक , फरदीन , मुन्ना पुर्ण नांव माहीत नाही यांनी कर्मचारी योगेश करनकर यांची कॉलर पकडून ओढताण करून शिवीगाळ करून धमकी देवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला . या संदर्भात योगेश सुधाकर करनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन , तपास सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण हे करीत आहे .

बैलांची वाहतूक प्रकरणी जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

आज दि 20/ 7 /2021सूनगाव येथील बजरंग दल गोरक्षक यांचे कडून पोलिसस्टेशन जळगाव जा महिती मिळाली कि , एक इसम टाटा मॅक्सीमो मालवाहु गाडी क्र एम एच 27 एक्स 5412 मध्ये बैल जामोद कडून जळगाव जामोद कडे कोंबून घेवून जात आहे . त्यानुसार सहाययक पोलीस निरीक्षक सागर भास्कर खाजगी वाहनाने निघुन सुनगाव येथे पोहोचले आणी रोडवर नाकाबंदी करत हजर असता खबरीप्रमाणे एक टाटा मॅक्झीमो मालवाहू गाडी क्र एम एच 27 एक्स 5412 मध्ये काही इसम बैल घेवून येतांना दिसले सदरचे वाहनाबाबत आम्ही खात्री केली व सदरचे वाहन पंचासमक्ष थांबवून त्यांची पाहणी केली असता त्यामध्ये 1.एक लालसर बैल ज्यांचे शिंगे मागे असलेले वय अंदाजे 8 वर्ष चेह – यावर बाहडा शेपटाचा गोडालाल असलेला किमती अंदाजे 6000 रूपये 2.एक पांढ – या रंगाचा बैल त्याचे शिंगे मागे असलेली क्य अंदाजे 7 वर्य शेपटाचा गोंडा काळा असलेला किमती अंदाजे 7000 रूपये3.एक पाढ – या रंगाचा बैल उभे शिंगे असलेला वय अंदाजे 7 वर्ष शेपटाचा गोंडा काळा किंमत 6000 रूपये 4.एक धामण्या रंगाचा बैल उभे शिंगे असलेला क्य अंदाजे 9 वर्ष शेपटाचा गोंडा काळा असलेला किंमत अंदाजे 5000 रुपये असे चार बैल त्यांना वेदना होतील अशा रितीने आणी त्यांच्या उंचीच्या आणी रंदीच्या आणी जाळीच्या मानाने पुरेसे नसलेमुळे वाजवीरीत्या हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने वाहतूक करीत होते त्यानुसार प्राण्यांनाक्रूरतेने वागविणे प्रतिबंध नुसार अप नं613 /2021 कलम 11 (1)घ /ड/ च नुसार आरोपी शेख रिहान शेख बटू वय 26 राहणार जामोद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करीत आहे

अपंग तक्रार निवारण समित्या गठीत करा

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटना चा जिल्हाधिकारी यांना निवेदन

अमरावती :- अपंगांना त्वरीत न्याय मिळावा व त्यांच्या तक्रारीवर त्वरीत कार्यवाही व्हावी , नवीन अपंग हक्क अधिनियम 2016 कायदामध्ये , जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस विभाग , जिल्हा परिषद , पंचायत समिती , तहसिल या शासकीय कार्यालयामध्ये अपंगांसाठी अपंग तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी असे शासनाचे आदेश असून सुध्दा प्रशासनाच्या बोगस कारभारामुळे या समित्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व अपंग हक्क अधिनियम कायदा ची अवेलना करण्यात आली अपंग हक्क अधिनियम कायदा हा अपंगांचा न्याय व हक्कासाठी असून तरी या कायदा ची सक्तीने अंमलबजावणी होत नाही आहे तरी आपण आपल्या स्तरावर या सर्व विभागात अपंग तक्रार निवारण समित्या गठीत कराव्या व अपंगांच्या तक्रारीवर त्वरीत या समितीच्या मार्फत कार्यवाही करण्यात याव्या . जेणेकरुन अपंगांना त्वरीत न्याय मिळेल व त्यांच्या तक्रारीवर त्वरीत कार्यवाही होणार असे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देणयात आले यावेळी सुधाकर काळे,मयुर मेश्राम राजीक शहा, शेख रुस्तम, राहुल वानखडे, मुतलीक चौस

विज वितरण कंपनीच्या कार्यालयात युवा सेनेने सोडला साप

0

 

विज कंपनीच्या विरोधात युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांचे आंदोलन

अचानक साप सोडो आंदोलनाने अधिकारी धास्तावले

नांदगाव खंडेश्वर/
नांदगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे वेळी आवेळी लोडशेडिंग नसतांना वीज जाते त्यामुळे अचानक युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी साप सोडल्यामुळे अधिकाऱ्यांत प्रचंड धावपळ सुरू झाली
स्थानिक वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारा विरोधात युवा सेनेने अचानक साप सोडो आंदोलन केले सतत विजेचा लपंडाव सुरू असून उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे यांना तक्रारी देऊन सुद्धा विजेचा खेळखंडोबा थांबला नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून बहुतांश भागात होलटेज नसल्यामुळे नगरपंचायत व ग्रामपंचायत चा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे स्ट्रीट लाईट बंद पडले त्यामुळे पावसाळ्याचे दिवस असून दररोज साप निघत आहे म्हणून वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे एक महिन्यापासून नागरिक त्रस्त आहे स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील एक्सरे मशीन व इतर यंत्रे होलटेज अभावी निकामी झाले आहे अनेक सोयी सुविधा मिळत नाही त्यामुळे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कंपनीच्या कार्यालयात साप सोडो आंदोलन केले व सात दिवसाचा अलटिमेट दिला आहे यावेळी सरपंच गोकुळ राठोड, सूरज औतकर,निखिल मोरे, निलेश निंबरते, पवन ठाकरे, अक्षय राणे, अजय काळे, धनंजय भडके, आशिष हटवार, पंकज रामगावकर, पवन पुसदकर,अक्षय तुपट, आशिष भाकरे, पवन मोकडेकर, अभय बनारसे,शुभम रावेकर, अमन मानकर, रोशन भातुलकर, विक्की बविस्थळे, सागर गटूले, तेजस जवळकर, श्याम मुळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

 

खाजगी चालकास एक लाख रुपयांनी गंडविले एटीएम कार्ड अदलाबदल प्रकरण

0

 

नांदुरा : प्रफुल्ल बिचारे

अज्ञात इसमाने एटीएम कार्डची अदलाबदल करून बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात १ लाख रुपये वर्ग करून खासगी चालकास एक लाख रुपयांना गंडविल्याची घटना १७ जुलैला दुपारी १२ ते ५.३० वाजण्यादरम्यान येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील एटीएममध्ये घडली. याबाबत अलमपूर येथील सुनील मारोती देशमुख (वय ३०) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी पैसे निघाले नाही. रांगेत उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने कार्ड टाकून पिन नंबर टाकण्याचे म्हटले. मात्र, त्यानंतरही पैसे न निघाल्याने त्याने कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगितले. घरी परतल्यानंतर भ्रमणध्वनीवर दहा हजार रुपये काढल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यावेळी एटीएम कार्डची पाहणी केली असता त्यावर नारायण बटवात असे लिहिलेले होते. त्यानंतर थोड्यावेळाने एकापाठोपाठ एक पैसे काढल्याचे संदेश मोबाईलवर आले. तत्काळ बँक प्रबंधकांना भेटून घडलेली घटना सांगितली. बँक खाते ब्लॉक केले तोपर्यंत अज्ञात इसमाने खात्यातून १ लाख ६ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ४२० भादंवी अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास स.पो.नि. विरणक करत आहेत.

डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयात आमदार अभिजीत वंजारी याँचा सत्कार

0

 

सचिन वाघे वर्धा  हिंगणघाट

विधान परिषदेचे नागपूर विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार अॕड.अभिजीत वंजारी यांनी डाॕ.बी,आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली.यावेळी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्प देऊन डाॕ.बी.आर.आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचीव श्री. अनिल जवादे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विधान परिषदेकरीता पदवीधर मतदार स़ंघातून निर्वाचीत झाल्यानंतरची त्यांची हिँगणघाट शहराला ही पहिलीच सदिच्छा भेट होती.याप्रसंगी विचार मंचावर नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डाॕ.शकील सत्तार , काॕग्रेसचे नेते डेहने पाटील,किसान अभियानचे प्रविण उपासे श्री.महाजन ,पत्रकार इकबाल पहिलवान , अब्दुल अमिन ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.राजू मंगेकर प्राचार्य एस.एम.राऊत,मुख्याध्यापक देवतळे यांची उपस्थिती होती,
सत्काराला उत्तर देतांना बेरोजगार संघटनेचे प्रश्न ,पदवीधर मतदारांचे प्रश्न ,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ,संस्था संचालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे त्यांनी सांगितले. २००५ पूर्वी नियुक्त परंतु २००५ नंतर अशंता किंवा १००% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी,अटीची पुर्तता करणाऱ्या विनाअनुदानीत शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत असेही त्यांनी सांगितले.विदर्भातील विद्यार्थी mpsc, Upsc च्या परीक्षेला बसतात परंतु पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ते कमी पडतात .अशा होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाव ,त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पदवीधर भवन बांधन्याची संकल्पना आपण जिल्हा नियोजन बैठकीत मांडलेली असून त्यात लवकरच यश मिळेल असे ते म्हणाले.सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे व त्यासाठी त्यांना उद्योगाकडे वळविणे व त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण प्राप्त करून देणे यावर आपला भर असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या दरम्यान जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लवकर लागू करावी यासाठी अॕड.अभिजीत वंजारी यांना निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे संंचालन आणि आभारप्रदर्शन श्री .गोपाल माँडवकर यांनी केले.

साकळी शिवारातुन विना परवाना अवैध गौण खनिजची चोरटी वाहतुक करणारा डंपर महसुलच्या पथकाने जप्त करून दंडात्मक कार्यवाही

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी शिवारातुन विना परवाना अवैध गौण खनिजची चोरटी वाहतुक करणारा डंपर महसुलच्या पथकाने जप्त करून दंडात्मक कार्यवाहीसाठी यावल पोलीस स्थानकात जमा करण्यात आला आहे.
याबाबत महसुल प्रशासनाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास साकळी शिवारातील वढोदे प्रगणे यावल क्षेत्रात तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गस्ती पथकाच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत नायब तहसीलदार आर. डी. पाटील, निवासी नायब तहसीलदार आर के पवार, अव्वल कारकुन निशा चव्हाण लियाकत तडवी, विरावली तलाठी यांच्या पथकाला डंपर क्रमांक एमएच १९ झेड८९७५या वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले. याबाबत विचारणा केली असता वाहनचालक किरण वसंत धनगर (राहणार कासवे तालुका यावल) याने कासवे येथील राहणारे गुणवंत वसंत बादशाह यांचे मालकीच्या डंपर मध्ये असलेल्या वाळुचा परवाना नसल्याचे सांगीतले. यावेळी डंपर वाहनात विनापरवाना गौण खनिज २ ब्रास वाळुची वाहतुक करतांना दिसुन आले म्हणुन महसुलच्या पथकाने कार्यवाही करीत हा डंपर पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी ताब्यात घेवुन त्यास यावल पोलीस स्टेशनला जमा केले आहे.

राज्यमंत्री सत्तार यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त प्राचार्य चापेंच्या वाढदिवसानिमित्त 151 वृक्षांची लागवड

0

 

आयुषी कुुलकर्णी( औरंगाबाद)

सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत वृक्षलागवड करतांना सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे कृष्णा लहाने,प.पु.स्वामी अखंडानंद गिरी महाराज ,प. पु.ओंकारगिरी महाराज,प.पु.दयानंद महाराज शेलगाव ,ह.भ.प. नामदेव महाराज वाकी, ब्रह्मकुमारी छाया दीदी ,प.पु.दिगंबर दादा ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर ह.भ.प.संतोष महाराज आढावणे ह.भ.प.रामेश्वर महाराज पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन गाढे,दीपाली ताई भवर आदी

*सिल्लोड*: वृक्ष लागवड काळाची गरज असून सध्याची परिस्थिती पाहता आक्सीजन निर्मिती करणाऱ्या झाडांची जास्तीत जास्त लागवड करावी असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सेवानिवृत्त प्राचार्य सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव चापे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.कृष्णाजी लहाने सर व शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळचे वतीने निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड येथे आयोजित १५१वृक्षांचे वृक्षारोपण व वृक्षदिंडीच्या कार्यक्रमात बोलताना केले .
यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांचे सामाजिक ,शैक्षणीक, अध्यात्मीक व इतर क्षेत्रात योगदान आहे ,वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून यथोचित सन्मान होत आहे असे ते म्हणाले, यावेळी प.पु.स्वामी अखंडानंद गिरी महाराज ,प. पु.ओंकारगिरी महाराज,प.पु.दयानंद महाराज शेलगाव ,ह.भ.प. नामदेव महाराज वाकी, ब्रह्मकुमारी छाया दीदी ,प.पु.दिगंबर दादा ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर ह.भ.प.संतोष महाराज आढावणे ह.भ.प.रामेश्वर महाराज पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुन गाढे,दीपाली ताई भवर,रेखाताई विश्वासराव गाढे,नगर परिषदगटनेते नंदकिशोर सहारे,नगरसेवक प्रशांत क्षीरसागर नायब तहसीलदार संजय सोनवणे, नायब तहसीलदार सागर मुंडदा, पो निरीक्षक राजेंद्र बोकडे, पो उपनिरीक्षकआडे, पो उपनिरीक्षक अंधारे, ह.भ.भ. ज्ञानेश्वर महाराज सासमकर ,ह.भ.प.भगवान महाराज जंजाळ ह.भ.प.समाधान महाराज बसंते,ह.भ.प. अजबराव महाराज मिरगे ,ह.भ.प.मनोज महाराज भाग्यवंत ,ह.भ.प.रविंद्र महाराज राजहंश, ह भ प गजानन महाराज, जुनिअर शाहरुख शफी अन्सारी, सा.का.अमोल भोकणाल,ह भ प गणेश महाराज थोरात ,ह भ प विष्णु महाराज कुदळे,ह भ प दादाराव महाराज राऊत, डॉ. गजानन काकडे ह.भ.प.कमलाकर महाराज पिंगाळकर,संतोष पाटिल देवरे, सुरेश पाटील सुलताने ,डा.निलेश मिरकर डा.अक्षय खंडेलवाल,डा्.विकास गोठवाल ,डा. पाखरे साहेब, राजेंद्र ठोंबरे ,सयाजी वाघ,जगन्नाथ काकडे, प्रवीण मिरकर,दत्तात्रय भवर ,प्राध्यापक घारोळे , प्राध्यापक शिंदे , रमेश शेठ कासलीवाल ,अनिल बोरा, अनिल मिटकरी, अनिल गाढे , हरिचंद्र काकडे, दत्तू पाटील बडक , धोंडीबा काकडे ,पंकज पाटील संतोष चाबुकस्वार, श्रीमती संगीता पाटील, श्याम कुमार सोनवणे ,सुखदेव काटकर दादाराव खिल्लारे,शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळ सर्व कर्मचारी तसेच माऊली वारकरी शिक्षण संस्थचे शिक्षक व विद्यार्थी, सामाजिक, राजकीय, व्यापारी व इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा जैवाळ यांनी आभार प्रदर्शन कृष्णा लहाने यांनी केले.