Home Blog Page 440

जनमत दारूबंदी हटवून वर्धा जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आना !

0

 

सचिन वाघे वर्धा
दि.19 जुलै
दारू बंदी हटाव वर्धा जिल्हा समितीचे आमदारांना साकडे दारूविक्री आणि अर्थव्यवस्था यांचा थेट संबंध आहे. मद्यप्राशन ही पूर्वापार चालत आलेली मनुष्याच्या इतर क्रियाकलापांसारखी एक नैसर्गिक व सामान्य क्रिया आहे. मात्र,48 वर्षांपूर्वी गांधी जिल्हा असण्याच्या सबबीखाली वर्धा जिल्ह्यात अनैसर्गिक दारूबंदी करण्यात आली. त्यामुळे, वर्धेकरांचे दारू पिणे बंद झाले नसून उलट दारूचे अनावश्यक आकर्षण जनतेत निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दारूनिर्मिती आणि विक्री सुरू असून ह्या अवैध दारूनिर्मिती आणि विक्रीमुळे काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था आपल्या जिल्ह्यात विकसित झाली आहे. सामान्य, गोरगरीब लोकांना हलक्या दर्जाची, नकली व महाग दारू प्यावी लागत असून त्यामुळे लाखो लोकांच्या आरोग्याचा व त्यावरील महागड्या उपचारांचा प्रश्न उभा ठाकला आहे. विषारी दारूमुळे शेकडो मृत्यू झाले असून मृतांवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे जीवन उध्वस्त झाले आहे.

एकाच देशात, एकाच राज्यात विविध राज्य किंवा जिल्ह्यांना वेगळा न्याय लावणे भारतीय राज्यघटनेशी पूर्णतः विसंगत आहे. जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 तिथे रद्द झाले असले तरी वर्धा जिल्ह्यात ते दारूबंदीच्या रूपाने अप्रत्यक्षपणे लागू आहे. दारूबंदीने जिल्ह्याचा विकास पूर्णपणे खुंटला असून 10 वर्षाची 1 पिढी मानल्यास गेल्या 5 पिढ्या दारूबंदीने बरबाद केल्या आहेत. पोलिसदलाचे गुन्हेगारीकरण व पोलिसांची भ्रष्टाचारी अशी प्रतिमा दारूबंदीने निर्माण केली असून पोलिस दलाला पूर्वीची प्रतिष्ठा व दरारा प्राप्त करून देण्यासाठी देखील दारूबंदी हटविणे आवश्यक आहे.

अवैध दारूविक्रीच्या धंद्यात मोठे माफिया उतरले असून ह्या धंद्यातून त्यांनी प्रचंड माया गोळा केली असून ह्या काळ्या पैशाच्या बळावर त्यांनी राजकारणात उतरून लोकप्रतिनिधीची मोठमोठी पदे बळकावली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून असे अवैध धंदे करणारे, गुन्हेगार, चारित्र्यहीन लोक प्रस्थापित होऊ पाहत असल्याने देशाच्या लोकशाही रचनेला मोठा धोका निर्माण झाला आहे. अवैध दारूच्या आधारे येथे इतर अवैध व्यवसाय देखील फोफावले असून सामान्य नागरिकांचे ह्या नव्या व्यवस्थेद्वारे प्रचंड शोषण केले जात आहे.

थोडक्यात, दारूबंदी अनैसर्गिक अव्यवहार्य आहे आणि ती त्वरित जिल्ह्यातून उठवून येथील जनतेचे जीवन सुसह्य करण्याची तातडीची गरज आज आहे. गांधीजी केवळ वर्धा जिल्ह्याचे नव्हे, तर देशाचे राष्ट्रपिता मानले जातात आणि म्हणून त्यांच्या बहाण्याने केवळ एका जिल्ह्यात दारूबंदी लावणे म्हणजे त्यांच्या कर्तुत्वाला संकुचितपणा आणणे आहे. संपूर्ण देशात दारूबंदी नसेल तर वर्धा जिल्ह्यात ती लावणे देखील महापुरुषांना कमीपणा आणणारे आहे आणि वर्धेकरांवर अत्याचार करणारे आहे. त्यामुळे, वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याविषयी आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा तसेच मा. मुख्यमंत्र्यांशी व इतर संबंधित सर्व व्यक्ती व संस्थांशी संपर्क साधून दारूबंदी उठविण्याकरिता प्रयत्न करावेत व वर्धेकर जनतेला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन “दारूबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलन समिती”ने वर्धेचे आमदार श्री. पंकज भोयर यांची जिल्हा विश्रामगृहात भेट देऊन दिल. ह्या संदर्भात आमदारांनी समितीचे म्हणणे ऐकून घेतले व शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

शिष्टमंडळात श्री सचिन म्हैसकर, श्री राहुल करंडे, श्री मनीष पुसाटे, श्री किरण पट्टेवार, श्री प्रफुल येसनकर, श्री सिद्धान्त कांबळे, श्री करण गेडाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. दारूबंदी हटविण्याच्या चळवळीत सर्व वर्धेकरांनी सामील होण्याचे आवाहन दारूबंदी हटाव समितीने केले आहे.

गावातील ग्रामस्थाना स्थाही पटे नाहीतर आमरण उपोषण कामगार नेते डॉ उमेश वावरे

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.19 जुलै ग्रा,प,किन्हाळा ता,समूद्रपूर हयानी दि,21,7,2020, ला सर्वानी मते ठराव पारीत केला त्या ठरावाच्या अनुषगाने ग्राम पंचायतीची गावठान चि जमीन असून त्या वर अतिक्रमण झालेले आहे ।
सदर गावठान च्या जागेवर प्रत्येकास एक सारखे मोजून तेथील नागरिकाना प्लांट देण्यात यावे।
सदर अर्जदार प्रतंप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असून सदर ग्राम पंचायत याचा कडे दुर्लक्ष करत आहे
हि बाब 15 दिवसाच्या आता निकाली काडावी अन्यथा आमरण उपोषन करण्यात येईल असा ईशारा कामगार नेते डॉ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत जिलाधिकारी वर्धा याना निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना, मनिष कांबळे , दिलिपकहूरके ,जिवन उरकुडे, ,देवेन्द्र त्रिपल्लीवार , प्रणय पाटील, नुतन राठोड़, दिलीप बालक,अतीश माडवे, सुरेश दुधकोहके, निखिल बोबडे, मंगेश पाटील, प्रणय बावणे,तुषार पाटील, सचिन ठाकरे, गजानन नागेशे, मंगला वंतारी, कचरू बावणे, मालता बावणे, संजय बगडे, जितेन्द्र चौधरी,इदु वंतारी,सरला शेन्डे, विलास गेडाम,शिला गेडाम,संगीता बावणे,यशोदा दुधकुरे, संविता नागोसे, राहूल पाझारे, सुयोग्य पाटील, रोहीत झगडे,नागेश पाटील,रोशन पाटील, इत्यादि ग्रामस्थ उपस्थिति होते,,

शिवसेना जिल्हाप्रमुख श्याम देशमुख यांचा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिव संपर्क अभियान दौरा :

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिवसंपर्क अभियान मोठ्या जोमाने सुरू झाले असून यामध्ये पंचायत समितीच्या आठही गणात हा दौरा करण्यात आला लोणी ,मोरगाव, धानोरा फशी, शिवणी रसुलापुर ,मंगरूळ चव्हाळा ,पिंपळगाव निपाणी ,पापड वाढोणा, माऊली चोर ,या गावी मीटिंग घेण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख शाम भाऊ देशमुख उपजिल्हाप्रमुख प्रमोद भाऊ कटाळे प्रमुख अतिथी सहसंपर्क प्रमुख माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील ,ज्योतीताई अवघड जिल्हाप्रमुख महिला आघाडी ,विष्णुपंत तिरमारे तालुकाप्रमुख ,छायाताई भारती महिला आघाडी तालुकाप्रमुख ,तसेच उपतालुका प्रमुख दिलीप भाऊ देवतळे, उमेश चौकडे ,शहर प्रमुख अरूण लाहबर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा करण्यात आला यामध्ये प्रत्येक गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ शिवसैनिक ,सेवा सहकारी सोसायटी सदस्य, संजय गांधी निराधार योजना तालुका समितीचे सदस्य अरूण लाहबर, सौ उगलेताई ,श्रीकृष्ण दहातोंडे यांचा सत्कार करण्यात आला या दौऱ्याचा मुख्य उद्देश शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री उद्धव साहेब ठाकरे कर्जमाफी सारख्या मोठ्या सरकारच्या योजना घोषित करत आहे त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत शिवसैनिकांनी पोहचवुन त्याची माहिती जनतेला द्यावी यासाठी हे अभियान राबवण्यात आले असल्याचे जिल्हाप्रमुख श्री श्याम भाऊ देशमुख यांनी सांगितले तालुक्यातील लोणी येथील शाखाप्रमुख संजय गायगोले ,महाजन, मोरगाव येथील शाखाप्रमुख पप्पू थेटे ,धानोरा येथील शाखाप्रमुख प्रकाश पाटेकर शाखाप्रमुख मधु भाऊ कोठाळे पुंडलीकराव तर्हेकर, आशिष हटवार, गोकुल राठोड मंगरुळ चव्हाळा शाखाप्रमुख विनोद भाऊ पिंपळकर गजानन लायब्ररी, मोरेश्वर परळीकर, गजाननराव खांडेकर, डॉक्टर जांगडा, सालोड, पिंपळगाव येथील शाखाप्रमुख सुभाष मिसाळ रवि बांबटकर, सुनिल थोरवे, श्रीकृष्ण दहातोंडे राजु राऊत, सतिश पाडर, प्रमोद मिसाळ,वाढोणा रामनाथ शाखाप्रमुख विजुभाऊ अजबले, आशिष यलोरे, सुरेश क्षिररसागर ,रामहरी राऊत, बाळू काजे ,बंडू रोहणकर, विजु भोयर माऊली शाखाप्रमुख मंगेश सुरोशे,शिवाजी शिंदे, शिवाजी कोरडे, यांनी अभियान यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले

पैशाच्या वादातून चारचाकी वाहन अंगावर घालून शिवीगाळ

0

 

नांदुरा: (प्रफुल्ल बिचारे)

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ४६ वर्षीय इसमाच्या अंगावर पैशाच्या वादातून चारचाकी वाहन घालून शिवीगाळ करीत खिशातील १२०० रुपये काढून घेतल्याची घटना लोणवडी ते माळेगाव गोंड फाट्यादरम्यान शंकर सोळंके यांच्या शेतामध्ये १७ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान घडली.
लोणवडी येथील कैलास महादेव सातव यांनी नांदुरा पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये लोणवडी ते माळेगाव फाट्यादरम्यान सकाळी पायी फिरतअसताना आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन गोंड, रा. माळेगाव गोंड यांनी त्यांची चारचाकी गाडी अंगावर घातल्याने खाली पडलो, तसेच रस्त्याच्या खाली शेतात नेऊन माझे ५ लाख रुपये दे, नाही तर गायब करून टाकीन, असे म्हणत शिवीगाळ केली. खिशातील १२०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३९४ अन्वये गुन्हा नोंदविला. याबाबत अधिक तपास नांदुरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार करीत आहेत.

राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाची पत्रकार भवनाची मागणी

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील सर्वच छोट्या मोठ्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. तसेच नांदुरा शहरात पत्रकार परिषद घेण्यासाठी सुद्धा हक्काची जागा नाही. यामुळे नांदुरा शहरात पत्रकार भवन बांधून मिळावे याकरिता राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे,तालुका सचिव प्रफुल्ल बिचारे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,पवन चव्हाण, व इतर पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

पदविका डिप्लोमा धारकांना संपवण्याचा कट व महाराष्ट्र कौन्सिलिंग यांनी लावलेले निर्बंध तातडीने स्थगित करण्यात यावा तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील.

0

 

 

 

महाराष्ट्र राज्य पशु सेवादाता संघटना तालुका संग्रामपुर कार्यकारणी मंडळ जिल्हा बुलढाणा

पशुधन पदविकाधारकांना कायमस्वरूपी संपवण्याचा कट महाराष्ट्र काउंसलिंग यांनी रचलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद मध्ये पर्यवेक्षक श्रेणी 2 दवाखाना येथील पद भरतात आणि शासनच यांना बोगस डॉक्‍टर म्हणतात यामध्ये शासनाचा प्रोटोकॉल चुकत आहे. वेळेस पदविका धारकांनी शासनास मदत केलेली आहे उदाहरणार्थ लसीकरण बिल्ले टोचणे कृत्रिम रेतन पशु जनगणना इत्यादी मदत करत आहे. परंतु शासनाने पदविका धारकाची पिडवणुक करून बोगस डॉक्टर म्हणून आमचे अस्तित्व कायमचे मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचे पशुधन पदविकाधारक हे शेतकऱ्याच्या दारावर व शेतापर्यंत पशु सेवा पुरवितात म्हणून शेतकऱ्याचे पशुधन जिवंत आहे. आज भारत वर्षांमध्ये शंकर जनावराची पैदास कुत्रिम रेतन द्वारे तयार झाले आहे. याचे स्वयंपूर्ण श्रेय पदविका धारकांना जाते B.V.S.C /L.D.O हे डॉक्टर फक्त कागद काळे करणे आणि लाखो रुपयाचा पगार घेणार पुरताच मर्यादित आहे म्हणून आम्ही काम बंद संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू केले आहे.
संपाचे उद्देश काय हे शासनाकडे मागणी
1) पदवीकाधारक यांचे बेरोजगारी प्रमाण वाढत असल्याकारणाने विविध जागी जसे शासकीय विभागात रोजगारी च्या संधी उपलब्ध करा.
२) महाराष्ट्रात भारतीय पशु वैद्यकीय परिषद अधिनियम १९८४ कायदा रद्द करा.
३) पशुसंवर्धन पदविका धारक व्यक्तींना आरोग्य खात्यातील नर्सिंग प्रमाणे नोंदणीकृत करण्यात यावे.
४) पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदावर पदविका धारकाचे पद भरण्यात यावी.
५) पशुसंवर्धन पदविकाधारक बेरोजगार युवकांना शासनाने किमान १० लाख रुपयांचे कर्ज पशुपालन किंवा व्यवसाय करीता उपलब्ध करून द्यावे.

आळंदीत आयकाॅन क्लासेसच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

0

 

आळंदी : कोरोनाच्या महामारीत सर्वच पालक आर्थिक अडचणीत सापडले होते याची जाणीव ठेवून मुलांच्या भविष्यासाठी आयकाॅन क्लासेस चे संचालक प्रा.हरीश जगताप सर, नगरसेवक सचिन गिलबिले व मा.नगरसेवक दिनेश घुले यांच्या सौजन्याने आळंदी शहरातील आठवी, नववी, दहावी व अकरावीच्या मुलांसाठी मोफत ॲानलाईन क्लासेस सुरू केले होते. त्यात इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवार १६ जुलै रोजी लागला. त्यामध्ये समृध्दी आंधळे व स्नेहल गाडेकर या विद्यार्थिनींनी गणित या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचा आयकॉन क्लासेस च्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ११,१११ रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला,तसेच ९७ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रा.हरीश जगताप सर यांनी कठीण परिश्रम, सातत्य, संघर्ष, त्यातून मिळणारे यश, परिवाराची साथ व गुरूजनांचे मार्गदर्शन याविषयी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नगरसेवक सचिन गिलबिले, मा.नगरसेवक दिनेश घुले, मा.नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, नगरसेविका शैला तापकीर, शहरप्रमुख अविनाश तापकीर, राहूल सोमवंशी, विपुल तापकीर, रामभाऊ कांबळे, उमेश गिलबिले, भाऊसाहेब कोळेकर, प्रशांत जगताप, वैभव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते

शिवशाही बसने माऊलींचे पंढरपूर कडे प्रस्थान

0

 

आळंदी : सतरा दिवसांच्या मुक्कामानंतर तीर्थक्षेत्र आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलेल्या शिवशाही बस मधून आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाने पंढरपूर कडे हरीनामाच्या गजरात मार्गस्थ झाल्या. सोमवारी पहाटे नित्य पुजा व आरती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली, साडे सहा ते साडे आठ धोंडोपंत दादा अत्रे फडाची कीर्तन पाडुन माऊलींचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 40 वारकर्यांच्या उपस्थित दोन शिवशाही बस मधुन पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
2 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुकांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. मात्र करोनामुळे शासनाच्या निर्देशानुसार सतरा दिवस माऊलींच्या पादुकांचा मुक्काम आळंदीत आजोळघरी होता. यावेळी वारीच्या वाटेवर जे काही परंपरेनुसार रिंगण सोहळा सोडून बाकीचे कार्यक्रम असतात ते सर्व माऊलींच्या मंदिरात प्रतिनिधीक स्वरूपात पार पडले.
शिवशाही बसमधून माऊलींसोबत चाळीस वारकरी जाणार आहेत. त्यामध्ये संस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, विश्वस्त योगेश देसाई यांच्या सहीत माऊलींचे मानकरी, सेवक, वारकरी यांचा समावेश आहे.
पंढरपूर तालुक्यात दुपारी 2 वाजता वाखरी येथे पोचतील, तेथे इतरही मनाच्या पालख्या बसमधून येणार आहेत. तेथे सर्व संतांची भेट होऊन पुन्हा पंढरीत पादुका विसावतील. त्यानंतर 24 जुलैला पौर्णिमेला काला करून पादुका आळंदीकडे मार्गस्थ होतील.

आ. समीर कुणावार यांचे निधीतुन ७ रुग्णवाहिकांचे लोकार्पण

0

 

हिंगणघाट दि.19 जुलैकेन्द्राने राज्यात दिलेल्या ६ हजार ५०० कोटि रूपयाच्या लसीमुळे राज्याचे वाचलेली रक्कम आरोग्यासाठीच उपयोगात आणली पाहिजे,केंद्र सरकारमधे स्व.अटलजी पंतप्रधान असतांना आरोग्य हा राज्याचा विषय असतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या अनेक योजना सुरु करण्यात आल्याची माहितीही रुग्णवाहिका लोकार्पण समारोहप्रसंगी माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक विकास निधीतुन देण्यात आलेल्या सात रुग्णवाहिकांचे लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी त्यांनी लोकाभिमुख कार्याची स्तुती केली,समिर कुणावारांचे रूपाने त्यांनी मतदारसंघाला कार्यसम्राट आमदार लाभले असल्याचा उल्लेख करीत त्यांनी कुणावार यांचे कौतुक केले.
आज दिनांक १८ जुलै रोजी स्थानिक निखाडे शभागृह येथे उपरोक्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे राज्य सचिव राजेश बकाने, हिंगणघाट नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसतांनी,जि प सभापती माधव चंदनखेडे,पंचायत समिती सभापती सुरेखा टिपले,सौ शारदा आंबटकर,सिंदी येथील नगराध्यक्षा सौ बबिता तुमाणे,समुद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत,भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष भुपेंद्र शहाणे,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष नितीन मडावी इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान राज्य सचिव राजेश बकाने,नागराध्यक्ष प्रेम बसंतांनी,जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे,हिंगणघाट तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,समुद्रपुर तालुकाध्यक्ष संजय डेहणे, राकेश शर्मा इत्यादींनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्थानिक नगरसेवक, उपस्थित जि प सदस्य,पंचायत समिती सदस्य,आरोग्य विभागाचे अधिकारी व भाजपा कार्यकर्ते यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले
सदर रुग्णवाहिका उपजिल्हारुग्णालय हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय तसेच समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी,गिरड व प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदी (रेल्वे),हमदापूर,हिंगणघाट तालुक्यातील पोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे देण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात रुग्णांची मोठी हेळसांड झाली रुग्णवाहिकेअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला यावेळी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद नजरे समोर ठेऊन आपल्या स्थानीक आमदार निधीतून १कोटी २७लक्ष रुपये दिल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले,या वेळी पुढाकार घेऊन डाँ. चाचारकर,डॉ.माधुरी कुचेवार तसेच आरोग्यविभागाचे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून अनेकांचे प्राण वाचविता आले याचे समाधान असल्याचे कुणावार यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे संचालन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे यांनी केले व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष आशिष पर्बत यांनी केले.

इंद्रायणी तीरावर “विठू माझा लेकुरवाळा” हे भिंतचित्राचे लोकार्पण

0

 

पुणे- आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकल्पनेतुन आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या सौजन्याने पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवासाच्या भिंतीवर विठू माझा लेकुरवाळा हे भिंतचित्र साकरण्यात आले असून या चित्राचे लोकार्पण सोहळा श्री.सदगुरु मनोहर मामा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख अॅड.विकास ढगे पाटील,आळंदी पोलिस स्टेशनचे ज्ञानेश्वर साबळे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,नगरसेवक प्रशांत कुर्‍हाडे,शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष आनंद मुंगसे,माजी नगरसेवक रमेश गोगावले तसेच शिवतेज मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि मामांचे भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या भिंतीवरील चित्रात श्री विठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वासुदेव, वारकरी विणेकरी, तुळसधारी वारकरी महिला प्रतिनिधी साकरण्यात आले आहे हे चित्र अक्षय भोसले, धीरज पोटफडे, मोहन पाटोळे, नवनाथ कोरके, सुजल ओव्हाळ आणि माणिक तोरवार या कलाकारांनी साकारले आहे.