Home Blog Page 44

वणा नदी संवर्धन समितीमुळे पियुष इन्फ्रा कंपनीवर 14,57,610 रुपयांचा दंड! (Crimenews)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट तालुक्यातील डंकीन परिसरात वणा नदीच्या पात्रातून औरंगाबाद येथील पियुष इन्फ्रा कंपनीने बंधाऱ्याच्या बांधकामादरम्यान कोणतीही प्रशाशकिय वैध परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

या प्रकरणी वणा नदी संवर्धन समितीने या परिसरात जावुन रेती साठ्याचे फोटो व व्हिडिओ काढली होती. मोक्का चौकशी नायब तहसीलदार कांबळे व तलाटी,पटवारी सय्यद अहमद शेख यांनी १००ब्रास रेती असल्याचे सागितंले होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगा व्दारे झालेल्या परीक्षेत लेफ्टनंद पदी निवड झाल्याबदल आधार फाउंडेशन च्या वतीने वेदांत कोळसे यांच्या सत्कार.(Hingnghat)

दुसऱ्या दिवशी नायबतहसिलदार सागर कांबळे यांना निवेदन देवुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.यानंतर प्रशासनला वेळोवेळी अवगत करुन चौकशीची मागणी कोणताही दबाव न टाकता महसूल मित्र या नात्याने आम्ही प्रशासनाला सहकार्य करत होतो.

तहसीलदार योगेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रेती मोजनीचे आदे्श दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोजनी मध्ये ६३.१० ब्रास रेती असल्याचे निषपन्न झाले.व तो अहवाल तहसीलदार शिंदे यांना देवुन उपविभागीय अधिकारी याच्या कडे वर्ग केला. उपविभागीय अधिकारी याच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी कंपनीवर 14,57,610 रुपयांचा दंड ठोठावला हेच सिध्द झाले कि कंपनी कडून अवै रेती उचलून झालीआहे.

मात्र, या दंडाच्या रकमेवर वणा नदी संवर्धन समितीने तीव्र असमाधान व्यक्त केले आहे. दंडाची रक्कम चौपट करावी कारण इतक्या मोठ्या प्रमाणात रेती साठा काढण्यात मशीनरीचा वापर निश्चित झाला आहे.परंतु गैरकायदेशीर खनिज चोरीचा गुन्हा दाखल केला नाही.या प्रकरणात अवैध रेती उपसण्यासाठी वापरलेली संसाधने आणि वाहतूक साधने जप्त करण्यात आली नाही.

पंचनामा होवुन सुधा कंपनीडुन रेतीची विलेवाट लावण्यात आले कारण १००ब्रास रेती ही महसूल विभागाच्या पाहणीत होती मग ३७ ब्रास रेतीचे काय झाले हा मोठा प्रश्न आहे. वणा नदी संवर्धन समितीच्या वेळोवेळी हा विषय प्रशासनाच्या लक्षात आणुन दिला नसता तर भविष्यात पियुष इंटस्टक्चर कंपनीकडून एक ते सव्वा कोटी रुपयांची रेतीचा शाशनाचा खनिज महसूल बुडवला असता. तसेच, बंधारा खोदकाम दरम्यान आढळलेल्या *मानवी अवशेषांची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पियुष इन्फ्रा कंपनी आणि पाटबंधारे विभागावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने समितीने नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत पोलिस प्रशासनाने तातडीने कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी समितीने केली होती.प्रशासनाच्या ढिसाळ कारवाईमुळे आणि प्रकरणाच्या गंभीरतेवर योग्य पावले न उचलल्याने वणा नदी संवर्धन समितीने न्यायासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे सदर कंपनी यात नदीवर काम करीत असताना पर्यावरणाचा विचार सुरक्षेच्या दुष्टीकोनातुन कोणत्याही उपयोजना केले नाही आहेत याबाबत अधिकार्यांनी सक्त समज द्यावी जेणेकरून कोणतीही घटना घडु नये.

Crimenews:वणा नदी संवर्धन समिती ही सार्वजनिक कामात अग्रण्य असते विचार भविष्यात पण राहील. यांनी संपूर्ण कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, नदीच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कठोर कायदेशीर लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगा व्दारे झालेल्या परीक्षेत लेफ्टनंद पदी निवड झाल्याबदल आधार फाउंडेशन च्या वतीने वेदांत कोळसे यांच्या सत्कार.(Hingnghat)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे इंडियन आर्मीसाठी घेण्यात आलेली (CDSE ) या परीक्षेचा निकाल नुकताच लागला या परीक्षेत स्थानिक रिठे कॉलनी येथील वेदांत प्रभाकर कोळसे या विद्यार्थ्यांने देशात ३६६ वा क्रमांक मिळवून त्यांची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे.

कु.पाखी अतुल वांदिले हिच्या पाचव्या वाढदिवसा निमित्य पाच वृक्षाची लागवड..(atulvandile)

त्याने हिंगणघाट शहरासह वर्धा जिल्ह्याचे नाव प्रकाश झोतात आणले आहे. या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्याच्या निवासस्थानी जाऊन आधार फाऊंडेशन वतीने रोपटे, शाल व स्मृतिचिन्ह आणि मिठाई देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले त्याला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी वेदांत कोळसे याने आपल्या यशाचा प्रवास कथन केला.यावेळी वेदांत कोळसे, वडील प्रभाकर कोळसे, आई प्रतिभा कोळसे यांच्यासह सत्कार करण्यात आला.

Hingnghat :आधार फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्षा सौ.माधुरी विहीरकर, निलेश गुल्हाने,प्रा.डॉ.शरद विहीरकर, जगदीश वांदिले, डॉ. गिरीधर काचोळे, चंद्रशेखर निमट,राजेश कासवा,मधुकर चाफले, सुरेश गुंडे, सुहास घिनमिने,माया चाफले, ज्योती धार्मिक, वैशाली लांजेवारआदी उपस्थित होते.

कु.पाखी अतुल वांदिले हिच्या पाचव्या वाढदिवसा निमित्य पाच वृक्षाची लागवड..(atulvandile)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कन्या पाखी वांदिले हिच्या वाढदिवसाच्या निमित्य श्री.साई मंदिर समोरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण आणि मानवी जीवन यांच्यातील नातेसंबंधांबद्दल बोलायचे तर ते एक अतूट नाते आहे, ज्यात निसर्गाने मानवाला सर्व काही दिले आहे. मात्र, निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीच्या नावाखाली ना त्याचे नीट संरक्षण केले आणि ना भविष्याची चिंता.

Policenews / चोरी गेलेली मोटारसायकल सोनाळा पोलिसांनी केली मूळ मालकास परत; गाडी मालकाने मानले पोलिसांचे आभार .

त्याचाच परिणाम म्हणून आज जग प्रदूषित पर्यावरण आणि नैसर्गिक आपत्तींच्या कोपाखाली गाडले जात आहे. गत काही वर्षांत पर्यावरणाची गंभीरपणे बिघडत चाललेले आहे. म्हणूनच उष्माघाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे,

आपल्याला पर्यावरणाला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या शुभमंगल प्रसंगी प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक वृक्ष लावण्याची गरज आहे असे मनोगत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.

atulvandile:या कार्यक्रमाला श्री.साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर महाराज, अतुल वांदिले, नामदेव वांदिले, विनोद कुबडे, दशरथ ठाकरे, बालु वानखेडे, माजी नगरसेवक दादा देशकरी, अमोल बोरकर,स्वाती वांदिले, अमिता जुमडे,माधुरी कावरे, राणी सोमवंशी, वैशाली हेडाऊ,जयश्री कुबडे, प्रवीण कावरे, आनंद जुमडे, नितीन भुते, बच्चू कलोडे,सुनिल भुते, प्रवीण भुते,राजू सिंन्हा,सुशील घोडे, राहुल जाधव, राजू मुडे, कुणाल घोल्हर,प्रशांत कुटे,सतिश झीलपे, दिनेश राऊत आदी उपस्थित होते.

Policenews / चोरी गेलेली मोटारसायकल सोनाळा पोलिसांनी केली मूळ मालकास परत; गाडी मालकाने मानले पोलिसांचे आभार .

 

Policenews:बुलढाणा: जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील टुनकी गावाचे रहिवासी तथा पत्रकार प्रभूदास पारस्कार यांची एमएच २८ बि.एम ३१९० ह्या क्रमांकाची दुचाकी १८ जानेवारी २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. स्थानिक पोलीस स्टेशन सोनाळा येथे २० जानेवारी २०२२ रोजी दुचाकी हरविल्याची तक्रार सोनाळा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यात आला व अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील दोन चोरटे जेरबंद करण्यात आले. सदर दुचाकीचा रंग जेनी ग्रे मेटॅलिक हा होता मात्र चोरट्यांनी दुचाकीचा रंग बदल करून पेट्रोल टाकी साईट पॅनल बदल करून काळ्या लाल रंगात करून पुर्णतः बदल केला होता .

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा..दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण (gajukubde)

मात्र पोलीसांनी खाकी दाखत चोरट्यांचा छळा लावत जेरबंद केले . संबंधित पोलिसांच्या तपासाअंती स्थानिक पोलीस स्टेशन सोनाळा येथून संबंधित सोनाळा पोलीस स्टेशनचे पोहेकॉ विशाल गवई व पोहेकॉ मोहनसिंग पवार यांनी १५ एप्रिल रोजी प्रभुदास पारस्कार यांना भ्रमणध्वनी वरून चोरट्यांकडून दुचाकी जप्त केल्याची माहिती देण्यात आली.

न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय संग्रामपूर यांच्या कडे अर्ज सादर करून सदर प्रथम श्रेणी न्यायालय कडून कायदेशीर आदेश प्राप्त करून घेत प्रभुदास पारस्कर यांनी सोनाळा पोलीसांत सादर केले.

Policenews:त्यांनतर सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी प्रभुदास पारस्कर यांना सदर दुचाकी ताब्यात दिली. या वेळी प्रभूदास पारस्कर यांनी पोलिसांचे आभार मानले.

रुग्णमित्र गजू कुबडे यांचा असाहीं ध्येयवेडेपणा..दिव्यांगाच्या हस्ते केली रुग्णवाहिका समाजार्पण (gajukubde)

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट:- रुग्णमित्र गजू कुबडे यांनी स्वतःची इंडिगो विकून त्यांला रुग्णवाहीकेचे रूप देऊन त्या रुग्णवाहिकेचे आज 1 जूनला काही दिव्यांगाच्या हस्ते समाजासाठी अर्पण करण्यात आली.

शहरातील अत्यावश्यक रुग्णांना मदत मिळत नव्हती. हीं गरज ओळखून गजू कुबडे यानी लोकवर्गणी करून त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराने दिलेली इंडिगो वाहनाला रुग्णवाहिकेत परावर्तीत करून शहरातील गोरगरीब जनतेला सोयीचे व्हावे म्हणून आज तिचे लोकार्पण राजू पपंनवर, पिंटू कावळे, या दिव्यांगा च्या हस्ते करून एक आदर्श निर्माण केला आहे.

घरकुला संदर्भात हलगर्जी खपवून घेणार नाही – आमदार अमोल जावळे(gharkulyojna)

Hingnghat:हीं रुग्णवाहीका राष्ट्रीय महामार्गवरील अपघातग्रस्त रुग्णांना रुग्णालयापर्यन्त व रस्त्यावर बेवारस म्हणून भटकणाऱ्या मतिमंद व्यक्तींना आश्रमापर्यन्त पोहचविण्यासाठी हीं रुग्णवाहीका मोफत देण्यात येणार आहे.
गजू कुबडे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.

घरकुला संदर्भात हलगर्जी खपवून घेणार नाही – आमदार अमोल जावळे(gharkulyojna)

 

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीरित्या संपन्न

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

“अंत्योदय हीच लोकसेवेची खरी दिशा असून, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे,” असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी डोंगरकठोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात केले.

प्रशासनाने नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम केल्यास शासन आणि जनतेतील अंतर नक्कीच कमी होईल, असे ते म्हणाले. यावेळी यावल पंचायत समितीच्या घरकुल विभागाच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, घरकुल योजना ही ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजांशी निगडित आहे आणि यामध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतली जाणार नाही. यापुढे अशा तक्रारी आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

आरोग्य उपकेंद्र नियमित सुरु करा अन्यथा उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू (andolannews)

यावल तालुक्यातील महसूल मंडळ भालोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन दिनांक १ जून रोजी डोंगरकठोरा येथील श्री खंडेराव मंदिर ट्रस्टच्या सभागृहात करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जावळे बोलत होते. या शिबिरात एकाच छताखाली २५ शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपक्रमातून एकूण ८८८ लाभार्थ्यांना थेट सेवा देण्यात आल्या.

शिबिरात उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, “शासनाच्या प्रत्येक यंत्रणेने पारदर्शकतेने सेवा पोहोचवली तरच वास्तविक अंत्योदय साध्य होईल.”

तहसीलदार मोहनमला नाझीरकर यांनी “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कटिबद्ध आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.

लाभार्थ्यांना मिळालेल्या प्रमुख सेवा – विभागनिहाय तपशील:
महसूल विभाग:
जिवंत ७/१२ – १५२
ई-हक्क नोंदणी – १२८
दुरुस्ती – १९

मतदार यादी अद्ययावतीकरण:
फॉर्म ६ – २२
फॉर्म ७ – १३
फॉर्म ८ – ४

इतर महत्त्वाच्या योजना व सेवा:
संजय गांधी योजना (DBT लाभार्थी) – १५२
आरोग्य तपासणी – ५४
शिधापत्रिका लाभ – ८४
सेतू केंद्राद्वारे विविध दाखले – १८३
(उत्पन्न – ६६, जातीचे – ७२, वय/रहिवास – ४५)
लेक लाडकी, जननी सुरक्षा, ICDS योजना – ४

gharkulyojna:या शिबिरास माजी शिक्षण सभापती हर्षल पाटील, श्याम महाजन, भरत पाटील, यदु पाटील, पंकज चौधरी, शरद कोळी, योगेश भंगाळे, रुपेश पाटील, डिगंबर खडसे आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्य उपकेंद्र नियमित सुरु करा अन्यथा उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू (andolannews)

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

andolannews:सविस्तर वृत्त असे कि, लोणार तालुक्यातील मौजे चोरपांग्रा, गोवर्धन नगर येथे जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून उपकेंद्र अस्तित्वात आहे. मात्र या आरोग्य उपकेंद्राकडे कोणताही वरिष्ठ अधिकारी फिरकत नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी, कर्मचारी या उपकेंद्राकडे कानाडोळा करतात. व आठवड्यातून एकदाच उपकेंद्र उघडण्यात येते.

या संदर्भात स्थानिक नागरिक शिलवंत इंगळे यांनी तालुखा वैद्यकिय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी तोंडी माहिती देऊन कळवले मात्र या निगरगठ्ठ अधिकाऱ्यावर काहीच असर झाला नाही.

अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना…(FarmerNews)

आता पावसाळ्याचे दिवस सुरु होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यास त्यांना बीबी येथे न्यावे लागते परिणामी त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो बीबी ते चोरपांग्रा तीन ते चार किलोमीटर अंतर असल्याने रुग्ण दगवण्याची शक्यता नाकारतायेत नाही.

andolannews: त्यामुळे चोरपांग्रा येथील शिलवंत इंगळे यांनी लोणार तालुका आरोग्य अधिकारी यांना दि.3 जुन 2025 रोजी निवेदन देऊन मागण्या मान्य न केल्यास 15 जुन 2025 पासून तालुखा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनसमोर आमरण उपोषण करून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा शिलवंत इंगळे यांनी दिला आहे

अखेर मागेल त्याला पिक विमा न मिळाल्याने शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी रवाना…(FarmerNews)

 

FarmerNews:उद्या दिनांक ४ जून रोजी मुंबई येथे पिक विमा संदर्भामध्ये मंत्रालय मध्ये अतिशय महत्त्वाची पीक विमा संदर्भामध्ये कृषीमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित असून त्या बैठकीसाठी शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबईसाठी अखेर रवाना..

मागील काही दिवसांपूर्वी सिंदखेड राजा येते हजारो शेतकरी घेऊन दिनांक १४ मे रोजी उपविभागीय कार्यालयावर पिक विमा व कर्जमाफी या संदर्भामध्ये भव्य मोर्चा निघाला असून तसेच लोणार तहसील कार्यालयावर मागील त्याला पिक विमा द्या मागेल त्याला कर्जमाफी द्या यासंदर्भामध्ये २६ मे रोजी शेकडो शेतकरी घेऊन मोर्चा निघाला होता.

नवनिर्वाचित संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांचे हस्ते सत्कार.(drsanjaykute)

FarmerNews:वरील दोन्ही मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या दोनच मागण्या असून अद्याप कुठलेही मागणी राज्य सरकारकडून पूर्ण न झाल्याने अखेर शेतकरी योद्धा कृती समितीची टीम मुंबई येथे कृषी मंत्री श्री माणिक दादा कोकाटे यांना भेटण्यासाठी अखेर रवाना….

शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा.

नवनिर्वाचित संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांचे हस्ते सत्कार.(drsanjaykute)

 

drsanjaykute:संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक दिनांक 31 मे रोजी पार पडली त्याचा निकाल काल 1 जुन रोजी घोषित करण्यात आला असुन यामध्ये शेतकरी परिवर्तन पॅनेल चा दणदणीत विजय संपादन केला आणि १५ पैकी या पैनल चे १४ संचालक विजयी झाले.

या सर्व विजयी संचालकांचा आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पेढ़ा भरवून त्यांचे निवास स्थानी उत्सहात सत्कार करण्यात आला.

निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )

यावेळी शेतकरी परिवर्तन पॅनेल ची विजयी पताका फडकवन्या साठी झटलेले संग्रामपूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आ डॉ कुटे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात ही निवडणूक लढल्या गेली यावेळी सूक्ष्म नियोजन करीत संग्रामपूर तालुका अध्यक्ष तथा कृऊबास सभापती भाऊराव पाटील यांच्या नविनतम कार्यकाळात भाजपा प्रणित पॅनेल ची ही पहिलीच निवडणूक संग्रामपूर तालुक्यात लढली गेली.

यामध्ये विरोधी पॅनेल ला सोसायटी मतदारसंघातून एकच जागा निवडून आणता आली तर इतर सर्व मतदारसंघात शेतकरी पॅनेल चे छत्री या निशाणी वर एकूण 14 संचालक निवडून आले. निकाल जाहीर झाल्या नंतर परिवर्तन पॅनेल चे सर्व विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी फटाके फोडून, पेढे वाटून, ढोलताशे वाजवीत मोठा जल्लोष साजरा केला होता.

यावेळी कार्यकर्त्याच्या जोरावर आपण संग्रामपूर तालुक्यालतील सहकार क्षेत्र पुर्णपणे काबीज केले असुन ते निरंतर टिकवाण्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे.

drsanjaykute:तसेच या निवडणुकी मधे शेतकऱ्यांनी पॅनेल वर दाखवलेला विश्वास आणि परिवर्तन पॅनेल मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर हा भरघोष विजय संपादन करता आला असुन सर्व विजयी संचालकांनी संग्रामपूर तालुका खरेदी विक्री संस्थेच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने विकासात्मक व शेतकरी हिताची कामे करावी असे प्रतिपादन केले.

निसर्गासाठी नारी शक्तीचा जागर! विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवाद्वारे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!(MurtijapurNews )

 

प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुका विलास सावळे

MurtijapurNews:मूर्तिजापूर शहरात विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवा महिला मंडळ मूर्तिजापूरच्या उत्साही सदस्यांनी एकत्र येऊन पर्यावरणाची काळजी घेण्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. नुकताच, हरियाणा नगरमधील डॉक्टर विक्रम शर्मा हॉस्पिटलच्या परिसरातील मोकळ्या जागेत या मंडळाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

या उपक्रमात केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि इतरांनाही प्रेरणा देण्याचा उद्देश होता.

या कार्यक्रमात विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली, ज्यात वड, पिंपळ, लिंब आणि इतर सावली देणाऱ्या तसेच औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींचा समावेश होता. मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन अत्यंत आनंदाच्या वातावरणात वृक्षारोपणाचे काम केले.

प्रत्येकीने आपल्या परीने योगदान देत या उपक्रमाला यशस्वी बनवले.या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रश्मी शर्मा होत्या, ज्यांनी पर्यावरणाचे महत्त्व विशद केले आणि महिलांच्या या योगदानाला गौरवले. तसेच, उपाध्यक्ष संतोषजी खंडेलवाल यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आणि त्याचे दूरगामी फायदे सांगितले. सहउपाध्यक्ष किरण जोशी, सचिव बरकाजी तिवारी आणि कोषाध्यक्ष कल्पना तिवारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय भूमिका घेतली.

याव्यतिरिक्त, मंडळाच्या सदस्य मीना नागवान, सुनिता नागवान, शितल जोशी, रेखा उपाध्याय, काजल तिवारी आणि शशी नागवान यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने या उपक्रमात सहभाग घेतला.

MurtijapurNews:विदर्भ वि.प्र. नारी शक्ती सेवा महिला मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महिलांनी एकत्र येऊन केवळ वृक्षारोपण केले नाही, तर त्यांनी समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीने इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यात असे अनेक उपक्रम राबवले जातील, अशी आशा व्यक्त होत आहे.आपल्या परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता?