Home Blog Page 441

शेगांव शहरातील समस्त्त मातंग समाजाच्या वतीने पुण्यतिथी संपन्न.

0

 

सर्व प्रथम साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सकल मातंग समाजाच्या हस्ते करण्यात आले व आयोजक लहुजी शक्ती सेना युवा जिल्हा अध्यक्ष आशिष दादा सावळे यांच्या वतीने तसेच समस्त मातंग समाजाच्या वतीने पुष्प हार अर्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे मातंग समाजाचे नेते लक्ष्मण गवई यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला व आभार प्रदर्शन केले.या वेळी विजय भाऊ सावळे मुकेश भाऊ गवई विनोद भाऊ सोनोने संतोष भाऊ भालेराव दिलीप भाऊ तायडे जितू भाऊ मानकर अजय तायडे, प्रेम सावळे, आकाश तायडे, नागेश गवई ,भिकू सारवान, आकाश पाटील , श्री तायडे, मंगेश तायडे, विवेक तायडे, रोहित तायडे, निखिल तायडे व इतर समाज बांधव उपस्थित होते.

सुनगांव येथील वार्ड क्रमांक १ मधील धापा नसलेली नाली ठरतेय जीवघेणी

0

 

गजानन सोनटक्के
सुनगांव प्रतिनिधी:-

सुनगांव येथील वार्ड क्रमांक एक मधील मोठ्या नालीवरील सुस्थितीत असलेला धापा गेल्या दोन महिन्यापासून सुनगाव ग्रामपंचायतने काढून टाकला तेव्हापासून दिनांक 18 जुलै पर्यंत सुद्धा सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाने धापा टाकलेला नाही. आज दिनांक 18 जुलैला संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सुनगाव येथील च रामदास वसुले हे आपल्या मोटर सायकल ने येत होते. त्यांना नाली वरील धापा नसल्याचे निदर्शनास आले व त्यांनी दुरूनच आपल्या गाडीचे ब्रेक लावले परंतु तरीही मोटरसायकल तुटलेल्या नालीमध्ये जाऊन पडली त्यामुळे रामदास वसुले यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. रामदास वसुले हे आपल्या मोटरसायकल सह नालीमध्ये पडलेले तेथील नागरिकांना दिसताच वसंता मगर,गणेश भड,कुसुम भगत हे धावतच त्या ठिकाणी गेले व त्यांनी रामदास वसुले यांना नालीच्या बाहेर काढले व त्यांच्या गाडीला सुद्धा बाहेर काढले. अशीच घटना दिनांक आठ जुलै रोजी वसंता मगर यांचा नातू खेळता खेळता तुटलेल्या नाली मध्ये पडला होता. तेव्हा वसंता मगर आणि गणेश भड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तसेच वार्ड क्रमांक एकच्या सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना धापा दुरुस्तीची विनंती केली तरीही आज पर्यंत धापा दुरुस्त झाला नाही. त्यातच ही मोठी दुर्घटना होता होता तळली. या दुर्घटनेमुळे येथील नागरिकांनी आठ दिवसाच्या आत ग्रामपंचायत ने नाली वरील सिमेंट धापा न टाकल्यास येथील नागरिक पूर्ण नाली मातीने भरुन टाकतील असा इशाराच ग्रामपंचायतीला दिला आहे.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती ने दिलेल्या निवेदनास यश

0

 

सिल्लोड प्रतीनीधी:-  आयुषी कुुलकर्णी

जिंठा येथील गांधी चोंक ते मोगरशाह नाना दर्गा रोड चे काम सुरु जे की जे काम अर्धवट व शिवमरोती मंदिर बालाजी मंदिर समोरील काम सोडलेले होते ते आज करण्यात आले कारण मागील आठवड्यात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्री मंगेश जी गोंदवले साहेब यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण चव्हाण देशमुख व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्ष श्रीमती अंजना ताई राजपुत यांनी उपोषण ना चा इशारा देताच रोड चे काम सुरू करण्यात आले तसेच अजिंठा पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधु यांचे विशेष आभार मानतो जया नी आपल्या इलेक्ट्रॉनिक मिडीया दैनिकांत बातमी लाऊन सहकार्य केले

अवकाळी पाऊसामुळे शेतकरी हावलदिल.पिके झाली जमीन जमिनदोस्त

0

 

 

सिल्लोड प्रतिनिधी :- आयुषी कुलकर्णी

आसडी रहिमाबाद सह परिसरात शनिवार झालेल्या वादळी पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
परिसरावर शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मक्का पिके होतेच नव्हते करून सोडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शनिवारी रात्री 11:00 वाजता सुरू झालेल्या वादळी वार्‍या सह 1 तास चाललेल्या पावसाने मका, कपाशी,मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मक्का व मिरची उंची मोठी असल्याने पाऊस व वार्‍या मुळे आडव्या झाला असल्याने आत्ता हे पीक हात चे गेल्या मुळे पुढे काय असा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरात नगदी पीक म्हणून मक्का पिका कडे पाहिले जात असल्याने गेल्या ४ वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
कोरोना पार्श्वभूमीवर आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजा ला आत्ता नैसर्गिक संकटाने ही आपल्या विळख्यात घेतल्याने दुष्काळात १३
वा महिना म्हणी प्रमाणे झाले आहे. लागवड केलेल्या क्षेत्रापैकी साधारण ४० ते ५० टक्के क्षेत्र पावसाने वार्‍याने बाधित केले आहे पिकांचे ही नुकसान झाल्याने मक्का व मिरची ही पिके उत्पन्न न देता खर्चात भर टाकून जाणारी ठरणारी आहे.
शनिवार रात्री झालेल्या वादळी पावसाने मका व बाजरी पिकांची पुरती वाट लावली आहे लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ५० ते ६० टक्के क्षेत्र बाधित झाल्याने या पिकावर झालेला खर्च ही वसूल होईल की नाही असा प्रश्न पडला असल्याने वार्षिक गणित कसे जुळेल ही मोठी समस्या होऊन बसली आहे तरी शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे.

लक्ष्मण कान्हेरकर यांच्या वाढदिवसानिम्मित फळ वाटप

0

 

 

टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष मा श्री पै जालिंदर भाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री पै तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप खामगांव येथील टायगर ग्रुप चे सक्रिय कार्यकर्ते तथा तरुण महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी मा श्री पै लक्ष्मण भाऊ कान्हेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा सामान्य रुग्णालय तालुका खामगांव येथे रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करण्यात आले तसेच दोन डिलेव्हरी पेशंन्ट यांना दोन बाॅटल बी निगोटिव्ह ब्लड देण्यात आले तसेच टायगर ग्रुप ग्राम शाखा उमरा भिसे येथे वृक्षारोपण सुध्दा करण्यात आले आहे प्रमुख उपस्थिती (सामाजिक कार्यकर्ते)
मा श्री पवनभाऊ माळवंदे , टायगर ग्रुप कार्यकर्ते
गगन सेठ छाबरा, पियुषभाऊ चव्हाण, रोहित भाऊ माळवंदे अंकुशभाऊ हटकर, सुमितभाऊ कांटे , सुरज लोंढे ,राम देवकते, स्वप्निल तांबे क्रृष्णा गवळी क्रृष्णा काकडे , पवन गवळी, प्रशांत वरघटे,अमोल वानखेडे राहुल सुरोसे रुपेश काकडे कुनाल कुंदलवार मंगेश शिंदे शुभम राऊत आशिष कुटे नंदु कान्हेरकर तथा टायगर ग्रुप ग्राम शाखा जनुना, जवळा, वाडी,पहुरजिरा, मांडका अलमपुर, निमगाव, नांदुरा, येथील टायगर ग्रुप चे सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते

आझाद हिंदच्या संघर्षमय आंदोलनाला यश… श्रीक्षेत्र माऊली जन्मभूमी आपेगाव च्या दिंडी प्रस्थान सोहळ्यास शासन प्रशासनाची अखेर परवानगी..

0

 

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

श्री क्षेत्र माऊली जन्मभूमी आपेगाव च्या दिंडी प्रस्थान सोहळ्याला आज नगर प्रशिक्षना देत सुरुवात…

ज्ञानोबा माऊली,ज्ञानराज माऊली तुकाराम…
टाळ मृदुंगाच्या गजरात आपेगाव नगरी दुमदुमली…

बुलडाणा:
माऊली जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव येथे माऊली माता पिता दिंडी प्रस्थान सोहळ्यापूर्वी 18 जुलैला सकाळी 11 वाजता माऊली मातापित्यांच्या पादुका अभिषेक नामदार संदिपान भुमरे व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आपेगावात नगर प्रदीक्षना करीत मिरवणुक काढण्यात आली.

माऊली माता-पित्यांना निरोप देण्यासाठी माऊली जन्मभूमी आपेगाव संस्थान चे विश्वस्त,अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर दादा, शिवाजी महाराज शेलूकर, नामदार संदिपान भुमरे,आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे, विदर्भ प्रदेश संपर्कप्रमुख शेख सईद, आझाद हिंद शालेय पोषण आहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लियाकत खान, महिला उपाध्यक्ष वर्षाताई ताथरकर यांच्यासह देशातील गुरुवर्य विष्णु महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचे भक्तगण प्रामुख्याने उपस्थित होते.
माऊली जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव मधून माऊली माता पिता दिंडीला निरोप देण्यात आला आहे. आज माऊली माता-पिता दिंडी सोहळ्याचा मुक्काम भाऊसाहेब देवराव पाटील यांच्या शेतात आहे.
तर उद्या सकाळी पाच वाजता पंढरपूरकडे होणार असून दुपारी दोन वाजता वाखरी येथे सर्व पालक यांचा सोहळा एकसंघ होणार आहे. तर उद्याच संध्याकाळपर्यंत पंढरपूर येथे दिंडी पोहोचणार आहे.
माऊली जन्मभूमी आपेगाव माता-पिता दिंडी प्रस्थान सोहळ्यात अकरा वारकर्‍यांना परवानगी मिळाली असून पंढरपूरच्या मुख्य नगर प्रदक्षिणेत सुद्धा माऊली माता पिता दिंडी सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जाम च्या विकासा साठी निधी उपलब्ध करून देईल आमदार समीर कुणावार जाम येथील व्यायामशाळे चे लोकार्पण

0

 

सचिन वाघे वर्धा

समुद्रपूर जाम या गावाची ओळख देशभर च नाही तर या चौरस्ताची ओळख देशाच्या बाहेर सुद्धा आहे परंतु सदर गाव हे विकासा पासून दूर आहे तेव्हा आता मी विशेष लक्ष देत आहो. सर्वात अगोदर पाण्याचा प्रश्न हाती घेऊन 1कोटी 80 लाखाची योजना मंजुरी साठी टाकली आहे दिवाळी च्या अगोदर नागरिकांना पाणी मिळेल व इतर ही जाम च्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणाचा माझा पर्यन्त राहील. असे मत जाम येथील व्यायामशाळे च्या लोकार्पण समारंभात कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले.
आमदार समीर कुणावार यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जाम येथे भव्य व्यायामशाळा उभारली त्या शाळेचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला उध्दघाटक म्हणून आमदार समीर कुणावार होते तर अध्यक्ष स्थानी पी व्ही टेक्स्टाईल चे व्यवस्थापक भुपेंद्र शहाणे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय युवा मोर्चा चे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समनव्यक प्रा. मेघश्याम ढाकरे, जाम चे सरपंच सचिन गावंडे, उपसरपंच अजय खेडेकर, पोलिस पाटील कवडू सोमलकर ,तंटामुक्ती गाव समिती चे अध्यक्ष गजानन मुंगसे ,पवार साहेब व सर्व सदस्य गण मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कुणावार म्हणाले डॉ. बाबासाहेबच्या संविधानाने आम्हाला ज्या खुर्च्या दिल्या त्या बसण्यासाठी नाही तर जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्या तेंव्हा लोकांचे – युवकाचे जे प्रश्न आहे ते सोडविण्या साठी माझा प्रयन्त आहे युवकांनी खेळा च्या माध्यमातून तसेच अभ्यासाच्या माध्यमातून विविध स्पर्धात्मक परीक्षेला समोर जाऊन जाम येथील युवकांना चांगल्या नोकऱ्या लागल्या पाहिजे या करिता एक चांगली अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
तर भुपेंद्रजी शहाणे यांनी जाम गावाच्या विशेष समाजाभिमुख कामे करण्याचा सतत प्रयत्न राहील असे सांगितले.
या वेळी सरपंच सचिन गावंडे यांनी जाम मध्ये विकास कामाची तडफड पाहून आमदार समीर कुणावर यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सचिन गावंडे यांनी केले तर संचालन ग्रामविकास अधिकारी ए एस धोटे, यांनी केले तर आभार गजानन मुंगसे यांनी मानले
कार्यक्रमाचे यशस्वीते साठी ग्रामपंचायत सदस्य सनी निवटे, राहुल पाटील,अभिलाष गिरडकर,सौ चंदाताई खेळकर, सौ साधनाताई पुसदेकर,कविताताई आटोळे,पंचफुल। खेकारे,रमाबाई शंभरकर,अनिल खुडसंगे, मोहन सराटे,रणजित वाढइ इत्यादींनी परिश्रम घेतले.

अंडरवर्ड डॉन अखेर पोलिसाचे ताब्यात ,

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

शहरातील कोर्ट रस्त्यावर मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने चांदीच्या सराफा दुकानावरील दरोडा

प्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौथ्या मुख्य  संशयित आरोपीला पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे फैजपूरच्या जंगलातून ताब्यात घेतले आहे.
मुकेश प्रकाश भालेराव ( रा. बोरावल खुद्रुक, ता. यावल ह. मु.तापी काठ स्मशानभूमीजवळ, भुसावळ) असे ताब्यात घेतलेल्या  चौथ्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याच गुन्ह्यातील काल शुक्रवारी तिसरा आरोपी यश विजय अडकमोल (22, रा.बोरावल गेट, यावल) अटक केल्यानंतर आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एस.बनचरे यांनी २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे ७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे १२ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे बुधवारी १४ जुलै रोजी कांदीवलीतून पहिला संशयित निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड ( मूळ रा. रामनगर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद, ह्ल्ली रा. भामरेकर नगर, मस्जिद गल्ली, कांदिवली ( पूर्व), मुंबई ), गुरूवारी १५ जुलै रोजी चंद्रकांत उर्फ विक्की लोणारी (रा. भुसावळ) तर शुक्रवारी १६ जुलै रोजी यश विजय अडकमोल ( रा. बोरावल गेट, यावल) प्रमाणे अटक केली होती.  आज बोरावल बुद्रुक ता. यावल येथील संशयित मुकेश प्रकाश भालेराव यांस एलसीबीच्या पथकाने फैजपूर जंगलातून अटक केली.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण कुमार बकाले यांचे नेतृत्वात शरीफ काझी, प्रदीप पाटील, युनुस शेख, विनोद पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, रमेश जाधव, अशोक पाटील या पथकाने मुकेश भालेराव यास अटक केली. दरम्यान मुकेश भालेराव या संशयिताने तापी नदीकिनारी असलेल्या पुरातन हनुमान मंदिराजवळून काही दागिने काढून दिले आहे. दरोडेखोरांनी या गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी गाडी सोमवारी १२ जुलै रोजी यावल व रावेर पोलिसांना तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीच्या खोऱ्यातून आढळून आलेली आहे. सराफा दुकानावरील टाकलेल्या दरोड्यातील आतापर्यंत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सूनगावचा देवराई उपक्रमामुळे सातपुडा आणखी हिरवा होणार -सौ स्मिता राजहंस

0

 

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील तरुण मित्रांनी एकत्र येत वनसैनिक बनून लोकसहभाग घेत श्रमदानातून 1001 वृक्षलागवड व संगोपनाचा जो वसा घेतला आहे ,त्यातून निश्चित सातपुडा हिरवा होण्यास मदत होईल असे मत जळगाव जामोद सामाजिक वनीकरण च्या रेंज फॉरेस्ट ऑफीसर सौ स्मिता राजहंस यांनी व्यक्त केले.
सूनगाव येथे आयोजित वृक्षलागवड महोत्सवात त्या बोलत होत्या.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव जामोद तालुक्यात सूनगाव येथे वनसैनिक म्हणून समोर येत काही नवंतरुण मित्रांनी ‘ देवराई -2021’ नावाने लोकसहभाग व श्रमदानातुन वृक्षलागवड व संगोपन उपक्रम हाती घेतला.
प्रथम टप्प्यात जून महिन्यात श्रमदानातून 1001 खड्डे खोदून तयार करण्यात आले, व द्वितीय टप्प्यात रोपलागवडीचे काम सुरू करण्यात आले आहे, याच दरम्यान नुकताच दि 16 जुलै ला स्थानिक गोरक्षनाथ महाराज मंदिरशेजारी ओसाड जमिनीवर 2018 व 2019 ला पाणी फाऊंडेशनतर्फे जलसंधारणाचे कामे झाली होती, त्याच जमिनीवर आता वृक्षरोपन चा उत्सव आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी 51 वृक्ष लावून व श्रमदान करून ह्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
——————–
सातपुड्याच्या पायथ्याशी तरुणांनी हे जो स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे त्यास निश्चित फळ येईल, जो घाम इथे हे तरुण गाळत आहेत , काही वर्षात त्या घामाचा सुगन्ध येथे वृक्षरुपानी दरवळेल.देवराई 2021 उपक्रमास आपल्या सलाईबन परिवार व तरुणाईकडून कायम मार्गदर्शन असेल
– मंजितसिंग शिख
मानद वन्यजीवरक्षक ,
बुलडाणा जिल्हा
——————–
ह्यावेळी सौ स्मिता राजहंस – रेंज फॉरेस्ट ऑफीसर सामाजिक जळगाव जामोद,
श्री मंजितसिंग शिख -मानद वन्यजीव रक्षक बुलडाणा जिल्हा,
श्री उमाकांत कांडेकर-तरुणाई फाउंडेशन,
सौ रुपालिताई काळपांडे-जि प सदस्या,
श्री महादेवराव धुर्डे -उपसभापती पंचायत समिती
श्री रामेश्वर अंबडकर- सरपंच सूनगाव
श्री चौधरीसाहेब ग्रामसेवक,
सुनील भगत-इंजिनियर,
श्री संतोष कतोरे-ग्रँथपाल एस के के कॉलेज
आश्विन राजपूत -छायाचित्रकार व पत्रकार,
शालिग्राम भगत,अनिल हिसल,
वनविभागाचे कर्मचारी वृंद,सामाजिक वनीकरण चे कर्मचारी , ग्रामपंचायत सूनगाव चे कर्मचारी ,
स्थानिक आदिवासी नागरिक,महिला
व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक कोविड नियमांचे पालन करून श्रमदानास उपस्थित होते.
यावेळी 51 रोपे मान्यवरांनी व 150 रोपे श्रमदात्यांनी एकाच दिवशी लावली, आजपर्यंत 1001 पैकी 450 रोपे लागली आहेत ,15 ऑगस्टपुर्वी सर्व रोपे लावायची वनसैनिकांची योजना आहे.
0 ₹ बजेट ठेऊन श्रमदानातून व लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या या पर्यावरणपूरक कामाची सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी सोशल दिस्टन्स ने झालेल्या छोट्या सभेत प्रास्ताविक आश्विन राजपूत यांनी,सनचं निवृत्ती वंडाळे यांनी तर आभारप्रदर्शन संतोष कतोरे यांनी केले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विन राजपूत,महादेव धुर्डे, सरपंच रामेश्वर अंबडकर,ग्रामसेवक चौधरी,अभिषेक राजपूत,वैभव गव्हाळे,सुरेश मिरटकार,लखन ,अभिषेक राजपूत,करणं राजपूत,प्रवीण भगत,व सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

माजी सैनीकाचा उपोषणाचा इशारा

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

देश रक्षनार्थ आपले प्राण ओतणारे, भारत भू साठी धारातीर्थी पडणारे देशाचे सैनिक ऊन पाऊस वारा जात धर्म पंत भाषा कशाचीही चिंता न करता फक्त देशाचे रक्षण करून आपल्याला सुख समाधान आणि शांतिपुर्वक जीवन जगण्याची मुभा देणाऱ्या देशाच्या सैनीकाला जर आपल्या देशात आपल्या गावात समस्येला सामोरे जावे लागत असेल तर ही किती दूर्भाग्यपूर्न घटना आहे. आणि त्यासाठी त्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणे याला काय म्हणावे?
नांदूरा वार्ड क्रमांक 1 मधील सांडपाणी हे नगरपरिषद ने ओपन स्पेस  मध्ये लोकांच्या घराकडे सोडलेले आहे. हे पाणी नाली तोडून.माजी सैनिक रतन डोंगरदिवे व आय बी सेवन चे तालुका प्रतिनिधी असून सुद्धा यांना  येण्या-जाण्यासाठी संडासचे व घाणीचे साम्राज्य सोबत संघर्ष करावा लागतो.
त्यामुळे त्यांच्या व येथील रहिवासी उल्हास हाताडकर, अर्जून साबे, विजय चांभारे, गजानन डांगे, देवा डंबेलकर या सर्वांना घाणीचे साम्राज्य सोबत लढा द्यावा लागतो घाणीच्या पाण्यामुळे डास जास्त निर्माण होत आहेत. त्या डासामुळे डेंगू मलेरिया यासारख्या रोग  होण्याची जास्त शक्यता आहे, तरीही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नगर परीक्षेचे कर्मचाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावे त्या कामाची विल्हेवाट न लावल्यास 15 दिवसाच्या आत काम न केल्यास नांदुरा नगर परिषद ला उपोषणाचा इशारा केला आहे असे लेखी निवेदन सुद्धा १६/७ /२०२० ला. दिला आहे.