Home Blog Page 442

फि बाबत शाळा महाविद्यालयाचि मनमानी थांबनेसाठी मनसेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन

0

 

सुनील पवार. नांदुरा ता.प्र.

कोरोना या महामारी मुळे देशभरात सुरू असलेले लाँकडाऊन व आँनलाँक तसेच पालकांचे गेलेले उधोगधंनदे बेरोजगारी या सर्व कालखंडात सर्व जनता विध्यार्थी चिंतेत आहे पन या सर्व गोष्टी ची बाब लक्षात घेता माननीय जिल्हाधीकारी साहेब यांनी आदेश दिल्या वरही काही शाळा व महाविद्यालययांनी फी वसुली करीता विध्यार्थी व पालकांना प्रचंड प्रमानात त्रास देत आहे व आपली मनमानी सुरूच ठेवत आहे जिल्हा अधिकारी साहेब व शिक्षण अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आपली मनमानी करनारे शाळा महाविद्यालयावर कारवाई करा या मागनीसाठी मनसेचे वतीने शिक्षनाअधीकारी साहेब पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देऊन सदर बाब लक्षात आनून दिली आहे जिल्हा अधिकारी साहेब यांनी दिलेले आदेश पत्र क़मांक शिक्षा .ठडए२५/२०२१-२०२२/२८३८/२०२१नुसार देण्यात आले आहे पन तरीही काही पालकांच्या तक्रारी ह्या मनसे पदाधिकारीकडे येत आहे म्हणून या सर्व गोष्टी चि चर्चा करून गंभीररीत्या मनसे पदाधिकारी यांनी शेवटचा ईशारा दिलेला आहे. जर यापुढे कोनतेही शाळा व महाविद्यालय.यांनी फी साठी कोणत्याही प्रकारचि विद्यार्थी चि अडवनुक केली तर आपन सबधीत मनसे पदाधिकारी यांच्या शि संपर्क करावा असे आवाहन मनसे चे वतीने करण्यात येत आहे. तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या जि.आर.चि.प्रत्.शिक्षनाअधीकारी साहेब यांनी मनसे पदाधिकारी यांना देण्यात आलेली आहे यावेळी मनसे ता.अ.भागवत उगले. उपा.अ.कांडेलकर.राजु काळे.अजय बेलोकार..सागर ददगाळे. निकेतन वाघमारे. योगेश अरून सपकाळ. विशाल बग्गन. हिंगना विभाग. धनंजय देशमुख. गनेश अवचार उपस्थित होते

युवासेना उपजिल्हा प्रमुख पदासाठी मा.श्री. माहेशभाऊ चौधरी यांची नियुक्ती

0

प्रज्वल यावले (आर्वी तालुका प्रतिनिधी)

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादने मा.श्री. शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेना नेते युवासेना प्रमुख, पर्यावरण पर्यटन मंत्री, मा.श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मा.श्री. राजसाहेब दीक्षित वर्धा,अमरावती लोकसभा विस्तारक युवासेना यांच्या सूचनेनुसार, श्री. सुर्याभाऊ हिरेखन जिल्हाप्रमुख युवासेना वर्धा जिल्हा यांच्या हस्ते मा.श्री. महेशभाऊ चौधरी यांची युवासेना उपजिल्हा प्रमुख (विधानसभा क्षेत्र आर्वी) या पदावर नियुक्ति करण्यात आली. त्याचप्रमाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रीद वाक्यनुसार “गाव तेथे शाखा” व “घर तेथे शिवसैनिक” या धोरणाने आपण वाटचाल करावी, आर्वी विधानसभा पातळीवर तालुका निहाय , जिल्हा परिषद सर्कल निहाय , पंचायत समिती सर्कल निहाय तसेच 310 बूथ प्रमुख यांची नियुक्ती करावी तसेच मोठ्या प्रमाणात युवासैनिकांची बांधणी करावी. असे कार्य महेशभाऊ चौधरी यांच्यावर सोपविण्यात आले . तसेच सरकार च्या योजना लोकांपर्यंत पोहचवने व ८०% समाजकरण २० % राजकरण या मुलमंत्रप्रमाणे गांवोगावी युवासेने च्या माध्यमातुन सामान्य नागरिकांचे व विद्यार्थांचे प्रश्न सोडवावे असे निर्देश यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुर्या हिरेखन यांनी दिले. याठिकाणी प्रमुख उपस्तीथी मा. श्री. विपुलभाऊ चौधरी (यूवसेना जिल्हा समन्वयक वर्धा जिल्हा), मा. श्री. सागर जामखूटे ( युवासेना आर्वी तालुका प्रमुख), मा. श्री. रोशन ठाकरे ( युवासेना तालुका प्रमुख कारंजा) ,मा. श्री. राहूल घागरे ( युवासेना उपतालुका प्रमुख कारंजा) या सर्व पदाधिकाऱ्यातर्फे महेशभाऊ यांना पुढील वाटचालीस भगव्या शुभेच्छा देण्यात आले

८ दिवसांपासून आजारी गाईचा उपचार न झाल्याने मृत्यू डॉक्टरांच्या संपामुळे गेला निष्पाप जीव

0

 

नांदुरा:-( प्रफुल्ल बिचारे)

तालुक्यातील पिंपळखुटा धांडे येथील मजूर श्री ज्ञानेश्वर मस्के यांनी कष्टाने मोलमजुरी करून ३५ हजार रुपयांची गाय दुग्धव्यवसायासाठी घेतली होती. परंतु अचानक हे गाय आजरी पडली.श्री ज्ञानेश्वर मस्के यांनी सर्व ढोर डॉक्टर, व पशुवैद्यकीय अधिकारी यांना वारंवार फोन केले परंतु डॉक्टरांचा संप असल्यामुळे एकही ढोर डॉक्टर आजारी गायकडे फिरकला नाही. गाईच्या वाढत्या वेदना पाहून मस्के यांनी वेगवेगळ्या क्रमांकावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांना ८-१० फोन केले परंतु त्यांनी फोन उचलले नाही. यामुळे आज दिनांक १6 जुलै रोजी या गाईचा उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. कोणाचा जीव वाचविण्याची कला अवगत असलेले सुशिक्षित डॉक्टर असा संप करून आपल्याच व्यवसायासोबत बेइमानी करू करू लागल्यामुळे आज निष्पाप गाईचा जीव गेला. याला जबाबदार असलेले अधिकारी यांना कठोर शासन होऊन संबधित मजुराला झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी गावकऱ्यांची लोकांची इच्छा आहे.

सुनगाव येथून वाघ दात व वन गुन्हा कामी वापरण्यात आलेली अवजारा सहित एकास अटक

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

दिनांक 13/7/2021 रोजी मोताळा वनपरिक्षेत्रातील मौजे नांदुरा येथे वन्य प्राणी बिबट /वाघ नखे व दात तस्करी करणाऱ्या टोळीचीगुप्त माहिती मिळाल्यावरून बुलढाणा वनविभाग वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो मुंबई व मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम ब्रँच अमरावती यांनी संयुक्तरित्या कारवाई करून वन्य प्राणी बिबट/वाघ नखे तस्करीप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती व वन गुन्हा प्रकरणी चौकशी दरम्यान प्राप्त माहितीनुसार मुक्ताईनगर व जळगाव जामोद येथील आणखी दोन आरोपीस दिनांक 15 /7 /2021रोजी अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्याची चौकशी दरम्यान आज 16 /7/ 2021 रोजी वनविभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या मौजे सुनगाव तालुका जळगाव जा दोन ठिकाणी धाड टाकून वन्य प्राणी बिबट/वाघ चे दात व वन गुन्हा कामीवापरण्यात आलेली अवजारे जप्त करण्यात आली सुनगाव येथील एक आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर कारवाई माननीय उपवनसंरक्षक बुलढाणा वनविभाग श्री अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली सदर कारवाईमध्ये जळगाव जामोद साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे व कर्मचारी तसेच मोताळा खामगाव व जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील कर्मचारी यांनी सहभाग घेतला सदर घटनेचा पुढील तपास माननीय उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांचे मार्गदर्शनाखाली श्री रणजीत गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा व नेहा मुरकुटे वनपरिक्षेत्राधिकारी मोताळा हे करीत आहेत

आर्वी तालुक्यातील चिंचोली(डांगे) येथे ९३वा भारतीय कृषी अनुसंधान परिषद स्थापना दिवस व ग्रामीण कृषी कार्यानुभव निमित्त येथे वृक्षारोपण

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी:- प्रज्वल यावले

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषी महाविद्यालय व ग्रामीण कृषी कार्यानुभव प्रकल्प अनुषंगाने विध्यार्थी प्रशांत प्रमोदराय कथलकर कृषी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा चिंचोली (डांगे) येथे वृक्षारोपण करून गावकऱ्यांना एक व्यक्तीने झाड लावावे असा संदेश देण्यात आला.
तसेच जनसामान्यामध्ये गेल्या काही कालावधी पासून विध्यार्थी प्रशांत कथलकर कृषी संदर्भात जनजागृती करत आहेत.
प्रमुख उपस्थिती:-
*सौ. गीता मनोहरराव मानमोडे प्राचार्य जिल्हा परिषद शाळा

प्रमोद गुलाबराव पोटे प्राध्यापक

मंदाबाई मनावर अंगणवाडी सेविका

स्वाती गुलाबराव तांबे सेविका

सरस्वती विघ्ने

ताजने मॅडम पशु चिक्कीत्सक
तसेच गावातील नागरिक
गणेश कथलकर,अक्षय हिवाळे,गौरव नारड, सुरज हिवडे
अन्य नागरिक उपस्थित होते
सदर कार्यक्रम हा प्रमूख मार्गदर्शक कृषी महाविद्यालय प्राचार्य शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

सूर्या मराठी न्यूज कडून हिशोबाची पोलखोल बातमी प्रकाशित होताच महिला बचत गट व अधिकारी यांच्यावर कारवाई .

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.15 जुलै हिंगणघाट वासियांचे लक्ष केंद्रित करणाऱ्या हिंगणघाट नगर पालिकेच्यावतीने संत तुकडोजी वार्ड येथे शहरातील बेघर तसेच निराधार व्यकतींचा सांभाळ करण्यासाठी आश्रय शहरी बेघर निवाऱ्यांची स्थापना करण्यात आली होती, याचे व्यवस्थापनासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या प्रेरणा वस्ती स्तर संस्थेच्यावतीने येथे आर्थिक घोटाळा होत असल्याची तक्रार शहरातील सामाजिक कार्यकर्ता दिनेश वर्मा यांनी मुख्याधिकारी जगताप यांचेकडे केल्यानंतर पालिका प्रशासन खड़बडून जागे झाले असून आज सदर वृत प्रकाशित होताच सदर संस्थेला तसेच संबंधित पालिका कर्मचाऱ्यांना,अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात आला आहे.
सदर संस्थेवरती कारवाई होणार असून आश्रय बेघर निवाऱ्याचे कामसुद्धा त्यांचेकडून काढण्यात येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.
प्रेरणा वस्तीस्तर संस्था या संस्थेवर कारवाई करण्यात येईल झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्याचे तसेच गैरव्यवहार झालेल्या रकमेची वसुली करण्याचा आदेशही मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरोडेखोरांना बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लुटले होते. या दरोड्यांतील पाच गुन्हेगारांचे नावे निष्पन्न झाले

0

 

 

यावल (प्रतिनिधी )
विकी वानखेडे

यावल शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या कवडिवाले यांच्या सराफा दुकानावर ७ जुलै रोजी दुपारी चार दरोडेखोरांना बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लुटले होते. या दरोड्यांतील पाच गुन्हेगारांचे नावे निष्पन्न झाले असून एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरूवार १४ जुलै रोजी कांदीवील मुंबई येथून अटक केली आहे.
निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय-३२) रा. रामनगर ता. कन्नड जि.औरंगाबाद ह.मु. कांदीवली पुर्व मुंबई असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारातील व्यवसायीक बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात दुकान मालक आणी शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले हे दिनांक ७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात असतांना चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने घेवुन पळाले होते. याप्रसंगी काही धाडसी युवकांनी त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला तरी देखील ते दरोडेखोर आपल्या कडील पल्सर या मोटरसायकलने पळुन जाण्यात यशस्वी ठरले होते. भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. पालकमंत्र्यांनी या दरोड्याची उकल पोलीस प्रशासन लवकरच करेल अशी ग्वाही दिली होती. संशयित आरोपी हा कांदीवली येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी संशयित आरोपी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय-३२) रा. रामनगर ता. कन्नड जि.औरंगाबाद याला आज गुरूवारी १४ जुलै रोजी सकाळी कांदीवली मुंबई येथून अटक केली. त्याची चौकशी केली असताना दरोड्यातील गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव रा. बोरवाला ता. यावल ह.मु. तापीकाठ स्मशानुभमी जवळ भुसावळ, सुनिल अमरसिंग बारेला रा. गोऱ्या पाडा ता. चोपडा, रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी रा. श्रीराम नगर भुसावळ आणि चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ लोणारी रा. मोहित नगर भुसावळ यांचा समावेश असल्याचे सांगितले.

अपंग बीज भांडवल कर्ज प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनात बैठक संपन्न.

0

 

हंसराज उके अमरावती

अपंग सामूहिक आंदोलनाची दखल घेऊन बैठकीचे आयोजन

अमरावती , अपंग कर्ज प्रकरणात अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात 14 अपंग बांधवानी 1 महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 वेडा सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात आले होते, परंतु अपंग कर्ज प्रकरण हे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाशी निगडित असल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेतली व सर्व बँकेच्या अधिकारी व संघटनेच्या पदाधिकार्यासोबत दिनांक 12/7/2021 रोजी बैठकीचे लेखी आश्वासन पत्र दिले म्हणून अपंग सामूहिक आत्मदहन आंदोलन तात्पुरता स्थागिती करण्यात आले होते त्यानुसार आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली डॉ पंजाबराव देशमुख सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत 14 अपंग कर्ज प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली व सर्वसाधारण त्रुटी असलेल्या 9 प्रस्तावावर लवकरच मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले , 1 प्रस्ताव मंजूर करण्यात आला व 4 प्रस्तावावर सखोल चौकशी करून कारवाही करण्याचे आदेश देण्यात आले यावेडी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जाधवर साहेब,अपंग नेते शेख अनिस पत्रकार,जेस्ट अपंग नेते सुधाकर काळे,जिल्हा अध्यक्ष मयुर मेश्राम ,लीड मॅनेजर झा साहेब,अपंग विभाग प्रमुख पी.डी शिंदे ,प्रशांत सांगोले, महाराष्ट्र बँक ,सेन्टर बँक ,इंडियन ओव्हर्सिस बँक,इंडियन बँक,कॅनरा बँक,स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांचे प्रादेशिक व्यवस्थापक उपस्तीत होते

अवधेशचा लद्दाख ते कन्याकुमारी पायदळ प्रवास 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिना दिवशी कन्याकुमारी पोहोचण्याचा ध्यास !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट – तरूणाई बिघडली, वाईट मार्गाने लागली, सामाजीक भान हरवलेली तरूण मंडळी अशा गोष्टी नेहमीच ऐकायला आणि अनूभवायला मिळते. परंतु विश्व कल्याणासाठी वयाच्या तिशीत ४२०० कि.मी चा पायदळ प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याकरिता निघालेल्या अवधेशकडे बघितल्यावर आम्हा तरूणांमधे नवी उमेद जागृत होते.

काल दुपारी १:०० च्या सुमारास स्नेहल नर्सरीत काही रोपं घ्यायला गेलो असता खांडरे सर, गुड्डू भाऊ आणि गोलू भाऊंसोबत एक व्यक्ति चर्चा करत दिसली. त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली तेव्हा त्या व्यक्तिची पर्यावरण रक्षणाबाबत असलेली कळकळ समजली.

मुळचा मथुरेचा राहणारा अवधेश शर्मा याने भारताच उत्तरेकडील टोक असलेल्या लद्दाख मधील थांग या गावापासुन भारताच दुसरं टोक म्हणजेच कन्याकुमारीपर्यंत एकूण ४२०० कि.मी चा पायदळ प्रवास करण्याच ठरवलेलं आहे. यामागचा त्याचा उद्देश विचारला असता त्याने RGB म्हणजेच
Red Donate Blood,
Greeen.
* Save Environment,
Blue .Save Water.
हे असल्याच सांगितल. या तरूणाचा हा पहिलाच प्रवास नसून याआधी संपुर्ण उत्तराखंड प्रदेश सायकलने पालथा घातला. तर सियाचीन सारखा (उने)-३०° चा अतिथंड भूभाग पायदळ सर केला. RGB मोहीम सुरू असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. ज्यामधे अटल टनल हे ९ कि.मी चे अंतर पार करत त्याने आपल्या दृढ निश्चयाचा परिचय दिला.

खांडरे सरांनी ४२०० झाडं देऊन अवदेशची स्वप्नपूर्ती केली .

३५ किलो वजनाची बँग घेऊन प्रवासाला निघालेला हा तरूण काल त्याच्या ६६ व्या दिवसाच्या प्रवासात श्री. दिगांबरजी खांडरे यांच्या स्नेहल किसान नर्सरीत पोहोचला. तिथे जाण्याचा उद्देश म्हणजे आपला जेवढया किलोमीटरचा प्रवास होईल तेवढी झाडं प्रवास संपल्यावर आपल्या मूळ गावी मथुरेला लावण्याचा संकल्प त्याने केलेला होता. त्यामुळे प्रवासादरम्यान जिथे कुठे नर्सरी दिसली तिथुन काही झाडं उपलब्ध होईल का? या अपेक्षेने जात होता. परंतु खांडरे सरांची भेट झाली आणि ४२०० झाडांच्या लागवडीचे उद्दीष्ट चुटकीसरशी पुर्णत्वास आले. खांडरे सरांनी सगळीच रोप विनामूल्य देण्याचे कबुल केले. सरांनी आजवर लाखो झाडं देणगी स्वरूपात दिली त्यात ही आणखी भर म्हणता येईल. रोज ४० ते ५० कि. मी चा प्रवास करताना राहण्याची व्यवस्था हा अडचणीचा विषय ठरतो. परंतु आपल्या नर्सरीत जेवणाची व्यवस्था आणि पुढील मुक्कामाची पांढरकवडा येथे व्यवस्था श्री. खांडरे सरांनी केली.

विश्व कल्याणाचा ध्यास उरी बाळगून ४२०० कि. मी च्या अवघड प्रवासाला निघालेल्या एका अवलीयाला या प्रवासात एक असाच अवलीया श्री. खांडरे सरांच्या रूपाने मिळाला. पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन आयुष्याच्या ऐन उमेदीचा काळ खर्ची घालणाऱ्या या तरुणाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आम्ही हजारो कि.मी पायी चालू शकणार नसू. परंतु दोन पावलं समोर टाकून झाडं लावू शकतो. पावसात विनाकारण वाहणारं पाणी वाचवु शकतो. लाख मोलाचा जीव रक्तदान करून वाचवू शकतो. आणि अवधेश सारख्या तरूणाच्या पायपिटीला न्याय देऊ शकतो.

अवधेशचा १५ ऑगस्टला स्वातंत्र दिनादिवशी कन्याकुमारी पोहोचण्याचा ध्यास आहे. त्यासाठी आपल्या शुभेच्छा त्याच्या पाठिशी असू द्या.

यावल शहरातील शस्त्र सराफा दरोड्यातील एक संशयीत आरोपी गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती लागला आहे

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातील कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर पडलेल्या शस्त्र दरोडयाच्या तपासात आज पोलीसांनी १ संशयीत आरोपी पकडता आहे . याबाबतचे वृत्त असे यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील बाजीराव कवडीवाले व शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानात दिनांक ७ जुलै रोजी भरदिवसा चार दरोडेखोरांनी मोटरसायकलवर येवुन शस्त्र दरोडा टाकुन सुमारे ११ लाख रूपयाचे दागी न्यासह ५५ हजार रुपयांचा ऐवज जबरी चोरी करून लुटला होता . यावल शहरातभरदिवसा घडलेल्या या दरोडयाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान दरोडेखोरांना पकडण्यासाठी काही धाडसी तरूणांनी प्रयत्न केले होते मात्र तरी देखील दरोडेखोर पडुन जाण्यात यशस्वी झाले होते . दरम्यान या शिवसेना शहरप्रमुखाच्या सराफा दुकानांवर पडलेल्या शस्त्र दरोड्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देवुन परिस्थिती माहीती घेवुन, पोलीस या आरोपींचा शोध लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता .दरम्यान पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तपासकामी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली , या तपासी यंत्रणेला यश मिळाले या दरोडयातील एका संशयीत आरोपीस मुंबईहुन पकडण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार कळाले असुन , उर्वरीत या गुन्ह्यातील आरोपींचाही शोध लागेल असा विश्वासपोलीस प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे .