Home Blog Page 443

डोंगर कठोरा येथे खळ्यास भिषण आग ९ पशुधनांपैकी ३ म्हशीचे पारडुच मृत्यू तर ४ पारडू गंभीर जळाले व इतर शेतीपयोगी अडीच लाखांच्या नुकसान

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील युवराज गणपत भिरुड यांच्या गावाजवळील खळ्यात सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अचानक भिषण आग लागली.या आगीमध्ये त्यांच्या खळ्यातील शेती उपयोगी सामान यात कडबा,कुट्टी जळून खाक झाले तर नऊ पशुधनापैकी अडीच ते तीन वर्षांचे तीन म्हशीची पारडुचा होरपळून मृत्यू झाला तर चार म्हशीचे पारडू गंभीर स्वरूपात जळाले असुन,दोन गाईं देखील जखमी झालेल्या आहेत.सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास खळ्याशेजारी रहिवासी असणारे चिंधु अवचित पाटील यांना या खळ्याजवळ धूर दिसला त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता आग लागलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले यावेळी विजय जंगले व चिंधु पाटील यांच्या आग लागलेली असल्याचे लक्षात येताच जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे गावातील लोक तात्काळ त्या ठिकाणी मोठया संख्येत जमा झाले एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.तोपर्यंत खळ्यातील शेतीपयोगी सामान यामध्ये कडबा,कुट्टी हे जळून खाक झाले तसेच तीन म्हशीचे पारडुंचा मृत्यू झाला व चार म्हशीचे पारडू गंभीर जळालेले असून दोन गायीसुद्धा आगीमध्ये जखमी झालेले आहेत.घटनेची माहिती समजताच तहसीलदार महेश पवार यांनी तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. घटनास्थळी सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,ग्राम विकास अधिकारी सी.जी.पवार, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.सी.भगुरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ.के.डी. बावस्कर,डॉ.सुरेश सोनवणे, लोटू धनगर,ग्राम पंचायत सदस्य मनोहर ईच्छाराम महाजन,जुम्‍मा तडवी,कोतवाल विजय आढाळे,ग्राम पंचायतचे कर्मचारी प्रदीप पाटील कलेश कोल्हे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बचत गटाच्या नावावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , अधिकारी यांच्या हिशोबाची पोल-खोल

0

 

सचिन वाघे वर्धा
दि.14 जुलै
हिंगणघाट :- मनोरुग्ण , दिव्यांग, लोकांनकरिता आमदार समीर कुणावार ,नगराध्यक्ष श्री प्रेम बसंतानी यांच्या सहकार्याने आश्रय शहरी बेघर निवारा सुरू करण्यात आला या करिता हिंगणघाट नगरपालिका कडून कमला नेहरू शाळा ची इमारत उपलब्ध करण्यात आली तसेच येथील व्यवस्थापन करीता प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था यांची निवड करण्यात आली सुरुवाती मध्ये शासन कडे निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही शहरातील मदत करणारे नागरिकांकडून वस्तुरूप मध्ये मदत घेतली व अनेकांनी स्वतः मदत केली यामध्ये पलंग, टीव्ही ,कुलर ,पंखे, पेटी ,कपडे ,चादरी , ब्लॅंकेट इत्यादी त्यांच्या सुविधा करिता साधन उपलब्ध केले तसेच रोटरी क्लब हिंगणघाट कडून महिन्यातून सर्वांचे इलाज व त्यांची दवाई ची मदत उपलब्ध झाली. या सर्वांच्या मदतीने आश्रय बेघर निवारा व्यवस्थित सुरू झाले व कुठलेही अडचण मध्ये आल्यास आम्ही शहरातील मदत करणारे नागरिकांकडून तसेच अन्य सामाजिक संस्थाकडून वस्तुरूप मध्ये मदत घेऊन स्वतः तिथे राहून सर्व बेघर सदस्यांची त्यांना गरज असलेली मदत करत आहोत .
शासनाकडून उपलब्ध झालेला निधी मध्ये हिशोबात दाखविलेल्या खर्चामध्ये गैरव्यवहार दिसून आला .
जून 2021 मध्ये जाहिरात देऊन 35 ते 40 लोकांची मुलाखात घेण्यात आली. 1)व्यवस्थापक म्हणून 1 पद
2) काळजी वाहक 2 पद
(1 महिला व 1 पुरुष )
3) पहारेकरी एक पुरुष
याबद्दलची जाहिरात तरुण भारत मध्ये देण्यात आली.
हिशोबात जाहिरात खर्चावर 15,000 रुपये दाखवले.
पदसंख्या नुसार डिसेंबर 2020 ला 3 कर्मचार्‍याचा 9860 प्रमाणे पगार 29580 रुपये व व्यवस्थापक याचा पगार 9880 रुपये याप्रमाणे डिसेंबर महिन्यात
39460 रूपये दाखवले
जानेवारी 2021 पासून तीन कर्मचाऱ्यांचा 14790 रुपये प्रमाणे 44370 रुपये व व्यवस्थापकाचा 14820 रुपये पगार दाखविला एकूण पगारावर जानेवारी महिन्यात 59190 रुपये खर्च दाखविला याप्रमाणे प्रत्येक महिन्यात खर्च दाखवित आहे
परंतु प्रत्यक्षात व्यवस्थापन खर्च डिसेंबर2020 मध्ये 19200 रुपये खर्च
जानेवारी 2021 मध्ये 21000 रुपये खर्च
फेब्रुवारी 2021 पासून 22000 रुपये खर्च प्रत्येक महिन्यात दाखवण्यात येत आहे या खर्चा मधून अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव हे प्रत्येकी 5000 रुपये प्रमाणे 15000 रुपये घेत आहे यापैकी पहारेकरी 3500 रुपये व स्वयंपाकी इला 3500 रुपये देत आहे प्रत्यक्षात पद भरले गेले नाही हिशोबात डिसेंबर 2020 पासून खर्च दाखवण्यात येत आहे
सरकार कडून मोठ्या प्रमाणात महिला सशक्तिकरण च्या नावावर बचत गटाला प्राधान्य देऊन रोजगार निर्माण करत आहे या बचत गटांच्या व्यवहार तपासण्यासाठी सरकार कडून अधिकाऱ्यांची नेमणूक केली असते सर्व मिळून भ्रष्टाचार करतात याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दिनेश वर्मा यांनी मुख्याधिकारी कडे केली आहे

माननीय लोक प्रिय आमदार. राजेश भाऊ एकडे यांचे वाढदिवसा निमित्ताने. विविध कार्यक्रम

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

माननीय लोकप्रिय आमदार राजेश भाऊ एकडे यांच्या वाढदिवसा.निमित्त.विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्या तिल एक भाऊचि नांदुरा ता.का.कमीटिचे वतीने लाडू तूला करण्यात आली त्या वेळी पदमराव पाटील. ता.काँ..निलेश पाऊलझगडे. भगवान धांडे पुरुषोत्तम झालटे. केशव मापारी .ता.काँ.क.उपा.आकाश वतपाळ. अतुल पाटील. शशिकांत गव्हाळ. शंकर बोदळे. संतोष लाहुळकार. सुनीता ताई देशमुख. असंख्य कार्य करते उपस्थित होते

यावल येथे आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थ सहाय्याचे धनादेश वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तहसील कार्यालयात आज यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावल तहसीलच्या कार्यालयात आज दिनांक १४ जुलै रोजी तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील मयत झालेल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखास प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आलीत या १६ कुटुंबातील कुंटुब प्रमुखांना तिन लाख २० हजार रुपयांचे धनादेश यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते व तहसीलदार महेश पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार सौ . भाग्यश्री भुसावरे , यावल पंचायत समितीचे गटनेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील , कॉग्रेस कमेटीचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह पक्षाचे विविध पदावरील कार्यकर्ते उपस्थित होते . या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची नांवे १ ) पुष्पा तुकाराम कोल्हे रा . फैजपुर ता यावल , २ )मनिषा प्रविण कोळी , राहणार हंबर्डी, ३ )विमल मधुकर भोई रा फैजपुर, ४ ) संगीता रविन्द्र मंडवाले , रा . फैजपुर , ५ ) मंगला नथ्थु तायडे , रा . हंबर्डी ,६ ) सुमित्राबाई कैलास पाटील , रा . सांगवी खुर्द , ७ ) मालती गोपाळ भालेराव , रा . सांगवी बु॥ ता . यावल , ८ ) सुनिता सोमा भारुडे , रा . अट्रावल ता . यावल , ९ ) सुंदरबाई वसंत भोई , रा . यावल , १० ) रईसाबी अकील रवान ,रा .यावल, ११ )हसीना मुबारक तडवी, रा . बोरखेडा खुर्द ता . यावल , १२ ) हसनुर अब्बास तडवी , रा . मोहराळा तालुका यावल , १३ ) सुरेखा पुंडलीक कोळी , राहणार यावल , १४ ) फातमा बाई दगडु तडवी , राहणार कोरपावली, १५ )अपशान रशीद तडवी , रा . कोरपावली आणी रविन्द्र मिठाराम सपकाळे , रा . यावल या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.

जागो ग्राहक जागो ” ग्राहक सवरक्षणं फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी – अ‍ॅड .देवकांत पाटील यांची नियुक्ती

0

l

याव (प्रतिनिधी)विकी वानखेडे

तालुक्यातील विरावली येथील अ‍ॅड देवकांत बाजीराव पाटील यांची ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वंदना जैन यांनी नुकतेच दिले आहे. अँड देवकांत पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व विरावली ग्रामपंचायत सदस्य आहेत. देवकांत पाटील यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या कार्यकारिणीत सचिव पदी निवड झाली आहे. निवडी बद्दल पाटील यांनी आभार मानले असून आपण या पदाला न्याय देऊ असे अ‍ॅड. देवकांत पाटील पाटील यांनी सांगितले.

या निवडीबद्दल अ‍ॅड देवकांत पाटील यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड रवींद्र पाटील , रावेर- यावल विधान सभेचे आमदार शिरिषदादा चौधरी , माजी पालकमंत्री डॉ सतीष आण्णा पाटील ,विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी साहेब , माजी आमदार मनीष जैन , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले, राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख अनिल साठे, माजी नगर अध्यक्ष शशांक देशपांडे , माजी नगरअध्यक्ष अतुल पाटील ,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तथा जि प चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक नितीन चौधरी ,पं, स. गट नेते शेखर पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील , माजी उपसभापती पं.स.दीपक पाटील , सेनेचे उपजिल्हासंपर्क प्रमुख भूषण नागरे , सेना शिक्षक संघटनेचे घनश्याम निळे , डॉ नरेंद्र महाले मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अजय पाटील , उंटावद सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील, फैजपूर चे शहर अध्यक्ष अन्वर खाटीक , राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष पवन पाटील यावल शहर अध्यक्ष हितेश गजरे ,समन्वयक किशोर माळी यावल वकील बार संघ अध्यक्ष यावल बार अँड धीरज चौधरी , सचिव निलेश मोरे अँड के डी पाटील , अँड नितीन चौधरी , अँड गोविदा बारी , अँड निवृत्ती पाटील, अँड हेमराज क्षीरसागर ,अँड उमेश बडगुजर ,अँड गौरव पाटील ,अ‍ॅड विनोद परतणे , अँड सुलताना तडवी , सर्व वकील सहकारी सह , विनोद पाटील , शरद राजपूत ,संजू पाटील ,डॉ विवेक अडकमोल ,गुणवंत नीळ,प्रल्हाद पाटील , गुलाबराव पाटील , गिरीष पाटील , जमीर पटेल , दीपक पाटील ,रणधीर पाटील ,गोकुळ पाटील ,संजू तडवी ,गणेश पाटील , प्रदीप पाटील राहुल पाटील , चेतन पाटील ,किशोर पाटील, राजेश अडकमोल भूषण पाचपोडे , चंद्रकांत येवले ,राज कोळी, प्रशांत पाटील, भूषण निळे ,देवेंद्र पाटील ,नरेंद्र शिंदे ,राकेश सोनार , योगेश पाटील यांच्यासह तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आह .

जिल्हा परिषदचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी पहिल्या आठवड्यात यावल येथे भेट

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

जिल्हयातील आज यावल येथे भेट देवुन संपुर्ण विभागाच्या कामांचा आढावा
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे भीषण वास्तव आज समोर आले आहे. तालुकांतर्गत येणाऱ्या ७ शाळांना अद्यापही हक्काची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना झोपडीत शिक्षण दिले जात आहे. अशी माहिती सीईओंनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली आहे.
तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषदच्या शाळांना आज देखील आंबापाणी, टेंभुरणबारी, चारमळी, माथन, साक्यादेव,रुईखेडा, लंगडाआंबा, या ठिकाणच्या ७ शाळांना आज देखील ईमारती नसल्याने येथील विद्यार्थी झोपड्यांमध्ये शिक्षण घेत असल्याची माहीती समोर आली. तरी सदरील आदिवसी वस्ती/पाडे हे वन जमीनी (फॉरेस्ट) हद्दीत असुन सदरील शाळा बांधकाम प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे,तसा बांधकाम पाठपुरावा सुरु आहे,त्याचप्रमाणे तालुक्यातील १११ मुलींच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये अद्याप २९ शाळांमध्ये अद्याप विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहच नसल्याची माहिती तसेच त्या शाळा वन जमीनीवर (फॉरेस्ट) हद्दीत आहेत आढावा बैठकीत शिक्षण विभागाकडुन शिक्षणधिकारी नईम शेख यांनी दिली. तसेच यावेळी गरोदर मातांच्या पोषण आहार व कुपोषीत बालकांच्या विषयाला गांर्भीयांने घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सिईओ पंकज आशिया यांनी म्हटले आहे. आज पंचायत समितीच्या अंतर्गत विविध शासकीय योजनांची अमंलबजावणी आणी प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी आज यावल येथे भेट देवुन संपुर्ण कामांचा आढावा घेतला.
दरम्यान आज दि.१३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता यावल पंचायत समितीच्या सभागृहात जळगाव जिल्हा परिषदचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या विभाग निहाय कामाचा आढावा सविस्तर आढावा घेतला.
दरम्यान या बैठकीत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभाग ,ग्रापंचायत विभाग, इतर सर्वच विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला,यावेळी ज्या विभागाच्या कामांची शासनाव्दारा दिलेल्या कामांची प्रगती अत्यल्प असेल त्यांना तात्काळ नोटीसा बजवा अशा सुचना यावेळी पंकज आशिया यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. या आढावा बैठकीत महीला व बालविकास विभागाच्या व आरोग्य विभागा, मनरेगा  तसेच बांधकाम विभागाच्या वतीने समाधानकारक उत्तरे मिळाल्याने सदर अपुर्ण कामे ८ दिवसात पुर्ण करावी अशी ताकिद नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी अशा प्रकारच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश एस. पाटील, ग्रामविस्तार अधिकारी हबीब तडवी, ग्रामविस्तारअधिकारी किशोर सपकाळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे, गटशिक्षण अधिकारी नईम शेख, महीला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रभारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोये, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. पी .कोते यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह विविध विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते.

शिवसेना शहर प्रमुख सतीश ढोमणे यांच्या नेतृत्वात शहरातील समस्या विषयी हिंगणघाट नगरपालिकेत धडक मोर्चा

0

 

 

सचिन वाघे वर्धा

दि.13 जुलै  हिंगणघाट शहरातील विविध योजनेचे काम सुरू आहे पण त्या कामात नगर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे या कामावर योग्य उपायोजना करावे या बाबत मुख्यधिकारी यांना निवेदनातून केली मागणी.
१) शहरातील संपूर्ण भागात अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजना तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून काम चालू आहे या कामाची मुदत संपल्यानंतर सुद्धा कामे पूर्ण झाले नाही या कामामुळे सिमेंटचे रस्ते डांबरीकरण रस्ते तसेच सिमेंट नाल्या तोडण्यात आले ते आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाही या आपल्या विभागाच्या हलगर्जीमुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आपण हे काम पूर्ण करण्यास आपले प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे दिसत आहे
२) अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेतील कामे जवळपास झालेले आहे. पण 60 % वार्डातील काही भागात अजूनही लोकांच्या घरा मागची नाली बंद करून लोकांच्या घरचे आउटलेट ला पाईप जोडून चेंबर पर्यंत नेण्यात आले पण पावसाळ्यातील पाणी पुढे न जाता लोकांच्या घरात नालीचे सांडपाणी परत येत आहे यावर आपण काहीही उपाययोजना केलेली नाही ती त्वरित करण्यात यावी .
३)शहरातील प्रत्येक वार्डात मागील चार वर्षापासून एक दिवसानंतर पाणीपुरवठा नगरपरिषद करीत आहे याबाबत नगर परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे की पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले मग आपण एक दिवसानंतर पाणीपुरवठा का करतात ? तो नियमित करण्यात यावे व जनतेला सोयी उपलब्ध करून देण्यात यावे .
४) पावसाळ्याच्या काळात विविध वार्डात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे . हा घनकचरा उचल करणाऱ्या करिता एजन्सी निवडली आहे मग हा संपूर्ण शहरातील कचरा बाबत नगर प्रशासन गंभीर का नाही आपल्या हलगर्जीमुळे कोरोना चा प्रादुर्भाव असताना वेगवेगळ्या आजाराला निमंत्रण देण्याचे काम आपल्यामुळे होत आहे यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा
५) शासनाच्यावतीने लोक उपयोगी नाविन्यपूर्ण योजना संपूर्ण शहरात LED पथदिवे लावण्याचे उपक्रम राबविण्यात आले पण काही प्रभागात अजूनही LED बल्ब लावण्यात आले नाही आणि नगरप्रशासन म्हणतो आहे की संपूर्ण शहरात व वार्डात LED पथदिवे लावण्यात आले यावर स्पष्टता द्यावी ? तसेच शहरातील रस्त्यावरची पथदिवे नेहमी बंद दिसून येते आपल्या जवळ मेंटेनन्स अशी कोणती व्यवस्था नाही यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावे लागत आहे.
६) केंद्राच्या योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत समाजाच्या घटकाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून योजना अमलात आणली आहे पण दोन वर्षापासून या योजनेपासून लाभार्थी वंचित आहे असे आमचे सरळ आपल्यावर आरोप आहे यावर तातडीने कार्यवाही व्हावी.
७) राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश आहे की दिव्यांग धारकांना नगर परिषदेच्या माध्यमातून वार्षिक ठराव घेऊन नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नावर 5 % निधी अनुदान देण्याचे करावे पण नगर प्रशासन दिव्यांगावर अन्याय करीत असल्याचे दिसत आहे . यावर ताबडतोब कारवाई व्हावी
८) हिंगणघाट शहरातील विविध भागात मंदिर , मज्जिद ,बगीचा सांस्कृतिक भवन, अंगणवाडी शाळा , वॉर्डातील काही भागात जवळपास 400 बोरवेल करण्यात आले आहे या बोरवेल चे पाणी ची चाचणी कधीही करण्यात आलेली नाही ? पावसाळ्याच्या काळात नागरिक त्या पाण्याचे उपयोग करीत असताना ते पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ? याबाबत फलक त्या बोरवेल जवळ लावावा .
९) आपल्या नगरपरिषद मध्ये मुख्य विभाग आहे तो म्हणजे जन्म व मृत्यू चा पण या विभागात लोकांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून अशी खूप तक्रार आहे .बाहेरगावावरून येणार्‍या या लोकांना तर एक दोन दिवस राहुन प्रमाणपत्र मिळतो मिळतो पण काही लोक त्यांच्याजवळ राहण्यासाठी घर नसेल तर त्या लोकांनी का करावे ? हा मोठा प्रश्न आहे याबाबत आपण तातडीने व्यवस्था करावी जेणेकरून लोकांना एकाच दिवशी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या सर्व मागण्या बद्दल कारवाई करावी अन्यथा पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल संबंधित निवेदन देतांना श्री.राजु खुपसरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख,श्री.प्रकाश अनासने उपतालुका प्रमुख,श्री.अभिनंदन ,मुनोत युवासेना जिल्हा प्रमुख,श्री.चंद्रकांत घुसे उपाध्यक्ष न.प.हिं श्री. श्रीधर कोटकर नगरसेवक गटनेता न.पा.हिं.श्री.सतिश ढोबे नगरसेवक,श्री.सुरेश मुंजेवार नगरसेवक,श्री.मनिष देवढे नगरसेवक,सौ.निता धोबे नगरसेविका, श्री.भाष्कर ठवरे नगरसेवक,सौ.सुनिता पचोरी नगरसेविका,श्री.निलेश पोगले नगरसेवक,श्री.बंटी वाघमारे, श्री.महेन्द्रा पचोरी,श्री.देवेंद्र पडोळे माजी नगरसेवक,श्री.शंकर मोहमारे माजी नगरसेवक,सौ.माधुरी खडसे माजी नगरसेविका,सौ.नलिनी सयाम माजी नगरसेविका
श्री.मुन्ना त्रिवेदी, श्री.डॉ.आदर्श गुजर श्री.जयकुमार रोहणकर,श्री.संजय पिंपळकर,श्री.रोहीत बक्षी,श्री.निखील वाघ,श्री.भुषन कापकर,श्री.सोनु कोनप्रतिवार,श्री.हिमेश ढोबे,श्री.नरेश भजभुजे,श्री.कमलेश वझेकर,सौ.हेमा मडावी,श्री.संजय मसानकर,श्री.बलराज डेकाटे,श्री.संजय इटनकर,श्री.नितिन वैद्य,श्री.पांडुरंग निखाडे,श्री.उमेश ढोबे,श्री.रुपेश काटकर,श्री.विजय कोरडे,श्री.सौ.सातपुते, सौ.कल्याणी निखाडे,सौ.भजभुजे,सौ.हेमा मडावी,श्री.अरुण सोनटक्के,श्री.संजय सयाम,श्री.राजु ढोलकीया,श्री.कुलदिप ठवरे,श्री.आकाश निखाडे,श्री.शाम येळणे,श्री.आदर्श भोयर,श्री.सतीश चतुर,श्री.राजु कोल्हे,श्री.अभीजीत चव्हाण,श्री.पाल गुरुजी,श्री.विठ्ठल गलांडे,श्री.नितिन गलांडे,श्री.सौ.रोशनी गलांडे,श्री.अजय मुलरवार,श्री.हिरामण हिंगे,श्री.शंकर झाडे,श्री.भाष्कर मानकर,श्री.गजु राऊत,श्री.विनोद यामाते,श्री.अतुल जुमडे,श्री.मनोज धवड,श्री.एकरी झाडे,श्री.बालु दुर्गे,श्री.गब्बा टापरे,श्री.सुरेश तांदुळकर,श्री.रुपेश कापकर,श्री.श्री.तुळशी लोणकर
संबंधित निवेदन माननीय श्री १)उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र
२) माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री
३) श्री सुनील केदार साहेब पालकमंत्री वर्धा
४) माननीय जिल्हाधिकारी वर्धा
५) माननीय श्री अनंत गुडे साहेब माजी खासदार व जिल्हा संपर्कप्रमुख वर्धा
६) माननीय श्री अनिल जी देवतारे जिल्हाप्रमुख वर्धा

पिकविमा मिळावा या मागणीकरिता सुनगाव येथील नागरिकांनी दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा. प्रतिनिधी:-

सुनगाव येथील शेतकऱ्यांनी दिले जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांना सन 2020 व 21 च्या पिक विमा मिळणेबाबत दिनांक 12 जुलै रोजी देण्यात आले निवेदन. मागील वर्षी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस मूग उडीद ही पिके पूर्ण नष्ट झाली तर मून सोयाबीन पिके ही घरी सुद्धा आणले नाही महसूल विभाग व कृषी विभागाने या शेतकऱ्यांचा पीक पाहणी पंचनामा केला असता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याची आनेवारी ही 37% नक्की आलेली आहे शासन निर्णय शेतकऱ्यांना आणेवारी कमी आल्यामुळे पिक विमा मिळणे आवश्यक होते परंतु शेतकऱ्यांना आज पर्यंत सुद्धा पिक विमा मिळाला नाही सुनगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे ही विनंती केली की शासन दरबारी व विमा कंपनी यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा सदर निवेदन देण्याकरिता सुनगाव येथील सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, अशोक काळपांडे, मोहनसिंग राजपुत,प्रविण धर्मे,पत्रकार गणेश भड,पत्रकार गजानन सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे,किसन ताडे, प्रमोद नानग्दे,त्रिलोक राजपुत,प्रमोद वानखडे,संजय राजपूत,मंगेश वंडाळे,श्रीराम राउत,अतुल गिर्हे, लक्ष्मण धुळे, पंकज भगत, मधुकर धुळे, किसना ताडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी या वेळी उपस्थित होते

सुनगांव येथील विद्युत पुरवठा नेहमी खंडित राहत असल्या कारणामुळे नागरिकांचे विद्युत वितरण विभागाला निवेदन देत दिला उपोषणाचा इशारा…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस कंटिन्यू सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान सुनगाव येथील विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. तरीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिक उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्या कारणामुळे वेल्डिंग व्यवसाय गिरण्या बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले असता सहाय्यक अभियंता कातखेडे यांनी सुनगाव येथील नागरिकांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबडकार तसेच पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे आक्रमक झाले असता सहाय्यक अभियंता कातखेडे नरमले व त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले सुनगाव येथील नागरिकांनी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना अशी मागणी केली की सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास सुनगाव येथील नागरिक हे दिनांक 22 जुलै पासून जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण नास बसतील असे निवेदन देण्यात आले निवेदनावर सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे,अशोक काळपांडे, प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ,पत्रकार गणेश भड,पत्रकार गजानन सोनटक्के, मंगेश वंडाळे,त्रिलोकसिंह राजपुत, लक्ष्मण धुळे,किसन ताडे,देविदास गिर्हे,प्रमोद वानखडे,मधुकर धुळे,गजानन येउल,श्रीराम राउत,संजय राजपुत यांच्यासह बहुसंख्य सुनगाव येथील नागरिक उपस्थित होते.

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते बायपॅप मशीन चे वितरण.ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोदला भेट दिल्या 3 बायपॅप मशीन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:-

कतार येथे वास्तव्यास असलेले आ. डॉ. संजय कुटे यांचे बंधू विनोद कुटे यांच्या माध्यमातून लखनऊ येथील श्रीजान-एक सोच या संस्थेद्वारे ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथील डॉक्टर व स्टाफला अतीशय उपयुक्त अश्या 3 बायपॅप मशीन चे मोफत वितरण आज दिनांक 13 जुलै रोजी आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे लवकरच ऑक्सीजन प्लांट सुरू होऊन दहा बेडचे आय सी यु वॉर्ड 3 नवीन व्हेंटिलेटर सह जनतेच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सदर बायपॅप मशीन रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. लखनऊ येथील आरोग्य सेवा, स्किल डेव्हलपमेंट, शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीजान एक सोच या संस्थेचे ग्रामीण भागातील विविध उपक्रमांना यापुढेही असेच सहकार्य आपल्या भागात मिळत राहणार असल्याने आमदार डॉ. संजय कुटे यांनी त्यांचे बंधु विनोद कुटे व श्रीजान संस्थेचे मनःपूर्वक आभार यावेळी मानले.यावेळी सौ सीमाताई डोबे नगराध्यक्षा, नंदकिशोर अग्रवाल, रामदासजी बोंबटकार,सचिन देशमुख,अभिमन्यू भगत,गजानन सरोदे,राजेश गोटेचा,आशिष सारसर,अनिल कपले, सुरेश इंगळे,रमेश कोथळकार, डॉ दीपक केदार, डॉ नंदूभाऊ तायडे,गौरव डोबे,अक्षय देशमुख, यांसह ग्रामीण रुग्णालय स्टाफ उपस्थित होता.