Home Blog Page 444

बहुचर्चित दारुबंदी हटाव, वर्धा जिल्हा बचाव आंदोलन समितीची अखेर स्थापना

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.13.7.21वर्धा :– दारुबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलन आता महत्वपूर्ण वळणावर पोहोचले असून आंदोलन जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याकरिता जिल्हास्तरीय आंदोलन समितीची स्थापना करण्यात आली आहे
हे आंदोलन पक्ष, जात, धर्म, लिंग, राजकारणनिरपेक्ष ठेवण्यावर सर्वांचे एकमत असून आंदोलनाच्या प्रचार, प्रसारासाठी तन, मन, धन आणि वेळ देऊ शकणे ह्या महत्वपूर्ण निकषावर समितीचे सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत.

त्यांची नावे व संपर्क क्रमांक –

सचिन म्हैसकर – 8329302715

राहुल करंडे – 9096968243

अमित डांगे – 9175869921

श्याम परसोडकर – 9822362355

मनिष पुसाटे – 9860469894

सिद्धांत कांबळे – 9175904295

चंद्रशेखर घाटे – 8600931287

अरुण पाटील – 9503333058

सितम मंदरेले – 9890417874

राहुल पाटील – 9890653710

किरण पट्टेवार – 8975517593

दारुबंदी हटाव आंदोलनाचा कुणालाही वैयक्तिक लाभ घेऊ द्यायचा नसल्याने समितीमध्ये अध्यक्ष, सचिव किंवा इतर पदे न ठेवता सर्वांना सदस्य हे एकच पद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक सदस्य हे विविध राजकीय पक्षाचे सदस्य असूनही केवळ दारुबंदी हटविणे ह्या एकाच उद्देशपूर्तीकरीता आपसातील मतभेद दूर सारून एकत्र आले आहेत. जिल्हास्तरीय समितीकडून लवकरच तालुकास्तरीय दौरे केले जाणार असून तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात येतील, त्यामुळे आपल्या तालुक्यात सदर आंदोलनाच्या यशस्वितेकरिता श्रम, शक्ती, बुद्धी, वेळ खर्च करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनी जिल्हास्तरीय समितीतील कोणत्याही सदस्यांशी संपर्क साधून आपल्या तालुक्यात बैठक आयोजित करावी अशी दारुबंदी हटाव, वर्धा बचाव आंदोलन समिती तर्फे जाहीर विनंती करण्यात येत आहे. दारुबंदी हटाव आंदोलन समितीतर्फे शक्य त्या सर्व प्रचार, प्रसार माध्यमांचा वापर करून वर्धेकर जनतेचे मोठे प्रबोधन करण्यात येणार आहे. दारूबंदीने होत असलेल्या अन्याय आणि शोषणाची जाणीव झाल्यास हे आंदोलन लोकआंदोलन होण्यास वेळ लागणार नाही.

#दारुबंदी_साईड_इफेक्ट्स
#दारुबंदी_हटलीच_पाहिजे
#रोजगार_आमचा_अधिकार
#दारुबंदी_हटाव_वर्धा_बचाव

यावल येथे शेतात कामास गेलेल्या मजुर महीलेच्या हातास सर्पदंश ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील राहणाऱ्या एका शेतमजुर महीलेस शेतात काम करतांना सर्पदंश झाल्याची घटना घडली असुन सदर महीलेस उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , दिनांक १२ जुलै रोजी यावल येथील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या सौ . राधाबाई अमृत पाटील वय३५ वर्ष या कांततोडी शिवारातील निमजाई माता मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या सोमाजी गुरव यांच्या शेतात दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असतांना सौ .राधाबाई पाटील यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केल्याची घटना घडली असुन, सर्पदंश झालेल्या महीलेस सोबतच्या सहमजुरांनी तात्काळ यावलच्या ग्रामीणच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असुन , यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके व वैद्यकीय कर्मचारी जॉन्सन सोरटे यांनी तात्काळ उपचार केले असुन , सद्य परिस्थितीला सर्पदंश झालेल्या महीलेची परिस्थिती ठीक असल्याचे वृत्त वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाले आहे . दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यात सर्वत्र शेतीच्या विविध कामांना वेग आला असुन यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी सर्पदंश पासुन बचावा करिता योग्य ती दक्षता व काळजी घ्यावी असे आवाहन शेतकरी व शेतमजुरांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी केले असुन , शेतात काम करीत असतांना किंवा ईतर ठीकाणी सर्पदंश झाल्यास त्या व्याक्तीस कुठल्याही तंत्रमंत्र करणाऱ्याकडे घेवुन न जाता तात्काळ आपल्या जवळ दवाखान्यात उपचार करावे जेणे करून त्या व्यक्तिचा जिव वाचु शकेल असे ही डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी सांगीतले आहे .

कासारखेडा शिवारात जंगलातील विहीरीत पडुन पाण्यात बुडुन आदीवासी युवकाचा दुदैवी मृत्यु पोलीसात अक्समात मृत्युची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा जंगलातील कासारखेडा शिवारातील शेतातील विहीरीत पडुन पाण्यात बुडुन आदीवासी तरूणाचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली असुन याबाबत पोलीसात नोंद करण्यात आलेली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की दिनांक ११ जुलै रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास मोहम्मद हबीब तडवी वय२२ वर्ष राहणार कासारखेडा तालुका यावल हे व आम्ही जंगलातुन येत असतांना कासारखेडा शिवारातील मनुदेवी मंदीर रोडा वरील सायबु तडवी यांच्या शेतातील विहीरीजवळ जावुन पहात असतांना अचानक मोहम्मद तडवी याचा तोल जावुन तो खोल व पाण्याने भरलेल्या विहीरीत जावुन पडल्याची घटना घडली असुन त्याच्या सोबत असलेल्यांनी तात्काळ ही सुचना त्यांच्या कुटुंबास दिली त्या वेळेस रात्री त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी विहीरीच्या घटनास्थळी पाहणी केली असता शोध घेण्याच्या प्रयत्न केले असता विहीरीस असलेले पाणी व रात्रीचा अंधार या मुळे तडवी याचा शोध घेता आला नाही नंतर सकाळी मोहम्मद तडवी याचा मयत अवस्थेत मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले , मयताचा त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी. बी . बारेला व डॉ . शुभम तिळके यांच्या उपस्थित करण्यात आले असुन, यावल पोलीस स्टेशनमध्ये इतबार बशीर तडवी यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

यावल येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघासह्११ संघटनेचे विविध मागण्यांसाठी तहसील समोरआंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय मुल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आरक्षण बचाओ लोकतंत्र बचाओ या मागणीसाठी एक दिवसी धरणे आंदोलन केले या आंदोलनास राज्यातील ११ संघटनांनी आपला पाठींबा दर्शविला आहे . दरम्यान आंदोलन करणाऱ्या संघटनेसह आदी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार आर डी पाटील यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की , राज्यातील अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती , भटके विमुक्त आणी विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी सरकारी निम सरकारी व शासकीय आणी सार्वजनिक सेवेतील कर्मचारी व अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याच्या धोरणाच्या विरोधात दिनांक १८ फेब्रवारी २०२१ते २० / ४ /२o२१ आणी ७ मे२०२१च्या शासन निर्णयाच्या विरोधात . महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणी नोकरीतील आरक्षण विरोधी धोरणाच्या विरोधात , सार्वजनिक उपक्रमातील अस्थापनामध्ये नियमाप्रमाणे बिंदुनामावली अदययावत न करता व अनुशेष भरती न करता होणाऱ्या नियमबाह्य भरती प्रक्रीयेच्या विरोधात व ओबीसी प्रवर्गास पदोन्नतीतील आरक्षण लागु न करण्याच्या धोरणाच्या विरोधात . महाराष्ट्र अन्यायकारक शेतकरी विरोधी केन्द्रीय कायदे लागु करण्याच्या धोरणाच्या विरोधात , त्याचप्रमाणे कामगारांचे संवैधानिक अधिकारी नष्ठ करण्यासाठीच्या कामगार हिताचे कायदे रद्द करून निर्माण केलेल्या काळ्या कामगार कायद्याच्या विरोधात तसेच मराठा आरक्षण लागु करणे , अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना शासकीय कर्मचारी न मानता त्यांना नियमित वेतनश्रेणी न घेण्याच्या विरोधात अशा एकुण १४ निर्णयांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आनंद जाधव सर व मनोज तायडे सर यांनी केले तर या आंदोलनास प्रोटान संघटनेचे बी बी सुरवाडे, महेन्द्र तायडे, प्रभा तायडे , भारत मुक्ती मोर्चाचे पंकज तायडे , पंकज डांबरे , बबलु गजरे , स्वप्नील पारधे , मंथन महीरे, भिमआर्मीचे निलेश सपकाळे , आकास सुरवाडे , अतुल पारधे , आकाश बिऱ्हाडे यांच्यासह चेतन गजरे, भुषण बागुल , ऑल इंडीया दलीत पँथर सेनेचे भुषण साळुंखे , योगेश भालेराव, अमोल भालेराव , राष्ट्रीय किसान मोर्चाचे कुंदन तायडे , भिमराव साळवे , अमर कोळी , भारतीय युवा बेरोजगार मोर्चाचे ज्ञानदेव भालेराव , सागर बहारे , बुद्धीष्ट इन्टरनॅशनल नेटवर्कचे संतोष तायडे , वैभव सोनवणे , चेतन भालेराव , रोहन निकम ,हर्षल गजरे , पंकज डांबरे , पंकज तायडे , बबलु गजरे आदींनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला .

आमदार संजय गायकवाड यांची आमदारकी काढून घ्या,भगवान ईगळे

0

 

सुनील पवार नांदुरा. ता.प्र.

दि.१२जुलै खामगाव ता.चितोडा येथे सार्वजनिक शांतता भंग करने जातीय दंगल घडवून देशाच्या अखंड तेला तडा जाईल असे देश विघातक क्रूत् केलयामुळे लोकप्रतिनिधि कायदा नुसाराआमदार संजय गायकवाड यांच्या वर गुन्हा दाखल करून त्यांचि आमदारकी काढून घ्या अशी मागणी व.ब.आ.जि.उ.भगवान ईगंळे यांनी केले आहे.राज्यपाल भगतसिंग कश्यारि.यांना तहसिलदार नांदुरा ह्याच्या मार्फत निवेदन देण्यात आले त्यावेळि प्रसार माध्यमशि बोलताना केले ह्यावेळि व.ब.आ.भारतीय बैद् महासभा चे रा.चरमकार म हासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार नांदुरा यांना दिलेल्या निवेदनावर व.ब.आ.चे.ता.अध्यक्ष अजाबराव वाघोदे. मधुकर तायडे. धरमेश तायडे. भिमराव तायडे. प्रविन गुरचळ मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

कुनघाडा(रै)केंद्राची मुख्याध्यापक सभा संपन्न.विद्यार्थी गुणवत्तेवर सविस्तर चर्चा.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:आज दिनांक १२ जूलै रोजी चामोर्शी तालुक्याअंतर्गत कुनघाडा रै केंद्राची मुख्याध्यापक सभा केंद्राचे केंद्रप्रमुख गुरूदास गोमासे व गट साधन केंद्र चामोर्शीचे साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली.मुख्याध्यापक सभेमध्ये कोविड कालावधीतीत शिक्षण या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.त्यामध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या शाळेत दाखल करणे,स्वाध्याय उपक्रम,कृतिपत्रिका आणि नियोजन,आभ्यासमाला उपक्रम,सेतू उपक्रम (ब्रिज कोर्स),शाळा सिद्धी,महापोर्टल करियर,शाळा बाहेरची शाळा,मोफत पाठ्यपुस्तक योजना,शाळा बाह्य विद्यार्थी शोध आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे,शाळा व्यवस्थापन समिती सभा आणि सक्रिय सहभाग,गोष्टींचा शनिवार,नवोदय परिक्षा,वेध शिष्यवृत्ती,दिक्षा ऍपचा विद्यार्थीना उपयोग,शासनाचे उपक्रम व डायट गडचिरोली संस्थेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे,इत्यादी विषयांवर मुख्याध्यापक यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रसंगी डायट गडचिरोली संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी सभेला उपस्थित मुख्याध्यापक यांच्याशी ब्रिज कोर्स विषयी दुरध्वनी वरुन संवाद साधून मार्गदर्शन केले.सभेला कुनघाडा रै केंद्राचे सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

स्वच्छता निर्मुलन व निर्जतूकिकरण फवारणी साठी निवेदन सादर सूरज मेहरे व दर्पण टोकसे यांच्या मार्फत निवेदन दिले

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी:-प्रज्वल यावले

आज दि. १२/०७/ ला मा. पवार साहेब उपमुख्यधिकारी नगरपालिका आर्वी यांना मायबाई वार्ड व वाल्मीक वार्ड ( बालाजी वार्ड ) येथे पावसामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराई पसरत असल्यामुळे तरी इतल्या नगरपालिकाच्या आरोग्याचे दुष्टीने आपण न. प. आर्वी आरोग्य विभाग मार्फत मायबाई वार्ड व वाल्मीक वार्ड ( बालाजी वार्ड ) येथे स्वच्छता निर्मुलन व निर्जतूकिकरण फवारणी करण्यात यावे म्हणून सूरज मेहरे व दर्पण टोकसे यांनी निवेदन दिले. सुरेंद्र भिवगडे सर , सचिन मनवरे,अरुण लांडगे, योगेश बावणे अनिल पखाले ,मनोज वानखेडे, अनिकेत सिंगाने, निखिल हूमे,विशाल बडगे,सोनू हुमे,विकेश हुमे, अभिषेक ढोले, अनिकेत कुबेटकर उपस्थित होते….

आर्वी शहरातील घरकुल योजनेचे चे उर्वरित अनुदान उपलब्ध करून द्या

0

 

 

 

आर्वी तालुका प्रतिनिधी:- प्रज्वल यावले

न. प. ला प्राप्त झालेला निधी वितरित करण्याचे तात्काळ निर्देश द्या

जनता नगर येथील सार्वजनिक वैष्णवी गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर छत्री व – हायमास्ट -खेडने सौंदर्य करण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या

नगरविकास-तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे कडे दिलीप पोटफोडे यांची मागणी
वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते अभिजित फाळके पाटील यांच्या पुढाकाराने मुंबई च्या मंत्रालयात बैठक
आर्वी : नुकतीच वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगर परिषद अंतर्गत झालेले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील दोन वर्षांपूर्वीपासून 1476 लाभार्थी यांचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळण्यासाठी दिनांक 07/07/2021 ला मुंबई येथील मंत्रालयात नगरविकास -तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दालनात वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते अभिजित दादा फाळके पाटील यांच्या पुढाकारात युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे-शहर अध्यक्ष कमलेश चिंधेकर आर्वी शहरातील -व विभागातील विविध समस्या- विषय घेऊन धडकले यात प्रामुख्याने आर्वी शहरात 2018- 2019 ला 1476 DPR 1-आणि DPR -2 मध्ये घरकुल मंजूर झालेत आणि नागरिकांनी काम सुरु केलेत आर्वी शहरातील पात्र लाभार्थी नागरिकांनी रीतसर प्रक्रिया करून प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ घेतला आणि घर बांधण सुरु केले काही पात्र लाभार्थ्याना एक टप्पा कोणाला दोन तर कोणाला तीन टप्पे मिळाले परंतु कोरोना 2019 मध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढला केंद्र आणि राज्य सरकार अडचणीत आले कोणाच काम लेन्टर पर्यत तर कोणाची स्लॅप हाईट तर काहींचा जोता च पूर्ण झाला आणि पूर्ण दोन वर्ष अतोनात अडचणीचा सामना करत नागरिकांनी काढले परंतु आता लोकांची स्थिती फारच नाजूक झाली आहे भाड्याने राहणारे नागरिक भाडे न भरू न शकल्याने आता ताळपत्री टाकून राहत आहे तर काही आता ही भाड्या चा भुर्दंड सोसत आहे अशात एक आशेचा किरण दिसला कि न. प. ला 4 कोटी आलेत वितरण होईल याची वाट पहिली परंतु वितरण झाले नाहीत पुन्हा 8 कोटी आले परंतु वितरण झाले नाही अशात नागरिक मोठया अडचणीत आले आहे तरी तातडीने आलेल्या रकमेचा योग्य नियोजन करून तात्काळ पात्र लाभार्थी नागरिकांना उपलब्ध असलेली निधी वितरण करावा तसेच राज्य व केंद्र सरकार कडे बाकाया उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली तसेच
जनता नगर परिसरातील AMPS कॉन्व्हेंट लगत असलेल्या सार्वजनिक वैष्णवी गार्डन मध्ये महाराष्ट्र राज्याचे सर्व धर्माचे प्रेरक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा आहे परंतु त्यावर छत्री नसल्याने महाराजांच्या पुतळ्यावर ऊन वारा पाऊस याचा सरळ आघात होतो करिता महाराजांच्या पुतळ्यावर छत्री व्हावी परिसरातील महिला करिता सकाळ सायंकाळी फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक व्हावा लहान मुलांना खेडने उपलब्ध व्हावे महिला पुरुषां साठी व्यायाम साहित्य तसेंच याच उद्यानात नवरात्री उत्सव मोठया उत्सवात साजरा केला जातो तरी हायमास्ट असणे गरजेचे आहे या सर्व महत्वपूर्ण मागण्या प्रामुख्याने राज्याचे नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे कडे करण्यात आल्या शहरातील सर्व नागरिकांना घरकुल चा प्राप्त निधी वितरित करणे उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करावा जनता नगर सार्वजनिक वैष्णवी गार्डन मध्ये छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यावर छत्री, लहान मुलांसाठी खेडने, नवरात्र उत्सव दरम्यान परिसर प्रकाश मय राहावं करिता हायमास्ट, महिलांना व पुरुषांना वॉकिंग ट्रॅक या साठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा करिता सर्व विषय गांभीर्याने घेत संबंधितांना मार्गी लावण्या बाबत निर्देश देण्यात यावे अशी मागणी या बैठकीत रेटन्यात आली

यावल शहरात रात्री मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी पादचाऱ्याच्या हातातील महागडा मोबाइल लांबविला

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकानातील भरदिवसा पडलेल्या धाडसी शस्त्र दरोडयातील आरोपींचा शोध सुरू असतांना येथील एका दुध डेअरीच्या मालकाच्या हातातुन महागडा मोबाईल चोरटयांनी मोटरसायकल येवुन हातातुन लांबविल्याची घटना घडली असुन, चोऱ्यांचे प्रकार थांबता थांबत नसल्याचे स्पष्ठ झाले आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी दिनांक ११ जुलै रोजी ८ , ३० वाजेच्या सुमारास बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील पॅट्रोल पंपा समोरील आठवडे बाजार जवळ असलेल्या शबनम दुध डेअरीचे चालक शेख दानिश शेख युसूफ हा रस्त्याने जात असतांना मागील बाजुने मोटरसायकल वरून येणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी हातातुन२५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल घेवुन पोबारा केला . या बाबत शेख दानिश शेख युसुफ यांनी यावल पोलीसात मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असुन , पॅट्रोल पंपावरील लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीच्या कॅमेऱ्यात मोबाइल चोरटे कैद झाले आहे . दरम्यान यावल शहरात व परिसरात चोरट्यांकडुन काही ठिकाणी घरात घुसुन चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे मात्र याची पोलीसात अधिकृतरित्या कुठही नोंद नसल्याची माहीती मिळाली आहे . दरम्यान पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या पंपावर समोर झालेल्या अशा प्रकारच्या लागोपाठ होणाऱ्या रस्तालुट व दरोडयाची घटना व मग ही चोरांकडुन मोबाइल लांबविण्याच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीकांपासुन व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे .

कांग्रेस पार्टी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेला झाली सुरुवात…

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.तालुका प्रतिनिधी
:-
दिनांक 11 जुलै रविवार रोजी जळगाव जामोद शहर आणि युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस तर्फे पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या तसेच दररोज वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात झाली आहे दररोज वाढत असलेले पेट्रोल डिझेलचे भाव तसेच गॅस दरवाढीने सामान्य जनता त्रस्त झाली असून या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे यानिमित्ताने केंद्र सरकारच्या निषेधार्थ या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली अभिजीत अवचार युवक कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद पाटील अध्यक्ष निशिकांत देशमुख युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल राजीक, स्वप्नील देशमुख राजू मुल्लाजी मन्सूर शेख इम्रान भाई शेख जुनेद,मयूर हारीस, शफिक भाई अमोल मानकर दिनेश काटकर, हुसेन राही ,अब्रार अवेस भाई यांनी या स्वाक्षरी मोहीमेत जळगाव जामोद येथील पेट्रोल पंपावर सहभागी होऊन या इंधन दरवाढीविरोधात नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन केंद्र शासनाचा महागाईच्या विरोधात निषेध केला.