Home Blog Page 448

संपूर्ण ओबीसी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा… प्रा. बबन तायवाडे

0

 

नागपूर:-दि.22(सविता कुलकर्णी):-

राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिवसानंतर आपली एक आंदोलनात्मक तयारी करण्यासाठी 15 जून 2021 रोजी संपन्न झालेल्या ओबीसी महासंघाने हा निर्णय घेतला आहे.

4 मे रोजी सर्वत्र महासंघाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गात मिळत असलेले 27% आरक्षण रद्द ठरविण्यात आले असून जो पर्यंत हे राज्य सरकार समर्पित आयोग स्थापन ( Dedicated Commission) करून Empirical Data गोळा करून माहिती सर्वत्र न्यायालयात सादर करणार नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्ग आरक्षण मिळणार नाही. तसेच केंद्र सरकार सुद्धा घटनेच्या कलम 243 D व T यामध्ये सुधारणा करून देशातील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय 27 टक्के आरक्षण ठेवू शकते.

1. राष्ट्रीय ओबीसी महासंघ 27 जून 2021 ला सर्व जिल्ह्याअधिकारी व तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व प्रधानमंत्री व इतर मान्यवरांना निवेदन पाठवणार.
2. दिनांक 26 व 27 जून 2021 रोजी लोणावळा येथे 300 ओबीसी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. असे ही पत्रकार परिषदेत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माहिती दिली.

15 कोटी 58 लाख 94 हजार रुपयाचे रस्त्याचे भूमिपूजन आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट,दि.२२ जून
हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हिंगणघाट तसेच समुद्रपुर तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करीत विकासकामांची मुहुर्तमेढ़ रोवली.सदर भूमिपूजन करण्यात आलेले रस्ते एकूण 15 कोटि 58 लाख,94 हजार रुपये अनुदानातुन बांधण्यात येणार असून या रस्त्याचे तात्काळ कामे सुरु होणार आहेत.
हिंगणघाट येथीलच नव्हे तर विदर्भातील श्रद्धाळूच्या श्रद्धास्थानी असलेल्या शहालंगड़ी येथील नागाबाबा देवस्थानापासून राष्ट्रीय महामार्गाला जोड़णाऱ्या रस्त्याची दर्शनार्थी तसेच देवस्थानाच्या वतीने मागणी करण्यात आली होती,आमदार कुणावार यांनी दखल घेतल्याने आज या रस्त्याचेही भूमिपूजन करण्यात आले यावेळी श्रद्धेय वासुदेव महाराज हे प्रामुख्याने उपस्थित होते .
सदर रस्त्याची विकासकामे करण्याची ग्रामीण भागातील जनतेची मोठी मागणी होती,मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार समिर कुणावार यांनी हिंगणघाट तालुक्यातील डोरला,शहालंगड़ी देवस्थान,सुलतानपुर ते उमरी रस्त्याचे भूमिपूजन केले तर समुद्रपुर तालुक्यातील मांगली ते उबदा,सावरखेड़ा ते हिवरा,महागाव ते वायगाव(गोंड) तसेच रामनगर ते परसोड़ी इत्यादि रस्त्याचे भूमिपूजन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे,जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती मृणालताई माटे,भाजपा महामंत्री किशोर दिघे,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नितीन मडावी,पंचायत समिति सभापती सौ.शारदा आंबटकर,समुद्रपुर प.स.च्या सभापती सौ.सुरेखा टिपले,जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे, हिंगणघाट भाजपाध्यक्ष आशिष पर्बत, पंचायत समिती माजी सभापती गंगाधरराव कोल्हे, समुद्रपूर पंचायत समिती उपसभापती योगेश फुसे, हिंगणघाट भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, समुद्रपूर भाजपा तालुका अध्यक्ष संजय डेहणे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, विनोद विटाळे , तुषार आंबटकर, भाग्येश देशमुख, बालुभाऊ इंगोले, कैलास टीपले , नितीन भोयर, वायगाव गोंड येथील सरपंच रोशन पांगुळ, कंत्राटदार राजाभाऊ मॅडमवार, अभय मॅडमवार इत्यादी मान्यवर मंडळी सदर कार्यक्रमास उपस्थित होती.

स्वतःच्या विवाह वरील खर्च टाळून कोरोनाग्रस्ताकरिता मुख्यमंत्री सहायता निधीत दिला 1लाख ,1 हजाराचा धनादेश अभिनंदन मुनोत यांचे होत आहे सर्वत्र कौतुक

0

 

सचिन वाघे वर्धा हिंगनघाट :-

युवा सेनेचे वर्धा ज़िल्ह्या प्रमुख , समाजसेवी , सुवर्ण व्यावसाइक अभिनंदन मुणोत यांनी आपल्या विवाहावर होणारा खर्च टाळून कोरोना ग्रस्ताकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधि करिता 1लाख 1 हजाराचा धनादेश देऊन समाजापुढे आदर्श ठेवला . अलंकार ज्वेलर्स चे संचालक असलेले अभिनंदन मुणोत यांचा विवाह कोरोना काळात पार पडला . त्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळुन कुठलाही बड़ेजाव न करता अत्यात साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडला . या सध्या विवाह सोहळ्या चे आयोजनामुळे पैशाची मोठी बचत झाली . ही बचतीची रक्कम त्यांनी कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रमाकरिता खर्च केली. हिंगनघाट तालुक्यात कोरोना संक्रमनाच्या काळात विविध समाजपयोगी उपक्रम राबुउन गरजु कुटुबियाना मदतीचा हात दिला . त्यामुळे ते कौतुकास पात्र ठरले . याच उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी दि.21 जून रोजी वर्षा बंगला मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक लाख एक हजार रूपये चा धनादेश मुख्यमंत्री साह्ययता निधी ला दिला.या वेळी वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार अनंत गुडे ,वर्धा जिल्हा प्रमुख अनिल देवतारे. देवळी पुलगांव आर्वी चे शिवसेना जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर् उपस्तीत होते. मुणोत यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. त्यांचे हे कार्य समाजाकरिता प्रेरणादायी ठरले आहे.

हिंगणघाट माता मंदिर देवस्थान ला महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्राच्या क दर्जा चे स्थान दिले .

0

 

सचिन वाघे वर्धा
22.6.21
हिंगणघाट- पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
यापुढे माता मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना सुविधा प्राप्त होईल तसेच पर्यटनाला वाव मिळून रोजगार निर्माण होणार आहे.
माता मंदिर देवस्थान हे पेशवेकालीन मंदिर असून विदर्भातून भाविक तिथे दर्शनाला येतात. आपल्या सर्व मनोकामना माता पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराला क वर्ग दर्जा मिळावा यासाठी अध्यक्ष गणपत गाडेकर यांनी ही मागणी लावून धरली होती. यासाठी आमदार रामदासजी आंबटकर यांनी सतत पाठपुरावा करीत अथक प्रयत्न केले.
पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार रामदास आंबटकर,आमदार समीर कुणावर, माजी आमदार राजू तिमांडे, नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी, माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी व नगरपालिका नगरसेवक या सर्वांचे देवस्थान समितीचे अध्यक्ष गणपत गाडेकर, तसेच विस्वस्त रमणिक शेषपाल,संजय मॅडमवार, राधेश्याम श्रीवास, पुरुषोत्तम मावळे, प्रा सूर्यकांत मावळे, चंद्रकांत साटोणे यांनी आभार व्यक्त केले आहे.

यावल येथे महसुलच्या वतीने खातेदार शेतकरी यांच्या सातबारा फेरफार नोंदणीच्या तिन दिवसी शिबीराची सुरूवात

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील महसुल प्रशासनाच्या वतीने आज येथील तलाठी नागरीकांच्या कार्यालयात सातबारा उताऱ्यामधील चुका दुरूस्त करणे व आदी महसुलच्या प्रशासकीय कामाबाबत शिबीराची सुरूवात करण्यात आली आहे .दरम्यान फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग आदेशाने आणी तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २१ जुन रोजी तालुका महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन सातबारा दुरूस्ती तिन दिवसीय २१ , २२ आणी २३ जुन पर्यंत चालणाऱ्या शिबीराची आज पासुन सुरुवात झाली, या शिबीरात खातेदार , शेतकरी व नागरीकांच्या सातबारा मधील चुका दुरूस्ती करणे , ज्या खातेदारांचे हस्तलिखित सातबारा मधील नांवे चुकीची असतील त्या महसुली कलम१५५ अन्वये दुरूस्त करणे , अहवाल निरंक करणे , फेरफार नोंदी लिखित करणे आदी महसुली कामासाठी एक दिवसीय शिबीर आयोजीत करण्यात आले होते यास यावल आणि परिसरातील नागरीक व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावलच्या चावडीवरील तलाठी कार्यालयात पार पडलेल्या महसुली सातबारा फेरफार शिबीरात यावल मंडळाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी , यावल तलाठी ईश्वर कोळी, कोरपावली व टाकरखेडा येथील तलाठी मुकेश तायडे , परसाडे गावाचे तलाठी समिर तडवी , कोळवदचे तलाठी संदीप गोसावी , निमगाव चे तलाठी विशाल चौधरी , विरावली गावाचे तलाठी हेमंत मारूडे व सजेतील सर्व कोतवाल यांनी परिश्रम घेवुन या शिबीरास यशस्वी केले .महसुलच्या या सातबारा फेरफार शिबीरास यावल व परिसरातील शेतकरी , खातेदार व नागरीकांच्या मोठा प्रतिसाद लाभला , यावल आणी परिसरातील खातेदार शेतकरी व नागरीकांनी आपल्या सातबारा फेरफार नोंदणी संदर्भात कामे करव्याची असेल त्यांनी २३ जुन पर्यंत यावल शहराच्या तलाठी कार्यालयावर आवश्यक त्या कागदोपत्रासह उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे .

नवसंजीवनी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट अतिदुर्गम व आदिवासी भागात आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम तालुका यावलच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सातपुडा पर्वतातील आणि राज्याच्या मध्य प्रदेश सीमेवर असलेले व अतिदुर्गम भाग असलेल्या उपकेंद्र जामन्या येथे अतिरिक्त जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, व आयुष वि. अधिकारी, आणि प्रभारी प्रशासन अधिकारी डॉ. मनोहर बावणे यांनी भेट देऊन मान्सून पूर्व कामांचा आढावा घेतला, अंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांची व गरोदर मातांची विचारपूस केली, आरोग्य सेविकेला उपकेंद्रातच प्रसूती व्हायला हवी आशा सूचना दिल्या, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना व इतर प्रकारचे आर्थिक लाभ लवकरात लवकर दिला जाईल याचे नियोजन करण्यास सांगितले. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागात सावखेडासिम प्रा. आ. केंद्राकडून दिल्या जात असलेल्या आरोग्यसेवा बद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच ग्रामस्ताना कोरोना लसीकरणा बाबत असलेले गैरसमज दूर करून लसीकरण करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, मानसेवी अधिकारी डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सेवक अरविंद जाधव, आरोग्य सेविका शाबजाण तडवी, शिवप्रताप घारू, समीर तडवी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावल शहरालगत बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील अतिक्रमण धारकांना आठ दिवसाच्या आत शासकीय जागा मोकळी करण्याबाबत प्रांतांच्या नोटीसा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातुन जाणाऱ्या बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर या मार्गावरील शहरालगतच्या रस्त्यावर शासकीय जागेवर व्यवसायीकांनी बेकायद्याशीर अतिक्रमण करून ठेवले असुन , या अनधिकृत व्यवसायीकांच्या अतिक्रमाणामुळे या रस्त्यावर अनेक वेळा गंभीर स्वरुपाचे अपघात देखील झालेले असुन, या रस्त्यावरील व्यवसायीकांनी बेकाद्याशीरपणे केलेले अतिक्रमण तात्काळ काढावे या संदर्भात महसुल प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत . या संदर्भात फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी दिनांक १६ / ६ / २०२१ रोजी यावल शहरालगतच्या असलेल्या बु्ऱ्हाणपुर ते अंकलेश्वर या राज्य मार्गा क्रमांक४ किमि१८१ / ३३५ते १८२ / ३३५मध्ये रस्त्याच्या माध्यमासुन१५ मिटर अंतरावर अनधिकृतपणे सरकारी मालकीच्या जागेवर बेकाद्याशीर ताबा ताबा घेवुन मार्गाच्या दोघ डाव्या / उजव्या बाजुस कच्चे अथवा पक्के बांधकाम तयार केलेले असल्याचे या नोटीसी व्दारे सुचविण्यात आले असुन , दरम्यान सदरची नोटीस मिळाल्याच्या आठ दिवसाच्या आत आपआपल्या स्वखर्चाने केलेले अतिक्रमण काढुन घेवुन सरकारी जागा पुर्वरत करावी . प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी नोटीसी व्दारे विनिदेशित केलेल्या मुदतीत तुमचे काही म्हणणे असल्यास , अथवा जागेच्या वापराबाबत काही कागदोपत्री पुरावा असल्यास , संबंधीत कार्यालयास सत्वर सादर करावा . अन्यथा आपले विरूद्ध महाराष्ट्र जमीन महसुल जमीन अधिनियम , १९६६च्या कलम५० (३ ) व मुंबई हायवे अॅक्ट१९५५ कलम५०व२५ अन्वये खात्यामार्फत कार्यवाही करून जागा ताब्यात घेवुन त्या खर्चाची नुकसान भरपाईसकट रक्कम आपल्याकडुन वसुलीची आवश्यक कार्यवाही केली जाईल , तसेच महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियमाच्या कलम५४ अन्वये अतिक्रमीत मालमत्ता शासन जप्त करण्यात येईल असे सुचित करण्यात आले आहे . दरम्यान या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण हे पुर्वी यावल तहसीलला तहसीदार म्हणुन व या वेळेस विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या कार्यकाळात सहा वर्षा पुर्वी २०११ते २०१४ वर्षीच्या या कार्यकाळात मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले होते, यामुळे सदरच्या अतिक्रमणा विषयी प्रांत अधिकारी कैलास कडलग यांचा दांडगा अनुभव व निर्णय घेण्याची क्षमता यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार असल्याचे मत शासनप्रिय जाणकार व्यक्त करीत आहे .

यावल येथे पिपल्स रिपब्लीकन पार्टीसह एकूण दहा संघटनांचा मराठा , मुस्लीम , धनगर आरक्षणासह विविध मागण्यासाठी मोर्चा व आंदोलन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समितीवर पिआरपीसह एकुण दहा संघटनांच्या माध्यमातुन आज दुपारी विविध प्रलंबीत मागण्यांना व मराठा , मुस्लीम , धनगर आरक्षणाला घेवुन आंदोलन करण्यात आले व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येवुन मागण्या मान्य न झाल्यास ठीय्या आंदोलनाचा ईशारा ही पंचायत समिती प्रशासनाला यावेळी पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले .आज दुपारीच्या वेळी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल बसस्थानक परिसरा पासुन मोर्चा काढण्यात आला या मोर्चात एकुण १oसंघटनांनी आपला सहभाग नोंदविला , यावेळी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने मोर्चा व आंदोलनाच्या माध्यमातुन यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस .पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , किनगाव खुर्द तालुका यावल येथील ग्राम पंचायतच्या माध्यमातुन लाखो रुपयांच्या निधीतुन दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी यासंदर्भातील निवेदन देवुन देखील पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने चौकशी कामी होत असलेली दिरंगाई व दुर्लक्ष संशय निर्माण करणारे असल्याची संत्पत प्रतिक्रीया या वेळी जगनभाई सोनवणे यांनी व्यक्त केली . त्याच प्रमाणे गावातील एकाच गटारीचे बांधकाम वारंवार करण्यात येत असुन यात दलीत वस्ती मधील विकासाची कामे ही इतर प्रभागात वढविली जावुन ती करण्यात येत असुन सदर चे काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिची झालेले असुन , पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तक्रार करून देखील संबधीत अधिकारी हे संगनमताने गुणवत्ता नसलेल्या कामांचे बिले आर्थिक मोहाला बळी पडुन काढुन घेत असल्याच्या तक्रारी पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील मनवेल ग्राम पंचायतच्या माध्यमातुन रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेल्या विधवा निराधार दलित महीलेस ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्या आडमुठ्ठी धोरणामुळे अनुदान मिळत नसल्याने त्या निराधार महीलेची बांधकाम झालेल्या घरकुलच्या अनुदान भटंकती होत असुन तात्काळ त्या महीलेस अनुदान देण्यात यावे याशिवाय राज्यातील मराठा , मुस्लीम , धनगर समाजाला आरक्षणा बाबत ही यावेळी निवेदन देण्यात आलीत, आज यावल पंचायत समितीवर काढण्यात आलेल्या मोर्चा आंदोलनात पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जगनभाई सोनवणे व तालुका अध्यक्ष राहुल साळुंखे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन , अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष आरीफ शेख , युवा नेते गोपी साळी, पिआरपीचे जिल्हा उपाध्यक्ष रतन वानखेडे, संविधान आर्मीचे निलेश सेंदाणे , मातंग सेनेचे विजय सुधाकर तायडे आदी पदाधिकारी यांनी या आंदोलनात भाग घेतला . यावेळी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला .

हिंगणघाट येथे भाजपला धक्का !

0

 

सचिन वाघे वर्धा
21.6.21
हिंगणघाट :– भाजपचे नगरसेवकांनी मुख्यमंत्रीच्या वर्षा बंगल्यावर बांधले शिवबंधन ; स्थानिक नेतृत्वावर दाखविली नाराजी
हिंगणघाट नगरपालिकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपच्या नऊ नगरसेवकांनी पक्षत्याग करून शिवबंधन बांधले आहे, त्यांच्यासोबत एक अपक्ष नगरसेवक, भाजपयुमो शहर सचिव आणि दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश घेतला आहे.. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे. हिंगणघाट नगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. मागील निवडणुकीत भाजपला 38 पैकी 28 जागा विजय मिळवता आला होता. त्यांच्या मित्रपक्ष आरपीआयने दोन जागा मिळवल्या होत्या. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला चार, शिवसेनेला एक आणि तीन अपक्ष नगरसेवक असे संख्याबळ होते. भाजपच्या 28 नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकल्याने भाजप वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या नगरसेवकांनी स्थानिक नेतृत्वावर आपली नाराजी व्यक्त करीत पक्ष त्याग करीत असल्याचे म्हटले आहे . आज सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक सतीश धोबे, नीता धोबे, नगरपालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, मनीष देवढे, निलेश पोगले, भास्कर ठवरी, सुनिता पचोरी, शिक्षण सभापती संगीता वाघमारे, स्वीकृत नगरसेवक मनोज वरघने या नऊ नगरसेवकांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे अपक्ष नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, भाजप भाजयुमोचे शहर सरचिटणीस बंटी वाघमारे हे शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दोन माजी नगरसेवक प्रतिभा पडोळे व देवेंद्र पडोळे यांनीही प्रवेश घेतल्याचे वृत्त आहे. भाजपचे काही नगरसेवक पक्ष सोडण्याची चर्चा अधूनमधून सुरु होती.त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेतृत्वाला अपयश आले. त्याचवेळी जिल्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी संधी साधून या नगरसेवकांना आपल्या गळात अलगद अडविले.या प्रवेशाने भाजपला मोठा हादरा बसलेला आहे.आणखी काही आजी माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.या एकूण घडामोडी बाबत नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना विचारले असता ते म्हणाले की, हे संधी साधू नगरसेवक असून त्यांना येत्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असावा. त्यांनी नाराजी व्यक्त केली असती तर ती सोडवता आली असती, त्यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

शेतीच्या वादातून वयोवृध्द आजीस मारहाण तर नातवावर चाकूने हल्ला

0

 

नांदुरा: प्रफुल्ल बिचारे

तालुक्यातील पिंप्री कोळी शिवारात १८जूनच्या दुपारी १२ वाजेदरम्यान शेतीच्या मालकीच्या वादातून वयोवृध्द आजीस मारहाण व तिच्या नातवास बांबूच्या काठीने मारहाण करुन चाकू हल्ला केल्याप्रकरणी गावातील सात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंप्री कोळी ता. नांदुरा येथील निलेश महादेव कांडेलकर वय २३ वर्षे यांनी नांदुरा पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्याच गावातील आरोपी वासुदेव नामदेव कांडेलकर, दिलीप नामदेव कांडेलकर, रंजना वासुदेव कांडेलकर, रुपाली दिलीप कांडेलकर चारही सर्व रा. पिंप्री कोळी ता. नांदुरा, संतोषं कडुबा कांडेलकर रा. सुळे ता. मुक्ताईनगर, सोपान निवृत्ती खिरोडकार निवृत्ती खिरोडकार दोन्ही रा. वडोदा ता. मुक्ताईनगर यांनी तालुक्यातील पिंप्री कोळी शिवारातिल शेताबाबात तक्रारदार व आरोपी यांच्यामध्ये शेतीच्या वाटणी वरुन वाद असून या मधील आरोपी यांनी तक्रारदार यांच्या आजी व आजोबांचा शिवीगाळ केली व आजीस केस धरून लोटपाट करुन खाली पाडले व तक्रारदार यांच्या पायावर बांबुची काठी मारली व दंडावर चाकू मारला. तसेच शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून वरील सात आरोपीविरूध्द नांदुरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.
तर दिलीप नामदेव कांडेलकर यांनीही फिर्याद दिली असून त्यात त्यांनी नमूद केले की, आरोपी महादेव सुपडा कांडेलकर, निलेश महादेव कांडेलकर, सागर नारायण कांडेलकर, मंगेश महादेव कांडेलकर व योगेश नारायण कांडेलकर यांनी शेतीच्या कारणावरून वाद घालून माझ्या घरात घुसून लोखंडी रॉड ने मला व माझ्या नातेवाईकांना मारून जखमी केले. तसेच माझ्या पत्नीची छेडखानी केली. अशा फिर्यादीवरुन वरील आरोपी विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.