Home Blog Page 458

बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच आणी ग्रामसेवकानी केला संगनमतांनी गैरव्हवहार व भ्रष्ठाचार चौकशीची जिल्हा परिषद कडे मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील बोरखेडा ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उपसरपंच आणी ग्रामसेवकाचा मनमानी कारभार व यातुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार गटविकास अधिकारी आणी उपमुख कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प. )जळगाव जिल्हा परिषद यांच्या कडुन हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीचे ९ पैक्की सात सदस्य आणी गावातील अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर दिल्यावर या सर्व गोंधळाची चौकशी होवुन कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे. या संदर्भात यावल पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत बोरखेडा खुर्द तालुका यावल यांनी दिनांक ११ / ८ / २०२० रोजीच्या दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व५ टक्के अबंध निधितुन मागील अडीच वर्षाच्या कालावधीत सरपंच , उपसरपंच तथा ग्रामसेवक यांनी १९ / ०२ / २०१९पासुन तर २४ / ४ /२०२०पर्यंतच्या सर्वसाधारण सभा कोरम पुर्ण असतांना ही तहकुब करून मनमानी कारभार करून संगनमताने शासकीय निधीत मोठा आर्थीक भ्रष्टाचार व गैरव्यवहार केल्याच्या लिखित तक्रारी करण्यात आल्या असुन , या तक्रार अर्जात दर्शविण्यात आलेली कामे व त्यासाठी झालेले खर्च पुढीलप्रमाणे विहीर खोदकाम खर्च ४३००० हजार , एलईडी लाईट ९९९८८, नवीन पाईपलाईन दोन लाख रुपये , जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत दोन लाख रुपये , पेव्हर ब्लॉक खर्च१ लाख८५००० हजार रुपये , ग्राम पंचायत कार्यालय दुरुस्ती ७१ हजार रुपये खर्च , अंगणवाडी अॅक्वागार्ड व गणवेश खर्च१ लाख रुपये , कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सॅनेटाईझर, मास्क , आक्झोमिटर खरेदी १ लाख९९५० हजार खर्च याशिवाय गाव पातळीवर आपले सरकार सेवा केन्द्र दहा टक्के रक्काम अनुसार २लाख५५ हजार२३४ रुपये अशा प्रकारे ग्रामपंचायत च्या माध्यमातुन खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले असुन या सर्व आर्थिक व्यवहारारात मोठा भ्रष्ठाचार व गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली असुन , याशिवाय ग्रामपंचायत मालकीचे शेतजमीनचे शेत स्वामित्व रक्कम जमा करून ग्रामपंचायतीने वर्ष२०१८ते ३१ / ० ३ / २०२१पर्यंत ग्रामपंचायत मालकीचे शेतचा १ लाख३० हजार प्रति वर्षा प्रमाणे तिन वर्षाकरीता तिन लाख९०हजार रुपये प्रमाणे सदरची रक्कम ही ग्रामपंचायतीकडे जमा झालेली दिसुन येत नसल्याचे दिसुन येत आहे . या व्यतिरिक्त विद्यमान सरपंच जमशेर तडवी , उपसरपंव , तथा ग्रामसेवक यांनी संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्ठाचार आणी गैरव्यहार केल्याचे दिसून येत असुन, तात्काळ या बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत सर्व झालेल्या भ्रष्ठाचाराच्या आणी गोंधळलेल्या कारभाराची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी करून संबधीतांवर कार्यवाही करावी अशी लिखित तक्रारी व्दारे मागणी ग्रामपंचायत सदस्य रहीम गुलशेर तडवी , छब्बीर शेखर तडवी , मेहरबान हबीब तडवी , आशाबाई मुबारक तडवी , नसीबा रशीद तडवी , सईदा हमिद तडवी आणी जयश्री सुनिल चौधरी यांच्या वतीने करण्यात आली आहे .

कोरोना संकटात बेरोजगार झालेल्या नाभिक समाजाला जिल्हाधिकारी यांनी व्यवसायाची परवानगी द्यावी : श्री जिवा महाले नाभिक संस्थेची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

मागील दिड वर्षापासुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या शेकडो नाभिक समाजावर हालाकीची चे प्रसंग ओढवले गेले असुन , आम्हास महाराष्ट्र शासनाने कुटुंबास उपासमारी पासुन वाचविण्यासाठी लॉकडाऊनच्या चाकोरीत राहुन व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज यावल येथील श्री जिवा महाले नाभिक बहुऊदेशीय संस्थेच्या माध्यमातुन तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे . या संदर्भात श्री जिवा महाले नाभिक बहुऊदेशीय संस्थाच्या वतीने देण्यात आलेल्या लिखित निवेदनात म्हटले आहे की , राज्यात मागील दिड वर्षांपासुन सर्वत्र कोरोना संसर्गामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणुन लॉकडाऊन लावण्यात आले असुन, यामुळे सर्व व्यवसाय सोबत नाभिक समाजाचा व्यवसाय देखील बंद झाला असुन यामुळे समाज बांधवांनी आपला परिवाराचे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न पडला असुन, नाभिक समाजापुढे दुसरे रोजगाराचे साधन नाही , समाजाचा सलुन चालविणे हा जन्मजात व्यवसाय असल्यामुळे समाजा समोर पर्याय नाही . जळगाव जिल्ह्याच्या नाशिक , पुणे आणी मध्यप्रदेश सारख्या राज्यात आमच्या व्यवसायाला शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे . मग जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाजाला सलुन व्यवसायाची परवानगी का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे . बेरोजगारीमुळे व रोजगार अभावी आर्थिक संकटात सापडलेल्या समाजाची सहनशक्ती संपली असुन ,सयंम ही सुटले असुन , समाज बांधवांसमोर आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही अन्यथा जिव वाचविण्यासाठी आंदोलनाचा दुसरा पर्याय नसल्याने जिल्हाधिकारी हे आमचे पालक असुन त्यांनी आमच्या समाजावर अन्याय होणार नाही अशी पालकतत्व कर्तव्याची जाणीव ठेवुन आम्हास न्याय द्यावा अशी मागणी केली असुन , या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष अनिल तोताराम चौधरी , सुपडु शामराव वारूळकर , रविन्द्र सुकदेव आमोदेकर , सुरेश विलास चौधरी , अंनतारे देविदास चौधरी , राहुल उमाकांत चौधरी , शेख सलीम शेख शरीफ ,दिलीप रंगनाथ चौधरी , सुनिल पाडुरंग संनसे,रणजित सुकलाल ठाकरे, सुरेश भिका चौधरी यांच्या स्वाक्षरी आहे .

लॉक डाऊन मुळे व्यवसायात नुकसान गळफास घेऊन आत्महत्या

0

 

सचिन वाघे वर्धा
2.5.21
हिंगणघाट
स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी अरविंद पुंडलीकराव चंदनखेडे (४५) यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजता उघड़कीस आली.
मृतक अरविंद चंदनखेडे हे कंत्राटदार असून संचारबन्दी दरम्यान त्यांचे व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला,याचे निराशेपोटी त्यांनी इहलोक सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
मृतक अरविंद हे संत तुकडोजी वार्ड परिसरातील प्रज्ञानगर भागात रहात असून त्यांचेमागे पत्नी,तीन भाऊ,बहिण,२ मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.
शहरातील शासकीय कंत्राटदार अशोक चन्दनखेड़े यांचे ते छोटे बंधु होते.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोहवा वीरेंद्र कांबळे,बंडू महाकाळकर करीत आहे.

मनवेलच्या निराधार विधवा महिलेच्या मंजुर रमाई घरकुलाचे अनुदान थांबविले ४ जुन पासुन यावल येथे आंदोलन : जगनभाऊ सोनवणे

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल गावात एका विधवा व निराधार महिलेच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत मंजुर होवुन बांधकाम झालेल्या घरकुलास सरपंच व ईतरांच्या विरोध असल्याने पावसाळया पुर्वीच आपले घरकुल पुर्ण व्हावे यासाठी निराधार महीलेची भटकंती होत असल्याने दरम्यान तात्काळ या महीलेस न्याय न दिल्यास यावल पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा ईशारा भुसावळ येथील पिपल्स रिपब्लीकन पार्टी ( प्रा . जोगेन्द्र कवाडे सर ) यांच्या वतीने प्रदेश महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्राद्धारे दिला आहे . या संदर्भात प्रदेश महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांनी म्हटले आहे की , यावल तालुक्यातील मनवेल येथील राहणाऱ्या मंगलाबाई रामदास इंधाटे या विधवा व निराधार महिलेचे रमाई या योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झाले असुन असे असतांना मात्र घरकुलाचे बांधकाम अर्ध्यावर आलेले असतांना ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग देवराम सोनवणे आणी ग्रामसेवक यांनी सार्वजनिक मुतारीच्या विषया वरून काही ग्रामस्थांच्या तक्रारी झाल्याने अखेर या घरकुलाचे बांधकाम बंद झाल्याने उर्वरीत मिळणारे अनुदान रुपाचे हफ्ते थांबविल्याने हे कामबंध करण्यात आले असल्याचे वृत्त आहे . याबाबत सदर मंगला सोनवणे या विधवा व निराधार महीलेने पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांच्याकडे आपल्याला घरकुलांचे उर्वरीत हफ्ते व ग्रामपंचायतीने काम बंद पाडल्याची तक्रार केल्याने आज सोनवणे हे यावल येथे पंचायत समितीच्या कार्यालयात येवुन त्यांनी विस्तार अधिकारी के सी सपकाळे यांची भेट घेवुन त्यांना मनवेल येथील निराधार महीलेच्या मंजुर झालेल्या रमाई घरकुल योजनेचे लाभ मिळवण्यासाठी होत असलेल्या मानसिक त्रास व अडचणी बाबत ची माहीती दिली व तात्काळ या महीलेचे उर्वरीत घरकुलाचे हफ्ते व बांधकाम सुरू न झाल्यास आपण दिनांक ४ जुन रोजी १o विविध संघटनाच्या माध्यमातुन ताला ठोको आंदोलन करणार तसेच दिनांक ७ जुन रोजी दुपारी २ वाजता यावल पंचायत समिती समोर हल्लाबोल आंदोलन व दिनांक १० जुन रोजी सुमारे २०० स्त्री पुरुषांचे आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा या वेळी जगनभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकारी के सी सपकाळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे .

उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा:-जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांची आग्रही मागणी.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

आरमोरी : जिल्ह्यात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने येथील आरमोरी शेतकी खरेदी विक्री सोसायटीच्या मार्फतीने धान खरेदी केल्या जाते.मात्र यावर्षी शेतकऱ्यांचे धान मळणी करून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी मात्र शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल भावात धान विकावे लागत आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करण्यात यावा.लवकरात लवकर सात दिवसाच्या आत आरमोरी येथील आधारभूत धांन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांनी दिला आहे.
एप्रिल महिन्यात धान्याचे उत्पादन झाले,मे महिना संपूनही गेला तरीही आरमोरी येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही.हि फार गंभीर बाब आहे.फक्त शेतकऱ्यांना आशेवर ठेवण्यासाठी सातबारे ऑनलाइन करण्यात येत आहे. परंतु अधिकचा वेळ धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी लागत असल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याकडे अल्पशा किमतीत विकण्याची वेळ आली आहे.खाजगी व्यापारीसुद्धा सुरुवातीला ठोकळ धानाला १४०० ते १५०० रुपये दरम्यान भाव देत होते.परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने मागील १५ दिवसापासून खाजगी व्यापारी सुद्धा शेतकऱ्याला १२५० ते १३५० रुपये धानाला भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यात पावसामुळे २० ते ३० टक्के धान जमीनीच्या खाली गळल्या गेला.त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांना उत्पादनात खूप मोठी घट निर्माण झाली आहे.धान पिका लागवड करण्यापासून ते कापणीपर्यंत एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च करावा लागत असून उत्पादन मात्र खर्चाच्या तुलनेत होत नाही.शासन धानाची १८६५ रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने खरेदी करीत असल्या थोडा फार शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.मात्र मे महिना संपला तरी खरेदी विक्री सोसायटी आरमोरीने धान खरेदी केंद्र सुरू केले नाही.येत्या सात दिवसाच्या आत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलन करून खरेदी-विक्री सोसायटी आरमोरीच्या व्यवस्थापकासह पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंबून ठेवणार असल्याचा इशारा जि.प. सदस्या सौ मनिषा दोनाडकर यांनी दिला आहे.

वडनेर येथील इसमाचा नांदुरा येथे अपघाताने मृत्यू, मृतकाच्या अंत्यविधीसाठी संग्रामपूर येथून येत असलेल्या नातेवाईक महिलेचा नांदुरा येथे ट्रकच्या धडकेने मृत्यू

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
वडनेर येथील
श्री निनाजी धोंडू कुयटे वय ६८ वर्ष हे खरेदी विक्री समोरून जात असताना त्यांना टाटा कंपनीचे ट्रेलर क्रमांक GJ१३BW९०४५ चालक बिरम नयनु सिंग राहणार खेडा देवणारायान जिल्हा अजमेर राजस्थान यांनी धडक दिली यामध्ये निनाजी कुयटे यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर चालक पोलीसांच्या ताब्यात असून पुढील
तपास पीएसआय दौंड साहेब करीत आहेत. तसेच निणाजी कुयटे यांच्या अंत्यविधीसाठी संग्रामपुर येथून येत असलेले नातेवाईक हरिदास तुळशीराम नागे वय ५२ वर्ष त्यांचा मुलगा विजय आणि पत्नी लीलाबाई यांचा नांदुरा येथे अपघात झाला. यामधे ट्रक वाहन क्रमांक आर जे १९ जि एफ ५९४६ चालक अधूराम दुदी घुगाराम दुदि राहणार तरातराम तहसील चोहटन जिल्हा बारमेर राजस्थान यांनी हरिदास नागे यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. यामधे लीलाबाई ह्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक यांच्यावर कलम २८९,३३७,३०४ अ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सदर वाहन चालक पोलीसांच्या ताब्यात आहे. याबाबत पुढील तपास ए पि आय विरकण मॅडम करीत आहे.

वाढदिवस साधपणाने साजरा करीत गरिबांना केले मिठाई चे वाटप

0

 

 

तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

आज यावल येथील शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांची मुलगी कु सायली कवडीवाले हिने आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करीत गरीब नागरिकांना व गरजू लोकांना यावल येथील शासन मान्य व शिवशक्ती बचतगट संचालित शिवभोजन थाळी माध्यमातून प्रत्येक थाळी पार्सल द्वारा मिठाई चे वाटप केले व एक स्तुत्य उपक्रम राबविला. आपल्या वाढदिवसाचा खर्च न करता गरिबांना मिठाई वाटप करून नव्या पिढी समोर आदर्श ठेवला.यावल येथील शिवभोजन केंद्रावर सुरवातीला स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष श्री भरत चौधरी ,व शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित गरजू गरीब नागरिकांना शिवभोजन थाळी पार्सल चे मिठाई सह वाटप करण्यात आले.यावेळी भरत चौधरी,शिवसेना तालुका उप प्रमुख शरद कोळी,शहर उप प्रमुख संतोष धोबी,तालुका संघटक आर के सर,विभाग प्रमुख योगेश राजपूत यांचे हस्ते वाटप करण्यात आले.या साठी शिवभोजन केंद्र संचालक व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले.या स्तुत्य उपक्रम बद्दल कु सायली हीचे वाढदिवसा निमित्त अनेकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

अतिक्रमीत शेतरस्ता मोकळा करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू – शेतकर्‍यांचा इशारा

0

 

नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मौजे मुरंबा येथुन महाळुंगी कडे जाण्याचा गाढ रस्ता हा संबंधित शेतकरी यांनी दगड रचुन अतिक्रमित केला आहे. त्यामुळे सदर रस्ता हा बैल गाडी, बैल जोडी जाईल एवढा सुद्धा राहिलेला नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यामध्ये मधोमध झाडं सुद्धा वाढलेले आहेत. त्यापैकी एक झाडा लिंबाचे तर दुसरे बाभळीचे आहे, हेसुद्धा रस्त्यातून काढणे आवश्यक आहे. अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.
पेरणी पाण्याचे दिवस लक्षात घेता आज रोजी मशागत करण्यासाठी व पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर, बैल जोडी शेतामध्ये जाणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ता मोकळा करणे अत्यावश्यक आहे. सदर विषय हा गंभीर रित्या घेऊन अधिकाऱ्यांमार्फत सदर रस्त्याचा पंचनामा करण्यात यावा व ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना रीतसर नोटिसा पाठवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, आणि आम्हा शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता मोकळा करण्यात यावा.
सदर रस्ता हा लवकरात लवकर मोकळा करून देण्यात यावा अन्यथा सर्व शेतकरी लोकशाही मार्गाचा अवलंब करून दि.९ /६ /२०२१ पासुन आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांनी संबंधित आशयाचे निवेदन मा. आमदार साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, विभागीय अधिकारी साहेब मलकापूर, मा. गटविकास अधिकारी साहेब नांदुरा, पोलीस ठाणेदार पिंपळगाव राजा यांना दिले आहे.
तरी शेत रस्ता लवकरात लवकर मोकळा करून आम्हाला न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.

मालमत्ता कर माफ करा विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी .

0

 

सचिन वाघे वर्धा

31.5.21 हिंगणघाट – कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये या कारणाने संपूर्ण देशात मार्च 2020 पासून संचारबंदी आणि टाळेबंदी घोषित करण्यात आली त्यामुळे छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार ,शेतकरी, शेतमजूर रिक्षावाले, टॅक्सी वाले, हात मजूर अशा सर्वांचेच उत्पन्न थांबल्यामुळे ते आर्थिक हलाखीचे जीवन जगत आहे त्यातल्या त्यात केंद्र सरकारने डिझेल पेट्रोल गॅसचे भाव वाढवून लोकांचे खिसे कापण्याचे उद्योग सुरू केला आहे . त्यामुळे नेमके जगायचे तरी कसे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे .लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतात पिकविलेल्या माल विकण्यासाठी पर्यायी व्यवस्था प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पडत्या भावात माल विकावा लागला. शेतात लावलेला भाजीपाला बाजारात विकता न आल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यावा लागला. वर्षभर काबाडकष्ट करून आणि तळहातावरच्या फोडासारखे जपून पिकविलेल्या शेतमालाला ग्राहकच न मिळाल्यामुळे ते जनावरांना खाऊ घालावे लागले. सण-समारंभ, उत्सव, लग्नकार्य यावर निर्बंध घातल्यामुळे फुल शेती करणाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अगोदरच शेतकरी वर्ग हा बँक, सावकार, नातेवाईक आणि ज्यांच्या ज्यांच्या कडून कर्ज मिळेल त्यांच्याकडून कर्ज मिळवून आपली शेती व्यवसाय उभा करीत असतो परंतु संचारबंदी आणि टाळेबंदी मुळे व्यवसायच उद्ध्वस्त झाल्यामुळे बँकेकडून, सावकाराकडून, नातेवाइकाकडून घेतलेले कर्ज कसे द्यावयाचे .येणाऱ्या हंगामाकरिता खते बियाणे कसे विकत घ्यायचे, मुला बाळाच्या अन्न वस्त्र आरोग्य, शिक्षणाच्या गरजा कशा भागवायच्या ही विवंचना आहे. वर्षभरापासून कंपन्या- कारखाने यांना टाळे असल्यामुळे अनेकांचे रोजगार जाऊन त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे अनेक कर्मचारी अर्ध पगारी झाले आहे. अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांना वर्षभर दुकानच उघडता आले नाही. अधेमध्ये टाळेबंदीत थोडी शिथिलता देऊन काही काळ मर्यादित वेळेत दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. परंतु ग्राहकच नसल्यामुळे या वर्गाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे डिसेंबर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्याचा कालावधी हा लग्न समारंभाचा आणि इतर समारंभात असतो पण याच कालावधीत मागील वर्षी आणि या वर्षीही कडक टाळेबंदी असल्यामुळे मंगल कार्यालयाचे मालक त्यांच्यावर आधारित असणारे बँड वाले, घोडी वाले, मंडपवाले ,डेकोरेशन वाले, स वाले फुल वाले या सर्वच व्यावसायिक मंडळींना आर्थिक फटका बसला आहे संचार बंदी मुळे प्रथम निर्बंध घातले गेले ते प्रवासावर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था डिकांचे अपरिमित नुकसान झाले टॅक्सी चालवून रिक्षा चालवून उपजीविका करणाऱ्या वर उपासमारीची वेळ आली एसटीला प्रवासी मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची कपात केली त्यामुळे त्यांच्यावर उपजीविकेचे मोठे संकट आलेले आहे हॉटेल्स निवासस्थानाच्या सोयी खानावळी पूर्णपणे बंद असल्यामुळे या व्यवसायिक व्यवसायिकांची ही नुकसान झाले आहे अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक वगळता इतर बहुसंख्य शिक्षकांची परवड झालेली आहे शैक्षणिक संस्था सुरू नसल्यामुळे त्यांचे वेतन थांबले आहे. मुळातच बहुसंख्य विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांना कमी वेतन दिले जाते. शिक्षण संस्था चालक ही या परिस्थितीपुढे हतबल झालेले आहे . नगरपालिकेचे प्रमुख कर्तव्य जनतेला नागरी सुविधा पुरविण्याचे आहे .कोरोणातील लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांनाही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केंद्र सरकारने केलेली नाही. असे असताना नगर परिषदेचे जनतेकडून मालमत्ता कर वसुली करणे सुरूच आहे. या निवेदना द्वारे नगर परिषद अध्यक्ष यांना अशी विनंती आहे की जनतेने आपणाला नगरपरिषदेच्या निवडणूकीत बहुसंख्य मते देऊन आपली निवड केली आहे . नगरपरिषदेत आपल्याच भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि केंद्रातही आपल्या पक्षाची सत्ता असताना या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपणाला लॉक डाऊन च्या काळात जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देता आले असते पण आपणाकडून या गोष्टी दुर्लक्षित झालेल्या आहे. जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. आपणास बहुमतांनी निवडून दिलेल्या जनतेचे आर्थिक संकटाच्या संघर्ष काळात त्यांना एक धीर म्हणून नगरपरिषदेच्या आमसभेत सन 2020 21 या वर्षातील मालमत्ता धारकांकडून आकारला जाणारा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव संमत करावा. या सर्व परिस्थितीचा विचार करता नगर परिषद प्रशासनाने 20- 21 या वर्षातील शहरातील मालमत्ताधारकांना (शासकीय पगारदार वगळून) मालमत्ता कर पूर्णता माफ करावा .अशी मागणी विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांच्या तर्फे करण्यात येत आहे .यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत महेश माकडे, गोरख भगत, राजेंद्र पाटील, जयंत धोटे ,दिनेश वाघ, राजू कुरेकार ,अजय मुळे इत्यादी विदर्भ विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

0

 

आमदार जनसंपर्क कार्यालय नांदुरा येथे समाजबांधवां च्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य प्रशासक श्री. पदमभाऊ पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, श्री.भानुदास तितरे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, डॉ.माधवराव बोरसे, श्री.त्रंबक भवरे, श्री.रामदासभाऊ कारोळे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री. पुरुषोत्तम झाल्टे, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बंटी पाटील,श्री.राजू पाटील हाडे, श्री.सोपान वक्ते प्रामुख्याने उपस्थित होते.