Home Blog Page 459

जनसेवेचे व्रत निरपेक्ष पणे राबवणारी एकमेव संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी…..

0

 

ऋषी जुंधारे
औरंगाबाद जि.प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यात सेवा ही संघटन कार्यक्रम उत्साहात साजरा ” जनसेवेचे व्रत निरपेक्ष पणे राबवणारी एकमेव संघटना” म्हणजे भारतीय जनता पार्टी” तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची माहिती . केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने जनसेवेत ७ वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले. या निमित्त “सेवा ही संघटन” हा उपक्रम अंतर्गत तालुक्यात 50 ठिकाणी विविध कार्यक्रम राबवण्यात आले.

वैजापूर शहरामध्ये सरचिटणीस डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी कोविड सेंटरला फळे वाटप ,शहरात फवारणी, मास्क वाटप ,सँनेटायजर वाटप ,करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, कल्यान पाटील दांगोडे , , दशरत बनकर , गणेश खैरे नगरसेवक , गोकूळ भुजबळ , बजरंग मगर नगरसेवक , अनिल भाऊ वानी,भाजपा यूमोर्चा शहर अध्यक्ष महेश भालेराव ,प्रवीन तांबे शहर उपाध्यक्ष गौरव दोडे , शहर सरचिटनिस युवा मोर्चा आकाश शिंदे , इत्यादी उपस्थित होते
लासुरगाव सर्कल मधील सर्व फ्रंटलाईन वर्कर चा साडीचोळी सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .धोंदलगाव करंजगाव , दहेगाव पालखेड लासुरगाव शिवराई येथे फवारणी करण्यात आली.
याप्रसंगी कल्याण पाटील दांगोडे सरपंच अनिल वाणी, राजेंद्र चव्हाण , योगिता सतीश रावते ,मोहनराव उगले, कांताबाई एकनाथराव गायकवाड उपसरपंच बद्रीनारायण मगर, सौ वर्षा नंदकिशोर जाधव, श्री नंदकिशोर जाधव,
संतोष मिसाळ ,संतोष आवारे ,वसंत शेलार, गणेश डिके, किरण डिके, सचिन घोडके बाळू मगर, पांडुरंग ठोकळ, बिपिन साळे, काकासाहेब कुभाडें ,सुरेश पानसरे, सुभाष वाघ, डॉक्टर अनिल पवार ,विनोद सोळस, किसनराव आवारे ,भाऊसाहेब धुराट, दत्तात्रय आवारे, भगवान अवारे, शिवाजी डमाळे ,प्रकाश वाघ इत्यादी हजर होत
घायगाव सर्कल मध्ये मास्क वाटप व फवारणी करण्यात आली व मेजर हंगे यांनी कोरूना काळामध्ये विलगीकरण कसे करायचे याबाबत सर्व गावांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नबी पटेल बाबासाहेब वाळुज,
सुनिल गोरसे कानिफनाथ आहेर ,
गणेश गोरसे ,सतोष गुजाळ, शरद सावत, आमोल गायके , धनंजय सावत ,शिवनाथ सावत, विजय ञिभूवन उतम साळुके, बाबासाहेब तागड हजर होते करण्यात आले शिउर गावामध्ये कोरणा योद्धा सन्मान सुशील देशमुख व कार्यकर्त्यांनी केला.

यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीचे बांधकाम अंतीम टप्यात दोन महीन्यात नव्या ईमारतीत कार्यालय स्थळलांतराचे संके

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समिती यावलच्या नविन प्रशासकीय ईमारतीचे काम प्रगतीपथावर असुन हे काम आता अंतीम टप्यात आले असुन पावसाळया पुर्वीच पंचायत समितीचे स्थलांतर या नव्या ईमारतीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे . यावल पंचायत समितीचे अत्यंत जुने व जिर्ण झालेले कार्यालय हे या पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असुन , पन्नास वर्षा पेक्षा ही अधिक काळापासुन जुन्या असलेल्या पंचायत समितीच्या ईमारतीची पतझड गेल्या पाच ते सहा वर्षापासुन सुरू झाली होती , तेव्हा पासुन आमदार शिरीष चौधरी आणी माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांच्या अथक प्रयत्नातुन अखेर या पंचायत समितीसाठी नुतन प्रशासकीय ईमारती करीता दोन कोटी १४ रुपयांचे निधीस मान्यता मिळुन या ईमारतीच्या कामास प्रयत्यक्षात दिड वर्षा पासुन सुरूवात करण्यात आली होती , संबधीत ठेकेदाराने अत्यंत वेगाने केले असुन चांगल्या प्रति चे बांधकाम संबधीत ठेकेदार यांच्या कडुन स्थानिक प्रशासनाने करून घेतल्याचे ही दिसुन येत आहे , येणाऱ्या एक ते दिड महीन्यात ही भव्य नविन प्रशासकीय ईमारत पुर्णत्वास येणार असल्याची माहीती देवुन सदरची ईमारत ही प्रशासनाच्या ताब्यात दिली जाणार असल्याची माहीती भुसावळ येथील सदर बांधकामाचे ठेकेदार प्रमोद नेमाडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांच्याशी अनपोचारीकरित्या बोलतांना दिली . असा ही योगायोग यावल पंचायत समितीची सुमारे पन्नास वर्षा पुर्वीची ईमारत ही त्या वेळेस मंत्री असलेले लोकसेवक स्व . बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातुन ईमारतीचे बांधकाम करण्यात आले होते आणी आता त्याच पंचायत समितीच्या नविन भव्य प्रशासकीय ईमारतीसाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या पाठपुराव्याने पन्नास वर्ष जुन्या ईमारतीच्या बांधकामास मान्यता मिळालेल्या नुतन ईमारतीचे बांधकाम त्यांच्या कार्यकाळात होत असल्याने हे महत्वाचे आहे असे राजकीय वर्तुळात कुतुहलाने बोलले जात आहे .

चुंचाळे येथे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती रविद्र पाटील यांच्या निधीतून दर्गा परिसरात पेव्हर ब्लॉक कामाचे शुभारंभ

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथे भाजपाचे साकळी दहिगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य व शिक्षण सभापती रविद्र सुर्यभान पाटील (छोटु भाऊ) यांच्या जन सुविधा विकास निधीतून चुंचाळे येथे पंचक्रोशितील सर्वधर्मीय शेकडो नागरीकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत गैबनशहा बाबा यांच्या दर्गा जवळ दोन लाख रुपयांची निधी मजुर करुन पेव्हर ब्लाँकचे भुमीपुजन व प्रत्यक्ष काम दिनांक २८ मे रोजी करण्यात आले कामाचे भुमीपुजन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ सदस्य व ग्राम पंचायत सदस्य दगडु तडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रविद्र पाटील यांनी साकळी दहिगाव गटातील विकास कामे करण्यासाठी मी कटीबंद्ध आहे तसेच पेव्हर ब्लाँक चे कामे स्वता उभे राहून ठेकेदाराकडून चांगल्या प्रतीचे करुण घ्यावे अश्या सुचना भ्रमणध्वणी वरुन त्यांनी नागरीकांना व आपल्या कार्यकर्त्याना दिल्या आहेत.
या प्रंसगी चुंचाळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुंनदा पाटील, उपसरपंच नजिमा तडवी,सदस्य सुकलाल राजपुत,अनिल कोळी यांच्यासह ग्रा.प.सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते चुंचाळे येथे जिल्हा परिषद सदस्य रविद्र पाटील विविध विकास कामांसाठी निधी दिल्या बद्दल चुंचाळे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुंनदा संजय पाटील यांनी त्यांचेआभार मानले.

पतिने केला पत्नी चा खुन.नारायनपुर येथील घटना

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्र

नांदुरा तालुक्यातील निमगाव ला लागुन असलेल्या नारायनपुर येथे पतिने पत्नी चा खुन केला हि घटना२८मे.रोजि संध्याकाळी६चे सूमारास घडली वर्षा .वि.खैरे वय३१असे खुन झालेल्या महिलेचे नाव तिच्या राहते घरात पतीने जड वस्तू डोक्यावर मारून खून केला वि.खैरे वय३५असे आरोपिचे नाव आहे त्याना आठ वषँ वयाचा मुलगा. सहा वषँ वयाचा मुलगा. चार.वषँ चा मुलगा व.दहा महिनेचि मूलगि याघटने मुळे गावात धक्का बसला आहे घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करत मयत महिलेचे प्रेत उतरिय तपासणी करिता पाठवला तपास नांदुरा पोलीस करित खुनाचे कारन वूत् लिहेपरँत समोर आले नव्हते

हिंगणघाट तालुका संजय गांधी निराधार योजना समितीवर सौ कविता विनोद वानखेडे यांची निवड

0

 

सचिन वाघे वर्धा
29.5.21
वडनेर :– सरपंच व माजी पंचायत समिती सदस्या सौ कविता विनोद वानखेडे यांची वर्धा जिल्हा पालक मंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना केलेल्या शिफारस पत्राद्वारे हिंगणघाट तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती वर नियुक्ती करण्यात आली आहे..
समितीद्वारे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्द पेन्शन योजना, विधवांना अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची निवड सदर समितीच्या शिफारसीनुसार केल्या जाते…
एक निष्ठावंत लढवय्या महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्या बाबत मा.ना.सुनीलजी केदार पालकमंत्री, मा.रंजितदादा कांबळे आमदार, मा. राजु तीमांडे माजी आमदार, विनोद वानखेडे (अध्यक्ष हिंगणघाट तालुका रा.काँ.पार्टी) यांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच निवडी बाबत अनेकांनी अभिनंदन केले आहे.
सौ.दिपाली भुते(ग्रा.पं.सदस्या),
सौ.रीना तागडे(ग्रा.पं.सदस्या),
सौ. वर्षा भोयर(ग्रा.पं.सदस्या),
सौ.नम्रता भगत(ग्रा.पं.सदस्या), सौ. मंदा आत्राम (ग्रा.पं.सदस्या),सौ वनिता कळसकर (ग्रा.पं.सदस्या)
सुभाष शिंदे उपसरपंच, आरिफ शेख सदस्य ग्रा.पं. यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावल नगर परिषदच्या विकास कामांसाठी अखेर आमदार शिरीष चौधरींनी केला एक कोटी रुपयांची वैशिष्टपुर्ण निधी मंजुर

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील नगर परिषदला मिळणार आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ठपुर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी विस लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आले असुन तसे पत्र नगर परिषदला प्राप्त झाले आहे . दरम्यान मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणी फैजपुर नगर परिषदच्या विकास कामांसाठी ४कोटी९२ लाखाचा निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण यावल शहरवासीयांच्या नजरा या आमदार शिरीष चौधरी यांच्या कडे लागल्या होत्या , आमदार शिरीष चौधरी यांच्या मतदारसंघात येणारे यावल शहर हे अत्यंत म्हत्वाचे शहर असुन या शहरातील देखील विकासकामे व्हावीत या दृष्टीकोणातुन आमदार चौधरी यांनी वैशिष्टपुर्ण कामांसाठी १ कोटी२० लाखांचा भरीव निधी मंजुर केला असुन, दिनांक ०३ मे२०२१ रोजी तसे पत्र महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव विवेक कुंभार यांनी यावल नगर परिषदेला पाठविला आहे . लवकरच शहरातील प्रलंबित विकास कामांना सुरूवात होणार आहे . या निधीमुळे यावल नगर परिषदच्या विकास कामांना गती व दिशा मिळेल , यानिधी मंजुर करण्या करीता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले तथा माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या निधीस मान्यता मिळाली असुन , या निधीचा फायदा पावसाळ्यापुर्वी होणाऱ्या विकास कामावर व्हावीत अशी अपेक्षाकृत मागणी यावल शहरवासीयांकडुन व्यक्त करण्यात येत आहे .

यावल तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थतेत सावळा गोंधळ नागरीकांसाठी सुचना फलक अनिवार्य करा : भाजपाची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात व शहरातील स्वस्त धान्य दुकानातुन सर्वसामान्य नागरीकांना मिळणाऱ्या स्वस्त धान्य वितरणात अनियमितेचा मोठा सावळा गोंधळ होत असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे लिखित तक्रारी व्दारे केली आहे . या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात उमेश फेगडे यांनी म्हटले आहे की तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरणात अनियमितता दिसुन येत असुन , सदर स्वस्त धान्य दुकानदार कोणते धान्य उपल्बध आहे व कोणत्या योजनेमधला व किती आहे याची सविस्तर माहीती दुकानावरील फलकावर लिखाण करीत नाही यामुळे आशिक्षीत व सर्वसामान्य नागरीकांची फसवणुक होत असते यामुळे नागरीकांना शासनाच्या नियमानुसार प्रतिमाह वितरण होणारे धान्य मिळत नसल्याने नागरीकांना पुर्ण लाभ मिळतांना दिसत नाही व प्रकारे मुळे स्वस्त धान्य दुकानदारांना गैरकारभार करण्यास वाव मिळतो या करिता महसुल प्रशासनाने यावल शहर व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांवरील धान्याचा गैरकारभार थांबण्याचे असेल तर दुकानदाराने वितरणासाठी घेतलेल्या धान्यांचा सविस्तर माहीतीचे सुचना फलक हे अनिवार्य करावे आणी अशा प्रकारे सुचनांचे पालन न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली असुन तहसीलदार महेश पवार साहेब यांना दिलेल्या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , शहराध्यक्ष निलेश गडे , परेश दिलीप नाईक, योगेश विजय चौधरी , राहुल पंढरीनाथ बारी यांच्या स्वाक्षरी आहे .

लोकनेते ना.नितीनजी गडकरी यांचे वाढदिवसा निमित्त भाजपा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

 

 

सचिन वाघे वर्धा
27.5.21
वडनेर :– भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, कर्तव्यदक्ष व कार्यकुशल केंद्रीय मंत्री,विकासपुरुष व लोकनेते ना.नितिनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२७ मे रोजी भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आज दिनांक २७ मे रोजी सकाळी १० वाजता तालुक्यातील वडनेर येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले.
विशेष म्हणजे या शिबिरात विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी ५६ वेळा रक्तदान करुन युवकांसाठी आदर्श निर्माण करीत रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
आमदार समीर कुणावार हे गेल्या २५ वर्षा वर्षापासून रक्तदान करीत आहेत. त्यांनी ५६ वेळेस रक्तदान करण्याचा विक्रम नोंदविला आहे. या शिबिरामध्ये सुद्धा त्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले.
याप्रसंगी हिंगणघाट ग्रामीण परिसरातील युवक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करुन या रक्तदान यज्ञात वडनेर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, पं. स. सभापती सौ. शारदाताई आंबटकर, हिंगणघाट न. प. बांधकाम सभापती सौ. छायाताई सातपुते, भाजयुमोचे विठू बेनीवार, विक्की राऊत, भाग्येश देशमुख, तुषार आंबटकर, सौरभ शिवणकर, आकाश बावणे, उमेश कोल्हे, प्रज्वल खैरे, अनिल येळणे, सुनील सरोदे, सुमित ढगे इत्यादीनी सहभाग घेऊन शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

युवासेना मलकापूर-नांदुरा विधानसभेच्या वतीने

0

 

युवासेना मलकापूर-नांदुरा विधानसभेच्या वतीने

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

आमदार संजय गायकवाड यांच्या इन्होवा गाडीवर झालेल्या घातपात करणाऱ्या समाजकांटकावर तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी यासाठी या साठी मा. तहसीलदार साहेब नांदुरा यांना वसंतराव भोजने शिवसेना उपजिल्हाप्रमुख व लालाभाऊ इंगळे शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आले यावेळी, रविंद्र वसंतराव भोजने युवासेना उपजिल्हाप्रमुख, संदीप पाटील उपतालुक प्रमुख शिवसेना , मुन्ना पांडे वि. सेना प्रमुख ,ईश्वर पांडव विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख अभिराजे हिवराळे,शहर प्रमुख विद्यार्थी सेना, राहुल राऊत तालुका युवासेना सचिव संतोषभाऊ लाहुडकर,शुभम पाटील,सौरभ पाटील,पुरषोत्तम सोनोवणे,अतुल रूम,उपस्थित होते.

नगर परिषद जळगाव जामोद च्या विशेष सभेमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जा.प्रतिनिधी:-
स्थानिक जळगांव जामोद नगरपालिके ची दिनांक 25/05/ 2021 रोजी विशेष सभा पार पडली.या सभेमध्ये काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप, शिवसेना गटनेते गजानन वाघ नगरसेवक सर्वश्री श्रीकृष्णा केदार,रमेश ताडे, एडवोकेट संदीप मानकर, व महाविकास आघाडीचे विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.सभा पुस्तिकेमध्ये नमूद विषय क्रमांक 1नुसार गॅस शवदाहिनी उभारण्याबाबत विचार विनिमय करताना प्रथम जळगाव जामोद शहरातील सर्व अविकसित स्मशानभूमी व कब्रस्तान विकसित करण्यात यावेत व नंतर गॅस शवदाहिनी ची उभारणी करण्यात यावी असे मत विरोधकांनी नोंदविले तसेच कोरोना महामारी च्या काळात शहरातील जनतेच्या आरोग्य व जीवनावश्यक प्राथमिक गरजा याकडे लक्ष न देता केवळ आवश्यकता नसताना अवाजवी खर्च करून त्यांचे बिले काढून कमिशन खाण्याचे काम नगर परिषद प्रशासनाकडून होतांना दिसत आहे असा विरोधकांनी आरोप केला. विषय क्रमांक 2 नुसार स्वर्गरथ घेणेबाबत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सहमती दर्शवत स्वर्गरथा सोबतच रुग्णवाहिका घेण्याबाबत सुद्धा प्रस्ताव तयार करण्यात यावा तसेच शहरातील अपंग, निराधार,परित्यक्त्या महिला व गोरगरीब जनतेला आर्थिक मदत नगर परिषदेने करावी असे मत नोंदवत विषय क्रमांक दोन ला सहमती दर्शविली. विषय क्रमांक 3 नुसार माननीय नगराध्यक्ष यांनी मंजुरी प्रदान केलेल्या कामांना कार्योत्तर मंजुरी देण्याबाबत विचारविनिमय करताना माननीय अध्यक्ष तथा माननीय मुख्याधिकारी यांनी संबंधित कामाची यादी वाचून दाखवावी अशी मागणी विरोधकांनी केली असता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची यादी वाचून दाखविली यामध्ये कचरा संकलनाचे कामाला कार्योत्तर मंजुरी देण्याबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदविला व असे नमूद केले की कचरा संकलनाचे काम योग्य प्रकारे होत नसून संपूर्ण शहरातील नागरिकांच्या याबाबत तक्रारी आहेत.ह्या तक्रारी माननीय आरोग्य पर्यवेक्षिका तसेच माननीय मुख्याधिकारी यांना वेळोवेळी सांगून सुद्धा तक्रारींचे निराकरण झाले नाही उलटपक्षी कचरा संकलनाचे नियमानुसार व इस्टिमेट प्रमाणे काम न करताच अवाजवी बिले काढण्यात येतात असा आरोप केला. संबंधित प्रभागाच्या नगरसेवकांची सहमती घेतल्याशिवाय बिले काढण्यात येऊ नये जेणेकरून शासनाच्या निधीचा अपव्यय होणार नाही असे मत विरोधकांनी नोंदविले. विषय क्रमांक 3 नुसार सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याचे कार्योत्तर मंजुरी देण्याबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदवला व शहरातील शौचालयांची साफसफाई होत नसून काही शौचालयात पाण्याची व्यवस्था विस्कळीत झालेली आहे असा आरोप करत त्या कामासंबंधिचे दिलेले कामे पूर्ण झाल्याशिवाय बील काढण्यात येऊ नये असे मत नोंदविले. विषय क्रमांक 3 नुसार हातपंप दुरुस्ती चे कार्योत्तर मंजुरी घेताना हातपंप अनेक वेळा तक्रार करून सुद्धा वेळेवर दुरुस्त होत नाहीत असा आरोप करत अगोदर बिल सभेसमोर सादर करावेत व नंतर मंजुरात द्यावी असे मत विरोधकांनी नोंदविले. विषय क्रमांक 3 नुसार इलेक्ट्रिक विषयक कामांना कार्योत्तर मंजुरी देण्याबाबत चर्चा सुरू असताना विरोधकांनी आपले मत असे नोंदविले की अगोदर केलेल्या कामाची सविस्तर माहिती रकमेसह सादर करण्यात यावी व नंतर मंजुरी देण्यात यावी. विषय क्रमांक 3 प्रमाणे मनुष्यबळ पुरविणेनुसार कर्मचाऱ्यांचा पगार काढण्याबाबत कार्योत्तर मंजुरी देण्याबाबत या विषयावर मत नोंदविताना विरोधकांनी सहमती दर्शवली.सबंधित विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असून, शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना पगार दिल्या जात नाही,पी एफ चे पैसे प्रशासनाने भरणे बंधनकारक असून सुद्धा ते पैसे भरल्या जात नाहीत,त्या कर्मचाऱ्यांचा पगार नियमीत निघत नसून 8 ते 10 महिने प्रशासनाकडून विलंब लावल्या जातो असे आरोप केले तसेच अग्निशमन, साफसफाई,विद्युत व इतर जोखमीची काम करणारे कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुरेसे विमा संरक्षण व कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य पुरविण्यात यावे असे मत नोंदवून संबंधित विषयास सहमती दर्शविली.वरील सर्व कामांची कार्योत्तर मंजुरी घेण्याऐवजी शहरातील नागरिकांच्या व नगर परिषद च्या हिताच्या दृष्टीने माननीय अध्यक्ष व माननीय मुख्याधिकारी यांनी दर महिन्याला सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक होते व त्या सभेमध्ये सर्व विषय चर्चेला घ्यावयास पाहिजे होते परंतु तसे न करता सर्वसाधारण सभा घेण्याच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे हा एक प्रकारे न प अधिनियम 1965 नुसार अपराध ठरतो.जळगाव शहरामध्ये सॅनीटायझर फवारणी व इतर समस्या बाबत अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही असा आरोप विरोधकांनी केला. उपरोक्त सर्वच विषयांवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असता माननीय अध्यक्ष व माननीय मुख्याधिकारी यांची चांगलीच तारांबळ उडाली असून नगर परिषद प्रशासनाच्या कारभारात कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले.