Home Blog Page 473

सेलू तालुका राष्ट्रवादी महिला शाखेच्या वतीने लसीकरण यशस्वितेसाठी जन जागरण मोहीम

0

 

अजहर पठाण सेलू/परभणी

सध्या कोरोणा काळात शासनाने कोविड लस उपलब्ध करून प्रत्येक नागरिकांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन केले असतानाच ग्रामीण भागातील अनेक लोक लस घेण्याबाबत उदासीन दिसत आहे. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहीमेत सर्व नागरिकांनी लस टोचून घेण्यासाठी सहभागी होऊन कोरोणावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सेलू तालुक्यातील अनेक लोक लासिबाबत मनात भीती बाळगून लस घेत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या सेलू तालुकाध्यक्ष सौ. निर्मला बालासाहेब लीपने यांनी महिलांच्या मनातील भीती दूर करून लस टोचून घेण्याबाबत जन जागरण केले व सवतः महिलांना सोबत घेऊन सेलू येथिल उपजिल्हा रुग्णालयात वैदयकीय अधीक्षक श्री. संजय हंबर्डे यांच्या उपस्थितीत महिलांना लस टोचून घेण्यासाठी सहभागी करून घेऊन जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोक या पासून वंचित राहू नये यासाठी राष्ट्रवादी महिला प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्मरण पत्राच्या फाईलमध्ये अडकले कोव्हीड सेंटर ! एकाच आठवड्यात साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात १२८ कोरोना पाॅझिटीव्ह

0

 

सिंदखेड राजा ( विशेष प्रतिनिधी )

प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ दिवसांत १२८ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्न आढळून आले आहेत . तरीही साखरखेर्डा येथील कोव्हीड सेंटरचा प्रश्न स्मरण पत्राच्या फाईल मध्येच अडल्याने तो प्रश्न तंत्काळ निकाली काढावा अशी मागणी होवू लागली आहे .
साखरखेर्डा गावाची लोकसंख्या २० हजार असून परीसरातील २३ खेडी या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येतात . कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी गावातील आणि परिसरातील शेकडो नागरिक , महिला आपली कोरोना तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत आहे . गेल्या सोमवार पासून आर टी पी सी आर च्या ११६ तर रॅपीड तपासणी केली असता १६ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत . हा आकडा साखरखेर्ड्यासाठी खुपचं मोठा असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस यांनी तत्काळ दखल घेऊन साखरखेर्डा येथे कोव्हीड सेंटर सुरु करावे अशी मागणी सर्व स्तरातून होवू लागली आहे .
साखरखेर्डा येथे कोव्हीड सेंटर सुरू करावे यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागील आठवड्यात मागणी केली होती . सहकार विद्या मंदिराची इमारत कोव्हीड सेंटर साठी उपयूक्त असल्याचा अहवाल तहसीलदार सुनील सावंत , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .रविंद्र साळवे यांनी दिला होता . ५० खाटाचे कोव्हीड सेंटर सुरु करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला होता . परंतू या अहवालाची फाईल आजही त्यांच्याकडे पडून असून आज स्मरण पत्र दिल्याचे जबाबदार अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली आहे . साखरखेर्डा येथील आणि परिसरातील वाढती रुग्ण संख्या पाहता एक चिंतनाचा विषय ठरत आहे . केवळ पत्रावर पत्र देऊन प्रश्न सोडवू ! या आश्वासनावर ताटकळत न ठेवता युद्ध पातळीवर कोव्हीड सेंटरचा प्रश्न निकाली काढावा . अन्यथा यासाठी पालक मंत्र्यांनाच अधिकाऱ्यांना स्मरण पत्र देण्याची वेळ येवू देवू नये अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत .
————————————————
साखरखेर्डा येथील कोरोना रुग्णांचा प्रश्न अत्यंत गंभिर विषय असून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कोव्हीड सेंटर तत्काळ सुरु करावे .
राजेश ठोके ,
माजी सभापती
———————————————–
कोव्हिड सेंटर साठी कर्मचारी नियुक्त करावे लागत असल्याने ती प्रक्रीया दोन दिवसात मार्गी लागेल . आणि कोव्हीड सेंटर सुरु करण्यात येईल .
सुनिल सावंत
तहसिलदार , सिंदखेडराजा
———————————————–
सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविण्यात आली आहे .
* डॉ . सदानंद बनसोड
तालुका वैद्यकीय अधिकारी , सिंदखेडराजा

दरेगावात कोरोना चा कहर बघता 45 वर्ष वयोगटा वरील सर्व नागरिकांना तात्काळ कोव्हिड लस द्या..!

0

 

मनसे चे राधेश्याम बंगाळे यांची वैद्यकीय अधिकारी साखरखेर्डा यांच्याकडे मागणी….!

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे
तसेच तालुक्यातील दरेगाव येथे सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत त्यामध्ये वयस्कर लोकांची संख्या जास्त असल्यामुळे
45 वर्ष वयोगट यावरील सर्व नागरिकांना कोविड लस तात्काळ देण्यात यावी ची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे यांनी 30 एप्रिल रोजी
साखरखेर्डा येथील वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे
तसेच समस्त दरेगाव गावकरी मंडळी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा येथिल वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने सुद्धा ही मागणी करण्यात आली आहे !त्यामुळे त्वरित दरेगाव मध्येच लसीकरण व्हावे ही लोकांची इच्छा आहे ! तसेच !
covid-19 महामारी मुळे दरेगाव येथील चार ते पाच व्यक्ती मृत्यू पावले असून दरेगाव हे गाव कोविड हॉटस्पॉट ठरत आहे तरी पुढील अनर्थ टाळण्यासाठी पंचेचाळीस वयोगटात वरील सर्व गावकऱ्यांना तात्काळ कोवीशिल्ड किंवा कोव्हाॅक्सीन या लसीद्वारे लसीकरण करण्यात यावे.

दिव्यांगांना लसीकरण केंद्र शासनाच्या आदेशान्वये करण्यात यावे – नांदगाव (खंडे) तालुका सचिव राहूल वानखडे यांची मागणी

0

 

अमरावती:-भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याने मृत्युचे प्रमाणदेखील वाढलेले असल्याने अनेकांना उपचाराअभावी मृत्यू होत आहेत . केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने दि .२६ / ०४ / २०२१ रोजी काढलेल्या आदेशान्वये दिव्यांगांना प्राधान्याने तपासणी उपचार व लसीकरण करण्यात यावे असे आदेश असतांना देखील अमरावती जिल्ह्यातील संव्यांग व्यक्तींना लस मिळत नसल्याने दिव्यांगांना लसीकरणसाठी वणवण उन्हात भटकावे लागत आहे.
सामान्य व्यक्तींच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना संसर्ग जलद गतीने होऊ शकतो असे असतांना देखील सर्व क्षेत्रात दिव्यांगांना कमी लेखले जाते त्यात जिल्ह्यातील covid -१९ चे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले असल्याने अपंग जनता दल चे नांदगाव (खंडे) तालुका सचिव श्री.राहूल वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून सामान्य रुग्णालय अमरावती व सर्व तालुका उप आरोग्य केंद्र ( ग्रामीण ) यांना लेखी आदेश काढून दिव्यांगांना प्रथम प्राधान्याने लसीकरण व्हावे अशी मागणी अपंग जनता दल सामाजिक संघटना नांदगाव खं तालुका सचिव राहुल वानखडे ऑनलाईन निवेदन माध्यतून केली आहे .

भीषण पाणी टंचाई  संत ज्ञानेश्वर वार्डातील नागरिकांची मुख्याधिकारी यांना पाणीपुरवठा ची केली मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट :- संत ज्ञानेश्वर वार्ड येथील सर्व नागरिक का कडून आम्ही दिनांक 19 एप्रिल2021 ला नगरपरिषद मध्ये आपली भेट घेतल्यानंतर तुमच्या सांगण्यानुसार 30 तारखेला संत ज्ञानेश्वर वार्ड मध्ये असलेली पाण्याची टाकी सुरू करून येथील नळ योजना सुरू करण्यात येईल. ते आश्‍वासन आपण दिले होते ,परंतु ती आजपर्यंत नळलाईन सुरू झालेली दिसत नाही म्हणून आपण आज महाराष्ट्र दिनापासून पाण्याची टँकर सुरू करावी अन्यथा नळयोजना सुरु करावी असे आपणास विनंती करत आहोत. सन्माननीय सुनील डोंगरे यांनी आमच्या शब्दाचा मान ठेवून आमच्या वार्डमध्ये त्यांनी दिनांक 2 एप्रिल 2021 पासून सलग आतापर्यंत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला परंतु संत ज्ञानेश्वर वार्ड हा मोठा असल्यामुळे एका गल्ली मध्ये टँकर येण्‍यास त्यांना एक आठवडा लागत असल्यामुळे व एका ड्रम पाण्यात येथील नागरिक कसे वापर करेल हे शक्य होत नसल्यामुळे नगर परिषद कडून ताबडतोब टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. आमच्या वार्डातील नगरसेवीका मा. धनश्रीताई वरघने, पाणीपुरवठा सभापती माननीय भास्करराव ठवरी हे अजिबात वार्डमध्ये फिरकून पण बघत नाही त्यांनी वार्ड कडे दुर्लक्ष केलेले दिसते.
वार्ड मध्ये भीषण पाणी टंचाई असल्यामुळे ताबडतोब तीन-चार टँकर लावून पाणीपुरवठा करण्यात यावा .

सुनगाव हायमास्ट इ-निविदेत गौडबंगाल फौजदारी गुन्हे दाखल करा भाजयुमो माजी तालुका सरचिटणीस यांचा उपोषणाचा इशारा

0

 

गजानन सोनटक्के

सुनगाव ग्रामपंचायत ने विषयांकित कामासाठी ma hantender. gov. in या साइटवरून सिमेंट रस्ता हायमास्ट लाईट कामाकरिता ऑनलाइन निविदा मागवल्या होत्या व निविदा सादर करताना आर्थिक देकार बी वो क्यू मध्ये कमी अधिक दर नमूद करताना तिथे त्यांनी नियमबाह्य हेतूपुरस्पर व मनमानी कारभार चा अवलंब करून पासवर्ड लावला असा पासवर्ड लावल्यामुळे व पासवर्ड माहिती नसल्यामुळे किंवा पासवर्ड सुरक्षित आर्थिक देकार असल्यामुळे कंत्राटदाराला तिथे कमी अधिक दर नमूद करणे शक्य नव्हते व परिणामी त्यांना या निविदेत सहभाग घेण्यापासून दूर ठेवण्यात आले व त्यांना सहभागी होता आले नाही त्यावेळेस सुनगाव ग्रामपंचायत व सरपंच च्या जागेवर प्रशासक असल्यामुळे याबाबत माननीय गटविकास अधिकारी यांना तक्रार प्राप्त झाली होती त्याबाबतीत त्यांना या विषयाचे ऑनलाइन चे स्क्रीन शॉट व व्हिडिओ पण पाठविले गेले 12मार्च 2021 ला कामाची लेखी तक्रार माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांच्याकडे करण्यात आली आणि गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी योग्य कार्यवाही करणे अपेक्षित होते मात्र गटविकास अधिकारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही त्यामुळे 16 मार्च 2019 ला पुन्हा लेखी तक्रार माननीय गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे केली मात्र गट विकास अधिकारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही विषयांकित प्रकरणावगावर कुठलिही कारवाई होत नसल्याचे दिसत असल्यामुळे 19 मार्च 2021 ला रतन नाईक यांनी तक्रार केली होति या हायमास्ट लाईट च्या निविदेमध्ये कंत्राटदार ने प्रशासनासोबत मिलीभगत करून हा पासवर्ड मिळवला व त्यामुळे फक्त त्यांनाच या निवेदनामध्ये सहभागी होता आले ही निविदा मध्ये आर्थिक देकार मध्ये कमी-अधिक दर नमूद करताना पासवर्ड लावणाऱ्या व प्रकरणात मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर आयटी ऍक्ट फसवणूक पदाचा दुरुपयोग सरकारी नियमांचा हेतुपुरस्पर भंग पदाचा दुरुपयोग करून विशिष्ट कंत्राटदारास लाभ पुरवणे बाबत कारवाई करून गुन्हे दाखल करावेत व तक्रारीची दखल ना घेतल्यास लोकशाही मार्गाने उपोशन व आंदोलन केले जाईल असा इशारा भाजयुमो तालुका माजी सरचिटणीस सचिन शेषराव हागे ( जामोद )यांनी 21 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे व आज 30 एप्रिल रोजी सुनगाव ग्रामपंचायतला तक्रार दिली आहे

साहित्य उपेक्षितांचे मासिक आयोजित नववर्ष स्पर्धा समुहाचा निकाल जाहीर

0

 

नवी मुंबई : राज्यस्तरीय “साहित्य उपेक्षितांचे” मासिकातर्फे समूहाचे प्रमुख प्रशासक प्रदीप बडदे (नवी मुंबई) यांनी नववर्ष आणि चैत्र पाडवा निमित्ताने वाचन-लेखन संस्कृती जपण्याच्या उद्देशाने “राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा” गीतलेखन, काव्यलेखन प्रकारात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, बीड, अहमदनगर, वर्धा या जिल्हातून तसेच गुजरात व परदेशातील सिंगापूर येथून स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता व्हाॅट्सएपच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात स्पर्धेसाठी कविता मागविण्यात आल्या होत्या.

शनिवार दि.१ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नव संकल्पना आणि नविन विचार अंमलात आणून स्पर्धेचा निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहिर करण्यात आला. स्पर्धेसाठी सौ. शामला पंडित दीक्षित या व्यासंगी तसेच उत्कृष्ट कवयित्री आम्हाला परीक्षक म्हणून लाभल्या. त्यांचे एकूण पंधरा काव्यसंग्रह प्रकाशीत असून प्रणाली प्रकाशन, चिंचवड च्या मुख्य प्रकाशक आहेत.

ऑनलाईन कार्यक्रमाचे संयोजक तसेच मासिकाचे मुख्य संपादक निलेश बामणे सर(कवी/लेखक/पत्रकार) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून त्यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला लाभले त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यांची एकूण आठ पुस्तके त्यात काव्यसंग्रह, कथासंग्रह व कादंबरी असे साहित्य प्रकाशित आहे.

स्पर्धेत मुंबई आणि पुणे अशी चुरशीची लढत झाली. कुणी ‘म्हणे पुणे तिथे काय उणे’ तर कुणी ‘आमची मुंबई आमचीच हवा’ असे म्हणत शेवटी सौ. सायली पिंपळे या मुंबईतून सर्वोत्कृष्ट ठरल्या आणि किरणताई मोरे व विजय सातपुते हे पुणे येथून उत्कृष्ट क्रमांकाचे मानकरी ठरले.
प्रथम: शोभा कोठावदे, जयश्री बोदडे, माधुरी फालक, रेखा कुलकर्णी, सानिका पत्की; द्वितीया: रोहिदास बिचकुले, रझिया जमादार, विजया शिंदे, कविता पाचंग्रे, शैला तावरे; तृतीय: सचिन पाटील, रवींद्र गिमोणकर, भाग्यश्री बागड, स्मिता भीमनवार, अशोक वरूडे; विशेष प्राविण्य: प्रतिभा विभूते, चिंतामणी पावसे, जया मुंडे, मीना सानप; लक्षवेधी: माला पारिसे, चेतन मोरे, भावना काळे, भावना गांधिले, हेमलता विसपुते; तसेच उत्तेजनार्थ: सुरेखा मैड, प.सा. म्हात्रे, श्रुती दिवाडकर, मुकूंद देवरे, स्वाती राऊत हे स्पर्धेत सहविजेते ठरले.

ग्राफिक्सकार प्रमोद सुर्यवंशी यांच्या सौजन्याने स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक ई-प्रमाणपत्राने देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मासिकाचे प्रमुख संपादक निलेश बामणे सर आणि ग्राफिक्सकार प्रमोदजी सुर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

…✍️@ प्रदीप बडदे, नवी मुंबई

गाव हागणदारीमुक्त असल्याने  तरी सार्वजनिक शौचालयाचे बारा वाजले

0

 

यावल,( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरपावली जवळच असलेल्या एका छोट्याशा गावात ग्रामस्थ अनेक समस्यांनी ग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येते, महेलखेडी गाव हागणदारीमुक्त असल्याने सार्वजनिक शौचालयाचे बारा वाजले असून आजही महिलांना प्रातःविधीसाठी उगड्यावरच बसण्याची वेळ आहे, प्रथमच ग्रामपंचायत मध्ये झाडें झुडपे, त्याच ठिकाणी कूपनलिका असून बंद अवस्थेत दिसून येते, त्याच प्रमाणे गावात गुरेढोरे यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था असलेल्या हौदाची अतिशय दैना अवस्था झाली असून त्याच ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची टाकी असून तिला गळती लागली आहे त्यातील बहुतांशी नळ हे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते, कारण की एवढी दयनीय अवस्था आहे, पुरुष व महिला शौचालय बंद अवस्थेत असून तरी आता या ग्रामपंचायतीची एक हाती सत्ता स्थापन झाल्याने म्हणजेच परिवर्तन पॅनल त्यातच महिलांच्या हाती देण्यात आली महेलखेडी ग्रामपंचायत म्हणजेच नक्किच महिलांचे प्रश्न मार्गी लागतील अश्या प्रकारे महिला वर्गात उत्साही वातावरण निर्माण असून गावाचा विकास म्हणजेच परिवर्तन घडुन कधी येणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे,सध्या कोविड 19 असून गावात उपाय योजना आखणी करणे गरजेचे असल्याचे याकडे दुर्लक्ष केले आहेत,

पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा,अन्यथा ठिय्या आंदोलन- लोकनेते विजयराज शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा

0

 

अजहर शाह मोताळा

खरीप हंगाम 2020-21 मधील जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिकविम्या पासून वंचित

“विमा कंपनीची मनमानी खपवुन घेतली जाणार नाही”

*बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्यातील 2020-21 मधील खरीप हंगामातील हजारो शेतकरी हे पिक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने अश्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी या मागणी साठी आज लोकनेते विजययराज शिंदे यांनी तसेच किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.

“यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान “विमा कंपनीची मनमानी सुरु असून पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसून कृषि विभाग व या विमा कंपनीचे आर्थिक हित संबंध असल्याचा सुद्धा घनाघाती आरोप यावेळी भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी केला आहे.पिक विम्या बाबत शेतकऱ्यांच्या येणाऱ्या विविध तक्रारिंवर कृषि विभाग कोणतीही कारवाई न करता केराची टोपली दाखवत असून यामुळे शेतकरी मेटाकुटिस आला आहे.जिल्हाधिकारी यांनी 50 पैसे पेक्षा आणेवारी कमी असल्याचे जाहिर करून सुद्धा जर विमा कंपन्या या घोषणेला जुमानत नसतील तर अश्या विमा कंपनीची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा लोकनेते विजयराज शिंदे यांनी दिला आहे.”

दिलेल्या निवेदनात नुमद आहे की, बुलडाणा जिल्ह्यातील 2020-21 या मागील वर्षात खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तिमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे.महसूल यंत्रनेने पंचनामे करून त्या आधारे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्याची आणेवारी घोषित केली होती. त्यात सर्व तालुक्याची आणेवारी ही 50 पैसे पेक्षा खाली आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे अश्या कोणत्याही शेतकऱ्यास पिक विम्याची रक्कम अद्याप पर्यंत पिक विमा कंपनीने खात्यात जमा केलेली नाही.

30/12/ 2020 रोजी मा.जिल्हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे खरीप हंगाम 2020-21 ची तालुका निहाय अंतिम आणेवारी घोषित केली होती. सदर घोषित केलेल्या आणेवारीत बुलडाणा तालुक्यातील 98 गावे तर मोताळा तालुक्यातील 120 गावांची अंतिम आनेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आलेली आहे.
संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता जवळपास 1419 गावांची आनेवारी 50 पैसे पेक्षा खाली आलेली आहे.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरवात केली आहे.विमा कंपनीच्या म्हणन्या नुसार शेतकऱ्यांनी शेतकरयांनी नुकसान झालेल्या पिकांचा क्लेम नुकसान झाल्या नंतर 72 तासाच्या आत ऑनलाइन दाखल करावा अशी अट घातली होती .बऱ्याच शेतकरयांनी यानुसार क्लेम दाखल केला आणि काही शेतकरयांना 72 तासाच्या आत क्लेम दाखल करता आला नाही शेतकरयांच्या जवळ महागड़े मोबाइल, नेट सुविधा,अज्ञान या सर्व कारनामुळे काही शेतकऱ्यांना नुकसानीचा क्लेम दाखल करता आला नाही. त्यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास नकार देत आहे.प्रशासकिय महसूल यंत्रनेनी स्वतः स्थळ निरीक्षण करून पंचनामे करून या नुकसानीचा सर्वे केलेला आहे.त्या अहवाला च्या आधारेच जिल्हाधिकारी यांनी आनेवारी जाहिर केलेली आहे.त्या आधारे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे ही बाब सुस्पष्ठ असताना विमा कंपन्या आर्थिक नुकसान भरपाई टाळा टाळ करत आहे.
तरी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या आनेवारी व गावातील तलाठी वा महसूल यंत्रनेनी केलेल्या पंचनाम्या च्या आधारे संपूर्ण जिल्ह्या भरातिल पिक विमा काढलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तत्त्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी व विमा कंपनीला द्याव्यात.
व येणाऱ्या 8 दिवसात जर जिल्हयातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम न मिळाल्यास अश्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्या च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल व यास सर्वस्वी विमा कंपनी व जिल्ह्या प्रशासन जबाबदार राहिल, असा आंदोलनात्मक इशारा लोकनेते विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदना द्वारे दिला आहे.
यावेळी किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे यांची उपस्थिति होती.

साकळी गावात आरोग्य सभापती व तहसीलदार यांच्या उपस्थितीत माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमाअंतर्गत सर्वेक्षण

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील साकळी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत सर्वेक्षण सुरू असताना जळगाव जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फछोटु पाटील, तहसीलदार महेश पवार तसेच यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन कुतुबुद्दीन शेख यांनी भेट दिली याप्रसंगी सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांनी नागरिकांनी covid-19 या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय नियमांचे पालन करून स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व समय सुचकता बाळगुण आपली वेळ येईल त्यावेळेस कोवीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मार्गदर्शन केले. सर्वेक्षण केंद्र प्रमुख किशोर चौधरी यांनी पंचक्रोशीतील साकळी परिसरात साकळी, शिरसाड, मनवेल, दगडी, थोरगव्हाण व पिळोदा येथील आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण संदर्भात माहिती दिली. साकळी परिसरातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन होत असलेल्या कोरोना संदर्भातील जनजागृती व रुग्णांची घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती जाणुन घेतली तहसीलदार महेश पवार समाधान व्यक्त केले व कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनास जनजागृती व शासनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी आणी सर्वेक्षण अधिकाधिक प्रभावी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील सर्वेक्षण कर्मचारी शिक्षक, आशा वर्कर प्रामुख्याने उपस्थित होते.