Home Blog Page 474

एक हात मदतीचा उपक्रमान्तर्गत कोरोना रुग्णांना “शिक्षकांकडून” मायेची सावली.

0

 

चामोर्शी तालुक्यातील सात केंद्रावर ‘सावलीची’ व्यवस्था.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी:भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अनेक ठिकाणी रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.रुग्णांना बेड,ऑक्सीजन,औषधी,एम्बुलंस मिळत नाही तर बऱ्याच लसिकरण केंद्रात लस उपलब्ध नाही तसेच सावलीची व्यवस्था सुद्धा नाही.लसीकरनाच्या ठिकाणी भर उन्हात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.
संपूर्ण देशभरात या कोरोना विरोधातील लढाई अत्यंत जिद्दीने लढली जात असून यामध्ये विविध घटक सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रकारची मदत करीत आहेत.यामध्ये चामोर्शी तालुक्यातील शिक्षकवृंदानेही पुढे येत या लढ्यात आपलाही सहकार्याचा हात असावा या दृष्टीने सोशल मीडिया द्वारे मदतीचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत चामोर्शी मध्ये कार्यरत शिक्षक,प्राध्यापक सोबतच तालुका व जिल्ह्याबाहेरील १९८ शिक्षक व इतर दात्यांनी सुद्धा या मदतीत अमूल्य अशी भर घातली.
एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत जमा झालेल्या निधीतुन सर्वानुमते ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे कायमस्वरूपी पत्र्याचा शेड बांधला.तसेच चामोर्शी तालुक्या अंतर्गत येणारे ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे लसिकरण केंद्रासमोर हिरवी नेट बांधून सावलीची व्यवस्था केली.लसीकरनाच्या वेळी सामान्य लोकांची आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने भर उन्हात त्यांना तासनतास उभे रहावे लागत आहे.त्यामुळे चक्कर येणे,बीपी वाढने व इतर समस्या तयार होत होत्या.आता या कायमस्वरूपी शेड व हिरव्या नेट ची व्यवस्था शिक्षकांकडून केल्यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त होत आहे.सदर उपक्रम राबविण्यासाठी प्रविण पोटवार, आशिष जयस्वाल,प्रदिप भुरसे, सुजित दास,माणिकचंद रामटेके,संतोष गुट्टे व सचिन गायधने या शिक्षकांनी पुढाकार घेतला.त्याचप्रमाणे या उपक्रमात युवा संकल्प संस्था भेंडाळा जि. गडचिरोली यांनी हिरिरीने सहभागी होऊन खूप मोलाचा हातभार लागला. त्यामध्ये युवा संकल्प संस्था चे अध्यक्ष राहुल वैरागडे उपाध्यक्ष चेतन कोकावार, सुबिर मिस्त्री,विशाल बंडावार, प्रशांत कुसराम, वैभव मंगर यांनी सहकार्य केले व पुढेही याप्रकारची मदत सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
उत्तम संस्कारातून नवी पिढी घडविणा-या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला आदर्श आपल्या मदतीच्या कृतीतून समाजासमोर ठेवला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्या बद्दल ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.लिला मदने,डॉ.शेषराव भैसारे,औषध निर्माण अधिकारी प्रतीक पुनप्रेड्डीवार,राजेश ढाले,उमेश राठोड,कुशल कवठेकर,चन्द्रकांत गव्हारे आणि समस्त रुग्णालयीन कर्मचारीच्या वतीने या महत्वाच्या सोयीबद्दल आभार मानले आहे.तसेच “एक हात मदतीचा” या समाजपयोगी प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सर्व स्वरावरून अभिनंदन केले जात आहे.

यावल शहरातुन रात्री ३ वाजेपासुन तरूणी झाली बेपत्ता आईने खबर दिल्याने पोलीसात हरविल्याची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारी तरूणी अचानक घरून निघुन घेल्याची घटना घडली असुन , तरूणीच्या आईने पोलीसात माहीती दिल्याने मुलगी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात तरूणीची आई सुंनदा मधुकर वाघ , वय ४२ वर्ष हिने यावल पोलीसात दिलेल्या खबर मध्ये सांगीतले आहे की , माझी मुलगी लक्ष्मी उर्फ गायत्री मधुकर वाघ वय २१ वर्ष राहणार शिवाजीनगर यावल ही दिनांक १oमे रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने लाईट बंद असल्याने मला जाग आली असता बघीतल्यावर ती त्याच्या जागेवर झोपलेली मिळुन आली नाही म्हणुन आम्ही तीस प्रथम घरातील शौचालय व आधी ठीकाणी शोधाशोध घेतली असता ती मिळुन आली नाही अखेर ती कुणाला काहीही एक न सांगता घरातुन निघुन गेल्याचे दिसुन आले असुन , याबाबत सुनंदा वाघ यांनी पोलीसात खबर दिल्याने लक्ष्मी उर्फ गायत्री वाघ ही २१ वर्षीय रंग सावळा, शरीर सळपातळ चेहरा गोल नाक सरळ जाड , केस काळे ,डोळे काळे तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व पिवळ्या रंगाची पँट वयाच रंगाची ओढणी परिधान केली असुन याबाबत ती हरवल्याची नोंद करण्यात आली असुन सदरची मुलगीही कुणास मिळुन आल्यास किंवा दिसुन आल्यास यावल जिल्हा जळगाव पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

पोलिसाच्या आतही असतो माणुसकीचा झरा ! पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा !! ..ना वाढदिवस ‘एनिवर्सरी ‘फक्त आणि फक्त ड्युटी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

पोलीस म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो तो खाकी वर्दीतला माणूस !कठोर शब्दात बोलणारा तर कधी प्रेमाने बोलणारा !

होय खाकी वर्दीतला लोकांचे रक्षण करणारा आपली ड्युटी तन-मन-धनाने करणारा म्हणजे पोलिस! . सद्रक्षणाय ..खलनिग्रहणाय ! हे ब्रीदवाक्य खाकी वर्दीतील प्रत्येक पोलिसांच्या अंगावरती असते !

म्हणजेच चांगल्या माणसाची तुम्ही रक्षण करावं !दृष्ट लोकांना शासन करा !

परंतु काही वेळेस चांगल्या लोकांना शासन होतं तर काही दृष्ट लोकांना ही शासन होतं .ही गोष्ट वेगळी !

पोलीस तपासामध्ये दोन्ही बाजूंचा सारासार तपास करून योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करण्याचे काम करत असतात !

परंतु एका बाजूने न्याय देताना दुसऱ्या बाजूच्या लोकांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागतो .
अनेक वेळा दारू अड्ड्यावर ती किंवा जुगार अड्ड्यावर छापा मारतांना त्यांना लोकांच्या किंवा अवैध धंदे वाल्याच्या सामना करावा लागतो .

पोलीस कसाही असला तरी शेवटी तो पोलीस असतो .आणि ते आहेत म्हणून
महिला सुरक्षित आहेत .

मागील भाग सोडला तर गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र पोलिसांचे अवलोकन केले तर घर दार आई – वडील ‘ मुले . पत्नी .यांना सोडून कोरोनाच्या संकट काळामध्ये लोकांनी विनाकारण बाहेर फिरू नये म्हणून त्यांना धाक दाखविण्यासाठी हातात दंडुका घेऊन ! कोरोना पासून लोकांनी वाचाव म्हणून भर उन्हातानात रस्त्यावर पोलिस दादा उभी असतात !

आणि विनाकारण फिरणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारणा केली असता त्यातही त्याचे वाहन लवकर सोडले नसता लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते !कोरोना संकट काळामध्ये गेल्या दीड वर्षापासून पोलीस आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे रक्षण करीत आहे !

त्यामध्ये अनेक पोलिस दादांचा धोरणामुळे लोकांचे रक्षण करत असताना कोरोना ची लागण होऊन आपला जीव गमवावा लागला आहे ।

आणि दररोज पोलीस लोकांचे रक्षण करत असताना उपचाराअभावी मृत्यू ची झुंज देत आहेत :

अनेक तरुण पोलिसांचे नुकतीच लग्न झालेली असते लहान मुलं घरी असतात म्हातारे आई वडील असतात ‘ पत्नी असते .या सर्वांना घरी सोडून मंत्री असतील खासदार असतील आमदार असेल कुठे भांडण झाले असेल अशा सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ला जात असतात .त्यांचे रक्षण करत असतात !

असाच एक प्रसंग काल सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी गावात सायंकाळी घडला !अरे निमित्त होते बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणेजी काही कामानिमित्त
सरपंच विनोद खरात यांच्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी आले होते !

पाहणी करत असताना एका ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी सोडवत असताना थोड्या अंतरावर त्यांच्या ताब्यातील पाच ते सहा पोलीस कर्मचारी साखरखेर्डा येथील दुय्यम ठाणेदार राणे साहेब व मी पत्रकार सचिन खंडारे ‘असे आम्ही चर्चा करत बसलो होतो ‘अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याला छोट्या मुलीचा फोन आला ‘पप्पा आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे केक कधी आणताय !

हे शब्द ऐकून पोलिसांनी आपल्या छोट्या मुलीला गमतीशीर उत्तर दिले की बाळा मला घरी यायला रात्रीचे ११ वाजतील ‘आणि त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा लग्नाचा सहावा वाढदिवस होता ‘यावरूनच पोलीस कुठल्याही प्रकारचा सण-उत्सव साजरा करता त्यांना येत नाही नेहमीच लोकांच्या रक्षणासाठी ते बाहेर असतात ‘लोकांचे रक्षण करत असतात .आणि तेवढेच ते कठोर असतात तेवढे ते मनाने मवू सुद्धा असतात !
अर्धा तासा चर्चा केल्यानंतर मी तिथून घरी आलो ‘परंतु अजूनही माझ्या डोक्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीचा फोन घुमत होता !

खरंच पोलिसांना घर .दार पत्नी .मुल सोडून इतरांचे रक्षणासाठी झटत असतात ‘ पोलिसांमुळेच सर्वसामान्य लोक आज लग्न साजरे करतात वाढदिवस साजर करतात ‘आमदार . खासदार ‘ मंत्री ‘ कार्यक्रम साजरे करतात ‘परंतु अहोरात्र लोकांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिस बांधवांना मात्र कुठलाही सण उत्सव वाढदिवस साजरा करता येत नाही !

म्हणून पोलीस कितीही कठोर वागले तरी त्यांच्याही मनामध्ये मायेचा पाझर फुटत असतो ! ‘

पोलिसाच्या आतही असतो माणुसकीचा झरा ‘
पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा !

कोरोना जोमात शेतकरी कोमात

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

कोरोना चा कहर सुरूच आहे पंधरा ते वीस दिवसांवर पेरणी येऊन ठेपली आहे दिवसभर बंद त्यामुळे पीक कर्ज बियाने खते आदींचे कामकाज कसे पार पडावे असा प्रश्न आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे मागील वर्षापासून सुरू झालेले कोरोना संकट थांबायला तयार नाही सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून शेतीविषयक कामे उरकून पिक कर्ज सावकारी उसनवारी कर्ज यासारखे व्यवहार आणि यासोबतच बाजारपेठेत जाऊन खरीप हंगामाकरिता बी-बियाणे खते आदी तयारीला शेतकरी महत्त्व देतात परंतु यामुळे खरिपाच्या तयारीवर मोठा परिणाम होत आहे लॉकडावून काळात बँकेच्या वेळ मर्यादित आहेत बँकांना लागणारे कागदपत्र करिता कार्यालयात जाणे तिथे सध्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असणे यामुळे तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचे नियोजन कसे करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे संचार बंदी मुळे सर्व दुकाने कालपर्यंत सात ते अकरा पर्यंत सुरू राहून बंद होतात त्यामुळे यांची चौकशी सुद्धा करणे कठीण झाले आहे व आता सुरू झालेला लॉकडाऊन त्यातच नैसर्गिक नापिकी व दुष्काळामुळे आर्थिक संकट असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे पेरणीचे दिवस जवळ जवळ येत आहे तरी खरीप हंगाम हातातून गेल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत शेतकरी जीवन जगत आहे शासनाने यासंदर्भात कृषी निविष्ठा वेळेत सूट देऊन सर्वतोपरी आर्थिक मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज भासत आहे त्यातच शेतकऱ्यांना सरकारकडून पीक विमा किंवा कोणतीच मदत मिळाली नाही परिणामी शेतकरी हा मोठ्या कोंडीत सापडला आहे व येणारा खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे याचा प्रश्न जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांना पडत आहे

वृक्षरोपण करून विनोद वानखेडे माजी सरपंच व सुभाष शिंदे उपसरपंच यांनी वाढदिवस केला साजरा

0

 

सचिन वाघे वर्धा
9.5.21
वडनेर :- विनोद वानखेडे माजी सरपंच वडनेर व सुभाष शिंदे उपसरपंच ग्रा.पं.वडनेर यांचे वाढदिवसानिमित्त ग्रा.पं. परिसरात पिंपळ,आंबा ,जांभूळ,कडुनिंब वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपन कार्यक्रमाला वडनेर ग्रा.पं. सरपंच सौ कविता वानखेडे , ग्रा.पं. सदस्य बबनराव आंबटकर, अजयभाऊ ढोक तसेच ग्रा.पं. कर्मचारी यांचे उपस्थितीत ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षाचे लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृक्षाची संगोपन करण्याची हमी ग्राम विकास अधिकारी श्री रामटेके यांनी घेतलेली असून या प्रमाणे प्रत्येकानी वृक्ष लागवड करावी अशा भावना व्यक्त करण्यात आल्या…

चुंचाळे बोराळे गावात भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांच्या जयंती प्रतिमेस अभीवादन करून साजरी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतच्या वतीने मातृभुमीच्या स्वाधीनतासाठी आपल्या संपुर्ण जिवन बलीदान करणारे विरता, पराक्रमा , त्याग आणी देशभक्तीचे प्रतिक महायोद्धा महाराणा प्रताप यांच्या जंयती निमित्त अभीवादनाचा कार्यक्रम संपन्न झाले . बोराळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे उपसरपंच उज्जैनसिंग राजपुत हे होते , याप्रसंगी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस बोराळेच्या पोलीस पाटील माधुरी राजपुत , आशा सेविका सुनयना राजपुत, कैलाससिंग राजपुत , नितिन राजपुत , अनिल वानखेडे, गणेश राजपुत , संजयसिंग राजपुत आणी गावातील ईतर समाज बांधवांनी उपस्थित राहुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी सर्व उपास्थितांचे आभार मेघराजसिंग राजपुत यांनी मानले, त्याचप्रमाणे चुंचाळे गावात देखील भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात येवुन त्यांना अभिवादन करण्यात आले , या प्रसंगी चुंचाळे चयेथे महाराणा प्रताप जयंती साजरी
चुंचाळे ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच पती संजय पाटील ,सदस्य सुकलाल पाटील,अनिल कोळी, संजु तडवी, ग्रामपंचायत शिपाई मनीष पाटील,रोजगार सेवक दीपक कोळी, संगणक परिचारक भुरा कोळी,पत्रकार यावल प्रतिनिधी विकी वानखडे,चुंचाळे पत्रकार दिपक नेवे यांचेसह ग्रामस्थ ऋषिकेश राजपूत,उमेश राजपूत,शुभम राजपूत,रतिलाल राजपूत,पवन पाटील,प्रशांत राजपूत,पवन राजपूत उपस्थित होते.

यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांच्या दळणवळणाचे सुरक्षीत साधन एसटी बससेवा कोरोनामुळे पुर्ण बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणा ही सर्तक व सज्ज असतांना ही कमी होतांना दिसुन येत नसुन या महामारीचा प्रसार ग्रामीण भागात अत्यंत वेगाने वाढतांना दिसत असुन , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ग्रामीण भागातील जवळपास सर्वच एसटी बससेवा ही पुर्णपणे थांबवल्याने ग्रामीण भागातील नागरीकांची लाईफलाईन व दळणवळणाच्या साधनावर मोठा परिणाम जावणत आहे . यावल एसटी आगारातुन तालुक्यातील सुमारे ३५ते ४० गावामध्ये २४शेड्डलय फेऱ्याव्दारे ही सेवा दिली जाते , सर्वसामान्यांची आवडती लालपरी ही जणु मागील काही महीन्यांपासुन प्रवासांची रुसली आहे की काय असे ही ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे . यावल एसटी आगारातुन लॉकडाऊन पुर्वी एकुण ७२शेडुअल फेऱ्या सोडल्याजात असे , १४ लांब पल्यांच्या १४ फेऱ्या , मध्य पल्यांचा ६ फेऱ्या तर८ अंतरराज्य फेऱ्यांची बससेवा प्रवासांसाठी दिली जाते, मात्र कोरोनाच्या लॉक डाऊन गोंधळामुळे यावल आगारातुन अत्यंत मोजक्या बससेवा प्रवासांसाठी सोडण्यात येत असल्याने अनेक प्रवासांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी अवैध मार्गाने चालत असलेल्या खाजगी वाहनाने मनमानी भाडे आकारणी देवुन प्रवास करावा लागत आहे . कोरोनाच्या महामारीचे उच्चाटन होवुन सर्वस्थिती पुर्व पदावर सामान्य होई पर्यंत आपल्या गावात सुखरूप व सुरक्षीत पहोचवणाऱ्या लालपरीची आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार हे सत्य आहे .

मालोद येथे ग्रामसेवकानी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे आदर्श निर्माण करणारे उपक्रम वृक्षारोपण , गरीब व गरजुंना वस्त्र आणि अपंगांना शासनाची 5 % टक्के मदत

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद येथील ग्रामसेवक राज़ु तडवी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कर्तव्य आणी समाजहीताची व माणुसकीची जाणीव ठेवत विविध सामाजीक व विधायक उपक्रम राबवुन एक आदर्श निर्माण केले असुन त्यांनी केलेल्या प्रेरणादायी या कार्याचे परिसरात कौत्तुक केले जात आहे . यावल पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले आदीवासी कुटुंबातील राजु अन्वर तडवी यांनी आपला वाढदिवसासाठी होणारे अनेक अनावश्यक खर्च टाळुन अतिश्य साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला .सद्या संपुर्ण देशात आणी आपल्या राज्यात व आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे लागलेली सर्वत्र संचारबंदी यात अनेक हातावर पोट भरणारी कुटुंब ही रोजगार व कामधंदे अभावी आर्थिक संकटात ओढवलेली गेली आहे . अशा संकटाच्या समयी समाजाला आपले देणे म्हणुन सामाजिक कर्तव्याची जाणीव राखुन ग्रामसेवक राजु तडवी यांनी आपल्या वाढदिवसासाठी होणारे सर्व खर्च टाळुन यातुन मालोद या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी गावातील गोरगरीब व गरजु महीलांना स्वखर्चातुन वस्त्र , मास्क , आणी सेनिटाईझर वितरीत केले तसेच शासनाच्या तरतुदीनुसार अपंगांना ५ % टक्के निधीतुन दहा अपंग महीला व पुरूषांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे धनादेश वाटप केलीत व आजच्या काळात सर्वाधिक अत्यंत गरजेचे असलेली पर्यावरणाचे व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी विविध वळ /बदाम /आंबा वृक्षांचे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण केले अशा विविध समाजहिताच्या दृष्टीकोणातुन लक्ष वेधणारे मोल्यवान कार्य करून शासनाचे सर्व नियम पाळत आपला वाढदिवस आगळ्या वेगळया उपक्रमानी साजरा करून एक आदर्श निर्माण केले आहे . याप्रसंगी मालोद या आदीवासी गावात संपन्न झालेल्या या आदर्श निर्माण करणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा प्रसंगी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , सहा गट विकास अधिकारी/विस्तार अधिकारी किशोर सपकाळे ,ग्रामपंचायंत विस्तार अधिकारी हबीब तडवी , ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पुरूषोत्तम तळेते , ग्रामसेवक हितेन्द्र महाजन ,ग्रामसेवक बाळु वायकोळे ,मालोदच्या सरपंच सौ . हसिना सिराज तडवी , उपसरपंच सौ .हुसेनाबाई रमजान तडवी , ग्राम पंचायत सदस्य सौ . जोहराबाई मुजात तडवी , जिल्हा परिषद शाळेचे वाघिरा येथील मुख्याध्यापक शिराज तडवी , बिस्मिल्ला तडवी , अरब सुभान तडवी , सौ . सुनिता नंदकिशोर पाटील , संजय सुभान तडवी , अकबर बाबु तडवी , बिस्मिल्ला नथ्थु तडवी , यांनी या सामाजीक व विधायक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला , तसेच तालुक्यात व समाजात त्यांचं कौतुक होत आहे

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या रचना दशरथ ढोकपांडे या विद्यार्थिनीचे सेवा कार्याबद्दल होत आहे सर्वत्र कौतुक

0

 

सचिन वाघे वर्धा हिंगणघाट:

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा देण्यात यावी या शासनाच्या आदेशानुसार वर्धा बोरगाव मेघे येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अंड रिसर्च येथील विद्यार्थी रचना दशरथ ढोकपांडे हि अरिहंत मेडिकल औषध वितरण करणाऱ्या दुकानात निशुल्क सेवा देत आहे.
रचना दशरथ ढोकपांडे ही विद्यार्थिनी मागील चार वर्षापासून वर्धा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून कोरोना चा संसर्ग वाढत असल्यानेआपल्याकडून थोडीफार मदत शासनाला देण्यात यावी या उद्देशाने या विद्यार्थिनीने
मागील एक महिन्यापासून अरिहंत मेडिकल स्टोअर्स मध्ये निशुल्क औषध दुकानांमध्ये सेवा देत आहेत तिचे या सेवा कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

ग्रामपंचायत कार्यालय येथे हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

आज दिनांक 9 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे मेवाड रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची 481 जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम सुनगाव येथील सरपंच रामेश्वर अंबडकार यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले महाराणा प्रताप हे मेवाड येथील शूर वीर योद्धा होते ते असे योद्धा होते की त्यांना शत्रू सुद्धा अभिवादन करीत होते त्यांची शौर्यगाथा जगात गाजलेली होती अशा या थोर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी द्रोपदी गवई,उमेश कुरवाडे, राम राजपुत, दिनेश ढगे,राहुल इंगळे,उत्तम ढगे,संतोष वंडाळे, रामेश्वर अंबडकार, पत्रकार गणेश भड,गजानन सोनटक्के,पवन पालीवाल,प्रभुगव ई,गणेश ढगे,गजानन धुळे, संतोष ताडे,विलास मिसाळ, शालिग्राम भगत अनिल भगत उपस्थित होते