Home Blog Page 481

कॉंग्रेस सेवा फाउंडेशनच्या कोवीड१९ कंट्रोल रूमच्या राज्य कार्यकारणीवर जिल्हाप्रमुखपदी जलील पटेल व मिनाक्षी जावरे यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीने थैमान घातले असुन आरोग्य व उपचाराच्या नांवाखाली खाजगी रुग्णालयात असो वा शासकीय रुग्णालयायात गोरगरीबाची मोठी आर्थिक लुट करण्यात येत असल्याच्या तक्रारींचा पाऊस सुरू झाला असुन , उपचाराअभावी असंख्य रुग्णांना आपले जिव गमवावे लागत आहे , याच पार्श्वभुमीवर काँग्रेस सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्य पातळीवर कोवीड१९शी समर्थपणे लढा व उपचाराच्या नांवाखाली कुणावरही अन्याय होता कामा नये म्हणुन जिल्हा निहाय१९ कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असुन , या राज्य पातळीवरील १९ जणांच्या कार्यकारणीत कोरपावली तालुका यावल येथील तरूण तडफदार काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते जलील सत्तार पटेल यांची व भुसावळच्या मिनाक्षी जवरे निवड कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष अॅड सुभाष गोडसे व सुयोग हिवाले (सोशल एक्टीवेटीस महाराष्ट्र ) यांनी केली असुन , जलील पटेल हे आज जळगाव जिल्हा शल्यचिकीत्सक एन .एस . चव्हाण यांची भेट घेवुन त्यांच्या सोबत जिल्ह्यातील विविध कोवीड सेन्टरचा तपसिलवार आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे .

 

 

यावल येथे श्रीराम नगरमधील तरुणाने केली गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समातमृत्युची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातील श्रीराम नगरमध्ये रहीवासी एका तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत घटनेची नोंद पोलीसात करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल शहरातील श्रीराम नगर परिसरात राहणारा कैन्ह्या रामचंद्र मेढे वय२६ वर्ष यांने दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी१० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताच्या ईगला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , याबाबत यावल पोलीसात गोकुळ पंडीत मेढे वय५१ वर्ष यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण हे करीत आहे . दरम्यान मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी बारेला हे करीत असुन ,सदर मयत कन्हैया मेढे यांने आत्महत्याका केली हे मात्र समजु शकले नाही .

फैजपुर कोवीड ऑक्सीजन सेन्टर ला शिक्षकांनी केली चार लाखांची मदत प्रांत अधिकारी कडलग, तहसीलदार महेश पवार ,यांच्या आवाहानास मोठा प्रतिसाद.

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातत्याने बाधीत रूग्णांची वाढती संख्या बघता फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी रुग्णांची उपचाराअभावी भटकंती व गैरसोय होवु नये या दृष्टीकोणातुन लोकसहभागातुन फैजपुर न्हावी येथे जे टी महाजन अभीयांत्रीक महाविद्यालय येथे५० ऑक्सीजन बेडचे सेन्टर उभारण्याचा संकल्प हाती घेतले असुन हे ऑक्सीजन सेन्टर तात्काळ उपलब्ध करण्यासाठी सामाजीक कार्यकर्त व दानसुरांनी या विधायक कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले होते याआवाहानास प्रतिसाद देत आज तालुक्यातील शिशकांनी आपल्या वर्गणी जमा करून ४ लाख५ हजार८१४ रुपयांची रोख मदत शिक्षकांनी स्वच्छेने दिली . यावल तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्याकडे यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील, गटशिक्षण अधिकारी नईमोद्दीन शेख , पंचायत समितीचे गटनेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी प्रमोद कोळी गट समन्वयक गट साधन केन्द्र यावल, शिक्षक इम्तीयाज फारूकी , शिक्षक योगेश इंगळे , शिक्षक कुंदन वायकोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते .

डॉ . मयुर पाटील सायन मुंबईहुन शासकीय वैद्यकीय विद्यालयातुन एमबीबीएसच्या पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

पारगाव येथील राहणारे डॉ.मयुर राजेश पाटील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथून एमबीबीएस पदवीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ .मयुर पाटील हे पारगाव तालुका चोपडा येथील जिल्हा परिषद शाळेततील शिक्षक राजेश उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव असून विरावली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड .देवकांत पाटील यावलयांचे चुलतबंधू आहेत. पाटील हे एमबीबीएसच्या परिश्रेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री अरुणभाई गुजराती यांनी त्याचे अभिनंदन केले असून, एकनाथ पाटील ,योगेश सनेर ,राजेंद्र साळुंखे, व विरावली गावातील मान्यवरांनी त्यास भावी वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत .

यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील भालशिव शिवारात विनापरवाना वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला महसुलच्या पथकाने जप्त केले असुन या ट्रॅक्टरवरील चालक मात्र तिथ मिळुन आला नाही . या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील महसुलचे पथक हे वाळु माफीयाच्या मागावर असतांना आज दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी १०ते १० , ३० वाजेच्या सुमारास भालशिव गावाच्या शिवारात यावल मार्गावर एमएच १९ ए एन ४१३४ क्रमांकाचे ट्रॅक्टर हे विनापरवाना गौण खनिजची वाहतुक करण्यासाठी वाळुने भरलेल्या बेवारस स्थितीत यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी , यावलचे तलाठी ईश्वर कोळी , परसाडे येथील तलाठी समिर तडवी , कोतवाल पंढरीनाथ अडकमोल व कोळवद तलाठी संदीप गोसावी व कोळवदचे कोतवाल सोनु सिंग यांचे पथक हे गस्तीवर असतांना मिळून आले असुन ट्रॅक्टरला कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांनी चालवुन पोलीस स्टेशन पर्यंत आणले, सदरचे हे ट्रॅक्टर वाहन शरद भागवत कोळी यांच्या मालकीचे असुन त्यास यावल पोलीस स्टेशन मध्ये पुढील दंडात्मक कार्यवाही करिता जमा करण्यात आले आहे .महसुलच्या पथकाने केलेल्या या कार्यवाही मुळे अवैद्य मार्गाने विनापरवाना गौण खनिज ची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर वचक बसणार.

यावल नगर परिषदच्या नविन वसाहती मधील नळ जोडणी साठी लागणारी रक्कमची आकारणी कमी करावी युवकांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर परिषदच्या माध्यमातुन विस्तारीत क्षेत्रातील राहणाऱ्या नागरीकांसाठी नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिनी पाईपलाईन वरून नळ जोडणीच्या कामास सुरुवात झाली असुन , नळजोडणीची मुदत व जोडणीसाठी लागणारी रक्कम ही कमी करावी अशी मागणी या परिसरातील युवकांनी नगर परिषदे मुख्यधिकारी यांच्याकडे केली आहे . या संदर्भात नगर परिषदकडे केलेल्या मागणीच्या निवेदनात युवकांनी म्हटले आहे की , सद्या देशात व राज्यात कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे संचारबंदी लागलेली असुन , सर्वनागरीकांची आर्थिक परिस्थिती सर्वसम्मान झाली आहे . अशा परिस्थित नगर परिषदच्या वतीने सुमारे ५ कोटी७५ लाख२ रुपये खर्च करून नव्या जलकुंभाची उभारणी केली असुन विस्तारीत क्षेत्रातील विविध भागामध्ये या जलकुंभावरून नागरीकांना मुबलक स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरीता जलवाहिनी पाईपलाईव टाकण्यात आली असुन या पाईपलाईन वरून नगरपरिषदच्या वतीने नळजोडणीच्या कार्यास सुरुवात करण्यात आली असुन , यासाठी नगर परिषद कडुन नवीन नळजोडणी करीता ५ हजार६५० रुपये प्रत्येकी अकरणी करण्यात येत आहे .कोरोना संकटाच्या काळात ही नळजोडणीची रक्कम अधिक वाटत असुन , तरीही रक्कम ३०००ते ३५०० पर्यंतची अकारणी करण्यात यावी अशी मागणी गणपती नगर , तिरूपत्तीनगर व आयशानगर या क्षेत्रातील राहणाऱ्या अशपाक शाह, सुलेमान शेख लुकमान, रईस शेख बिस्मिल्ला , सईद खाटीक ,युसुफ शेख इस्हाक, रऊफ नसिर खान , रिजवान हारीस शेख आदींनी नगर परिषद अमोल मदने यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .

हिंगणघाट शहरात तात्पुरते कोव्हिडं संक्रमण सेंटर सुरु करा विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट- 27.4.21 शहर व ग्रामीण परिसरातील आजच्या परिस्थितीत कोव्हिडं रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हिंगणघाट शहरातील शासकीय व प्रायव्हेट कोव्हिडं सेंटरमध्ये आज रुग्णांकरिता बेड उपलब्ध नाही. त्यामुळे पेशंट दिवसभर वेगवेगळ्या रुग्णालयात फिरून – फिरून शेवटी हतबल होतो त्याचाच त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. ही अवस्था फार गंभीर आहे. माननीय आमदार साहेबांनी तसेच मनसे व प्रहार तर्फे कोव्हिडं दवाखान्याच्या संदर्भात जो प्रस्ताव सादर केलेले आहे तो प्रशंसनीयच आहे. यावर प्रशासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. दरम्यानच्या परिस्थितीमध्ये कोव्हिडं रुग्णांची तात्काळ व्यवस्था होणे याकरिता जोपर्यंत नवीन व्यवस्था कार्यान्वित होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था करणे आवश्यक आहे. शहरातील व ग्रामीण भागातील रुग्ण फार मोठ्या आशेने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात येतात. परंतु अपूर्ण सोयीसुविधांमुळे रुग्णांना येथे भरती न करण्यात आल्याने त्यांची निराशा होते खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांच्या ऐपतीच्या बाहेरचा असतो अशा अवस्थेत रुग्णांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. हतबल होतात परिणामी रुग्णांना मृत्यूला कवटाळण्या शिवाय मार्ग राहत नाही.अशी वेळ कुणावरही येऊ नये याकरिता अशा गोरगरीब रुग्णांकरिता एक संक्रमण कोव्हिडं उपचार केंद्र तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित होणे गरजेचे आहे . ट्रान्झिट कोव्हिडं -19 सेंटर यामध्ये (1) आलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद एका मध्यवर्ती ठिकाणी (उपजिल्हा रुग्णालय) घेण्यात यावी. ज्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहेत तिथे रुग्णांना भरती करण्यात यावे बेड उपलब्ध नाहीत तेव्हा हे ट्रान्झिट कोव्हिडं सेंटरला पाठविण्यात यावे .(२) इथे येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतील . (3) दरम्यान जिथे बेड उपलब्ध झाले तेथे या रुग्णांना पाठविण्यात येतील. (4) येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्राथमिक उपचार करणारे हे केंद्र कार्यान्वित करता येईल असे हे केंद्र असेल . या उपचार केंद्राकरिता डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक मंडळ अशा कठीण परिस्थितीमध्ये कोव्हिडं रुग्णांना दिलासा देण्याकरिता तयार आहे. डॉ. बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बी आर आंबेडकर विद्यालय नंदोरी चौक हिंगणघाट येथील इमारत सध्या परिस्थिती शाळा बंद असल्याने तसेच शालेय परीक्षा रद्द झाल्याने रिकामी आहे. आपले स्तरावरून या संदर्भात एक मिटींगचे आयोजन व्हावे, या संदर्भात चर्चा करावी व डॉ. बी आर आंबेडकर विद्यालयात एक ट्रान्झिट कोव्हिडं सेंटर तयार केले तर जवळपास 30 बेडची उपलब्धता त्या ठिकाणी होऊ शकते. आपले स्तरावरून सकाळ-संध्याकाळ एक डॉक्टर व दोन परिचारिका व 2 वार्डबाय याची व्यवस्था जर होऊ शकली तर तीन दिवसात हे सेंटर सुरू होऊ शकते. विद्यालयाचे परिसरात इमारत क्रमांक 2 येथे तळ माळावरील सहा वर्गखोल्या पुढील सत्र सुरू होईपर्यंत उपलब्ध करून देण्यास ट्रस्टच्या समितीने होकार दिलेला आहे. प्रसाधनगृह, पाण्याची व्यवस्था सुद्धा ट्रस्टच्यावतीने करून घेण्याची ग्वाही दिलेली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण दवाखाना शोधण्यास शहरात फिरण्यास प्रतिबंध होईल . पॉझिटिव्ह असेल अशा रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात थांबण्याकरिता एक ट्रान्झिट कोव्हिडं सेंटर तयार झाले तर ते शहरातील गोरगरीब व ग्रामीण भागातील जनतेच्या फायद्याचे होईल. अशा प्रकारचा एक प्रस्ताव अनिल जवादे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठविलेला आहे . तसेच या प्रस्तावाची प्रतिलिपी माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , माननीय अजित पवार साहेब मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय राजेशजी टोपे साहेब आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय जयंत जी पाटील साहेब जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय सुनीलजी केदार साहेब पालकमंत्री वर्धा, माननीय अण्णा गोटे साहेब माजी आमदार धुळे, माननीय पोलीस अधीक्षक साहेब वर्धा तसेच माननीय जिल्हा शल्यचिकित्सक साहेब जिल्हा रुग्णालय वर्धा यांना पाठविलेली आहे

शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लावून आरा मशीनसह . घर सुध्दा जळाले ! 50 लाखाचे साहीत्य जळून खाक ! …तातडीने मदत मिळण्याची मागणी !

0

 

सिंदखेड राजा l ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे दिनांक 26 एप्रिल च्या मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये आरा मशीन सह घराला लागलेल्या आगीमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये 50 लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना मेरा बुद्रुक गावात घडली !

अशोक दशरथ सुरुशे यांचे गावच्या मधोमध ‘आरा मशीन असून त्याला लागूनच राहते घर आहे ‘रात्री अचानक विद्युत पोलवर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे ।भुसा .व .वाळलेल्या लाकडाने पेट घेतलायामुळे बाजूला असलेल्या घराला आग लागली ही बाब ‘कळताच .दशरथ सुरुशे व त्यांचा परिवार जीव मुठीत धरून ‘सर्व सोडून घराच्या बाहेर गेले ‘परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आग प्रखर असल्यामुळे तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते .त्यामध्ये आरामशीन लायसन नंबर ‘ ७० .घर व घरातील संपूर्ण सामान .दोन मोटरसायकल ,रोख रक्कम ,कपाट, कागदपत्रे ,लाकडी वस्तू ,संपूर्ण जळून खाक झाली,यामध्ये 50 लाखाच्या आसपास हे नुसकान असून कोरोनाच्या संकट काळामध्ये लागलेल्या आगीत सुरुशे परिवारातील घरातील सर्व सामान जळून खाक झाल्यामुळे त्यांना प्रशासनाने तातडीने मदत करण्याची गरज आहे .यावेळी तहसीलदार येळे ‘यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली ‘तसेच तलाठी जाधव व तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला ‘
आता तातडीने मदत मिळावी एवढीच अपेक्षा !

बहुचर्चित बहुप्रतीक्षेत असलेला ‘खामगाव ते जालना रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा …रवींद्र मगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाचा व बहुप्रतिक्षित असलेला ‘खामगाव ते जालना या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर केंद्र सरकारने सुरू करावे ‘यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करण्याची विनंती मुख्यमंत्री यांना दिनांक 25 एप्रिल ला पाठवलेल्या निवेदनामध्ये साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मगर यांनी केली आहे ‘राज्यातील विदर्भ व मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा बहुप्रतिक्षित खामगाव-जालना या नवीन रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित आहे हा रेल्वे मार्ग निर्माण व्हावा ही खूप जुनी मागणी आहे 155 किलोमीटर अंतर असणारा हा रेल्वे मार्ग निर्माण होणे या भागासाठी अतिशय आवश्यक आहे व्यापार ,शिक्षा ,रोजगार ,परिवहन, पर्यटन, अधि घटकांना या मार्गामुळे चालना मिळणार आहे .
यासाठी सन 2016 – 17 मध्येकेंद्र सरकारने आर्थिक बजेट मध्ये यासाठी ३ ‘००० हजार कोटी रुपयांची विदर्भ व मराठवाडा या दोन विभागांना तरतूद केली होती
तसेच केंद्र सरकार मधील रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे एक पथक या मार्गाची पाहणी करून गेले होते ‘परंतु त्यानंतर अजूनही याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही ‘तरी मराठवाडा व विदर्भ या विभागांचा विकास होण्यासाठी हा रेल्वेमार्ग आवश्यक असून .माननीय मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे रेल्वेमार्ग लवकरात लवकर सुरू करावा यासाठी सतत पाठपुरावा करावा अशी मागणी शेवटी रवींद्र मगर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे ‘

जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन तत्काळ उपलब्ध करून द्या !फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे जिल्हा संपर्क प्रमुख जिवन चेके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तसेच वाढती रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी लक्षात घेता
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने राज्य शासनाकडे जास्तीची मागणी नोंदवून रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करावे.अशी मागणी फार्मसी स्टूडेंट कौन्सिल चे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख जिवन चेके यांनीदिनांक 25 एप्रिल रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गतवर्षांपासून कोरोनाशी लढा दिला जात आहे. प्रशासकीय
पातळीवर जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्राने अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे संक्रमण खूप वाढले आहे. जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे त्यात जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा अत्यल्प होत आहे.त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होताना दिसत आहे अश्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे रेमडेसिविर इंजेक्शनची जास्तीची मागणी नोंदवावी.तसेच तत्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिवन चेके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.