Home Blog Page 481

जलसंवर्धनाच्या कामातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणार- आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

अवर्षणप्रवण नांदुरा तालुक्यामध्ये सतत चा दुष्काळ,सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा अभाव, भूजल पातळी खालावणे अशा अनेक बाबींमुळे शेतकऱ्यांची पीक उत्पादन क्षमता कमी झाली आहे. सदर बाब लक्षात घेता व शेतकर्‍यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देऊन खालावलेली भूजल पातळी उंचावणे या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी नांदुरा तालुक्यात रु. १७.२१ कोटी रुपये किमतीचे द्वारयूक्त सिमेंट बंधारे मंजूर केले आहेत त्यामध्ये खातखेड, निमगाव येथे प्रत्येकी एक व भूईशिंगा येथे दोन द्वारायुक्त सिमेंट बंधारे समाविष्ट आहे. मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत या सर्व द्वारयुक्त सिमेंट बंधाऱ्याचा भूमिपूजन समारंभ मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.जलसंवर्धनाच्या कामातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणार,मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार व या कामांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देणार असे प्रतिपादन यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी केले. निमगाव येथील बंधाऱ्याचे काम प्रत्यक्ष सुरू देखील झाले.
यावेळी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमरावजी पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. वसंतरावजी भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. युवराज देशमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.संदीप हाडे-पाटील,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,भुईशिंग खातखेड गट ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.पंचशीला दिनकर वाकोडे, निमगाव येथील सरपंच सौ.मिराबाई कुवारे, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सर्वश्री,आकाश वतपाळ,अतुल पाटील, गजानन उन्हाळे,सुनील वेरुळकर,विजू ढोले,निमगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. मधुभाऊ चरखे,रामेश्वर इटखेडे,पप्पू गावडे, महिंद्र भोपळे,राजू बोहरा,पुरुषोत्तम साबे, शंकरराव इंगळे अँड.गावंडे,विष्णु एकडे,अनंत नागपुरे,किसन भगत,श्रीकृष्ण इंगळे,योगेश चावरे, ग्रामसेवक प्रशांत जामोदे,खातखेड-
भुईशिंगा येथील सर्वश्री गोविंदा पाटील रवींद्र तायडे,बलवंत काटे, संतोष वाकोडे,संदीप खंराबे,निरंजन मोरे, महादेव पाटील,वासुदेव बोंद्रे,विनोद मानकर, सागर दामधर,निलेश कोल्हे,अमोल काटे, दिनेश वाकोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावल भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर ट्रक व मोटरसायकलच्या अपघातात पिताचे जागीच मृत्यु मुलगी गंभीर जख्मी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील यावल भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी वाजेच्या सुमारास कडुन येणाऱ्या मोटरसायकल दुचाकी वाहनाने सुरेश सोनवणे वय ४५वर्ष राहणार आव्हाणे ता . जि .जळगाव व त्यांची मुलगी मनिषा सुरेश सोनवणे वय१९ वर्ष हे दोघ म्हैसवाडी कडुन बोरावल मार्ग जात असतांना भुसावळ कडुन यावल कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक जि जे २७ टीटी४३७८या चारचाकी मोटर वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघात सुरेश सोनवणे हे जागीच मरण पावले असुन त्यांची मुलगी मनिषा सोनवणे ही गंभीर जखमी झाली असून त्याच वेळी अंजाळे येथील राहणारे धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरूणीची तात्काळ मदत करून ग्रामीण रुग्णालयात पहोचवले तिचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात औषधपचार करण्यात येवुन तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे . मयत सुरेश सपकाळे यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे .पोलीसांनी अपघातास कारणीभुत असलेल्या ट्रकला व वाहनचालकास ताब्यात घेतले आहे

उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची मंजुरी न मिळाल्यास रुग्णमित्र गजू कुबडे करणार छतावर उपोषण !

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट :- 22.4.21

येथील उपजिल्हा रुग्णालयात आक्सिजनच्या सोयीसह 200 बेड्सची व्यवस्था न झाल्यास येत्या सोमवार,दि.२६ एप्रिलला प्रहारचे विदर्भ विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे हे आपल्या स्वतःच्या घरावरील छतावर 12 तासाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना आज दि 22 एप्रिलला पाठविलेल्या निवेदनातून म्हंटले आहे.
येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्याना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,हिंगणघाट शहर,ग्रामीण भाग व समुद्रपूर तालुका येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.येथील व्यवस्था अपुरी असल्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरगावी उपचारासाठी जावे लागत आहे.त्यामुळे मानसिक दृष्टीने खचलेल्या रूग्णांवर आर्थिक बोझा पडत असून शारीरिक त्रासही त्याला व त्याच्या कुटुंबियांना होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत आक्सिजनच्या व्यवस्थेसह 200 बेड्सची व्यवस्था केली तर या भागातील गोरगरीब रुग्णांना येथेच उपचार घेता येईल व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेलच सोबत सावंगी,व सेवाग्राम येथील दवाखान्यांवर पडणारा ताणही हलका होईल.या संपूर्ण बाबीचा विचार करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच हालचाल करून या रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था करावी ही मागणी मान्य न झाल्यास स्वतः रुग्णमित्र गजू कुबडे हे 26 एप्रिलला स्वतःच्या घराच्या छतावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदनातून प्रशासनाला इशारा दिलेला आहे.त्यानंतरही मागणी मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

हिंगणघाट उपविभागीय अंतर्गत covid-19 दक्षता केंद्र फक्त पोलीस कुटुंबाकरिता सुरू

0

 

सचिन वाघे वर्धा

 

हिंगणघाट :– 21 4 21

हिंगणघाट उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांचे व कुटुंबाचे आरोग्य या कोरणा च्या कठीण प्रसंगी अबाधित रहावे या दृष्टिकोनाणे पोलीस अधीक्षक वर्धा प्रशांत होळकर यांच्या संकल्पनेतून हिंगणघाट येथील पिंपळगाव माडाच्या वस्ती मध्ये तात्पुरत्या स्वरूपात सर्व सोयी covid-19 दक्षता केंद्र पोलिस कुटुंबीयाकरिता सुरू करण्यात आले या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम ,पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, तसेच उपविभागातील सर्व पोलीसनिरीक्षक उपस्थित होते

कोरोना चा वाढता कहर बघता ।वधू वराकडील पाहणीचा कार्यक्रम स्थगित ! …..तर आधी लगीन कोंढाण्याचे …..! कोरोनाचा व्हावा नायनाट .. हीच .. इच्छा !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कोरोना हा झपाट्याने वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो तो आपल्या परिवाराची आपल्या स्वतःची काळजी घेताना दिसत आहे ‘ते चांगले लक्षण आहे ! …
मनुष्याच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो तो विवाह ‘

मागील वर्षीसुद्धा कोरोना चा प्रादुर्भाव होता व या वर्षी सुद्धा कोरोना चा प्रादुर्भाव मागील वेळेपेक्षा जास्त आहे . :
ज्या वधू-वराची या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये लग्न ठरलेली आहेत त्या सर्वांची लग्न वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नि रदद सुद्धा केलेली आहेत ‘

तर काहींनी फक्त चार ते पाच जणांची उपस्थिती मध्ये आपला विवाह उरकला ‘

एप्रिल-मे हे उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने वयात आलेल्या तरुण तरुणी चे लग्न ठरवले जाते ‘

मग लग्न ठरवायचे असल्यास मुलांना बघण्याचा कार्यक्रम मुलींना बघण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो ‘
काहींना तर जिल्ह्याच्या बाहेरील वधू आणावी लागतील ‘

त्यामुळे त्यांची सध्या जाण्याची येण्याची पंचाईतच झाली आहे ‘

तर काही वर पक्षाकडील मंडळी वधू बघण्यासाठी घराबाहेर पडू शकत नाही ‘
कडक लॉकडाऊन असल्याकारणाने व पोलिसांचा प्रसाद मिळत असल्या कारणाने घरातच राहणे बरे अशी भूमिका वर पक्षाकडील काही मंडळींनी घेतली दिसते !

तर या वर्षी लग्न झाले नाही तरी चालेल परंतु कोरोचा नायनाट व्हायला हवा अशी भूमिका काही भावी नवरदेव यांनी व्यक्त केलेली आहे . !

।लग्न यावर्षी नाही झाली तरी चालेल परंतु कोरोना चा प्रादुर्भाव बघता कोरोनाचा नायनाट होणे गरजेचे आहे ‘

कडुबा खंडारे ! भावी नवरदेव :

..लग्न हा माणसाच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे परंतु सध्या परिस्थिती गंभीर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुलगी बघण्यापेक्षा स्वतःची व परिवाराची काळजी घेणे हिताचे आहे … अमोल खिल्लारे .

…त्यामुळे आधी लगीन कोंढाण्याचे या म्हणीप्रमाणे अगोदर कोरोणा चा नायनाट व्हावा हीच अपेक्षा भावी नवरदेव यांनी व्यक्त केली आहे !
….

साखरखेर्डा येथे कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचालींना वेग ‘ . लोक प्रतिनिधी गेलेले पाहून !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

वाढता करूनच प्रादूर्भाव बघता तसेच सिंदखेडराजा तालुक्यामधून साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामीण भागामध्ये एकूण दोनशेच्या आसपास कोरोणा बाधित रुग्णांची संख्या बघता .साखरखेर्डा येथे को विड सेंटर व्हावे अशी मागणी .स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या अनेक दिवसापासून मतदार संघाचे आमदार तथा पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे रेटून धरली होती ‘त्यामुळे 18 एप्रिल रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या .श्री पलसिद्ध मठातील इमारतीची ‘पाहणे स्थानिक लोक प्रतिनिधींनी केली ।व कोविंड सेंटर वाढती रुग्णाची संख्या लक्षात घेता लवकरात लवकर सुरू व्हावे अशी मागणी देखील केली होती ‘
त्या अनुषंगाने ‘साखरखेर्डा ग्रामपंचायतचे सरपंच दाऊद शेठ कुरेशी ‘ जि . प सदस्य ‘रामभाऊ जाधव ‘साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप कुमार सुरुशे .माझी पंचायत समिती उपसभापती सुनील भाऊ जगताप ‘ज्येष्ठ पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य सय्यद रफिक ‘पलसिद्ध संस्थान चे उत्तराधिकारी ‘मठाधिपती निळकंठ स्वामी ‘यांनी इमारतीची पाहणी केली ‘यामध्ये 25 बेडचे कोविड सेंटर उभारले जाऊ शकते ‘व रुग्णांना शौचालय ‘व स्नानगृहाचे सर्व सुविधा येथे उपलब्ध राहील ‘त्यामुळे मोठा दिलासा साखरखेडा परिसरातील लोकांना मिळणार आहे .कारण सिनखेडराजा हे 55 ते 60 किलोमीटर अंतर असल्यामुळे रुग्णांचे व नातेवाईकाचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे ‘त्यामुळे लवकरात लवकर कोविड सेंटर होणार याकडे लोकांच्या नजरा लागून आहे !

तांदुळवाडी शिवारातील विहीत पडलेल्या तीन निलगायीचे स्थानिक लोकांच्या मदतीने वाचविले प्राण !वन विभागाने -दाखवले इकडे तिकडे बोट ।

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे जिथे माणसे आहे हैराण आहेत तेथे पशू पक्षी प्राणी कसे बर मागे राहतील .
असेच पाण्याच्या शोधात तीन नीलगाई एका विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना दिनांक21 एप्रिल रोजी घडली
हकिकत अशी कि .
साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी शिवारात एका विहीरीत पडलेल्या तीन निलगायीचे प्राण ग्रामस्थांनी वाचविले आहेत .
तांदुळवाडी शिवारात तुळशिराम गोपाळा जाधव यांच्या शेतातील विहीर रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेल्या तीन निलगायी पडल्याची माहिती ग्रामस्थांना कळाली . सरपंच अंबादास बुंधे यांनी तातडीने घटणास्थळावर जावून उपरोक्त घटणेची माहीती साखरखेर्डा पोलीस स्टैशनला दिली . ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी वनविभागाला माहिती दिली . परंतू वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी केली . त्या निलगायी जिवंत असल्याने त्यांचे प्राण वाचविणे महत्वाचे असल्याने सरपंच अंबादास बुंधे यांनी ठाणेदाराची परवानगी घेवून रामेश्वर बुंधे , मदन बुंधे , मदन पिसे , सौ . मंदा बुंधे , संदीप राऊत , ऋषिकेश बुंधे , रघुनाथ बुंधे , भुजंग दवडेकर यांच्या मदतीने दोर बांधून तीनही निलगायीचे प्राण वाचविले .
शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाची नासाडी ह्या निलगायी करतात . परंतू मानवतावादी दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांनी या तीनही जंगली प्राण्यांचे प्राण वाचवून आपले कर्तव्य बजावले .

कोव्हीड – १९ अंतर्गत हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमदार निधीतून खर्च करण्यात यावा. समीर कुणावार (आमदार हिंगणघाट विधानसभा , वर्धा जिल्हा महाराष्ट्र )

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 21. 4. 21

सुमारे १५० बेडला पुरेल इतका
१० किलोलिटरचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याच्या सुचना दिल्या असून ५० बेडला
सेन्ट्रल ऑक्सिजन सिस्टिम लावण्याचीसुद्धा सुचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचेमार्फत केली आहे. यासाठी लागणारा निधी आमदार समिर कुणावार यांच्या आमदार निधीतुन खर्च करण्यात यावा.असेही यावेळी सांगण्यात आले.
कोविड महामारीची तीव्रता लक्षात घेता १५ ते २० दिवसामध्ये हा प्रकल्प तयार करण्यात यावा अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी वर्धा जिल्हाधिकाऱ्यांकड़े स्वतः केली आहे.
हिंगणघाट हा मोठा तालुका आहे,येथील लोकसंख्या पाहता उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णासांठी ५० नविन बेड तसेच त्यासाठी लागणारे साहित्य तातडीने खरेदी करण्याची गरज असून १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सिस्टिम उपलब्ध करुन देणेसुद्धा महत्वाचे आहे.
छोटे(सेमी) व्हेटिलेटर ५ नग देण्यात यावे.त्याचप्रमाणे कोव्हीड रुग्णासाठी आवश्यक असणारा औषधी आणि इन्जेक्शनचा साठा २ महिना पुरेल इतका आमदार निधी मधुन घेण्याची परवानगीसुद्धा आमदार समीर कुणावार यांनी पत्राद्वारे प्रशासनाला दिली.
आज दि.२१ रोजी यासंदर्भात आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय घेऊन सुविधा पुरविण्यात याव्या,अशी मागणी केली, जेणेकरुन कोरोनाबाधित रुग्णाचा जिव वाचवता येईल. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना योध्याना रुग्णसेवेचे काम करण्यास बाधा येणार नाही.
उपरोक्त आरोग्य सुविधा तात्काळ आमदार निधी मधून मंजूर करण्यात यावा आणि माझ्या स्थानीक आमदार निधी मधून देण्यात यावा अशी आग्रही मागणी आमदार समीर कुणावार यांनी पत्रा द्वारे केली

यावल शहरात व परिसरात जिल्हा प्रशासनाच्या कोरोना पार्श्वभुमीवर लागु झालेले नवीन संचारबंदी निर्बंधांने कडकडीत बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वेगाने वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काल दिनांक २० एप्रिल रात्री ८ वाजे पासुन संचारबंदी च्या संदर्भात नवीन कडक निर्बंध लावले असुन या नवीन नियमावलीनुसार संपुर्ण व्यवसाय सकाळी ७ वाजेपासुन११ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याने या नव्या संचारबंदीच्या आदेशाला नागरीकांसह सर्व व्यापारी व व्यवसायीकांनी पहील्याच कडकडीत बंद पाडले आहे . संपुर्ण राज्यात मागील काही दिवसापासुन महाराष्ट्र थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र मृत्युचे तांडव सुरू झाले असुन , राज्य शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी अभीजीत राऊत जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याकरीता नविन संचारबंदीची| नियमावली जाहीर केली असुन , काल रात्री ८ वाजेपासून या संचारबंदीची अमलबजावणीस सुरुवात झाली असुन , आज सकाळच्या ७ वाजेपासुन तर सकाळच्या११ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गावरील बाजारपेठेत दुकाने सुरू असल्याने नागरीकांची जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदी साठी एकच गर्दी केल्याचे दिसुन आली ,दरम्यान यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कालच पोलीस वाहनाव्दारे भ्रमणध्वनीद्वारे शहरातील नागरीकांना सुचना देण्यात आले होत्या , या सुचनांची शहरवासीयांनी आपली व्यवसाय कडकडीत बंद प्रशासनाला साथ दिली आहे . यावल बस आगारातुन प्रवासी नसल्याने अखेर काही मोजक्या सुरू असलेल्या सर्व बसफेऱ्या ही रद्द करण्यात आल्याची माहीती एसटी आगाराच्या सुत्रांकडुन मिळाली आहे. यावलहुन बदलुन गेलेले तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे यावल येथे पुन्हा रूजु झाल्याची ही काही टवाळखोर मंडळीने खोटी अफवा शहरात पसरविल्याने शहरात विविध ठिकाणी धनवडेसाहेब पुन्हा यावल येथे आले का ? अशी चर्चा देखील काही मंडळी करीत असतांना दिसत होती .

राहुल बोडखे यांनी घेतली रविकांत तुपकरांची भेट

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनीधी सेनगाव

वस्त्रोद्योग महामंडळाचे .अध्यक्ष आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पं.स.सदस्य राहुल बोडखे यांनी बुलढाणास्थित स्वाभिमानी हेल्पलाईन सेंंटरला भेट घेतली.त्यामध्ये खरिप हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना पिक विमा कंपन्यांनी विमा भरुनहि जाचक अटी लावत पळवाटा काढून शेतकऱ्यांना कुठलिही नुकसान भरपाई दिली नाही.शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा प्रश्न, शेतातील विजेचा प्रश्न,अवकाळी गारपीट, केंद्र सरकारने लादलेले कायदे, दिल्लीतील शेतकरी आंदोलन,कोरोना परिस्थिती अशा अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली.राहुल बोडखे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात चालू असलेल्या कोविड हेल्पलाईन विषयी माहिती रविकांत तुपकरांना दिली.कोरोनाच्या काळात रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युवक काँग्रेस करत असलेल्या कामाचं तुपकरांनी कौतुक केलं.कोरोना महामारीच्या काळात रूग्णांना सहकार्य करणे म्हणजेच खरं समाजकार्य असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी केले.