Home Blog Page 482

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विवेकानंद नगर (हिवरा आश्रम)येथे उद्या पासून 3 दिवस कडकडीत बंद !

0

 

सिंदखेड राजा प्रतिनिधी )

वाढता कोरोना चा उद्रेक बघता तसेच मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता
हिवरा आश्रम येथे

दिनांक:-२७/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ किराणा दुकान, हॉटेल कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे, फक्त दूध सकाळी ०६ ते ०९ ,आणि मेडिकल दवाखाने नेहमी प्रमाणे सुरू राहतील ,त्याकरिता सर्व व्यापारी वर्ग आणि जनतेने ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे,
कोणीही विनाकारण घरा बाहेर पडू नये ,तसेच गर्दि करू नये ,तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे,अन्यथा होणाऱ्या कार्यवाहिला आपण सर्वशी जवाबदार राहाल ,तसेच लसीकरण आणि कोरोना तपासणी नेहमी प्रमाणे सुरू राहील.
सौ.प्राजक्ता नितीन इंगळे
सरपंच ग्रा.पंचायत, विवेकानंद नगर(हिवराआश्रम)

रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या एक दिवसाच्या उपोषणाची सांगता व इशारा  श्री संपत चव्हाण (पोलीस निरीक्षक) यांच्या उपस्थितीत तात्पुरते उपोषण मागे !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट :- 26.4.21
उपजिल्हा सरकारी रुग्णालयात आक्सिजनच्या सोयीसह 200 बेड्सची व्यवस्था करण्यात यावी या मागणी साठी आज सोमवार,दि.26 एप्रिलला प्रहारचे विदर्भ विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी आपल्या स्वतःच्या घरावरील छतावर 12 तासाचे लाक्षणिक उपोषण केले.
सायंकाळी 7 वा. हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक श्री संपत चव्हाण यांच्या उपस्थितीत आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.तत्पूर्वी येथील उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभान खंडाईत यांनी सायंकाळी ६ वाजता व्वाट्स-उप कॉल वरून श्री कुबडे यांच्याशी चर्चा करून या मागणी बाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असून या निर्णयासाठी थोडा अवधी देण्याची विनंती केली.
रुग्णमित्र गजू कुबडे यांची प्रमुख मागणी ही शहर,ग्रामीण भाग व समुद्रपूर तालुका येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.येथील व्यवस्था अपुरी असल्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरगावी उपचारासाठी जावे लागत आहे.त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था करावी ही त्यांची मुख्य मागणी आहे. सर्व परिस्थिती पाहता येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत आक्सिजनच्या व्यवस्थेसह 200 बेड्सची व्यवस्था केली तर या भागातील गोरगरीब रुग्णांना येथेच उपचार घेता येईल व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेलच सोबत सावंगी,व सेवाग्राम येथील दवाखान्यांवर पडणारा ताणही हलका होईल.या संपूर्ण बाबीचा विचार करून श्री गजू कुबडे यांनी 22 एप्रिलला जिल्हाधिकारी वर्धा याना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन दिले होते. व या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आज 26 एप्रिलला स्वतःच्या घराच्या छतावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. मागणी मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या मागणीबाबत प्रशासन गंभीर पणे सकारात्मक विचार करीत असल्याचे संकेत आजच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या चर्चेवरून प्राप्त झाले आहेत.

पारस – निमकर्दा मार्गावर एकाला चाकूच्या धाकावर लुटले वाटमारी करणाऱ्या चौघांना उरळ पोलिसांनी केली अटक

0

 

 

 

 

बाळापूर :- पारस – निमकर्दा मार्गावर वाटमारी करणाऱ्या टोळीतील चार युवकांना उरळ पोलिसांनी काल रविवारी बारा तासाच्या आत गजाआड केले. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पारस येथील आहेत. गुरुवार ता. २२ एप्रिल रोजी रस्त्याने पायी जाणाऱ्या हातरुण येथील ६२ वर्षीय इसमास अज्ञात युवकांनी अडवूण मारहाण करत ४५ हजार रुपयांनी लुटले होते.
बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या पारस रेल्वे फाटका जवळ हि घटना घडली होती.
प्राप्त माहितीनुसार हातरुण येथील मुरलीधर अनंत गायकवाड हा ६२ वर्षीय इसम गुरुवारी पारस येथील स्टेट बँकेत घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आला होता. सायंकाळच्या सुमारास त्याने बँकेतून ४५ हजार रुपये काढून तो निमकर्दा मार्गाने पायी निघाला होता. यावेळी काही अज्ञात युवकांनी त्याचा पाठलाग केला. पारस रेल्वे फाटका जवळ सदर इसम पोहोचताच चौघे जणांनी त्याला अडवले व मारहाण करून चाकूच्या धाकावर खिशातील ४५ हजार रुपये लुटले. मारहाणीत मुरलीधर गायकवाड हा इसम गंभीर जखमी झाला. त्यामुळे काल रविवारी ता. २५ रोजी उरळ पोलिस स्टेशन गाठत त्याने पोलिसांना घटनेची माहिती कथन केली. ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी क्षणाचा विलंब न लावता आपले पोलिस कर्मचारी पारस येथे रवाना केले. प्रथम स्टेट बँकेशी संपर्क साधून मुरलीधर गायकवाड याने ४५ हजार रुपये काढल्याची खात्री केली.

सीसीटीव्हीच्या आधारे घेतला आरोपींचा शोध
उरळ पोलिसांनी आपले कसब पणाला लावून स्टेट बँके पासून निमकर्दा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेज मध्ये सदर युवक पारस येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून एका युवकाला ताब्यात घेतले. सदर आरोपीस गुन्ह्याबाबत विचारणा केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर तिघांची नावे सांगितली. यामध्ये आशिष बाबुराव खंडारे, राहुल बाबुराव भगत, अक्षय दादाराव खंडारे व अनिल आनंद घोगले सर्व रा. पारस हि वाटमारी करणाऱ्या आरोपींची नावे समोर आली. या आरोपींवर यापुर्वी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन
वाटमारीची घटना बाळापूर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने
उरळ पोलिसांनी सदर आरोपींना अटक करून बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलिस उपनिरीक्षक बचे, रवी हिंगणे, जयेश शिंगणारे यांनी हि कामगिरी केली. पुढील तपास बाळापूर पोलिस करत आहेत.

चावरा येथे अवैध गावठी दारु वर पोलिसांनी मारला छापा छाप्यात १५०० रुपये किमतीची दारू जप्त..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

 

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बीटमधील चावरा येथे दिनांक २५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल अनिल सुशिर यांना गुप्त बातमीदारांनी सदर अवैध गावठी दारूची चावरा येथे सर्रास विक्री चालू आहे अशी माहिती मिळाल्यामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सुशिर यांनी होमगार्ड गणेश दांडगे यांना सोबत घेऊन जावरा हे गाव गाठले व दुपारी एक वाजेच्या सुमारास अवैध गावठी दारू पकडण्यासाठी पोलिसांनी रेड केली असता आरोपी किशोर वासुदेव मेहेंगे वय २७ वर्ष राहणार कवठळ तालुका संग्रामपुर याला पकडले असता त्याच्या जवळून १५ लिटर हातभट्टीची गावरान दारू किंमत अंदाजे एक हजार पाचशे रुपये प्लास्टिक कँनसह बागडताना मिळून आला यावरून अनिल सुशील यांनी अपराध नंबर २८९/२१,६५ इ. महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कलम १८८,२६९,२७० भारतीय दंड विधान नुसार आरोपी किशोर वासुदेव मेहेंगे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सुशिर हे करीत

महाराष्ट्रातील covid 19 हॉस्पिटल चि इलेक्ट्रीक सुधारणा व फायर ऑडिट करण्यात यावे..अशी वंचित बहूजन आघाडी चि मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट :- 26.4.21

महाराष्ट्र राज्या मधे कोविड 19 मुळे सर्वत्र हा हाकार माजला आहे .अनेक रूग्ण विना आक्सीजन मुळे मृत्यू मुखी पडत आहे . अनेक रूग्णालयाची अवस्था बिकट व गभीर होत चाली आहे. अनेक ठिकाणी स्टॉप ची कमतरता आहे. तसेच को हॉस्पिटला आग लागण्यचे प्रमान मोठया प्रमाणात बघाला मिळते . कही दिवसा आधी भंडारा येथे आगी मुळे रूग्णाला आपला जिव गमवावा लागला.. करीता वर्धा जिल्हा तील संपूर्ण कोविड हॉस्पिटल ची इलेक्ट्रीक चि जुनी फिटीग तपासुन बरोबर करण्यात यावी व फायर ऑडिट करून फायर ची व्यवस्था करण्यात यावे ..अशी बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा.राजेशजी टोपे. आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य. यांना निवेदन देण्यात आलेत्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजेश खानकूरे. चारू आटे. संतोष सहारे. कूदीक भजभूजे. विरेन्द्र सहारे. केशव सहारे देवेंद्र त्रिपल्लीवार. महेन्द्र हाडे .उपस्थित होते..

2021-22 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून वंचित न ठेवणे व पुढील वर्गात प्रवेश मिळण्याबाबत गट शिक्षण अधिकारी समुद्रपूर यांना निवेदन

0

 

सचिन वाघे वर्धा

समुद्रपूर 26.4.21 माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल च्या प्रशासनाने व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमच्या पाल्याला पुढील वर्गात प्रवेश दिल्याचे सामायिक नोटीस द्वारे कळविले ,परंतु शालेय फी न भरल्यामुळे आम्हाला निकाल पत्र देण्यात आले नाही . त्यामुळे आमच्या पाल्याला शाळेने पुढील वर्गात प्रवेश दिला की नाही याबाबत आम्ही पालक संभ्रमात आहोत . तसेच शालेय प्रशासनाने इयत्ता नववी व दहावी चे ऑनलाईन क्लासेस सुरू केले असून ज्या पालकांनी शालेय फी भरली त्यांच्याच पाल्याला ऑनलाइन शिक्षण देणे सुरू आहे .इतर पाल्य शिक्षणापासून वंचित आहेत .इयत्ता आठवी पर्यंतच्या ऑनलाइन शिक्षण २६एप्रिल २०२१ पासून सुरू होणार असून त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना अद्याप व्हॉटस अॅप लिंक पाठवलेली नसून शालेय फी भरण्यासाठी शालेय प्रशासनाने तगादा लावला आहे त्यामुळे ७०% ते ८० % पाल्य शिक्षणापासून वंचीत राहणार आहे . तसेच मागिल शैक्षणिक वर्षात एप्रिल २०२० ला काही पालकांनी आपल्या पाल्यांचा नर्सरी वर्गा करिता २०९६० रुपये फि भरून प्रवेश घेतला परंतू संपूर्ण वर्षभर नर्सरी ची कोणतीच शाळा किंवा वर्ग घेतले नसतांना शाळेने यावर्षी नर्सरी च्या मुलांना पुढील वर्गात म्हणजे KG -1 मध्ये दाखल केले . परंतू यावर्षी सूद्धा शाळेकडून K G – I ची भरावी लागले अशी शाळेकडून मागणी होत आहे मग आमचे २०९६० रुपये फि चे काय ? याकडे सुद्धा माय बाप सरकारणे लक्ष द्यावे . आधिच कोरोना महामारी मुळे आम्ही पालक वर्ग आर्थिकदृष्टया परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे शालेय फी भरण्यास असमर्थ असून फार तर आम्ही ५०% फी भरू शकतो . शालेय फी न भरल्याच्या कारणाने शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेऊ नये असा शासन निर्णय असताना शालेय प्रशासन शासन निर्णयाची अवहेलना करीत आहे .
करिता शालेय प्रशासनाला तातडीने आमच्या पाल्यांना पुढील वर्गात प्रवेश देऊन त्यांचे निकाल पत्र व्हाट्सअप च्या माध्यमातून देण्यास व सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी सामावून घेण्याचे आदेश देण्यात यावे
याबद्दल पालक वर्गाकडून सचिन गावंडे ,रवींद्र लांबट ,अजय पानेकर ,विनोद डगवार यांनी निवेदन दिले

किराणा दुकानदार व तेल एजन्सीज वर गुन्हे दाखल करा . सहासिक जनशक्ती संघटनेची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट ,26.4.21
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता राज्यशासनाने दि,१४ एप्रिल पासुन १ मे पर्यंत राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.
याचा गैरफायदा घेत किराणा दुकानदार व खाद्यतेल विक्री करणाऱ्या ठोक व्यापाऱ्यांनी नफेखोरी करून जास्तीचे दर आकारुन ग्राहकांची सर्रास आर्थिक लुट करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेलासह साखर,गुळ,दाळ अश्या अनेक वस्तुंचे भावदेखील वाढवून ग्राहकांना वेठीस धरले आहे.प्रशासनातील अधिकारी मात्र यावेळी मुग गिळून चुप बसल्याचे दिसुन येत आहे.
लॉकडाऊनमुळे हाताला काम नसलेल्या गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू
जास्त दराने विकल्या जात आहे
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी किराणा मालाचे भाव जाहिर केल्यानुसार साखर ३५ रु. किलो ,गुळ ४५ रु.किलो, हरभरा डाळ ६० रु.किलो ,शेंगदाने १००रु किलो , तेल ९५ रुपये किलो, तुरदाळ ९० रु ‌किलो , देण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु आज किराणा व तेलासारख्या जीवनावश्यक वस्तु चढ़या दराने विक्री करण्यात येत आहे. मोठे दुकानदार साठा करुन भाववाढ करुन कीरकोळ दुकानदारांना जास्त किंमतीत माल पुरवठा करीत असल्याने किरकोळ किराणा विक्रेतेसुद्धा जादा भाव घेऊन विक्रि करीत आहे.
उपरोक्त भाववाढ करुन गोरगरीब जनतेला वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष यांनी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत व तहसीलदार श्रीरामं मुधंडा यांना निवेदनाद्वारे केली आहे ,

वालुर प्रा. आरोग्य केंद्राला आ. मेघना दिदी बोर्डीकर यांची भेट . पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.

0

 

अजहर पठाण
सेलू परभणी

आज सोमवारी सेलू जिंतूर मतदार संघाच्या आ. मेघना दिदी बोर्डीकर यांनी वालुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय डाके यांनी पुष्पगुच्छ देऊन आ. मेघना बोर्डीकर यांचे स्वागत केले. लिपिक जी.जी. उबाळे,mpw श्री. गोरे यांनी लसिकरण बाबत विस्तृत मोहिमेची माहिती दिली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत कोरॉना काळात काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी गोविंद मगर, दगडोबा जोगदंड पाटील, ग्रा. प. सदस्य श्री.विलास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महीला शहराध्यक्ष सुरेखा पारधे यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील विरारनगर परिसरातील रहीवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल शहर अध्यक्ष सुरेखा सिताराम पारधे वय३५ वर्ष यांचे आज अल्पशा आजाराने डॉ . उल्हास पाटील यांच्या गोदावरी रुग्णालयात उपचार घेत असतांना दुपारी ३ वाजेच्या सुमारास निधन झाले, सुरेखा पारधे या महीलांच्या सामाजीक व विविध प्रश्नासाठी धावुन जाणाऱ्या कार्यकर्त्या म्हणुन त्यांची ओळख होती .एक महीला म्हणुन संघर्षमय जिवन जगणारी आमची उमदा कार्यकर्ता निघुन गेल्याचे आपल्या शोकसंदेशात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी म्हटले व त्यांना श्रद्धांजली वाहीली . सुरेखा पारधे यांच्या पश्चात कुटुंबात आई , बहीण , पुतण्या , पुतणी असा परिवार आहे .

कोरपावली ग्रामपंचायतच्या माजी सरपंचांनी तडवी यांच्या भ्रष्ठाचाराच्या आरोपांना फेटाळले चौकशी करावी सत्य समोर येइल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

सामाजीक कार्यकर्ते मुनाफ जुम्मा तडवी यांनी कोरपावली येथे १४ .वित्त आयोगात भ्रष्टाचार झालेचा आरोप केल्याची तक्रार दिल्याची समजले असुन त्यात त्यांनी मासिक मिटींग काही कारणास्तव तहकूब करून अर्धवट सह्या घेऊन त्याचा गैवापर केला असे विविध मुद्दे मांडले आहेत त्यात तडवी यांनी म्हटले आहे की मासिक सभा ग्रामपंचायत अधिनियम कलम ३६ प्रमाणेआयोजित केलेल्या आहेत .त्यात काही सभासद गैहजर असल्याने कोरम अभावी सभा तहकूब करून पुन्हा सभा घेण्यात आलेल्या आहेत व विविध विकास कामांना नियमानुसार प्रशासकीय मान्यता देणेत आलेली आहे . त्याप्रमाणे तडवी वाडयात फेव्हर ब्लॉकबसवणे .शेतकऱ्यांसाठी शेतरस्ता तयार करणे . स्मशानभूमीला संरक्षण भीत बांधणे .व फेव्हर ब्लॉक बसून सुशोभीकरण करणे . गावात मागास वस्तीत LED लाईट बसविणे इतर वस्तीत LED लाईट बसविणे . पाणीपूरवठा टाकी जवळील पाईपलाईन करणे करोना काळात सॅनिटायझर ,मास्क ,थर्मल गण, आक्सी मीटर ,हॉयड्रोजनची फवारणी कब्रस्थान मागासवस्तीत मीनी हाय मास्ट बसविणे ही कामे ऑनलाईन टेडर करून इस्टीमेट प्रमाणे अभियंत्याच्या निगराणी खाली करण्यात आलेली असून त्यांचे मुल्याकंन करून बीले नियमप्रमाणे मक्तेदारास देणेत आलेली आहे . यातील आरोप केलेले कामे खेळणी साहीत्य पूरविणे अंगणवाडी साहित्य व खरेदी , गावहाळ दुरुस्ती, शौचालय बाधकम ही कामे हाती घेणेतच आलेली नाही .
सदरचे तक्रार अर्जदार हे गावातील ग्रामपंचायतमध्ये साधे सभासद नसतांना किंवा कोणतेही पूरावे नसतांना अशा तक्रारी करणे योग्य वाटत नाही . सौ . कविता कोळबे – माजी सरपंच कोरपावली यांनी आपल्या वतीने खुलासा करतांना उपरोक्त माहीती देवुन आपल्यावरील भ्रष्ठाचाराचे सर्व आरोप फेटाळुन लावले आहे .