Home Blog Page 483

रुग्णमित्र गजू कुबडे यांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ! मी माझ्या छतावर 

0

 

सचिन वाघे वर्धा
26. 4 . 21
हिंगणघाट :- दिनांक 26 .4 .21 ला उपजिल्हा सरकारी रुग्णालय येथे ऑक्सिजन व तज्ञ स्टॉपसह 200 बेडची व्यवस्था कोविड रुग्णांसाठी व तज्ञ डॉक्टर स्टॉप ची सुविधा करण्यात यावी या मागणीसाठी आज एक दिवसाचे मी माझ्या छतावर  उपोषण करणार आहे
शुभ चिंतक यांनी माझ्या उपोषणाला भेट देऊ नये ही विनंती .

सावंगी वीर येथे दलित वस्तीत असणारी धोकादायक पडित विहीर बुजवण्याची स्थानिक नागरिकांची .सरपंच व सचिवास निवेदनाद्वारे मागणी !! ..एखादे मृत्युमुखी पडल्यास याला जबाबदार कोण ?

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातील सातशे ते आठशे लोकवस्तीचे गाव असलेल्या सावंगी विर येथे .दलित वस्तीत असणारे जीर्ण व पडीत असलेली विहीर बुजविण्याची मागणी .स्थानिक नागरिकांनी .सरपंच व सचिवास निवेदन देऊन केली आहे
दलित वस्तीतील नागरिकांना या पडित विहिरी मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळेला वाट काढत घरापर्यंत यावे लागत आहे .
झी रणविहिर 50 ते 60 वर्षांपासून पडीत असून .
ही विहीर अतिशय धोकादायक बनली आहे ‘

ही विहीर पडित असल्यामुळे सर्व गावातील घाण या विहिरी मध्ये लोक टाकत आहे .
त्यामुळे टाकलेल्या घाणीमुळे आसपासच्या घरांमध्ये दुर्गंधी येत असून त्यामुळे गावात मच्छरांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे ‘

त्यामुळे डेंगू चे आजार उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो ‘

तसेच लहान लहान मुले सुद्धा विहिरीमध्ये डोकावून पहात असल्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे ‘
अगोदरच कोरोणाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असताना ‘

पंडित विहिरी मुळे गावात दुर्गंधी सुटून गावात आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे ‘

एखादे अपघात झाला एखाद्या व्यक्ती बिमार पडला तर याला जबाबदार कोण ? असेही या निवेदनात म्हटले आहे

सचिव व सरपंच एक महिना झाला तरी अजून दिलेल्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्यात येईल असा इशारा शेवटी दिला आहे !

त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सचिव काय कारवाई करतात याकडे हे पाहणे औचित्याचे ठरेल ‘तसेच पडीत असलेल्या विहिरीचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नसताना ती विहीर काम बुजवत नाही हा प्रश्न आहे ?

या निवेदनावर .समाधान सुखदाने .
श्रीकृष्ण सुखदाने,सिताराम सुखदाने, प्रभाकर सुखदाने,विजय सुखदाने, शैलेश सुखदाने, शुद्धोधन सुखदाने ‘आधीच्या सह्या आहेत ‘

हिवरा आश्रम येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर ‘गावामध्ये ‘ग्रामपंचायत च्या वतीने ‘हायड्रोक्लोरोफिन व डेटॉल ची फवारणी ‘

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोनाची संख्या ग्रामीण भागांमध्ये झपाट्याने वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं गाव सुरक्षित रहावे यासाठी स्थानिक ग्रामपंचायत च्या वतीने गावामध्ये सॅनिटायझर जी फवारणी केली जात आहे ‘
मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे दिनांक २४ एप्रिल रोजी ‘स्थानिक ग्रामपंचायत च्या वतीने ‘गावामध्ये हायड्रोक्लोरोफिन व डेटॉल लिक्विड ची फवारणी करण्यात आली

यावेळी सरपंच नितीन इंगळे ‘उपसरपंच रमेश गिर ‘ग्रामसेवक सदानंद मस्के .माजी सरपंच मनोहर गिरे ‘संजय बनसोडे ‘संतोष दळवी .मेहबूब पठाण ‘पोलीस पाटील विवेक लहाने ‘ रवी घोंगडे .आरोग्य सेवक विवेक बाजड ‘तलाठी राहुल मोहिते ‘संजय गिरी ‘आधी हजर होते तर ‘फवारणी करण्यासाठी ‘किशोर मोरे विजय कंकाळ .सुदाम पाखरे ‘संजय केंदळे ‘अफजल पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले ‘

त्यामुळे लोकांनी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर घरातच राहावे व काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी सरपंच नितीन इंगळे यांनी केले ‘

बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र प्रल्हाद सोरमारे करतोय औरंगाबाद येथे जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवण्याची ‘ राहण्याची व्यवस्था ‘ कठीण परिस्थिती प्रल्हाद चोरमारे चं दायित्व ! .

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या कोरोना मुळे सामान्य माणसाचे जगणे हे अतिशय बिकट झाले आहे ‘

कोरोना चं थैमान थांबण्याचं नाव घेत नाही त्यामुळे धावपळीच्या या दुनियेमध्ये माणूस थांबला आहे ‘ सह्या महाराष्ट्र मध्ये कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कडक लॉकडाऊन चालू आहे ।दवाखाना मेडिकल वगळता सर्व हॉटेल दुकाने बंद आहेत ‘
त्यामुळे रुग्णाबरोबर असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाची ‘मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल बंद असल्यामुळे जेवण न मिळाल्यामुळे गैरसोय होत आहे ‘

परंतु अशा परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व म्हणून अनेक जण पुढे आले आहेत ‘रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक जण डबा पुरवत आहेत ।
असेच सामाजिक दायित्व म्हणून औरंगाबाद येथे मंगल कार्यालयाचा व्यवसाय करणारे तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख ‘

प्रल्हाद सोरमारे यांनी कडक लॉकडाऊन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तसेच औरंगाबाद मधील
रुग्ण सोबत असणाऱ्या नातेवाईकांची जेवणाची व त्यांच्या राहण्याची संपूर्ण व्यवस्था प्रल्हाद सोरमारे यांनी त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये केली आहे ।

प्रल्हाद सोरमारे हे मूळचे सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील रहिवासी असून .त्यांचा औरंगाबाद येथे मंगल कार्यालय व केटरिंगचा व्यवसाय आहे ‘सध्या लग्नसराई बंद असल्यामुळे त्यांनी मंगल कार्यालयाचा उपयोग रुग्णांच्या नातेवाइकांना निवारा देण्यासाठी केला आहे ।
व तसेच सकाळी नऊ वाजेपर्यंत दिलेल्या या 7775857442 नंबर वर फोन केल्यानंतर .दवाखान्यांमध्ये जाऊन रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना डबा पुरवले जातो ‘
तसेच सायंकाळी सात वाजेपर्यंत फोन केल्यानंतर मी डब्बा पुरवला जातो ‘

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक रुग्ण आहे उपचारासाठी औरंगाबाद येथे जात असतात ‘व तेथे गेल्यानंतर कोरोणांची वाढती संख्या पाहता तेथे कडकलॉक डाऊन असल्यामुळे तसेच हॉटेल्स बंद असल्यामुळे जेवणाची खूप मोठी समस्या नातेवाईकांची झाली होती ‘

त्यामुळे कधीकधी रुग्णासोबत असणाऱ्या नातेवाईकांना उपाशी राहावे लागत असे ‘
अशा परिस्थितीमध्ये केंटरिंग चे उरलेले अन्नधान्य याचा उपयोग प्रल्हाद सोरमारे हे रुग्णांना डबा पुरवण्यासाठी करतात !
प्रल्हाद सोरमारे यांनी दाखवलेल्या दायित्वामुळे त्यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे !

व आणखी दानशूर व्यक्तींनी अशा परिस्थितीमध्ये पुढे यावे असे आवाहनही यावेळी प्रल्हाद सोररमारे त्यांनी केली आहे ‘

शिंदी येथे वाढता कोरोनाचा संसर्ग बघता ग्रामपंचायत च्या वतीने गावात सॅनिटायझर ची फवारणी !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यादृष्टीने गावामध्ये दिनांक 25 एप्रिल रोजी ग्रामपंचायतच्या वतीने सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली ‘

शिंदी हे गाव साडेतीन हजार लोकवस्तीचे असून
गावामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत आहे ।

तसेच गावांमध्ये कोरोनामुळे एका महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला आहे ‘

अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये पाच वेळा सॅनिटायझर ची फवारणी करण्यात येणार असून ।

शिंदी ग्रामपंचायत चे सचिव अर्जुन गवई हे वेळोवेळी गावात येऊन गावच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येतील याची काळजी ते घेत असतात .

त्यामुळेच 25 एप्रिल ला सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली .
यावेळी सरपंच विनोद खरात ‘
ग्रामपंचायत लिपिक विशाल खंडागळे ‘
ग्रामपंचायत कर्मचारी पप्पू गुनेवाड ‘

यांनी हजर राहून सहकार्य केले ।

वेगळी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांनी सुद्धा गावाला धावती भेट दिली ‘
यावेळी पोलीस पाटील मदन हाडे ‘
व इतर पोलिस कर्मचारी हजर होते ‘

साखरखेर्डा येथील नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनची सरपंच दाऊतशेठ कुरेशी यांच्याकडून पाहणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या .तसेच 35 हजार लोकसंख्या चे गाव असलेले साखरखेर्डा येथेन व नवनिर्वाचित साखरखेर्डा गाव चे सरपंच दाऊद सेठ कुरेशी .यांनी सतत पाठपुरावा करून ‘
नामदार तथा पालकमंत्री डॉ . राजेंद्रजी शिंगणे .यांच्या माध्यमातून साखरखेर्डा गावातील नागरिकांसाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे ‘

पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘लवकरच साखरखेर्डा गावाला स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे ‘
साखरखेर्डा येथील तांबोळी पुऱ्यामध्ये नवीन पाणी पुरवठा पाईप लाईन टाकण्याचे काम आले असता
साखरखेर्डा येथील सरपंच दाऊत सेठ कुरेशी यांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन कामाची पाहणी केली ‘
व लवकरात लवकर काम पूर्ण करा अशा सूचना दिल्या ‘

यावेळी आयुब सेट कुरेशी ‘माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य बाबुशेठ कुरेशी ‘अख्तर भाई ‘ हारुण भाई ‘यासीन अख्तर ‘तनवीर भाई ‘आदी हजर होते ‘

उपचारादरम्यान कोरोनामुळे साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रतापराव भुतेकर यांचे निधन !

0

 

सिंदखेड राजा ( विशेष प्रतिनिधी )

सध्या कोरोनाच्या प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि जवळची माणसे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडत आहे सर्व काही हतबल आहे .

साखरखेडा पोलीस स्टेशन मध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले .
प्रतापराव भुतेकर ‘ ब . नं . १००१ ‘
यांचा कोरोना चा संसर्ग झाल्यामुळे औरंगाबाद येथील दवाखान्यांमध्ये उपचारादरम्यान दिनांक २४एप्रिल रोजी मृत्यू झाला .

मृत्युसमयी ते ५४ वर्षाचे होते .

मुलाचे लग्न असल्यामुळे ते काही दिवसांसाठी सुट्टीवर गेले होते ‘

त्यानंतर सुट्टी संपल्यानंतर परत साखरखेर्डा पोलीस स्टेशनला हजर झाले ‘परंतु त्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ते परत उपचारासाठी चिखली येथील खाजगी रुग्णालय मध्ये विलगीकरण उपचारासाठी दाखल झाले ।

परंतु चिखली येथील दवाखान्यांमध्ये प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे ‘
लगेच त्यांना औरंगाबाद येथील दवाखान्यामध्ये 28 मार्च रोजी भरती करण्यात आले .

परंतु उपचार घेत असताना दिनांक २४ एप्रिल रोजी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला ‘
ते दवाखान्यामध्ये असताना साखरखेडा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांनी सर्व सहकार्य केले ‘

कोरोना चा संसर्ग वाढत असल्यामुळे काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे ।लोकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारे पोलिस बांधवांना सहकार्य करून त्यांना जपण्याची खरी गरज निर्माण झाली आहे !

व्यापारी संघटना जळगाव जामोद तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

व्यापारी संघटना नेहमीच नवनवीन उपक्रमासाठी आणि आंदोलनासाठी ओळखले जाते सध्या कोरोना च्या भयंकर काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. रक्त हे कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नाही हे जाणून सामाजिक दायित्वाचे भान ठेवत संघटनेमार्फत रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्यापारी बांधव व इतर नागरीकांच्या माध्यमातून लक्षणिय बॕग्स रक्त गोळा करण्यात संघटना यशस्वी झाली. सदर शिबिर रक्ताच्या जमा झालेल्या रक्ताच्या बॕग्स व नियोजनासाठी एक आदर्श बनले . विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही आणखी एक विशेष बाब. सदर शिबिरासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी अकोला यांचे सहकार्य लाभले.

*लक्षवेधक नियोजन*

कोरोनाचा काळ पाहता अतिशय प्रशंसनीय नियोजन संघटनेमार्फत करण्यात आले होते. मास्क , सॕनी टायझर, प्रत्येक रक्त दात्यांमध्ये आठ फुटाचे अंतर ,आरोग्याची काळजी घेता प्रत्येक रक्तदात्या करिता प्लेन सीटचा वापर, शारीरिक अंतर , प्रत्येक कार्यकर्त्याला हॅन्ड ग्लोज , नियम व सूचना फलक अशा अनेक गोष्टी लक्षवेधक होत्या .

*महिलांचा प्रतिसाद*

सदर रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग दिसून आला. महिलांना रक्तदानासाठी स्वतंत्र व्यवस्था हे आणखी एक नवीन वैशिष्ट्ये दिसून आले .

*सेल्फी पॉइंट*

*आम्ही रक्तदान केले ……तुम्ही?* हा सेल्फी पाॕईंट येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आकर्षणाचा बिंदू ठरला. प्रत्येक रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी सेल्फी पाॕईंट ची निर्मिती हा नवा प्रयोग पहावयास मिळाला.

सदर शिबिराचे आयोजनात
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे , अनिल भगत, जितेश पलन, निलेश सेदाणी , अजय पलन, महेंद्र पलन, गौतम भंसाली , एफ आर खान ,हुसेन डायमंड , प्रकाश सोळंकी , पवन चांडक आणि व्यापारी बांधवांनी परिश्रम घेतले.

सरकारी अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांच्या भेटी

सदर शिबीराला जळगाव जामोद च्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर मॕडम , तहसिलदार शिवाजी मगर, नगराध्यक्ष सौ. सीमाताई डोबे,डाॕ. संदिप वाकेकर , काँग्रेस चे शहरअध्यक्ष अर्जुन घोलप, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख , तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ , शहराध्यक्ष अभिमन्यु भगत, परिक्षित ठाकरे , उमेश येऊल , तसेच कैलास डोबे , राजू हिस्सल , डाॕ. प्रकाश बगाडे, अजिंक्य टापरे यांनी भेटी दिल्या. नगरपरिषद जळगाव जामोद ने सांस्कृतिक भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यापारी संघटनेमार्फत पालीका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

सेवाग्राम हॉस्पिटल covid-19 सेंटर मधील फरार आरोपी याच्यावर हिंगणघाट डीबी पथकाने केली कारवाई

0

 

सचिन वाघे वर्धा
25.4.21
हिंगणघाट :- मोहम्मद शबार मोहम्मद शब्बीर वय19 वर्ष राहणार जहीराबाद ,तेलंगणा याच्यावर हिंगणघाट इथे चोरीच्या आरोपाखाली कलम 379 -34 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपी हा वर्धा कारागृह येथे बंदिस्त होता त्यास न्यायालयीन कोठडी दरम्यान covid-19 ची लागण झाल्याने पुढील उपचाराकरिता कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे भरती करण्यात आले होते.
दि. 22. 4 .21 च्या उपचार दरम्यान तो covid-19 वार्ड येथून फरार झाला होता त्याच्याविरोधात सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे कलम 224, 269 भा.द.वी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार होताच त्याचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो.हवा शेखर डोंगरे यांचे प्रगटीकरण पथकास नेमून
मा पो.अधीक्षक यांचे आदेशान्वये, पो.हवा.शेखर डोंगरे यांची गुन्हे प्रगटीकरण पथक आरोपीचा पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या सोबत सतत संपर्कात राहून शोध घेत होते पांढरकवडा जिल्हा यवतमाळ आदीलाबाद, निर्मल, निजामबाद, जहीराबाद, राज्य तेलंगणा येथे शोध घेतला असता माहितीच्या आधारे आरोपीला बीदर राज्य कर्नाटक येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे आणून परत आरोपीस सेवाग्राम पोलीसकडे कारवाई करण्याकरिता हस्तांतरण करण्यात आले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध इतर राज्यात सुद्धा बरेचसे गुन्हे दाखल आहे .
सदरची कामगिरी मा.श्री प्रशांत होळकर ( पोलीस अधीक्षक वर्धा ) मा.श्री यशवंत साळुंखे (अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा ) मा.श्री दिनेश कदम कदम (उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट) श्री संपत चव्हाण (पोलीस निरीक्षक हिंगणघाट) यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पो.हवा शेखर डोंगरे नापोशी निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे विशाल बंगाले ,पोशि सचिन भारशंकर यांनी केली

जळगांव जामोद तालुक्यातील निंभोरा बु.जि.प.शाळेच्या कु.आरती सुरडकर ची आकाशवाणीवर झेप

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव(जामोद):दि.२५ कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये सध्या प्राथमिक शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासाची निरंतर ओढ लागावी, यासाठी आकाशवाणी नागपूर आणि विद्या प्राधिकरण नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “शाळेबाहेर ची शाळा”हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. तालुक्यातील निंभोरा बु. येथील जि.प. प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. आरती सुरळकर हिची ह्या उपक्रमासाठी आकाशवाणी केंद्राने मुलाखत घेऊन प्रसारित केल्याने ह्या शाळेने व कु.आरतीने आकाशवाणी वर झेप घेतली आहे.आरतीने कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली.
नागपूर आकाशवाणी च्या अ केंद्रावरून शाळे बाहेरची शाळा हा कार्यक्रम आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस सकाळी साडेदहा वाजता प्रसारित करण्यात येत असतो. कु.आरती व सुरडकार हिने “बँका मुळे तुम्हाला काय फायदा” ह्या विषयावर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. तिचे वडील विठ्ठल सुरडकार यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला. कु. आरती ही इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी असून तिचा अभ्यास ती गटामध्ये पूर्ण करते. शाळेबाहेर ची शाळा ह्या उपक्रमात १३२ व्या भागांमध्ये कु. आरती चा सहभाग असलेला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. कु. आरती सुरडकर हिच्या प्रतिसादाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एन.जी.फाळके, गटसमन्वयक एम.आर.इंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी आर.पी.तायडे, केंद्रप्रमुख योगेश वाघ, ह्या उपक्रमाचे तालुका समन्वयक किशोर शास्त्रकार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना सपकाळ ,सहयोगी शिक्षक संदीप इंगळें, मनोज वाकडे ,गोविंद बोरुडे यांच्यासह ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कु. आरतीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. सध्या कोरोनाचा भयंकर असा संक्रमण काळ आहे. विद्यार्थ्यांनी विनाकारण कुठेही न फिरता घरात राहूनच अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, तसेच”शाळा बाहेरची शाळा” अश्या अभिनव उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून आपल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.