Home Blog Page 483

नगरसेविका शुभांगी सुनील डोंगरे यांनी हिंगणघाट शहरात कोरोना वॅक्सिन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याकरिता दिले निवेदन

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.20/4/21 रोजी हिंगणघाट नगरपालिका नगरसेविका सौ. शुभांगी सुनिल डोंगरे यांनी शहरातील कोरोना रूग्ण बघता हिंगणघाट शहराला कोवॅक्सीन लस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी या करिता माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना माननीय उपविभागीय अधिकारी खंडाईत साहेब यांच्या मार्फत निवेदन दिले. निवेदनात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरातील कोविड रूग्ण लक्षात घेता मागील आठवड्याभरात कोणीतीही वॅक्सिंन ऊपलब्ध झाली नाही करिता मोठ्या प्रमाणात रूग्णांना हाल सोसावे लागत आहे हि बाब प्रामुख्याने पत्रात नमूद केली तरी माननीय जिल्हाधिकारी मॅडम नि जातीने लक्ष देवुन हिंगणघाट शहराला जास्तीत जास्त वॅक्सिंन उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती करण्यात आली प्रतिलिपी मा पालकमंत्री वर्धा जिल्हा तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय समीर कुणावार यांना देण्यात आले

अपंग जनता दल (सामाजिक संघटना) जिल्हा अमरावती येथील तालुका नांदगाव (खंडेश्वर) कार्यकारिणि बरखास्त

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटना अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम यांनी केले जाहीर

अमरावती :- अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून संपूर्ण महाराष्टात अपंगाच्या न्याय व हक्का साठी शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात कार्य सुरू आहे अमरावती जिल्हातील
नांदगाव खंडेश्वर तालुका कार्यकारणी काही करणामुळे बरखास्त करण्यात येत असून कोणीही तालुका पदाधिकारी यांनी शिक्के. लेटर पैंड. व्हिजिटिंग कार्ड व नियुक्ती पत्र चा वापर करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून 15 दिवसात अपंग नेते व अध्यक्ष शेख अनिस पत्रकार याचा सोबत चर्चा करून नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईल तरी सर्व तालुकातील अपंग बांधवानी याची नोंद ग्यावी ही नम्र विनंती

आदेशानुसार
जिल्हाध्यक्ष:मयुर मेश्राम

आ. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा नांदुरा शहर व तालुका भाजपाच्या वतीने पुतळा जाळून निषेध

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांच्या विरुद्ध अवमानकारक व गलिच्छ असे वक्तव्य केले असून नांदुरा शहर व तालुका भाजपाच्या वतीने आज सोमवार, दि. १९/०४/२०२१ रोजी आ. संजय गायकवाड यांचा पुतळा जाळून त्यांच्या विकृत वक्तव्याचा तीव्र जाहीर निषेध करण्यात आला. आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आशयाचे निवेदनही यावेळी नांदुरा शहर पोलीस स्टेशनला नांदुरा शहर व तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आले.
आज मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भारताच्या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज्याच्या सर्वोच्च पदावर राहून गेलेले असून आज विरोधी पक्षनेते या संवैधानिक पदावर कार्यरत आहेत. तसेच प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतजी पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर हे सुद्धा विधिमंडळ विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या विरोधात ज्या तुच्छ व असंवैधानिक भाषेचा वापर केल्या गेला ती भाषा आ. संजय गायकवाड यांची काय पात्रता आहे हे दाखवून देत आहे. आमदार असताना कसं बोलावे याबाबत त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज असल्याची भावना याप्रसंगी नांदुरा शहर व तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केली. स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना संजय गायकवाड यांनी असे वक्तव्य करणे पूर्णतः चुकीचे असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. राज्य सरकारने काहीच न करता केवळ आपली निष्क्रियता लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी राज्य सरकार करीत आहे. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना विद्यमान राज्य सरकारने केल्या नाहीत. कोणत्याही आरोग्य सुविधा देण्यास राज्य सरकार निष्प्रभ ठरले. आतापर्यंत व्हेंटिलेटर केंद्राने दिले, PPE किट केंद्राने दिल्या, लॉकडाऊन मध्ये प्रत्येकाला मदत देण्याचा प्रयत्न केंद्राने केला. राज्य सरकारने फक्त केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा काहीही केले नाही. तरी सुद्धा सत्ताधारी राज्य सरकार हे केंद्र सरकार व भारतीय जनता पक्ष यांच्या नावाने बोटे मोडत आहे. ज्या भारतीय जनता पक्षाच्या भरवशावर त्यांच्या पक्षाचे लोक आमदार खासदार झाले त्यांनीच भाजपाला खालच्या पातळीवर बोलणे म्हणजे कृतघ्नतेचा कळसच म्हणावा लागेल, असे मत यावेळी नांदुरा शहर व तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये संतोषभाऊ मुंढे अध्यक्ष नांदुरा तालुका भाजपा, श्यामभाऊ राखोंडे अध्यक्ष नांदुरा शहर भाजपा, सौ.अर्चनाताई पाटील अध्यक्षा नांदुरा तालुका महिला आघाडी, सौ.सारिकाताई डागा अध्यक्षा नांदुरा शहर महिला आघाडी, सौ.प्रज्ञाताई लासुरकर सचिव भाजपा बुलडाणा जिल्हा,भाजपा नेते व नगरसेवक सुधीरभाऊ मुर्हेकर,भाजपा जेष्ठ नेते शंकरसा ताकवाले, दत्ताभाऊ सुपे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, जगन्नाथभाऊ डांगे, गजाननभाऊ पाटील सरचिटणीस नांदुरा तालुका, गणेशभाऊ भोपळे, गजाननभाऊ चरखे, नितीन लहाने सरचिटणीस नांदुरा शहर, रोशन पांडव युवा मोर्चा नांदुरा शहर, विजयभाऊ अढाव पाटील जिल्हाउपाध्यक्ष भाजयुमो बुलढाणा, प्रमोदभाऊ हिवाळे उपाध्यक्ष भाजपा नांदुरा शहर, प्रभाकरभाऊ वानखडे पंचायत समिती सदस्य, प्रशांतभाऊ वडोदे, विनोदभाऊ देशमुख, निळकंठभाऊ भगत, अविनाशभाऊ इंगळे, कैलासभाऊ डांगे, उमेश शंकरसा ताकवाले बुथ मंडल प्रभारी नांदुरा शहर, शैलेशभाऊ मिरगे बुथ मंडल प्रभारी नांदुरा तालुका, लक्ष्मण झांबरे, अमोल डाहाके, अनिलभाऊ इंगळे, सौ.ज्योतीताई तांदळे संयोजिका बेटी बचाओ बेटी पढाओ, सौ.लताताई ठोंबरे, बाळुभाऊ लासुरकर, नाना खर्चे, विश्वकर्मा मुर्हेकर, रविभाऊ डंबेलकर, विनायक वाकेकर, किसना रहाटे, करनकार भाऊ, रविंद्र खंडारे, ऋषीकेश इंगळे, संजयभाऊ घाटे, व तोलामोलाचे भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

वळती बु येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण संपन्न

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

संपूर्ण राज्यात कोरोना ने थैमान घातले असल्याने प्रशासनाने कोरोना लसीकरण वर भर देत आता ग्रामीण भागात सुद्धा गावोगावी लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत आज दिनांक 19 एप्रिल 2019 रोजी वळती ता. नांदुरा येथे लसिकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता, सकाळी कॅम्प सुरू होण्याअगोदर ग्राम दक्षता समिती यांची मिटिंग घेऊन लोकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण बद्दल जनजागृती करण्यात आली व 10 वाजता लसीकरणा सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडल अधिकारी श्री रविन्द्र पाटिल साहेब यानी अढावा घेत लसीकरन कॅम्प ला भेट दिली उत्कृष्ट नियोजनाबद्दल सरपंच /सचिव, सदस्य पोलीस पाटील यांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी श्री ठाकुर साहेब, डॉ वसत्कार साहेब, सरपंच मधुकर तायड़े, सचिव दाते, सदस्य दिलीप कोल्हे, पोलीस पाटील
एकनाथ कोल्हे, तलाठी
सौ राठी मॅडम
सौ.बेबिताई मॅडम
तायडे मॅडम अंगणवाडी सेविका
सौ.प्रमिलाताई ,रूखमा ताई आशा मदतनीस
शाळेचे मुख्याध्यापक तायड़े सर , हेलोडे सर ,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटिल, ग्राम पंचायत ऑपरेटर गणेश कोल्हे, शिवहरी पा शिपाई आदीची उपस्थिती होती.

आजी-माजी आमदार सरकारी दवाखान्यांकडेही लक्ष द्या रुग्णमित्र गजू कुबडे

0

 

सचिन वाघे वर्धा

20 एप्रिल :- हिंगणघाट येथील चार तरुण तडफदार डॉक्टरांच्या कोविड रुग्णालयाच्या साठी आमदार कुणावर व माजी आमदार राजू तिमांडे यांनी प्रचंड मेहनत घेऊन या रुग्णालयासाठी 10 बेड्सची मंजूरी मिळवून दिली, व सोबतच 5 सिलेंडर्सचीही व्यवस्था करून दिली.व विशेष म्हणजे समाज माध्यमावर कुणावार आणि तिमांडे हे दोघेही याची व्यवस्था मी केली हे सांगत आहे. कोणाच्याही मदतीनेने का होईना खासगी हॉस्पिटल साठी तुम्ही दोघांनी हिंगणघाट शहरात कोविड रुग्णांसाठी व्यवस्था केली याबद्दल तुमचे शतशः अभिनंदन
आपल्या शहरात 50 कोटीची सुजज्ज असे उपजिल्हारुग्णालयाची इमारत आहे.या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी 50 बेड्सची मान्यता आहे.ही इमारत सुसज्ज असल्याने याठिकाणी कोविड-19 रुग्णासाठी 200 बेडसची व्यवस्था सहज होऊ शकते.५० रुग्णासाठी ऑक्सीजन ची व्यवस्था आहे.आता या समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यातील गोरगरीब कोविड रुग्णासाठी जर या हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या वाढवून ऑक्सिजन जर उपलब्ध झाले तर असंख्य गरीब रुग्णांना सेवाग्राम,सावंगी,नागपूर वा अन्य ठिकाणी जावे लागणार नाही.व तिथे जाऊनही बेड्सची व्यवस्था होईल याची गॅरंटी नाही.त्यामुळे गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शारीरिक आर्थिक व मानसिक त्रास सहन करून पुन्हा वापस आपल्या घरी यावे लागते.या जाण्या-येण्यात अनेकांना प्राण गमवावे लागत आहे.
आमदार कुणावार,आणि माजी आमदार तिमांडे यांनी या मतदार संघातील आपल्या गोरगरीब असहाय जनतेसाठी जर या रुग्णालयात 200 बेड्स वाढवूनऑक्सिजनची व्यवस्था केली तर तुमच्याच मतदार संघातील गोरगरीब जनता तुम्हाला तुमच्या उदंड आयुष्यासाठी निश्चितच दुवा देतील यात शंकाच नाही.
आज तुम्ही खासगी डॉकटरच्या कोविड रुग्णालयासाठी जी धावाधाव केली व मंजुरी मिळवून दिली याबद्दल आपले अभिनंदनच आहे पण अशीच धावपळ जर आपण उपजिल्हा रुग्णालयासाठी केली तर ईश्वर आपणास नक्कीच यापेक्षा उच्च स्थानावर नेऊन ठेवल्या शिवाय राहणार नाही.कारण या उपजिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण हे शेतकरी,शेतमजूर,गिरणी कामगार,भाजी विक्रेते व अतिशय गरजू व मध्यम वर्गीय उपचारासाठी येतात आणि भाऊ लोकहो आपणा सर्वांना माहीतच आहे की,सरकारी दवाखाना व खासगी दवाखाना यात बिलांची किती प्रचंड तफावत आहे.नागपुरात खासगी रुग्णालये कोविड रुग्णांपासून 3 ते साडे तीन लाख रुपयांपर्यंत फी आकारतात तर सरकारी रुग्णालयात केवळ 10 रु गोरगरिबांचे काम होते साहेब.
हा फरक आहे सरकारी व खासगी रुग्णालयात!
म्हणून तुम्ही मायबाप कुणावार साहेब आणि तिमांडे साहेब ज्या जिव्हाळ्याने व ताकदीने तुम्ही खासगी रुग्णलयाला कोविड सेरन्टरची मान्यता मिळवून दिली तशीच तत्परता तुम्ही येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व आक्सिजनची व्यवस्था करावी .

आमदार समीर कुणावर यांनी हिंगणघाट शहरातील उद्योजक यांच्या सहकार्याने कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले

0

 

सचिन वाघे वर्धा

डॉ मरोठी यांचे अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर येथे कोरोना रुग्णालय सुरु झाले आहे.या करिता शहरातील खाजगी उधोजकानी मदतीचा हात दिला आहे. हिंगनघाट तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालय अंतर्गत कोविड रुग्णालयातील खाटा सुद्धा कमी पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी आ समिर कुणावार सहित ज़िल्हातिल सर्व आमदार, खासदार रामदास तडस, तसेच ज़िल्ह्या रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी उपस्तित होते.यावेळी आ कुणावार यांनी हिंगनघाट येथे खाजगी कोविड रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी ज़िल्हाधिकाऱ्याना निवेदनातून केली .तसेच हिंगनघाट येथील काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची कोविड रुग्णालय सुरु करण्याची तयारी असल्याचेही यावेळी सांगितले. ज़िल्ह्याधिकारी वर्धा यांनी यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितल्यानंतर हिंगनघाट उपज़िल्हा रुग्नालयाच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला. यानुसार डॉ मरोठी यांचे अरिहंत क्रिटिकल सेंटर मधे १० खाटाचे कोरोना रुग्नालयाला मंजूरी प्रदान करण्यात आली.परंतु ऑक्सीजन सिलेंडरचा मोठा तूटवड़ा असल्याने रुग्णालय कार्यान्वित करण्याची गंभीर समश्या निर्माण झाली. तेव्हा आ कुणावार यांनी विविध उधोजकांशी संपर्क साधुन ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. शहरातील उधोजकानी लगेच प्रतिसाद देत तब्बल तीस औधोगिक ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले.यात गिमाटेक्स इंडस्ट्रीज , पी वी टेक्सटाइल्स जाम, सगुना फुड्स वनी , दुलानी मेडिकल्स , वरुण राठी यांनी मदतीचा हात देऊन सिलेंडर चा पुरवठा केला. या बद्दल आ कुणावार यानी सर्व उधोजकांचे आभार मानले.आ कुणावार यांनी स्वता रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी अरिहंत क्रिटिकल केअर सेंटर चे संचालक ड़ॉ राहुल मरोठी, डॉ मधुसूदन गोयनका, माज़ी नगरसेवक प्रा किरण वैद्य, संमाजसेवी संजय बोथरा, पुंडलिक बकाने उपस्तित होते.

वर्धा व हिंगणघाट येथे जम्बो कोविंड सेंटर ची वंचित बहुजन आघाडी चे नेते डॉ.उमेश वावरे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी दिवसेन दिवस कोरोणा पेशन्ट वाढीवर असून शासनाने जी गाईड लाईन दिली त्या नुसार नागरिक चालत आहे.पन हिंगणघाट व आजु बाजुच्या गावात कोविड चे पेशन्ट वाढीवर आहे. सरकारी दवाखान्यात गेले असता दवाखान्यात डाॅक्टर व स्टाप चि अत्यंत संख्या कमी असल्यामुळे पेशन्टचि तपासणी बरोबर होत नसुन पेशन्ट ला डाॅक्टर कडून सांगितला जाते ईथे बेड उपलब्ध नाही आक्सीजन चि कमतरता आहे असे सांगून पेशन्ट ला सेवाग्राम किंवा सावगी मेघे रूग्णालयात पाठवला जाते पन तिथे भरती घेत नसल्यामुळे पेशन्टला आपला जिव गमवावे लागत आहे .या सर्व परिस्थिती वर मात करायची असेल तर हिंगणघाट व वर्धा येथे मधे जब्मो.अत्याअधुनिक कोविड सेंटर उभारन्यात यावे . व दवाखान्यात ला स्टॉप वाढविण्यात यावा सरकार फक्त लाॅकडाॅऊन कडे कडे लक्ष देते पन पेशन्ट ला जा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहीजे त्या कडे मुळीच लक्ष देत नाही. त्या साठी आज आम्ही निवेदनातून मुख्यमंत्री यांना मागणी करतो .की लवकरात लवकर सोई उपलब्ध करून जन सामान्य नागरिकाच्या जिव वाचवा.निवेदन देताना.दिलिपभाऊ कहूरके. मनिषभाऊ कांबळे. राजेश खानकूरे. चारू आटे. जिवन उरकुडे. प्रा.मनोहर भगत. देवेंद्र त्रिपल्लीवार..महेन्द्र हाडे. नितीन मैदलकर. विशाल थु ल. प्रशांत शंभरकर. प्रदीप माणिकपुरे.किशोर लढे.प्रमोद कोसुरकर.संतोष सहारे. महेश लोहकरे. व्यंकटेश झाडे…इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते…

ऑक्सिजन बेडसह नांदुरा येथे नवीन कोविड सेंटर तातडीने सुरू करा-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

बुलढाणा जिल्हासह मलकापूर व नांदुरा तालुक्यात कोरोनाने
उग्र रुप धारण केले आहे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक उपाय योजना करणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी स्थानिक नांदुरा व मलकापूर प्रशासनाची बैठक घेऊन मलकापूर व नांदुरा तालुक्यातील रुग्णसंख्या,उपलब्ध बेड,
ऑक्सिजन सिलेंडर, औषधसाठा, कोविड लसीकरण,प्राप्त लसीचे योग्य नियोजन या बाबत आढावा घेतला.नांदुरा येथे ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर (डी.सी. एस.सी.) तात्काळ सुरू करावे,मलकापूर येथील कोविड सेंटर येथे २५ बेड वाढवावे,कोरोना टेस्टिंग वाढवाव्या, गावा-गावात शिबिरे आयोजित करून
लसीकरणाची गती वाढवावी,प्रशासना कडून रेमडिसिव्हर उपलब्ध करून घेण्या साठी पाठपुरावा करावा व लॉकडाऊन ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी अश्या सूचना केल्या.यावेळी नांदुरा येथील तहसीलदार श्री.राहुल तायडे, मलकापूर येथील तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे,नांदुरा येथील मुख्याधिकारी श्री. आशिष बोबडे,मलकापूर येथील मुख्याधिकारी श्री.रमेश ढगे,नांदुरा चे ठाणेदार श्री.नाईकनवरे,
मलकापूर व नांदुरा येथील गटविकास अधिकारी श्री.समाधान वाघ,श्री.मानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे,डॉ.अझर,डॉ.बेडे,नांदुरा येथील एकात्मिक बालविकास अधिकारी,नांदुरा पंचायत समितीचे श्री.सोयस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोनाचा कहर सुरूच ! ।अखेर बुलढाणा स्मशान भूमीत त्या कोरोना रुग्णांचा अंतिम संस्कार केला ! ‘

0

 

‘ रयतचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील,शिवसेना नगरसेवक मोहन पऱ्हाड,केमिस्ट संघटनेचे स्वप्नील तायडे आले मदतीला धावून ‘

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोना चा कहर वाढत आहे अशातच कोरोणा मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही परंतु याला रयत क्रांती संघटनेचे प्रशांत ढोरे पाटील अपवाद आहे ते नेहमीच मदत करत असतात दिनांक 17 एप्रिल रोजी रोजी बुलढाणा येथिल सिद्धिविनायक कोरोना हॉस्पिटलमध्ये कोरोना मुळे परप्रांतीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला असता सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून गेले,
मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या आलनुर या गावातील एक पन्नास वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असता सर्वात प्रथम त्या महिलेला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेड व रेमडीसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्या रुग्णाला मुक्ताईनगर येथील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले परंतु त्याही ठिकाणी बेड व इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी चिखली येथील डॉ सुहास तायडे व डॉ योगिता तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुलढाणा येथिल सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करून दिली, त्या ठिकाणी रुग्णाला लागणारे रेमडीसिव्हीर इंजेक्शन रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पुढाकाराने केमिस्ट संघटनेचे चिखली शहराध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी तात्काळ उपलब्ध करून दिले,परंतु दुर्दैवाने सदर महिला रुघ्न कोरोनामुळे दगावली असता कोरोना रुग्णाचे मृत शरीर नगरपालिका हद्दीच्या बाहेर नेता येत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील,बुलढाणा नगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक मोहन पऱ्हाड,चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी अंतिम संस्काराची तयारी करून स्वतः सरणं रचून त्या रुग्णांचा दफन विधी बुलढाणा येथील समशान भूमीत केला व सदर महिलेच्या मुलाला त्याच्या घरापर्यंत पोहचवून देण्याची व्यवस्था केली,व अजूनही माणुसकी माणसांमध्ये शिल्लक आहे याचा प्रत्यय आणून दिला ! असे कमी लोक मिळतात की जय दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जातात त्याचाच प्रत्यय प्रशांत ढोरे पाटील यांनी आणून दिला ते नेहमी लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी असतात !अशी वेळ कोणावर ही येऊ नये म्हणून विना कारण फिरू नका मास्क सॅनिटायझर चा वापर करा ताप सर्दी डोकेदुखी अंगावर काढू नका तात्काळ उपचार घ्या असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले,

जामोद येथील अल्पवयीन 17 वर्षीय मुलीवर तोंड दाबून बलात्कार आरोपीवर गुन्हा दाखल

0

गजानन सोनटक्के जळगाव जा

डोंगर वेस् जामोद येथील17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याची घटना 17 एप्रिल दुपारी तीन ते चार वाजता घडली याविषयी फिर्यादीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली की आरोपी क्र 1 श्रावण जावळे वय 17 वर्षे 8 महिने राहणार जामोद यांनी तिच्या मोबाईलवर फोन करून तिला टावर जवळ ये मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हटले फिर्यादी टावर जवळ गेली असता श्रावण जावळे याला विचारले की काय काम आहे श्रावण जावळे म्हणाला माझ्या मोटरसायकलवर चाल तुला काम सांगतो फिर्यादीला संगणमत करून आरोपी क्रमांक 2 उमेश नामदेव कोथळकर वय 21 राहणार जामोद यांच्या शेतातील झोपडी मध्ये नेले श्रावण जावळे ने वाईट उद्देशाने फिर्यादीचा हात धरून तिला जवळ ओढले तेव्हा फिर्यादीने आरडाओरडा केली श्रावण जावडे याने तिचे तोंड दाबून दोन वेळा संभोग केला तर उमेश कोथलकार याने खोपडी बाहेर रखवाली देऊन सहकार्य केले अशी तक्रार फिर्यादीने दिली फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशन नी आरोपीविरुद्ध 376(2)(j), 2013 चे 376 (2)(ड)354,46 पोकसो दाखल केलेला आहे पुढील तपास एपीआय सतीश आडे करीत आहेत.