Home Blog Page 484

विरावलीचे प्रगतशिल शेतकरी अशोक पाटील यांचे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

विरावली तालुका यावल येथील रहिवासी अशोक दौलत पाटील यांचे जळगाव येथे दवाखान्यात उपचार सुरु असतांना दु:खत निधन झाले.कै अशोक पाटील यांचा मुलगा श्रीकांत पाटील, (मुंबई महापालिका) विवेक पाटील, विकास पाटील सोबत सुना आणि नातवंडे असा परिवार आहे आणि तसेच कै. अशोक पाटील हे यशवंत पाटील माजी तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यावल तालुका यांचे मोठे बंधु होते . कै. अशोक पाटील यांचे मृत्य नंतर सध्या जगभरात सुरु असलेले कोविड 19 चे वातावरण झाल्याचे बघता डॉक्टर यांचे सल्यानुसार जास्त हट्टाहास न करता कोरोना काळात वारिल तिंघीही मुलानी आपले दुःख बाजूला सावरुन एक धाडसी निर्णय घेत कोणतेही नाते वाइक किंवा गावातिल मडळी याना न बोलवता कै. अशोक पाटील याना जळगांव येथे अंतिम संस्कार विधि पार पाडला आणि सोबत तिघे भाऊ यानि हे ही आवाहन केले आहे की सध्या परिस्थिति सामान्य होत नाही तो पर्यंत द्वार दर्शन येण टाळावे असे पाटील कुटुंबाकंडुन सांगण्यात आले आहे .

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर अप्पा सोनवणे यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

जिल्ह्याच्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांची निवड कैलास गोरे पाटील राष्ट्रीय सरचिटणीस यांनी पत्र पाठवून केली आहे . सदरचे निवड पत्र हे प्रभाकर अप्पा सोनवणे यांना प्राप्त झाले असल्याची माहीती अप्पा यांनी दिली .
याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, . रासरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे यांचेकडील नियुक्ती पत्रावर यांच्या स्वाक्षरी आहे .
जिल्हा परिषद सदस्य व खेडयापाडयातील व दुर्गम भागातील नागरीकांचे विकासात्मक दृष्टीकोण व ग्रामीण पातळीवर सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची आवश्यकता असुन त्याची जाणीव ठेवुन जिल्हापरिषद सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे .
शासनाकडुन येणाऱ्या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होवून कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकिय कामांत दैनंदीन येणाऱ्या अडीअडचणी व त्यांचे प्रश्न सोडविण्याच जिला परिषद संघटनेकडुन प्रश्न सोडविला जाणार असल्याची माहीती जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी दिली .

जिल्हा परिषद सदस्य असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावेर यावल आ.शिरीष चौधरी ( महाराष्ट्र प्रदेश कँग्रेस कमिटी ). उल्हास पाटील .( प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष ) संदीप भैय्या पाटील ( कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष जळगांव ) भगतसिंग पाटील (जिल्हा अध्यक्ष इंटक ), माजी आ . रमेशदादा चौधरी, हाजी शब्बीर खान ( जिल्हा उपाध्यक्ष कॉग्रेस ), वसंत रामजी महाजन (माजी प्रतोद कॉग्रेस ), जिल्हा परिषद सदस्य आर जी पाटील . सौ . सुरेखाताई पाटील, पं .स . चे माजी सभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी, बामणोद चे माजी सरपंच शिवराम किसन तायडे ., पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, पंस सदस्य -सरफराज तडवी, सौ . कालिमा तडवी, कृउबा माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, यावल न पा गटनेता सय्यद युनुस सय्यद युसुफ , फैजुर गट नेता नपा कलीम मन्यार, काँग्रेसचे यावल शहर अध्यक्ष कदीर खान, माजी सभापती उपसभापती उमाकांत रामराव पाटील फैजपुर शहर काँग्रेस अध्यक्ष रियाज भाई यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

चौकट- जळगाव जिल्हा परिषद चे एकुण ६७ सदस्य व जिल्ह्यात १३४पंचायत सदस्य असुन, असोसिएशन महाराष्ट्र जळगाव जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी माझ्यावर जी जबाबदारी संघटनेने सोपवली असून ती जबाबदारी पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेल सध्या जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आली असून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी खूप अडचणी येत आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून सर्वपक्षीय जि.प. सदस्यांना सोबत घेवुनआवाज उठून निश्चीत प्रयत्न करू आणि या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे नवी मुंबई आणि नवी मुंबई शिवसेना नगरसेवक संजूभाऊ वाडे यांच्यासह सर्वांचेच त्यांनी आभार व्यक्त केले आहे

मलकापूर पांग्रा येथे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी दाखवला खाक्या !ठाणेदार जितेंद्र अडोळे यांचा रुद्रावतार

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे दिनांक18 एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे शांत व संयमी परिचित असलेले ठाणेदार जितेंद्र आडोळे आज मात्र रुद्र अवतारात दिसून आला ‘ कोरोनाच्या य पार्श्वभूमीवर कोरोणाची संख्या झपाट्याने वाढत आहे लोकांना ऑक्सिजन व सिलेंडर सुद्धा मिळत नाही बेड सुद्धा उपलब्ध नाहीअशा परिस्थितीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना आज आज साखरखेरडा पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला त्यामुळे चोरून दुकाने उघडणार याची तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची चांगलीच पंचाईत झालीअगोदरच प्रशासन लोकांना सांगून सांगून थकले आहे. व नागरिक शासनाचे नियमांचे पालन न करणे ,मास्क न बांधता घोळक्याने जमा होणे, काम नसतानाही रस्त्यावर फिरणारे , गाडीवरती फिरणारे यांना आज मलकापूर पांग्रा येथे चांगलाच ठाणेदार साहेबांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.
जिल्ह्यामध्ये तसेच गाव पातळीवर कोरानाचे उद्रेक होत असताना वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासन ,पोलीस प्रशासन आव्हान करत आहेत सुरक्षित रहा घरी रहा तरीही पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन आव्हानाला न जुमानता पब्लिक काम नसतानाही घोळक्याने बस स्टैंड वर ती सर्वजनिक ठिकाणी थांबत आहे रोज सूचना देऊ नये अक्षरशः वैतागलेल्या प्रशासनाने आज दंडुका हातात घेऊन चांगलंच महाप्रसादाचे वितरण आज मलकापूर पांग्रा येथे केले तसेच जाणाऱ्या येणारे वाहतूक यांना चांगला दंड ठोठावला आहे .तसेच बंद असतानाही पान टपऱ्या व हॉटेल यांनाही चांगला धडा शिकवला आज मलकापूर पांग्रा येथे पूर्ण छावणीचे स्वरूप आले होते गावात एकच कल्लोळ होता बस स्टॅन्ड वरती काय घडतय पण आज खरं पोलीस प्रशासनाने त्यांचा खाक्या पहायला मिळाल.. यावेळी ठाणेदार जितेंद्र आडोळे व दुय्यम ठाणेदार श्री राणे व मलकापूर पांग्रा चे बीट जमादार नारायण गीते पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर पोलीस कॉन्स्टेबल श्री मापारी उपस्थित होते.

वाघोडा ग्रामपंचायतच्या सचिव मानकर यानी नियमबाह्य घेतलेला जागेचा फेरफार रद्द करुन संबंधित सचिवाला निलंबित करण्याची मागनी पत्रकाराने केली गटविकास अधिकाररि

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वाघोडा येथील तात्कालीन ग्रामसेवक श्री मानकर
यांनी सन २०१६/२०१७ मधे वाघोडा येथीलच लाभार्थी श्रीमती
सत्यभामा अशोकराव लोखंडे हिला रमाई आवासस योजने अंतर्गत लाभ देऊन वाघोडा ग्रामपंचायत हद्दीतील मालकी हक्काचे जागेवर अतिक्रमण करुन नियमबाह्य १००रुपयांचे स्टँम पेपरवर स्वतःच्या मुलांच्या नावाने हस्ते स्टँम पेपर घेऊन जागा मालकाला कुठलीच पुर्व सुचना न देता वाघोडा येथील रहिवासी महादेवराव बाळे वय वर्षे८४या मातार्या व्यक्ती ची रमाई
आवास योजनच्या लाभार्थी चाच मुलगा संदिप अशोकराव लोखंडे
व ग्रामपंचायत सचिव श्री मानकर
यांनी संगमत करून महादेवराव बाळे यांची मालकी हक्काचे खाली जागेची नियम बाह्य़ दस्तऐवज तयार करून वय रुध्द म्हातार्या ची जागा सत्यभामा अशोकराव लोखंडे यांच्या ताब्यात देऊन त्या जागेवर रमाई आवास योजनेचे घरकुल चा लाभ
घेऊन शासण निर्णय १९०८ चे कलम १७ चे ग्रामपंचायत सचिव श्री मानकर उल्लंघन केले असल्याचे दिसुन येत आहे श्री देशमुख विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्र्वर यानी महादेवराव बाळे यांच्या तक्रारी च्या अनुसंगाने केलेल्या चौकशीच्या आधारे व विस्तार अधिकारी यांच्या चौकशी अहवालाच्या आधार घेऊन संबंधित ग्रामपंचायत सचिव श्री मानकर यांना निलंबित करुन नियमबाह्य घेतलेला जागेचा फेरफार रध्द करून श्री महादेराव
बाळे यांची जागा त्याचे देण्याची
मागणीचे निवेदन मा.गटविकास अधिकारी खेळकर साहेब यांचे मागनी केली आहे निवेदन देतेवेळी सुनील भाऊ तायडे, उमेश चौखडे हजर होते.

यावल शहरातुन जाणाऱ्या बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील रस्ता दुरूस्तीचे काम अत्यंत निकृष्ठ प्रतिचे : प्रभाकर सोनवणे यांची तक्रार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार अनेक दिवसापासुन दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्याबाबत जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी कामाबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त करून ठेकेदारांच्या पंटरांना घेतले धारेवर धरल्याचा प्रकार समोर आला आहे . यावल शहरातुन जाणाऱ्या अंकलेश्वर ते बुऱ्हाणपुर या राज्य मार्गावरील यावल बस स्टॅन्ड परिसरापासुन वन विभाग कार्यालयापर्यंतचा रस्ता हा ठीकाणी मोठमोठे खड्डे पडुन अत्यंत खराब झाला होता , प्रसंगी या मार्गावर अनेक अपघात देखील घडले असुन , या मार्गावरील खराब झालेल्या रसत्याबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या म्हणुन या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील पत्रव्यवहार केला होता . सदरचे काम हे भुसावळ येथील एका नाम बडे दर्शन खोटे ठेकेदारास देण्यात आले असुन , सदर ठेकेदार हा शासनाच्या निविदा मधील अटीशर्तीच्या अधीन राहुन काम करीत नसल्याने जिल्हा परिषद गटनेते व कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी आज सकाळच्या सुमारास या मार्गाचे काम सुरू असतांना कामास भेट देवुन संबंधीत ठेकेदाराची माणस हे रस्त्यावर डांबर न टाकता खडीचा सर्रास वापर करून अत्यंत निकृष्ठ प्रतिचे काम करण्यात येत असल्याची बाब त्यांच्या निर्दशनास आल्याने त्यांनी ठेकेदारांची माणस आणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांना चांगलेच धारेवर धरले व कामाची गुणवता सुधारण्याचे निर्देश दिलेत, सदरचे काम हे ठेकेदाराच्या वतीने बिओटी तत्वावर सुरू करण्यात आले असुन , या रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी ही पाठपुरावा करून कामास तात्काळ करण्यास सांगीतले होते . यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी सांगीतले की आपण या कामाच्या गुणवंत्तेबाबत वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे सांगीतले या प्रसंगी त्यांच्या सोबत इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान , काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह व आदी कार्यकर्ते होते .

दहिगाववचे सरपंच उपसरपंच ॲक्शन मोडवर गावात ठिकठिकाणी होतेय नागरिकांची कोरोना चाचणी

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव येथे अत्यंत घातक व वेगाने प्रसार होणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण राज्यात १५ते ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.संचार बंदी चे नियम मोडून बेशिस्त व बिना मास्क फिरणाऱ्यांवर आज दहिगाव गावातील येथील मुख्य चौकात सरपंच अजय अडकमोल व उपसरपंच किशोर महाजन यांनी पोलिसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई करत ५२ नागरिकांची कोरोना एंटीजन रॅपिडची तपासणी करण्यात आली.
यामुळे कोणतेही कारण नसता गावात बेशिस्त विनाकारण व विना मास्क फिरणाऱ्याच्या गोटात खळबळ उडाली असून मोठा वचक बसणार आहे.
दहिगाव चे जबाबदार व कर्तव्याची जाणीव सरपंच अजय अडकमोल व उपसरपंच किशोर महाजन यांनी हे नियोजन करून या अगोदर गावातील पाटील वाडा येथे तपासणी कॅम्प लावून ४२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात एक ज्येष्ठ नागरिक पॉझिटिव्ह मिळून आले होते.
आज घेण्यात आलेल्या ५२ कोरोना रॅपिड एंटीजन चाचणीत सर्व अहवाल निगेटिव्ह मिळून आले ही समाधानाची बाब आहे.कोरोना एंटीजन चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक एल. जी. तडवी , राजेंद्र बारी यांच्या पथकाने केली.
ह्या कामी गावातील आशा सेविका नीता महाजन, भाग्यश्री महाजन ,पुष्पा पाटील व संध्या बाविस्कर , तसेच ग्रामपंचायतचे रवींद्र पाटील , विजयकुमार पाटील ,रितेश महाजन , नितीन जैन व सुधाकर पाटील आदींचे सहकार्य लाभले.

अपंगाचे मानधन तत्काळ जमा करा- शेख अनिस पत्रकार अपंग जनता दल सामाजिक संघटना ची राज्य सरकार ला मागणी

0

 

हंसराज उके अमरावती

अमरावती :- राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर करण्यापुर्वी महाराष्ट्रतील अपंगाचा विचार केला नाही फक्त घोषणा केले की दोन महिना चा मानधन एकच वेळा मिडेल पण कधी मिडेल लोकडाऊन सुरु झाला आहे पहिलेच तर मानधन वेळेवर मिळत नाही . आणि चक्क लॉकडाऊन जाहीर केला . आम्ही प्रशासनाचे नियम पाळत असून कोणत्याही दिव्यांग व्यक्तींने व त्याच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार ही केली नाही . अपंग व्यक्तींनी लॉक डाऊनमध्ये उपचारसाठी धडपडतान कोणीही पाहिले असेल किंवा नसेल . त्यात मतिमंद , व्योवृद्व , गतिमंद ८० टक्के पेक्षा जास्त अपंग बांधवाच्या कुंटूबाची खुप बिकट परिस्थितीतून जात आहेत . आपलं सरकार अपंग व्यक्तिला तुटपुजी एक हजार रुपये अनुदान देते . पण तेही वेळेवर देत नाही . अपंग बांधवांनचा औषधांचा प्रश्न आहे . व्यक्तींना अंत्योदय आण्ण योजना काढली . ती फक्त कागदावरच राहिली आहे . कोणत्याही अपंग बांधवला कोरोना काळात , तरी सरकारने मदत करावी . महाराष्ट्र राज्य सरकारचे नियम आदेश आम्ही पाळतो . पण महाराष्ट्र राज्यातील २८७ आमदार आणि ४८ खासदार यांच्या लॉकडाऊन काळातील पेन्शन पगार बंद करून अपंग व्यक्तीना पाच हजार अनुदान द्यावे . या लॉकडाऊन काळात आमदार , खासदार यांना पगारीची काय गरज . त्यानी सर्व सामान्या व्यक्ती प्रमाणे अपंग व्यक्तीला मदत करावी अशी मागणी अपंग जनता दल सामाजिक संघटना चे अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांनी राज्य सरकार ला केले आहे .

वट वृक्षारोपण करून केले अस्थिविसर्जन .. नागरे कुटुंबाचे सर्व स्तरातून होता आहे कौतुक..

0

 

सिंदखेडराजा:- ( सचिन खंडारे )

भारतीय परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रेताच्या दहनानंतर ची रक्षा ही पवित्र धार्मिक स्थळे,पवित्र नदी, तलाव किंवा जलाशयात विसर्जित केल्या जाते.त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन विविध प्रकारच्या जलचरांचे जगणे कठीण होऊन जाते.पाण्याचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जानत देऊळगावराजा नगरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ नागरे यांच्या सुविद्य पत्नी तथा ख्यातनाम डॉक्टर संदीप नागरे,शिक्षक राजेश नागरे, व्यावसायिक जयदीप नागरे यांची आई स्वर्गीय दुर्गाबाई नागरे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने 14 एप्रिल रोजी निधन झाले होते.आज रक्षा विसर्जन पार पडले.परंपरेनुसार रक्षा ही नदी पात्रात विसर्जित न करता त्यांनी देऊळगावराजा शहर व परिसरात 63 वटवृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करत आज 3 वटवृक्षांचे रोपण केले.अस्थि विसर्जन नदीपात्रात किंवा इतर कोणत्याच प्रकारच्या जलाशयात न करता वृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्यात रक्षा विसर्जित करून त्यात वृक्षारोपण केले व दहावे व तेरवी चा कार्यक्रम अगदी थोडक्यात कौटुंबिक स्वरूपात करून येत्या काळात आईच्या स्मृतीप्रित्यर्थ पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रावर सन्मानजनक निधी खर्च करण्याचा मनोदय श्री.नानाभाऊ नागरे,डॉक्टर संदिप नागरे तथा नागरे कुटुंबियांनी केला.
जल प्रदूषण टाळत मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून धरती बचाओ परिवाराच्या माध्यमातून सातत्याने केल्या जाणाऱ्या आवाहनाला समाज चांगला प्रतिसाद देत असून अशा प्रकारचे कार्य ही परंपरा झाली पाहिजे असे विचार सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री.रमेशदादा कायंदे यांनी व्यक्त केले तर शिवसेना नेते डॉक्टर रामप्रसाद शेळके,ख्यातनाम डॉक्टर रामदास शिंदे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री.देवानंद कायंदे,भाजपा चे जेष्ठ नेते डॉ.गणेश मांटे, देऊळगावराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष श्री.संतोष खांडेभराड,सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रकाश गीते,माजी नगरसेवक श्री.गणेशराव बुरकुल,सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव जायभाये,महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे श्री.विजूभाऊ इंगळे,सिनगाव जहांगीर चे पोस्ट मास्टर श्री. गणेशराव डोईफोडे,ह.भ.प. रामराव महाराज डोईफोडे आदींनी वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी केलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही चळवळ लोकचळवळ करण्यामध्ये आम्ही सर्व तन-मन -धनाने सोबत असल्याचे सांगितले.
नागरे कुटुंब तथा धरती बचाओ परिवार यांच्या संयुक्त सहभागातून समाजासमोर ठेवलेला आदर्श सर्व समाजासाठी दिशादर्शक ठरेल व यातूनच पर्यावरण संवर्धन चळवळ ही लोकचळवळ होईल असा आशावाद वनश्री.जनाबापू मेहेत्रे यांनी व्यक्त केला.
मरावे परी वृक्ष रुपी उरावे या उक्तीला साजेसं कार्य केल्यामुळे आज सर्वदूर सर्व समाजात नागरे कुटुंबाच्या या स्तुत्य उपक्रमाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती.हे विशेष.

कोविड रुग्णांना मदत ! सर्वपक्षीय नेते पदाधिकारी, उद्योजक व सामाजिक संस्था यांना विनंती अतुल वांदिले मनसे जिल्हाध्यक्ष वर्धा

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरामध्ये कोरोना महामारीची परिस्थिती हाताबाहेर गेली असून रूग्णाची स्थिती अतिशय गंभीर आहे जिल्हातील वर्धा जिल्हा रूग्णालय ,सावंगी,सेवाग्राम इथे रूग्णाना बेड मिळत नाही नागपूर,यवतमाळ,अमरावती मधील परिस्थिती सुध्दा अशीच आहे .
अशा संकटकालीन स्थिती मध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन हिंगणघाटतील कोविड रुग्णांना हिंगणघामध्ये बेड उपलब्ध करून दिल्यास त्यांना इथेच उपचार मिळेल त्यांची हयगय हाेणार नाही त्यासाठी त्यांना मदतीचे काम अतिशय गरजेचे आहे करिता ह्या निवेदनाद्वारे मी सर्व पक्षीय राजकीय नेते,पदाधिकारी उदयोजक ,व सामाजिक संस्थाना विनंती करतो की ,सर्वानी एकत्र मिटींगचे आयोजन करून मदतीचे कार्य सुरु करण्यासंबंधी नियोजन करून व सर्व कोविड रूग्णांना मदत करावी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घरोघरी जाऊन केले बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे वाटप – संग्रामपूर मित्र परिवार

0

 

दि.14 एप्रिल 2021 रोजी संग्रामपूर शहरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संग्रामपूर मित्र परिवाराचे अध्यक्ष जनसेवक मा.शंकरभाऊ पुरोहित यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे बौध्द समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.सर्वप्रथम संग्रामपूर येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित महिला वर्गाच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे हारार्पण करून पूजन करण्यात आले.त्यांनतर संग्रामपूर मित्र परिवाराचे अध्यक्ष जनसेवक मा.शंकरभाऊ पुरोहित,प्रवक्ते हमीद पाशा, रवी पहुरकर आणि राहूल शिरसोले यांनी आपले विचार मांडून डॉ.बाबासाहेब यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.त्यावेळी शंकरभाऊ पुरोहित म्हणाले पुढच्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीला संग्रामपूर शहरामध्ये दिवाळी साजरी झालीच पाहिजे आणि त्यांचे विचार आत्मसात आणणे गरजेचे झाले आहे असे संबोधित केले.त्यावेळी संग्रामपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक,संग्रामपूर मित्र परिवाराचे सदस्य आणि समस्त बौध्द समाज बांधव उपस्थित होते.त्यांनतर सामूहिक मानवंदना करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.