Home Blog Page 485

बारी समजाचे आराध्य दैवत असलेले संत रुपलाल महाराज यांची आज पुण्यतिथी त्यांच्या जीवनचरित्रातील प्रकाशझोत

0

 

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

महाराष्ट्रामधील विदर्भ अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी नगरीचे कर्मयोगी संत रुपलाल महाराज यांच्या वास्तव्याने पावन झा ग्गवलेली ही पुण्यभूमी आहे. अंजनगाव नगरीला धार्मिक जगतामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले कारण येथे भव्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि समाधिस्थ झालेले वैराग्यमूर्ती श्री संत रुपलाल महाराज.
श्री संत रुपलाल महाराजांचा जन्म जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या रुपलाल महाराज यांच्या आईचे नाव कासाबाई आणि वडीलांचे नाव शामजी होते संत रुपलाल महाराज पानमळा लावायचे व त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. प्रामाणिक व बालपणापासूनच धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असलेले संत रुपलाल महाराज गाडगेबाबांचे कार्य व महती जाणून होते, त्या काळी संत गाडगेबाबांचे कीर्तन गावोगावी होत असत असे एकदा गाडगेबाबांचे कीर्तन त्या परिसरात झाले,कीर्तनानंतर संत गाडगेबाबा संत रुपलाल महाराजांच्या पानमळ्यात पोहचले बराच काळ संत गाडगे बाबा आणि रुपलाल महाराज यांच्यामध्ये संवाद झाला.भक्ती, ज्ञान ,वैराग्य रुपी उपदेश गाडगे बाबा यांच्याकडून रुपलाल महाराज यांनी घेतला. हाच काळ त्यांच्या जीवनाची दिशा बदलविणारा ठरला.श्री संत रुपलाल महाराज कर्म हेच मर्म याची जाणीव करुन देणारे संत शिरोमणी श्री संत रुपलाल आजही समाजाला आपल्या कामकाजातून परमार्थ साधता येऊ शकतो, आपल्या कार्यावर निष्ठा, जिद्द ठेवली तर अशक्य गोष्टही शक्य होवू शकते याची अनुभूती देणारे संत म्हणजे श्री संत रुपलाल महाराज. आपल्या कर्तव्यापासून न ढळता एकाग्रताने त्यांनी साक्षात भगवंताला आपलेसे केले, संत गाडगे बाबांच्या या भेटीनंतर संत रुपलाल महाराज यांनी प्रपंचाचा आणि घरादाराचा त्याग करुन वैराग्य पत्कारले त्यानंतर पंढरपूरला निघून गेले, तेथून १२वर्ष त्यांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या केली परत आल्यानंतर मडक्याची खंजेरी,टाळ आणि भोपळ्याचा विना वाजवत संत तुकारामाच्या अभंगाचे गायन करण्यात तल्लीन होऊन जायचे. अध्यात्म आणि भक्तीमार्गाची गोडी लागलेले संत रुपलाल महाराज यांचा प्रारंभीच्या बराचसा काळ चारीधाम भ्रमण, ध्यानधारणा व तपश्चर्या करण्यात गेला तपश्चर्येनंतर आपल्या पहूर या गावात सप्ताह साठी पोहोचल्यानंतर दिवसभर ते गावाची स्वच्छता करायचे आणि रात्री कीर्तन करून ते लोकांना उपदेश करायचे भ्रमण करताना ते पुढे महाराष्ट्रातील खान्देश- विदर्भातील अशा अनेक गावांमध्ये त्यांचे वास्तव्य होते.संत रुपलाल महाराज यांनी समाजात सामुहीक विवाह सोहळा सुरु करून त्याची सुरुवात जळगाव जामोद येथून केली.संत रुपलाल महाराज १९७१ साली अंजनगाव व आकोट या परिसरात आले पुढे अंजनगाव सुर्जी येथे पोहोचले. सकाळपासून हाती खराटा घेऊन ते गाव स्वच्छ करायचे व लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगायचे ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे.त्यांनी भुकेलेल्यांना जेवण दिले, तहानलेल्यांना पाणी दिले,
गरिबांना वस्त्र दिले, शिक्षण दिले, बेघरांना आसरा दिला,हिम्मत दिली,
एक नवा समाज घडविण्यासाठी त्यांनी लोकांना आत्मबळ दिले.
अंगावर भगवे कपडे आणि हातात एक खराटा असा त्यांचा वेष असे ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत, समाजातील भेदाभेद नाहीसे करण्यासाठी महाराजांनी हयातभर भजन- कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. “मानवता” हाच आपला सर्वात मोठा धर्म आहे येथे गावागावात जाऊन ते आपल्या भजनातून म्हणत
कुठे काही काम करावयाचे असले की संत रुपलाल महाराज स्वतःहून पुढे येत सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला त्यांनी लोकसवेचे व्रत सोडले नाही कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे . त्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती,अनिष्ट रूढी दूर करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले यासाठी सप्ताह, भजन कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने उपयोग करत असत.व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची बळी देऊ नका ,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे उपदेश करीत असत आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने उपयोग करत असत संत रुपलाल महाराज म्हणजे मूर्तिमंत कडकडीत वैराग्य! जनसेवेसाठी सर्वार्थाने झोकून दिलेले आयुष्य, समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अहोरात्र कळवळणारी वृत्ती,हातात एक झाडू,झाडू नसेल तर काठी.झाडू घेऊन कुठेही कचरा दिसला की तो स्वतः दूर करवायचा हा महाराजांचा नियम. अध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे कर्मयोगी संत रुपलाल महाराज सत्पुरुष!
संत रुपलाल महाराज यांच्या कार्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती त्यांच्या दर्शनाला व त्यांचा उपदेश ऐकायला असं की लोक यायचे संत रुपलाल महाराज यांनी संकल्प करून अंजनगाव सुर्जी मधील गावकरी मंडळींना घेऊन त्यांनी भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारले येथे गावकरी मंडळी ला घेऊन एका रात्रीमध्ये विहिर बांधण्यात आली या विहिरीला अष्टमासिद्धी चे महात्म्य प्राप्त झाले या विहिरी मधील पाण्याने स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे भक्त मंडळींना इथून पुढे संत रुपलाल महाराजांनी क्षेत्र अंजनगाव सुर्जी ते श्री क्षेत्र पंढरपूर वारी सुरू केली
संत रुपलाल महाराज या थोर कर्मयोगी संत सत्पुरुषांनेश्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी येथे चैत्र शुद्ध पंचमी शके १९१६ म्हणजेच १६ एप्रिल १९९४ रोजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला, अंजनगाव सुर्जी येथे भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मध्ये असलेले समाधीस्थळ आजही त्यांच्याh श्रेष्ठत्वाची महती जागवीत आहे
श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी नगरीचे आराध्य ग्रामदैवत श्री संत रुपलाल महाराज यांच्या चैत्र शुद्ध पंचमीस असलेल्या पुण्यतीथी सोहळ्याचे औचित्य साधून त्यास लेखरूपाने अशा महान संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन!

उरळ पोलिसांनी विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला.

0

 

अकोला :- जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या पूर्णानदी पात्रातून विनापरवाना वाळूची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करीत असल्याची माहिती उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकर यांना मिळाली त्या आधारे उरळ पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकर,पोलीस उपनिरीक्षक राजेन्र्द मोरे चालक कांताराम तांबडे,यांनी ट्रॅक्टर.एम.एच.२८ ए.जे. २६४४ क्रमांकाचा ग्राम हातरुण परिसरात कारवाईचा सापडा रचत विनापरवाना वाळूची वाहतूक करीत असताना सदर ट्रॅक्टर पकडला असता त्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास विनापरवाना वाळू आढळून आली. सदर ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन त्याचेजळून एक ब्रास वाळूसह 5 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.आरोपी ज्ञानेश्वर श्रीधर रोहणकार रा. बोरगांव वैराळे याचे विरुद्ध भादंवीचे कलम ३७९ नुसार रेतीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाईमूळे परिसरात विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एसटी वाहक कर्मचारी महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला . . गळा चिरून हत्या केल्याचा संशय . अंत्री खेडेकर परिसरात खळबळ .

0


सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी )

– सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक जात असलेल्या व्यक्तींना दिनांक सोळा एप्रिल च्या सकाळी सकाळी अंत्री खेडेकर गावालगत काही हाकेच्या अंतरावर रोडला लागून नाल्यात एक रक्ताने माखलेला तरुणीचा मृतदेह आढळून आला . पोलिसांनी पंचनामा केला असता तरुणीचा मृतदेह हा गळा चिरलेला, हातापायावर चाकूचे वार, अंगावर चटके दिल्याचे निशाण मृतदेहावर दिसत असल्याने हा खून असल्याचे स्‍पष्ट होत आहे. त्यामूळे अंत्री खेडेकर परीसरात खळबळ उडाली आहे .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर येथील रहिवाशी असलेले भिमराव रामा मोरे यांची २५ वर्षाची बुलडाणा आगाराची मुलगी माधुरी भिमराव मोरे ही गेल्या सहा ते सात वर्षा पासून एसटी महामंडळ विभागात वाहक पदावर कार्यरत होती. सुरवातीला ती जाफ्राबाद विभागाला होती आणि नुकतीच काही महिन्यापर्वी बुलढाणा एसटी आगार विभागात बदली झाली होती. सध्या ती साखळी येथे मावशी कडे राहत असे .परवा तिचे वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्‍यानुसार साखळी (ता. बुलडाणा) येथे मावशीच्‍या घरी त्‍या मुक्‍कामी होत्या. काल ड्युटी करून आज त्‍यांची आठवडी सुटी असल्याने अंत्री खेडेकरला घरी परतणार होत्‍या. मात्र थेट मृतदेहच भल्‍या पहाटे अंत्री खेडेकरच्‍या शिवारात आढळला. मृतदेह संशयास्‍पद अवस्‍थेत असल्याने खून झाल्‍याचे दिसून येत आहे. भल्‍या पहाटे फिरायला बाहेर पडलेल्या ग्रामस्‍थांना मृतदेह दिसल्यानंतर त्‍यांनी गावात ही माहिती दिली. त्‍यानंतर पोलीस पाटलांनी अंढेरा पोलिसांना ही माहिती दिली. तातडीने ठाणेदार राजवंत आठवले यांनी पथकासह घटनास्‍थळी धाव घेतली. खून असल्याने बुलडाण्यावरून श्वानपथक व ठसेतज्‍ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पंचनामा आणि खुन्‍याचा माग काढला जात आहे. दरम्‍यान, सूत्रांच्‍या माहितीनुसार, माधुरी यांचा ५ वर्षांपूर्वी घटस्‍फोट झाला होता. यापूर्वी त्‍या जाफ्राबाद आगारात कार्यरत होत्‍या. तिथे असताना एक एसटी वाहक त्‍यांची नेहमी छेड काढायचा. त्‍याच्‍या त्रासाला कंटाळून त्‍यांनी बुलडाणा आगारात बदली करून घेतली होती, असे तिच्‍या वडिलांनी सांगितले. पोलीस या दृष्टीनेही तपास करणार आहेत. खुनापूर्वी त्‍यांच्‍यावर बलात्‍कार झाल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्‍याच्‍या अहवालानंतर ही बाब स्‍पष्ट होणार आहे.आणि घटनास्थळी ठाणेदार राजवंत आढवले , समाधान झिने , बिट अमलदार पोफळे ,मुन्ना राठोड , हजर होते ‘आता मुख्य आरोपीला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान असेल ‘

नांदुरा-मोताळा रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करा-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

नांदुरा मोताळा रस्त्याची सुधारणा करण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने या रस्त्यावरून येणे-जाणे, प्रवास करणाऱ्या नागरिकांची,शेतकऱ्याची प्रचंड गैरसोय होत आहे तसेच वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होत आहे. या अनुषंगाने मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.यंत्रणेच्या अडचणी देखील समजून घेतल्या.नांदुरा-मोताळा रस्ता सुधारणा करण्याचे काम जलदगतीने पूर्ण करा,रस्त्याचे काम दर्जेदार असावे अश्या सूचना केल्या.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोल्याचे अधीक्षक अभियंता श्री.गिरीष जोशी, सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावचे कार्यकारी अभियंता श्री.चंद्रशेखर
शिखरे, उपकार्यकारी अभियंता श्री.सचिन तायडे, संबंधित रस्त्याचे कंत्राटदार पलसिध्दी कन्स्ट्रक्शन श्री.अर्जुन काटे, श्री.राजेश काटे, सुधीर कन्स्ट्रक्शन नागपूरचे श्री.डोईफोडे
प्रामुख्याने उपस्थित होते.

यावल तालुक्यातील १४ हजारच्यावर विधवा , निराधार व अपंग नागरिकांना मिळणार प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या वेगाने वाढत्या प्रादुर्भावचा टाळण्यासाठी १५ते ३० एप्रील पर्यंत राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरीकांनी आपल्या घरातच रहावे सुरक्षीत रहावे या दृष्टीकोणातुन संचारबंदी लावण्यात आली असुन , दरम्यान या पन्द्रादिवसाच्या कालावधीत अपंग , निराधार नागरीकांना आपली उपजिवीका भागविण्यासाठी आर्थीक अडचणींना सामोरे जावु नये या करीता राज्यातील महा विकास आघाडी शासनाने तालुक्यातील संजय निराधार योजनेचे ३९०४लाभार्थी , वृद्धपकाळ योजनेचे ५ हजार२८५ लाभार्थी , श्रावणबाळ वृद्धपकाळ योजनेचे ४ हजार३३७लाभार्थी , इंदीरा गांधी निराधार योजनेचे १३६६ लाभार्थी व इंदीरा गांधी अपंग योजनेचे ७१लाभार्थी असे एकुण १४ हजार९०६ लाभार्थ्यांना सुमारे दोन कोटी ५० लाख रुपये हे येत्या आठ दिवसाच्या आत प्रत्यकाच्या बॅंकेतील खात्यात दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला असुन , शासनाच्या वतीने या संकटकाळातील मिळणाऱ्या मदतीचे निराधार व अपंग, विधवा महिला व नागरीकांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे . अशी माहीती नायब तहसीलदार आर .डी . पाटील व संजय गांधी निराधार योजना विभाग कार्यालयाचे प्रफ्फुल कांबळे यांनी दिली आहे .

जळगांव जा.शहरात कचऱ्याचे वाढते साम्राज्य नगर परिषद कंत्राटदार कचरा उचलण्यास असमर्थ…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्थानिक जळगांव जामोद नगर परिषद कंत्राटदारांकडून होत असलेल्या हलगर्जीपणा मुळे शहरवासीयांना नगर परिषदे कडून होत असलेल्या दुर्लक्षित पणाला सामोरे जावे लागत आहे.
जळगाव जामोद नगर परिषदे मार्फत उचलला जाणारा घनकचरा हा वेळेवर उचलला जात नाही कचरा 4 ते 5 दिवस विलंबाने उचलला जात आहे गल्ली बोळात जाणारे छोटे वाहन कार्यरत नाही शहरातील नाल्या सफाई योग्य वेळी साफ केली जात नाहीत. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे शहरामध्ये सफाई वेळेवर केली जात नाही वरील प्रमाणे सफाई मध्ये निष्काळजी दिसून येत असून कंत्राटदार जास्तीत जास्त नफा कसा राहील या उद्ध्येशाने काम करीत आहे. परिणामी जळगांव शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे तसेच कंत्राटदरांचा निष्काळजीपणा हा कोविड 19 साठी पोषक होत आहे.
कोविड महामारी फार वाढत आहे
ओला व सुका कचरा गोळा करणे आवश्यक असतांना अश्या कोणत्याही प्रकारची बाब सदर कंत्राटदार याच्याकडून होतांना दिसत नाही मात्र त्या सदरखाली अनावश्यक बिल मात्र काढल्या जात आहे., covid 19 चा प्रादुर्भाव असतांना सुध्दा सदर घंटा गाडीवर जे मजूर काम करतात त्याना कोणत्याही प्रकारची साहित्य जसे की हँड वॉश, हात मोचे, सॅनिटायझर, मास्क इ दिले जात नाही त्यामुळे सदर मजूर हे तोंडावर मास्क न वापरता घरोघरी जाऊन रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते त्यामुळे सदर मजूर व नागरिक यांच्या जीवितास धोका संभवतो , तसेच सदर घनकचऱ्या बाबत अधिकाऱ्याकडून ही योग्य कारवाही होत नसल्याने
स्मार्ट सिटी चे काम सर्वत्र घाण असे म्हणावयास चुकीचे होणार नाही कारण कचरा व सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. परिणामी कंत्रादार व स्मार्ट सिटी चे संबधीत अधिकारी यांनी सुरू असलेल्या अस्वच्छते कडे पाठ फिरवली आहे.याकडे संबंधित अधिकारी व कत्राटदार लक्ष देतील का अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

यावल शहरात व तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर १५ एप्रील पासुन लावण्यात आलेल्या संचारबंदीस संमिश्र प्रतिसाद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

संपुर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा अत्यंत वेगाने होणाऱ्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने नागरीकांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीकोणातुन दिनांक १५एप्रील पासुन ते३० एप्रील पर्यंत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू केली असुन या संचारबंदीला मात्र यावल शहरात व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले . दरम्यान यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत गरज नसतांना फिरणाऱ्या रिकामटेकळ्यांची मोठी गर्दी आज सकाळ पासुन दिसुन येत होती , दरम्यान लॉकडाऊन मध्ये कोणती दुकाने व व्यवसाय बंद ठेव्याची आहे व कोणती नाही या संभ्रम अवस्थेत आज शहरातील अनेक अनावश्यक व्यवसायींकानी ही आपली दुकाने सुरू ठेवल्याचे चित्र दिसुन आले यामुळे संचारबंदी आहे असे कुठही दिसत नव्हते, दरम्यान पोलीस निरिक्षक सुधीर पाटील व पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी शहरात विविध ठीकाणी ग्रस्त घालुन संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही करीत ३० जणांकडुन सुमारे ७६०० दंड वसुल ही केला असुन , सुमारे ५४ अनावश्यक फिरणाऱ्या नागरीकांची आरोग्य पथकाच्या यावल ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ नानासाहेब घोडके व त्यांच्या आरोग्य सेवकांच्या माध्यमातुन अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली आहे .मात्र तरी देखील नागरीकांची वर्दळ ही बाजारातुन कमी होतांना दिसुन आली नाही . दुपारच्या सत्रात विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी शहरात गस्त घालुन परिस्थितीचा आढावा घेतला . संचारबंदी ही कशा प्रकारची आहे ही बाब अद्याप ही काहींच्या लक्षात येत नसल्याने हा सर्वाघोळ निर्माण झाला असुन, महसुल प्रशासन ,नगर परिषद , आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या कुठतरी समन्वयाचा आभाव असल्याने संचारबंदीवर याचा मोठा परिणाम दिसुन येत असल्याचे जाणकारांचे मत असुन, येणारे काळ हे नागरीकांचे आरोग्य व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा अत्यंत धोका असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे

डॉक्टरावर होणारे हल्ले ! सुरक्षा व उपाय संबंधी विदर्भ विकास आघाडी कडून निवेदन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.16
मंगळवार दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता एक कुटुंब डॉक्टर निर्मेश कोठारी यांच्या दवाखान्यात आले असता त्यांच्या मुलाने डॉक्टर कोठारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली सदर मुलाचे वडील मरण पावले त्याचे दुःख त्याला झाले हे स्वाभाविकच आहे. परंतु याचा राग सदर डॉक्टर वर काढून त्यांना मारहाण करणे हे अयोग्य व माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा घटना जर शहरांमध्ये होत राहिल्या तर व वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जर संपावर गेले तर याचा सर्वात जास्त परिणाम सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर होईल. सध्याचा काळ हा कोरोना महामारी चा आहे अशा नाजूक परिस्थिती मध्ये जर डॉक्टरांवर हल्ले होत गेले तर शहराची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती फारच गंभीर आहे म्हणून या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे व दोषी असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच परंतु सोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा देणे हे सुद्धा गरजेचे आहे. डॉक्टरांची सुरक्षा जर आपण करू शकलात तरच या शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहील अशा प्रकारचे निवेदन विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अनिल जवादे यांनी माननीय श्री उपविभागीय अधिकारी साहेब हिंगणघाट यांना ई-मेल पाठवून केले तर ठाणेदार साहेब हिंगणघाट यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन सादर केले ठाणेदार साहेबांनी यावर योग्य तोडगा काढून एक पथक तयार करून सर्व डॉक्टरांना तो नंबर वितरित करतो व शहराची सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन श्री अनिल जवादे यांना दिले. यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत विदर्भ विकास आघाडीचे महेश माकडे, दिनेश वाघ राजेश कुरेकार, जयंत धोटे, अजय मुळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

परसाडे प्रेमी युगुलांची आत्महत्या की खुन करुन फासावर लटकवले मयत तरूणाच्या वडीलांनी व्यक्त केला संशय , प्रसंगी खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील परसाडे गावाच्या शिवारात प्रेमसंबधातुन आत्महत्या केलेल्या घटने बाबत मयत तरूण शाहरूख तडवी व मिना तडवी दोघांनी आत्महत्या की त्यांचा खुन करण्यात आले या विषयाला घेवुन तरूणाच्या कुटुंबांनी पोलीसांची भेट घेवुन या आत्महत्या बाबत संशय व्यक्त केले असुन , प्रसंगी याबाबत अज्ञात लोकांविरूद्ध दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल होण्याचे संकेत मिळाले आहे . दरम्यान या संदर्भातील मयत शाहरूखचे वडील बाबु तडवी यांनी दिलेली माहीती अशी की , हरिपुरा तालुका यावल राहणारा शाहरुख बाबु तडवी वय१९ वर्ष आणी मिना शावखा तडवी वय२२ वर्ष राहणार परसाडे तालुका यावल या दोघांनी मिळुन आपल्या प्रेमसंबंधास कुटुंबाकडुन मिळणाऱ्या नकारास कंटाळुन अखेर त्यांनी १३ एप्रील रोजी दुपारच्या ३ , ४० वाजेच्या पुर्वी परसाडे गाव शिवारातील खडकाई नदीच्या पायथ्याशी असलेले पुष्पा गडे यांच्या शेतात निंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आपली जिवनयात्रा संपवली होती . यात विशेष म्हणजे घटनेतील तरूण शाहरुख तडवी याचा दिनांक १३ एप्रील रोजीच चिनावल तालुका रावेर येथील समाजातील एका ठिकाणी स्थळ जुळल्याने साखरपुड्याचा कार्यक्रम होता .आत्महत्या करण्याच्या काही तास आदी त्यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये जावुन पोलीसांची भेट घेवुन आपण एकमेकांवर प्रेम करीत असल्याची माहीती त्यांनी दिली असल्याचे वृत्त आहे .पोलीसांना भेटुन घेल्यानंतर काही तासातच असे काय घडले की त्यांनी एक दुजे के लिए आत्महत्या करण्याचा मार्ग पत्कारावा लागला , आत्महत्या केलेल्या तरूणाच्या पायावर व शरीरावर काही ठीकाणी जख्मेचे निशान असुन , मयत शाहरूख तडवीच्या कुटुंबांनी त्यांचे वडील बाबु हयाती तडवी वय ६० वर्ष राहणार हरिपुरा तालुका यावल या आत्महत्याच्या सर्व घडलेल्या घटनावर संशयव्यक्त व्यक्त केले असुन , आपण त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट बघत असल्याचे शाहरूखचे वडील यांनी सांगीतले असुन येत्या काही तासातच या सर्व घटनेच्या मागची सत्य परिस्थिती समोर येईल व आपण या दोघांनीआत्महत्या की त्यांचा खुन झाला या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळेल व आपण निर्णायक भुमीका घेवु असे मयत शाहरुखचे वडील बाबु हयाती तडवी यांनी म्हटले आहे .

 

 

घरावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे लागली मध्यरात्री घराला आग आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह हजारोंचे नुकसान…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा. प्रतिनधी

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे लागली मध्यरात्रीच्या दोन ते अडीच दरम्यान घरांवरील विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे घनश्याम राजपूत यांच्या घराला भीषण आग आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह घरातील भांडी कपड्यांसह धान्य जळून खाक सविस्तर असे की सुनगाव येथील घनश्यामसिंह राजपूत यांच्या घराला आग लागल्याचे शेतातून आलेले शाम इंगळे, अक्षय गिऱ्हे,अमोल ढगे,अनिल वसुलकार,अर्जुन ढगे यांना घराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा करून तसेच घनश्याम सिंह राजपूत यांना झोपेतून उठवून आग लागल्याची कल्पना दिली व या चौघांनी मिळून घरातील गॅस सिलेंडर पटकन काढून बाहेर आणला तोपर्यंत आग एवढी भडकली होती की आगीच्या ज्वाळा दहा ते पंधरा फुटापर्यंत वर दिसत होत्या यांच्या आरडाओरड्याने घरा शेजारील नागरिक जागे झाले व त्यांनी आपापल्या घरातील जे हातात येईल त्या भांड्याने पाणी आणून आगीच्या भक्ष्यस्थानी असलेल्या घरावर पाणी फेकने चालू केले. शॉर्टसर्किट घरावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे झाल्याचे लक्षात येताच अनिल भगत व शाम इंगळे यांनी विद्युत डीपी बंद केली त्यामुळे शॉर्टसर्किट होणे बंद होऊन पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. जवळपास एका तासाने नागरिकांच्या या अथक प्रयत्नांना यश आले व आगीवर नियंत्रण मिळविले. आग एवढी भयंकर लागली होती की संपूर्ण वस्ती जळून खाक झाली असती आगीमध्ये घनश्यामसिंह राजपुत यांचे स्वयंपाक घर जळुन खाक . शेता मधून आलेल्या या चौघांच्या समयसूचकता आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चौघा मुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला असे नागरिक त्या ठिकाणी बोलत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथीलच श्रीराम इंगळे, अनिल तिवारी, बळीराम इंगळे, गजानन जवंजाळ, पुर्णाजी धुळे ,संजय निमकर्डे पांडुरंग इंगळे उमेश कुरवाडे, गणेश कतोरे,अनिल वसूलकार,अक्षय गिऱ्हे, अमोल ढगे, अर्जुन ढगे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी आग विझविण्याचा मदत केली.