Home Blog Page 492

जिल्हा परिषद निधीमधून 14 एप्रिल ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वडनेर येथे हायमास्ट लाईटचे लोकार्पण

0

 

सचिन वाघे वर्धा

वडनेर येथे 14 एप्रिल च्या पार्श्वभूमीवर मा.आमदार समीरभाऊ कुणावार तसेच मा. आमदार डॉ.रामदासजी आंबटकर यांच्या मार्गदर्शनात तसेच जि.प.सदस्य सौ. जोस्त्नाताई सुनील सरोदे यांच्या जि.प.निधीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वडनेर येथे हायमास्ट लाइट चे लोकार्पण मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आले..
बऱ्याच कालावधीपासून वडनेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या आंबेडकर चौक हायमास्ट चे लोकार्पण मा.कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते दिनांक १४/०४/२०२१ ला करण्यात आले. मा. सौ. जोशनाताई सुनील सरोदे जिल्हा परिषद सदस्य वडनेर त्यांच्या विशेष निधी अंतर्गत मंजूरीतील कामे असून वडनेर गावाच्या लौकिकांत वाढ झाली असून अतिशय प्रकाशित गावं व्हावे या करिता बरेच दिवसापासून नागरिकांची मागणी होती. यामुळे नागरिकांची बरीच सोय झालेली आहे. हा *हायमास्ट* सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. सदर परिसरामध्ये हायमास्ट

लावल्याने गावातील परिसर प्रकाशमय झाला असून *मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या कामाविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे नागरिकांना अतिशय सुरक्षितपणे व सजक पणे जीवन जगण्यामध्ये या *हायमास्ट लाइटचा उपयोग होणार आहे. सदरील लोकार्पण सोहळा सोशल डिस्टंसिंग ठेवून करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये *मा.आमदार समीरभाऊ कुणावार , मा. वसंतराव आंबटकर माजी शिक्षण सभापती ,सौ शारदाताई आंबटकर पं.स.सभापती हिंगणघाट ,जि.प. सदस्या जोस्त्नाताई सरोदे , कविताताई वानखेडे सरपंच ग्रा.पं. वडनेर, मधुकर महाजन , सुनील सरोदे माजी सरपंच ग्रा.पं.वडनेर ,सुरेश भगत,तुषार आंबटकर, किशोर जवादे ,गजानन जारोंडे , गणेश शेळके ,वैभव फुलझेले ,प्रतीक जवादे , निखिल कळसकर ,बंटी कुंभारे ,संजय जमानकार ,अभिजित डोंगरे , इत्यादी कार्यकर्ते व गावकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

तरुनानि स्वयंपुतिन रक्त दानासाठि पुढे यावे हेच महामानवास खरे अभिवादन. आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा. सुनील पवार

बुलढाणा जिल्हा सह महाराष्ट्र राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमानात तुटवडा जानवत आहे त्या अनुषंघाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अधक्ष. मा. नानाभाऊ पाटोले व जिल्हा.काँग्रेस कमिटि बुलढाणा यांच्या सुचने नुसार मानसाला मानुस म्हणून जगण्याचा अधिकार देनारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३०व्या जयंतिचे औचित्य साधून नांदुरा ता.व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार मा.राजेश एकडे यांच्या कायाँलयामधे रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते या रक्त दान शिबिराचे उतघाटन मलकापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांचे हस्ते सपन झाले राज्यासह बुलढाणा .जिल्ह्यामधे मधे कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सामाजिक दाईतव म्हणून तरूनानि मोठ्या प्रमाणात रक्त दान करावे व अशी रक्त दान शिबिरे आयोजित करून शासनास व आरोग्य विभागास सहकार्य करावे असे प्रतिपादन यावेळि आमदार राजेश एकडे यांनी केले या रक्त दान शिबिरात पक्षाच्या५१कार्य करतानि रक्त दान केले यावेळी नांदुरा क्षि उतपन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पदम पाटिल बुलढाणा जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस निलेश पाऊलझगडे नांदुरा ता.काँ.भगवान भाऊ धांडे. गौरव पाटील. सुनीताताई देशमुख .सनिताताई गोंड प्रामुख्याने उपस्थित होतें

कोरपावलीचे चंद्रकांत तायडे यांचे अल्पशा आजाराने निधन

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कोरपावली येथील रहीवासी चंद्रकांत भास्कर तायडे वय ४८ वर्ष यांचे अल्पशा आजाराने दिनांक १४ एप्रील रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात आई , पत्नी , भाऊ , दोन मुलगा , एक मुली असा परिवार आहे. ते चुंचाळे बोराळे येथील सामाजीक कार्यकर्ते तसेच यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे यांचे मामा होत.

जिल्हा परिषद शाळा सूनगाव मुख्याध्यापक यांचा मनमानी कारभार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ताडे सर हे मुख्याध्यापक मनमानी कारभार करीत आहे असा आरोप काही शाळा समिती सदस्यांनी केला आहे शाळे संदर्भात कामे जसे दुरुस्ती कलरिंग ची कामे शालेय पोषण आहार वाटप शाळेतील विद्यार्थी गणवेष खरेदी इत्यादी कामे शाळा समितीतील सदस्यांना न सांगता स्वतःच्या मर्जीने करीत परस्पर करून घेत आहे शालेय पोषण आहे व्यवस्थित वितरित करीत नाही पालकांना विद्यार्थ्यांना त्याची पूर्वसूचना देत नाहीत शाळा समितीची मासिक सभा नियमित न घेता ही कामे सभेत न मांडता व त्यावर चर्चा न करता स्वतः करवून घेत आहेत व विचारणा केली असता त्याची माहिती देत नाही अशी खंत काही शाळा समितीतील सदस्यांनी व्यक्त केली आहे तरी पंचायत समिती शिक्षण विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी खंत समितीतील काही सदस्यांनी व्यक्त केली आहे

इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा व बँकेच्या अधिकार्या मनमानी कारभार बँकेच्या खातेदारांचा पैसा. अन,खातेदारच चोर का? बँकेच्या खातेदारामधे चर्चेचा विषय

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
====================
सरकार नेहमी मोठ्या वाज्यागाद्यत सरकार शेतकर्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभे आहे पण
या उलट अशी म्हणायची वेळ आली शेतकर्यावर व सामान्य खंजीर घेऊन उभे आहे नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पापळ या
गावामध्ये गेले अनेक वर्षांपासून इल्हाबाद बँकेची शाखा होती पण
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार या बँके नामकरण होऊन एक वर्षे पुर्ण होऊन सुद्धा या बँकेचा नियमित एकच प्रश्न राहतो तो बँकेचे साफ्टवेअरचे काम चालु आहे नेटवर्क लिंक नाही पण ग्रामीण भागातील अनेक गावे बँकेला जोडलेले आहे व खातेदारा सुद्धा हजारोंच्या वर
आहे .पण बँकेच्या खातेदाराना
कुठल्याही सुविधा या बँकमधे नाही उलट ग्रामीण भागातून गावा गावा मधून येणाऱ्या बँकेच्या खाते
दाराला बँकेच्या अधिकारी शेतकरी व सामान्य लोकांना अपमानास्पद वागणूक देऊन अरेरावीची भाषेत बोलतात त्यामुळे शेतकऱ्यांन सामान्य लोकांच्या पैस्याच्या ठेवीवर
बँकचे व्यहार असुन सुद्धा सामान्य लोकाची पिळवणूक या बँकेच्या शाखा व्यवस्थापक अधिकार्या होत असल्याची चर्चा लोका मधे दिसून आले व शासणाच्या विविध योजनाचे लाभार्थ्यांना वेळेवर पैसा मिळत नाही. संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ ,इंदिरा गांधी निराधार योजनेचा पैसा काढण्यासाठी लाभार्थी गेले असता लाभार्थ्यांला पैसे काढण्या करिता विड्राल शिल्फ भरण्यासाठी बँकेत कुठल्याही प्रकारची सुविधा नसुन उलट त्या
लाभार्थ्यांना एजंट कडुन विड्राल
भरून आणायला सांगितले जाते व त्या एजंटला २०रुपये प्रति लाभार्थ्यांना द्यावे लागते घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा शासणाने खात्यावर एका वेळेत कुठल्याही परिस्थितीत पैसे दिले जात नाही शेतकऱ्यांना व सामान्य खातेदारच सोडूनच द्या
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील
पापळ हे गाव भाऊसाहेब पंजाब राव देशमुख भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री यांची जन्म भुमी असुन शेतकऱ्याना न्याय देईल तरी कोण अशी चर्चा अशी सामान्य लोकांनमधे सुरू आहे अशावेळी विदर्भ शेतकरी संघर्ष समिती पदधिकार्याने आमच्या प्रतिनिधी कडे मोबाईल संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की एका आजोबाचे नातेवाईक दवाखान्यात भरती आहे व मला पैस्याची आजच गरज आहे बँक अधिकार्यांनी आजोबा ला नेटवर्क लिंकचे निमित्त सांगुन मोकळे केले पण त्या दवाखान्यात असणाऱ्या रुग्णाचे काय ? खातेदारांचा पैसा खातेदारालाच मिळत नसेल तर आम्हाला इंडियन बँकेचा फायदा काय बँकेचे ग्राहकांचाच पैसा आणि बँकेचे ग्राहकच चोर का?बँकेच्या ग्राहकामधे चर्चेचा विषय सुरू आहे.

मलकापूर कोविड सेंटर मध्ये २५ ऑक्सिजन बेड वाढवून द्यावे-आमदार राजेश एकडे.

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडॉऊनच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बुलढाणा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कडक अंमलबजावणी करणे संदर्भात आढावा घेतला. सदर बैठकी मध्ये मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांनी मलकापूर येथील कोविड सेंटरमध्ये २५ अतिरिक्त ऑक्सिजन बेड व नांदुरा येथे ऑक्सिजन व औषधीची व्यवस्था मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी केली सदर मागणीच्या अनुषंगाने मा.पालकमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शीवली,
त्याच प्रमाणे आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याची देखील मागणी केली.या आढावा बैठकीस बुलढाणा जिल्ह्याचे खासदार श्री.प्रतापरावजी जाधव,आमदार श्री. संजयजी रायमुलकर, आमदार श्री.संजुभाऊ गायकवाड, आमदार श्री.संजयजी कुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.जालिंदरबुधवत,श्री.संतोषभाऊ रायपुरे, मा.जिल्हाधिकारी श्री.एस.राममूर्ती,जिल्हा पोलिस अधीक्षक मा.अरविंद चावरीया,जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विसपुते मॅडम ,अप्पर जिल्हाधिकारी श्री.दिनेश गीते,जिल्हा शल्य चिकित्सक श्री.नितीन तडस,जि.प.आरोग्य विभागाचे सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.सांगळे,तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

आजच्या तरुणांनी महामानव डॉ बाबासाहेबांचे विचार व आचार आत्मसात केल्यास हिच त्यांना खरी आदरांजली : भरत चौधरी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील चुंचाळे येथील श्री. संत संताजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साजरी करण्यात आली.आज सार्वजनिक वाचनालयात आयोजीत या कार्यक्रमास यावल येथील स्वराज्य फाउंडेशन अध्यक्ष अँड भरत चौधरी ,रहेमान तडवी यांनी ही उपस्थित राहुन राज्यघटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सामुहिक पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण केली . यावेळी सामाजीक कार्यकर्त हेमंत सावकारे, संजय पाटील, शिवाजी गजरे , पत्रकार विकी वानखेडे, पत्रकार दिपक नेवे हे प्रामुख्याने उपस्थित होते. भिम आर्मी सामाजिक संघटना सचिव जळगाव जिल्हा सुपडू संदांनशिव .स्वराज्य फाउंडेशन अध्यक्ष अँड भरत चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती दिली व आजच्या तरुणांनी डॉ बाबासाहेबांचे विचार व आचार आत्मसात केल्यास हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे सांगुन कोरोना काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना संकटावर मात करण्यासाठी दिलेल्या उपाययोजनांचे पालन करण्याची ही याप्रसंगी मान्यवरांनी विनंती केली व प्रत्येक व्याक्तीने आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व कोरोना आजारांवर मात करण्यासाठी धडे देत साधे पणाने जयंती साजरी केली. या जयंतीच्या कार्यक्रमास चुंचाळे येथील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुनगांव येथे ठिक ठिकाणी करण्यात आले अभिवादन

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील मिलिंद नगर येथील बुध्दविहार,ग्रामपंचायत कार्यालय, जि.प.मराठी प्राथमिक शाळा येथे
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पध्दतीने शासनाने दिलेल्या नियमावली नुसार मागिल वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा महामानवाची जयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली यावेळी पत्रकार विनोद वानखडे , पत्रकार गणेश भड , पत्रकार अनिल भगत, पत्रकार गजानन सोनटक्के, पत्रकार राजकुमार भड, पत्रकार शिवदास सोनोने,गिताबाई सोनोने, सरपंच रामेश्वर अंबडकार
जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धूर्डे ग्रा प सदस्य बळीराम धुळे राहुल इंगळे देवानंद वानखेडे गजानन दातिर विमल काळपांडे योगिता कुरवाडे कौशल्या ढगे द्रौपदी गवई व पांडुरंग गवई रामसिंग राजपुत रियाज तडवी लक्ष्मण काटोले उमेश कुरवाडे मनीष तडवी,ग्रामसेवक चौधरी,ग्रामपंचायत कर्मचारी, अजय ससाने, किसन अर्दळे, शरद हिवराळे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची यावेळी उपस्थित होती.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे साजरी,विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम संपन्न.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

घोट(गडचिरोली):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न,महामानव,विश्वपंडित, महाज्ञानी,बोधिसत्व,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य एम एन राव होते तर विशेष प्रतिनिधी उपप्राचार्य राजन गजभिये,गट साधन केंद्र चामोर्शी चे साधनव्यक्ती चांगदेव सोरते,संसाधन शिक्षक रवी खेवले,शाळेचे शिक्षक भराडे हे होते.
दरम्यान विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तर रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा व वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.गुणानुक्रमे आलेल्या स्पर्धेमधील विजेत्यांना प्राचार्य,उपप्राचार्य,साधनव्यक्ती व मान्यवरांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत गायन केले निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी चांगदेव सोरते यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. संस्थेचे प्राचार्य एम एन राव व उपप्राचार्य राजन गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपीस अटक नाही म्हणून हिंगणघाटात आज पासून (OPD)बाह्यरुग्ण सेवा बंद डॉ राहुल मरोठी

0

 

सचिन वाघे वर्धा

डॉ निर्मेश कोठारी यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत हिंगणघाट(IMA) इंडियन मेडिकल असोसिएशन कडून (OPD) बाह्यरुग्ण सेवा बंद अशी माहिती डॉ.राहुल मरोठी यांनी दिली