Home Blog Page 493

कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगतात त्याच्या मुलाने केली डॉक्टरास मारहाण

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट – दि.13
नागपुर येथून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तिचा मृत्यु झाल्याचे सांगताच त्याचे मुलाने एका खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरास मारहाण केल्याची घटना आज दि.13 रोजी सायंकाळी घडली.
शहरातील शिवाजी वार्ड येथे डॉ.निर्मेश कोठारी यांचे हॉस्पीटल आहे.
आज दि. 13/04/2021रोजी हॉस्पीटलमध्ये पेशंटची तपासणी करीत असतांना एका कोविड पॉसिटीव रुग्णास सायंकाळी
5.45 वाजताचे दरम्यान ऑटोमध्ये आणण्यात आले. रुग्ण अत्यवस्त स्थितीत असल्याचे सांगण्यात आल्याने आल्याची माहीती मिळाल्याने डॉक्टर कोठारी स्वत: रुग्णाजवळ गेले. डॉक्टरांनी पाहणी केली असता सदर रुग्ण मृत अवस्थेत होता. मृत घोषीत रोडवर का करावे म्हणुन रुग्णास हाँस्पीटलच्या पोर्च मध्ये घेतले.यावेळी मृतक सोबत मुलगा सलमान खान
सत्तार खाँन व इतर दोन-चार नातेवाईक होते.यावेळी नागपुरला केलेल्या उपचाराचे कागदपत्रे दाखविले असता रुग्ण कोरोना पाँझीटीव्ह असल्याचे दिसुन आले. म्हणुन डॉ.कोठारी यांनी मृतकाचा मुलगा सलमान खाँन सत्तार खाँन व नातेवाईकांना मृतक कोरोना पॉझीटीव्ह असून मृत पावला असल्याचे सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या मृतकाचे मुलगा सलमानखान सत्तार खान याने डॉक्टरांना अंगावर धावून जात मारहाण केली.
यावेळी डॉक्टर कोठारी यांनी भ्रमणध्वनीवरुन पोलिसांना पाचारण केले,यामुळे पुढील अनर्थ टळला.
डॉ.निर्मेश कोठारी हे आयएमएच्या सदस्यांसह स्थानिक पोलिस ठाण्यात पोचले.
आयएमए सदस्यांनी आरोपीवर योग्य कारवाई न झाल्यास शहरातील खाजगी बाहयरुग्णसेवा बंद करण्याची धमकी पोलिस प्रशासनाला दिली.
पोलिसांनी आरोपीवरती विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.

तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमी युवगलांनी प्रेमसंबधातुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली

0

 

तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमी युवगलांनी प्रेमसंबधातुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमी युवगलांनी प्रेमसंबधातुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे . याबाबत मिळालेली माहीती अशी की , परसाडे गावात एकाच समाजातील प्रेमींनी गाव शिवाराला लागुन वड्री परसाडे गावाला जाणाऱ्या असलेल्या पुष्पा गडे यांच्या शेतातील निंबाच्या झाडास दोघांनी एकाच वेळी गळ्फास घेवुन आपले जिवन संपवल्याची दुख :दायी घटना घडली आहे .विशेष म्हणजे आज यातील तरुणाचा चिनावल येथे साखरपुडा असल्याचे वृत मिळाले असुन , मात्र या तरुणाचे परसाडे येथील मिना शावखाँ तडवी वय २२ वर्ष राहणार परसाडे व हरीपुरा येथील शाहरूख बाबु तडवी वय१९ या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आला आहे . या बाबत वड्रीचे पोलीस पाटील ईब्राहीम तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात गुन्हा दाखल कसण्यात आला असुन , पोलीसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदना साठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे ?

आमदार समीर कुणावार यांनी घेतला कोरोना महामारी चा आढावा आय. एम. ए. ने दिला सहकार्याचा हात

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता  आमदार समीरभाऊ कुणावार  यांनी तातडीने यांच्या अध्यक्षतेखाली आज हिंगणघाट तालुक्याचा कोरोणा आढावा बैठक आमदार कार्यालय हिंगणघाट येथे घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये कोरोना ग्रस्तांचा औषधोपचार त्याच प्रमाणे कंटेनमेंट झोन याबद्दल माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना करणे, टेस्ट करून घेणे जे पेशंट कोरोना ग्रस्त आहे गृह विलगीकरनात आहे, त्यांची प्रकृती वाढत असल्यास त्यांची माहिती घेऊन त्यावर ताबडतोब औषध उपचार करण्याची दखल घेणे या सर्व गोष्टीचा आढावा सदर बैठकीमध्ये घेण्यात आला.
दिवसें दिवस कोरोणाचे संक्रमण वाढतच चालले असून हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेशंट दिसून आलेले आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी केले. सदर कोरोना पहिल्यापेक्षाही मोठ्या झपाट्याने वाढत चालला असून उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोविंड सेंटर चालविणे गरजेचे आहे . हिंगणघाट शहरातील आय. एम. ए. चे सर्व डॉक्टर यांची मिटिंग घेऊन सर्व डॉक्टरांनी सहकार्य देण्यास प्राधान्य दिले. आय. एम. ए. च्या सर्व डॉक्टरांनी तीन शिफ्ट मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहरात वाढत्या कोरोना वर निर्बंध निश्चितच लाभेल असा विश्वास *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी व्यक्त केला.

सदर बैठकीला *आय. एम. ए. च्या अध्यक्षा डॉ. सौ. मानधनीया मॅडम, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन मा. श्री. सचिनजी तडस साहेब, हिंगणघाट उप-जिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. मिसाळ मॅडम, हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. किर्तीताई कुचेवार, इत्यादी हिंगणघाट शहरातील डॉक्टरांची चमू सोबतच हिंगणघाट शहराचे मुख्याधिकारी मा. श्री. जगताप साहेब* सदर बैठकीला उपस्थित होते.

लसीकरनाचा संदेश देणारी आगळी वेगळी गुढी उभारून वाकेकर हॉस्पिटल ने जोपासली परंपरा..

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:

भगवान श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत परतले होते, या आनंदात आयोध्यामध्ये दारात विजयाची गुढीउभारून त्यांचे स्वागत केले होते. हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.त्याच प्रमाणे यावर्षी स्थानिक जळगांव जामोद शहरातील सुप्रसिद्ध वाकेकर हॉस्पिटल तर्फे लसीकरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी गुढी उभारून जनजागृती केली. यावेळी कोरोना विषाणू चा नायनाट करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. आपल्या भारतात आज घडीला कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. तरी सर्व जनतेने मनात कोणत्याही शंका कुशंका न ठेवता, कोणताही संभ्रम न ठेवता लसीकरण करून घ्यावे व शासनाच्या या उपक्रमाला आपली नैतिक जबाबदारी म्हणून हातभार लावावा असे आव्हान केलं. यावेळी वाकेकर हॉस्पिटल चे संचालक डॉ. संदीप वाकेकर व डॉ.सौ.स्वाती वाकेकर यांनी रीतसर पूजा करून सुख समृद्धी व सदृढ आरोग्यची गुढी उभारली व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.मागील वर्षी सुद्धा कोरोना योद्ध्यांचे आभार व्यक्त करणारी गुढी उभारून आगळा वेगळा संदेश दिला आहे.

रस्ता बांधकामाबाबत वार्ड नंबर 1 मधील नागरिकांचे ग्रामपंचायत कार्यालयास निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत मधील वार्ड नंबर एक मधील ग्रामपंचायत कार्यालय मागच्या बाजूस शंकर रामा कातोरे यांच्या घरापासून ते बऱ्हानपुर रोड पर्यंत रस्त्याची दुर्दशा फार खराब झालेली आहे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असते त्यामधून लोकांना जाण्या येण्यास त्रास होत असतो व वार्ड नंबर एक मधील जुनी आवजी सिद्ध बँक परिसरातील रस्ते हे मोठ्या प्रमाणात जशाच्या तसेच अवस्थेत आहेत तरी या परिसरात ग्रामपंचायततिने पेवर ब्लॉक व सिमेंट रस्त्याचे कामे करावेत व राहिलेला अर्धवट रस्ता हा बऱ्हानपूर रोडपर्यंत पूर्ण करावा असे निवेदन वार्ड नंबर एक मधील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयास दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी दिले आहे तरी अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा नाहीतर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे या अर्जावर सुरेश मारोती मिसाळ वैभव ढगे अनिल गणेश राव ढगे सुनील जगदेव गवई व परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत

बापरे ! एकाच गावात 77 पॉझिटिव्ह 750 लोकसंख्या असलेल्या पोटा या छोट्याशा गावात तब्बल 77 रुग्ण पॉझिटिव्ह

0

 

नांदुरा:- (प्रफुल्ल बिचारे पाटिल)

तालुक्यातील पोटा या गावात आज दि. १२ एप्रिल रोजी रँपीड टेस्ट मधे तब्बल 77 पेशंट पाँझीटीव आल्याने नांदुरा तालुक्याचे कर्तव्य तत्पर अधिकारी राहुल तायडे तहसीलदार ,नांदुरा प. स. चे गट विकास अधिकारी समाधान वाघ , तालुका आरोग्य अधिकारी खंडारे साहेब , जि प सदस्य वसंतराव भोजने , तलाठी देशमुख मँडम , सचिव काळवाघे ,आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांनी पोटा गावात जावून प्रमुख गावकर्यांची बैठक घेतली व 750 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात 77 पेशंट निघाले म्हणून घाबरून न जाता कोणी ही गावकऱ्यांनी बाहेर जावू नये व कोनालाही गावात येवू देवू नये अशा सुचना केल्या व सकाळ पासुन न च गोळ्या ,औषधे व तपासणी करण्यात येईल
यावेळी विशाल पा सरपंच माजी सरपंच ऊमाकांत पाटील, जलतज्ज्ञ रामकृष्ण पाटील प्रामुख्याने हजर होते.
या गावात आज 145 तापसणी केली असता 77 posotive आढळून आले. पूर्ण गांव containment झोन करण्यात आले व उद्यपासून पूर्ण गांव तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हिवरा बु . येथे १० गांज्याची झाडे व वाळलेल्या गांज्यासह ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त ! साखरखेर्डा पोलीसांची कारवाई 

0

 

सिंदखेड राजा (विशेष प्रतिनिधी )

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा बु . येथील एका शेतातून पोलीसांनी १० गांज्याची झाडे आणि वाळलेला गांज्या असा ऐकून ४२ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
१२ एप्रिल रोजी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना गोपनीय माहिती मिळाली त्या माहिती वरुन ठाणेदार जितेंद्र आडोळे , पीएसआय दिपक राणे , पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मुंढे , पोलीस नायक काशपाग , धुड , रमा गवई यासह दोन शासकीय पंच , फोटो ग्राफर , वजन करण्यासाठी एक व्यावसायीक हेघटणास्थळी गेले . तेव्हा   हिवरा बु . शिवारातील राजू शेळके यांच्या रसवंती मागे शिवाजी त्रंबक शेळके यांचे शेत असून त्यांच्या शेतात कपाशी आणि मका ही पिके घेतली जातात . या  शेतातच शिवाजी शेळके हा गांज्याची शेती करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती .त्याच शेतात शेळके यांची फऱ्हाटीच्या कुडाची झोपडी असून त्या झोपडीत शिवाजी हा बसलेला आढळून आला . त्याची कसून चौकशी केली असता आणि झोपडीची झडती घेतली असता  झोपडीत एका पोतडीत २ किलो ३९२ ग्राम गांजा मिळून आला . अधिकची चौकशी करून मका शेताची पाहणी केली असता शेतातील धुऱ्यावर ७ ते ८ फुट उंचीची दोन व इतर लहान मोठी १० झाडे आढळून आली . पंचासमक्ष पंचनामा आणि झाडाचे वजन केले असता २४ किलो ५२ ग्राम वजन भरून आले . असा एकूण २६ किलो ५०० ग्राम गांजा जप्त करण्यात आला . गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी शेळके हा गांज्याची झाडे लावत असून त्या झाडाचा पाला वाळवून विक्री करीत असल्याचे सुत्रांकडून समजते . या गांज्या व्यवसायामागे आणखी कोन यांचा तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दिपक राणे करीत आहेत . आरोपी शिवाजी त्रंबक शेळके वय ५५ वर्ष रा . हिवरा बु . यास अटक केली आहे . त्यामुळे आणखीन आता कोणाकोणाच्या शेतात गांजा आहे याचा तपास होणे गरजेचे आहे ।

नांदुरा तालुक्यात संपूर्ण राशन दुकानात मिळत आहे निष्कृष्ट दर्जाचे धान्ने:- बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिले नांदुरा तहसील दारांना निवेदन

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

शहर व ता . च्या हद्दीत शिधा वाटप पत्रिकेवर मिळणारे गहू तांदूळ गहू ज्वारी व मका हे धांन्य अंत्यत निकृष्ठ दर्जाचे व कोणत्याही प्रकारची दर्जा नसलेले धान्य असुन त्या पासुन अनेक प्रकारचे शारीरीक व्यंग व दुर्धर आजार नागरिकांना होत आहे सदर शासकीय धांन्ये गोदामात बऱ्याच दिवसापासून पड्न असलेलल्या व सडक्या स्वरूपाचा धांन्यसाठा नागरीकांना देण्यात येत असुन त्याबाबत संबंधित गोदाम निरीक्षक व पुरवठा निरीक्षक यास वारंवार सांगूनही तोच सटका साठा शिधावाटप दुकानदारांना वाटप करण्यात येतो व चांगल्या प्रतीचा असलेल्या उत्कृष्ट धान्य खुल्या बाजारात दलालांमार्फत सर्रास विकल्या जाते सदर प्रकरणात बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना याबाबत या अगोदर अवलोकन केले आहे. याकरीता बहूजन समाज पार्टीच्या वतीने नांदुरा तसीलदारांना निवेदन देण्यात आले.

उंद्रि परिसरतिल 18 गावातील बंद असलेले पथदिवे सुरू भाई प्रदीप अंभोरे आंदोलन यश !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

येथून जवळ असलेल्या उंद्रीसर्कल मधील 18 गावातील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरण ने बंद केले होते. त्यावर प्रदेश कांग्रेस अनु जाती विभाग नेते, व उंद्रि ग्रा प सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी महावितरण कंपनी यांच्याकडे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर दिनांक बारा एप्रिल रोजी महावितरण कंपनीने दखल घेऊन अखेर उंद्री व सरकारमधील 18 गावातील बंद पाडलेले पथदिवे सुरू केले आहे.
या महिन्यांमध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या रामनवमी गुढ़ी पड़वा, रमजान अशा धार्मिक सणावर पहिलेच कोरोणामुळे विरजण पडले आहे यातच महावितरण कंपनीने वीज बिले उंद्रि व सरकलमधील अठरा गावातील ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद केले होते. सदर पथदिवे सुरू करण्यासाठी भाई प्रदीप अंभोरे यांनी मा.उद्घव ठाकरे मुख्यमंत्री,मा.ऊर्जा मंत्री नितीन राऊत आदिक डे व महावितरण कंपनी बुलढाणा यांच्याकडे आंदोलन निवेदन देऊन केलेली मागनी ची दखल घेऊन पथदिवे सुरू केल्याने उंद्रिसह 18 गावामध्ये पथदिवे सुरू झाले आहे. हे पथदिवे सुरू करण्यासाठी उप अभियंता चिखली भुसारी व कनिष्ठ अभियंता जाधव याना वरिष्ठ अभियांत्यान्नी केलेल्या आदेशानुसार त्यान्नी उंद्री वैरागड़ सह 18 गावतिल पथ दिवे सुरू केले यावेली शिवाजी पाटिल ग्राप सदस्य राम नसवाले, आकाश राऊत स्वा.शे.स.पत्रकार वसंत सिरसा ठ आदि तरुण उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक मध्ये निर्णय

0

सचिन वाघे वर्धा

दिनांक 11एफ्रिल रोजी डाॅ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्याने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे शांतता कमेटीची बैठक आयोजीत करण्यात आली होती, या बैठकित शासनाच्या मार्गदर्शक व नियमाचे पालन करुन जयंती साजरी करावी,असे ठाणेदार संपत चव्हाण यांनी आवाहन केले, या बैठकीला माजी नगराध्यक्ष सुरेश मुंडेवार,, अशोक रामटेके, रसपाल शेंदरे, उमेश वावरे, अनील मून, गोरख भगत,, संजय वानखेडे, इत्यादि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्तै उपस्थित होते,