Home Blog Page 491

परसाडे प्रेमी युगुलांची आत्महत्या की खुन करुन फासावर लटकवले मयत तरूणाच्या वडीलांनी व्यक्त केला संशय , प्रसंगी खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील परसाडे गावाच्या शिवारात प्रेमसंबधातुन आत्महत्या केलेल्या घटने बाबत मयत तरूण शाहरूख तडवी व मिना तडवी दोघांनी आत्महत्या की त्यांचा खुन करण्यात आले या विषयाला घेवुन तरूणाच्या कुटुंबांनी पोलीसांची भेट घेवुन या आत्महत्या बाबत संशय व्यक्त केले असुन , प्रसंगी याबाबत अज्ञात लोकांविरूद्ध दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल होण्याचे संकेत मिळाले आहे . दरम्यान या संदर्भातील मयत शाहरूखचे वडील बाबु तडवी यांनी दिलेली माहीती अशी की , हरिपुरा तालुका यावल राहणारा शाहरुख बाबु तडवी वय१९ वर्ष आणी मिना शावखा तडवी वय२२ वर्ष राहणार परसाडे तालुका यावल या दोघांनी मिळुन आपल्या प्रेमसंबंधास कुटुंबाकडुन मिळणाऱ्या नकारास कंटाळुन अखेर त्यांनी १३ एप्रील रोजी दुपारच्या ३ , ४० वाजेच्या पुर्वी परसाडे गाव शिवारातील खडकाई नदीच्या पायथ्याशी असलेले पुष्पा गडे यांच्या शेतात निंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आपली जिवनयात्रा संपवली होती . यात विशेष म्हणजे घटनेतील तरूण शाहरुख तडवी याचा दिनांक १३ एप्रील रोजीच चिनावल तालुका रावेर येथील समाजातील एका ठिकाणी स्थळ जुळल्याने साखरपुड्याचा कार्यक्रम होता .आत्महत्या करण्याच्या काही तास आदी त्यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये जावुन पोलीसांची भेट घेवुन आपण एकमेकांवर प्रेम करीत असल्याची माहीती त्यांनी दिली असल्याचे वृत्त आहे .पोलीसांना भेटुन घेल्यानंतर काही तासातच असे काय घडले की त्यांनी एक दुजे के लिए आत्महत्या करण्याचा मार्ग पत्कारावा लागला , आत्महत्या केलेल्या तरूणाच्या पायावर व शरीरावर काही ठीकाणी जख्मेचे निशान असुन , मयत शाहरूख तडवीच्या कुटुंबांनी त्यांचे वडील बाबु हयाती तडवी वय ६० वर्ष राहणार हरिपुरा तालुका यावल या आत्महत्याच्या सर्व घडलेल्या घटनावर संशयव्यक्त व्यक्त केले असुन , आपण त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट बघत असल्याचे शाहरूखचे वडील यांनी सांगीतले असुन येत्या काही तासातच या सर्व घटनेच्या मागची सत्य परिस्थिती समोर येईल व आपण या दोघांनीआत्महत्या की त्यांचा खुन झाला या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळेल व आपण निर्णायक भुमीका घेवु असे मयत शाहरुखचे वडील बाबु हयाती तडवी यांनी म्हटले आहे .

 

 

घरावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे लागली मध्यरात्री घराला आग आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह हजारोंचे नुकसान…

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा. प्रतिनधी

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे लागली मध्यरात्रीच्या दोन ते अडीच दरम्यान घरांवरील विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे घनश्याम राजपूत यांच्या घराला भीषण आग आगीमध्ये जीवनावश्यक साहित्यासह घरातील भांडी कपड्यांसह धान्य जळून खाक सविस्तर असे की सुनगाव येथील घनश्यामसिंह राजपूत यांच्या घराला आग लागल्याचे शेतातून आलेले शाम इंगळे, अक्षय गिऱ्हे,अमोल ढगे,अनिल वसुलकार,अर्जुन ढगे यांना घराला आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा करून तसेच घनश्याम सिंह राजपूत यांना झोपेतून उठवून आग लागल्याची कल्पना दिली व या चौघांनी मिळून घरातील गॅस सिलेंडर पटकन काढून बाहेर आणला तोपर्यंत आग एवढी भडकली होती की आगीच्या ज्वाळा दहा ते पंधरा फुटापर्यंत वर दिसत होत्या यांच्या आरडाओरड्याने घरा शेजारील नागरिक जागे झाले व त्यांनी आपापल्या घरातील जे हातात येईल त्या भांड्याने पाणी आणून आगीच्या भक्ष्यस्थानी असलेल्या घरावर पाणी फेकने चालू केले. शॉर्टसर्किट घरावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे झाल्याचे लक्षात येताच अनिल भगत व शाम इंगळे यांनी विद्युत डीपी बंद केली त्यामुळे शॉर्टसर्किट होणे बंद होऊन पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. जवळपास एका तासाने नागरिकांच्या या अथक प्रयत्नांना यश आले व आगीवर नियंत्रण मिळविले. आग एवढी भयंकर लागली होती की संपूर्ण वस्ती जळून खाक झाली असती आगीमध्ये घनश्यामसिंह राजपुत यांचे स्वयंपाक घर जळुन खाक . शेता मधून आलेल्या या चौघांच्या समयसूचकता आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चौघा मुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला असे नागरिक त्या ठिकाणी बोलत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथीलच श्रीराम इंगळे, अनिल तिवारी, बळीराम इंगळे, गजानन जवंजाळ, पुर्णाजी धुळे ,संजय निमकर्डे पांडुरंग इंगळे उमेश कुरवाडे, गणेश कतोरे,अनिल वसूलकार,अक्षय गिऱ्हे, अमोल ढगे, अर्जुन ढगे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी आग विझविण्याचा मदत केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अपमानकारक पोस्ट वडनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

0

 

  • सचिन वाघे वर्धा

    14 एप्रिल ला संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर फेसबुकवर अपमानकारक टिपणी केली . वडनेर पोलिस हद्दीतील काचनगावातील सचिन उरकुडे ने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल फेसबुकवर अभद्र व अपमानकारक पोस्ट शेयर केली, त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .

संबंधित निवेदन उपविभागीय पोलिस अधिक्षक दिनेश कदम, ठाणेदार राजेंद्र शेटे यांना देण्यात आले.
यावेळी सुनील ढोरे ,निखिल कांबळे, रवी कांबळे ऍड. वीरेंद्र कांबळे, विवेक नाखले, सुरज ताकसांडे, प्रदीप भोंगाडे, सचिन कुंभारे, कपिल गोटे, सरपंच वडनेर, मधुकर कुंभारे, शामराव कुंभारे, भीमराव गोटे, सुमेध ढोरे, अभय ब्राह्मणे, अजित बुरबुरे, छोटू गोटे, प्रफुल पाटील, चंद्रमणी गोटे, रजत सोगे, प्रभाकर नाईक, मनोज कांबळे, निखिल जूनगडे, रवी कांबळे रोशन नगराळे उपस्थित होते.

सवडद येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सरपंच शिवाजी लहाने यांच्या हस्ते पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथे सरपंच शिवाजी लहाने यांनी ग्रामपंचायत अंतर्गत निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व पुतळ्या परिसरातील सौंदर्यकरण केले होते ‘काम पूर्ण झाल्यानंतर ’14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पुतळ्याच्या सौंदर्यीकरण . तसेच सुशोभीकरणाचे लोकार्पण सवडद चे सरपंच शिवाजी लहाने यांच्या हस्ते करण्यात आले ‘यावेळी सवडद गावचे सचिव श्री मानतकर ‘पोलीस पाटील मनसुबराव देशमुख ‘उपसरपंच नामदेव काटकर ‘ग्रामपंचायत सदस्य उद्धव केंदळे ।तंटामुक्त अध्यक्ष शिवा साळवे ‘व इतर समाज बांधव उपस्थित होते .

तहसील कार्यालयात तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

नांदुरा तहसील कार्यालयात आज गुरुवारी सकाळ 9 च्या सुमारास एक 45 वर्षीय तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अनिल लक्ष्मीण अंभोरे असे या तलाठ्याचे नाव असून तो 45 वर्षाचा असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्त असे की नांदुरा तहसील अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत असलेले अनिल लक्ष्मण अंभोरे यांनी तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या केबिन मधील स्वछता गृहात गळफास घेतली.सदर प्रकार आज गुरुवार सकाळी 10 वाजता उघडीस आला.सदर घटनेची माहिती नांदुरा पोलीस स्टेशन ला प्राप्त होताच घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास चालू आहे.वृत्त संकलन पर्यंत तपास सुरू होता.

जब तक सुरज चाँद रहेगा , तब तक बाबासाहेब का संविधान रहेगा !सरपंच दाऊद सेठ कुरेशी यांचे प्रतिपादन !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिले आणि ही संविधानामुळे च मी सरपंच पदावर विराजमान झालो ‘असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथे आयोजित कार्यक्रमात साखरखेर्डा येथील सरपंच दाऊत शेठ कुरेशी यांनी केले ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी सर्वांच्या तोंडाला माक्स व हाताला सॅनिटायझर लावलेले होते ‘
यावेळी सरपंच दाऊत शेठ कुरेशी यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .ते पुढे बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकी शिकवली ‘व सर्व धर्माला संविधानाच्या माध्यमातून न्याय दिला ‘राज्यघटना बदलण्याचे मनसुबे काही लोक करत आहेत परंतु जबतक सुरज चाँद रहेगा ! तबतक बाबा साहब का संविधान रहेगा !
असे सांगितले ‘
त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव यांनी सुद्धा मार्गदर्शन केले !
अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले !
यावेळी ‘जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ‘साखरखेर्डा दाऊद सेठ कुरेशी ‘माजी सरपंच कमळाकर गवई ‘ग्रामपंचायत सदस्य संग्राम सैरगैये ‘उपसरपंच प्रवीण पाझडे ‘सचिन जाधव ‘शुभम राजपूत रामदास सिंग राजपूत ‘आयुब शेठ कुरेशी . अंकुर देशपांडे .माजी सभापती राजू ठोके ‘माझी पंचायत समितीचे उपसभापती सुनील जगताप ‘ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ पत्रकार सय्यद रफीक ‘ संजय जैस्वाल ‘गोपाल शिराळे ‘गणपत अवचार ‘ ग्राप . सदस्य ‘ दिलिप बेंडमाळी ‘दर्शन गवई .ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे ‘ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप इंगळे ‘विशाल गवई ‘आदी मान्यवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते ‘कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन दर्शन गवई यांनी केले ‘
या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता ‘

शिंदी येथे भीम जयंती साध्या पद्धतीने साजरी ..समता सैनिक दलाच्या चिमुरड्यांनी दिली मानवंदना !

0


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुण्या एका जातीचा विचार न करता सर्व जाती धर्माचा विचार केला – – अर्जुन गवई

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिंदी येथे अतिशय साध्या पद्धतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती साजरी करण्यात आली ‘सकाळी आठ वाजता शासनाच्या नियम व अटी पाळून 15 जणांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली,यावेळी शिंदी गावचे सरपंच विनोद खरात तसेच शिंदी गावचे ग्रामसेवक अर्जुन गवई यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व पुतळ्याचे पूजन केले ‘त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य ‘समता . बंधुताची ‘ शिकवण दिली .त्यांनी कुठल्याही एका जाती धर्माकरिता काम केले नसून त्यांनी सर्व जाती धर्माचा विचार केला ‘असे मार्गदर्शन अर्जुन गवई यांनी केले ‘

यावेळी सरपंच विनोद खरात ‘ पोलीस पाटील मदन हाडे ‘ उकंडा खंडारे कडूबा रविंद्र खंडारे .अरविंद खंडारे ।रतन खंडारे .कडुबा खंडारे संतोष खंडारे यशवंतराव खंडारे ‘ पत्रकार सचिन खंडारे ‘विनोद खिलारे . राजू गवई भगवान गवई मधुकर खंडारे । राहुल खंडारे ‘आदी उपस्थित होते ‘यावेळी परत एकाने सुरक्षित अंतर ठेवून तोंडाला मास्क बांधले होते ।

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी पुष्पहार व फुलांना विक्रमी मागणी !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथील प्रफुल्ल फुल भांडार वर व पुष्पहार व फुले घेण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली ‘
प्रफुल्ल अवचार यांचे गेल्या दहा वर्षापासून साखरखेर्डा येथे फुल भांडाराची दुकान आहे स्वतःच्या अर्धा एकर शेतामध्ये त्यांनी फुलाची लागवड केली आहे तसेच इतर शेतातून सुद्धा ते फुलं घेत असतात ‘
तसेच लग्न करता वधूवरांना लागणारे हार असो किंवा स्त्रीयांसाठी गजरे असो .ऑर्डर प्रमाणे वेळेच्या आत उपचार हे ग्राहकांना हार व फुले बनवून देत असतात ‘
त्यामुळे नागरिक आकर्षक हार घेण्यासाठी प्रफुल्ल अवचार यांच्या दुकानावर गर्दी करत असतात .
14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त .
प्रफुल्ल अवचार यांना विक्रमी नफा मिळाला ‘
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे दुरवरून नागरिक पुष्पहार व फुले घेण्यासाठी आले होते ‘

14 एप्रिल रोजी प्रफुल्ल अवचार यांचे वीस हजाराचे पुष्पहार व फुले व्रिकी झाली !त्यामुळे प्रफुल्ल अवचार हे बेरोजगारीवर मात करण्यासाठी फुल भांडार या माध्यमातून प्रयत्न करत आहे !

शिक्षण हाच जीवनाचा प्रगतीचा मार्ग आहे ठाणेदार जितेंद्र आडोळे

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

डॉ. बाबासाहेबांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन खूप प्रगल्भ आणि आधुनिक होता. ते स्वत: प्रतिकूल परिस्थितीतही खूप शिकले आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याचा जणू त्यांनी आदर्श घालून दिला. त्यामुळे बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो मूलमंत्र आपणास दिला त्यानुसार आपण सुद्धा शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा त्यासाठी भरपूर अभ्यास करा कारण शिक्षण हेच आपल्या जीवनाच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे असे प्रतिपादन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केले
मलकापूर पांग्रा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 व्या जयंती निमित्त सोशल डिस्टंसिंग चा वापर करून अभिवादन करतात ठाणेदार आडोळे बोलत यावेळी त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले दीप पूजा धूप पूजा केल्यानंतर पत्रकार भगवान साळवे यांनी त्रिशरण पंचशील घेतले यावेळी ग्रा प सदस्य राजू साळवे पत्रकार अमोल साळवे बीट जमादार नारायण गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल बनकर पत्रकार वसीम शेख संदीप साळवे आदिनाथ साळवे दिनकर बावरे कैलास साळवे भीमराव साळवे दिलीप काकडे सरपंच बाळू पवार बाळू पैठणे डॉ रामेश्वर उबाळे ग्रापं सदस्य किरण काकडे ग्रा प सदस्य बबन काकडे विष्णू साळवे गुलाब मगर अर्जुन मगर आदीजण उपस्थित होते पांगरा येथील पुतळ्याला देखील अभिवादन करून भीम जयंती साजरी करण्यात आली पत्रकार भगवान साळवे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सरपंच भगवान उगले सरपंच पती बंडू उगले शिवव्याख्याते मधुकर लहाने दिलीप काकडे ग्रा प सदस्य किरण काकडे बबन काकडे राजू साळवे यादव टाले नामदेव उगले साबीर खान पठाण गोलू पठाण राधाकिसन देशमुख यांचेसह रंगनाथ साळवे , नारायण काकडे प्रशांत साळवे आकाश साळवे रामेश्वर गवई प्राचार्य भीमराव काकडे रवी वायाळ ,गुड्डू अंभोरे.

भरधाव महिंद्रा महिंद्रा पिकअप च्या धडकेत महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू ‘

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

मृत्यू कधी कुठे आणि कधी येईल हे सांगता येत नसते .दिनांक 14 एप्रिल ला सकाळी १० वाजेच्या दरम्यान .भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या कोंबड्याच्या महिंद्रा पिकअप गाडीने ‘समोरून येणाऱ्या गणेश नागरे या दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे
गणेश नागरे वय २५ वर्ष राहणार सोयंदेव . हा ।तरुण धडकेत जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना 14 एप्रिल घडली ‘ही दुर्दैवी घटना .साखरखेर्डा ते .मलकापूर पांग्रा मार्गावर .झोटिंगा शिवारात घडली ‘यानंतर बीबी पोलिसांनी महिंद्रा पिकअप च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ‘गणेश नागरे हा तरुणआपल्या दुचाकीने ‘हिवरा आश्रम येथे कृषी महाविद्यालया मध्ये जाण्यासाठी चालला होता ‘परंतु भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकअप च्या .धडकेत गणेश जागीच ठार झाला ।पुढील तपास बीपी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्री पवार करत आहे ।