Home Blog Page 493

ब्रेक द चैन च्या नावावर जनतेची व व्यापाऱ्यांची शासनाने केली फसवणूक अजय वानखडे अध्यक्ष, व्यापारी संघटना जळगांव(जामोद)

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

पाच एप्रिल पासून *कडक निर्बंध लावून फक्त *शनिवार व रविवारी संपुर्ण लॉक डाऊन करण्यात येईल असे मंत्री मंडलातील जेष्ठ, श्रेष्ठ मंत्रीगण काल पासून सांगत होते मात्र आज आता प्राप्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून त्यांनी जनतेची व व्यापारी वर्गाची सफसेल फसवणूक केल्याचे स्पस्ट झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन ची घोषणा करून व्यापाऱ्यांसमोर भले मोठे संकट निर्माण केले आहे. लॉक डाऊन करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे नियोजन केल्या गेलं नाही, विजेचे बिल, नगर पालिका टॅक्स, इनकम टॅक्स, दुकानांचे भाडे, कर्जाचे हप्ते,ज्यांचे हातावर पोट आहे अश्यांचा उदरनिर्वाह कसा होईल याबाबत तरदूत करणे आवश्यक असतांना फक्त दुकाने बंद चा आदेश देने हा अन्याय कारक आहे . तब्बल पंचवीस दिवसांचा लॉक डाऊन करून व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणून ठेवली आहे. वर्ष भरात शासनाने कोरोना संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्यात ह्या बाजूला ठेऊन जनतेला वेठीस धरण्याच्या या धोरणाचा निषेध करावा तेवढा कमीच!
वर्षभरात तालुका स्तरावर कोरोना टेस्टिंग ची एक लॅब उभारली गेली नाही, जिल्हास्तरावर लॅब सुरू केली तिचीही मर्यादा दिवसाला फक्त 1000 swab तपासण्याची आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट ही बेभरवश्याची असल्याचे सिद्ध झाले आहे. तालुका स्तरावरील कोविड सेंटर हे कंत्राटी डॉक्टर वर अवलंबून आहे एक ही *एम. बी.बी. एस डॉक्टर या ठिकाणी नाही.* एक ही व्हेंटलेटर या ठिकाणी नाही. फक्त टेस्टिंग चा सपाटा लावला आहे . Positive आल्यानंतर तुम्हाला पुढे रेफर केलं जाते, पुढे बेड मिळत नाही अश्यावेळी काय करावं हा मोठा प्रश्न आहे. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी जनसामान्यांना वेठीस धरण्याचाच हा प्रकार का समजू नये ! ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या साठी लॉक डाऊन हा *आत्महत्या करण्याकरिता उपलब्ध करून दिलेला पर्याय ठरू नये* एवढीच माफक अपेक्षा !
आणि हो कितीही दिवस लॉक डाऊन करा कोरोना हद्दपार होणार नाही हे सूर्य प्रकाशा इतके सत्य आहे. लसीकरणाची गती अगदी धीम्या गतीनं, कोरोना चीन मध्ये गेला अन परत आला असे मुळीच नाही मग आपण झोपला होतात का ? आरोग्य खात्यात लक्षवेधक उपाययोजना केल्या नाहीतच मग आम्ही तुम्हाला फुकट काय मागतो ! *नियमांचे पालन करून आम्हाला आमचे व्यवसाय करू द्या जगू द्या,* कोरोनाने मरू तेव्हा मरू वीणा कोरोनाने मारण्याची वेळ आमचेवर आणू नका एवढीच मागणी आहे आमची !
पुन्हा सांगतो *लॉक डाऊन ने कोरोना ला हरविता येणार नाही नाही नाहीच !!*
व्यापारी संघटित नाहीत त्याचा गैरफायदा घेतला जात आहे,तुमच्याकडे नियंत्रण करण्याकरिता पुरेशी यंत्रणा नाही. रिपोर्ट यायला पाच सात दिवस लागतात तो पर्यंत इलाज काय करावा हे समजत नाही, काही Positive पेशंट बिनधास्त समाजात वावरताना त्यांना अडकाव करण्याची कुवत तुमच्या कुचकामी यंत्रणेत नाही, फक्त एकच दुधारी शस्त्र *लॉक डाऊन* उपसले म्हणजे आपण खूप मोठे काम केले याचाच आव आणल्या जातो हे आमचे दुर्दैव आहे !!
आगामी दिवसात व्यापारी *रस्त्यावर उतरल्यास* त्याचे कोणाला आश्चर्य वाटायला नको तूर्त एवढंच !!

महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळणे बाबत व जमावबंदी आदेश मागे घेण्यासाठी निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

या निवेदनात नमूद करण्यात आले की मागील वर्षी covid-19 मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,महात्मा फुले जयंती व इतर थोर महापुरुषांच्या जयंती, उत्सव प्रशासनाच्या विनंतीमुळे 100% साजऱ्या झालेल्या नाहीत सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करून जयंती घराघरात साजरी केली आपण covid-19 चे कारण पुढे करून जयंती वर बंदी घालत आहात,असे पाहता येथून पुढे माणसांना या विषाणूसोबत जीवन जगावे लागणार आहे,महापुरुषांच्या जयंती हा सण प्रत्येक वेळी आपण नियमांची अट घालून थांबू शकत नाही आपण जनभावनांचा आदर केला पाहिजे ज्याना आजाराची भीती आहे अशा लोकांनी सार्वजनिक ठिकाणी येऊ नये परंतु जे लोक नियमांचे पालन करून जर कार्यक्रम करीत असतील तर त्यांना हे अडविणे चुकीचे आहे जयंती ही प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करण्याची व जनभावनेचा आदर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे संकट वाढत आहे त्यामुळे लॉकडाऊन लावून जनतेवर निर्बंध लागलेले आहेत आरोग्य सेवा पुरविण्यात शासन अपयशी ठरत आहे वास्तविक पाहता सरकारने आरोग्य सुविधा वर भर द्यावा व इतर प्रतिबंधक उपाय करावे, निर्बंधांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे ,लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत गर्दीमुळे कोरोना वाढत असेल तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी केवळ कडक निर्बंध न लावता जनतेला नियमाचे पालन करण्याचे आवाहन करावे व आपण जनतेवर लावलेले कडक निर्बंध मागे घेऊन जमावबंदी आदेश मागे घ्यावा व जनतेला होत असलेला त्रास थांबावा या निवेदनावर शंकरराव इंगळे ,अरुण पारवे ,देवानंद दामोदर, सुनील बोदडे, साहेबराव भगत महादेव बोदडे ,अभिषेक बोदडे, सुभाष शिरसाट ,विजय तायडे ,विलास तायडे सुरेश वाघोदे इत्यादींच्या सह्या आहेत

लॉकडावून काळात सी .एस .सी . सेंटर चालू ठेवण्याची मागणी ! पंचायत समितीचे सदस्य संतोष आडे यांचे तहसीलदारांना निवेदन !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सध्या महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी दिवसा जमावबंदी . तसेच लॉकडाऊन चे आदेश जारी झाले आहे .त्यामुळे अनेक अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद आहेत ‘अशा परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या csc केंद्र ‘लॉक डाउन काळामध्ये सुरू ठेवण्याची मागणी .पंचायत समिती सदस्य दत्ता आडे ‘व तंटामुक्ती अध्यक्ष संजय पवार .यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .त्यांनी दिनांक 5 एप्रिल रोजी सिंदखेड राजा तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले ‘निवेदनामध्ये म्हटले आहे की ‘अतिशय महत्वाचे असे काम csc सेंटर च्या माध्यमातून होत असते .मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज असतील .मुलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र शाळेतील परीक्षेचे अर्ज ‘जातीचे प्रमाणपत्र .इत्यादी कामे हे सीएससी सेंटर च्या माध्यमातून होत असतात .व ही कामे झाली नाही तर विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते .व त्यांच्या शिक्षणासाठी अडथळा निर्माण होईल ‘म्हणून लोक डाऊन काळामध्ये .csc सेंटर चालू ठेवण्याची मागणी पंचायत समिती सदस्य दत्ता आडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे !

कोरोना चा कहर व उष्णतेची लहर .यामुळे साखरखेर्डा बस स्थानकावर शुकशुकाट !

0

 

शासनाच्या नियमाचे पालन करावे ठाणेदार जितेंद्र आडोळे व सरपंच दाऊत सेठ कुरेशी यांचे आव्हान !

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर जमाबंदी व संचारबंदी लागू झाली आहे ‘तसेच प्रत्येक ठिकाणी वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने सुद्धा काल रात्रीपासून आदेश जारी केली आहे ‘तसेच दहा एप्रिल पर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सुद्धा लोक हैराण झाले असून उष्णतेपासून पासून वाचण्यासाठी लोक शेतातील लिंबाच्या वआंब्याच्या झाडाचा आश्रय घेत आहे ‘सूर्य आग ओकू लागल्या मुळे अंगाची लाही लाही होत असून .मधेच लाईट हि जात असल्यामुळे लोक आणखीन परेशान झाली आहे .त्यामुळे व कोरोना ची संख्या वाढत असल्यामुळे साखरखेर्डा येथील बस स्थानकावरील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद होती ‘म्हणजेच कोरोना ची लहर व उष्णतेचा कहर यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते .अनेक लोकांनी कोरोना मुळे व उष्णतेच्या लाटेमुळे प्रवास करणे टाळले आहे तर शासनाच्या दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे लोकांनी पालन करावे असे आव्हान साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे व साखर खेडा ग्रामपंचायत सरपंच दाऊत सेट कुरेशी यांनी केले आहे ‘

रमजान पवित्र महिन्यातील लोडशेडिंग बंद करण्यात यावी मलकापुर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांची विद्युत अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

14 एप्रिल पासून इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे, रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रात्री तीन ते चार वाजता सहीरी साठी उठतात व दिवसभर अन्नपाणी सेवन न करता उपवास ठेवतात ,तसेच रात्री नमाज तरावीह व कुराण पठण करत असतात . यामुळे मलकापूर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांनी विद्युत अभियंत्याला दिनांक चार एप्रिल रोजी निवेदन देऊन रमजान महिन्यातील लोड शेडींग बंद ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. मुस्लिम बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलां पासून ते ज्येष्ठांपर्यंत उपवास करत असतात परंतु उन्हाळा सुरू असल्याने वाढलेल्या भयंकर तापमानापासून उपवास धरला त्रास होईल व रात्री 3 वाजता स्वयंपाक करणे नमाज पठण करणे या कामात महिलांना त्रास होणे या सर्व बाबींचा विचार करून रमजान महिन्या 14 एप्रिल 20 21 ते 15 मे 2021 पर्यंत पूर्णत लोडशेडिंग बंद करण्यात यावी.. अशी मागणी मुस्लिम बांधवांनी विद्युत अभियंता मलकापूर पांग्रा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली
यावेळी निवेदन देताना जलील वहीद शेख ,फजल खान मजीत पठाण, निशान खान ,शेख तालिब , राजिक पटेल ,एजाज खान, सय्यद आसिफ उपस्थित होते.यामुळे आता पवित्र रमजान महिन्यामध्ये उष्णतेची लाट बघता विद्युत वितरण कंपनी काय निर्णय घेते हे बघणे औचित्याचे ठरेल !

दि . ७ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटे सह विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात दि.०७ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची तर दिनांक १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची व हलक्या पावसाची अधिक शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शेतातील कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, जनावरे सावलीत/गोठ्यात बांधून ठेवावीत.त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी. तसेच मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वत:ची व पशुधनाची योग्यप्रकारे काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलढाणा तसेच बुलढाणा हवामान केंद्राचे हवामान निरीक्षक अनिल जाधव यांनी केले आहे ‘अगोदरच शेतकरी निसर्गापुढे हतबल झालेला असताना परत एकदा पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातुर झाला आहे !

शिंदी गावातील जास्तीत जास्त लोकांनी कोरोना ची लस घ्यावी ! ग्रामसेवक अर्जुन गवई यांचे आव्हान ! लस संदर्भात शिंदी ग्रामपंचायत मध्ये चर्चा !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढत आहे ‘तसेच ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे तेथील रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे .या संदर्भामध्ये ग्रामपंचायत प्रशासन हे सतर्क झाले असून ‘जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड लसीकरण सुरू झाली आहे ‘या पार्श्वभूमीवर ’60 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांनी जास्तीत जास्त कोविड ची लस घ्यावी .या संदर्भात दिनांक 5 एप्रिल रोजी शिंदी येथील ग्रामपंचायत भवनामध्ये छोटी सभा घेऊन चर्चा करण्यात आली .यावेळी ग्रामसेवक अर्जुन गवई यांनी गावातील परिस्थितीचा आढावा घेतला ‘व जास्तीत जास्त नागरिकांनी न घाबरता कोविडची लस घ्यावी असे आव्हान केले ‘व नागरिकांनी तोंडाला मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा घराच्या बाहेर कोणीही विनाकारण फिरू नये असे सांगितले ‘यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘यांनी सांगितले की कोविडची लस पूर्णतः सुरक्षित असून आपण गावातच कोविडचे लसीकरण लवकरात लवकर गावातच सुरू करू असे सांगितले .यावेळी ‘पोलीस पाटील श्री मदन हाडे ‘ग्रामसेवक अर्जुन गवई ‘सरपंच अर्चना ताई खरात ‘सरपंच पती विनोद खरात ‘तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर गावडे ‘समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘व ग्रामपंचायतीचे इतर सदस्य हजर होते ‘

पत्रकार संरक्षण समितीच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी निर्भीड पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांची निवड!

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

_”खिंचो न कमानों को, न तलवार निकालो…!, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो……ना जातीसाठी, ना मातीसाठी लढाई फक्त पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी …. हे ब्रिदवाक्य घेवून कार्य करणाऱ्या ‘ पत्रकार संरक्षण समिती ‘ ने
बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदाची धुरा ख्यातनाम निर्भीड पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांच्या खांद्यांवर सोपवली आहे.
आपले पञकारितेचे शिक्षण औरंगाबाद येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाची उच्च पदवी व विशेष बीएड ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करून दैनिक गावकरी,दैनिक लोकपत्र,दैनिक एकमत,दैनिक लोकमत नंतर स्वतःचे साप्ताहिक तेजस्वी प्रभात, उत्कर्ष प्रभात,दैनिक उत्कर्ष जनतेचा आदी वृत्तपत्रात विशेष लिखाण करुन आपली वेगळी ओळख आणी छबी निर्माण करुन पत्रकारिता श्रेत्रात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करुन केवळ सकारात्मक पत्रकारितेच्या भरवशावर दैनिक लोकमंथन या वृत्तपत्रात निवासी संपादक या पदावर स्थिरावलेले आहे. सुमारे 20 वर्षांपासून विविध वृत्तपत्रांत काम करुन विविध समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले आहे,दैनिक लोकमंथनची बुलडाणा जिल्ह्याची सर्व धुरा प्रामाणिकपणे सांभाळत असतांना दैनिक लोकमंथनचे लोक न्यूज २४ या चॅनेल ची सुध्दा सर्व जबाबदारी पुरुषोत्तम बोर्डे यांच्यावर आली ती सुध्दा ते प्रामाणिक पणे पार पाडत आहेत, अनुभवाच्या भरवशावर पुरुषोत्तम बोर्डे यांच्या कार्याची दखल घेवून आणि पत्रकारांच्या न्याय – हक्कासाठी ते देत असलेला लढा लक्षात घेवून “पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, सह प्रदेश उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ ( नाशिक ) व महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल चौधरी ( पुणे ) व जेष्ठ पत्रकार सुभाष लहाने यांनी पुरुषोत्तम बोर्डे यांची नियुक्ती बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे हे धडाडीचे व निर्भीड स्पष्टवक्ते आहेत, ते जेव्हा भुमीका घेतात तेंव्हा ती सत्याची व अनेकांना न्याय देण्याची असते त्या मुळे त्यांचे विरोधक सुध्दा त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारितेला सकारात्मकतेकडे नेणारे व पत्रकारांना स्वाभिमानाची,हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणारे एकमेव पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे आहेत त्यांची पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आता सर्व पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल ही खात्री आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असुन जिल्ह्याभरातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साखरखेर्डा येथे वार्ड क्रमांक सहा मधील रस्ता कामाचे सरपंच दाऊद शेठ कुरेशी यांच्या हस्ते भूमिपूजन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथेवार्ड क्रमांक सहा मधील .अतिशय महत्त्वाच्या अशा जाण्या-येण्यासाठीअसलेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ‘दिनांक 4 एप्रिल रोजी ‘साखरखेर्डा चे सरपंच दाऊत शेठ कुरेशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले ‘पलसिद्ध मठाजवळील महत्त्वाचा असा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून जैसे थे होता ‘या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असे .हा रस्ता व्हावा म्हणून स्थानिक नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा सुद्धा केला होता .तीनशे मीटरच्या या रस्त्यासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून ‘सरपंच दाऊत शेठ कुरेशी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊजी जाधव ‘पंचायत समितीचे माजी सभापती राजू ठोके व माजी उपसभापती सुनील भाऊ जगताप ‘माजी सरपंच कमळाकर गवई या मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .यावेळी उपसरपंच प्रवीण पाझडे .ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी ‘ग्रामपंचायत सदस्य सय्यद रफिक, उल्हास देशपांडे देवानंद खंडागळे संग्राम सरगये .इब्राहिम शाहा ‘विश्वनाथ आप्पा जितकर ‘शुभम ठाकूर . अमित जाधव आदी हजर होते ‘

यावल शहरातुन अडीच वर्षाच्या बालकाचे अपहरण करून फरार आरोपी दिपक शर्मा यास स्थानिक गुन्हे अन्वेषण व यावल पोलीसांच्या संयुक्त कार्यवाही अटक मुलगा पालकांच्या स्वाधीन

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातुन फैजपुर मार्गावर असलेल्या हरी ओम नगरच्या खुल्या जागेवरून झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण करून फरार असलेल्या संशयीत आरोपीस पोलीसांनी अवघ्या तिन दिवसात शोध घेण्यात यश आले असुन त्याच्याकडील बालकास देखील सुखरूप त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे . या संरर्भात मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील फैजपुर मार्गावरील सुभानी पेट्रॉलपंपा समोरील हरिओम नगर येथील खुल्या जागेवर मुक्कामास असलेले सादीक शाह शाहीद शाह वय २८ वर्ष राहणार गोशालपुर ता . सोहरा जिल्हा जबलपुर यांच्या अडीच वर्षाच्या अरमान नांवाच्या मुलास दिपक शर्मा या संशयीत आरोपीने दिनांक २ एप्रील च्या सकाळी ४ वाजेच्या सुमारास अपहरण करुन फरार झाला होता . त्या बालकाचे वडील सादीक शाह यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उप निरिक्षक अजमल पठान, सहाय्यक फौजदार अशोक बाविस्कर यांनी तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवत भुसावळ येथील राहणारा दिपक बगाराम शर्मा राहणार सिंधि कॉलनी भुसावळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन सहाय्यक फौजदार शरीफ तडवी, पोलीस कर्मचारी युनुस शेख , किशोर राठौड , विनोद पाटील , रणजीत जाधव यांनी सापळा रचुन संशयीत आरोपी दिपक बग्गाराम शर्मा यास पकडुन यावल पोलीसांच्या स्वाधीन केले. यावल पोलीसांनी आरोपीस चौकशी कामी ताब्यात घेवुन त्याच्याकडुन माहीती मिळवली असता तो अपहरण केलेल्या त्या मुलास भुसावळ येथील एका व्यश्याला विकण्याच्या बेतात होता , सदर त्या महीलेने मी या मुलाला घेते पण तुला माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल असे म्हणताच दिपक शर्मा यांने त्या ठीकाणाहुन पळ काढला व नंतर त्यास अटक करण्यात आली असुन , यावल पोलीसांनी अपरहण झालेल्या मुलास त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले असुन आरोपी अटक करण्यात आली आहे .