Home Blog Page 494

यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय१०ते १५ जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असुन , याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या करंजपाणी या परिमंडल कक्ष०३ क्रमांक१०४मध्ये दिनांक ११एप्रिल रोजी दुपारी ३ , ४० वाजेच्या सुमारास या क्षेत्राकरीता मागील चार वर्षापासुन वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय गोरख शिरसाठ वय २७ वर्ष हे आपले सहकारी लेदा सिताराम पावरा , काळु बाळु पवार वनरक्षक लंगडाआंबा, अश्रफ मुराद तडवी , वनरक्षक करंजपाणी असे सर्व मिळुन एकत्र आम्ही लंगडा आंबा क्षेत्रात गस्त करीत असतांना त्या ठिकाणी १०ते १५ अज्ञात जणांचे टोळके दिसुन आले व त्या टोळक्यातील लोकांनी आमच्याकडे पाहुन घटनास्थळापासुन पळ काढला आम्ही सर्व त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता , त्या टोळक्यांकडे असलेल्या गावठी कट्टयाने आमच्यावर झाडा आळ लपुन तुम्ही लोक आम्हाला शिकार करू देत नाही असे जोरा जाराने ओरडुन आमच्या दिशेने दोन फेऱ्या गोळीबार करून आम्हास जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला व त्या ठीकाणाहुन जंगलच्या मार्गाने परप्रांतात पळुन जाण्यात यशस्वी झाले . त्या वेळेस आमच्याकडे कुठलेही शस्त्र नसल्याने आम्ही सर्व झाडांच्या आडोसा घेवुन आपले जिव वाचविले आमच्याकडील मोबाईलला रेंज नसल्याने कुणाशीही संपर्क करता आले नाहीत नंतर काही अंतरावर असलेल्या शेणपाणी सरंक्षणकुटी जावुन फॉरेस्ट रेंजर अक्षय म्हात्रे यांच्याशी तात्काळ दुरध्वनीव्दारे कळविले असता त्यांनी आम्हास तात्काळ लंगडाआंबा मुख्यालयात बोलविले नंतर वरिष्ठांच्या आदेशाने अतिदुर्गम असा खडतर मार्गाने यावल येथे येवुन पोलीसात विजय गोरख शिरसाठ वनक्षक करंजपाणी यांनी त्या अज्ञात १oते १५ परप्रांतीय जणांचे टोळके हे बेकाद्याशीर शिकारच्या उद्धीष्ठाने फिरून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्याची फिर्याद दाखल केली असुन , या घटनेचा तपास पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील ,पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस अमलदार सुशिलघुगे , भुषण चव्हाण ,असलम खान हे करीत असुन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक तपासकामी करंजपाणी या घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आहे .

जळगांव जामोद वनविभागाची अवैध सलाईगोंध तस्करांवर धडक कारवाई. आरोपी फरार..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जा.प्रतिनिधी

आज दिनांक १२/०४/२०२१ चे सकाळी अंदाजे ५.०० वा. चे सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री कटारिया यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन भिंगारा ते निमखेंडी रोडने गस्त करीत असतांना रस्याचे बाजुने दबा धरून बसले असता,वरील वेळेला भिंगाराकडून जळगांवकडे येणा-या रस्त्याने राखीव क.नं.३७१ निमखेडी बिट या ठिकाणी चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार क्रमांक MH-२०BC-३९७ ही दिसून आली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वनअधिकारी/वनकर्मचारी यांना पाहून गाडी सोडून जंगलातून पसार झाला. त्याला वनअधिका याने ओळखले असून तो इसम जामोद येथील तेजराव अशोक लोणे असून तो वरील गाडी व त्याचा मोबाईल हँडसेट घटनास्थळी सोडून फरार झालेला आहे. मोक्यावर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध वनोपज सालई गोंद ८ कट्टे दिसून आले. त्याचा पंचासमक्ष पंचनामा करुन वजन केले असता,२६५ किलो भरले. सदर मालमत्ता जप्त करुन आरोपी विरुध्द वनगुन्हा क्रमांक ६६५/१६६०१ दिनांक १२/०४/२०२१ जारी करुन जप्त वाहन,सालई गोंद मोबाईल हँडसेट जळगांव जामोद येथील लाकूड आगारात आणून ठेवण्यात आलेला आहे. फरार आरोपीचा शोध घेणेसाठी वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी जामोद परिसरात शोध घेत आहेत. आरोपीविरुध्द भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६(१) ड,फ,ग,४१(१),४२(१) (२),५२,६१ ए.६९ व महाराष्ट्र वन नियमावली नियम २०१४ चे नियम ३१,८२ नुसार गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. सदरची कारवाई मा.श्री.अक्षय गजभिये,उपवनसंरक्षक प्रादेशिक बुलडाणा मा.श्री.आर.आर.गायकवाड,सहा.वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) बुलडाणा यांचे आदेशाप्रमाणे श्री.बि.डी.कटारिया,वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद प्रादेशिक व श्री.पी.जी.सानप वनपाल हे करीत आहेत.सदर कारवाईत श्री.ए.आर.खेडकर,श्री.आर.व्ही.फड,श्री.बि.एम.खेडकर हे वनरक्षक व फायर कॅम्पवरील व निमखेडी नाक्यावरील मजुर यांनी सहकार्य केले आहे.फरार आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

वैजापूर येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन वैजापूर येथे महात्मा फुले पुतळा परिसर येथे नगराध्यक्षा सो शिल्पाताई परदेशी श्री दिनेश भाऊ परदेशी आमदार प्रा श्री रमेश बोरणारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक स्वप्निल जेजुरकर राजेश गायकवाड आबासाहेब जेजुरकर बाबासाहेब गायकवाड अ भा माळी महासंघ तालुका अध्यक्ष अशोक देवकर उपाध्यक्ष एकनाथ बनकर संतोष गायकवाड प्रसिद्धीप्रमुख ऋषी भाऊ जुंधारे ज्ञानेश्वर शिरसाट समता परिषद तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदें शहराध्यक्ष पुंडलिक गायकवाड दिलीप अनर्थे विलास मस्के बाळासाहेब शेवाळे आदी उपस्थित होते

अखेर विद्युत तार तुटला सुदैवाने जिवीत हानी टळली ..महावितरण कोणाच्या जीवाची वाट बघत आहे !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

/ दिनांक ११/४/२०२१
तालुक्यात असलेल्या आडगावराजा येथे ५० वर्षापूर्वी विद्युत तार जोडणी करण्यात आली मिञ जिर्ण तार झाल्यामुळे अचाणक तार तुटतात असाच आज दिनांक ११/४/२०२१ रोजी सकाळी ९ च्या सुमारास रेणुका देवीच्या समोरील तार तुटला आणी नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला नाहीतर जिवीत हाणी झाली असती.
आडगावराजा येथील विद्युत तार बदलून नवीन तार बसविण्यात यावे यासाठी सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी सातत्याने लेखी निवेदने दिली तरीही याची दखल घेतल्या गेली नाही शेवटी सरपंच सौ.कासाबाई कहाळे यांनी आंदोलनाचा ईशारा विद्युत वितरण विभागाला दिला त्या वेळेस या विभागाने दखल घेऊन झुकलेले तार व वाकलेले पोल दुरुस्त केले माञ सदर कंञाटदाराने विद्युत तार बदलले नाही जिर्ण तारालाच ताण दिला आणी तार सरळ केले .त्या मुळे जिर्ण तार तसेच राहिले आणी सातत्याने तारतुटण्याचे प्रमाण थांबले नाही आज दिनांक ११/४/२०२१रोजी९ च्या सुमारास रेणुका देवी च्या मंदिरासमोर विद्युत सुरु असतानच अचानक तार तुटला आणी मंदिरासमोर असलेल्या नागरीकांनी धावपळ केल्याने पुढील अनर्थ टळला नाहीतर जिवीत हानी झाली असती. या जिर्ण तारा संबधित कंञाटदाराने बदलल्याच नाही त्या मुळे असला प्रकार सातत्याने आडगावराजात होत असुन यामुळे कधी विद्युत चालू असताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या मुळे जिर्ण तारा बदलावेत अशी मागणी गावकरी करीत आहेत.

… .. ‘सरपंच यांचे म्हणणे खालील प्रमाणे ‘
विद्युत वितरण विभागाने एक कंञाटदाराला जिर्ण तार बदलून पोल सरळ करण्याचे काम दिले होते परंतु सदर कंञाटदाराने फक्त झुकलेले तार सरळ करुन पोल सरळ केले माञ जिर्ण ताराला ताण बसल्यामुळे हा प्रकार होत असुन संबधित कंञाटदाराकडुन अर्धवट काम विद्युत वितरण विभागाने करण्याची कडक सुचणा देण्यात यावी अन्यथा अचानक विद्युत चाअसताना तार तुटुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुदैवाने आज दिनांक ११/४/२०२१ रोजी जिवीत हानी टळली परंतु भविष्यात अचानक तार तुटुन जिवीत हानी झाल्यास यास विद्युत वितरण विभाग जबाबदार राहिल

सौ.कासाबाई मानसिंग कहाळे
सरपंच आडगावराजा तथा अध्यक्ष सरपंच संघटना सिंदखेडराजा तालुका

साहेब लॉकडाऊन करा पण जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तरी कमी करा ! ..खाद्यतेलाचे भाव १५० आसपास ! …….!तळ हातावर पोट भरणार्‍या मजूर वर्गाची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे काही ठिकाणी संचारबंदी सुद्धा सुरू आहे तर शनिवार आणि रविवार ला कडकडीत बंद आहे ‘शिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा दहा ते पंधरा दिवस कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे .अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाची जिने अस्वस्थ करणारे आहे ‘
कारण अशी काही कामगार आहेत की जे कामाला गेल्यानंतर कमावलेल्या पैशातून अन्य धान्य आणून आपल्या घराचा प्रपंच भागवतात ‘
व कामाला गेले शिवाय आपली रात्रीची चूल पेटू शकत नाही अशी परिस्थिती सर्वसामान्य कामगार वर्गाची सध्या झालेली आहे ‘दहा ते बारा दिवस कामगार घरीही राहील ‘परंतु लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक दुकानदार आपले हात धुऊन घेतात ‘
त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढले आहेत .खाद्य तेलाचे भाव तर दीडशेच्या आसपास जाऊन पोहोचली आहे सध्या खाद्यतेलाचे भाव 140 ते 145/ रुपये दराने आहेत ‘साखरेचे भाव सुद्धा वाढलेले आहेत ।दवाखान्या मध्ये सुद्धा औषधी चे भाव वाढलेले आहे ‘
अशा परिस्थिती मध्ये जर खाद्य तेलाचे भाव साखरेचे भाव मिठाचे भाव मसाल्याचे भाव अव्वाच्या सव्वा दराने वाढत असतील तर सर्वसामान्य माणूस कसा काय जगू शकेल ।
सर्वसामान्य माणसाला जगायचं असेल तर आगोदर दुकानातील भाव कमी करावे अशी मागणी होत आहे .
अनेक दुकानदार लॉकडाऊन च्या काळामध्ये मालच नाही असे सांगून मनानेच किमती वाढवत आहे ‘यावर उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज आहे ‘
– (सध्या माझे दुकान गेल्या पाच दिवसापासून बंद आहे त्यामुळे उपासमारीची वेळ माझ्यावर येऊन ठेपली आहे ‘इकडून तिकडून अन्य धान्य घेऊन आम्ही जगू शकतो परंतु जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ह्या किमती शासनाने कमी कराव्या व खुशाल दहा ते पंधरा दिवस लॉक डावून करावे ‘ — ..विलास तोडे ( रेडियम व्यवसायिक )

महात्मा फुले शिक्षणाचे आद्य प्रवर्तक.. प्राचार्य संतोष दसरे…

0

 

 

……. ( सिंदखेडराजा सचिन खंडारे )…..

. स्थानिक येथे दिनांक 11/04/2021 ला महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य संतोष दसरे सर यांनी महात्मा फुले हे स्त्री शिक्षणाचे व शिक्षणाचे आद्य प्रवर्तक आहे. असे त्यांनी वक्तव्य केलं. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक एम. बी. भगत सर, शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष प्रताप पागोरे सर, माजी उपसरपंच तथा पत्रकार दर्शनकुमार गवई, गौतम जाधव, रामा सोरमारे हे सर्वजण उपस्थित होते .

साखरखेर्डा येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

क्रांतीसुर्य स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथे अभिवादन करण्यात आलेभीम नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले ।यावेळी इंडियन गॅस चे संचालक भाजपनेते अंकुर देशपांडे तसेच संजय जयस्वाल यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला ।यावेळी ‘माजी सरपंच कमलाकर गवई ‘माझी पंचायत समिती सभापती राजू ठोके सामाजिक कार्यकर्ते विशाल गवई ‘ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी ‘धोंडीराम गवई ‘हे हजर होते

साखरखेर्डा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धाड . माळखेड फाट्यावर अवैध दारू विक्री करतांना एकास अटक

0

 

(सिंदखेडराजा विशेष प्रतिनिधी)

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माळखेड फाट्यावर चार देशी दारुचे बाॅक्ससह आरोपीस अटक केली आहे . गेल्या आठवड्यात ११ ठिकाणी पोलीसांनी धाड टाकून अवैध दारू साठा जप्त केला आहे .
साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी देशी दारुची अवैध विक्री सुरु असल्याची माहिती ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी साखरखेर्डा येथील दोन ठिकाणी , लोणी , गोरेगाव , हनवतखेड , शेंदुर्जन , वर्दडा , पाठोपाठ माळखेड फाट्यावर छापा टाकला . आज सकाळी ठाणेदार जितेंद्र आडोळे , पीएसआय दिपक राणे , पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण , पोलीस का . अनिल वाघ , राजू मापारी यांनी छापा टाकला असता माळखेड फाट्यावरील तृप्ती हाॅटेलवर अवैध दारू विक्री करतांना संजय माधवराव देशमुख रा . लोणी यांच्याकडून ४बाॅक्स सखु संत्र्याच्या १९२ काॅर्टर किम्मत १३ हजार ४६० जप्त करण्यात आल्या आहेत . आरोपीस तंत्काळ अटकही करण्यात आली आहे . या अगोदर अनेक गावांत फाट्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असता मागिल आठवड्यात ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . कोवीड काळात कडक लाॅकडाऊन असतांना काही व्यक्तींनी सुशिक्षीत बेकार युवकांना या धंद्यात ओढून आपली अर्थीक पोळी भाजून घेण्यासाठी दारु विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याचे समजते . या दारु मुळे सर्वसामान्य व्यक्तींचे कुटूंब बरबाद होत आहे .

कारंजा चौक ठाकरे सायकल स्टोअर्स या दुकानाला आग लागून अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट प्रतिनिधी दि.११ शहरातील कारंजा चौक येथील सुरेश चंपत ठाकरे यांचे मालकीचे ठाकरे सायकल स्टोर्स या दुकानाला आग लागून अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाले.
आज रविवार सकाळी या दुकानातुन धुवा निघत असल्याने तेथे उपस्थित नागरिकांना दिसले.
उपस्थित नागरीकांनी दुकान मालकास घटनेची माहिती दिली.
याचवेळी अग्निशमन विभागाससुद्धा माहिती देण्यात आली. यावेळी सदर आगीत दुकानातील टायर ट्यूब्सचे ३ बोरे,छोट्या सायकल ५० नग, १८० टायर नग,स्पेयरपार्ट्स,२५ हजाराची कंप्रेसर मशीन इत्यादि जळून ५ लाख रूपयाचे नुकसान झाले. माहिती मिलताच दुकानमालक घटनास्थळी पोचले,
परंतु तोपर्यंत सर्व राख झाले होते.
अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोचत आग पूर्णतः विझविली. संचारबंदीमुळे श्री ठाकरे यांचे दुकान बंद असतांना सदर घटना घडली असून शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे डॅशिंग PSI प्रल्हाद मदन यांची पुन्हा एकदा अवैध देशी दारू वाहतूकदारांवर केली धडाकेबाज कारवाई…

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:
जळगाव जामोद पोलीस स्टेशन ने पुन्हा एकदा अवैधरित्या देशी वाहतूक करणाऱ्या विरोधात केली धाडसी कारवाई दिनांक दहा एप्रिल च्या संध्याकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की आसलगाव येथे दोन व्यक्ती मोटरसायकलवर अवैध रित्या देशी दारू घेऊन येतात व बाजारामध्ये थांबून देशी दारुची विक्री करतात अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांना माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे पोलीस नाईक गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत यांना सोबत घेऊन आसलगाव येथे जाऊन मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहन वानखडे यांचे घराकडे पायी जात असताना त्यांच्या घराचे शेरीमधून एका मोटरसायकलवर मोहन वानखडे व सुरेंद्र मेहंगे असे दोन जण दारू घेऊन येताना दिसले त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भरधाव गाडी चालवून ते गाडीवरून पडुन त्यांनी देशी दारुचा माल जागेवरच सोडून गाडी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला नंतर पोलिसांनी सदर देशी दारुचा माल ताब्यात घेतला व मोहन वानखडे यांच्या कुटाराच्या गोठ्याची पाहणी केली असता तेथे त्यांना देशी दारू संत्रा ५००० कंपनीचे १० बॉक्स व गाडी वरून पडलेला एक बॉक्स असे एकूण ११ बॉक्स देशी दारू चा माल किंमत २८ हजार ८८५ रुपयाचा माल मिळून आला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत उपविभागीय पोलिस अधिकारी तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पीएसआय सचिन वाकडे करीत आहेत.