Home Blog Page 496

शेतकरी नेते राकेश तिकैत यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध

0

 

(उप विभागीय अधिकारी यांना ) निवेदन

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट: – दोन एप्रिल रोजी शेतकरी आंदोलनातील नेते राकेश तिकैत हे राजस्थानातील अलवर जिल्ह्यात असताना स्वागताचे नाटक करून अभाविप (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी आघाडी ) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी टिकैत यांचेवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर शेतकरी नेत्यांवर प्राणघातक हल्ला करणे हा सर्व कष्टकऱ्यांचा अपमान आहे. व तो आम्ही सहन करणार नाही. असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून राकेश टीकैत यांना सुरक्षा देण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांनी ही भूमिका घेण्याची वेळ येणे हेच सरकारच्या कार्पोरेट धार्जिण्या आणि शेतकरी कष्टकरी विरोधी नियतीचे पुन्हा एकदा दर्शन देत आहे. देशाचे प्रधानमंत्री म्हणून देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भावा मध्ये देशव्यापी शेतकरी आंदोलन मागील 125 दिवसापासून सुरू आहे. परंतु देशाचे प्रधानमंत्री मात्र शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावू शकत नाही किंवा या समस्येवर तोडगा काढू शकत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल . देशांमध्ये एवढे मोठे शेतकरी आंदोलन सुरू असताना प्रधानमंत्री मात्र निवडणुकीच्या प्रचारसभेत व्यस्त आहे . याचा अर्थ प्रधानमंत्री संपूर्ण भारत देशाचे आहेत की फक्त भारतीय जनता पक्षाचे आहेत असा संभ्रम जनतेत निर्माण होत आहे. त्यामुळेच ते भारतीय शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत काय ? जेव्हा जेव्हा विचारांची लढाई आपण करत आहोत असे भाजप किंवा संघ यांना दिसून आले आहे तेव्हा तेव्हा ते हिंसेवर उतरले आहेत सध्या हल्लेखोर 16 अभाविपचे कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक करण्यात आली आहे. हा हल्ला भाजप व संघाची लोकशाही विरोधी भूमिका स्पष्ट करीत आहे. विचारांची लढाई विचारांनी न लढता हिंसात्मक मार्गाने आंदोलन दडपून टाकण्याचा भाजपा आणि संघाचा प्रयत्न आहे. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो- धिक्कार असो. या निवेदनाद्वारे अशी मागणी करतो की प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून शेतकरी नेते राकेश टीकैत यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे अभाविपचे कार्यकर्ते असेल तर त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले. अभाविपची मातृ शाखा आरएसएस आणि बीजेपी यांचा या कटामागे काही हात आहे काय ? याचा तपास करून जे दोषी असेल त्यांच्यावर तत्काळ आरोपपत्र दाखल करावे व अशा गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकावे अशी मागणी राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे . हे निवेदन देत असताना शेतकरी नेते अनिल जवादे महेश माकडे दिनेश वाघ जयंत धोटे अजय मुळे गोपाल मांडवकर व इतर शेतकरी पुत्र उपस्थित होते

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलामध्ये लागलेली आग विझविनाऱ्या 3 वनमजुरांचा मृत्यू, तर 2 गंभीर जखमी.!

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर आगीत गंभीररित्या जखमी झाले आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पीटेझरी गेटला लागुन असलेल्या थाटेझरी या गावातील जगंलात काल गुरूवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत तीन हंगामी मंजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन मजूर आगीत गंभीररित्या जखमी झाले आहेत. या मजुरांवर नागपूर येथे ऊपचार सुरु आहेत.

व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या थाटेझरी गावातील जंगलात गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली. यावेळी जंगलात काम करणाऱ्या तीन हंगामी मजुरांचा यात होरपळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी बोलाविलेल्या अग्निशमन दलाच्या बंबाचाही स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे गाव नागझिरा व्याघ्र प्रकलपाच्या कोर क्षेत्रात असल्याने वन्य जीवांनाही या आगीचा फटका बसून अनेक वन्य प्राणीही दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान मृतांमध्ये २४ वर्षीय राकेश मडावी, ४५ वर्षीय रेकचंद राने, २२ वर्षीय सचिन श्रीरगे यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये ४२ वर्षीय विजय मरसकोल्हे आणि २५ वर्षीय राजेश हराम यांचा समावेश आहे.

नगराध्यक्षा चे आश्वासन हवेत विरले ! बुलढाणा नगर परिषदेची होणारी ऑनलाईन सभा रद्द ! आंबेडकरी अनुयायी मध्ये प्रचंड रोष !

0

 

 

(बुलढाणा शहर प्रतिनिधी)

स्थानीक जयस्तभ चौक परिसरातील हीरोळे पेट्रोल पंपा जवळील जागा बाबासाहेबान चा भव्य पूतळा तथा स्मारक साठी देण्यात यावी या साठी सम्राट संघटना बूलङाणा जिल्हा तथा बूलङाणा शहरातील जवळपास 19वार्ङातील अर्ज शिवाय जवळ पास 15-16नगर सेवकानी सही सह पञ नगर परिषद ला सादर नगर परिषद ने उत्तर न दिल्या 30मार्च पासून आशिष खरात यानी 5दिवस बेमूदत उपोषण केले नगर अध्यक्ष पती मोहम्मद सज्जाद आणी विशेष मिंटीग मध्ये बोलावून आपले अर्ज सभाग्रुहात ठेवून चर्चा करू असे आश्वासन दिल्या नंतर उपोषणा ची यशस्वी सांगता झाली माञ त्याच दिवशी मा जिल्हाधीकारी साहेबान चा कोरोना बाबतीत नवीन आदेश आल्या मूळे दिनांक 8एप्रिल रोजी ऑनलाइन मिंटीग चे आयोजन करण्यात झालेल्या ऑनलाइन मिंटीग मध्ये कोरम पूर्ण न झाल्या मूळे मिंटीग रद्द करण्यात आली या आधीच नगर सेवकान वर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्या ची बातमी प्रसिद्ध झाली होती ती खरी ठरली ज्या नगर सेवकानी लेखी स्वरूपात पञ दिले त्या पैकी यमुनाबाई शंकर काकस काँग्रेस नगर सेवीका गौसीया बी शेख सत्तार राष्ट्रवादी नगर सेवीका निर्मलाबाई जाधव वंचीत बहूजन आघाङी नगर सेवीका शिधूबाई खेङेकर भाजप नगर सेवीका अरविंद होङे भाजप सरला मंदार बाहेकर भाजप गोविंद सराफ भाजप या नगर सेवकानी ठराव पारीत करावा असे लेखी स्वरूपात नगर परिषद ला पञ दिले तर काँग्रेस चे काही नगर सेवक राष्ट्रवादी चे दोन नगर सेवक भाजप चा एक नगर सेवक वंचीत बहूजन आघाङी चा एक नगर सेवक हे दबावात आल्या मूळे ऑनलाइन मिंटीग ला उपस्थित राहले नाही हा एक प्रकारे बाबासाहेबान च्या अनुयायी चा विश्वास घात केल्याचे आशिष खरात यानी म्हटले आहे हीरोळे पेट्रोल पंपा जवळील जागे चा लढा संपला नाही तर तीव्र करण्या चा निर्नय घेतला असून ज्या नगर सेवकानी लेखी स्वरूपात पञ देवून ऑनलाइन मिंटीग मध्ये उपस्थित झाले नाही त्याचेवर पक्षा ने कार्यवाही करण्या ची मागणी करत असताना दिलेल्या पञाच्या आधारावर न्यायालयात जाणार असल्या चे म्हटले आहे बूलङाणा शहरात कोट्यावधी चे अनेक भूखंड विविध संस्था ला दिले कोट्यावधी ची इमारत दिली बाबासाहेबान चा भव्य पूतळा तथा स्मारका साठी जागा देण्या ची मागणी सर्व स्तरावरून होत असताना नगर सेवकान वर दबाव आणून ऑनलाइन मिंटीग रद्द करण्यात येते ही शोकातीका आहे नगर अध्यक्षा ला विशेष अधिकार आहेत त्या अधीकारा चा वापर करून जागा दिल्या जावू शकते माञ त्यानी तस न करता ऑनलाइन मिंटीग कोरम अभावी रद्द केली या मूळे समाजा सह बहूजन समाजा चा रोष आहे

होम क्वारंटाईन केलेल्या कोरोणा बाधीत रुग्णांच्या हातावर होम क्वारंटाईन चे शिक्के मारणे बाबतचे श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूचे उपजिल्हाधिकारी, सेलू यांना निवेदन

0

 

अजहर पठान सेलू/परभणी

श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची उपजिल्हाधिकारी सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, सेलू मध्ये *कोरोणा टेस्ट केल्यावर जे पण रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत. त्या रूग्णांना त्यांच्या इच्छेनुसार होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. पण हे रुग्ण घरी न बसता पुर्ण गावात कोरोणाचा प्रसाद वाटत फिरत आहेत. या रुग्णांवर कोणाचेच नियंत्रक नाही. म्हणून कोरोणाचे रुग्ण वाढत आहेत*म्हणून जे पण होम क्वारंटाईन रुग्ण आहेत त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन चा शिक्का मारण्यात यावा. जेणेकरून हे लोक गावात फिरणार नाहीत. तसेच या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी गाव वाईज व वार्ड वाईज माणसाची नेमणूक करण्यात यावी *जेणेकरून कोरोणाचे नियंत्रण करण्यासाठी शासनाचे जे प्रयत्न चालले आहेत. त्या प्रयत्नांना यश येईल*तसेच कोरोणाचा प्रसार कमी होईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे
*यावेळी जयसिंग शेळके, अक्षय सोळंके, सिध्देश्वर कदम, सुमित लंगोटे, बाबा शेळके उपस्थित होते.

आंतरराज्य इराणी अट्टल गुन्हेगार टोळीतील दोन चोरट्यांनाअटक

0

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.०८ एप्रिल

आंतरराज्य इराणी गुन्हेगारी टोळीतील दोन चोरट्यांना अटक करीत त्यांचेकडुन २लाख २८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली असून चोरट्यांनी शहरातून मोबाइल हिसकावून नेल्याचे प्रकरणी छानबीन केली असता हे चोरटे आंतरराज्य स्तरावर गुन्हेगारी करीत असल्याचे उघड़कीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.६ एप्रिलचे सायंकाळच्या
दरम्यान शहरातील विविध ठिकाणावरुन ३ मोबाईलसंच दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकलने येवुन हिसकावून
नेल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सदर तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. ०३४७/२०२१ कलम ३७९ अ
भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास केला.
हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
पो.हवा. शेखर डोंगरे यांनी त्यांचे पथकासह परिसरात माहीती घेत आरोपीचा शोध घेतला, सदर गुन्हयातील मुद्देमाल चोरणारे चोरटे हे शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगांव चौक येथून वडनेर मार्गाने गेल्याची
माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरुन वडनेर रस्त्यावर चोरट्यांचा शोध घेतला असता, त्यांना दारोडा टोल
नाक्याजवळ दोन इसम बजाज पल्सर मोटरसायकलने संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांची विचारपुस केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देवू लागले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचेजवळ ७ मोबाइल संच मिळाले.
सदर आरोपी शेख साखी जहागीर बाशा(३३)रा. गंगानगर, गुंटकल, अनंतपुर (आंध्र
प्रदेश ) तसेच मोहम्मद शब्बर मोहम्मद शब्बीर(१९) रा. बांगरडीपल्ली, झहीराबाद, मेडक ( आंध्र प्रदेश ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना ताब्यात
घेऊन सखोल विचारपुस केली असता, त्यांनी ३ मोबाईल हे हिंगणघाट शहरातुन चोरल्याचे
सांगीतले तर २ मोबाईल तेलंगना राज्यातील मैनूर व आदिलाबाद येथुन चोरल्याचे सांगीतले. तसेच
मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्यांनी ती दासनगर, बोरगांव जि. निझामाबाद येथुन चोरल्याचे सांगीतले. तसेच आदिलाबाद शहरामध्ये एका वृध्द महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची चेन चोरल्याचीसुद्धा
कबुली दिली. त्यांचे स्वतःचे २ मोबाईल व नगदी रकम २ हजार ५०० रूपये, २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सात
अॅन्ड्राईड मोबाईलसंच, बजाजपल्सर मोटरसायकल तसेच नगदी रकमअसा एकुण २ लाख २८ हजार ५०० रूपयेचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला.
त्यांचेकडुन हिंगणघाट पोलिसांचेअंतर्गत ०१ गुन्हा तसेच तेलंगाना राज्यातील ०४ गुन्हे उघडकीस आले आहे.
सदर आरोपी हे इराणी टोळीचे सराइत गुन्हेगार आहेत त्यांचे विरूध्द इतर राज्यातसुद्धा बऱ्याचश्या गुन्ह्याची नोंद आहे.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक. अमोल लगड,डि. बी. पथकाचे पोहवा शेखर डोंगरे, नापोशी
निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर, विजय काळे यांनी केली.

नांदुरा येथे शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचा आदेशावरून
विधानसभा मतदार संघाचा वतीने शिवसेना जिल्हा ऊप प्रमुख श्री वसंतरावजी भोजने यांच्या मार्गदर्शनात
संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असल्याने शिवसेना वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आणि कॉटन मार्केटचे नवनियुक्त मुख्य प्रशासक व सर्व नवनियुक्त प्रशासकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे म्हणून दि ८ एप्रिल रोजी शिवसेना चे वतीने नगर परिषद टाऊन हाँल मधे रक्तदान शिबिर घेण्यात आले .
शिबीराचे उद्घाटन मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूभाऊ एकडे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी पदमराव पा. लालाभाऊ ईगळे., विजय साठे, किशोर नवले, मुन्ना पांडे , बाळू पाटील वक्टे. गजानन राव करांगळे, संतोष दिघे ,दिपक जुमडे, सोपानराव पाटील, गणेश ताठे, अनिल देशमुख, ,ईश्वर पांडव ,सोनू चोपडे ,संदीप पाटील , राजू फुलोरकर ,ऊमेश हिरूळकर ,मुकेश ललवाणी , क्रुपलानी साहेब ,हजर होते
तर रक्तदान अभिराजे हिवराळे, ईश्वर पांडव ,संदीप काटे ,अनिकेत किरके ,मोहन चोपडे ,डॉ. विजय चोपडे व अन्य १७ लोकांनी रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडन्या करीता रवींद्र भोजने, धनंजय राणा, दत्ता जुमडे ,संजय गुजर ,संतोष लाहूडकर , सागर वावटळीकर ,अजय गायकवाड ,सुपडा रायपूरे , विनोद मानकर ,अर्जुन गव्हाळ , भिका पाटील , हजर होते. संचलन अर्जुन तागडे यांनी केले तर आभार संतोष बोराडे यांनी मानले. रक्तदान घेण्याकरिता सामान्य रूग्णालय खामगाव येथील टिम आली होती. यावेळी सर्व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना, महीला आघाडी, कामगार सेना, वाहतुकसेना, किसान सेना, व्यापारीसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

लॉकडाऊन च्या काळात सरकारने दिव्यांग,गोरगरीब जनतेसाठी उपाययोजना करा

0

 

अपंग नेते शेख अनिस पत्रकार याची सरकार ला मागणी
अमरावती :-गेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल गोरगरीब जनतेचे दिव्यांग बंधू-भगिनी चे आणि हातावर पोट असणाऱ्यांना गोरगरीबांचे झाले आहेत.पुन्हा त्यांना कसलाही त्रास न व्हावा यासाठी राज्य सरकारने आताच काही उपाययोजना त्या गरजू व्यक्तींसाठी करण्याची आवश्यकता आहे. आज त्यांच्यासाठी काही केले गेले नाही तर ते उपाशीपोटी होरपळून जातील व कोरोणा या बिमारी पेक्षाही उपासमारी ही अत्यंत घनघोर बिमारी असून त्यापासून ते आपले जीवन सुरक्षित ठेवू शकत नसल्या कारणाने सर्वप्रथम त्यांच्या जीवनाकडे व आरोग्याकडे लक्ष पुरविणे हेच आरोग्य दिवसाचे सरकारचे एक महत्त्वपूर्ण सामाजिक भूमिका राहील.एकीकडे महाराष्ट्र मध्ये सूर्याची किरणे अत्यंत तापत असताना काम नसल्याकारणाने व पैशाअभावी एक वेळेस जेवन पोटात नसताना त्या भयानक तापमान परिस्थितीला तोंड देण्यासाठी सभाव्य व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते व त्यांना आपले प्राण गमवावे लागतात.खऱ्या अर्थाने सर्व सामाजिक संस्थांनी सरकारी यंत्रणांनी या गोष्टीचा विचार करून गोरगरीब जनतेला व दिव्यांग व्यंक्ती, निराधार महिला या सर्वांना सहकार्य करावे असे आव्हान अपंग नेते तथा अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य शेख अनिस पत्रकार यांनी सरकारकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केले आहे.

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचा अपघात ! १ जण जागीच ठार तर १ जण जखमी ! चिखली एमआयडीसी जवळील घटना ‘

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मेहकर -चिखली या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर र असलेल्या चिखली एमआयडीसी जवळ आज दिनांक ८ एप्रिल ला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली !
सविस्तर वृत्त अशी की, मोहाडी येथील विक्रम कोंडू इंगळे व सखाराम इंगळे हे मोहाडी वरून चिखली कडे जात असताना चिखली एमआयडीसी जवळ कुत्रा आडवा आल्यामुळे दुचाकी हिरो होंडा क्रमांक MH २८ M २५२४ या मोटरसायकलचा अपघात होऊन १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामध्ये सखाराम इंगळे वय वर्षे ७२ हे जागीच मृत्युमुखी पडले. तर विक्रम कोंडू इंगळे वय वर्षे ५८ हे गंभीर जखमी झाले आहे. दोघेही सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडी या गावचे रहिवासी आहेत . विक्रम इंगळे यांना जखमी अवस्थेत औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. तर सखाराम इंगळे यांना शव विच्छेदनासाठी चिखली येथे नेण्यात आले आहे. मृतक सखाराम इंगळे यांच्या पश्चात पत्नी २ मुले व ३ मुली असा आप्तपरिवार आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ‘ मृतकावर वर रात्री नऊ वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले

शिंदी येथील शेतकऱ्याची अज्ञात व्यक्तीने हरभऱ्याची सुडी जाळली ! ५०,००० हजाराचे नुसकान ‘अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शिंदी येथील अल्प सुधारक शेतकरी प्रकाश कडूबा बंगाळे यांच्या शिंदी येथील शेतातील गट नंबर 136 मधील हरभऱ्याची सुडी ‘अज्ञात व्यक्तिने जाळून टाकल्याची घटना ‘ ७ एप्रिल च्या मध्यरात्री शिंदी येथे घडली ‘
प्रकाश कडूबा बंगाळे हे नेहमीप्रमाणे शेतामध्ये पाहणी करण्यासाठी सकाळी ६.३० मि . वाजता गेले असता त्यांना शेतातील 2 एकरातील लावलेली हरभऱ्याची सुडी जळालेल्या अवस्थेत दिसली ‘दोन एकरातील हरभऱ्याची सुडीची अंदाजे किंमत 50 हजार रुपये इतकी आहे यामध्ये सात वर्षाचे संत्राचे झाडे सुद्धा होरपळून गेली .
या घटनेची माहिती तातडीने तलाठी श्री नागरे यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला तसेच प्रकाश बंगाळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशन चे पो. कॉ अरविंद चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी बद्री वायाळ पोलीस पाटील मदन हाडे श्रीधर खरात पत्रकार सचिन खंडारे हजर होते व सुडी जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 435 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला !

अगोदरच शेतकरी लाकडावून काळामध्ये आपला माल हमी भावांमध्ये विकू शकत नाही अशातच अल्पभूधारक शेतकरी असलेले प्रकाश बंगाळे यांच्या शेतातील जवळपास पन्नास हजार रुपयाची हरभऱ्याची सुडी जाळल्यामुळे ‘प्रकाश बंगाळे यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे ‘उडी मध्ये ओलसरपणा असल्यामुळे चार-पाच दिवस सुडी वाळत घालू व सुडी काढल्यानंतर बाजारात विकून आलेल्या पैशातून शेतीच्या भरवशावर असलेली उधारी देऊन टाकू असा मानस प्रकाश बंगाळे यांनी व्यक्त केला होता ।परंतु जळालेली सुडीची अवस्था पाहून तेही हतबल झाले ‘यामुळे हरभऱ्याच्या सुडी बरोबर शेतीतील साहित्य तसेच ठिबक सिंचन चे केबल सुद्धा जळाली आहे !पुढील तपास साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण हे करत आहेत ‘

रताळी येथील यादीतून वगळण्यात आलेल्या लोकांचा घरकुल योजनेत समावेश करावा ‘सरपंच सौ अलकाताई लव्हाळे यांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

रताळी येथील पंतप्रधान घरकुल यादी आराखडा मंजुर होऊन त्या घरांची प्रत्यक्षात एक ग्रामसेवक व आपरेपर यांच्या नेमणूक करण्यात आली होती व त्यावेळी प्रत्येक घरात बसून आँनलाईन टँगिंग करण्यात आले परंतु हि बाबा टेक्निकल म्हणजे जे फोटो घेतले ते अपलोड करुन त्याची पोच पावती नेमनुक केलेल्या ग्रामसेवक दिली .ते अपलोड झाले किंवा नाही ते आँपरेटर व ग्रामसेवक यांना च माहीत होते .आणि आता प्रत्यक्षात राताळी येथील २४० घंराची जी ओ टँगिंग करण्यात आलि आणि आता आँनलाईन यादी जाहीर झाली त्यामध्ये राताळी येथील फक्त१८० घरकुले आँनलाईन दिसत आहे .यादिमधील जवळपास ६०लोकांना या यादिमधुन वगळण्यात आले आहे. त्या.वगळण्यात आलेल्या अनेक लोकांनजवळ एक गुंठा सुध्दा जमिन नाही अत्यंत गरज असेलच लोक या यादित आँनलाईन दिसत नाही हि खरी चुक आँपरेटर ची आहे त्यामुळे अशा वगळण्यात आलेल्या लोकांना या या यादित सहभागी करून घ्यावे असे निवेदन आज राताळी सरपंच अलका लव्हाळे यांच्या वतीने भानुदास लव्हाळे यांनी आज सिंदखेडराजा बीडीओ घुनावत साहेब यांना दिले यावेळी चर्चा करतांना केवळ राताळी या गावाच्या यादिचाच प्रश्न नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरात निर्माण होणार आहे. जसजसे लोकांच्या पर्यंत हि आँनलाईन यादी जाईल त्यावेळी त्या गावाच्या सरपंच व सदस्य यांची चुक नसतानाही गावकऱ्यांचा रोष सरपंच व सदस्य यांच्यावर येणाऱ आहे त्यासाठी आपण या प्रकरणात लक्ष घालुन ही बाब गांभीर्याने विचारात घेऊन वरिष्ठाकडून या यादीत या.लोकांचा सहभागी करून घ्यावा. त्यात मध्ये ओबिसी समाजासाठी हि योजना गेल्या दहा वर्षे पासुन बंद असल्यात जमा होती.ग्रामीण भागात घरकुल ओपण ओबीसी चेघरे झाले नाही फक्त मागील वर्षी पंतप्रधान घरकुल योजना ब ‘ची घरेच सुरु झाले आहेत त्यामुळे खुला प्रवर्ग, ओबीसी समाजातील गरीब लोकांना आता ह्या योजणेपासून खुप अपेक्षा आहे आपल स्वतः च हक्काच घर पण ते ह्या आँनलाईन यादीत समावेश झाला नाही तर याच्यांमध्ये रोष तयार होईल म्हणून. हे नावे आँनलाईन यादीत घ्यावी हि विनंती राताळी सरपंच सौ अलका लव्हळे यांच्या वतीने करण्यात आली आहे .