Home Blog Page 495

भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

काल तालुक्यातील भालशिव शिवारातील शेतात गांजा लागवड करणाऱ्या संशयीतास अटक करून आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता त्यास तिन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . याबाबत मिळालेली माहीती अशी की दिनांक ९ एप्रील रोजी यावल तालुक्यातील भालशिव शिवारात पोलीसांनी गुप्त माहितीच्या अधारावर चौकशी करून केलेल्या कार्यवाहीत चैत्राम गेंदा सोनवणे वय६० वर्ष यांनी स्वताच्या शेतात सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या ४२ किलो ५०० ग्राम गांजाची लागवड केल्याचे आढळुन आल्याने पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने कार्यवाही करीत गांजाची झाडे जप्त करून शेतमालक चैत्राम गेंदा सोनवणे यास अटक केली होती , त्यास आज पोलीसांनी भुसावळ न्यायलयात हजर केले असता न्यायधिशांनी संशयीत आरोपीस १२ एप्रील पर्यंत तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .

यावल पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी वाहनांचे होणार लिलाव वाहनांची ओळख पटविण्याची शेवटीची संधी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पोलीसांनी विविध अपघात किंवा इतर गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेल्या दुचाकी मोटर वाहनांचा बेवारस असलेल्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने येत्या पाच दिवसात शासकीय नियमानुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहीती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी पत्रकारांशी माहीती देतांना म्हटले आहे . दरम्यान यावल पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रा मागील काही वर्षात घडलेले गुन्हे घात अपघात या विविध प्रकारच्या कार्यवाहीत पोलीसांनी जप्त केलेल्या किंवा हस्तगत केलेले वाहन पोलीसांनी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहकार्यातुन प्राप्त झालेल्पा दुचाकी मोटर वाहनांच्या चेचीस क्रमांकाचा आधार घेवुन वाहनमालकांचा शोध घेतले असता ते अद्याप तरी मिळुन आलेले नसल्याने सदर पोलीस स्टेशनच्या आवारात अनेक दिवसांपासुन पडुन असलेले दुचाकी मोटर वाहन हे खराब स्थितीत आहे . तरी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडुन वाहनांचे मुल्यांकन अनुसार येत्या चार ते पाच दिवसात या दुचाकी वाहनांचा शासकीय प्रक्रीयेनुसार लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दिली असुन, येत्या दोन दिवसात संबधीत नागरीकांना वाहनांची ओळख पटविण्याचे अखेरचे आवाहन करण्यात येत आहे . यावल पोलीसांनी जप्त केलेली वाहनाची क्रमांकवारी पुढीलप्रमाणे हिरो होन्डा ब्लॅक निळ्या रंगाचा पट्टा क्रमांक एमएच १९डब्लयु२२५०चेचीसक्रमांकo२डी २०एफ०९६१६ , हिरो होन्डा एमपी४६ एमजे२४८५चेचीसक्रमांक एमबीएलएचए११ एएनएफ९बी४३०१, तिसरे वाहन देखील हीरो होन्डाचेच असुन तिचा क्रमांक आहे एमएच १९ एजे१८२६व चेसीसक्रमांक०५ एफ सिओ५६७७ , हिरो होन्डा क्रमांक नसलेले वाहन चेचीसक्रमांक एमबीएलएचए१८बीएफएफएच५० २७०७ असे असुन पाचवे वाहन देखील हिरो होन्डा कंपनीचे असुन त्याचे क्रमांक एमएच १९ ए एफ५६७७ असे असुन चेचीसक्रमांक०७ सि०९ सि१९४० असे आहेत तर सहाव्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी वाहनाचे क्रमांक नसुन या वाहनाचे इंजीन क्रमांक एचए१०ई ए८९८४७४८७ असे आहे या क्रमांकानुसार जर या वाहनांची ओळख होत असेल तर त्या व्यक्तिने आपल्या आधार कार्ड सहीत आवश्यक ती वाहनाशी संबधीत कागदपत्रे घेवुन पोलीस स्टेशनला दोन दिवसात हजर व्हावे असे आवाहन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी केले असुन् , या बेवारस स्थितीत असलेल्या दुचाकी वाहनांचा अखेर लिलाव करण्यात येणार आहे असे ही पोलीस निरिक्षक पाटील यांनी सांगितले आहे .

वर्धा मार्गावरील नेरी धोत्रा दरम्यानअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्या गाडी चाअपघात

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.10
पोलिसांनी पाठलाग करतांना अवैध दारूवाहतुक करणाऱ्या कारला वर्धा मार्गावरील नेरी-धोत्रा दरम्यान गंभीर अपघात झाला.यात वाहनचालकसुद्धा जखमी झाला.
सदर प्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत 3 लाख 20 हजार रुपये किमतीचा दारूसाठा कारसह जप्त केला. सदर घटना दि.8 रोजी रात्री 2 वाजता घडली.
वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुला मिळालेल्या माहितीनुसार दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन क्र. एमएच-31-8390 पुलगाव येथून मांडगाव तरोडा या मार्गाने जात असल्याची माहिती मिळाली.यानुसार सदर अवैध दारू वाहतुक करणाऱ्या कारचा पाठलाग करीत असता नेरी धोतरा दरम्यान कारला अपघात होऊन कारने पलटी खालली.
यावेळी चालक अक्षय रामेश्वर पोहाणे रा.धोत्रा हा जखमी झाला.
यावेळी पोलिसांनी वाहनासह अवैध दारू जप्त केली. दारू तसेच कारची किंमत एकूण 3 लाख 20 हजार 750 रुपये असल्याची माहिती
अल्लीपुर पोलिसांनी दिली. पोलिसांचेवतीने आरोपीच्या पोलिस पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकड़े केली परंतु न्यायालयाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कोठड़ी मंजुर केली.
सदर प्रकरणी पुढील तपास अल्लीपुर पोलिस स्टेशन करीत आहेत.

केंद्र सरकारकडून कोरोना व्हाक्सिंन लसीकरण चा मोठ्या प्रमाणात गाजावाजा तर लसीकरण केंद्रावर तुटवडा

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.१० एप्रिल राज्यात कोरोना व्हाॅक्सिनचा तुटवडा निर्माण झाला असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उद्यापासून दि.११ महात्मा फूलेंच्या तसेच १४ एप्रिल डॉ.आंबेडकर जयंतीपर्यंत लसिकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहेत.
अलिकडेच लसिचा तुटवड़ा निर्माण झाल्यावर तालुक्यातसुद्धा याची झळ पोचल्याचे दिसुन येत आहे. शहरात तसेच तालुक्यातील सर्वच कोरोना लसिकरण केंद्रावरीलसुध्दा कोरोना लसी संपल्याने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जात असलेल्या नागरीकांना लसिकरण केंद्रावरुन निराश होऊन परत यावे लागत आहे.
यासंबंधी आरोग्य विभागाशी संपर्क साधून विचारपूस केली असता राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसिचा साठा संपल्याने लसिचा पुरवठा बंद आहे.येत्या एक दोन दिवसात व्हाॅक्सिन उपलब्ध होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली असून राज्याला लसिचा साठा उपलब्ध होताच शहरातील कोरोना लसिकरण केंद्रावर तातडीने म्हणजे १-२ तासाचे अवधित लस उपलब्ध करून देण्यात येईल असेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
आज मात्र मोठ्या आशेने लसिकरण करुन घेऊ इच्छीणाऱ्या लाभार्थ्यांना निराश होऊन परतावे लागले.
मोठा गाजावाज़ा करुन लसिकरण मोहिमेस सुरुवात केल्यानंतर लगेच लस संपल्याने नागरीक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
राज्यात सर्वत्र कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून तालुक्यातसुद्धा हिच परिस्थिति आहे.

दत्तापूर येथे कोरोना लसीकरणाला प्रारंभ !जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी पं.स . सदस्य संतोष आडे यांचे आव्हान !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे अशातच लसीकरणासाठी सुद्धा नागरिकांची झुंबड दिसून येत आहे !जास्तीत जास्त नागरिकांनी देऊन सहकार्य करावे .असे आव्हान दत्तापूर पंचायत समितीचे सदस्य संतोष भाऊ आडे यांनी केले आहे ‘दत्तापूर येथे दिनांक 10 एप्रिल पासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये लसीकरणाला प्रारंभ झाला आहे !
ज्यावेळी लोकांनी न घाबरता जास्तीत जास्त लस घेऊन कोरोना ला हद्दपार करावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य संतोष आडे यांनी केली आहे ‘
यावेळी रामचंद्र पवार ,तंटामुक्ती अध्यक्ष संजय पवार .जगन पवार ‘डॉक्टर शिंगाडे डॉक्टर वाघमारे .आदी हजर होते ‘

यावल पोलीसांच्या कार्यवाहीत मिळाले भालशिवच्या शेतात अडीच लाखाची गांजा लागवडीची झाडे पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील भालशिव शिवारातील एका व्यक्तिच्या शेतातुन गांजा लागवडीचे आढळुन आल्याने पोलीसांनी त्या शेतमालका विरूद्ध गुन्हा दाखल केला असुन पोलीसांच्या या कार्यवाही मुळे अवैध धंद्यावाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील भालशिव शिवारात चैत्राम गेंदा सोनवणे वय६० वर्ष यांनी आपल्या शेतात मानवी आरोग्यावर परिणाम करणारे अमली पदार्थाची आपल्या शेतात लागवड केली असल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळाली असता आज दिनांक ९ एप्रील रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान , पोलीस अमलदार असलम खान , भुषण चव्हाण , अशोक बाविस्कर , सुशिल घुगे, राजेश वाढे तर सरकारी पंच म्हणुन परसाडे येथील तलाठी समीर निजाम तडवी व स्वप्निल शशीकांत तायडे यांच्या पथकाने गावाचे पोलीस पाटील सचिन हिरालाल तायडे यांच्या मदतीने शेतात जावुन पाहणी केली असता त्या ठीकाणी ४२ किलो५०० ग्राम वजनाचे ओले गांजाचे झाड किमत२ लाख५५ हजार रुपये इतकी हे शेतात लागवड केल्याचे मिळुन आले असता , पोलीसांनी पंचनामा करून सर्व झाडे तोडुन दोन गठ्ठे दोरीने बांधुन सिल केली असुन , याबाबत सहाय्यक फौजदार कैलाससिंग उमरावसिंग चव्हाण यांनी फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी चैत्राम गेंदा सोनवणे यांच्या विरुद्ध अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम१९८५चे कलम ८ ( ख ) २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल खान , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ , सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार असलम खान , पोलीस अमलदार संजय तायडे , भुषण चव्हाण , अशोक बाविस्कर हे करीत आहे .

श्री शिवाजी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा:-स्थानिक श्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोताळा येथे अर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाली म्हणून अमृतमहोत्सव साजरा करण्याचे आव्हान भारताचे पंतप्रधान यांनी केले.त्या अनुषंगाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक महाविद्यालयास विविध कार्यक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या करता श्री शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले. ही निबंध स्पर्धा प्राचार्य डॉ.सुनिल मामलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे संयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम चाटे होते.तर या स्पर्धेचे समन्वयक रसायनशास्त्र विभागातील प्रा.नागेश गट्टूवार व सहसमन्वयक म्हणून रसायनशास्त्र विभागातील प्रा.निलेश राहाटे व प्राणिशास्त्र विभागातील डॉ.अरुण गवारे यांनी जबाबदारी पार पाडली. कोविड -१९ च्या प्रादुर्भावाचा विचार करून राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील एकूण १५० विद्यार्थी मित्रांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या घरून स्व:हस्तलिखित निबंध तयार करून ऑनलाईन पाठविले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक एस.एन.मोर महाविद्यालय भंडारा येथील कु.स्नेहा चंदनलाल चौधरी हिने प्राप्त केला.दुसरा क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय चिखली येथील कु.साक्षी सुनिल चव्हाण हीने प्राप्त केला.तिसरा क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील कु. गायत्री विठ्ठलराव देशमुख हिने प्राप्त केला. या सर्व विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस ऑनलाईन स्वरूपात देण्यात आले.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण आभासी पद्धतीने करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव भारतभर साजरा होत असताना श्री शिवाजी महाविद्यालयाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करून तरुणांना भारताच्या इतिहास,वर्तमान व भविष्य या बद्दल व्यक्त होण्यास संधी उपलब्ध करून दिली.सहभागी स्पर्धकानी अंतर्मुख करणारे विचार आपल्या लिखाणातून मांडले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रत्येक घटकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले.

अवधा बुद्रुक गट ग्रामपंचायतचा जातीवादी व मनमानी कारभार. . . . . कोविड नाईंटीन च्या काळात दलित वस्ती मध्ये घाणीचे साम्राज्य

0

 

सुनिल पवार नांदुरा

ग्रामपंचायत अवधा बुद्रुक हेतूपुरस्पर कुंभकर्णाच्या झोपेत . . . कुठलाही सरपंच सचिव मेंबर पाहण्यासाठी आज पर्यंत दलित वस्ती मध्ये आलेला नाही . . . सहा महिन्यापासून कुठलेही सांडपाण्याच्या नालीची साफसफाई नाही ग्रामपंचायत सरपंच सचिव कुंभकर्णाच्या झोपेत गेलेले आहे परंतु सामान्य नागरिकांच्या जीविताशी ग्रामपंचायत खेळ खेळत आहे परंतु सामान्य नागरिक रहिवासी दाखला किंवा कुठलाही दाखला मागण्यासाठी गेले असता घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याशिवाय ग्रामपंचायत नागरिकांना दाखला मिळत नाही आणि कोरोनाच्या काळात शक्‍तीची कर वसुली हे एक वर्षापासून सुरूच आहे परंतु शासनाच्या आदेशानुसार कोविंड नाईंटीन च्या काळात सक्तीची कर वसुली करता येत नाही तरीसुद्धा अवधा बुद्रुक गट ग्रामपंचायत सक्तीची कर वसुली करीत आहे सामान्य नागरिकांनी विरोध केला असता आम्ही तुमच्यावर 353 नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करून सामान्य नागरिकांना धमकावण्यात येत आहे परंतु वरिष्ठ प्रशासन पंचायत समिती कार्यालय नांदुरा यांनी अवधा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयावर काटेकोर लक्ष देण्याची गरज सामान्य जनतेच्या आवाजातून दिसून येत आहे . . . . . .

रेती घाटावरील अवैध रेती वाहतूक बंद करण्यासाठी तहसीलदार यांना दिले निवेदन…

0

 

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जा.प्रतिनिधी:-

मौजे झाडेगाव, मानेगाव व येरळी येथे रेतीचे (घाट) असुन त्या रेती घाटांची हर्राशी झालेली आहे. सदर हर्राशी नुसार ठेकेदारांनी ठेके घेतलेले असुन सदरची रेती रॉयल्टीवर विक्री करीत असतात. सदरहु ठेकेदार यांनी दररोज एकाच रॉयल्टीवर दिवसभर इतर लोकांना मोठ्या प्रमाणावर रेती विक्री करीत असल्याचे आढळल्याने अर्जदारांनी ठेकेदारांना रॉयल्टी संबंधी माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आमचे वरपर्यंत हात आहेत त्यामुळे तुम्ही आमचे काहीही करु शकत नाही तुमच्या च्याने जे होत असेल ते करुन घ्या अशी धमकी दिली.यावरुन असे दिसुन येते की सदरहु ठेकेदार व त्यांचे कर्मचारी हे कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर रेतीची विक्री करित आहेत. त्यामुळे शासनाची फसवणुक होत असुन नुकसान होत आहे.असे असल्यामुळे व अर्जदारांना खरी व सत्य परिस्थिती माहिती असल्यामुळे सदरहुन अर्जदार हे कायदेशीररित्या तक्रार करीत आहेत. सदर तक्रारीवरुनचौकशी होऊन ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीररित्या कार्यवाई करण्यात यावी सदरह ठेकेदार व कर्मचारी यांचेवर चौकशी न झाल्यास अर्जदार हे उपोषणास बसतील याची नोंद घेण्यात यावी. या निवेदनावर अय्याज अहमद नियाज अहमद ,सैय्यद शमीम सैय्यद कालू यांच्या सह्या आहेत.

देवरी पोलिसांकडून 25 लाखांचे पान मसालासह चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

देवरी पोलिसांची मोठी कारवाई

देवरी 9: अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गोपनीय माहिती मिळाली कि राजनांदगाव येथून ट्रक मध्ये प्रतिबंधित पान पराग मसाला भरून अमरावती करीता निघालेला आहे या माहितीच्या आधारे देवरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांनी चिचगड टी पॉईंट वर नाकेबंदी करून वाहने तपासणी करीत असतांना ट्रक क्र GJ 37-/त-9921 यामध्ये प्रतिबंधित पान पराग मसाला 35 बॉक्स ज्यामध्ये 90 ग्रम वजनाचे 21000/- पॅकेट आढळून आले .
मालाची किंमत 2517600/- रुपये असून बिलासंबंधी विचारले असता कुठलेही कागद पत्र आढळून न आल्याने पो स्टे ला डिटेन करून ठेवण्यात आला आहे .
ट्रकमधील प्रतिबंधीत पान परागबाबत अन्न सुरक्षा सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा, यांना पत्राद्वारे कळविण्यात आले. त्यांनी संपुर्ण मालाची तपासणी करुन त्यांचा लेखी अहवाल व रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन देवरी येथे आरोपी हसन सलेमान रुखडा, वय 40 वर्ष, रा. खंबालिया, देवभूमी द्वारका, गुजरात यांचेविरुध्द अप.क्र. 89/2021 कलम 188, 272, 273,328 भा.द.वी. सहकलम अन्न सुरक्षा व मानदे कायदयाचे कलम 3(1) (झेडझेड)(iii), कलम 26(i), कलम 26(2)(i), कलम26(2)(iv), कलम 27(3)e), कलम 30(2)(ए), कलम 59 या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे पुढील तपास पोनि. सिंगनजुडे सा. करीत आहेत.
नमुद गुन्ह्यामध्ये प्रतिबंधीत पान मसाला एकुण किमत 25,17,600/- रु. व ट्रक क्र. GJ-37/ T-9921 किमती 15,00,000/-रु असा एकुण 40,17,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक सो. गोंदिया ,जांलधर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव, अति.कार्य, देवरी यांचे मार्गदर्शनात पोनि. सिंगनजुडे, पोउपनि. उरकुडे, पोना. बोहरे, पोशि. कांदे, पोशि. भांडारकर, यांनी केली आहे.