Home Blog Page 500

आशिष खरात बाबा यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता !विशेष सभा आयोजित करून कायदेशीर कारवाई करु नगराध्यक्षा यांच्या लेखी पत्रामुळे उपोषणाची सांगता !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

हिरोळे पेट्रोल पंपा जवळील जागा डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका साठी नगरपालिकेने समाज बांधवांना द्यावी या मागणी साठी गेल्या 30 मार्च पासून नगर परिषद बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आशिष बाबा खरात यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती ‘परंतु पाच दिवस होऊनही नगरपरिषदेने साधी त्यांचे विचारपूसही केली नव्हती ‘परंतु बुलढाणा शहरातूनच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून अनेक राजकीय पक्षांनी ‘ सामाजिक संघटनेने . वार्डा -वॉर्डातून नगर परिषदेला लोकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले ‘व अक्षरशा निवेदनांचा पाऊस नगर परिषदेमध्ये पडला !व नगरपरिषदेवर भीम सैनिकांचा प्रचंड दबाव वाढला ‘त्याचाच परिणाम म्हणून ‘
दिनांक 3 एप्रिल रोजी ‘बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नजमुन्निसा बेगम मो .सजाद व त्यांचे पती सज्जादयांनी आशिष खरात यांच्या उपोषण मंडपास भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ‘व नगर परिषदेची विशेष सभा .दिनांक ८ एप्रिल रोजी घेऊन .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी असलेल्या जागी संदर्भामध्ये योग्य निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन आशिष बाबा खरात यांना दिले .व दिनांक 5 एप्रिलला तसेच सूचना देखील काढू असे सांगितले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली ‘यावेळी नगराध्यक्ष मो . सज्जाद यांनी लिंबू पाणी देऊन आशिष खरात यांचे उपोषण सोडले ‘यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे ‘मो . सज्जाद,दत्ता काकस ,अरविंद हाडे, मंदार बाहेकर ,सत्तार कुरेशी, निलेश जाधव, वंचित बहुजन आघाडी चे बाला राऊत ‘गजानन पाखरे राऊत दिलीप राजभोज, उदय , भीमराव सुरडकर ,हरिभाऊ मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक हिवाळे गजानन झिने, राजेश गवई, अनिल बावस्कर शहराध्यक्ष राष्ट्रवादी ।भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंता मिसाळ ‘समाधान जाधव तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ‘गौरव हिवाळे शंतनू सरदार निर्मलाबाई जाधव नगरसेविका वंचित बहुजन आघाडी ची नाना साळवे, संतोष राव जाधव, मंगेश इंगळे ,आकाश लोखंडे ,किसन धुरंधर ‘पंजाबराव गवई . विनोद गवई रविकिरण मोरे किशोर सुरडकर . राजेश सरकटे . गजानन गवई ‘आधी युवक-युवती नागरीक हजर होते ‘

कोविड ची लस गावात उपलब्ध करून द्यावी ! नागरीकांची मागणी ‘वयोवृद्ध लोकांची लस घेण्यासाठी धावपळ ! :तासन तास ताटकळत बसावे लागते -साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या सिंदखेडराजा तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून 60 वर्षावरील नागरिकांनी लस घेण्याचे आव्हान प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे त्याला प्रतिसाद म्हणून अनेक वयोवृद्ध नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोविड ची लस घेतली आहे ‘परंतु कोविड लसीकरणाचे वर्गिकरण केल्यामुळे ६० वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांची लस घेण्यासाठी धावपळ होत आहे ‘साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक गावे येत असल्यामुळे जास्त गर्दी होत आहे ‘यामध्ये शिंदी ‘ सवडद ‘ रताळी ‘ मोहाडी ‘ पिंपळगाव सोनारा ‘ सांवंगी भगत ,साखरखेर्डा, गुंज ‘गोरेगाव ‘ उमनगाव ‘असे अनेक गावे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये लस घेण्यासाठी गर्दी वाढत असल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना तासनतास ताटकळत बिना पाण्यावाचून बसावे लागत आहे ‘त्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय होत असून ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे असे नागरिक सर्व कामे धंदे सोडून लस घेण्याकरता उन्हां मध्ये साखरखेर्डा येथे त्यांना यावे लागते ‘त्यामुळे त्यांचा वेळही जातो व आज अनेक महिला या शेतातील कामे सोडून दिवसभर साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस घेण्याकरता ताटकळत बसत आहे ‘त्यामुळे आरोग्य विभागाने साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांअंर्तगतातील खेड्यापाड्यांमध्ये गावात जाऊन लस द्यावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केली आहे ‘
त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल व लोकांचा वेळही वाचेल ‘त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने गावात जाऊन लसीकरणाला सुरुवात करणे गरजेचे आहे !त्यामुळे गर्दी ही होणार नाही !

माजी ग्रामपंचायत सदस्य. तथा सामाजिक कार्यकर्ते मा.प्रदिप भाऊ बोरकर यांच्या उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल

0

भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी
====================
नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील सातरगाव ग्राम विकासा पासुन
कोसो दुर असलेले एकमेव ग्राम
पंचायत म्हणजे सातरगाव गेली दोन वर्षांपासून ऐनवेळी तेथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते याना स्वतंत्र दिनाच्या दिवसालाच का? मागाव
लागतो गावाच्या विकासासाठी
न्याय. या भारत . India म्हणून अख्या जगात ओळख असलेल्या भारत म्हणजेच India या देशावर इंग्रजांनी मोजक्या सामाजिक कार्यकर्ते वर

वडीलांच्या निधनानंतर साहव्याच दिवशी मुलाचेही झाले दुदैवी निधन उंटावद गावात शोककळा

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील उंटावद येथील रहीवाशी तसेच उंटावद ग्रामपंचायतचे माजी सदस्य व दुध डेअरीचे विद्यमान संचालक सुधाकर उत्तमराव पाटील(वय ५४ वर्षे) यांचे शुक्रवार दि.२ एप्रील रोजी दुपारी १२ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले विशेष म्हणजे सहा दिवसापुर्वीच दि.२८ मार्च रोजी रात्री १०:३० वा.त्यांचे वडील उत्तमराव नारायण पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते ते ८७ वर्षांचे होते वडीलांचे निधन झाल्यानंतर अवघ्या ६ दिवसांनी मुलाचे निधन झाल्याने पाटील परिवारासह उंटावद गावावर दुःखाचा डोगंर कोसळला आहे शेवटी नियतीचा खेळच अजब आहे व तो सर्वांना मान्य करावाच लागतो सुधाकर पाटील यांच्या पश्चातआई,दोनभाऊ,पत्नि,दोन मुले व सुन असा परीवार आहे ते गुलाबराव पाटील यांचे बंधू होत.

 

जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ . मिनाश्री जावरे यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

भुसावळ येथील महीला चळवळीतील सामाजीक कार्यकर्ता सौ . मिनाश्री सुनिल जावरे यांची जळगाव जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .कॉंग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव आनंद यांच्या प्रेरणेने तथा महाराष्ट्र राज्य सेवा फाउंडेशनचे प्रदेश प्रभारी हुसैन अली भाटी तथा प्रदेश अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी सौ .मिनाश्री सुनिल जावरे यांची निवड केली आहे . या निवडीचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन , सौ . मिनाश्री जावेर यांना रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकराव चौधरी , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा पंचायत समिती गटनेता शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषद गटनेते व काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कॉग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , पंचायत समिती सदस्या कलीमा सायबु तडवी, व सरफराज सिंकदर तडवी , उमाकांत रामराव पाटील यांच्यासह आदी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीनंदन केले आहे .

भारत मातेची व देशाची सेवा पूर्ण करून आलेल्या सैनिक चे पातुर्डॉ खुर्द येथे जल्लोषात स्वागत

0

 

प स उपसभापती अंबादास
चव्हाण यांनी केला सत्कार

भारत माता व देशाची 24 वर्ष सेवा पूर्ण करून आपल्या जन्मभूमी परत आलेल्या सैनिकांचे पातुरडॉ बु येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले तर या वेळी प स उपसभापती अंबादास चव्हाण यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला
पातुरडॉ खुर्द येथील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले श्री प्रभूदास अंबादास झाडोकार याना लहान पना पासून देश सेवा करण्याची व मिलीट्रि मध्ये भरती होन्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी अथक प्रयत्न करून अखेर आपल्या जिद्दीला यश प्राप्त दि 22/4/1997 ला मिलीटरी मध्ये भरती झाले असता सतत 24 वर्ष द मराठा रेजिमेंट मधील लिंथ इन फ्रटी मध्ये 24 वर्ष या देशाची व मातेची सेवा करून दि 31 मार्च ला सेवानिवृत्त झाले ते आपल्या जन्मभूमी येणार हे माहिती पडताच गावातील नागरिकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली होती. पातुरडॉ खुर्द येथील महादेवाच्या मंदिराजवळ सैनिक प्रभूदास झाडोकार यांचे पुष्प वर्षाव करून सार्वजनिक स्वागत करण्यात आले तर प स चे उपसभापती अंबादास चव्हाण,भाजप किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष व माजी प स सभापती सौ तुळसा बाई वाघ व वाघ परिवार यांच्या कडून शाल व श्रीफळ व पेढा खाऊ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी प स सभापती सौ रत्नप्रभा ताई धर्माळ,ऍड वीरेंद्र झाडोकार,ग्रा प सदस्य राजू झाडोकार, ग्रा सदस्या सौ सुनीता विठ्ठल वाघ,गणेश नांदोकार,दत्ता डिक्कर,राम वाघमारे,वैभव वाघ,शिवानंद झाडोकार,भागवत झाडोकार, आशिष म्हसाळ, नितीन येळणे, गणेश राहाटे, प्रमोद राहाटे,मुरलीधर वाघ,गाजनांन झाडोकार,विलास येणकर, संदीप झाडोकार, या सह गावातील नागरिक उपस्थित होते

देश सेवा मनात असली पाहिजे- सैनिक प्रभूदास झाडोकार
सेवा करण्याची इच्छा मनात असली पाहिजे त्या करीता जरुरी नाही की मिलीटरी मधेच भरती झालो पाहिजे तुम्ही गावात राहून पण देशाची सेवा करु शकता असे सैनिक प्रभूदास झाडोकार यांनी सत्कार करताना या वेळी सांगितले

संगीत परमेश्वराशी नाते जोडणारा रेशीम धागा सिध्दलींग शिवाचार्य महाराज ! साखरखेर्डा नाद ब्रह्म संगीत विद्यालयाचे उद्घाटन !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

संगीत साखरे सारखे गोड असते माणसातली शुध्द शक्ती जागृत करण्यासाठी संगीत काम करते संगीतामध्ये रस आहेसंगीताच्या माध्यमातून नादब्रह्म आहे या व्दारे परमेश्वराशी नाते जोडता येते निरस वातावरणाला रसपूर्ण करण्याचे काम भारतीय संगीताने केले आहे. असे प्रतिपादन पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती ष ब्र सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
साखरखेर्डा येथे पलसिध्द महास्वामी मठात आयोजित नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दाऊतसेठ कुरेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून वेदमूर्ती निळकंठ स्वामी मानवतकर, हदगाव मठाचे सोमनाथ स्वामी, रावसाहेब देशपांडे, अनिकेत सैनिक स्कूलचे चेअरमन अर्जुनराव गवई, उपसरपंच प्रविण पाझडे, संतोष जयस्वाल, विश्वनाथ आप्पा जितकर उपस्थित होते.
यावेळी नादब्रह्म संगीत विद्यालयाचे अध्यक्ष संगीत विशारद प्रा अभय मासोदकर यांनी आपल्या प्रास्ताविकात असे सांगितले कि, नव्या पिढीने संगीत कला आत्मसात करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, ग्रामीण भागात विठूनामाचा गजर घुमतो मात्र भारतीय संगीत कलाकारांची वाणवा असून भावी पिढीला संगिताचे बाळकडू पाजण्यासाठी साखरखेर्ड्याच्या पावन कुशीत नादब्रह्म विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रा.डॉ. शाम दुतोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
भारतीय संगीत कलेला तारणारा एक तराणा आहे. महाराष्ट्राला या संगीताची अफाट अशी वैभवशाली परंपरा आहे, याच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये भारतीय संगीत कलेचा सिंहाचा वाटा आहे याच संगीताचा वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य अनेक महान गायक, वादक, तथा संगीतकार करतात.
हिच परंपरा जपत “एक तरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुका जन्मला” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे सांगितीक यशाच्या प्रसन्न वळणावरचा आनंद अनुभवण्यासाठी येथे नादब्रह्म च्या माध्यमातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तथा सर्व वयोगटातील रसिकांना शास्त्रीय, सुगम, संगीताचे धडे मिळणार आहे यानंतर वेदमूर्ती निळकंठ स्वामी मानवतकर, अर्जुनराव गवई यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश थोरहाते तर आभार प्रदर्शन संतोष गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला दीपक गवळी, गणेश खरात, चंचू बेंदाडे, शुभमसिंग ठाकूर, सुनील रिंढे, प्रफुल्ल जडे, बालनाथ कासार, डॉ प्रविण ठोसरे, अनिल कासार, विष्णू गायकवाड, डॉ संदिपकुमार सुरूशे, उमेश गंभीर उपस्थित होते.

सुनील डोंगरे (समाज सेवक) मित्र परिवार तर्फे संत ज्ञानेश्वर वार्ड येथे पाणी टॅकर चे लोकार्पण सोहळा संपन्न.

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट संत ज्ञानेश्वर वार्ड येथे पाणी समस्या लक्षात घेऊन मा सुनिल डोंगरे (समाज सेवक) संत ज्ञानेश्वर वार्ड येथील जनतेला दिलेला शब्द पाळला व जनतेच्या पाणी समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने पाणी टॅकर वार्डासाठी उपलब्ध करून देण्यात आला या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर वार्डातील मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक युवा वर्ग उपस्थिती होते या प्रसंगी प्रामुख्याने जेष्ठ नागरिक श्री.बापुरावजी नरड,रमेशराव सांबरे साहेब, डेहने साहेब, नानाजी नागमोते, ठावरी सर, भैय्याजी निखाडे,भांडे सर, ठावरी सर, भोयर सर, संजय ठाकरे भाईजी,निलेश चहाकार,रूपेश बुरड, मनोज हरडे सिंदेकर सर, किशोर तडस, राजेंद्र सहारे,अशोकराव तुळनकर, अन्नाजी लढी,सुनिल नरड, किशोर मेघरे,अनिलराव भाईमारे, दंतुजी भोसले, मनोज जीवतोड,साटकर सर, ईत्यादी मोठ्या प्रमाणात वार्डातील नागरिक उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वी पार पडला व योग्य पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात आले. 🙏

अजय पर्वत मनसे कामगार वर्धा जिल्हाअध्यक्ष यांनी केले मुख्यमंत्र्याला आव्हान

0

 

सचिन वाघे वर्धा

मुख्यमंत्री साहेबांनी मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधून Lock Doun बद्दल आणि कडक निर्बंध बद्दल दोन तीन दिवसात निर्णय घेण्याचे इशारा जनतेला कडक शब्दात दिला पण , मुख्यमंत्री साहेब तुम्ही पण एक काम करा अगोदर स्वतःपासून सुरू करा तुम्हाला मिळणारे मानधन बंद करा आणि सर्व मंत्री आमदार खासदार यांचे पण मानधन बंद करून सर्व क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय प्रशासन जिल्हा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सॅलरी बंद करून त्यांच्याकडून निस्वार्थ कार्य करून घ्या . जनतेला उदरनिर्वाहाच्या उपाय योजना राबवू नका मग बघा कोरोना साठी कोण लढतोय त्यातच सर्व लपलेला आहे नंतर Lock Doun करा . महाराष्ट्रात जनता कशे थैमान करतात बघा राज्याच्या पदावर गेल्या नंतर बोलणं कुणालाही जमत साहेब, पण गरिबाच्या घरी थोडं वाकून बघा कसे जगतात त.
श्री अजय परबत (मनसे कामगार जिल्हाध्यक्ष व पूर्व विदर्भ कार्यकारणी सदस्य)

अनोळखी इसमाची गळफास लावून आत्महत्या

0

 

गोदिया-शैलेश राजनकर

चिचगड,दि.0२ः चिचगड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वासणी जंगल परिसरात एका अनोळखी इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृतकाच्या शरीरावर गडद हिरव्या रंगाच्या स्वेटर घातलेला असून असून हातावर इंग्रजीमध्ये के लिहिलेला आहे.मृतक 20 ते 22 वर्षाचा असावा असा अंदाज आहे. सदर मृतदेह छत्तीसगड भागातील असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे.सदर प्रकरणाची नोंद चिचगड पोलीस स्टेशनला झाली असून प्रकरणाचा तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय इसकापे करीत आहेत. कुणाला सदर मृतदेहाची ओळख पटल्यास संबंधित फोनवर संपर्क साधावा ०८८८९५८५८४२ असे आवाहन करण्यात आले आहे.