Home Blog Page 501

शिका रुग्णालयाच्या पिडीत परिचरीकावर डाँक्टराने केला अत्याचार डाँक्टर आरोपी वर ३७६,अँट्रासिटी गुन्हा दाखल

0

 

भगवंत ब्राम्हणवाडे तालुका प्रतिनिधी नांदगाव

रुग्णालयात १९वर्षे युवती गेले चार महिन्या पासुन परिचरीका
म्हणून कामावर कार्यरत होती पिडीतीच्या तक्रारीवरुण शुक्रवार
दिनांक १९/३/२०२१ला आरोपी डाँक्टराने पिडीत युवतीला नाईट
ड्युटी साठी थांबवून ठेवले होते व १९ मार्च्या मध्यरात्री बळजबरीने
रुग्णालयातील एका खोलीत त्या युवतीवर वारंवार बळजबरी अत्याचार आरोपी डाँक्टर करीत होते व दिनांक २०/३/२०२१ ला
सकाळी युवती आपल्या राहत्या घरी असतांना परत आरोपी डाँक्टराने फोन केला व म्हणाले कि तुझ्या नि माझा शाररीक संबधाचा मि व्हिडीओ काढला व तुजर पुन्हा आली नाहीतर मि तो व्हिडीओ अपलोड करून जीवे मारण्याची धमकी देवुन पुन्हा आरोपी डाँक्टराने पिडीतेवर अत्याचार केल्याची बुधवार दिनांक २४/ ३ /२०२१ ला उशिरा रात्री पिडीतीने आपल्यावर अत्याचार केल्याची घरच्यांना सांगितले व तसेच नांदगाव खंडेश्र्वर पोलिस ठाण्यात

तक्रार डाँक्टर आरोपी विरोधात दाखल केली आरोपीवर ठाणेदार गोपाल उबंरकर यांनी आरोपी वर
कलम ३७६,३७६ ( २ ) ५०६, ५०४ अँट्रासिटी अनन्वे गुन्हा दाखल केला असुन डाँ आरोपी शोयब सय्यद फरार
असुन उपविभागीय पोलिस अधिकारी पुनम पाटिल यांच्या मार्गदर्शन खाली फरार आरोपीचा कसुन शोध तपास करीत आहे.

जिल्ह्यात जमावबंदी ,नि मु घटवाई विद्यालयात शिक्षकांचीच गर्दी…

0

 

सचिन वाघे वर्धा

वडनेर कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद आहे .तथापी हिंगणघाट तालुक्यातील नि.मु. घटवाई विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक आँनलाईन वर्ग घेत असतांनासुद्धा कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीचे आदेश असतानाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरून शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करीत असल्याचे दिसुन येत आहे.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्याऐवजी कोरोनाप्रादुर्भाव वाढविण्यास एकप्रकारे समर्थन करीत आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचे काळात शासनाने सर्व शाळांना आभासी (ऑनलाइन) शिक्षणाचे आदेश दिलेले आहेत. असे असूनही या शाळेतील सर्व शालेय शिक्षकांना सकाळी ८ ते २ पर्यत शाळेत थांबवून ठेवत असल्याची तक्रार आहे.
शाळेत ४६ कर्मचारी आहे कोरोना नंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा पुनश्च बंद करण्यात आल्यात व आँनलाईन शिक्षण सुरू आहे.विद्यालयातील तीन शिक्षक कोरोनाबाधीत झाले चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचे कुटुंब कोरोना पाझिटीव असतांनाही ती महिला कर्मचारी शाळेत कामावर उपस्थित राहत आहे. परिणामी त्याचा संसर्ग इतर शिक्षकांना होऊ शकते, मात्र याकडे मुख्याध्यापक डोळेझाक करीत असल्याची तक्रार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शासकीय कार्यालयात १००% कर्मचारी उपस्थिति अनिवार्य नसतांनासुद्धा येथील शाळेतील ४६ कर्मचारी शाळेत उपस्थित राहत असतात. मात्र कूठलेही सोशल डिस्टंसिंग पालन न करता ,वेळप्रसंगी मास्क न‌ वापरताही कर्मचारी शाळेत सुसाट वावरतांना आढळून येत आहेत .शालेय परिसरात सनिटायझेशन काळजी घेतली जात नाही. शाळेत ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश असतानाही मुख्याध्यापक शिक्षकांना जाणुन बुजून शाळेत उपस्थित राहण्यासाठी बाध्य करतात.कोरोना बाधित कुटुंबातील चतुर्थी श्रेणी कर्मचारी शाळेत वावरतो, परीणामी इतर शिक्षकही कोरोनाबाधीत होऊ शकतात हे येथील उच्चविद्याविभुषित मुख्याध्यापकांना का कळत नाही हा खरा प्रश्न अनुत्तरित आहे.

यावल येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केन्द्रातील शेतकरी व कामगार कायदे करणारे व महागाई वाढवणाऱ्या शासनाविरूद्ध उपोषण

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

केन्द्रातील भारतीय जनता पक्षाच्या शासनाने बहुमताच्या जोरावर मंजुर केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करून सर्व क्षेत्रात वाढलेली महागाईवर अंकुश लावावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले .दरम्यान भारतीय कॉग्रेस कमेटीचे यावल तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटाचे नेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध देशाच्या अन्नदाता व कामगार यांना देशोधडीला लावणारे काळे कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्ली राज्याच्या सिमेवर गेल्या शंभर दिवसापासुन आंदोलन सुरू असुन या देशव्यापी आंदोलनात आज पर्यंत सुमारे ३००हुन अधिक शेतकरी बांधवांचा मृत्यु झाला असुन , केन्द्र शासनाने पारीत केलेले हे काळे कायदे शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना पुर्णपणे उद्धवस्त करणारे आहेत .केन्द्र शासन या काळ्या कायद्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना बडया भांडवलदारांचे गुलाम बनविण्याचा सरकारचा डाव आहे .कॉंग्रेसच्या अध्यक्षा खा . श्रीमती सोनिया गांधी व खा . राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास आपला पाठींबा दिला असुन, देशातील ६oलाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देवुन काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे . असे असतांनाही केन्द्रातील भाजपाचे कुंभकर्णी सरकारला जाग आलेली नाही . दुसरीकडे पेट्रॉल , डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसचे वाढलेली प्रचंड किमती वाढवुन केन्द्र शासना दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत असुन, केन्द्राच्या कृषी बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे . या सर्व केन्द्र शासनाच्या भोंगळ शेतकरी सामान्य नागरीक विरोधी कारभारामुळे देश देशोधडीला लागले असुन , या सर्व गोंधळलेल्या दिशाहीन शासनाच्या विरूद्ध काँग्रेस कमेटीच्या वतीने यावल तहसील कार्यालया समोर कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व पंचायत समिती गटनेते शेखर सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी , खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान , नगरसेवक गुलाम रसुल हाजी गु . दस्तगीर , नगरसेवक असलम शेख नबी , कौग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान ,नावरे येथील मा .सरपंच समाधान पाटील , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष करीम मन्यार , हाजी ताहेर शेख चाँद , राष्ट्रवादीचे निवृत्ती धांडे , अनिल जंजाळे , विक्की पाटील आदींनी या उपोषणात आपला सहभाग नोंदवला . याप्रसंगी उपोषणाच्या ठीकाणी प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी भेट देवुन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले .

विदर्भ विकास आघाडी तर्फे संयुक्त किसान मोर्चा च्या भारत बंदला निवेदनाद्वारे समर्थन‍

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट :- संयुक्त किसान मोर्चाचे नेतृत्वात देशातील 500 पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले जुलमी कृषी कायदे रद्द करण्याबाबत आंदोलन करीत आहे. आत्तापर्यंतच्या या आंदोलनात जवळपास 300 हून अधिक शेतकरी हुतात्मे झालेले आहेत. या सरकारने फक्त शेतकऱ्यांचे विरोधातच कायदे केलेले आहे असे नाही तर देशातील 75 टक्के जनतेच्या आयुष्यावर दुष्परिणाम होतील असे विद्यार्थी, कामगार बेरोजगार, छोटे व्यापारी, मजदूर यांच्या दैनंदिन आयुष्यावर कुटाराघात करणारे कायदे संसदेत मंजूर करून घेतलेले आहे. आता नव्याने पारित केलेले भारतीय जीवन बीमा (LIC) निर्गुंतवणूकि मुळे देशातील विमाधारक या निर्णयाने प्रभावित होणार आहे. संसदेतील पाशवि बहुमताच्या जोरावर हे सरकार जनहित विरोधी कायदे करीत आहे. याचा विरोध म्हणून देशातील विद्यार्थी ,कामगार ,मजदूर, कर्मचारी अशा सर्व संघटना एकत्र येऊन या सरकारचा विरोध करीत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहे .पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या झालेल्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. नवीन कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्याकरिता संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दिनांक 26 मार्च 2021 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहता सरकारने जो टाळे बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता अगोदरच त्रस्त झालेली आहे. अनेक छोट्या व्यापाऱ्यांचे व्यापार बंद झालेले आहे .संयुक्त किसान मोर्चा च्या आंदोलनाला आज 120 दिवस पूर्ण होत असल्यामुळे भारत बंद चे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील परिस्थितीचा व छोटे व्यापारी यांचा विचार केला असता किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ अडचणीत असलेले व्यापारी व छोटे दुकानदार व सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीकरिता दिनांक 26 मार्च रोजी भारत बंद मध्ये सहभागी असल्याचे या निवेदना मार्फत आम्ही जाहीर करत आहोत. संयुक्त किसान मोर्चा ने केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमतीला कायद्याचे संरक्षण द्यावे म्हणजे किमान समर्थन मूल्य हा कायदा पारित करावा असे निवेदन उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचेमार्फत माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी आंदोलक अनिल जवादे यांच्यासोबत सुधीर राऊत, महेश माकडे ,गोपाल मांडवकर, जयंत धोटे ,अजय मुळे, विलास भोमले, पप्पु मुंजेवार, आशिष हाडके, रवींद्र मेश्राम, धनंजय कोकाटे व अनेक शेतकरी पुत्र उपस्थित होते

केन्र्दं सरकारच्या नविन शेतकरी कायद्याच्या विरोध्दात ,वाढत्या दरवाढी साठी काँग्रेसचे तहसिल कार्यालया समोर करणार एक दिवसीय उपोषण

0

 

सचिन वाघे वर्धा

 

केंद्र सरकारने पारीत केल्या तिन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी वाढत्या महागाईच्या विरोधात सरकारला जाग आणण्यासाठी हिंगणघाट शहर व तालुका कॉंग्रेस कमेटी कडून आज २६ मार्चला सकाळी ११:०० वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडुन आलेल्या सुचनेनुसार काँग्रेसकडून हिंगणघाट शहरातील तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करणार आले या वेळी एका शिष्टमंडळा द्वारे उपविभागीय अधिकारेर्‍याला सुध्दा केन्र्दं सरकारच्या विरोध्दात निवेदन देण्यात आले . या वेळी एकदिवसीय उपोषणात बालु माहाजन तालुका काग्रेस अध्यक्ष , पंढरी कापसे भुतपूर्व नगराध्यक्ष, प्रविन उपासे वर्धा जिल्हा किसान काग्रेस अध्यक्ष ,अमित चाफले युवक काग्रेस उपाअध्यक्ष , नकुल भाईमारे विधानसभा अध्यक्ष, सुवर्णा भोयर पंचायत समिती अध्यक्ष , राजू मंगेकर,अरविन्द संगोले, सुनील काले, लताबाई घवघवे, गुणवंता करवतकर, अशोक भाले, ज्वलन्त मून, सुरेश सतोकार इत्यादी सोबत अन्य कार्यकर्ते आणि पदअधिअधिरारी मोठ्या प्रमानात उपस्थिती होते

अखेर वीस वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश:-राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची वेतनाची प्रतीक्षा संपली शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला यश!

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

गेल्य पंचेचाळीस दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे विनाअनुदानित शिक्षक आपल्या कुटुंबासह आंदोलन करीत होते या आंदोलनाला यश आलेले आहे.राज्यामध्ये विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेण्यात आला मात्र यामध्ये सन 2014 या वर्षी उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी त्यांचे मूल्यांकन करून निधी वितरण करण्याचे ठरविण्यात आले होते परंतु सातत्याने या शाळांच्या विविध स्तरावर सारख्या तपासण्या करूनही शिक्षकांना हक्काच्या वेतनापासून वंचित राहावे लागले होते, 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार या शाळांना निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित करणे आवश्यक होते परंतु मागील काळामध्ये कोरोना चे संकट महाराष्ट्रात आल्यामुळे शिक्षकांना मिळणारे तब्बल 18 महिन्याच्या वेतनात शासनाला कपात करावी लागली. व पुनश्च एकदा या शाळांना अनुदान मिळावे यासाठी शिक्षकांचे नशिबी आंदोलन आले मागील सत्तेचाळीस दिवसांपासून राज्यातील शिक्षक हा मुंबई येथील आझाद मैदानात संघर्ष करीत होता.विनावेतन राबणाऱ्या शिक्षकांनी मिळेल त्या साधनांनी मुंबई गाठली व खूप अतिशय चिवट अशा प्रकारचा लढा दिला. शेवटी शिक्षकांच्या या लढ्याची दखल प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून शासनाला घ्यावी लागली
महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अघोषित, घोषित अंशतःअनुदानित शाळांचा प्रश्न मिटावा यासाठी आजाद मैदान मुंबई येथे अघोषित शाळा घोषित व्हाव्यात. 20 टक्के 40 टक्के अनुदान मंजूर होऊन निधी वितरणाचा जीआर पारित करावा. प्रचलित अनुदानाचे सुत्र आणावे, इतर मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे 47 दिवसापासून आंदोलन सुरू होते.आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच आ.डॉ.सुधीर तांबे मंत्रालयामध्ये ठाण मांडून होते महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांना सातत्याने भेटून प्रश्न किती गंभीर आहे, महत्त्वाचा आहे हा सोडवलाच पाहिजे. 66 हजार शिक्षकांच्या पोटापाण्याचा हा प्रश्न आहे. अभ्यास पूर्ण प्रश्नाची मांडणी केल्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आली परंतु निधी वितरणाचा शासन निर्णय काढण्यात आलेला नव्हता अधिवेशन संपल्यानंतर देखील आ.डॉ.सुधीर तांबे यांनी शालेय शिक्षण विभाग व वित्त विभागाचे अधिकारी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून आज 20 टक्के व 20 टक्के घेत असलेल्या शाळांना पुढील 40% चा टप्प्याचा निधी वितारणाचा शासन निर्णय पारित झाला यासाठी जळगाव जिल्ह्यातून प्राध्यापक के पी पाटीलप्रा दीपक कुलकर्णी राज्यध्यक्ष,प्रा संतोष वाघ, राहुल कांबळे कर्तार ठाकूर,अनिल परदेशी,राज्यसचिव,प्रा सुधीर चौधरी सर डी आर पाटील,नाशिक विभाग अध्यक्ष गुलाब साळुंखे,एन डी पाटील,पराग पाटील,राजेंद्र साळुंखे,पी एन तायडे,महेंद्र बच्छाव,वर्षा कुलथे,आदि पदाधिकारी लढा देत होते.
जळगाव जिल्ह्यातील  वरिष्ठ शिक्षक प्राध्यापक सुनील गरुड सर शैलेश राणे सर  यांचेदेखील या विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांच्या बाबतीत सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. विनानुदानित शिक्षकांना मार्गदर्शन प्रा.सुनील गरुड सर शैलेश राणे यांचे सहकार्य मिळाले
प्रतिक्रिया
१) आ.डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले की, आपले काम अजून पूर्ण झालेले नाही अजून अघोषित शाळांचा प्रश्न आहे, तसेच पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न आहे त्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे व ते प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील असे आश्वासन दिले. आ.डॉ.सुधीर तांबे सदस्य, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य.
२)दिनांक 17 मार्च 2021 रोजी राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.त्यामुळे शासनाचे आभार मात्र प्रश्न अजूनही पूर्णता संपलेला नाहीये शासनाने 20 वर्ष विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना प्रचलित सूत्रानुसार लवकर पुढील टप्पे द्यावे.
प्रा.अनिल परदेशी राज्यसचिव महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटना

पळसमंडळ येथे अंगणवाडी क्र २ पोषण अभियान अंर्तगत प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम एक पाहुल पुढे सुदृढ बालकाकडे ( IEC ) द्वरा विविध स्पर्धेचे आयोजन

0

हंसराज उके अमरावती जिल्हा
प्रतिनिधी
====================
नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समिती
अंतर्गत महिला व बालकल्याण विभागा द्वारे. पळसमंडळ अंगणवाडी क्रमांक २ येथे पोषण आहार अभियान अंतर्गत प्रचार व
प्रसिध्दी कार्यक्रमाचे आयोजन एक पाहुल पुढे ,सुदृढ बालकाकडे
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पळसमंडळ सरपंच्या सौ. मंगला
शामकांत मोरे अध्यक्ष स्थान भुसविले होते व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.गव ई मँडम सुपर वाईझर महिला व बालकल्याण व धदंर मँडम आणि ग्रामपंचायत उपसरपंच सौ.संगिता ओकांरराव
राऊत व ग्रामपंचायत सदस्य यांचे प्रमुख उपस्थित या कार्यक्रमाची सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात
आले. या कार्यक्रमात पोषण पुरक आहार ,स्तनपान,व लसीकरण. किशोरवयीन आरोग्य बाबत धदंर मँडम यांनी केले .व विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये सुदृढ बालक स्पर्धा. रांगोळी स्पर्धा व पाक क्रुती स्पर्धा
घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शुभांगी वासुदेवराव शिंदे अंगणवाडी क्रमांक१च्या सेविका यांनी केले या कार्यक्रमाला गावातील महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. व आभार प्रदर्शन अंगणवाडी क्रमांक २ च्या सेविका सौ.चंदा देवघरे मानले.

यावल येथे उद्या काँग्रेस कमेटीच्या वतीने शेतकरी विरोधी कायदे व सर्वत्र उडालेला महागाईचा भडका या केन्द्र शासनाच्या गोंधळल्या कारभार विरूद्ध उपोषण

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

केन्द्रातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधी शासनाने शेतकरी आणी कामगार यांच्या विरूद्ध काळ्या कायद्याविरोधात देशाचा अन्नदाता मागील १०० दिवसांपासुन दिल्लीच्या सिमेवर ठाम मांडुन आंदोलन करीत असुन या काळ्या कायद्यामुळे देशाचा अन्नदाताला मिळणारे हमीभाव आणी शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असुन, शेतकऱ्यांना भांडवलदाराचे गुलाम बनविण्याचा केन्द्रशासना डाव आहे . या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या काळ्या कायद्याला रद्द करावे तसेच पेट्रॉल , डिझेल व सातत्याने वाढणारे घरगुती गैस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती व वाढलेल्या महागाई च्या विरोधासह शेतकरी व कामगार विरोधातील कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सुमारे ३००पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यु होवुन शहीद झाले असून, उद्या२६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आंदोलक शेतकरी बांधवांना पाठींबा देण्यासाठी संपुर्ण देशात काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांसह यावल तहसील कार्यालयासमोर कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करीत तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे .

यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा रक्कम कमी मिळाल्याबाबत तक्रारींचे निराकरण बाबत बैठक संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तक्रारी निकाली काढण्यासंदर्भात आज तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली यात तक्रारदार शेतकऱ्यांनी भाग घेतला . दरम्यान आज दिनांक २५ मार्च रोजी यावल येथील तहसीलच्या प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, तालुका प्रभारी कृषी अधिकारी एस बी शिनारे , कृषी सहाय्यक बी के माचले , कृषी पर्यवेक्षक पी आर कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०१९ते २०या कालावधीतील प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत लाभार्थ्यांच्या खात्यात शासकीय अनुदानाची कमी रक्कम प्राप्त झाल्याच्या तक्रारी या निकाली काढण्या संदर्भात महत्वाची बैठक सावखेडा सिम तालुका यावल येथील शिवदास वासुदेव पाटील , डांभुर्णीचे शेतकरी मधुकर बाबाजी नेवे, साकळीचे उमाकांत नामदेव माळी, चिखली येथील सौ . रूपाली निलेश साळवे, डांभुर्णीचे प्रेमचंद धोंडु फालक, न्हावीचे तुकाराम राधो नारखेडे व मनवेलच्या सौ . कविता लक्ष्मण पाटील यांनी या बैठकीत अद्यापपर्यंत प्रधानमंत्री फसल विम्याची पुर्ण रक्कम प्राप्त झाली नसल्याबाबत तक्रारींचे निराकरण करण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरिय समितीच्या बैठकीत संबंधीत सेवा पुरवठा करण्याबाबत सविस्तर तक्रारदार शेतकरी आणी अधिकारी यांच्यात चर्चा झाली असुन ,समितीने शेतकऱ्यांच्या पिकविम्याची रक्कम कमी मिळणे बाबतच्या विषयांवर तक्रारी ऐकुन घेतल्यात चर्चेअंती या विषयावर तांत्रीक अडचणीवर कृषी विभाग यावल तालुका यांच्या माध्यमातुन विमा कंपनी यांच्याशी संपर्क साधुन या विषयावर तात्काळ तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील यांनी तक्रारदार लाभार्थी शेतकऱ्यांना दिली .

शहर व ग्रामीण मध्ये 27 मार्च पासून शनिवारी रात्री 30 मार्च मंगळवार सकाळी आठ वाजेपर्यंत टाळेबंदी

0

 

सचिन वाघे वर्धा

शहर व ग्रामीण मध्ये २७ मार्चपासून शनिवार रात्री पासून तर ३० मार्च मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आला वर्धा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २७ मार्च शनिवार रात्री पासून तर मंगळवार ३० मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहे. हिंगणघाट शहरात व तालुक्यात सुध्दा २७ मार्च शनिवार रात्री पासून तर मंगळवार ३० मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६० तासांची टाळेबंदी लागू राहणार आहे. या ६० तासाच्या टाळेबंदी मध्ये शहरात व तालुक्यातील गावात अतिआवश्य सेवा ,दवाखाने ,दवाई दुकाने सुरु राहणार आहे.या ६० तासाच्या टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी करण्यात आले आहे.