Home Blog Page 508

अमरावती जिल्हातील गरीब गरजू अपंगांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दया

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अपंग जनता दल सामाजिक संघटना ची मागणी

अमरावती : देशातील गरीब व गरजूंना आयुष्यमान भारत या योजनेतून संरक्षण कवच मिळावे या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून या योजनेला प्रारंभ केला होता . या योजनेला गती मिळताना दिसत आहे . गरीब व गरजूंना आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ देण्यात येणार येत आहे . या वर्षी सुद्या पुन्हा ही योजना सुरु केली असून या योजनेत लाभार्थी ठरलेत त्यांना गोल्ड विमा कार्ड बनवून देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे . या योजनेतून लाभार्थीना वर्षाला ५ लाखापर्यंत मोफत उपचार , खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळणार आहे अनेक गरीब गरजू अपंगांनी आयुष्य मान भारत योजनेचा याद्या मध्ये नाव नसल्याने त्यांना स्मार्ट कार्ड बनविले नाही म्हणून त्यांना या योजनेचा लाभ मिडत नाही आहे आशा अमरावती जिल्हातील गरीब गरजू अपंगांना या योजनेत समाविष्ट करावे अशी मागणी अपंग जनता दल चे अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांनी केली आहे .

यावल तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे

0

 

,. यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे,

येथील तहसीलदार महेश पवार १८ मार्च ते १ एप्रिल २१ पावेतो वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांचा रिक्त असलेल्या पदावर अतिरिक्त कार्यभार महसूल नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे पत्र पाठवुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यातर्फे पंकज लोखंडे यांनी कळविले आहे .रविंद्र पाटील यांनी तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळावा जेणेकरून तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचा कडे तात्पुरते तहसीलदार पदाची सुत्रे रवीन्द्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले असल्याचे महसूल जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पंकज लोखंडे यांनी काढलेल्या आदेशात कळविल्याने रवींद्र पाटील हे तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळतील असे महसूल प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. नायब तहसीलदार रवीन्द्र पाटील यांच्याकडे महसुल प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने त्याचा महसुलच्या प्रशासकीय कामास उत्तम प्रकारे फायदा होईल.

वडनेर ग्रामपंचायच्या उपसरपंच्यानी धनादेश पळविला

0

 

वर्धा सचिन वाघे

वडनेर ग्रामपंचायत मध्ये पैशाची हेरफेर उघड वडणेर येथील रहिवासी बळवंत सुधाकर फाटे यांची फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा परिषद कडे करन्यायात आली
बळवंत फाटे यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संडासाचे बांधकाम सुरू केले व ते जवळपास पूर्ण झाले असता फाटे यांनी वडणेर ग्रामपंचायत मध्ये जाऊन स्वच्छता अभियाना अंतर्गत मिळणाऱ्या सबसिडी चा चेक वडणेर ग्रामपंचायत चे सचिव हरिदास रामटेके यांच्या कड़े मागणी केली परंतु सचिव रामटेके यांनी फाटे याना सांगितले की तुमचा धनादेश वडणेर ग्रामपंचायत चे उपसरपंच ला घेऊन गेले मी त्यांना विचारले असता माझा चेक सुभाष शिंदे यांच्या कडे का दिला तेव्हा सुभाष शिंदे यांनी सांगितले होते की तुझ्या पत्निची प्रकृती अत्यंत नाजूक आहे व ती सेवाग्राम रुग्णालयात दाखल आहे करीत तुला पैशाची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून माझ्या कडून धनादेश घेऊन गेला व माझ्या नावांची पावती वर खोटी सही करून माझी सबसिडी गहाळ केली.
माझ्या पत्नीची प्रकृती ची खोटी माहिती देऊन शिंदे यांनी ग्रामपंचायत मधून धनादेश नेला त्या वेळेस माझ्या सोशालायचे काम सुरू झाले नव्हते सुभाष शिंदे यांनी पदाचा दुरुपयोग करून व सचिव रामटेके यांनी बेरर चेक देऊन व खोटी सही घेऊन त्यांनी सुध्दा आपल्या पदाचा दुरुपयोग केला असे बरेच नागरिकांचे पैसे गहाळ केले याची सखोल चौकशी करून मला योग्य तो न्याय द्यावा अशी तक्रार बलवंत फाटे यांनी जिल्हा परिषद ला केली.

चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस केली मुद्देमालासह अटक.

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट समुद्रपुर तालुक्यातील जाम बसस्थानक परिसरातील फळविक्रेत्याचे दुकानातील पेटीतील चार हजार रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास समुद्रपुर पोलिसांनी अटक केली.
आरोपीकडून चोरी केलेल्या चार हजार रक्कमेपैकी १९०० रुपये रकमसुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीची क्लोन उर्फ राहुल शांताराम तुमडाम(२४)अशी ओळख पटली असून आरोपी जाम येथील हनुमान वार्ड क्र.२ येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार सौ सुमन जयसिंग भाजीखाये वय ४५ वर्ष राहणार जाम या फळविक्री करणाऱ्या महिलेने दिनांक १६ मार्च रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे पतीचे दुकानातील पेटीतुन चार हजार चोरी गेल्याची तक्रार दिली होती, जाम बस स्टॅन्ड चे बाजूला फिर्यादि महिलेचे फळ विक्रीचे दुकान असून त्या दुकानामागे तीचे पतीचे चपलाजोडे दुरुस्तीचे दुकान आहे.
दिनांक १६ मार्च रोजी पहाटे फळ वितरकांचे पैसे देणे असल्याने चार हजार रुपये रोख रक्कम तिचे पतीचे दुकानाच्या पेटीमध्ये ठेवले होते दिनांक १६ मार्चचे मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकान फोडून चार हजार रुपये रोख रक्कम चोरी केले .
आरोपी विरुद्ध अ. क्रमांक १०२/२०२१ कलम ४५७ ,३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार निलेश पेटकर व पथक करीत असतांना जाम येथील क्लोन उर्फ राहुल शांताराम तुमडाम (२४) यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने अटक करण्यात आली चोरलेल्या चार हजार रुपये पैकी एकवीसशे रुपये आरोपीने खर्च केल्याने उर्वरित १९०० रुपये रोख रक्कम व फिर्यादी चे आधार कार्डची झेरॉक्स कागद आरोपींकडून जप्त करून गुन्हा उघडडीस आणला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम , पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन समुद्रपूर येथील पोलीस अमलदार नीलेश पेटकर ,विक्की मस्के मनोज कोसुरकर ,समीर कुरेशी यांनी केली आहे .
पोलिसांची गस्त
जाम परिसर तसेच समुद्रपूर परिसरात रात्री वेळी पोलीस गस्त वाढविण्यात आलेली असून नागरिकांना दुकानांमध्ये रोख रक्कम किंवा मूल्यवान वस्तू ठेवू नये तसेच सुरक्षितते करिता कॅमेरे लावण्याचा सूचना देण्यात आले आहेत

बुलडाण्यात कोविड रूग्णांसाठी जम्बो हॉस्पीटल उभारणार

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
प्रत्येक तालुक्याला कॉर्डीयाक ॲम्बुलन्सची सुविधा देणार
चार ठिकाणी ऑक्सीजन टँकची उभारणी करावी

बुलडाणा:-कोविड साथरोग आजाराचे वाढते रूग्ण बघता प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोविड साथरोगावर नियत्रण मिळविण्यासाठी व रूग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बुलडाणा शहरात 500 खाटांचे जम्बो हॉस्पीटल उभारण्यात यावे. त्यासाठी जागा बघून यंत्रणेने प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 18 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दे. राजा, मलकापूर, खामगांव व शेगांव येथे ऑक्सीजन टँक उभारण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, या ठिकाणी कोविड रूग्णांची संख्या बरीच असते. त्यामुळे या चारही ठिकाणी शासकीय रूग्णांलयामध्ये ऑक्सीजन टँकची उभारणी करण्यात यावी. जेणेकरून तेथील रूग्णांना गरजेनुसार तातडीने ऑक्सीजन उपलब्ध करून देता येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये कॉर्डीयाक रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी प्रस्ताव तयार करून मंजूरातीसाठी पाठवावा. कोविड रूग्णांवर प्रभावी असलेले रेमेडेसिवीर इंजेक्शनचे दर नियंत्रणात ठेवावे. या इंजेक्शनचे दर 1100 ते 1200 रूपयादरम्यान नियंत्रणात ठेवावे. जिल्ह्यात पुढील रूग्णसंख्या वाढ लक्षात घेता ऑक्सीजन बेड व अन्य आरोग्यविषयक सुविधा तयार ठेवाव्या. गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

ते पुढे म्हणाले, हिवरा आश्रम येथील ग्रामीण रूग्णालयासाठी मनुष्यबळाचा आकृतीबंध तयार करून पाठवावा. त्याला मंजूरात घेता येईल. सध्या कोविड तपासणीचा वेग चांगला आहे. त्यासाठी कॅम्प घेणे, सुपर स्प्रेडरचा शोध घेणे आदी कारणे महत्वाची आहेत. तपासण्यांचा वेग कमी होवू देवू नका. याच धर्तीवर आता लसीकरणासाठी काम करावे. कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचा अवलंब करीत शिबरे आयोजित करून लसीकरण करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणाचा आढावा नियमितरित्या घेण्यात यावा. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.

बुलढाणा d.f.o अक्षय गजभिये यांची धडक कारवाई जळगाव जामोद वनविभाग येथील एक वनरक्षक आणखी निलंबित

0

गजानन सोनटक्के जळगाव जा

बुलढाणा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर संक्रांत ओढवली असून d.f.o अक्षय गजभिये त्यांनी पुन्हा जळगाव जामोद वनविभाग येथील एक वनरक्षक निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केल्याने संपूर्ण वनविभाग हादरला आहे मागील महिन्यात सुद्धा जळगाव जामोद येथील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले होते विशेष बाब म्हणजे आतापर्यंत जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील एकूण तीन कर्मचारी निलंबित झाले आहेत बुलढाणा d.f.o अक्षय गजभिये आपल्या कामात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष असून ते कामात कुचराई करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतात मागील फेब्रुवारी महिन्यात जळगाव जामोद वनपरिक्षेत्रात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला म्हणून वनपाल सलीम खान तसेच वनरक्षक गजानन सोळुंके यांना निलंबित केले होते खात्यात कार्यरत निष्क्रिय व कामचुकार कर्मचारी त्यांच्या रडारवर असून जळगाव जामोद वनपरिक्षेत्राच्या कुवरदेव बीटचे वनरक्षक कैलास सलामे यांनी गोमाल या गावातील एका आदिवासी बांधवांच्या घरातून सोलर ची बॅटरी चोरी केल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन d.f.o अक्षय गजभिये यांनी वनरक्षक कैलास सलामेला निलंबित केले आहे एका महिन्याच्या आत जिल्ह्यातील चार कर्मचारी निलंबित झाल्याने संपूर्ण वनविभागात खळबळ माजली आहे.

श्रीराम टॉकीज जवळील साई ज्वेलरीचे दुकान चोरट्यांनी लुटले

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट : येथील श्रीराम टॉकीज जवळील नगर पालिका कॉम्प्लेक्स मधील श्री साई ज्वेलर्स या प्रतिष्ठान मध्ये काल मध्यरात्री धाडसी चोरी झाली . यात सुमारे तीन लाख 52 रुपयांचे सोन्या चांदीचा दाग दागिने चोरट्यांनी लंपास केला .
चोरट्यांनी दुकानाचे टीनेचे शेड तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील दोन लाख रुपये किमतीचे 50 ग्राम सोन्याचे दागिने , 6 ग्राम सोन्याची मोड किंमत 30 हजार रुपये आणि दीड किलो चांदी किंमत 82 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला .या दुकानाचे संचालक सोमनाथ लोंढेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची तक्रार नोंदविली आहे . विशेष म्हणजे या चोरट्यांनी आजू बाजूचे तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला व चोरट्यांच्या हातात ज्वेलरीचे दुकान लागल्याने त्यांनी या दुकानात लुट करून पळ काढला . हे कॉम्प्लेक्स मध्यवस्तीत असून दिवसरात् या परिसरात आवागमन सुरु असते,मागील काही महिन्यात शहरात चोरीची मालिका सुरु असून पोलीस चोरट्यांपर्यंत अद्याप पोहचू शकलेले नाही .त्यामुळे व्यापारी त्यामुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे,या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपत चव्हाण करीत आहे.

 

बुलढाणा जिल्हयात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ‘

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

प्रादेशिक हवामान केंद्र, नागपुर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्हयात दि. १७ मार्च ते २० मार्च, २०२१ दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच या दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता आहे. यादरम्यान शेतकर्यांनी स्वत:ची व पशुधनाची यथायोग्य काळजी घ्यावी तसेच परिपक्व झालेल्या पिकांची त्वरित कापणी करावी व कापणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी . साठवणूक करणे शक्य नसल्यास शेतातील शेतमाल प्लास्टिक शीटने झाकून ठेवावा, जेणेकरून अवकाळी पावसापासून संबंधित शेतमाल खराब होणार नाही, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राचे हवामान तज्ञ अनिल जाधव यांनी दैनिक भारत संग्राम शी बोलताना केली आहे ‘

शेतातील कांदा पिकाचे रोही मुळे नुसकान ! शिंदी येथील शेतकरी गणेश भुतेकर यांची नुसकान भरपाई मिळण्याची वनविभागाकडे मागणी !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

अगोदर शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देत स्वतःच्या कुटुंबाचाउदरनिर्वाह भागवत आहे तसेच इतर लोकांना अन्नधान्य पुरवत आहे ‘मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला तसेच अधून मधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान होत आहे ।अजूनही अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे सुद्धा मिळाले नाही तर काही शेतकऱ्यांना नुसकान भरपाई सुद्धा मिळाली नाही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य पिकवत आहे ! सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी गणेश भुतेकर यांनी .साखरखेर्डा भाग 2 मधील गट नंबर 805 या आपल्या चार एकर शेतामध्ये ‘दोन एकर खाण्याचा कांद्या व दोन एकर मध्ये बियाच्या कांद्याची लागवड केली होती ‘परंतु रात्री-बेरात्री येणाऱ्या रोही मुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत ‘रोही बी रात्री येऊन कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुस्कान करत आहे शेतकरी गणेश भुतेकर यांच्या शेतातील ‘साडेतीन एकरातील कांदा पिकाचे रोहि या प्राण्यांनी नुसकान केली असून ‘शेतकरी गणेश भुतेकर हे पुरती हवालदिल झाली आहे ‘त्यांनी वन विभाग मेहकर यांच्याकडे घटनेचा पंचनामा करून नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे !अगोदरच शेतकरी हवालदिल झाला असताना तसेच कोरोनाच्या संकट काळामध्ये शेतमाल अनेक शेतकऱ्यांनी विकलेलाला नव्हता ‘ नैसर्गिक संकट व आता जंगली प्राण्यांचे संकट यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे तरी शेतकऱ्यांना त्वरित नुसकान भरपाई मिळावी एवढीच रास्त अपेक्षा !

रस्त्याच्या कडा न भरल्यामुळे स्वयंपाकासाठी जाणाऱ्या महिला च्या गाडीचा अपघात :स्वयंपाकी तीन महिला गंभीर जखमी !शिंदी ते साखरखेर्डा रोड वरील घटना !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शिंदी ते साखरखेर्डा या रस्त्याचे काम नुकतेच डांबरीकरण आणि पूर्ण झाली असून रस्त्यावर डबल कोट टाकल्यामुळे रस्ता दीड ते दोन फूट उंच झाला आहे सिंधी ते साखरखेर्डा हा रस्ता एकेरी असून एसटी बस आली तर साइट देण्यासाठी सुद्धा जागा अरुंद पडते .दिनांक 17 मार्च बुधवार ला सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान ‘मेहकर वरून मेरा बुद्रुक या गावी मालवाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये स्वयंपाकी करण्यासाठी तीन महिला व एक पुरुष जात होते ।दरम्यान सिंधी साखरखेर्डा पॉईंट जवळ साखरखेर्डा कडे भरधाव वेगाने एक इंडिका कार जात होती ‘व समोरून स्वयंपाक करणाऱ्या महिलांचा मालवाहतूक गाडी येत होती ‘दरम्यान इंडिका कार चालकाने मालवाहतूक गाडीला कट मारला मालवाहतूक करणाऱ्या चालकाने तातडीने गाडीचे चाक रस्त्याच्या कडेला खाली घेतले .व परत रस्त्याच्या कडेवरून गाडी परत रस्त्यावर घेत असताना ‘रस्त्याच्या कडा ह्याउंच असल्यामुळे ‘मालवाहतूक गाडी रस्त्यावर येऊ शकली नाही ।व गाडीचा तोल जाऊन गाडी .पलटली ‘यामध्ये महिलांना मार लागला असून त्यांना तातडीने मेहकर येथे दवाखान्यामध्ये उपचारासाठी रुग्णवाहिकेचे द्वारे पाठवण्यात आले ।त्यामुळे उंच केलेला रस्ता व त्याच्या बाजूला मुरमाचा भर देण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे ।दरम्यान घटनेची माहिती मिळताच घरी येणारे अशोक तोडे यांनी तातडीने महिलांना सुखरूप गाडीतून बाहेर काढले व त्यांना दवाखान्यामध्ये भरती केले !अशोक तोडे यांनी दाखवलेली माणुसकी मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे !