Home Blog Page 509

हिरोळे पेट्रोल पंप जवळील जागा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी योग्य ! ..नगरपरिषदेने जागा देण्यासाठी – ..राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘डॉ . आंबेडकर नगर .देशपांडे लेआउट ‘भीम नगर ‘तथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर परिषदेला निवेदने !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बुलढाणा शहरामध्ये व्हावे अशी इच्छा तमाम बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायी त्यांच्या मनामध्ये भिनली आहे !परंतु यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे जागेची !हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागाही स्मारकाच्या दृष्टीने मोठी व भव्यदिव्य आहे याठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रतिम व सुंदर असे स्मारक बनू शकते हीच इच्छा बुलढाणा जिल्ह्यातील तमाम भीमसैनिकांची आहे !हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा नगर परिषदेने त्वरित ताब्यात द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने निधी जमा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बनू शकेल ‘तीन मार्च रोजी सम्राट संघटनेच्यावतीने जागा मिळावी म्हणून नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी ही जागा हिरोळे पेट्रोल पंपाशेजारी मिळावे म्हणून निवेदन दिली आहे व रोज निवेदन देत आहेत ‘दिनांक 18 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले यामध्ये त्यांनी नगरपालिका कायदा 1965 अनुच्छेद 572 भाग 6 नुसार समाजाच्या भावनेत लक्षात घेता हिरोळे पेट्रोल पंपा शेजारी जागा नगर परिषदेने देण्याची मागणी केली आहे ‘या निवेदनावर बाला राऊत यांची सही आहे !तर भीम नगर वार्ड क्रमांक दोन च्या वतीने सुद्धा नगरपरिषदेला निवेदन देण्यात आली आहे ।यामध्ये 20 नागरिकांच्या निवेदनावर सह्या आहेत ‘तर देशपांडे क्रिडा संकुलन रोड मधील नागरिकांनी सुद्धा निवेदन दिलेले आहे ‘यावर पंजाबराव गवई भीमराव सुरडकर ‘जगन गवई ‘ नारायणराव आराख ‘सौ रमाबाई जाधव आदींच्या २५जणांच्या सह्या आहेत ।डॉक्टर आंबेडकर नगर यांच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आले ‘यावर विनोद गवई ‘रविकिरण मोरे आधीचे सह्या आहेत ।तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा शहर अध्यक्ष ‘अनिल बावस्कर यांनी सुद्धा नगरपरिषदेला जागा देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन दिले आहे ‘या निवेदनावर ‘मंगेश बिडवे राजेश गवई ‘सत्तार कुरेशी मनोज चंदन ‘किरण चव्हाण .प्रशांत जाधव ‘विनोद इंगळे गौरव देशमुख ‘विशाल फदाट ‘अमोल सोनवणे मंगेश शिंगणे आदींच्या सह्या आहेत ।

केन्द्र शासनाच्या किमान आधारभुत किमतीच्या नाफेड व्दारे हरभरा खरेदीस१९ मार्चपासुन खरेदीस शुभारंभ. ,. . ,.

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ दिनांक १९/०३/२०२१ रोजी सकाळी १o:३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समीती यावल येथे चोपडा यावलच्या आमदार लताताई सोनवणे, रावेर यावल चे आमदार शिरीष चोधरी ,खासदार रक्षाताई खडसे यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पुजन कार्यक्रम होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधीकारी,तहसीलदार महेश पवार यावल,कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील ,उपसभापती व संचालक मंडळ , जिल्हा परीषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे , आर जी पाटील (नाना ), जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव , पंचायत समीती सभापती सौ. पल्लवी पुरूजीत चौधरी , ,उपसभापती योगेश भंगाळे व पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते शेखर सोपान पाटील ,. पंचायत समिती सदस्य दिपक अण्णा पाटील , उमाकांत रामराव पाटील , कलीमा सायबु तडवी , सरफराज सिकंदर तडवी , लताबाई विजय मोरे आणी खरेदी उपाभिकर्ता विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ, सर्व राजकीय पक्षा चे प्रमुख पदाधीकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव, तसेच शेतकरी यांनी उपस्थितीथी द्यावी आणी शासन निर्देशीत कोवीड १९ चे सर्व नियम सर्वाना पाळावयाचे आहेत असे आवाहन विकास कार्यकार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे , सचिव मुकुंदा वामन तायडे यांनी केले आहे .

कोरोना संकटकाळात माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृती कार्यक्रमाचे प्रचार सायकलव्दारे 13 हजार 500 किलोमिटर तरूणाचा प्रवास,

0

 

. यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,

. कोरोना विषाणु संसर्गा महामारी संकटात राज्य शासनाव्दारे नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन माझे कुटुंब माझी जबाबदारी हे जनजागृतीचे अभीयान सुरू करण्यात आले असुन, याच कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापुरच्या एका अवलीया धाडसी तरूण युवकाने महामारीच्या महासंकटात आपले जिव धोक्यात घालुन सायकलव्दारे या जनजागृती मोहीम करीत अर्ध्याहुन अधिक महाराष्ट्र पिंजुन काढले असुन , या तरूणाचे यावल तहसीलच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर के पवार आणी महसुलचे मुक्तार तडवी , संतोष पाटील त्यांच्या सहकार्यानी महसुल प्रशासनाच्या वतीने त्याचे स्वागत केले . या संदर्भात कोल्हापुर जिल्ह्यातील या युवका कडुन पत्रकार प्रतिनिधी यांनी त्याच्याकडुन माहीती घेतली असता या तरुणाने आपले नांव नितिन गणपत नावनुरकर वय३९ वर्ष राहणार आंबोळी जिल्हा कोल्हापुर असल्याचे सांगुन आपण १ ऑक्टोबर २०२०पासुन कोरोना संकटातुन आपल्या राज्यातील नागरीक सुरक्षित कसे राहतील याच विषयाला आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यात सायकली व्दारे गावागावात फिरून आपण मास्क लावा, सोशल डिस्टींसिंगचे काटेकोर पालनकरा असे बोलुन जनजागृती व्दारे सर्वसामान्या पर्यंतसंदेश पहोचवत आहे . या युवकाने सहा महीन्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर , सांगली , सातारा , सोलापुर , पुणे , लातुर , अहमदनगर. औरंगाबाद , नागपुर , गडचिरोली ,भंडारा , गोंदीया, वर्धा , अमरावती , अकोला , बुलढाणा , जळगाव , धुळे , नंदुरबार असे २९ जिल्ह्याचे सायकलीव्दारे प्रवास करीत आजवर 13 हजार५०० किलोमिटरचा प्रवास केला आहे .कोरोनाच्या सर्वाधीक गोंधळलेल्या १ ऑक्टोबर २०२०पासुन सुमारे सहा महीन्याच्या वेळेपासुन हा तरूण आपल्या कुटुंबा पासुन केवळ आपल्या राज्यातील नागरीकांना आरोग्याची घेण्याचा विधायक दृष्टीकोण ठेवुन कोरोना विषाणु संसर्गा पासुन सावध करण्यासाठी या जिद्दी तरूणाने जनजागृतीच्या माध्यमातुन केलेल्या समाजकार्याला सलाम.

चुंचाळे गावातील प्रसिद्ध जागृत बाबा ताजोद्दीन च्या दर्गावरील उर्स ( यात्रा )यंदा कोरोना पार्श्वभुमीवर रद्द.

0

 

, ,. यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,तालुक्यातील चुंचाळे गावात येथील येथे हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणुन ओळखली जाणारी ताजोदीन बाबा आर्थात आरनीवाले बाबा यांची दर्गा ही म्हणून ओळखली जाते. येणाऱ्या १एप्रिल रोजी सालाबाद होणारी यात्रा ( उर्स ) कार्यक्रम रद्द करण्यात आले असुन , अगदी साध्या पद्धतीने लंगर ( प्रसादाचे ) कार्यक्रम होणार आहे. संपुर्ण देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणु संक्रमणामुळे कार्यक्रम अगदी मर्यादित स्वरूपात असेल व कोरोना संसर्गाच्या नियमांचे परिपुर्ण पालन करुन हा कायक्रम करणार आहे. अशी माहिती चुंचाळे तालुका यावल येथील हिंदु मुस्लिम एकता समितीच्या वतीने देण्यात आली असुन , पंचक्रोशीतील बाबांच्या शेकडो भाविकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे .
येथे दिलीप नेवे व संजुसिंग राजपूत यांच्या शेतामध्ये जवळपास नव्वद ते शंभर वर्षेपुर्वीपासुन जागृत देवस्थान ताजोदीन बाबा हे दोघं शेतांच्या बांधावर एक भले मोठे आरणीचे वृक्ष होते.तेथे ते कायम वास्तव्यात असल्यामुळे त्यांना अरणीवाले बाबा असे लोग म्हणत असत ते बाबा हे सर्वधामियांना मार्गदर्शन करत असत. संसार,प्रपंच,शेती या विषयांवर मार्गदर्शन करत.कालांतराने बाबांचा मूत्युनंतर त्यांचे थडके व दोहे शेतांच्या बांधावर होते.ते आज चुंचाळे येथील माजी सरपंच दगडु तडवी यांनी गावातील तसेच परिसरातील तडवी .हिंदू-मुस्लिम बांधवांच्या साह्याने चांगल्या प्रकारच्या दर्ग्याचे बांधकाम केले असून सर्वधमीय भाविकांच्या श्रद्धेपोटी त्या ठिकाणी मानता मानत असता.

वाघोडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेकाने ८४वर्षे वय वृद्धाच्या खाली जागेचा घेतला नियमबाह्य फेरफार.

0

रमाई आवास योजनच्या लाभार्थी
च्या नावाने दिला गाव आठ वर नोंद.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी हंसराज उके

नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समिती
अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वाघोडा येथील महादेव पांडुजी बाळे रा वाघोडा तालुका नांदगाव खंडेश्र्वर जिल्हा अमरावती येथे कायमस्वरूपी रहिवासी असुन वय ८४वर्षे झाली आहे गेले सन २०१७/२०१८ मधे
वाघोडा येथील रहिवासी सत्यभामा लोखंडे यांच्या नावाने
रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी गावातील वय वृध्द महादेव पांडुजी बाळे याची राहत्या घरासमोरील मालकी हक्काचे जागेचा कुठलाही व्यहार
अथवा कुठलेच दस्तावेज करून न देता रमाई आवास योजनेचा लाभर्थी यांचे नावाने महादेव बाळे
यांची खाली जागेवर अतिक्रमण तर सोडा चक्क नियमबाह्य नोटरी
च्या भरश्यावर ग्रामसेकाने गाव नमुना आठ वर नोंद घेऊन सत्यभामा लोखंडे यांचे नावाने रमाई आवास योजनेचा घरकुल सुध्दा उभे केले व ८४वर्षे वयाच्या मातार्यने ग्रामपंचायत च्या ग्रामसेकाला या बाबत बरेच वेळा विचारले असता ग्रामसेकाने उडवाउडवीची उतरे दिले व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी बरेच वेळा गेले असता
मातरपणाचा फायदा घेवुन त्या मातार्याला न्याय नाही मिळाला
अखेर गावातील एका व्यक्तीने आम्हचे पत्रकारांना हि माहिती दिली महादेव बाळे यांच्या कडील
जागेची दस्तऐवज व ग्रामपंचायत वाघोडा यांच्या कडील नमुना आठ कोणत्या आधारे नोंद केली आहे विचारले असता नियमबाह्य
नोटरीच्या परंतु महादेव बाळे यांच्या म्हणन आहे की मि कुठलाच व्यहार केला नाही व सत्यभामा लोखंडे यांच्या कुठलेच रक्ताचे नाते म्हणून सबंधित ग्रामसेवकावर नियमानुसार कार्यवाही करुन मला माझी जागा
मिळुन देण्याची मागणी मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्र्वर यांचे लेखी तक्रारी द्वारे मागणी महादेव बाळे यानी केली आहे

जेहुर पांधी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास, प्रहार शेतकरी संघटना करणार आमरण उपोषण

0

 

प्रतिनिधी -सचिन पगारे
नांदगांव नाशिक

जातेगांव येथील जेहुर पांधी रस्ता मागील पावसाळ्यात खुपच खराब होऊन शेतकऱ्यांचे येण्याजाण्याचे खुपच हाल झाले होते व शेतकऱ्यांना आपला शेतमाल गावापर्यंत विकण्यास आणता येत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले होते , तसे गट विकास अधिकारी पं.स.नांदगाव यांना निवेदन देऊन कळवीले होते आणि गट विकास आधीकारी पं.स.नांदगाव यांनी 20ऑक्टोबर 2020रोजी जातेगाव येथील जेहुर पांधी रस्त्याचे काम म.गांधी राष्ट्रीय ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत सन.2021-22 मधील क्रुती आराखड्यात सामावेश करण्याबाबत लेखी आस्वासन दीले होते.
परंतु अजुनही सदर रस्त्याचे काम सुरु झालेले नाही.म्हणुन सदर जेहुर पांधी रसत्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अण्यथा प्रहार शेतकरी संघटना व शेतकरी 25/3/2021 रोजी आमरण उपोषन करतील असे निवेदन दि.15/3/2021 रोजी गट विकास आधीकारी पं.स.नांदगाव व जातेगाव ग्राम पंचायत यांना देण्यात आले.या वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सुर्यवंशी, चंद्रकांत झोडगे, जय भागवत,रवी भागवत ईश्वर जाधव आदी उपस्थित होते

खांबावर लाईनचे काम करत असताना अचानक वीज सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायत शिपायाचा खांबावरच शॉक लागून दुर्दैवी मृत्यू ! ….नातेवाईकाच्या तक्रारीवरून लाइनमन व हेल्परवर गुन्हा दाखल ;

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे सकाळी १०वाजता ऐजी लाईन वर काम करत असताना विद्युत प्रवाह अचानक पणे सुरु झाल्यामुळे मलकापूर पांग्रा ग्रामपंचायत मध्ये काम करणारे ग्रामपंचायत शिपाई .विशंभर श्रावण मांजरे वय 50 यांचा खांबावरच विजेचा प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाला ‘
यामुळे मृत्युची बातमी गावात पसरताच हजारो लोक घटनास्थळी दाखल झाले ‘व दोषी असणाऱ्या लाइनमन व हेल्पर वर कारवाई करण्याची मागणी करू लागले .जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रेत खांबावरून काढणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी यावेळी घेतला ‘त्यामुळे गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ‘माहिती मिळताच साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे दुय्यम ठाणेदार दीपक राणे व पोलीस कर्मचारी सोबत घेऊ यांनी घटनास्थळ गाठले ‘लोकांना शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण लोक ऐकत नव्हते .त्यानंतर मृतकाचे भाऊ ‘नंदू श्रावण मांजरे वय ४२ यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल केली ‘या तक्रारी मध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की ’16 मार्चला सकाळी दहा वाजता लाईनमन .प्रशांत देशमुख व हेल्पर सोनपसारे .यांनी माझ्या भावाला बोलावून नेले ‘मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा रोडवर असलेल्या .रविराज वाईन बार समोरील एजी लाईनवर खांबावर पाठवले .व अचानकपणे वीजप्रवाह सुरू झाल्यामुळे माझा भाऊ मरण पावला ‘त्यामुळे लाईनमन प्रशांत देशमुख व हेल्पर सोनपसारे यांच्या वर त्याच्या मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये कलम ‘ ३०४नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ‘गुन्हा दाखल झाल्याबरोबर गावकऱ्यांनी प्रेत खांबावरून खाली घेतली व शवविच्छेदन करण्यासाठी बिबी येथे पाठवले ‘घटनेची माहिती मिळताच भाजप नेते विनोद भाऊ वाघ उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विलास यामावार हे घटनास्थळी दाखल झाले ‘नेमके विद्युत प्रवाह कसा सुरू झाला यावरून गावात तर्कवितर्कांना चर्चेला उधाण आले होते !ग्रामपंचायत शिपाई असलेले ‘विशंभर मांजरे हे अतिशय मृदू स्वभावाचे होते त्यामुळे मलकापूर पांग्रा गावात एकच शोककळा पसरली आहे .वृत्त लिहीपर्यंत मृतकांचा अंतिम संस्कार झालेला नव्हता ‘पुढील तपास साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत ‘

राष्ट्रीय महामार्गाचे काम उंद्री गावातून चौपदरी करणे बाबत स्वाभिमानीचे आकाश राऊत यांनी वारंवार निवेदने देऊनही ‘प्रशासनाची कारवाई नाही ‘

0

 

…आकाश राऊत यांनी मागितली तहसीलदाराकडे आत्महत्येची परवानगी !

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

चिखली तालुक्यातील उंद्री गावातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘ ५४८ सी सी .रोडचे काम सुरू आहे सदर गाव आहे चिखली – खामगाव – बुलढाणा – बाळापुर -महामार्गावर असल्यामुळे सदर गावात मोठी बाजारपेठ आहे ‘शैक्षणिक संस्था हिंदू . मुस्लिम स्मशानभूमी त्यामुळे गावातून चौपदरीकरणाचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे ‘परंतु गावातून जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम हे खूपच अरुंद झाले आहे .त्यामुळे अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहे ‘रस्ता होऊनही रस्त्याच्या दुतर्फा बाजूला नाल्याचे ही काम नसल्यामुळे पावसाळ्यात कमरे पर्यंत पाणी व्यवसायिक दुकानदाराच्या दुकानासमोर समोर साचत आहे .त्यामुळे हा परिसर अतिशय गलिच्छ होत असतो ‘त्यामुळे गावातून रस्त्याचे काम चौपदरीकरण करावे व पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जुन्या नाल्या पुनर्जीवित कराव्या .यासाठी 3 -9 -2020 ला सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांना निवेदन दिले होते .तसेच 3 -9 – 2020 ला उंदरी चौफुलीवर धरणे आंदोलन सुद्धा केले होते .तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते की सदर मागण्याचा विचार करून कारवाई होईल ‘सदर सार्वजनिक बांधकाम विभाग हे गोल-गोल उत्तर देत असून ‘कुठल्याही प्रकारची कारवाई ते करत नाहीत ‘यामुळे अनेक अपघात या रस्त्याने झालेली आहेत ‘त्यामुळे निराश होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आकाश राऊत यांनी तहसीलदार यांना दिनांक16 मार्च ला निवेदन दिले आहे व एखादा अपघात होणे अगोदर आम्हाला आत्महत्येची परवानगी द्यावी असा मागणीही यावेळी स्वाभिमानी चे आकाश राऊत यांनी निवेदनात केली आहे ‘त्यामुळे प्रशासन याकडे कसे बघते हे पाहणे औचित्याचे ठरेल ‘

आडगावराजातील विद्युत तार व पोल दोन दिवसात दुरुस्त करा सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांचा विद्युत वितरण ला आंदोलनाचा ईशारा !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

दिनांक १६/३/२०२१
तालुक्यातील आडगावराजा येथील गावठाण मधील ५० वर्ष जुने विद्युत पोल वाकलेले असुन विद्युत तारही जिर्ण झाले असल्यामुळे वारंवार तार तुटतात सदर तार तुटत असल्याने गावात जिवीत हानी होण्याची शक्यता असुन दोन दिवसात तार व पोल दुरुस्त करा अन्यथा ग्रामस्थासह विद्युत वितरण कार्यालया समोर आंदोलन करण्याचा ईशारा आडगावराजा येथील सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी ऊपअभियंता विद्युत वितरण सिंदखेडराजा यांना दिला आहे.
आडगावराजा येथे अंदाजे ५० वर्षापुर्वी विद्युत पोल व स्ट्रीट लाई साठी विद्युत तार टाकण्यात आले असुन सदर विद्युत पोल ठिकठिकाणी वाकलेले असल्यामुळे तारा झुकल्या आहेत. विद्युत तार जिर्ण झाले असल्यामुळे वारंवार तार तुटतात यामुळे अचानक पडलेल्या तारामुळे गावात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .यबाबतीत विद्युत वितरण कार्यालयात लेखी व तोंडी निवेदन देण्यात आले परंतु कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही . डिपीवर ए.बी.स्वीच नसल्याने परमीट घेऊन गावठाण बंद करावे लागते जर गावात तार तुटली तर परमीट घेतल्या शीवाय बंद करता येत नाही त्या मुळे गावामधे विद्युत करंट लागुन जिवीत हानी होण्याची शक्यता त्या मुळे सदर विद्युत तार व वाकलेले पोल दोन दिवसांत सरळ करा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा आडगावराजा च्या सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी ऊपअभियंता विद्युत वितरण व गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा यांना दिला आहृ

नेहरू युवा केंद्र बुलडाणा मार्फत कोरोना जनजागृती अभियान पथनाट्य नांदुरा येथे सादर

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

नेहरू युवा केंद्र युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयात भारत सरकारच बुलडाणाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर कोरोना जनजागृती व जलचक्र जनजागृती अभियानांतर्गत पथनाट्य च्या माध्यमातून कोरोना बद्दल सविस्तर बचाव माहिती आणि पाणी अडवा पाणी जिरवा या दोन ज्वलंत विषयावर पोवड्याच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ घेण्यात आला असून कोरोनाबाबतचे सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.गणेशभाऊ कदम यांच्या संचाने अप्रतिम कार्यक्रम सादर केला. यावेळी नेहरू युवा केंद्र नांदुरा स्वयंसेवक अमर रमेश पाटील,पत्रकार संतोष तायडे व इतर उपस्थित होते.