Home Blog Page 512

भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता यांचे महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जाहीर आवाहन

0

 

भीम आर्मीचे १५ मार्च पासून घर घर चलो सदस्यता अभियान

यावल (प्रतिनिधी).विकी वानखेडे,-

१३- बामसेफ संस्थापक कांशीराम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने १५ मार्च ते ३० मार्च या पंधरवड्यात घर घर चलो सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे. बहुजन समाजाला सत्तेत घेऊन जाणारे कांशिराम यांच्याविषयी माहीती देतानाच विविध कार्यक्रम यावेळी राबविण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ते रमाकांत तायडे यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशात बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणारे बामसेफ डिसफोर व बसपाचे संस्थापक कांशिराम यांचा येत्या १५ मार्च रोजी ८३ वी जयंती आहे.या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भीम आर्मीने सलग पंधरा दिवस कोरोनाचे नियम पाळत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे, व्याख्याने परीसंवाद, मेळावे, बैठका,नवीन शाखा उद्घाटने,महाराष्ट्र भीम आर्मीच्या 21 सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी
आदी विविध कार्यक्रम राबवविण्याचा निर्णय घेतला आहे .शिवाय चलो भीम आर्मी की ओर अंतर्गत सलग पंधरा दिवस घरघर चलो सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियाच्या माध्यमातून बहुज समाजाला त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती तायडे यांनी दिली.
भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील गायकवाड व मुख्य महासचिव सीताराम गंगावणे यांच्यासह महाराष्ट्र भीम आर्मीची संपूर्ण टीम या अभियानात सक्रियपणे सहभाग नोंदविणार असून बहुजन समाजातील नागरीकांनीही यात सहभाग नोदवावा असे आवाहन तायडे यांनी केले आहे.

तहसीलदाराला कट मारून रेती मुख्य रस्त्यावर खाली करून ट्रॅक्टर फरार( तहसीलदारासोबत एक तास गावकऱ्यांचा राडा)

0

 

संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक जोमात सुरू.
(दररोज हजारो ब्रास रेती वाहतूक सुरू, महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष)

संग्रामपूर तालुक्यात मागील काही महिन्यापासून नदी व नाल्यांना रेती तस्करांची काळी नजर लागली असून सर्रास रेतीचे उत्खनन करून त्याची ट्रॅकटर, टाटा 407, डीसीएम व इतर वाहनातून अवैधरीत्या वाहतूक सुरू आहे. त्यामुळे नदी, नाल्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत दिवसाकाठी हजारो ब्रास रेतीचे तस्करी करण्यात येत आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी दररोज याच रस्त्याने ये-जा करत असून हे महाशय अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. दि. 14 मार्च रोजी रिंगणवाडी येथील वान नदीतून एम एच —- संग्रामपूर कडे जात असतांना वरवट बकाल येथील कृष्णा कॉम्प्लेक्स जवळ तहसीलदार कोरे पायी जात असताना ट्रॅक्टर चालकाने तहसीलदार यांना कट मारून वरवट गावात पळ काढून तहसीलदार पाठलाग करत असल्याचे समजताच वाहन चालकाने मुख्य रस्त्यावर 500 फूट रेती रस्त्यावरच खाली केली. विशेष 18 फेब्रुवारी रोजी एका टिप्परने रेती भरलेले वाहन नेकणामपूर फाट्याजवळ रस्त्यावर खाली केल्याने त्या अपघातात वरवट बकाल येथील पांडुरंग ढगे यांचा मृत्यू झाला होता. ते राहत असलेल्या घरापासून पोस्ट ऑफिस च्या समोरून मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ पर्यंत रेती खाली करून पळ काढला. गावातील काही लोकांनी ट्रॅक्टर ची चावी काढून टायर पंचर केले तरीही वाहन चालक तेथून वाहन घेऊन फरार झाला. गावातील सरपंच व सदस्यांनी तहसीलदार तेजश्री कोरे यांना फोन करून घटनास्थळी बोलावले. या रेती तस्करीमुळे गावातील एक जीव गेला असून गावातील नागरिकांनी तहसीलदार कोरे यांना 1 तास धारेवर धरले. मागील 18 फेब्रुवारी रोजी रेतीने भरलेले टिप्पर शेगावकडे जात असताना वानखेड फाट्यावरून महसूल ची गाडी त्या टिप्पर च्या मागे लागल्याने त्या तस्कराने ते रेतीने भरलेले टिप्पर नेकनामपूर फाट्यावर रस्त्यावरच खाली करून टाकले व तेथून पळ काढला. त्यामुळे त्या रात्री 8 ते 10 मोटारसायकलचा त्या रेतीवरून घसरून अपघात झाला. त्या अपघातातील पांडुरंग पुंजाजी ढगे वय 47 वर्ष हे शेगाव वरून वरवट ला जाण्यासाठी निघाले संध्याकाळी 7 वाजता ढगे यांची मोटारसायकल त्या रेतीवरून घसरून अपघात झाला. ढगे यांना डोक्याला व पाठीला जबर मार लागला होता. त्यांना तेथून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर अकोला येथे नेण्यात आले होते. तेथून सुध्दा डॉक्टरांनी नागपूर येथे रेफर केले. 3 दिवस उपचार केले असून आज दि. 24 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता नागपूर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ह्याआधी सुध्दा असेच अवैध रेती वाहतुकीमुळे कित्येक बळी गेले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील अवैध रेती वाहतूकिला आळा घालावा अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
वास्तविक पाहता गौण खनिजाला आळा बसावा म्हणून तहसील प्रशासनाने पथकाची निर्मिती केली आहे परंतु या रेती तस्करांकडे हे पथक हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे त्यामुळे कुठंतरी पाणी मुरत असल्याची शंका येत आहे. विना नंबर व बनावट नंबरच्या वाहनांची संख्या जास्त प्रमाणात असून व या तस्करांचे दलाल महसूल विभागाचे लोकेशन या तस्करांना देत असल्याने कारवाई करण्यात महसूल विभाग यांचे पथक कुचकामी ठरत आहे.
पंचनामा करून कारवाई करण्यात येईल. मी पायी चालत होती त्यावेळी ह्या ट्रॅक्टर ने मला कट मारून वरवट गावात पळ काढला व भर रस्त्यात ट्रॅक्टरमधली रेती खाली करून तेथून पळ काढला. त्या वाहनाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तेजश्री कोरे, तहसीलदार संग्रामपूर.

यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका , बाजरी , ज्वारी खरेदीची हमीभाव १० कोटी८२ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा, ..

0

 

यावल (प्रतिनिधि)विकी वानखेडे,

तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातुन तथा केन्द्र शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातुन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मका , बाजरी , ज्वारीच्या खरेदी केलेल्या धान्याची १oकोटी८२ लाख३७ हजार रूपयांची रक्कम ही १७१३ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहीती वि का सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी दिली आहे .कोरोना संकटाच्या काळात आदीच संकटात सापडलेले शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी जेणे करून त्यांना सहकार्य करता येईल नाफेडच्या माध्यमातुन खरीपाची खरेदी साठी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आपणास मिळाला होता पण त्यापैक्की पन्नास टक्केच ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकरी बांधवांचा धान्य आम्हास खरेदी करता आला, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये शासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती . शासन खरेदी व बाजार भावच्या तुलनेत खरेदीचा जो फरक शासनाने शेतकऱ्यांद्यावा अशी ही मागणी होत आहे . हरभऱ्याची ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली असुन , ही नोंदणी करीत असतांना खुल्या बाजाराचा भाव देखील जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी जर शासनाच्या या हमीभाव धान्य खरेदीकडे पाठ फिरवली तर विकास सोसायटीच्या माध्यमातुन होत असलेली ऑनलाईन नोदंणीची प्रक्रीया व त्यास लागणाऱ्या परिश्रम वेळ आणी खर्चाचा भुर्दंड हा विकास सोसायटीस बसणार आहे . यासाठी शासनाने काही तरी उपाय योजना करावी अशी मागणी कोरपावली विकास सोसायटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनकडे करणार असल्याचीही माहीती सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली .

यावल तालुक्यात प्रशासकीय पातळीवर महसुल , पोलीस , पंचायत समिती , नगर परिषद व्दारे सत्तर टक्के लसीकरण . .

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,येथील प्रशासकीय पातळीवर कोवीड19च्या लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळत असुन , पंचायत समितीच्या माध्यमातुन शासनाच्या वतीने प्राप्त होणाऱ्या गावातील विविध शासकीय योजनाची अमलबजावणी करण्यासाठी सदेव तत्पर राहणाऱ्या ग्रामसेवकांना देखील लसटोचणीस सुरूवात झाली आहे . दरम्यान आज यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ग्रामसेवक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष रुबाब तडवी यांनी लस घेवुन या कार्यक्रमाची सुरवात केली , या प्रसंगी ग्रामसेवक व्ही .एल . पाटील , एन व्ही गायकवाड यांच्यासह आदीनी यात सहभाग घेतला . दरम्यान यावल तालुक्यात महसुल , पोलीस , नगर परिषद , पंचायत समिती प्रशासन असे सर्व प्रशासकीय पातळीवर एकुण ७० टक्के जणांनी कोवीड19ची व्हेक्सीनचे लसीकरण लावुन घेतले आहे . या लसीकरण मोहीमेस यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे, डॉ . फिरोज तडवी , डॉ बी बी बारेला , डॉ . मनीषा महाजन , डॉ . गौरव भोईटे , डॉ .नसीबा तडवी यांच्यासह सर्व आरोग्य सेविका कर्मचारी आदी परिश्रम घेत आहे . यावल तालुक्यातील एकुण सहा प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातुन एकुण १३o७ जणांनी लसीकरणाच्या मोहीममध्ये सहभाग घेतला असुन , यात वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेवक तथा ४५ वर्ष वयोगटा पासुन ५०ते ६० वर्ष वयोगटातील विविध आजाराने ग्रस्त नागरीकांचा देखील समावेश असुन, याप्रसंगी नागरीकांनी कोरोनाच्या लसबाबत पसरविण्यात येत असलेल्या गैरसमजबाबत जागृत राहुन कुणाच्याही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी यांनी केले आहे .

शहरातील शास्त्री वार्ड रेल्वेपुलावरुन पित्यासोबत स्कूटरने जाणाऱ्या मुलीच्या हातातील मोबाईल हिसकाविल्याची घटना

0

 

सचिन वाघे वर्धा जिल्हा प्रतिनिधि

१३ फेब्रूवारी रोजी रात्री शहरात घडली होती.
सदर जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास येथील डी. बी पथकाने आज अटक करून त्यांचेकडुन २५ हजार रूपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
प्राप्त महितीनुसार दिनांक 13 फेब्रूवारीचे रात्री ८.३० वा.सुमारास तक्रारकर्ता त्याच्या मुलीसोबत बजाज एम. ८० गाडीने हिंगणघाट येथुन बुरकोणी येथे जाण्यास निघाला असता
शहरातील सेंट जॉन शाळेकड़े जाणाऱ्या रेल्वे उडाण पुलावरून जात असता मागुन मोटरसायकलने येवुन मुलीचे हातातील विवो कंपनीचा वापरता मोबाईल जबरीने हिसकावित पळ काढला.
याप्रकरणी मुलीचे वडिलांच्या तक्रारीवरून अपराध क्र. १४८/२०२१ कलम ३९२भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करीत पोलिसांनी तपास केला.
सदर गुन्हा दाखल होताच पोस्टे हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुखपो.हवा. शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह सदर गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेला मोबाईल हा
शास्त्री वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा विक्की लारोकर याने हिसकावुन नेल्याची माहिती मिळाल्याने आरोपीस ताब्यात घेतले. सदर मोबाइल चोरी केल्याचे कबुली दिली असुन, त्याचे कडुन सदर अॅन्ड्राईड
मोबाईल व गुन्हयात वारलेली होंडा ड्रीम युगा मोटरसायकल. क्र. एमएच-३२/ झेड-२२४५ असा २५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विक्की रामदासजी लारोकार, वय 25 वर्ष, रा. शास्त्री वार्ड,हिंगणघाट यास अटक केली असुन, सदर आरोपीविरुद्ध
यापुर्वी सुध्दा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद आहे.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी,दिनेश कदम, पो.नि. संपत चव्हाण मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली.

संग्रामपूर प स मार्फत आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप प स सभापती सौ धर्माळ यांच्याहस्ते

0

 

पातुरडॉ बु  जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत प स संग्रामपूर मार्फत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील कुटुंबियांना आर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप प स सभापती सौ रत्नप्रभा ताई धर्माळ यांच्या हस्ते करण्यात आले
या मध्ये एक कुटुंबाला एक डबी देण्यात आली असून या मध्ये बारा वर्षा खालील मुलाना 2 गोळ्या व बारा वर्षावरील वयोगटातील लोकांना 4 गोळ्या उपाशीपोटी सकाळी घ्याव्या अशाप्रकारे तीन दिवस गोळ्या घेण्याचे आव्हाहन प स सभापती सौ रत्न प्रभा ताई धर्माळ यांनी केले आहे या वेळी प स संग्रामपूर चे बिडीयो,भाजप ता प्रमुख लोकेश राठी,जेष्ठ भगवान राठी,कृषी अधिकारी उंदरे साहेब,माजी सरपंच सावळी प्रकाश अरबट,सुधाकर शेजोळे, अविनाश धर्माळ,राजू मुयांडे, गोवर्धन खोंड,संजय ठाकरे,यांची उपस्थिती होती आर्सेनिक अल्बम च्या डब्या प्रत्येक ग्रा प च्या सरपंच याना देण्यात आल्या

अपंगांसाठी राखीव ५ टक्के निधीचे वितरण नियमानुसार व्हावे,

0

 

आयुषी दुबे शेगाव/बुलढाणा

मलकापूर- अपंग/दिव्यांग बांधवांना भेडसावणार्या विविध समस्या तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास त्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्यात येवून अपंगांसाठी राखीव ५ टक्के निधीचे वितरण नियमानुसार व्हावे, संजयगांधी व श्रावण बाळ योजनेचे अनुदान नियमितपणे मिळावे, दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात याव्यात यासह आदी मागण्यांचे निवेदन आज १२ मार्च रोजी लोणार (सरोवर) अपंग विकास सेवाभावी असोसिएशन मलकापूर तालुकाध्यक्ष कलीम शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, अपंग/दिव्यांग बांधवांकरीता नियमानुसार ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. मात्र या निधीचे वितरण मलकापूर न.प.च्या वतीने गेल्या चार-पाच वर्षापासून अनियमित व चुकीच्या पध्दतीने करण्यात येत आहे. यामध्ये सन २०१७-१८ व सन २०१८-१९ मध्ये अपंग बांधवांच्या अनुदानाकरीता ३ टक्के राखीव नियमानुसार प्रत्येक वर्षाकरीता १० लक्ष रूपये आरक्षित ठेवण्यात आले होते. त्यामधून अंदाजे दोन वर्षात प्रत्येकी ७ ते ८ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले. तर सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये न.प.च्या माध्यमातून अंपग बांधवांना ५ टक्के निधी राखीव ठेवण्याच्या नियमानुसार २२ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र न.प.च्या वतीने अपंग बांधवांना अनुदानाचे वितरण करतांना कमी रक्कमेचे वितरण करून हे वितरण सन २०१९-२० चे असल्याचे सांगण्यात आले. तसेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातसुध्दा न.प.च्या वतीने अपंग/दिव्यांग बांधवांच्या ५ टक्के अनुदानासाठी किती रूपयांची तरतूद करण्यात आली आहे याबाबत अद्यापही कुठलीही माहिती देण्यात येत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून अपंग/दिव्यांग बांधवांच्या राखीव निधीचा घोळ न.प. प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे अनुदान नियमितपणे जमा होत नाही व जमा झालेतरी बँकांकडून खात्यामध्ये वळती करण्यास वेळ लागत असल्याने अपंगाना या अनुदानाच्या रक्कमेची वाट पहावी लागत आहे.
दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेच्या लाभापासून तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहावे लागते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र रेशनकार्ड देण्याबाबत यापुर्वी निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आमच्या संस्थेने सव्र्हे करून दिव्यांग बांधवांचे स्वतंत्र रेशन कार्ड मिळयासाठीचे प्रस्ताव दाखल केलेले होते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ७० अपंग/दिव्यांग बांधवांना स्वतंत्र रेशनकार्ड देण्याबाबतचा कोटा निर्धारीत करून तहसील प्रशासनाला तसे आदेश सुध्दा दिले होते. मात्र आजपर्यंत केवळ ३० लाभाथ्र्यांनाच स्वतंत्र रेशनकार्ड वितरीत करण्यात आले असून आजरोजी स्वतंत्र रेशनकार्ड मिळावे याकरीता अंदाजे २५० ते ३०० प्रस्ताव तहसीलस्तरावर प्रलंबित आहेत. त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासन परिपत्रक क्र.बैठक-२०२०/प्र.क्र.१९/नापु२८ दि.२१ डिसेंबर २०२० अन्वये दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शासनाचे आदेश असल्याने मलकापूर शहर व तालुक्यातील दिव्यांग/अपंग बांधवांना स्वतंत्र रेशनाकर्ड देण्याबाबतची कार्यवाही जलद गतीने राबविण्याचे निर्देश स्थानिक तहसील प्रशासनास देण्याबरोबरच आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेवूनन अपंग/दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष कलीम शेख, शहराध्यक्ष नागेश सुरंगे, शेख जाफर, निखील पोंदे, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार वानखेडे यासह आदींच्या स्वाक्षNया आहेत.

चौकट
यावेळी अपंग/दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी सविस्तरपणे माहिती जाणून घेत हा प्रश्न मलकापूर तालुक्यापुरता मर्यादीत आहे की जिल्ह्याचा आहे असे विचारून आपल्या निवेदनाबाबत लवकरच ठोस अशा उपाययोजना करण्यात येवून संबंधितांना याबाबत कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात येईल असे आश्वस्त केले.

विषारी साप चावल्यामुळे झालेल्या आदिवासी शेतकरी मुबारक दगडू तळवी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून ४ लाख रुपये मिळणार असल्याचे माहिती

0

 

 

यावल विकि वानखेड़े

यावल तालुक्यातील बोरखेडा खुदृ येथे विषारी साप चावल्यामुळे झालेल्या आदिवासी शेतकरी मुबारक दगडू तळवी यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून ४ लाख रुपये मिळणार असल्याचे माहिती तलाठी समीर तडवी आणि कृषी सहाय्यक गजानन निंबाळकर यांनी यांनी दिली यावल दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता सोमारास मुबारक दगडू तडवी वय 35 वर्ष राहणार बोरखेडा खुद्र तालुका यावल येथील राहणार आदिवासी शेतकरी आपल्या बोरखेडा खुदे शिवारातील शेतात हरभरा काढणीचे काम करीत असताना तडवी यांच्या विषारी साप पायास चावा ह घेतल्याने त्यांना तात्काळ यावल येथाली ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले असताना मुबारक दगडू तडवी यांचे दुदैवी निधन आले आज दुपारी त्यांच्या बोरखेडा गावात त्यांचा दफन विधी करण्यात आला . या घटनेचे विस्तार माहिती ती घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने परसाडे परिसराचे तलाठी समीर तडवी व कृषी सहाय्यक गजानन निंबाळकर बोरखेडा गावातील पोलीस पाटील सद्दाम तडवी यांनी मयत म तडवी व त्यांच्या कुटुंबातले वडील दगडू तडवी त्यांची पत्नी व दोन लहान मुलीची भेट घेवुन सांत्वन केले व शासनाच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांच्या माध्यमातून मयताच्या कुटुंबास भरीव मदतीसाठीचा प्रस्तव सादर करण्यात आल आहे

जिल्ह्यात शनिवार व रविवारला टाळेबंदी नाही

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-दि.12: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू आहेत. शनिवार व रविवारला टाळेबंदी चे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. मात्र सदर आदेश रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवार व रविवार दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने सुरू राहणार आहेत. तसेच सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे, असे शुध्दी पत्रकाद्वारे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

जीर्ण झालेल्या बाभळीच्या झाडाची फांदी रस्त्यावर तुटून पडली !सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

लव्हाळा ते साखरखेर्डा रस्त्यावरील
रस्त्यालगत असलेल्या जीर्ण झालेल्या एका मोठ्या बाभळीच्या झाडावरील ‘ बाभळीची फांदी रस्त्यावर पडली ‘त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना होता होता वाचली ‘साखरखेर्डा ते लव्हाळा हा रस्ता नेहमीच वर्दळीचा आहे या रस्त्याने खामगाव -मेहकर – अमडापूर – चिखली – मार्गे अनेक प्रवासी प्रवास करत असतात .तसेच शुक्रवारी हा साखरखेर्डा येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्यामुळे नेहमीच दुचाकीस्वारांची या रस्त्याने ये-जा असते ‘दिनांक 12 मार्च रोजी दुपारी एक ते दीड च्या दरम्यान .मोठ्या बाबळीच्या झाडावरील फांदीतून तुटून खाली पडली .सुदैवाने कुठलेही प्रकारचे वाहन त्या दरम्यान गेले नाही ‘अन्यथा दुर्घटना घडली असती ‘म्हणून रस्त्यालगत जीर्ण झालेल्या मोठ्या बाभळीचे झाडे तोडून टाकण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली आहे ‘अन्यथा अनेक दुर्घटना घडल्यास वेळ लागणार नाही ‘